मुरिगेप्पा चेंन्ननावार ठरले सर्वात उत्कृष्ट सायकल पटू, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस च्या वतीने त्यांचा गौरव
मुरिगेप्पा चेंन्ननावार ठरले सर्वात उत्कृष्ट सायकल पटू, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस च्या वतीने त्यांचा गौरव
सातारा, दि.25 -प्रा अजय शेटे प्रतिनिधी
इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे आयोजित केल्या गेलेल्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकल स्पर्धेत श्री. मुरीगेप्पा चेन्ननावार यांनी हि सायकल शर्यत अतिशय योग्य अवधीत जलद गतीने पूर्ण करून एक नवा विक्रम केला आहे.
याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.धीरजराय चौधरी यांच्या सहीने त्याला खास प्रशस्ती पत्र व सुवर्णपदक खास बक्षीस म्हणून बहाल करण्यात आले आहे.
आपल्या या मोहिमेबद्दल मुरिगेप्पा यांनी सांगितले की,आपण सर्व आदरयुक्त व्यक्तींना मला हे सांगताना आनंद व अभिमान वाटतो की,सर्वात उत्कृष्ठ सायकलपटू कोण हे पाहण्यासाठी ही काश्मीर ते कन्याकुमारी ' के 2 के ' स्पर्धा म्हणजे तरुणांनी सर्व प्रकारच्या व्यसनांना पहिल्यांदाच नकार देण्याची मानसिकता तयार करण्यासाठी आयोजित केली गेली होती.या स्पर्धेची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस' मद्ये होणार होती.माझ्यातील उत्कृष्ठ सायकल पटूला यातून स्वतःला पुन्हा एकदा नव्याने सिद्ध करण्यासाठी आव्हान होते.या मोहिमेत मी एकूण 3649 किमी सायकल चालवली.या वेळी नऊ राज्यांचा प्रवास करावा लागला .तसेच यामध्ये श्री वैष्णोदेवी, कटरा, जम्मू- काश्मीर ते कन्याकुमारी अशा दुर्गम भागातून प्रवास करायचा होता.
मी त्यासाठी ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2021 या कालखंडात भरपूर सराव केला होता.यावेळी सदानंद अमरापूर नावाचा माझा मित्र हा मदतनीस सहकारी होता.याच वेळी कन्नड अभिनेता व कर्नाटक रत्न तसेच थोर मानवता वादी कार्यकर्ता पूनित राजकुमार यांच्या मृत्यूची सल माझ्या मनात होती.तसेच त्यावेळी मला माझ्या काही आरोग्याच्या तक्रारींना अचानक पणे सामोरे जावे लागले.त्यामुळे माझ्या कौटुंबिक डॉक्टरांनी मला सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता पण मला जास्त काळ या अडचणीत अडकायचे नव्हते.
त्यानंतर जवळ जवळ तीन महिन्याच्या प्रदिर्घ विश्रांती नंतर मी mazi' K2K - अँटी ड्रग ' अर्थात व्यसन विरोधी सायकल मोहीम सुरू केली व ' व्यसन विरोधी दूत ' बनून मोहिमेला सुरुवात केली.यावेळी माझ्याबरोबर माझा जिवलग मित्र प्रशांत हिप्परगी हा होता.एक महिन्याचा अधिक विश्रांती नंतर मी ' जम्मू - काश्मीर ते कन्याकुमारी ' ( तामिळनाडू ) अशी सायकल फेरी पूर्ण केली.
त्यामुळे मी माझ्या सर्व सहकारी व हितचिंतक यांचा खूप खूप आभारी आहे की , ज्यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद यांच्या मुळे ही अवघड सायकल मोहीम मी पूर्ण करू शकलो.
तसेच मी खास करून माझी आई ,पत्नी व मुले तसेच माझे मोहिमेतील सहकारी प्रकाश चंन्ननवार ,अक्षय चनागौदर व डॉ.सोहेल यांचाही खूप खूप आभारी आहे. कारण या सर्वांनी रात्रंदिवस केलेल्या सहकार्यामुळेच मी ही मोहीम पूर्ण करू शकलो. माझे या मोहिमेचे यश मी अभिनेता कै.पुनीत राजकुमार यांच्या पवित्र स्मृतिस अर्पण करतो.
वीरशैव इंटरनॅशनल व लिंगायत टिव्ही लाईव्ह, लिंगायत समाज , तसेच
समस्त भारत वासियांच्या वतीने या सर्व चमूचे हार्दिक अभिनंदन व त्याच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा .




No comments:
Post a Comment