जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशनचे सर्व संचालक मंडळ बिनविरोध
मा.सुरेंद्रदादा गुदगे व मा.अनिल भाऊ देसाई यांची वर्णी .
सातारा दि 16 :- प्रणाली वाकडे प्रतिनिधी
जिल्ह्यातील बँकांच्या न्याय व हक्कासाठी प्रयत्नशील असलेल्या सातारा जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशनच्या कार्यकारिणीच्या 13 सदस्यांची निवडूक 27 जुलैला होणार होती. तथापि, अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 13 अर्ज राहिले ने निवडणूक बिनविरोध झाली.
बिनविरोध निवड झालेले कार्यकारणी सदस्य असे ः सर्वसाधारण गट ः अनिल शिवाजीराव देसाई, महेशकुमार जगन्नाथ जाधव, जयेंद्र शरदराव चव्हाण, चंद्रकांत वामनराव काळे, शिवाजीराव बाबूराव थोरात, सुरेंद्र मोहनराव गुदगे, सुरेशराव दिनकर कोरडे, संजय शिवराज देशमुख. महिला गट स्वाती राजेश लढ्ढा, वनिता जालिंदर पिसे. इतर मागास वर्ग - विजय नानासो मुठेकर. वि. जा. भ. ज. मधून राजेंद्र नारायण कुंडले. अनुसुचित जाती जमातीतून महेंद्र वसंतराव अवघडे. अशा निवडी जाहीर झाल्या.
जिल्हा नागरी सहकारी बँकस् असोसिएशनचा निवडणूक कार्यक्रम 21 जून रोजी प्रसिद्ध झाला होता. यासाठी नामनिर्देशन विक्री व स्वीकृती 27 जूनपर्यंत होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वसाधारण 8 जागांसाठी 13 अर्ज, दोन महिला वर्ग 2 जागांसाठी 2 अर्ज, इतर मागास वर्ग 1 जागेसाठी 2 अर्ज. अनु. जा. 1 साठी 1 अर्ज. वि.जा.भ.ज. 1 साठी 1 अर्ज असे अर्ज दाखल झाले.
अर्ज माघारीच्या शेवटच्यादिवशी दि. 13 रोजी जास्त असलेल्या सर्व सहा जणांनी आपले अर्ज माघारी घेतले. यामुळे सहायक निबंधक सातारा मा. शंकर पाटील साहेब (निवडणूक निर्णय अधिकारी) यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. निवडीबद्दल निवनिर्वाचित सदस्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. तसेच निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल मा. अनिल देसाई व मा.सुरेंद्र दादा गुदगे यांनी कार्यकारिणीच्या अर्ज माघार घेतलेल्या सर्व उमेदवारांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment