Sunday, July 25, 2021

कृष्णा नदिचे पूराचे पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा, पालकमंत्री जयंत पाटीलधरणातील पाणी विसर्गाचे योग्य पध्दतीने नियोजन


कृष्णा नदिचे पूराचे पाणी ओसरताच नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा,
 पालकमंत्री जयंत पाटील
धरणातील पाणी विसर्गाचे योग्य पध्दतीने नियोजन
सांगली दि 25 (उमेश पाटील )
सद्या सांगलीत पाणीपातळी जवळपास 53 फूटापर्यंत आली असून मागच्या येणाऱ्या पाण्यामुळे सांगलीत पाणी वाढले आहे. दि. 25 जुलै च्या सकाळपर्यंत पाणी उतरेल. पाणी ओसरताच शेती, घरे आदि सर्वच बाबींच्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत करा. पाणी ओसरताच आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक औषध फवारणी करा. पाण्याखाली गेलेल्या पाणीपुरवठा योजनांची त्वरीत दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरळीत करा. पूरप्रवण क्षेत्रातील अडकलेल्या लोकांना अडचणीच्या वेळी सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आवश्यक तेथे रस्ते, पूल यांची उंची वाढविण्यासाठी आराखडे तयार करा, असे निर्देश जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पूरसद्यस्थिती आढावा बैठकीत पालकमंत्री जयंत पाटील बोलत होते. यावेळी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी विशाल नरवाडे, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेूवार, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद नाईक, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, कार्यकारी अभियंता श्री. काटकर, कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष रोकडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, 2019 च्या महापूरापेक्षा या काळात पडलेला पाऊस फार जास्त आहे पण सुदैवाने प्रशासनाने आदिपासूनच सर्व यंत्रणा सज्ज ठेवून लोकांचे स्थलांतरण केले. सद्या कोयना धरणातून 30 हजार तर कण्हेर, धोम, उरमोडी, तारळी या धरणांमधून 20 हजार क्युसेक्स विसर्ग आणि वारणेतून 16 हजार क्युसेक्स विसर्ग होत आहे. कोयना धरणात आत्तापर्यंतचे एका दिवसात 12 टीएमसी पाणीसाठ्याचे रेकॉर्ड होते. ते यावेळी 18 टीएमसी वर गेले आहे. सद्या तरी पावसाने उसंत दिली आहे. भविष्यात असाच पाऊस आला तर त्यासाठी अत्यंत नेटके नियोजन हवे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, दुधगाव, शिगाव आदि भागात पाणी पसरले असून सांगलीतही पाणी आले आहे. वारणेतून होणारा 28 हजार क्युसेक्स विसर्ग 16 हजारावर  करण्यात आला आहे. शक्य असल्यास तो आजच्या रात्री तोही थांबवावा, अशा सूचना जलसंपदा विभागाला  दिल्या असून सांगलीतील पाणी 8 ते 10 तासात ओसरेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच पाणी ओसरताच यंत्रणांनी करावयाच्या सर्व उपाययोजना त्वरीत राबविण्याचे निर्देशही दिले. ज्या रस्त्यांवर पूराचे पाणी रस्ता ओलांडून पलीकडच्या बाजूला वाहून जाते अशी ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी पाणी निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, सद्या जिल्ह्यात 94 गावे पूरबाधित असून 1 लाख 5 हजाराहून अधिक लोकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. तर 24 हजार जनावरांचेही स्थलांतरण करण्यात आले आहे. 60 शासकीय व 6 सामाजिक संस्थांची निवारा केंद्रे सुरू करण्यात आली असून यामध्ये साधारणत: 3 हजार 400 व्यक्तींनी आश्रय घेतला आहे. त्यांना मास्क, सॅनिटायझर, भोजन आदि सर्व सुविधा पुरविण्यात येत आहेत. जवळपास 23 हजार 500 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन, ऊस आदि पिकांना फटका बसला आहे. नुकसानीच्या अनुषंगाने पंचनाम्यासाठी पथके तयार करण्यात आली आहे. पूरबाधित क्षेत्रात आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. पाणी आलेल्या ठिकाणी रेखांकन करण्याच्या सूचनाही यंत्रणांना दिल्या आहेत.
पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज दिवसभर वाळवा, शिगाव, कनेगाव, मौजे डिग्रज आदि भागातील पाणी आलेल्या ठिकाणी भेट दिली व पाहणी केली. सांगली शहरातही त्यांनी कापडपेठ, हरभट रोड, गणपती पेठ, बुरूड गल्ली, जुना स्टेशन या ठिकाणी पूरपरिस्थितीची पाहणी केली. तसेच सांगली महानगरपालिकेच्या वतीने स्थलांतरीत केलेल्या लोकांची महानगरपालिका शाळा क्र. 13 येथे भेट देवून विचारपूस करून दिलासा दिला.

Wednesday, July 21, 2021

बारा खांबी मंदिर.....ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सकलेश्वर मंदिर




बारा खांबी मंदिर.....

ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सकलेश्वर मंदिर 
बारा खांबी मंदिर.....
ऐतिहासिक वारसा असलेल्या जिल्ह्यातील अंबाजोगाई शहराच्या उत्तरेस सकलेश्वर मंदिर लेणी मंदिर असून या ठिकाणच्या दुर्लक्षित बाराखांबी परिसरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत सीताफळाचे झाड मुळासकट काढताना अनेक देवदेवतांच्या शेकडो शिल्प व शिलालेख सापडले आहेत.हे शिल्प बौद्ध की शिवकालीन आहेत,हे अद्याप स्पष्ट झाले नसून पुरातत्त्व विभागाने अजून या मंदिराला भेट दिलेली नाही.त्यामुळे ही दुर्मिळ शिल्पे चोरीस जाण्याची भीती स्वयंसेवकांकडून व्यक्त होत आहे.

अंबाजोगाई शहराजवळील सकलेश्वर मंदिर लेणी मंदिर असून यालाच बाराखांबी म्हणतात कलात्मक व खास रूपगर्वितांच्या शिल्पामुळे हे मंदिर प्रसिद्ध आहे.या मंदिराची उभारणी शके ११५० म्हणजेच इ.स.१२२९ मध्ये झाल्याचा उल्लेख शिलालेखात आहे.मध्ययुगीन कालखंडातील हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असून या मंदिराची उभारणी सिंघनदेव यादवांचा सेनापती खोलेश्वराने केलेली आहे.

मंदिराच्या शिलालेखातील अप्रतिम शिल्पे कर्नाटकातील एव्होळे मंदिराच्या स्थापत्य कलेशी साधर्म्य दाखवणारी आहे.मुळात सकलेश्वर मंदिर अवकाशातून शिवपिंडीच्या आकाराचे दिसते.

@aamhi_itihas_vede
https://instagram.com/aamhi_itihas_vede/

Saturday, July 17, 2021

सातारा जिल्हा षरिषदच्या वतीने १४ व्या वित्त आयोगांतून नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रास नविन अॅम्बुलस


सातारा जिल्हा षरिषदच्या वतीने १४ व्या वित्त आयोगांतून  नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रास  नविन अॅम्बुलस

नागठाणे दि प्रतिनिधि :-
सातारा जिल्हा षरिषदच्या वतीने १४ व्या वित्त आयोगांतून  नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रास  नविन अॅम्बुलस देण्यांत आली त्या गाडीचे पुजन करतांना नागठाणे गांवच्या प्रथम नागरीक सौ डाॅ रुपाली बेंन्द्रे  उपसरपंच श्री अनिल साळूंखे वर्धन अग्रो संचालक आविनाश साळुंखे कराड उत्तर शिवसेना उपप्रमुख श्री शंकरराव साळुंखे,नागठाणे प्राथमिक आरोग्य केंन्द्र प्रमुख श्री कांबळे सर सातारा तालुक अध्यक्ष श्री संतोष साळुंखे पाटिल तसेच नागठाणे ग्रामपंचायतीचे सदस्य श्री राजेन्द्र साळुंखे,संजय साळुंखे,श्री हणमंत साळुंखे श्री दत्तात्रय साळुंखे, नागेश साळूंखे,किरण साळुंखे तसेच ग्रामस्थ उपस्थितीत होते*

लिंगायत समाजातील गुणवंतांचा सन्मानमहाराष्ट्रात राज्यातील दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा *Lingayat - लिंगायत* सोशलमीडिया नेटवर्किंग परिवाराने महाराष्ट्र राज्यस्तरीय लिंगायत गुणवंतांचा सन्मान


लिंगायत समाजातील गुणवंतांचा सन्मान
महाराष्ट्रात राज्यातील दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा *Lingayat - लिंगायत* सोशलमीडिया नेटवर्किंग परिवाराने महाराष्ट्र राज्यस्तरीय लिंगायत गुणवंतांचा सन्मान 

पुणे दि 18 प्रतिनिधी
राज्यस्तरीय सन्मान लिंगायत गुणवंतांचा
महाराष्ट्रात राज्यातील दहावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन यशस्वी झालेल्याचे कौतुक केलेच पाहिजे ते आपले सामाजिक व नैतिक कर्तव्य आहे. ह्या उद्दांतहेतुने *Lingayat - लिंगायत* सोशलमीडिया नेटवर्किंग परिवाराने महाराष्ट्र राज्यस्तरीय लिंगायत गुणवंतांचा सन्मान करण्याचे ठरविले आहे. तमाम लिंगायत समाजातील सर्व दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणपत्रिका खालील व्हाॅटसप क्रमांकावर *दि.25 जुलै 2021पर्यत* पाठवावी आलेल्या गुणपत्रिकेतुन *सर्वात जास्त गुण मिळवलेल्या 10 विद्यार्थ्यांना विशेष सन्मानित करण्यात येईल* तसेच प्रत्येक सहभागी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल.
*WhatsApp नंबर - : 9420219469*

इथे क्लिक करुन थेट मेसेज करा 👇
https://wa.me/message/NQQ7MVHXFSYDJ1

Friday, July 16, 2021

लिंगायत TV live या नवीन youtube चॅनेल चालू होणाऱ्या चॅनेल साठी विवीध विभागात काम करण्यासाठीप्रतिनिधी ची नेमणूक सुरू


लिंगायत TV live या  नवीन youtube चॅनेल  चालू होणाऱ्या चॅनेल साठी  विवीध विभागात काम करण्यासाठी प्रतिनिधी ची नेमणूक सुरू
पुणे दि 16 :- प्रतिनिधी  
 लिंगायत समाजातील विविध उपक्रम  तसेच समाजातील घडामोडी या समाजातील सर्व लोकांपर्यन्त पोहोचविण्या साठी एक हक्काचे व्यासपीठ  लिंगायत TV live हे नवीन youtube चॅनेल  चालू होत असून या साठी  विवीध विभागात काम करण्यासाठी प्रतिनिधी ची नेमणूक करणार आहोत  या साठी इच्छुकांनी आपली महिती whatsap आणि खालील  दिलेल्या ई-मेल ला पाठवावी
📣 *लवकरच येत आहे*  📣
 🔸 *लिंगायत समाजाचे एकमेव*  *चँनल* 📡🔸
लिंगायत समाजातील सामाजिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय,सांस्कृतिक,अशा सर्वच क्षेत्रातील
बातम्या, माहिती 
डिजीटली लाईव्ह समाजातील प्रत्येकापर्यंत पोहचविण्यासाठी सर्वप्रथम घेऊन येत आहोत 📣
लिंगायतांचे एकमेव हक्काचे व्यासपीठ🎙️📹🎤
📹 *लिंगायत TV Live* 🎤
 *_युट्यूब चँनल_* 📡
समाज कार्याची आवड असलेल्या तसेच खालील क्षेत्रातील ज्ञान असलेल्या तरुण तरुणींना विनम्र आवाहन
🖥️ ग्राफिक्स डिझायनर
🎙️अँकर
📹 व्हिडीओ एडिटिंग
✒️पत्रकार
या व तांत्रिक विभागात असणाऱ्या बांधवांनी संपर्क साधावा व या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे हि विनंती🙏
 *ईमेल: lingayattv@gmail.com* 
 *whatsap मोबाईल:  8698002755*

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...