Friday, July 22, 2022

भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून मा.द्रौपदी मुर्मू यांची निवड स्वतंत्र भारतात जन्मलेली पहिली तसेच भारताची दुसरी महिला राष्ट्रपती .प्रा,अजय शेटे, वडूज.विशेष लेख



 भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून मा.द्रौपदी मुर्मू यांची निवड 
स्वतंत्र भारतात जन्मलेली पहिली तसेच भारताची दुसरी महिला राष्ट्रपती .
प्रा,अजय शेटे, वडूज.विशेष लेख
सातारा, दि.22 - गेले कित्येक दिवस संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए च्या उमेदवार व आदिवासी कन्या मा. द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे.त्यांना एकूण 10 लाख 38 हजार 431 मतांपैकी 5 लाख 7हजार 777 मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार मा.यशवंत सिन्हा यांना 2 लाख 61 हजार,62 इतकी मते मिळाली.म्हणजेच अनुक्रमे 812 - 2161 - 64 % व 521- 1058  - 36 %  इतकी मते मिळाली.
भारताच्या विविधतेचे व एकतेचे दर्शन या निवडणुकीत प्रकर्षाने दिसून आले.हेच या निवडणुकीचे महत्वाचे वैशिष्ट्य दिसून आले.कारण संपूर्ण स्वातंत्र्यात जन्मलेली पहिली आदिवासी व दुसरी महिला आज सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदावर विराजमान झाली आहे.या आधी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून मा.प्रतिभाताई पाटील निवडून आल्या होत्या.
मा.द्रौपदी मुर्मु यांचा जन्म 20 जून 1958 रोजी   ' मयूरभंज ' या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव  बिरंची नारायण टुडू हे होय.ते त्यांच्या गावचे  प्रमुख  ' मुखिया ' होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण भुवनेश्वर रामादेवी महिला महाविद्यालय येथे झाले.1997 साली मध्यप्रदेश मधील रायरंगपुर पालिकेत त्या पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या.पुढे येथेच सन 2000 ते 2009 अशा सलग दोन वेळा रायरंगपूर विधानसभा मतदार संघाच्या त्या आमदार झाल्या.सन 2000 ते 2004 ओरिसा राज्यातील बी जे डी सरकार मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले.सर्वोत्तम आमदार म्हणून त्यांना 2007 साली त्यांना  ' निळकंठ ' पुरस्कार मिळाला होता. 2013 ते 2015 असे 3 वर्षे त्या भाजपा  राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये पदाधिकारी होत्या. तसेच 2015 साली परत भाजपा मयूर भंज जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष म्हणून एक वर्षे काम केले. मे 2015 पासून सलग 5 वर्षे त्या झारखंड राज्याच्या  राज्यपाल होत्या.आज सर्वात कमी वयाच्या म्हणजेच 64 वर्षे,1 महिना,8 दिवस असे कमी वय असलेल्या त्या पहिल्याच सर्वात तरुण राष्ट्रपती ठरल्या आहेत.
त्या ओरिसा राज्यातील मयूरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.
त्यांनी आपला नोकरी कार्यकाल हा एका सरकारी कार्यालयात लेखनिक म्हणून सुरू केला.तसेच काही वर्षे विनाशुल्क विनाअनुदान तत्त्वावर अध्यापनाचे काम पण केले. त्या नंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या.
मा.द्रौपदी मुर्मू यांनी अनेक कौटुंबिक आघात सोसले आहेत.त्यांच्या पती व 2 मुलांचे निधन झाले आहे.आपल्या मुलांच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्या सहा महिने नैराश्यात गेल्या होत्या.योग्य व्यक्तीचे समुपदेशन घेवून त्या प्रजापिता ब्रमहकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय ,माऊंट अबू येथे काही काळ वास्तव्यास राहिल्या होत्या .मोठ्या मुलाचे निधन झाल्यानंतर तीन वर्षात दुसऱ्या लहान मुलाचे पण निधन झाले व त्या नंतर एका वर्षात पती निधनाचे असह्य दुःख त्यांनी सोसले आहे. नैराश्या वर त्यांनी देव,अध्यात्म, योगा व ध्यानध्यारणा यांच्या माध्यमातून मात करून वाईट काळ सोसून संपवला.
आपल्या जीवनचर्येत त्या अतिशय काटेकोर आहेत. रोज पहाटे 3.30 वा.उठून  हलका योग व्यायाम करून त्या फिरायला जातात.त्या नंतर जवळच्या एका श्री शिव मंदिराची  स्वच्छता व देखभाल करतात.त्यानंतर आपली कार्ये उरकून नित्यनेमाने घरी व मंदिरात पूजापाठ करतात. सकाळी लवकर  उगवत्या सूर्याबरोबर त्यांचे कामकाज सुरू होते.वेळेच्या बाबतीत त्या अतिशय काटेकोर आहेत.त्याच्या हातात नेहमी  संभाषणात अडथळा येवू नये म्हणून भाषांतर पुस्तक असते.दैनंदिन मनःस्वास्थ्य टिकून राहण्यासाठी त्या नेहमी शिवपुस्तिका जवळ बाळगून त्याचे पाठ करतात.
रायरंगपूर भागात त्यांचे स्वतःचे एक घर असून, पती निधनानंतर त्या घराचे रूपांतर त्यांनी एका शाळेत केले आहे.तेथे त्या मुला - मुलींना मोफत  शिकवतात.ज्या खोलीत थोरल्या मुलाचे निधन झाले तेथे त्यांनी विद्यार्थ्यांची निवास व अभ्यासिकेची सोय केली आहे. मुले व पतीच्या वर्ष श्राद्ध वेळी दरवर्षी त्या एका शाळेला भेट देवून काहीतरी भेट वस्तू देतात.त्याच्याकडे इतर कोणतीही सुशोभित स्थावर मालमत्ता किंवा संपत्ती नाही.
मा.द्रौपदी मुर्मू  दि.24 जुलै रोजी राष्ट्रपती पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतील.एन डी ए ने राष्ट्रपती पदासाठी एका आदिवासी महिलेचा चेहरा निवडून आणून विरोधकांना जबरदस्त धक्कातंत्राचा वापर केला आहे.एका आदिवासी महिलेचा सन्मान म्हणून अनेक विरोधी पक्षातील  लोकांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.त्यामुळे भाजपा ची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे.
आज मा.नवनियुक्त राष्ट्रपती यांच्या या विजया नंतर भाजपा कडून देशभर जल्लोष साजरा करण्यात येत आहे .दिल्लीत विजयी रॅली काढण्यात येणार आहे.राष्ट्रपती पदाचा उमेदवार  विजयी झाल्यानंतर विजयी रॅली काढण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे त्या बरोबर सर्व महीला
व संपूर्ण आदिवासी समाजाचा सन्मान होत आहे.यावेळी 20 हजार लाडू वाटप करण्यात येणार आहेत.
भारतीय लोकशाहीसाठी हा एक शुभसंकेत आहे. मा.पंतप्रधान नरेंद्रजी  मोदी साहेब यांच्या जोडीला एक भारतीय राज्यघटनेचा रक्षक आज भारताच्या राष्ट्रपती पदी अतिशय अभिमानाने  विराजमान होत आहे.समस्त भारतवासियांच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा .


No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...