Sunday, April 30, 2023

वीरशैव लिंगायत पतसंस्था पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न.

 वीरशैव लिंगायत पतसंस्था पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न.



वीरशैव लिंगायत पतसंस्था पदाधिकाऱ्यांचा राज्यस्तरीय मेळावा संपन्न.





कोपरगाव दि ३०:- सतीश निळकंठ

  महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वाखाली असलेल्या पतसंस्थांच्या सक्षमीकरणासाठी सामुदायिकपणे प्रयत्न करणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष आणि लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केली.




महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वात असलेल्या पतसंस्थांच्या पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते. पुणे येथील अर्थसिद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.भगवान कोठावळे, सिद्धेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री. सुधीर राजमाने व कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.गोपीनाथ निळकंठ यांनी केले होते.

या मेळाव्यास महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वात असलेल्या ४२ पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विशेषतः अहमदनगर, नाशिक, बीड, सांगली, संभाजीनगर या भागातील पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या मेळाव्यात खालील प्रमाणे ठराव करण्यात आले.



१) वीरशैव लिंगायत समाजातील बांधवांच्या पतसंस्थांना अडचणी येणार नाही याची सामुदायिकपणे दखल घ्यावी.

२) वीरशैव लिंगायत समाज बांधवांनी आपले व्यवहार वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वात असलेल्या पतसंस्थांमध्येच करावे.

३) वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वात असलेल्या पतसंस्थांनी प्राधान्याने लिंगायत समाजातील समाज बांधवांना कर्ज पुरवठा करावा.

४) वीरशैव लिंगायत समाजातील सर्वच धर्मगुरूंनी आपापल्या परिसरातील पतसंस्थांशी व्यवहार करण्याचे आवाहन समाज बांधवांना करावे व आपल्या मठा चे व्यवहारही परिसरातील वीरशैव लिंगायत समाजाच्या नेतृत्वात असलेल्या पतसंस्थांमध्ये करावे.

प्रसंगी वीरशैव लिंगायत पतसंस्था मेळाव्याला उपस्थित पतसंस्था प्रतिनिधींचे स्वागत कुंभारी येथील राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.गोपीनाथ निळकंठ यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे येथील सिद्धेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन श्री.सुधीर राजमाने यांनी केले. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील श्री. राजाभाऊ मुंडे यांनी भूषविले. उपस्थित पतसंस्थांच्या  प्रतिनिधींनी स्वतःचा परिचय करून देत पतसंस्थेची आर्थिक स्थिती सांगितली. तसेच स्वतः ची पतसंस्था सहकार व सामाजिक क्षेत्रात राबवत असलेल्या योजना, उपक्रमांची ही माहिती दिली. तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या हस्ते उपस्थित चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालकांचा सत्कार करण्यात आला.

या मेळाव्यास तुळजापूर येथील श्री. गुरुनाथ बडूरे, श्री.शिवाजी आप्पा कपाळे, श्री.रविंद कानडे , श्री.ओमकार खुरपे , धाराशिव येथील श्री.श्रीकांत साखरे, श्री.हनुमंत भुसारी, चाकूर येथील श्री विठ्ठल माकणे, आटपाडी येथील श्री.सतिश भिंगे, नाशिक येथील श्री.बद्रीनाथ वाळेकर, श्री.धोंडूआप्पा हिंगमिरे, श्री. रविंद्र आद्यप्रभू, श्री.अनिल कोठुळे, संभाजीनगर येथील श्री. शिवाप्पा खांडकुळे, बार्शी येथील श्री.बाळासाहेब आडके, कळंब येथील  श्री.सागर मुंडे, श्री.निलेश होनराव, मंगळवेढा येथील श्री.शैलेश हावनाळे , औसा येथील श्री.नितीन शेटे यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री.सतीश निळकंठ यांनी विशेष परिश्रम घेतले.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर येथे, म.बसवेश्वर अध्यासन केंद्राचे शानदार उद्घाटन .

 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर येथे, म.बसवेश्वर अध्यासन केंद्राचे शानदार उद्घाटन .

               




   पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर येथे , म.बसवेश्वर अध्यासन केंद्राचे शानदार उद्घाटन .


                                       


सातारा , दि.30 - प्रा.अजय शेटे.

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ ,सोलापूर येथे शनिवार , दि.29 रोजी सकाळी 11.30 ते 2.30 या वेळेत म.बसवेश्वर अध्यासन केंद्राचे उद्घाटन विद्यापीठाच्या प्रशस्त सभागृहात  विद्यापीठाचे पहिले संस्थापक  कुलगुरू प्रा. डॉ. इरेश स्वामी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करून  करण्यात आले. त्या नंतर उपस्थित सर्वांनी प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ.मृणालिनी फडणवीस या होत्या.त्यांच्याच विशेष प्रयत्नातून हे अध्यासन केंद्र  शासन व विद्यापीठ अनुदान आयोगयांचेकडून मंजूर करण्यात आले आहे. या नंतर सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत व सत्कार करण्यात आला.

               




विद्यापीठाच्या विद्यार्थिनी कु.लोणी व कांबळे यांनी कन्नड  बसव वचनांचे गायन केले. संस्कृत विभागाच्या प्रा.कु.तिवारी यांनी मा. इरेश स्वामी यांचा परिचय करून दिला. कु.ममता बोल्ली मॅडम यांनी अतिशय सुरेल आवाजात कार्यक्रमाचे निवेदन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  अध्यासनाचे प्रभारी संचालक प्रा. डॉ.केदारनाथ काळवणे यांनी करून अध्यासनाचा उद्देश स्पष्ट केला.

यानंतर मंगळवेढ्याचे बसव साहित्य प्रचारक डॉ. आप्पासाहेब पुजारी यांनी म.बसवेश्वर यांचे वचन लेखन कार्य विषद करून अजून नवीन प्रकारे वचन साहित्य कसे निर्माण करणार आहे हे  व इष्ठलिंग महत्त्व विषद केले.या वेळी या अध्यासन केंद्रासाठी त्यांनी पन्नास हजार देणगी जाहीर करून त्याचा चेक मा.कुलगुरू यांचेकडे सुपूर्द केला.प्रा. अरविंद लोणी यांची रु.पंचवीस हजार रुपये देणगी पण या वेळी जाहीर करण्यात आली.तसेच प्रा.तिवारी यांच्या बसव साहित्याचा पण आढावा घेण्यात आला.

 केंद्रिय विद्यापीठ ,गुलबर्गा चे संचालक प्रा. डॉ.बी.बी.पुजारी यांनी म.बसवेश्वर यांची विचारसरणी विषद करून अतिशय सुरेल आवाजात बसव वचनांचे गायन करून दाखविले व उपस्थित सर्वांची मने जिंकली.




या नंतर विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. इरेश स्वामी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की, म.बसवेश्वर हे समता नायक होते.त्यांचे जीवन चरित्र हे अतिशय प्रेरणादायी असे आहे.केवळ प्रधान मंत्री न रहाता या थोर विभूती ने सर्वसामान्य जन माणसांसाठी मानवतावादी कार्य केले.त्यांची कन्नड व मराठी वचने यांचा अभ्यास करून त्याचा नवा अर्थ माझ्या ग्रंथ संपदेतून मी इत्यंभूत पणे विषद करून त्यांच्या विचारांना नवीन दृष्टीने समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे .अशा थोर विभूतीच्या नावाने येथे सुरू होणाऱ्या अध्यासन केंद्राचे उद्घाटन करण्याचे भाग्य  मला लाभले हे मी माझे परमभाग्य समजतो.




 विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी  आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.त्या म्हणाल्या की, म.बसवेश्वर यांच्या अध्यासन केंद्राचे आज येथे उद्घाटन होताना माझ्या एका स्वप्नपूर्तीचा आनंद प्राप्त होत आहे. म.बसवेश्वर यांच्या जीवनकार्याचा सर्व सामान्य जीवनात प्रसार होऊन त्या माध्यमातून समाजात आदर्श विचारसरणी निर्माण झाल्यास समाज व्यवस्था अतिशय चांगली बनेल.असा मला विश्वास आहे.

या कार्यक्रमास प्र.कुलगुरू डॉ.राजेश गादेवार ,परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ.शिवकुमार गणपूर , वित्त व लेखाधिकारी चार्टर्ड अकाउंटंट श्रेणिक शाह,कुलसचिव योगिनी घारे यांनी विशेष उपस्थिती लाभली.

या वेळी मा.कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांच्या आवाहनानुसार म.बसवेश्वर अध्यासन केंद्राची रूपरेषा व कार्यपद्धती कशी असावी? या आवाहनाला प्रतिसाद देत  प्रा. अजय शेटे यांनी लेखी सूचना व कार्यवाही पत्र मा.कुलगुरू मॅडम यांना सर्वांसमक्ष सादर केले.तसेच सोलापूर बसव भक्त यांचे तर्फे मा.कुलगुरू मॅडम यांचा पुष्पगुच्छ  देवून विशेष सन्मान करण्यात आला व अध्यासन केंद्रासाठी म.बसवेश्वर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.हा सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  म.शासन म.बसवेश्वर स्मारक समिती मंगळवेढा चे अध्यक्ष मा. डॉ.बसवराज बगले, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू सारणे, संघटक लक्ष्मीकांत पुजारी,सरचिटणीस परमेश्वर माळगे , प्रा.शिवानंद तडवळ, प्रा. डॉ.भीमाशंकर बिराजदार, डॉ.भीमाशंकर भांजे, चन्नवीर भद्रेश्वरमठ,सुरेश वाले,महाबळेश्वर साखरे,प्रा.गजानन धरणे, जयदेवी ताई लिगाडे,विजयकुमार हतुरे यांनी विशेष प्रयत्न केले.या कार्यक्रमास कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील पत्रकार बंधू,  विद्यापीठ शिक्षक,बसव अभ्यासक व भक्त,विद्यार्थी - विद्यार्थिनी,स्त्री - पुरुष श्रोते  हजर होते.या वेळी सर्वांबरोबर उपस्थित सर्वांचे फोटो सेशन करण्यात आले व सर्व मान्यवरांच्या समवेत भोजनाचा आस्वाद घेण्यात आला.

या अध्यासन केंद्रासाठी म. शासना तर्फे 3 कोटी रु.देण्यात आले असून , त्या रकमेच्या व्याजातून व दानशूर बसव भक्तांच्या व अभ्यासकांच्या प्रयत्नातून हे केंद्र चालवण्यात येणार आहे.त्या बद्दल महाराष्ट्र शासन व सर्वांचे विशेष आभार मानण्यात आले. मराठी विभागाचे शिक्षक प्रा.दत्तात्रय घोलप यांनी सर्वांचे आभार मानले.




Friday, April 28, 2023

महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचने यांचा सद्यस्थितीमध्येआचरणात आणणे अत्याश्यक आहे ,डॉक्टर अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ .

 महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचने यांचा सद्यस्थितीमध्येआचरणात आणणे अत्याश्यक आहे ,डॉक्टर अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ .





 महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचने यांचा सद्यस्थितीमध्येआचरणात आणणे अत्याश्यक आहे ,डॉक्टर अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ .



पुणे दि २७ :- संजय शहापुरे  प्रतिनिधी 

महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचने यांचा सद्यस्थितीमध्येआचरणात आणणे अत्याश्यक आहे , असे प्रतिपादन डॉक्टर अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ . लिंगायत धर्म महासभा आणि राष्ट्रीय बसव दल यांच्या संयुक्त विद्यमाने भोसरी येथे केले ,बसव जयंतीचा उत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते , येथील अंकुशराव लांडगे सभागृह.या ठिकाणी बसव जयंतीचा उत्सव भरगच्च उपस्थितीत मोठ्या दिमाखात साजरा झाला.



या सोहळ्यामध्ये डॉक्टर अशोक नगरकर वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्या हस्ते ध्वज रोहन करण्यात आले.त्याचप्रमाणे नगरकर सरांच्या व्याख्याना द्वारे महात्मा बसवेश्वरांचे विचार आणि वचने यांचा सद्यस्थितीमध्ये कशाप्रकारे वैज्ञानिक विचार करता येईल याविषयी अनेक उदाहरणांद्वारे सर्व श्रोत्यांना माहितीपर व्याख्यान देण्यात आले.एका शास्त्रज्ञाला कार्यक्रमासाठी बोलावून त्यांचे विचार व बसवेश्वर तत्वज्ञानाचा सद्यस्थितीत कसा वापर करावयाचा याविषयी समाजातील युवकांना आणि नागरिकांना ऐकण्याची संधी उपलब्ध करून देणे हा एक मोठा परिवर्तनाचा भाग, बसव जयंती मध्ये झाला आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री सतीश पाटील यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली.

Thursday, April 27, 2023

सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका 'कारण गुन्ह्याला माफी नाही' १ मे पासून सुरु , सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.

 सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका 'कारण गुन्ह्याला माफी नाही' १ मे पासून सुरु , सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.



सोनी मराठी वाहिनीवर नवी मालिका 'कारण गुन्ह्याला माफी नाही' १ मे पासून सुरु , सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर.


                  

सातारा  , २६ : प्रसाद वाकडे 

 सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ ही नवी थरारक मालिका  प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहे.  या मालिकेत प्रेक्षकांचे आवडते इन्स्पेक्टर भोसले आणि जमदाडे आपल्याला निराळ्या अंदाजात पाहता येणार आहेत. निरनिराळ्या व्यतिरेखांमधून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी अभिनेत्री अश्विनी कासार ही या मालिकेतून पुनरागमन करताना दिसणार आहे. अभिनेत्री अश्विनी कासार पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसणार आहे. एसीपी अनुजा हवालदार असे तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सोबतच  रुपल नंद ही सुद्धा या मालिकेत पुनरागमन करताना दिसते आहे. मोहिनी दुभाषी असे तिच्या व्यक्तिरेखेचे नाव असणार आहे. या मालिकेचे लेखक चिन्मय मांडलेकर, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि निर्माती मनवा नाईक यांनी केले आहेत. ही मालिका १ मे पासून सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे तेव्हा पहायला विसरु नका.  




सध्याचे तरुण एका वेगळ्याच जाळ्यात अडकले आहेत. ते जाळं म्हणजे ऑनलाईन गेमिंगचं. नकळत या जाळ्यात सगळे गुंतले जात आहेत. झटपट पैसे जिंकण्याच्या आशेने या ऑनलाईन गेमिंगच्या जाळ्यात सगळे अडकत आहेत. त्यातून होणार्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी त्यांना आणखीन मोठ्या गुन्ह्यांच्या आहारी जावं लागतं आहे. यातून चोरी, सिरियल किलिंग या गुन्ह्याचे प्रमाणही वाढतं आहे. त्यासाठीच महाराष्ट्र पोलीस दलात 'स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड' नेमण्यात आलं आहे. त्याचा भाग इन्स्पेक्टर भोसले, जमदाडे आणि एसीपी अनुजा असणार आहेत. ते कशा प्रकारे या गुन्ह्याला आवरण्याचा आणि गुन्हेगारांना शिक्षा करण्याचा प्रयत्न करतील, हे आपल्याला पाहायला मिळेल.      

निरनिराळ्या चित्रपटांमधून आणि मालिकांमधून वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे हरीश दुधाडे  प्रेक्षकांच्या लाडक्या, इन्स्पेक्टर भोसले या व्यक्तिरेखेत  पुन्हा दिसणार आहेत. चंद्रलेखा जोशी हिने आपल्या अभिनायाच्या जोरावर जमदाडे ही व्यक्तिरेखा घराघरांत पोहोचली आहे. त्याबरोबरच पोलिसांच्या आयुष्यातील दुसरी बाजूही  आपल्याला या मालिकेतून पाहता येणार आहे. पोलीस आपल्या कामात नेहमी तत्पर असतात. दिवस-रात्र आपल्या कामाला महत्त्व  देणारे आपल्या कुटुंबाला देण्यासाठी पुरेसा वेळ त्यांच्याकडे नसतो. 'कारण गुन्ह्याला माफी नाही' मालिकेतून नेहमी आपल्या कामात तत्पर असलेल्या पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींवरही  भाष्य केले जाणार आहे. १ मे पासून सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. सोनी मराठी वाहिनीवर सुरु होणार आहे तेव्हा पहायला विसरु नका.



महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे शनिवारी सोलापुरात उद्घाटन.

 महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे शनिवारी सोलापुरात उद्घाटन. 




महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे शनिवारी सोलापुरात उद्घाटन. 





सातारा, दि.27 - प्रा.अजय शेटे.

 सर्व बसवप्रेमी अभ्यासक,संशोधक,लेखक, अनुवादक, बसवतत्व प्रसारक बंधू भगिनीं यांच्या बऱ्याच वर्षांच्या  मागणी नुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्रास राज्य सरकारने मंजूरी दिली असून ,त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 3 कोटी रूपयांची तरतूदही केली आहे. त्या रकमेच्या ठेवीच्या व्याजातून मिळणारी रक्कम दरवर्षी  25 लाख खर्च करून भविष्यात येथे  विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.त्याविषयीची कार्यपद्धती उच्च शिक्षण विभाग आणि विद्यापीठ प्रशासन  निश्चित करीत आहे.

महात्मा बसवेश्वर महाराजांचे जीवनचरित्र, वचन साहित्याचे भाषांतर, विश्लेषण,बसव साहित्यिकांचे विविध प्रकारचे साहित्य, प्रकाशन, कन्नड भाषेतील बसव साहित्याचा मराठीत अनुवाद,शालेय पाठ्यक्रमात समावेश, एम.फील,पीएच डी चा अभ्यासक्रम,प्रबंध लेखन,आणि बसवेश्वर महाराजांच्या जीवनचरित्राचा प्रसार व प्रचार आणि प्रकाशन यासाठी सर्वांच्या सूचना  व सहभाग विचारात घेऊन त्याबाबतची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या सर्व कार्य पूर्ती करिता शनिवार, दिनांक 29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 11:30 वाजता ' महात्मा बसवेश्वर '  अध्यासन केंद्राचा शुभारंभ व उदघाटन समारंभ विद्यापीठात होणार आहे. 

 हा  संपूर्ण कार्यक्रम शासकीय स्वरूपाचा आणि विद्यापीठ प्रशासनाचा असल्याने कोणताही राजकीय पक्ष अथवा सामाजिक संघटनेचा या विषयात संबध असणार नाही. तसेच या अध्यासन केंद्राविषयीची आपली संकल्पना काय आहे.याचे एक लेखी निवेदन आपण मा.कुलगुरू यांना देवून आपली भूमिका मांडण्याचा अधिकार बसव अभ्यासकांना देण्यात आला आहे. दरम्यानच या कार्यक्रमा नंतर सर्वांना  विद्यापीठ सभागृहात एकत्रित येऊन संवादातून विचारमंथन  व परिचय करून घेता येणार आहे .तशा स्वरूपाच्या 

आपल्या सूचना, संकल्पना,विचार लेखी स्वरूपात आणून  जाणीवपूर्वक या उद्घाटन समारंभात आपली उपस्थिती आणि सहभाग नोंदवून बसव साहित्य दासोहाचे योगदान द्यावे.असे आवाहन महाराष्ट्र शासन नियोजित म.बसवेश्वर स्मारक कृती समिती अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांनी केले आहे.

Monday, April 24, 2023

सातारा येथे वीरशैव लिंगायत समाज (औंधकर मठ) सातारा , एकोरामाराध्यय व महात्मा बसवेश्शर यांची ९१८ वा जन्मोत्सव (जयंती) उत्साहात साजरी करण्यात आली .

 सातारा येथे  वीरशैव लिंगायत समाज (औंधकर मठ) सातारा , एकोरामाराध्यय व महात्मा बसवेश्शर यांची ९१८ वा जन्मोत्सव (जयंती) उत्साहात साजरी करण्यात आली .



सातारा येथे  वीरशैव लिंगायत समाज (औंधकर मठ) सातारा , एकोरामाराध्यय व महात्मा बसवेश्शर यांची ९१८ वा जन्मोत्सव (जयंती) उत्साहात साजरी करण्यात आली .




सातारा  दि २३ :-  महादेव मेंडगिरी  प्रतिनिधी  

 प.पू.गुरू औंधकर महाराज बुधवार पेठ ,सातारा येथे  वीरशैव लिंगायत समाज (औंधकर मठ) सातारा ,वीर माहेश्वर मंडळ, वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विध्यमाने एकोरामाराध्यय व महात्मा बसवेश्शर यांची ९१८ वा जन्मोत्सव (जयंती)  उत्साहात साजरी करण्यात आली .




दिवसभर कार्यक्रम अंतर्गत सकाळी १०वाजता पाच दिवसीय ग्रंथराज  'परमरहस्य ' पारायण समाप्ती व महाप्रसाद ,दु. ४ ते ५ वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळाचे शिव भजन ,५ ते६ महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव व फूले टाकणे ,बसवेश्वर आरती व प्रसाद वाटप   बसवेश्वर जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला भजनी मंडळाचे पाच दिवसीय योगदान अतिशय मोलाचे असून त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे सर्वस्वी महिला भजनी अध्यक्षा नंदा चिंचकर सौ निर्मला बारवडे, सौ लक्ष्मी कामळे,सौ वासंती महापरळे, सौ चंदा जंगम ,सौ साधना कळसकर ,सौ आनंदी राजमाने, सौ महादेवी तोडकर सौ उमरदंड, सौ ज्योती परळकर सौ लता फल्ले, सौ जोस्ना चौकवाले, सौ गवळी, माजी अध्यक्षा शारदा देवर्षि ,माजी अध्यक्षा शशिकला वांकर ,सरोजनी गुरसाळे ,श्रीमती बहिरट व ज्ञात - अज्ञात महिला कार्यकर्त्या यानी  विशेष परिश्रम घेतले .



अध्यक्ष श्रीनिवास कामळे, सुभाष ताटे ,माधव मेंडीगीरी,सुरेश कळसकर ,श्री महादेव सरडे ,शेखर राजमाने , सागर कस्तूरे, महेंद्र बाजारे, महेश स्वमी, सिध्देश्वर शेटे नंदूशेठ गुरसाळे , प्रवीण स्वामी ,वैभव स्वामी संजय बेंदाडे, किरण श्रेष्ठी, विनायक स्वामी, जयेंद्र स्वामी, अक्षय विघ्ने, जगन्नाथ स्वामी, सुनिल जंगम स्वामी ,व इतर समाज बांधव व भगिनी या सर्वांच्या तन मन धन प्रयत्नाने बसवेश्वर जयंतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहाने व नेत्रदिपक झाला.सातारा येथीलवीशैव लिंगायत महिला भजनी मंडळाची गेल्या ५४ वर्षाची अखंडीत शिवभजन असो व परमरहस्य पारायण अथवा बसवेश्वर जयंती असो किवा शिवाचार्यांचे अनुष्ठान वा धार्मिक कार्यक्रम असो सातारा महिला मंडळ एक पाऊल नेहमी पुढे असते महिला कार्यकर्त्या तन मन धनाने नेहमीच समाजासाठी झटून कार्य करीत असतात. शेवटी प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली .

                      

            

Sunday, April 23, 2023

म.बसवेश्वर यांची 918 वी जयंती वडूज मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न.

  म.बसवेश्वर यांची 918 वी  जयंती  वडूज मध्ये  मोठ्या उत्साहात संपन्न.



 म.बसवेश्वर यांची 918 वी  जयंती  वडूज मध्ये  मोठ्या उत्साहात संपन्न.





सातारा, दि.23 - प्रा.अजय शेटे.

वडूज, ता.खटाव, जि.सातारा येथे म.बसवेश्वर यांची 918 वी जयंती वीरशैव लिंगायत समाज संघटने तर्फे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.वडूज नगरपंचायत,तहसील कार्यालय ,पंचायत समिती येथेही निवासी अधिकारी यांचे हस्ते  म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून शासकीय पार पडला.

शनिवार सकाळी 9.00 वा. म.बसवेश्वर यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना अध्यक्ष सचिन शेटे व श्री बालाजी स्वामी यांच्या हस्ते करण्यात येऊन आरती करण्यात आली.त्यानंतर दुपारी 3 ते संध्या 5.30 या वेळेत श्री विश्वाराध्याय महिला मंडळ, वडूज यांनी अथर्वशिर्ष व रूद्र पठण केले. संध्या.6.30 वा. म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेची मिरवणूक श्री.देवकर , कातरखटा व यांच्या अश्वारूढ सुशोभित वरात गाडीतून काढण्यात आली.



 मिरवणुकीसमोर धनाजी ब्रॉसबॅन्ड कंपनी , वडूज यांनी सुश्राव्य भक्ती संगीत सादर केले.श्री मारुती मंदिर - शेतकरी चौक - बाजार चौक - शिवाजी चौक - एस. टी.स्टँड मार्गे हुतात्मा स्मारक मार्गे मिरवणूक माघारी श्री.हनुमान मंदिर येथे माघारी आली यावेळी  वडूज चा आठवडा गर्दी  बाजार असून सुद्धा वडूज पोलीस स्टेशनच्या महिला व पुरुष कॉन्स्टेबल यांचे तर्फे यात्रा मार्गावर चोख बंदोबस्त ठेवला गेला होता.त्यामुळे मिरवणूक अतिशय व्यवस्थित पार पडली.मिरवणुकीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात येवून, म.बसवेश्वर महाराज की जय !,लिंगायत धर्माचा विजय असो!अशा घोषणा देण्यात आल्या .सर्व शरण व शरणी यांनी लिंगायत धर्माचे ध्वज हाता मध्ये धरून फडकवले होते.सर्वांना म.बसवेश्वर यांच्या चित्राचे भगवे फित बिल्ले लावण्यात आले होते.





त्यानंतर श्री मारुती मंदिर येथे नवीन पदाधिकारी ,पोलीस मित्र अतिथी मंडळी श्री दिलीप ढोले,मंत्रालय सहाय्यक श्री .अभय भुंजे,शुभम डोंबे ,योगेश लिगाडे अंबवडे ,तुकाराम भादुले आण्णा यांचा  जेष्ठ नागरिकांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.यानंतर  म.बसवेश्वर यांचे जीवन कार्य विषद करताना प्रा.अजय शेटे म्हणाले की, म.बसवेश्वर यांनी बाराव्या शतकाच्या प्रारंभी सुरू केलेली कल्याण क्रांती ही जगातील पहिली क्रांती आहे.बसव विचार हा जगातील सर्वात पहिला विचार आहे.शरण चळवळ ही पण जगातील पहिली चळवळ आहे आणि अनुभव मंडप ही पण जगातील पहिली लोकशाही संसद आहे. म.बसवेश्वर यांनी पाताळ व स्वर्ग - नरक या कल्पनेपेक्षा पृथ्वी वरील हयात माणसाच्या जीवनाचा विचार केला.स्त्री - पुरुष यांना समान लेखले.23 हजार वचने लिहून देव  हा पशू-पक्षी, झाडे यांच्यात नसून   माणसातच आहे.स्त्रिया या देवी असून,पुरुष देव आहेत. जीवनात 'तूच मूर्ती आणि तूच मूर्तिकार ' असा संदेश त्यांनी समस्त मानव जातीला दिला.देवळातल्या देवाला इष्ट लिंगाच्या रूपाने सर्व सामान्य माणसाच्या हृदयावर आणून बसवले.अशा या महान विभूतीचा समस्त भारत वर्षाला अभिमान आहे.

या नंतर प्रा.नागनाथ स्वामी यांनी आपल्या सांगितले की,समाजाने सर्व कार्यक्रमात वेळेत हजर राहून सहकार्य करणे अपेक्षित आहे. म. बसवेश्वर यांनी कर्मकांडातील देव मानला नाही तर भक्तिभावातील देव आपलासा केला. व सर्व लिंगायत समाजाला सुलभ भक्तीचा मार्ग उपलब्ध करून दिला. या वेळी त्यांनी सर्वांकडून  '

 ' ओम नमः शिवाय! ' हा मंत्र पठण करून घेतला.

या नंतर सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली.यावेळी आजच्या मंदिरातील कार्यक्रमाला हजर असणाऱ्या महिला शरणी वर्गाची एक समिती गठीत करण्याचे निश्चित करण्यात आले.तसेच या पुढील कार्यक्रम हा संपूर्ण दिवसभर उपस्थित राहून करण्याचे निश्चित करण्यात आले.या नंतर ओंकार मंगल कार्यालय येथे सर्वांना महाप्रसाद अन्नदान करण्यात आले.या कार्यक्रमाला आतार मंडप डेकोरेटर्स यांचे तर्फे लाऊड स्पीकर व इलेक्ट्रिक रंगीत बल्ब माळा यांची आरास करण्यात आली होती. ओंकार डेकोरेटर्स यांचे तर्फे म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेची फुलांची व रंगीत पडदे यांची  सुशोभित बैठक व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमाला एकूण एक हजार  स्त्री - पुरुष भाविक भक्त हजर होते.

Saturday, April 22, 2023

महात्मा बसवेश्वर यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी.डॉ.श्यामसुंदर झळके

 महात्मा बसवेश्वर यांचे कार्य समाजासाठी  प्रेरणादायी.डॉ.श्यामसुंदर झळके




महात्मा बसवेश्वर यांचे कार्य समाजासाठी  प्रेरणादायी.डॉ.श्यामसुंदर झळके


                                                        

सिन्नर दि ;- २२  प्रतिनिधी 

 बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील विषमता,अंधश्रध्दा,अस्पृश्यता ,जातीभेद नष्ट करण्यासाठी मोठा लढा दिला.त्यांचे विचार आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,बहि:षाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले. विजयनगर येथील महात्मा बसवेश्वर चौकात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.महात्मा बसवेश्वरांनी स्वातंत्र्य,बंधुता,न्याय व समतेची शिकवण दिली. विजयनगर मित्र मंडळ,अंधश्रध्दा निर्मूलन समिती, शिवजन्मोत्सव समिती,सिन्नर तालुका वीरशैव लिंगायत सामाजिक संघटना, माजी सैनिक संघटना , बारा बलुतेदार संघटना यांच्यावतीने 

 महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी महामित्र दत्ता वायचळे यांनी महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या तरुण पिढीला दिशादर्शक आहे तर अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष हरिभाऊ तांबे यांनी महात्मा बसवेश्वर यांनी समतेचा विचार सांगून लोकशाहीचा पाया रचला.आंतरजातीय विवाहास त्यांनी प्रोत्साहन दिले असे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते डॉ.मनोहर दोडके यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या सामाजिक क्रांतीची माहिती दिली. सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे,अंकुश दराडे यांनी महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केले यावेळी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.विजय लोहारकर,उपाध्यक्ष मुकुंद वाळेकर, संघटक विजय आश्टुरे,सचिव संतोष वाळेकर,राहुल घोंगाणे,मंगेश वाळेकर,आशुतोष घोंगाणे,विजय गवंडर,मधुकर सोनवणे,विनायक सूर्यवंशी,मिलिंद जाधव,अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे बाबासाहेब कलकत्ते, शिवजन्मोत्सव समिती चे अध्यक्ष पांडुरंग वारुंगसे आदि उपस्थित होते.



Wednesday, April 19, 2023

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन.

 वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन  तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन.




वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन  तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन.


सातारा, दि.20 - रविंद्र वाकडे.

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन  तर्फे भव्य क्रिकेट स्पर्धांचे आयोजन.लिंगायत समाजाच्या इतिहासात प्रथमच भव्य दिव्य राज्यस्तरीय क्रिकेट लीग स्पर्धा अर्थात  वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन लिंगायत प्रिमीयर लीग स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने समाजातील तरुणांच्या खेळातील कौशल्याला नवा आयाम देण्यासाठी समाजाच्या इतिहासात प्रथमच राज्यस्तरीय क्रिकेट लीग स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत, 








या स्पर्धेच्या माध्यमातून भरघोस बक्षिसे,खेळाचे लाईव्ह प्रक्षेपण, महाराष्ट्रस्तरीय लिंगायत खेळाडू एकाच व्यासपीठावर आणण्याचे प्रयोजन आहे.अशा या भव्यदिव्य व ऐतिहासिक लीग ची सर्व माहिती क्रिकेट प्लेअर, क्रिकेट प्रेमी समाजबांधवांना लवकरच कळविण्यात येईल .असे नुकतेच वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र यांच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.याबाबत अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक :- 7020572626,9011177773  वर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बसवेश्वर जयंती निमित्ताने लिंगायत मठ ते तहसीलदार कार्यालया पर्यंत भव्य रॅली आणि तहसीलदार कार्यालयात येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन.व विविध कार्यक्रमाचे आयोजन

 बसवेश्वर जयंती निमित्ताने  लिंगायत मठ ते तहसीलदार कार्यालया पर्यंत भव्य रॅली आणि तहसीलदार कार्यालयात येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन.व विविध कार्यक्रमाचे आयोजन


बसवेश्वर जयंती निमित्ताने  लिंगायत मठ ते तहसीलदार कार्यालया पर्यंत भव्य रॅली आणि तहसीलदार कार्यालयात येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन.व विविध कार्यक्रमाचे आयोजन






कराड दि , दि.20 - रविंद्र वाकडे .
बसवेश्वर जयंती निमित्ताने  लिंगायत मठ ते तहसीलदार कार्यालया पर्यंत भव्य रॅली आणि तहसीलदार कार्यालयात येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन.व विविध कार्यक्रमाचे आयोजन
तसेच रविवार दि.23 रोजी लिंगायत मठ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे .बसवेश्वर जयंती निमित्ताने कराड येथे लिंगायत समाजातील डॉ यांच्या वतीने सर्व रोग निदान मोफत तपासणी शिबीर ,रक्तामधील साखर हिमोग्लोबिन तपासणी सौजन्य डॉ. लाल पँथ लॅब कराड, येथील वीरशैव लिंगायत समाजातर्फे शनिवार, दि.22.04.2023 रोजी लिंगायत मठ संस्था,106 ,रविवार पेठ,कराड येथे म.बसवेश्वर जयंती आयोजित करण्यात आली आहे.
या निमित्त स.9.30 वा.लिंगायत मठ ते तहसील कार्यालय पर्यंत  म.बसवेश्वर भव्य दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली आहे. स.11 ते 12 वीरशैव भजनी मंडळ,कराड यांचे भजन व दु.12.15 वा. म.बसवेश्वर यांचा जन्मकाळ होणार आहे.
.यामध्ये डॉ.चंद्रकांत कोरे,(कान ,नाक, घसा तज्ञ),  (डॉ.शिवप्रसाद राजमाने) स्त्री रोग तज्ञ, (डॉ.विनायक चिंचकर) मूळव्याध तज्ञ,  (डॉ.महेश उमरदंड )बालरोग तज्ञ, (डॉ.चन्नाप्पा महाज )आर्थोपेडीक सर्जन, 
 ( डॉ. प्रथमेश लोखंडे)  दंतरोग तज्ञ,  (डॉ.श्रद्धा पाटील )एम. डी. होमिओपॅथिक, (डॉ.अभिजित नष्टे ) हृदयरोग व मधुमेह तज्ञ,(डॉ. राहूल फासे) नेत्ररोग तज्ञ हे रुग्णांची तपासणी करणार आहेत.
सोमवार दि.24 रोजी दु.4.30 ते 7.30 म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक,रात्री 7.30 ते 8.30 या वेळेत श्री.दिलीप पाटील यांचे म.बसवेश्वर यांच्या जीवनकार्यावरील व्याख्यान होणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी आपले दैनंदिन व्यवहार या काळात पूर्ण बंद ठेवून कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल श्री.अनीलशेठ खुंटाळे.झाल्याबद्दल चि. डॉ. अथर्व उदय हिंगमिरे,(एम.बी. बी.एस) व कु. डॉ. ऋतुजा राजीव खलीपे (बी.एच.एम.एस.)झाल्याबद्दल यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
रात्री 8.३०  वा.पासून श्री.चंद्रशेखर नागाप्पा नकाते,कराड यांचे तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दि.28 रोजी सर्व समाज बंधू - भगिनींसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबत अधिक संपर्क सौ.अर्चना मुंढेकर,9834750061 व सौ.स्नेहा तोडकर  ,8796241111 यांचेशी संपर्क साधावा.
तसेच दि.21 ते 25 अखेर रांगोळी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.या बाबत श्री.प्रशांत मुंढेकर सर् यांच्याशी अधिक संपर्क साधावा.

श्री दत्तात्रय तारळेकर 9890913723,श्री. सुनिल महाजन 9422038451,श्री.सतीश बेडके 9604218911, श्री.राजेंद्र भादुले 9881737567, राजीव खलीपे 9890000805,श्री दिलिप म्हेत्रे 9860010101व म.बसवेश्वर जयंती उत्सव समिती,कराड यांनी केले आहे.

Sunday, April 16, 2023

साईश आणि इंद्रनील या चिमुकल्यांचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम येथे सामाजिक उपक्रमाने साजरा.

 साईश आणि इंद्रनील या चिमुकल्यांचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम  येथे  सामाजिक उपक्रमाने साजरा.




 साईश आणि इंद्रनील या चिमुकल्यांचा वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम  येथे  सामाजिक उपक्रमाने साजरा.


                                               

कडेगाव दि १६ :- अंश खलीपे 

रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांचे पुतणे चि.साईश खलिपे याचा प्रथम वाढदिवस आणि चि.इंद्रनील खलिपे याचा चौथा वाढदिवस रुद्राक्षा फौंडेशन संचलित अंशजल सामाजिक वाढदिवस या उपक्रमांतर्गत सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.

आजच्या कलियुगात वृद्धाश्रमांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तरुणांना वृद्धांबद्दल आस्था व प्रेम संपत चालले आहे. हे असेच चालू राहिले तर एक वेळ अशी येईल की, घरात मुलांना संस्कार द्यायला आजी-आजोबाच राहणार नाहीत. लहानपणापासूनच मुलांना योग्य संस्कार दिले तर ती मुलं मोठी झाल्यानंतर देखील आपली कर्तव्य विसरत नाहीत. याचाच विचार करत रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांनी आपल्या दोन्ही पुतण्यांचे वाढदिवस गोविंद वृद्धाश्रम, येळावी येथील वृद्धांसमवेत केक कापून सर्वांना नाश्ता देऊन साजरा केला. तसेच पोलीस फाट्यावरील ऊसतोड कामगार व त्यांच्या लहान मुलांना खाऊवाटप करून साजरा करण्यात आला.

यावेळी रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ॲड.अंश खलिपे, फौंडेशनच्या सचिव सौ.शोभा खलिपे, गोविंद वृद्धाश्रमाच्या संचालिका सौ. अलका पाटील, शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अमरदीप खलिपे व सचिव श्रीकांत खलिपे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना सौ.अलका पाटील म्हणाल्या, आजकालच्या पिढीने आपली सामाजिक बांधिलकी ओळखून असे कार्य करणे अत्यंत आवश्यक आहे. रुद्राक्षा फौंडेशनचे अध्यक्ष ॲड.अंश खलिपे यांनी आपल्या दोन्ही पुतण्यांचे वाढदिवस वृद्धाश्रमात येऊन साजरे केले आणि आपली सामाजिक बांधिलकी जपली त्याबद्दल त्यांचे कौतुक करेल तेवढे थोडेच आहे. वृद्धाश्रमातील वृद्धांना कोणत्याही गोष्टीची पैशाची अपेक्षा नसते त्यांना फक्त याकाळात प्रेमाची जास्त गरज असते आणि तेच प्रेम आज संपूर्ण खलिपे कुटुंबीयांनी येथे वृद्धांसमवेत वेळ घालवून, त्यांच्याशी बोलून, त्यांची विचारपूस करून दिलेले आहे. येथून पुढे देखील रुद्राक्षा फौंडेशनचे अध्यक्ष ॲड.अंश खलिपे व त्यांच्या संपूर्ण परिवाराकडून असे कार्य घडत राहो हीच सदिच्छा.

वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी इंद्रनील व साईश यास आशीर्वाद देऊन त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना केली. यावेळी सौ.पूजा खलिपे, चि.इंद्रनील खलिपे, चि.साईश खलिपे व वृद्धाश्रमातील सर्व आजी आजोबा उपस्थित होते.



लिंगायत समाजातील सर्वांनी हातात हात घालून समाजाच्या प्रगती साठी एकत्र येणे गरजेचे आहे. मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष.

 लिंगायत समाजातील सर्वांनी  हातात हात घालून  समाजाच्या प्रगती साठी  एकत्र येणे गरजेचे आहे. मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष. 


लिंगायत समाजातील सर्वांनी हातात हात घालून समाजाच्या प्रगती साठी एकत्र येणे गरजेचे आहे. मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष. 




कराड दि १६ :- रविंद्र वाकडे

राष्ट्रीय लिंगायत संघ यांचे वतीने सांगली येथे 'बसव रत्न गौरव पुरस्कार प्रदान.संपन्न.

 या वेळी बोलताना  मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष चे मंगेशजी चिवटे  म्हणाले की लिंगायत समाजातील सर्वांनी  हातात हात घालून  समाजाच्या प्रगती साठी  एकत्र येणे गरजेचे आहे ,मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या माध्यमातून आम्ही गरजू लोकांना  मदत करत आहोत  या मुळे महात्मा जगद्गुरू महात्मा बसवण्णा यांना अभिप्रेत  असणारे समाज कार्य माझ्या हातून घडत आहे हे मी माझे भाग्य समजतो.




 कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना सुरेश भाऊ खाडे या वेळी बोलताना म्हणाले कि  महात्मा बसवेश्वर  महाराजांनी 12 शतकात  समाजातील वंचिंत  आनि उपेक्षित घटक 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन  लिंगायत धर्माची स्थापना  आणि समाजा तील उपेक्षित घटकांना एकत्र आणले अशा या जगद्गुरू महात्मा बसवण्णा  यांच काम हे जगात आदर्श वत आहे 





असे  कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना सुरेश भाऊ खाडे यांनी सांगली येथील राष्ट्रीय लिंगायत  संघ यांच्या वतीने आयोजित बसव रत्न गौरव पुरस्कार सोहळ्यात  केले या सोहळ्यात  सामाजिक  क्षेत्रा मध्ये विविध विभागात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय लिंगायत संघ यांचे वतीने सांगली येथे 'बसव रत्न गौरव पुरस्कार देऊन सन्मानित  करण्यात आले.शरण राजशेखर तंबांखे,शरण उमाकांत होनराव ,शरण आनंद कर्णे ,शरण गंगाधर लकडेराष्ट्रीय बसव दल खोजानवाडी,शरणी राजश्री सावर्डेकर ,शरण रविंद्र वाकडे यांना लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती सन्मान महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.सुरेशभाऊ खाडेमा.मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी कक्षाचे प्रमुख मा.मंगेश जी चिवटे,राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रदिप बापू वाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महत्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली .




राष्ट्रीय लिंगायत संघ संस्थापक अध्यक्ष प्रदिप बापू वाले समाजास संबोधित केले .या वेळी बसवपीठावर महाराष्ट राज्याचे कामगार मंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे मुख्यमंत्री आरोग्य सहायत्ता कक्ष प्रमुख मंगेशजी चिवटे सुमित कदम अध्यक्ष डॅा विनोद परमशेट्टी तहसीलदार राजेद्र कुंभार शिवसेना जिल्हाघ्यक्ष संजय विभुते जेष्ठ विश्वनाथ मिरजकर संजय हिरेकर मिलींद साखरपे राजशेखर तंबाके राजेद्र कुंभार गटनेते मेघना हिंगमिरे सरिता पट्टणशेट्टी रूपाली गाडवे रविंद्र बुकटे सुरेद्र बोळाज राजाराम पाटील कैलाश स्वामी व लिंगायत बांधव उपस्थित होते .




या वेळी शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मा विनायाक चिवटे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मा ना श्री सुरेश (भाऊ) खाडे पालक मंत्री सांगली जिल्हा हे होते .

प्रशस्तीपत्र  या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय लिंगायत संघाने या सर्व  समाज बांधवांच्या कार्याची दखल घेवून पुरस्कार सोहळा आयोजित आहे. या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.या कार्यक्रमा साठी सातारा आणि सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते

श्री.रविंद्र वाकडे यांना 'बसव रत्न गौरव ' पुरस्कार प्रदान.

  श्री.रविंद्र वाकडे यांना 'बसव रत्न गौरव ' पुरस्कार प्रदान.



 श्री.रविंद्र वाकडे यांना 'बसव रत्न गौरव ' पुरस्कार प्रदान.





कराड , दि.17 -दिलीप महाजन .

 राष्ट्रीय लिंगायत संघा तर्फे आज सांगली येथे माळी मंगल कार्यालय येथे सकाळी 11 ते दु.2 या वेळेत लिंगायत समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता.या मेळाव्यात उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्ते रविंद्र मधुकर वाकडे यांना लिंगायत समाजातील कर्तृत्ववान व्यक्ती सन्मान महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.सुरेशभाऊ खाडे, मा.मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी कक्षाचे प्रमुख मा.मंगेश जी चिवटे,राष्ट्रीय लिंगायत संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रदिप बापू वाले यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रशस्तीपत्र  या पुरस्काराचे स्वरूप आहे.या पुरस्काराबद्दल रविंद्र वाकडे म्हणाले की,आपणज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देण आहोत मग ते आपण कसे देऊ शकतो तर ते फक्त समजा कार्य के तरच   , या साठी सर्वांनी हा विचार मनात ठेवून समाज कार्य करावे कोणतेही कार्य करताना निरपेक्ष भावनेने केले होते.परंतु राष्ट्रीय लिंगायत संघाने या कार्याची दखल घेवून मला जो पुरस्कार बहाल केला आहे.त्यामुळे मला अधिक प्रेरणा मिळाली आहे.या बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा न हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसणार : डॉ. अरविंद भातांब्रे

 महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा न हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसणार : डॉ. अरविंद भातांब्रे 



महात्मा बसवेश्वरांचा अश्वारूढ पुतळा न हटविण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणास बसणार : डॉ. अरविंद भातांब्रे 

                                               

लातूर दि १६  : प्रतिनिधी 

 लातूर शहरातील कव्हा  नाका , महात्मा बसवेश्वर चौकातील जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ  पुतळा  हटविण्यात येऊ नये या मागणीसाठी आपण बुधवार, दि. १९ एप्रिल २०२३ पासून  आमरण उपोषणास बसणार असल्याची माहिती  ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरविंद भातांब्रे यांनी रविवारी लातुरात पत्रकारांशी बोलताना दिली. 

              डॉ. भातांब्रे यांच्या आमरण उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेस  कोरनेश्वर स्वामीजी उस्तुरी, संगनबसव स्वामी निलंगा यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. अरविंद भातांब्रे म्हणाले की, महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अनुभव मंटपाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला पहिली संसद दिली, लोकशाही दाखवून दिली. खऱ्या अर्थाने लोकशाहीचे जनक असणाऱ्या महात्मा बसवेश्वरांचा पुतळा राष्ट्रीय महामार्ग उभारणीच्या कारणावरून हटविण्यात  येणे ही बाब समाजाच्या भावनांना दुखावणारी आहे. हा केवळ लिंगायत समाजच  नव्हे तर संपूर्ण बहुजनांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रशासनाने हा पुतळा हटविण्याचा प्रयत्न केल्यास समाज त्याला प्रचंड विरोध करणार आहे. हा पुतळा हटविण्यात येऊ नये,अशी आपली आग्रही मागणी असून प्रशासनाला दि. १८ एप्रिल पर्यंतचा अल्टीमेटमही  दिला आहे. १८ एप्रिलपर्यंत प्रशासनाने हा पुतळा हटविण्यात येणार नाही, अशी लेखी हमी नाही दिल्यास आपण आमरण उपोषणास बसणार असल्याचे डॉ. भातांब्रे यांनी सांगितले. आपल्या या आमरण उपोषणास लिंगायत समाजासह अनेक संघटना, समाजाचाही पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

कोरनेश्वर  स्वामीजी यांनी यावेळी बोलताना महात्मा बसवेश्वर हे केवळ लिंगायतांचेच नव्हे तर समस्त बहुजन समाजाचे प्रेरणादायी नेतृत्व असून त्यांचा अश्वारूढ पुतळा हटविण्यात येऊ नये ही समाजाची मागणी अत्यंत रास्त आहे. महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांच्या भावना दुखावून पुतळा हटविण्याचा विचार योग्य नाही. प्रशासनाने पुतळा हटविण्याच्या निर्णयाबाबत समाजाच्या भावनांचा विचार करून हा पुतळा जैसे थे ठेवण्याचा निर्णय घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले. संगनबस्व महाराज यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना प्रशासनाला हा पुतळा आहे त्या ठिकाणाहून न हटविण्याची विनंती केली. समस्त लिंगायत आणि बहुजन समाज अत्यंत सहनशील आहे. पुतळा हटविण्याचा निर्णय घेऊन या समाजाला कठोर भूमिका घेण्याची वेळ आणू नये,असे आवाहनही संगनबस्व स्वामी जी यांनी केले. त्याचबरोबर यावेळी लताताई मुद्दे यांनीही आपले विचार व्यक्त केले.  

 याप्रसंगी  बसवराज धाराशिवे, राजाभाऊ राचट्टे, स्मिता ताई खानापुरे, पूजाताई पंचाक्षरी, ओमप्रकाश झुरूळे, बालाजीअप्पा पिंपळे, नितिन मोहनाळे, सचिन हुरदळे, राम स्वामी, रोहित चवळे, ओम धरणे, संकेत उटगे , नरेश पेद्दे , राहुल नारगुंडे , गणेश हेरकर, ऋषी झुंजे, बसवराज रेकूळगे , विजय शेटे , सतीश पानगावे, संजय बावगे, सुनील ताडमाडगे, नितीन नारगुंडे, संतोष सुलगुडले, सोनू डगवाले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.



झी युवा उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट.

 झी युवा उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट.


झी युवा उलगडणार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट.





कराड दि . 16 - रविंद्र वाकडे 

दलित समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारे, राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री असलेले, सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभी करणारे, संविधानातील मूलभूत हक्कांचा अधिकार देणारे, बौद्ध धर्माला पुनरुज्जीवन देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट पाहण्याची पर्वणी प्रेक्षकांना नव्याने मिळणार आहे.

विविध विषयांवरील प्रबोधनातून मनोरंजन देणाऱ्या झी युवा या वाहिनीवरून सुरू होत असलेल्या जय भीम… एका महानायकाची गाथा या मालिकेतून डॉ. आंबेडकर यांचे कार्य या मालिकेतून उलगडणार आहे. १४ एप्रिल या डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी या मालिकेला सुरवात झाली. महानायकाच्या आयुष्यातील संघर्षापासून ते त्यांनी समाजाच्या परिवर्तनासाठी दिलेल्या योगदानाचा आलेख पाहता येणार आहे.

तरुणाईच्या मनातील विषयांना मालिकांमधून मांडण्यासाठी सुरू झालेल्या झी युवा या वाहिनीने आता समाजातील प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. कार्यक्रम व मालिकांमधील वैविध्य, प्रबोधन आणि मनोरंजनाची योग्य सांगड आणि माहितीपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती यामध्ये झी युवा वाहिनी नेहमीच अग्रेसर आहे. आपल्या अभ्यासू नेतृत्वाने समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा यासाठी झी युवा वाहिनीचा पुढाकार कौतुकास्पद  आहे. याच पंक्तीत आता झी युवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महानायकाची गाथा मालिकेच्या रूपातून मांडण्यासाठी सज्ज झाली आहे.

जय भीम … एका महानायकाची गाथा ही १४ एप्रिलला सुरू झालेली मालिका झी युवा वाहिनीवर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजासाठी मोलाचे कार्य केले आहे. आजपर्यंत डॉ. आंबेडकर यांचे कार्य विविध भाषांमधून मालिका, माहितीपटाच्या माध्यमातून छोट्या पडदयावर दाखवण्यात आले आहे. यामध्ये झी युवानेही आपले पाऊल टाकले असून महानायक डॉ. आंबेडकर यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरील प्रसंग, घटना दाखवणारी ही मालिका उत्सुकतेचा विषय बनली आहे. डॉ. आंबेडकर यांच्या बालपणापासून ते त्यांच्या विद्यार्थीदशेतील घटनांचा वेध घेण्याबरोबरच स्वातंत्र्यसंग्रामातील डॉ. आंबेडकर यांची भूमिका हा या मालिकेचा गाभा आहे. स्वतंत्र भारताला संविधानाचा पाया देण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी केलेला अभ्यास, दलित समाजाच्या उद्धारासाठी घेतलेले कष्ट यावर ही मालिका आधारित आहे. डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याबरोबरच डॉ. आंबेडकर हे व्यक्ती म्हणून कसे होते, त्यांचे कौटुंबिक आयुष्य कसे होते यावरही या मालिकेत प्रकाश टाकण्यात आला आहे.

झी युवा वाहिनीवर या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या मालिकेची प्रेक्षकांना जेवढी उत्सुकता आहे तितकीच उत्सुकता मालिकेत डॉ. आंबेडकर यांची व्यक्तिरेखा कोणता कलाकार साकारणार हे पाहण्याची आतुरताही आता शिगेला पोहोचली आहे. यंदा डॉ. आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. स्वतंत्र भारताला ७५ वर्ष झाली. हा योगायोग साधून झी युवा वाहिनीने महामानवाची गाथा मालिकेतून मांडत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सलाम करण्याचा संकल्प केला आहे.

Friday, April 14, 2023

कु. ऋतुजा खलीपे हिचे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी विशेष श्रेणीत उत्तीर्ण , उल्लेखनीय यश समस्त लिंगायत समाजाकडून अभिनंदन .

 कु. ऋतुजा खलीपे हिचे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी विशेष श्रेणीत उत्तीर्ण , उल्लेखनीय यश समस्त लिंगायत समाजाकडून अभिनंदन .





 कु. ऋतुजा खलीपे हिचे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी विशेष श्रेणीत उत्तीर्ण , उल्लेखनीय यश समस्त लिंगायत समाजाकडून अभिनंदन .




कराड , दि.15 -दिलीप महाजन प्रतिनिधी 

कराड येथील लिंगायत समाजातील कार्यकर्ते राजीव खलीपे यांची कन्या कु.ऋतुजा हिने डॉ. जे. जे.मगदूम होमिओ पॅथीक कॉलेज, जयसिंगपूर येथून बी. एच.एम.एस. हि वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी नुकतीच विशेष श्रेणीत उत्तीर्ण होऊन प्राप्त केली 

याबद्दल तिचे डॉ.शिवकांत चिंगळे ,अशोक संसुद्दी, सुनिल महाजन,शिवानंद डुबल,उदय हिंगमिरे,नंदकुमार बटाने,राजेंद्र घाटे,मिलिंद लखापत्ती,राजेंद्र भादुले,दत्तात्रय तारळेकर,सदाशिव साबणे,उमेश घेवारी,समस्त कराड व ओगलेवाडी समाजबांधव  यांनी विशेष अभिनंदन केले.

 तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल लिंगायत टिव्ही लाईव्ह तर्फे  तिचे हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...