Saturday, July 23, 2022

मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी मा.मंगेश चिवटे यांची नियुक्ती करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा


 मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी मा.मंगेश चिवटे यांची नियुक्ती 
 करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

  
मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी मा.मंगेश चिवटे यांची नियुक्ती 
 करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा .
सातारा दि:-22 रवी वाकडे लिंगायत TV live प्रतिनिधी
करमाळ्याचे सुपुत्र मा.मंगेश चिवटे यांची मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या विशेष कार्यकारी अधिकारी पदी दि.21जुलै रोजी नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई मधील महाराष्ट्र शासन मंत्रालय इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे कामकाज चालते.सोमवार दि.25 जुलै रोजी मा.मंगेश चिवटे साहेब या कक्षा चा कार्यभार स्विकारणार आहेत. मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून मानले जातात.त्यांनी आजपर्यंत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात सुद्धा उल्लेखनीय काम केलेले आहे.
मा.देवेंद्र फडणवीस साहेब हे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर 13 मार्च 2015 पासून या कक्षाची खास स्थापना करण्यात आली होती. सी एस आर रकमेतून या कक्षातर्फे मदत केली जाते.दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना या कक्षातून एकूण खर्चाच्या 60% इतकी भरघोस आर्थिक मदत केली जाते.या आधी मा.ओमप्रकाश शेटे साहेब हे या कक्षाचे प्रमुख होते.पहिल्याच वर्षात या कक्षाने 28 हजार गरजू रुग्णांना 302 कोटीची भरघोस मदत केली होती.याचबरोबर 450 धर्मादाय रुग्णालयाच्या 10%राखीव खाटामधून 600 कोटी रुपयांचे उपचार झाले होते.
माजी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना हा कक्ष कार्यरत होताच पण अनेक जाचक अटी ऐनवेळी 
लादल्यामुळे  व फक्त सरकारी अधिकारी नेमण्यामुळे नेमक्या गरजू रुग्णांना त्याचा वेळेत लाभ मिळू शकला नाही.शिवाय निवडक 10 गंभीर आजारांसाठी च फक्त मदत करण्याची अट टाकली गेली होती.
पण आता हि अडचण राहणार नाही व मदत प्रक्रिया सुलभ होईल. करमाळ्याचे सुपुत्र मा.मंगेश चिवटे यांच्या कार्याची खास दखल घेवून मा.मुख्यमंत्री विशेष कार्यकारी अधिकारी पदावर झालेल्या त्यांच्या या नेमणुकीमुळे त्यांचे सर्वत्र खास कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत TV live यांचे वतीने त्यांचे खास अभिनंदन व त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा 

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...