Saturday, July 30, 2022

सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदारे यांना स्मशानभूमीसाठी जागा मिळावी अशा आशयाचे निवेदन वीरशैव लिंगायत सामाजिक संघटना सिन्नर


 सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदारे यांना स्मशानभूमीसाठी जागा मिळावी अशा आशयाचे निवेदन वीरशैव लिंगायत सामाजिक संघटना सिन्नर
 सिन्नर- दि 30  :-- शाम सुंदर झळके प्रतिनिधी
सिन्नरमध्ये वीरशैव लिंगायत समाजाची संख्या लक्षणीय असून त्यांना स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा   नसल्यामुळे समाजाची कुचंबणा होत आहे.वीरशैव लिंगायत धर्म परंपरेनुसार अग्निसंस्कार न करता, जमिनीत खोलवर पाच सहा फूट खोल खड्डा खोदून त्यात पार्थिव आसनस्थ स्थितीत दफन केले जाते व त्यावर समाधी बांधण्याची प्रथा कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. सिन्नरमध्ये दोन शासकीय तसेच सहकारी औद्योगिक सहकार वसाहती असल्यामुळे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून वीरशैव लिंगायत समाजाचे लोक सिन्नरमध्ये येऊन स्थिरावले आहेत. त्यामुळे  दिवसेंदिवस संख्या वाढत असताना स्मशानभूमी (रुद्रभूमी)   करीता स्वतंत्र जागा नाही त्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते.फार पूर्वी संगमनेर नाक्याजवळ नगरपालिका हद्दीत मोकळी जागा होती तेथे अंत्यविधी होत असे त्यावेळी समाजाची संख्या नगण्य होती त्यामुळे अडचण येत नव्हती.आता तेथेपण अतिक्रमण झाल्यामुळे लिंगायत समाजाला कोणीच वाली राहिला नाही.या ठिकाणी दशनाम गोसावी समाजाची स्मशानभूमी आहे पण त्यात दुसऱ्या समाजातील लोकांना अंत्यविधीसाठी जागा देत नाही.त्यांच्यातही पार्थिव दफन करण्याची प्रथा आहे.या सर्व बाबींचा विचार करून वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमी साठी जागा मिळावी अशी मागणी सिन्नर तालुका वीरशैव लिंगायत सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी सिन्नर नगरपरिषदे चे मुख्याधिकारी संजय केदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी डॉ.विजय लोहारकर, सोमनाथ लोहारकर, मुकुंद वाळेकर,राहुल घोंगाणे, संतोष वाळेकर,किरण लोहारकर,दिलीप ठेंगे,अविनाश आष्टुरे,विजय गवंडर,मुकुंद बोरीकर,सुनील लोहारकर,विजय आष्टुरे, सुहास आष्टुरे, मंगेश लोहारकर,गणेश अंकद,सतीश लोहारकर,मंगेश जंगम,अनिकेत पाचपाटील आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Thursday, July 28, 2022

शिरोळ तालुका लिंगायत समाजाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ


शिरोळ तालुका लिंगायत समाजाच्या वतीने 
 समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ
शिरोळ दि.29 -  संजय शहापुरे शिरोळ तालुका प्रतिनिधी 

शिरोळ तालुका लिंगायत समाजाच्या वतीने सन 2022 मध्ये ई.10 वी व ई.12 वी तसेच इतर स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचा सत्कार सोहळा रविवार दि.31 जुलै 2022 रोजी दारे मल्टिपर्पज हॉल,शिरोळ - अर्जुन वाड रोड ,शिरोळ येथे दु.3.30 वा .आयोजित करण्यात आला आहे.
हा सत्कार सोहळा मा.श्री.गणपतराव पाटील (दादा ), मा. चेअरमन श्री दत्त सहकारी साखर कारखाना यांच्या शुभहस्ते होणार आहे.यावेळी मा.प्रमोद चौगुले ,एम.पी.एस.सी.राज्य श्रेणी 1-  सन 2020 व मा.शिरीष शहापूरे , मा.नायब तहसीलदार,सन 2020 यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे 
या वेळी मा.राजेंद्र कुंभार सर्, माजी प्राचार्य .जयसिंगपूर कॉलेज,जयसिंगपूर तसेच मा.गणेश नायकुडे सर् , मा.चेअरमन,गुरुकुल आय आय टी व मेडिकल अकादमी ,अब्दुल लाट हे प्रमुख वक्ते म्हणून लाभणार आहेत.
या कार्यक्रमासाठी संयोजक शरण श्री.संजय शहापुरे 9972869472,रमेशकुमार मिठारे 9822332446,सुधीर शहापुरे 9881086021,स्वप्नील चौगुले 8669569891 यांचेशी संपर्क साधावा.
तरी आपण सर्व जण या कौतुक सोहळ्यास हजर रहावे.असे आवाहन शिरोळ तालुका लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

Monday, July 25, 2022

मुरिगेप्पा चेंन्ननावार ठरले सर्वात उत्कृष्ट सायकल पटू, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस च्या वतीने त्यांचा गौरव

 



मुरिगेप्पा चेंन्ननावार  ठरले सर्वात उत्कृष्ट सायकल पटू, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस च्या वतीने त्यांचा गौरव 


मुरिगेप्पा चेंन्ननावार  ठरले सर्वात उत्कृष्ट सायकल पटू, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस च्या वतीने त्यांचा गौरव 



सातारा, दि.25 -प्रा अजय शेटे प्रतिनिधी 

 इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आयोजित केल्या गेलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल स्पर्धेत श्री. मुरीगेप्पा चेन्ननावार यांनी  हि सायकल शर्यत अतिशय योग्य अवधीत  जलद गतीने पूर्ण करून  एक नवा  विक्रम केला आहे.

 याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.धीरजराय चौधरी यांच्या सहीने त्याला खास प्रशस्ती पत्र व सुवर्णपदक खास बक्षीस म्हणून बहाल करण्यात आले आहे.




आपल्या या मोहिमेबद्दल  मुरिगेप्पा यांनी सांगितले की,आपण सर्व आदरयुक्त व्यक्तींना मला हे सांगताना आनंद व अभिमान वाटतो की,सर्वात उत्कृष्ठ सायकलपटू कोण हे पाहण्यासाठी ही    काश्मीर ते कन्याकुमारी   ' के 2 के ' स्पर्धा म्हणजे तरुणांनी सर्व प्रकारच्या व्यसनांना पहिल्यांदाच नकार देण्याची मानसिकता तयार करण्यासाठी आयोजित केली गेली होती.या स्पर्धेची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस' मद्ये होणार होती.माझ्यातील उत्कृष्ठ सायकल पटूला यातून स्वतःला पुन्हा एकदा नव्याने सिद्ध करण्यासाठी आव्हान होते.या मोहिमेत मी एकूण 3649 किमी सायकल चालवली.या वेळी नऊ राज्यांचा प्रवास करावा लागला .तसेच यामध्ये श्री वैष्णोदेवी, कटरा, जम्मू- काश्मीर ते कन्याकुमारी अशा दुर्गम भागातून प्रवास करायचा होता.

मी त्यासाठी ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2021 या कालखंडात भरपूर सराव केला होता.यावेळी सदानंद अमरापूर नावाचा माझा मित्र हा मदतनीस सहकारी होता.याच वेळी कन्नड अभिनेता व कर्नाटक रत्न  तसेच थोर मानवता वादी कार्यकर्ता पूनित राजकुमार यांच्या मृत्यूची सल माझ्या मनात होती.तसेच त्यावेळी मला माझ्या काही आरोग्याच्या तक्रारींना अचानक पणे सामोरे जावे लागले.त्यामुळे माझ्या कौटुंबिक डॉक्टरांनी मला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता पण मला जास्त काळ या अडचणीत अडकायचे नव्हते.

त्यानंतर जवळ जवळ तीन महिन्याच्या प्रदिर्घ विश्रांती नंतर मी mazi' K2K - अँटी ड्रग ' अर्थात व्यसन विरोधी सायकल मोहीम सुरू केली व  ' व्यसन विरोधी दूत ' बनून मोहिमेला  सुरुवात केली.यावेळी माझ्याबरोबर माझा जिवलग मित्र प्रशांत हिप्परगी हा होता.एक महिन्याचा अधिक विश्रांती नंतर मी  ' जम्मू - काश्मीर ते कन्याकुमारी ' ( तामिळनाडू ) अशी सायकल फेरी पूर्ण केली.

त्यामुळे मी माझ्या सर्व सहकारी व हितचिंतक यांचा खूप खूप आभारी आहे की , ज्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद यांच्या मुळे ही अवघड सायकल मोहीम मी पूर्ण करू शकलो.

तसेच मी खास करून माझी आई ,पत्नी व मुले  तसेच माझे मोहिमेतील सहकारी प्रकाश चंन्ननवार ,अक्षय चनागौदर  व डॉ.सोहेल यांचाही खूप खूप आभारी आहे. कारण या सर्वांनी रात्रंदिवस केलेल्या सहकार्यामुळेच मी ही मोहीम पूर्ण करू शकलो. माझे या मोहिमेचे यश मी अभिनेता कै.पुनीत राजकुमार यांच्या पवित्र स्मृतिस अर्पण करतो.

वीरशैव इंटरनॅशनल व लिंगायत टिव्ही लाईव्ह, लिंगायत समाज , तसेच   

समस्त भारत वासियांच्या वतीने या सर्व चमूचे हार्दिक अभिनंदन व त्याच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .





खानापूर येथे उपजिल्हाधिकारी यांचा दिव्यांग परिसंवाद संपन्न

 


खानापूर येथे उपजिल्हाधिकारी यांचा दिव्यांग परिसंवाद संपन्न  



  खानापूर येथे उपजिल्हाधिकारी यांचा दिव्यांग परिसंवाद संपन्न  



       खानापूर:दि २५ ;- शिवकुमार कल्याणी प्रतिनिधी 

देगलूर तालुक्यातिल खानापूर येथे  दिनांक २२/७/२२ रोजी ससहाय्यक जिल्हाधिकारी देगलूर श्रीमती सौम्या शर्मा यांनी परिसंवाद साधला असुन ग्रामपंचायत खानापूर येथे दिव्यांग बांधवांची बैठक घेऊन दिव्यांगा सोबत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे

 उपजिल्हाधिकारी श्रीमती  सौम्या शर्मा मॅडम यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालय खानापूर येथे दि २२ रोजी दुपारी दिव्यांग बांधवांची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस गावातील सर्व दिव्यांग बांधव, श्रवणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना, च्या सर्व लाभार्थ्यी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तेव्हा मा.साह. जिल्हाधिकारी यांनी उपस्थित लाभार्थ्यांसोबत आधार कार्ड, राशन कार्ड, अपंग प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र बाबत चर्चा करून  ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही त्यांची यादी तयार करून सादर करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस केले तसेच वरील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपल्या गावात ॒दिवंगमित्र॒ निवड करण्यात येईल असे सांगितले. 





तसेच ग्रामपंचायत खानापूर येथील सुविधा केंद्र अद्यावत करून दिव्यांगाना योजना मिळवून देण्यासाठी माहितीपत्रक लावण्यात यावे अशा सूचना दिल्या ,आणि गावातील एकही दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी दिवंगमित्र यांनी घेतली पाहिजे. त्यासाठी गरज पडल्यास संसाधन व्यक्तीची निवड करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या, यानंतर ग्रामपंचायत मार्फत चालू असलेल्या कामाची माहिती गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांच्याकडून घेऊन दिव्यांग बांधवांना पंधरावा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीच्या पाच टक्के निधी वितरित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले, 



 ग्रामपंचायती कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्षारोपणाबाबत उपस्थित सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच गावातील रस्त्याची विकास कामे पाहणी करत असताना अतिक्रमीत असलेले रस्ते अतिक्रमण मुक्त करून कामे करावे त्यासाठी प्रशासन आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन गावातील नागरिकांना दिले. त्यानंतर खानापुर येथील जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छता, पाणीपुरवठा, विकास कामे पोषण आहार, ची पाहणी करून विद्यार्थिनीशी संवाद साधला. व विद्यार्थ्शी संवाद साधला यावेळी या कार्यक्रमास गटविकास अधिकारी शेखर देशमुख गटशिक्षणाधिकारी कृषी अधिकारी श्री ईडोळे , विस्तार अधिकारी दयानंद सूर्यवंशी ,संगमेश्वर कानडे, खानापूर महसूल चे मंडळ अधिकारी तलाठी अनिल सरगर हे उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक खानापूर चे ग्रामविकास अधिकारी श्री गणेश कोकणे यांनी केले तर उपजिल्हाधिकारी श्रीमती शर्मा यांचे स्वागत व सत्कार खानापूरचे सरपंच सौ. उज्वला गौतम वाघमारे व जि.प.सदस्या अनुराधा पाटील यांनी  केले त्यावेळी उपसरपंच अनिल पाटील  ग्रामपंचायत सदस्य आनंत पाटील, विश्वनाथ ताडकोले,  नागेश्वर बक्कनवार भीमराव यनलवार  शेषराव कदम गौतम वाघमारे मारोतराव परबते , रवींद्र कामशेट्टे व अशोक डुकरे, दयानंद मठवाले सुरेश बक्कनवार , प्रहार दिव्यांग संघटना तालुका संघटक उमाकांत अटकळे व सर्व दिव्यांग बांधव व गावातील जेष्ठ नागरिक , महिला व प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Saturday, July 23, 2022

मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी मा.मंगेश चिवटे यांची नियुक्ती करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा


 मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी मा.मंगेश चिवटे यांची नियुक्ती 
 करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

  
मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी मा.मंगेश चिवटे यांची नियुक्ती 
 करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा .
सातारा दि:-22 रवी वाकडे लिंगायत TV live प्रतिनिधी
करमाळ्याचे सुपुत्र मा.मंगेश चिवटे यांची मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी दि.21जुलै रोजी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई मधील महाराष्ट्र शासन मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे कामकाज चालते.सोमवार दि.25 जुलै रोजी मा.मंगेश चिवटे साहेब या कक्षा चा कार्यभार स्विकारणार आहेत. मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून मानले जातात.त्यांनी आजपर्यंत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात सुद्धा उल्लेखनीय काम केलेले आहे.
मा.देवेंद्र फडणवीस साहेब हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर 13 मार्च 2015 पासून या कक्षाची खास स्थापना करण्यात आली होती. सी एस आर रकमेतून या कक्षातर्फे मदत केली जाते.दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना या कक्षातून एकूण खर्चाच्या 60% इतकी भरघोस आर्थिक मदत केली जाते.या आधी मा.ओमप्रकाश शेटे साहेब हे या कक्षाचे प्रमुख होते.पहिल्याच वर्षात या कक्षाने 28 हजार गरजू रुग्णांना 302 कोटीची भरघोस मदत केली होती.याचबरोबर 450 धर्मादाय रुग्णालयाच्या 10%राखीव खाटामधून 600 कोटी रुपयांचे उपचार झाले होते.
माजी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना हा कक्ष कार्यरत होताच पण अनेक जाचक अटी ऐनवेळी 
लादल्यामुळे  व फक्त सरकारी अधिकारी नेमण्यामुळे नेमक्या गरजू रुग्णांना त्याचा वेळेत लाभ मिळू शकला नाही.शिवाय निवडक 10 गंभीर आजारांसाठी च फक्त मदत करण्याची अट टाकली गेली होती.
पण आता हि अडचण राहणार नाही व मदत प्रक्रिया सुलभ होईल. करमाळ्याचे सुपुत्र मा.मंगेश चिवटे यांच्या कार्याची खास दखल घेवून मा.मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी पदावर झालेल्या त्यांच्या या नेमणुकीमुळे त्यांचे सर्वत्र खास कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत TV live यांचे वतीने त्यांचे खास अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा 

Friday, July 22, 2022

भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून मा.द्रौपदी मुर्मू यांची निवड स्वतंत्र भारतात जन्मलेली पहिली तसेच भारताची दुसरी महिला राष्ट्रपती .प्रा,अजय शेटे, वडूज.विशेष लेख



 भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून मा.द्रौपदी मुर्मू यांची निवड 
स्वतंत्र भारतात जन्मलेली पहिली तसेच भारताची दुसरी महिला राष्ट्रपती .
प्रा,अजय शेटे, वडूज.विशेष लेख
सातारा, दि.22 - गेले कित्येक दिवस संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए च्या उमेदवार व आदिवासी कन्या मा. द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.त्यांना एकूण 10 लाख 38 हजार 431 मतांपैकी 5 लाख 7हजार 777 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मा.यशवंत सिन्हा यांना 2 लाख 61 हजार,62 इतकी मते मिळाली.म्हणजेच अनुक्रमे 812 - 2161 - 64 % व 521- 1058  - 36 %  इतकी मते मिळाली.
भारताच्या विविधतेचे व एकतेचे दर्शन या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आले.हेच या निवडणुकीचे महत्वाचे वैशिष्ट्य दिसून आले.कारण संपूर्ण स्वातंत्र्यात जन्मलेली पहिली आदिवासी व दुसरी महिला आज सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे.या आधी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून मा.प्रतिभाताई पाटील निवडून आल्या होत्या.
मा.द्रौपदी मुर्मु यांचा जन्म 20 जून 1958 रोजी   ' मयूरभंज ' या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव  बिरंची नारायण टुडू हे होय.ते त्यांच्या गावचे  प्रमुख  ' मुखिया ' होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण भुवनेश्वर रामादेवी महिला महाविद्यालय येथे झाले.1997 साली मध्यप्रदेश मधील रायरंगपुर पालिकेत त्या पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या.पुढे येथेच सन 2000 ते 2009 अशा सलग दोन वेळा रायरंगपूर विधानसभा मतदार संघाच्या त्या आमदार झाल्या.सन 2000 ते 2004 ओरिसा राज्यातील बी जे डी सरकार मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले.सर्वोत्तम आमदार म्हणून त्यांना 2007 साली त्यांना  ' निळकंठ ' पुरस्कार मिळाला होता. 2013 ते 2015 असे 3 वर्षे त्या भाजपा  राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये पदाधिकारी होत्या. तसेच 2015 साली परत भाजपा मयूर भंज जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष म्हणून एक वर्षे काम केले. मे 2015 पासून सलग 5 वर्षे त्या झारखंड राज्याच्या  राज्यपाल होत्या.आज सर्वात कमी वयाच्या म्हणजेच 64 वर्षे,1 महिना,8 दिवस असे कमी वय असलेल्या त्या पहिल्याच सर्वात तरुण राष्ट्रपती ठरल्या आहेत.
त्या ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
त्यांनी आपला नोकरी कार्यकाल हा एका सरकारी कार्यालयात लेखनिक म्हणून सुरू केला.तसेच काही वर्षे विनाशुल्क विनाअनुदान तत्त्वावर अध्यापनाचे काम पण केले. त्या नंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या.
मा.द्रौपदी मुर्मू यांनी अनेक कौटुंबिक आघात सोसले आहेत.त्यांच्या पती व 2 मुलांचे निधन झाले आहे.आपल्या मुलांच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्या सहा महिने नैराश्यात गेल्या होत्या.योग्य व्यक्तीचे समुपदेशन घेवून त्या प्रजापिता ब्रमहकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ,माऊंट अबू येथे काही काळ वास्तव्यास राहिल्या होत्या .मोठ्या मुलाचे निधन झाल्यानंतर तीन वर्षात दुसऱ्या लहान मुलाचे पण निधन झाले व त्या नंतर एका वर्षात पती निधनाचे असह्य दुःख त्यांनी सोसले आहे. नैराश्या वर त्यांनी देव,अध्यात्म, योगा व ध्यानध्यारणा यांच्या माध्यमातून मात करून वाईट काळ सोसून संपवला.
आपल्या जीवनचर्येत त्या अतिशय काटेकोर आहेत. रोज पहाटे 3.30 वा.उठून  हलका योग व्यायाम करून त्या फिरायला जातात.त्या नंतर जवळच्या एका श्री शिव मंदिराची  स्वच्छता व देखभाल करतात.त्यानंतर आपली कार्ये उरकून नित्यनेमाने घरी व मंदिरात पूजापाठ करतात. सकाळी लवकर  उगवत्या सूर्याबरोबर त्यांचे कामकाज सुरू होते.वेळेच्या बाबतीत त्या अतिशय काटेकोर आहेत.त्याच्या हातात नेहमी  संभाषणात अडथळा येवू नये म्हणून भाषांतर पुस्तक असते.दैनंदिन मनःस्वास्थ्य टिकून राहण्यासाठी त्या नेहमी शिवपुस्तिका जवळ बाळगून त्याचे पाठ करतात.
रायरंगपूर भागात त्यांचे स्वतःचे एक घर असून, पती निधनानंतर त्या घराचे रूपांतर त्यांनी एका शाळेत केले आहे.तेथे त्या मुला - मुलींना मोफत  शिकवतात.ज्या खोलीत थोरल्या मुलाचे निधन झाले तेथे त्यांनी विद्यार्थ्यांची निवास व अभ्यासिकेची सोय केली आहे. मुले व पतीच्या वर्ष श्राद्ध वेळी दरवर्षी त्या एका शाळेला भेट देवून काहीतरी भेट वस्तू देतात.त्याच्याकडे इतर कोणतीही सुशोभित स्थावर मालमत्ता किंवा संपत्ती नाही.
मा.द्रौपदी मुर्मू  दि.24 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील.एन डी ए ने राष्ट्रपती पदासाठी एका आदिवासी महिलेचा चेहरा निवडून आणून विरोधकांना जबरदस्त धक्कातंत्राचा वापर केला आहे.एका आदिवासी महिलेचा सन्मान म्हणून अनेक विरोधी पक्षातील  लोकांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.त्यामुळे भाजपा ची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे.
आज मा.नवनियुक्त राष्ट्रपती यांच्या या विजया नंतर भाजपा कडून देशभर जल्लोष साजरा करण्यात येत आहे .दिल्लीत विजयी रॅली काढण्यात येणार आहे.राष्ट्रपती पदाचा उमेदवार  विजयी झाल्यानंतर विजयी रॅली काढण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे त्या बरोबर सर्व महीला
व संपूर्ण आदिवासी समाजाचा सन्मान होत आहे.यावेळी 20 हजार लाडू वाटप करण्यात येणार आहेत.
भारतीय लोकशाहीसाठी हा एक शुभसंकेत आहे. मा.पंतप्रधान नरेंद्रजी  मोदी साहेब यांच्या जोडीला एक भारतीय राज्यघटनेचा रक्षक आज भारताच्या राष्ट्रपती पदी अतिशय अभिमानाने  विराजमान होत आहे.समस्त भारतवासियांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा .


Wednesday, July 20, 2022

गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा-- सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांची मागणी



      गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा--

      सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांची मागणी 





 


गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा--

सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांची मागणी




सिन्नर { नाशिक ] दि.१८: श्यामसुंदर झळके लिंगायत TV Live प्रतिनिधी 

 सिन्नर हे नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून येथे श्री गोंदेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे.बाराव्या शतकातील प्रारंभास साधारण ११६० च्या सुमारास हे मंदिर बांधल्याची इतिहासात नोंद आहे.भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ४ मार्च १९०९ मध्ये घोषित केले आहे.हे मंदिर हेमाडपंथी दक्षिण स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. गोंदेश्वर मंदिरामुळे सिन्नरच्या सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वैभवात मोलाची भर पडली आहे.हे मंदिर पाहण्यासाठी भारतभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.सिन्नर बारागाव पिंप्री रस्त्यावर सिन्नर न्यायालयाच्या मागे हे पुरातन मंदिर आहे.विशेष म्हणजे गोंदेश्वर मंदिराच्या पर्यटन विकासासाठी  तसेच सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्यातून विविध अनेक कामे मार्गी लागतील.परंतु  आश्चर्याची व खेदाची बाब म्हणजे या मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक नसल्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची फजिती होते.बसस्थानका पासून  ते विचारपूस करता करता वावीवेस पर्यंत येऊन सरळ बारागावपिंप्री रस्त्याने खरजे मळ्यात गोंदेश्वर मंदिराच्या मागील भागात पोहचतात तर काही सरळ कानडी मळ्यात पेट्रोलपंपापर्यंत जाऊन माघारी येतात.यामुळे पर्यटकांची तारांबळ उडते तसेच त्यांचा वेळ वाया जातो व शेवटी साधा बोर्ड नगरपालिकेला लावता येत नाही का अशी प्रतिक्रिया कानावर पडते. विशेष म्हणजे या परिसरात न्यायालय,तहसीलदार, पोलीस ठाणे व अनेक प्रशासकीय कार्यालये आहेत.परंतु गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा फलक नाही याचा खेद वाटतो.याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष नाही. तसेच लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करते. नेमके हे काम कोणाच्या अधिकारात येते हा प्रश्न सिन्नरकरांच्या मनात कायम आहे. 


   

श्री. गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार सागर मुंदडा याच्याकडे देताना सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके


सिन्नर येथील
 सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांनी या बाबत नुकतेच नायब तहसीलदार सागर मुंदडा यांना निवेदन दिले असून त्यात लवकरात लवकर गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा अशी  मागणी केली आहे.श्रावण महिना तसेच महाशिवरात्री ला भाविकांची गर्दी होत असते, थोड्याच दिवसात श्रावण महिन्याचे आगमन होत आहे.या पार्श्वभूमीवर हा फलक लावावा अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.





Monday, July 18, 2022

वीरशैव धर्म हाच खरा सनातन धर्म आहे गुरु गंगाधर शिवाचार्य


वीरशैव धर्म हाच खरा सनातन धर्म आहे गुरु गंगाधर शिवाचार्य 
विटा दि :- 18 प्रतिनिधी प्रवीण जंगम 
वीरशैव धर्म आज खरा सनातन धर्म आहे वीरशैव या शब्दा या शब्दाचा अर्थ असा आहे की वि म्हणजे ज्ञान र म्हणजे रहमान होणारा सेव म्हणजे शिवाशी एकरूप होणारा असा अर्थ आहे या धर्मात गुरु जंगम दीक्षा यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे प्रत्येक लिंगायत व्यक्तीने दररोज लिंग पूजा करून आपल्या शरीरावर लिंग धारण केल्याने सर्व पापी नष्ट होता असेही त्यांनी सांगितलेत आपल्या भाषणात गंगाधर शिवाचार्य पुढे म्हणाले की या विश्वात दोन वायू एकत्र भेटल्यानंतर ओम या अक्षराची निर्मिती झाली आणि त्यानंतर सृष्टी निर्माण झाली त्यामुळे ओम या अक्षराला जगात अनन्यसाधारण महत्त्व आहे असेही त्यांनी आपल्या प्रबोधन वर भाषणात सांगितले प्रारंभी महादेवाची पिंड. नंदी कासव आणि कळस यांची गावातून सर्वाधिक मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत जि प सदस्य सुरेंद्र गुदगे मायनीचे सरपंच सचिन गुडगे दिलीप देशमुखे महेश पुस्तके नंदकुमार पुस्तके विजय माळी संदीप माळी राजू झगडे विजय खलीपे सुनील खलीपे डॉक्टर दत्ता तांबेकर महेश कांबळे कर मिलिंद देशमुख जालिंदर माळी अशोक माळी मोरेश्वर कपाळे तसेच वीरशैव समाजातील बहुसंख्य महिला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

मात्या-पित्यांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस दिला मोबाईल निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी यांचे दातृत्व वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 67 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती


मात्या-पित्यांचे छत्र हरपलेल्या  विद्यार्थिनीस दिला मोबाईल 
निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी यांचे दातृत्व 
वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 67 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  
सोलापूर : दि 18  राजशेखर बुरुकुले सोलापूर प्रतिनिधी
 वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून आणि निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी यांच्या दातृत्वातून माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अक्षता स्वामी या विद्यार्थिनीस मोबाईल देण्यात आला.


 वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून अक्षता स्वामी या विद्यार्थिनीस मोबाईल देताना वैजनाथ स्वामी, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, अक्षय नवले
               महाविद्यालय ऑफलाईन सुरू झाले असले तरी काही अभ्यासक्रम, प्रकल्प आणि नोट्स मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पाहोचवण्यात येत आहेत. त्यामुळे आतादेखील मोबाईलची गरज आहे. अक्षता स्वामी या  विद्यार्थिनीकडे मोबाईल नसल्यामुळे तिच्या शिक्षणात अडचणी येत होत्या.
             काही दिवसांपूर्वी वीरशैव व्हिजनच्या प्रयत्नातून आणि श्रुती मरगुर हिच्या पहिल्या पगारातून श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिकणाऱ्या माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अक्षता स्वामी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका, द्वितीय वर्ष) व अंकिता स्वामी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका, प्रथम वर्ष) या दोन विद्यार्थिनींना 11 हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यात आली होती. त्याची दैनिकातील बातमी पाहून महापालिकेचे निवृत्त अधिकारी वैजनाथ स्वामी यांनी वीरशैव व्हिजनकडे संपर्क साधून त्या विद्यार्थिनींना आणखी कशाची गरज आहे का? याची विचारणा केली. तेव्हा मोबाईलची अडचण त्यांच्यासमोर मांडली असता त्यांनी तात्काळ त्या विद्यार्थिनीस 10 हजार रुपयांचा एक नवा मोबाईल घेऊन दिला.
             याप्रसंगी निवृत्त महापालिका अधिकारी वैजनाथ स्वामी, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, अक्षय नवले उपस्थित होते. 
        या विद्यार्थिनीसह वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 67 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून देण्यात आली आहे.
---------------------------------------------
माता-पित्याचे छत्र हरपलेल्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिल्याची बातमी दैनिकातून वाचली. तेंव्हा आपणही काहीतरी दिले पाहिजे अशी भावना माझ्या मनात निर्माण झाली. वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून त्या विद्यार्थिनींशी संपर्क साधून त्यांची गरज पूर्ण करता आली याचे मला समाधान वाटले. यापुढील काळातही अशा विद्यार्थ्यांना मदत करणार आहे.
वैजनाथ स्वामी
----------------------------------
निवृत्त महापालिका अधिकारी
           याप्रसंगी विश्वस्त सोमेश्वर याबाजी, उपाध्यक्ष सिद्राम बिराजदार, सचिव नागेश बडदाळ, सहसचिव संजय साखरे, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले उपस्थित होते. 
          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ चौधरी, शिव कलशेट्टी, राहुल बिराजदार, अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सचिन विभुते, बसवराज जमखंडी, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर कोरे, चेतन लिगाडे यांनी परिश्रम घेतले. 
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार बिराजदार यांनी तर आभारप्रदर्शन चिदानंद मुस्तारे यांनी मानले.

Sunday, July 17, 2022

जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशनचे सर्व संचालक मंडळ बिनविरोधमा.सुरेंद्रदादा गुदगे व मा.अनिल भाऊ देसाई यांची वर्णी ..


जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशनचे सर्व  संचालक मंडळ बिनविरोध
मा.सुरेंद्रदादा गुदगे व मा.अनिल भाऊ देसाई यांची वर्णी .
सातारा दि 16 :-  प्रणाली वाकडे  प्रतिनिधी 
जिल्ह्यातील बँकांच्या न्याय व हक्कासाठी प्रयत्नशील  असलेल्या सातारा जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या 13 सदस्यांची निवडूक 27 जुलैला होणार होती. तथापि, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 13 अर्ज राहिले ने  निवडणूक बिनविरोध झाली. 
बिनविरोध निवड झालेले कार्यकारणी सदस्य असे ः सर्वसाधारण  गट ः अनिल शिवाजीराव देसाई, महेशकुमार जगन्नाथ जाधव, जयेंद्र शरदराव चव्हाण, चंद्रकांत वामनराव काळे, शिवाजीराव बाबूराव थोरात, सुरेंद्र मोहनराव गुदगे, सुरेशराव दिनकर कोरडे, संजय शिवराज देशमुख. महिला गट स्वाती राजेश लढ्ढा, वनिता जालिंदर पिसे. इतर मागास वर्ग -  विजय नानासो मुठेकर. वि. जा. भ. ज. मधून राजेंद्र नारायण कुंडले. अनुसुचित जाती जमातीतून महेंद्र वसंतराव अवघडे. अशा निवडी जाहीर झाल्या. 
जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम 21 जून रोजी प्रसिद्ध झाला होता. यासाठी नामनिर्देशन विक्री व स्वीकृती 27 जूनपर्यंत होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वसाधारण 8 जागांसाठी 13 अर्ज, दोन महिला वर्ग 2 जागांसाठी 2 अर्ज, इतर मागास वर्ग 1 जागेसाठी 2 अर्ज. अनु. जा. 1 साठी 1 अर्ज. वि.जा.भ.ज. 1 साठी 1 अर्ज असे अर्ज दाखल झाले. 
अर्ज माघारीच्या शेवटच्यादिवशी दि. 13 रोजी जास्त असलेल्या  सर्व सहा जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. यामुळे सहायक निबंधक सातारा मा. शंकर पाटील साहेब (निवडणूक निर्णय अधिकारी) यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. निवडीबद्दल निवनिर्वाचित सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल मा. अनिल देसाई  व मा.सुरेंद्र दादा गुदगे यांनी कार्यकारिणीच्या  अर्ज माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांचे  आभार मानले.

Saturday, July 16, 2022

रखडलेला महामार्ग बनला जीवघेणा ! त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी शिवकुमार कल्याणी


रखडलेला महामार्ग बनला जीवघेणा ! त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी  
शिवकुमार कल्याणी 
 खानापूर दि 16  :  शिवकुमार कल्याणी  विशेष प्रतिनिधी लिंगायत TV live
खानापूर फाटा ते मुखेड  मार्गाचा गेल्या कित्येक वर्षांपासून गाजावाजा सुरू आहे. परंतु हा मार्ग अजून पूर्णत्वाला जात नाही, या  महामार्गांची कामे गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहेत.  ठेकेदारांच्या मनमानीमुळे काम संथगतीने सुरू आहेत, त्यामुळे हे मार्ग वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत असून आतापर्यंत अनेक जणांचे अपघात झालेले आहेत. तरीही याकडे मात्र शासकीय यंत्रणा, नेते मंडळींचे दुर्लक्ष होत आहे.
त्यातल्या त्यात खानापूर ते एकलारा कार्नर हा दुपदरी सी सी  रोड आहे हा  महामार्ग सध्या मृत्यूमार्ग बनला आहे, मागील दोन तिन वर्षांपासून हे काम चालू असुन सदरील काम संथगतीने होत असून. काम पूर्ण करण्याचा कालावधी नेमका किती? हा प्रश्न उपस्थित होतो आहे,अर्धवट रस्त्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे, या मार्गावर अनेक लहान मोठे अपघात रोजच होत आहेत अनेकांना अपंगत्व आले आहे, व रस्ताकामे अर्धवट असल्याने खासकरून खानापूरकरांसाठी
वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. दरम्यान, 
सध्या तालुक्यासह खानापूर महसूल मंडळाता अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे,यामुळे यंदाही हा मार्ग  वाहन धारकांना  वेदनादायी ठरणार असल्याचे चित्र आहे, त्यामुळे त्वरीत हे काम पूर्ण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन खानापूर येथील कांग्रेस कार्यकर्ते मारोती यन्नलवार यांनी देगलूरचे उपजिल्हाधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांना  दिले त्यावेळी देगलूर बिलोली विधानसभे चे आमदार जितेश अंतापुरकर हे उपस्थित होते, त्याप्रसंगी,माजी ग्रामपंचायत सदस्य माधव इंगळे, मनसेचे अनंत कामशेटे, चैतन्य घरडे, आनंद वाघमारे,माजी पोलीस पाटील सुरेश वानोळे,व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Friday, July 15, 2022

श्रीमती कुसुम बर्डे यांचे वृद्धापकाळानी निधन


श्रीमती कुसुम बर्डे यांचे वृद्धापकाळानी निधन
उंब्रज दि :- 15 
उंब्रज तालुका कराड येथील युवा उद्योजक कुमार बर्डे यांच्या मातोश्री आणि सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती कुसुम बाळकृष्ण बर्डे  यांचे काल पुणे येथे राहते घरी  वृद्धापकाळाणी निधन झाले मृत्यू समयी त्या 85 वयाच्या होत्या  समाजात आणि नातेवाईक यांच्या मध्ये त्यांनी आपली एक वेगळी अशी ओळख निर्माण केली होती अत्यंत सुंदर स्वभाव आपले कडे येणाऱ्या कोणत्याही लोकांना आपुलकीने विचार पूस करून हवी ती मदत करणे  मग तो आपल्या समाजातील आहे की इतर समाजातील असा भेदभाव कधी केला नाही ,
त्यांच्या निधनाने समाजात कधीही भरून न येणारी एक मोठी पोकळी तयार झाली आहे , त्यांच्या मागे 1 मुलगा  2 मुली ,सून आणि 2 नातू  असा परिवार आहे परिवार आहे त्यांचा मुलगा हा पुण्यात एक प्रतिष्ठित युवा उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहे ,माती आणि उत्तर कार्य हे विधी रविवार दि 17 रोजी उंब्रज तालुका कराड येथे सकाळी 9 वाजता  करण्यात येणार आहेत, त्यांना समस्त लिंगायत समाज उंब्रज , आणि लिंगायत TV live यांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

Thursday, July 14, 2022

खा.शरदचंद्रजी पवार साहेब , माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार आणि माण - खटाव चे राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत पुणे येथे भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन

 



खा.शरदचंद्रजी पवार साहेब , माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार आणि माण - खटाव चे  राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत  पुणे येथे  भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन 





 खा.शरदचंद्रजी पवार साहेब , माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार आणि माण - खटाव चे  राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत  पुणे येथे  भव्य नोकरी मेळाव्याचे आयोजन 



सातारा, दि.14 -प्रसाद  वाकडे प्रतिनिधी 

 देशाचे नेते आ. खा.शरदचंद्रजी पवार साहेब , माजी उपमुख्यमंत्री आ.अजितदादा पवार आणि माण - खटाव चे  राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीत पुणे येथे  हा भव्य असा नोकरी मेळावा होणार आहे.तरी खटाव - माण तालुका व सातारा जिल्हा मधील सर्व युवक युवतींनी याचा लाभ घावा .असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

    अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च , पर्वती,पुणे 09, व राजर्षी शाहू ॲकाडमी ,पुणे तसेच ग्लोबल टॅलेंट ट्रॅक,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इनॅगुरल फॅन्क्शन व कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह चे आयोजन शुक्रवार दि.15 जुलै 2022 रोजी सकाळी 9.30 वा.पासून पुढे संध्या.5.30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे .

यावेळी मा.शशिकांतजी सुतार, मा.प्रमिला गायकवाड मॅडम, मा.संदिपजी कदम , मा.भगवानराव साळुंखे , मा.विजयसिंह जेधे,प्राचार्य मा.सुनील ठाकरे ,प्रा.दिगंबर पवार यांची उपस्थिती राहून त्याचे खास मार्गदर्शन होणार आहे .




या नोकरी मेळाव्याचे ठिकाण ए. बी.एम.एस.परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग व रिसर्च ,शाहू कॉलेज कॅम्पस , पर्वती,पुणे 411009 येथे आहे.

   सदर रोजगार मेळावा महाराष्ट्र शासन पुरस्कृत ऑल इंडिया सर्टिफाईड ट्रेनिंग एज्युकेशन मार्फत व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचेशी सलग्न आहे.तसेच नॅक मानांकन  आयएसओ 9001.2015 ने मानांकित आहे.

या रोजगार मेळाव्यात 30 पेक्षा अधिक कंपन्या मध्ये नोकरीची संधी प्राप्त होणार आहे  तसेच आय टी, बी.एस.एफ.आय., मॅन्यूफॅक्चरिंग  व फार्मा क्षेत्रातील जवळ जवळ 1000 इतक्या पदांची भरती करण्यात येणार आहे. 

या साठी उमेदवारांनी आपले कोविड लस घेतल्याचे सर्टिफिकेट फोटो कॉपी,दोन पासपोर्ट साइज् फोटो आणि वैयक्तिक माहिती पत्र  च्या एकूण 10 प्रती घेवून वेळेत हजर रहावे.

सदर रोजगार मेळावा सर्व ग्रज्यूए ट,पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनीअरींग उमेदवार,आर्ट्स,कॉमर्स तसेच मॅनेजमेंट क्षेत्रातील नवीन व अनुभवी अशा उमेदवारांसाठी आहे.तसेच उमेदवारांच्या सोयीसाठी स्कॅन कोड रजिस्ट्रेशन ची सोय करण्यात आली आहे.

  तरी सदर रोजगार मेळाव्यातील नोकरीची संधी जास्तीत जास्त तरुण मुले - मुली यांनी प्राप्त करून घ्यावी व आपले उज्वल भवितव्य घडवावे.असे आवाहन माजी सनदी अधिकारी व माण - खटाव तालुक्याचे विद्यमान नेते मा. प्रभाकररावजी देशमुख साहेब यांनी केले आहे.




Wednesday, July 13, 2022

लान्स नायक मा.रमाकांत लामतुरे यांचा भव्य नागरी सत्कार .


लान्स नायक मा.रमाकांत लामतुरे यांचा भव्य नागरी सत्कार 
सातारा, दि.13 - रवींद्र वाकडे प्रतिनिधी
 सेवानिवृत्त सैनिक लान्स नायक मा.रमाकांत वीरपाक्षअप्पा लामतुरे हे भारतीय सैन्य दलातील नोकरीतून 17 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत झाल्यामुळे छ.संभाजी राजे ग्रुप,कारला व ग्रामस्थ तसेच आप्तस्वकीय यांच्या वतीने त्यांचा किल्लारी गावापासून भव्य मोटार सायकल रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी वाटेत त्यांच्यावर सर्व शालेय विद्यार्थी व  स्त्रीपुरूष नागरिकांतर्फे पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी रस्त्यांवर दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , कारला येथे त्यांचा सहपरिवार नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय गुत्तेदार नरेंद्र रामराव काळे,प्रमुख पाहुणे औसा तालुक्याचे आमदार मा.अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अँड.परिक्षीत पवार, लेफ्टनंट ऋषिकेश बाबळसुरे,भाजपा तालुका उपाध्यक्ष बंकट पाटील , भाजयुमो चे तालुका अध्यक्ष सचिन अनसरवाडे, म.बसव परिषद पुणेचे नृसिंह मुळे,सेलुकर परिवार,विशाल मुरुंबे,विशाल घोटाळे,विशाल कवे,बालाजी निकम,पुणे येथील उद्योजक प्रविण साखरे, सौ.विद्या बलक्षे,सिद्धेश्वर बिराजदार,विजयकुमार साखरे आणि परिवार ,पुणे. मा.सरपंच पारधेवाडी सौ.मंगल व श्री.देवानंद साखरे परिवार,प्रशांत तोडकरी ई.मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी सरपंच विलास काळे यांनी तर सूत्रसंचालन दयानंद सेलुकर यांनी व आभार सौ.केशराई विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश पवार यांनी मानले.
हा सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दलआभार व्यक्त करताना मा.रमाकांत लामतुरे यांनी अतिशय खडतर परिस्थितीत वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे भाग्य आपणास लाभले .तसेच ज्या शाळेत शिकलो तिथेच आज सत्कार होत आहे .हे अभिमानाने सांगितले.तसेच मार्गदर्शक ,पाठीराखे ,आयोजक छ.संभाजीराजे ग्रुप व कारला ग्रामस्थ व उपस्थित सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त केले .
या कार्यक्रमास कारला, कारलावाडी ,कुमठा,किल्लारी, यळवट, वाणेवडी, तांबरवाडी, किनिवरे येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी सर्वांसाठी अल्पोपहार सोय पण करण्यात आली होती.

Sunday, July 10, 2022

देगलूर तालुक्यातील खानापुर गाव व खानापूर सर्कल परिसरातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे . शेतकऱ्यांच मोठे नुकसान

 



देगलूर तालुक्यातील खानापुर गाव व खानापूर  सर्कल परिसरातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे . शेतकऱ्यांच मोठे  नुकसान 


    देगलूर खानापूर.दि.१० ;- शिवकुमार कल्याणी (प्रतिनिधी )

देगलूर तालुक्यातील खानापुर गाव व खानापूर  सर्कल परिसरातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे नदी,नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले असून, शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे, प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या हाती निराशाच येते आहे, कधी आस्मानी तर कधी सुलतानी अशा संकटांचा सामना या भागातील शेतकरी करीत आहेत,अत्यंत महागामोलाचं बि- बियान,कर्ज काढून काळ्या आईच्या उदरात मोठ्या उमेदीने त्यांनी पेरले होते,व अनेक स्वप्ने पाहिली होती कि या वर्षी तरी निसर्ग साथ देईल व आपलं काहीतरी भलं होईल असे वाटत होते, अत्यंत कष्टाने केलीली मेहनत एका पुराण वाहून नेली.अजून तरी पाऊस चालूच आहे असाच पाऊस चालू राहीला तर अत्यंत भयान परिस्थिती उद्भवेल.गावातील व खानापूर महसूल मंडळातील अनेक शेतकऱ्यांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सदरील शेतकऱ्यांच्या शेतीचे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी....! 





Thursday, July 7, 2022

खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूप..!मुलांचे आरोग्य धोक्यात ,?????


खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूप..!
मुलांचे आरोग्य धोक्यात ,?????
खानापूर दि 7 – शिवकुमार कल्याणी खानापूर प्रतिनिधी
 देगलूर तालुक्यातील खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणाला काल व आज  झालेल्या पावसामुळे तलावाचे स्वरूप आले आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शाळेच्या पटांगणात तुडुंब पाणी साचले आहे.पावसाळ्यात शाळेच्या पटांगणात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था शाळा व्यवस्थापनाने केलेली नसल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.एकीकडे शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेचे धडे गिरवले जात आहेत,तर दुसरीकडे अशा प्रकार पाहायला आढळत असल्याने स्वच्छ भारत मिशन व त्यासाठी येणारा निधी व यंत्रणा फक्त कागदावरच पाहायला मिळते का असा प्रश्न उपस्थित होतो आहे
शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी शासनाच्या वतीने दक्षतेबाबत सूचना देण्यात आल्या असतांना सुध्दा पटांगणात पाणी साचने ही खेदजनक बाब आहे.जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळल्या जात तर नाही ना ? असा प्रश्न आता अनेक पालकांना पडला आहे.विद्यार्थी हे आपल्या देशाच भविष्य आहे. त्यांच्या आरोग्याला जपणं हि शिक्षकांची व शालेय व्यवस्थापन समिती तथा गाव प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. पण हल्ली  त्याच काहीही घेणं देणं राहिलेले नाही असं नागरिकांतुन चर्चा ऐकायला मिळते.व असा आरोप पालक वर्गाच्या वतीने व्यक्त केला जात आहे.आजकाल जिल्हा परिषद शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी हे वंचीत तथा अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून आलेले आहेत.संबधीत विभागाने सदर समस्येकडे तात्काळ लक्ष घालून विषय निकाली काढण्यात यावा व गरिबांच्या मुलांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा अशी मागणी पालक वर्ग व गावातील सुजाण नागरिकांकडून होत आहे.

Wednesday, July 6, 2022

विटा मर्चंटस को. ऑ. बँक निवडणुकीत जय सहकार पॅनेल चे सर्व उमेदवार विजयी विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी यांची रणनिती यशस्वी


 विटा मर्चंटस को. ऑ. बँक निवडणुकीत जय सहकार पॅनेल चे सर्व उमेदवार विजयी 
 विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी यांची रणनिती यशस्वी 
प्रा.अजय शेटे.
सातारा, दि.7 - विटा मर्चंटस को. ऑ.बँक लि.विटाच्या नुकत्याच झालेल्या रविवार दि.3 जुलै रोजी च्या सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक निवडणुकीत ' जय सहकार पॅनेल ' चे सर्वच्या सर्व उमेदवारांनी ' कपबशी ' या चिन्हावर विक्रमी मतांनी निवडून येवून बँकेवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.
विद्यमान चेअरमन मा.विनोदजी गुळवणी यांनी आखलेल्या निवडणूक रणनिती मुळे हे यश प्राप्त झाल्याचे सहकारातील सर्व जाणकारांनी सांगितले. 
या निवडणुकीत विटा शहर सर्वसाधारण गटात विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी हे स्वतः 4043 अशा विक्रमी मतांनी विजयी झाले .
याच पॅनेल मधील श्री.वैभव म्हेत्रे4071,अशोक डोंबे 4071,विजय शहा 4061,राजेंद्रकुमार शहा 4061,दत्तात्रय कलेढोणे 4065,बाळकृष्ण शितोळे 4050,विनय भंडारे 4052,निरंजन गुळवणी 4060,तुषार मेहता 4046,रघुनाथ पवार 4037,अमित सगरे 3938 या 12 उमेदवारांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला .
     याच पॅनेल चे श्री.भगवान देवकर ,अशोक चांदणे,प्रदिप देशपांडे,विलास कुलकर्णी, सौ.पूजा स्वामी,रोहिणी दिवटे,रामचंद्र भिंगारदेवे,गौरव काकडे,उत्तम चोथे असे एकूण नऊ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत .
विटा बँक हि गेली साठ वर्षे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक असून या बँकेने रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्ठानुसार 100 कोटींचे ठेव उद्दिष्ठाकडे यशस्वी वाटचाल होत असून, सद्यस्थितीत बँक 25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास सक्षम आहे.बँकेच्या 24 शहरात मिळून एकूण 30 शाखा असून त्यांना वेळोवेळी रिझर्व्ह बँकेचे उच्च मानांकन प्राप्त झाले आहे. कोरोना काळातही बँकेने आपली योग्य प्रगती साधली आहे.
हे नवीन संचालक मंडळ निवडून आणण्यात बँकेच्या सर्व सभासदांचे मोलाचे योगदान असून त्यांनी दाखविलेल्या विश्वासास बांधील राहून नवीन संचालक मंडळ बँकेची भावी काळात प्रगती साधेल.असे सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले.
या निवडीबद्दल खानापूर चे आमदार मा.अनिलजी बाबर,
वडूज शाखा स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य मा.सतीश शेटे, 
वडूज शिक्षण विकास मंडळ उच्च न्यायालय नियुक्त सदस्य  डॉ.हेमंत पेठे,गोविंद भंडारे,नितीन जाधव,दिलीप जमदाडे,रमेश जंगम व सर्व सभासद यांच्या वतीने खास अभिनंदन करण्यात आले.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...