Monday, July 25, 2022

खानापूर येथे उपजिल्हाधिकारी यांचा दिव्यांग परिसंवाद संपन्न

 


खानापूर येथे उपजिल्हाधिकारी यांचा दिव्यांग परिसंवाद संपन्न  



  खानापूर येथे उपजिल्हाधिकारी यांचा दिव्यांग परिसंवाद संपन्न  



       खानापूर:दि २५ ;- शिवकुमार कल्याणी प्रतिनिधी 

देगलूर तालुक्यातिल खानापूर येथे  दिनांक २२/७/२२ रोजी ससहाय्यक जिल्हाधिकारी देगलूर श्रीमती सौम्या शर्मा यांनी परिसंवाद साधला असुन ग्रामपंचायत खानापूर येथे दिव्यांग बांधवांची बैठक घेऊन दिव्यांगा सोबत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्या सोडवण्याचे आश्वासन दिले आहे

 उपजिल्हाधिकारी श्रीमती  सौम्या शर्मा मॅडम यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालय खानापूर येथे दि २२ रोजी दुपारी दिव्यांग बांधवांची सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेस गावातील सर्व दिव्यांग बांधव, श्रवणबाळ योजना,संजय गांधी निराधार योजना, च्या सर्व लाभार्थ्यी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तेव्हा मा.साह. जिल्हाधिकारी यांनी उपस्थित लाभार्थ्यांसोबत आधार कार्ड, राशन कार्ड, अपंग प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र बाबत चर्चा करून  ज्यांच्याकडे हे प्रमाणपत्र नाही त्यांची यादी तयार करून सादर करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीस केले तसेच वरील लाभार्थ्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपल्या गावात ॒दिवंगमित्र॒ निवड करण्यात येईल असे सांगितले. 





तसेच ग्रामपंचायत खानापूर येथील सुविधा केंद्र अद्यावत करून दिव्यांगाना योजना मिळवून देण्यासाठी माहितीपत्रक लावण्यात यावे अशा सूचना दिल्या ,आणि गावातील एकही दिव्यांग व्यक्ती लाभापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी दिवंगमित्र यांनी घेतली पाहिजे. त्यासाठी गरज पडल्यास संसाधन व्यक्तीची निवड करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या, यानंतर ग्रामपंचायत मार्फत चालू असलेल्या कामाची माहिती गटविकास अधिकारी शेखर देशमुख यांच्याकडून घेऊन दिव्यांग बांधवांना पंधरावा वित्त आयोग अंतर्गत प्राप्त निधीच्या पाच टक्के निधी वितरित केल्याबद्दल समाधान व्यक्त केले, 



 ग्रामपंचायती कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून वृक्षारोपणाबाबत उपस्थित सर्व नागरिकांना मार्गदर्शन केले. तसेच गावातील रस्त्याची विकास कामे पाहणी करत असताना अतिक्रमीत असलेले रस्ते अतिक्रमण मुक्त करून कामे करावे त्यासाठी प्रशासन आपल्या पाठीशी आहे असे आश्वासन गावातील नागरिकांना दिले. त्यानंतर खानापुर येथील जिल्हा परिषद शाळेतील स्वच्छता, पाणीपुरवठा, विकास कामे पोषण आहार, ची पाहणी करून विद्यार्थिनीशी संवाद साधला. व विद्यार्थ्शी संवाद साधला यावेळी या कार्यक्रमास गटविकास अधिकारी शेखर देशमुख गटशिक्षणाधिकारी कृषी अधिकारी श्री ईडोळे , विस्तार अधिकारी दयानंद सूर्यवंशी ,संगमेश्वर कानडे, खानापूर महसूल चे मंडळ अधिकारी तलाठी अनिल सरगर हे उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक खानापूर चे ग्रामविकास अधिकारी श्री गणेश कोकणे यांनी केले तर उपजिल्हाधिकारी श्रीमती शर्मा यांचे स्वागत व सत्कार खानापूरचे सरपंच सौ. उज्वला गौतम वाघमारे व जि.प.सदस्या अनुराधा पाटील यांनी  केले त्यावेळी उपसरपंच अनिल पाटील  ग्रामपंचायत सदस्य आनंत पाटील, विश्वनाथ ताडकोले,  नागेश्वर बक्कनवार भीमराव यनलवार  शेषराव कदम गौतम वाघमारे मारोतराव परबते , रवींद्र कामशेट्टे व अशोक डुकरे, दयानंद मठवाले सुरेश बक्कनवार , प्रहार दिव्यांग संघटना तालुका संघटक उमाकांत अटकळे व सर्व दिव्यांग बांधव व गावातील जेष्ठ नागरिक , महिला व प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...