Sunday, November 27, 2022

सातारा येथे होणार दि १८ डिसेंबर रोजी 16 वे लिंगायत धर्मीय वधू - वर पालक परिचय संमेलन

 


सातारा येथे होणार दि १८ डिसेंबर रोजी 16 वे लिंगायत धर्मीय वधू - वर पालक परिचय संमेलन 


 सातारा येथे होणार दि १८ डिसेंबर रोजी 16 वे लिंगायत धर्मीय वधू - वर पालक परिचय संमेलन 




सातारा, दि.28 -रविंद्र वाकडे.

   महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,वीरशैव लिंगायत समाज व लिंगायत भजनी मंडळ ,सातारा तर्फे आयोजित 16 वे लिंगायत धर्मीय वधू वर पालक परिचय संमेलन प.पू.औंधकर मठ,बुधवार पेठ,सातारा येथे  रविवार दि.18.12.2022 रोजी सकाळी 11 वा.आयोजित करण्यात आले आहे.

सातारा शहरात सातत्याने व यशस्वीपणे होणारे लिंगायत धर्मातील सर्व जाती / उपजाती करिता वधू - वर पालक परिचय मेळाव्याचे यंदा 16 वे वर्ष असून,याचे उद्घाटन श्री.शिवराज शेटकार , मा.अध्यक्ष ,अखिल भारतीय वीरशैव सभा ,लातूर यांचे हस्ते व प्रमुख अतिथी श्री.प्रदिपबापू वाले यांच्या उपस्थितीत तसेच श्री.निशांत अ.गवळी ( सावकार ) मा.युवा शिक्षण महर्षी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून,या कार्यक्रमास आपण आपले इष्ट मित्र ,नातेवाईक या सर्वाँना माहिती देवून या मंगल प्रसंगी उपस्थित राहून हा समारंभ यशस्वी करावा.असे आवाहन मा.अधक्ष ,वीरशैव लिंगायत समाज,सर्व संचालक / सदस्य , मा.अध्यक्ष ,लिंगायत महिला भजनी मंडळ,सर्व संचालक / सदस्य, मा.अध्यक्ष, म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ ,सर्व संचालक/ सदस्य ,सातारा यांनी केले आहे.




या कार्यक्रमासाठी  पुढील काही नोंदी घेण्यात याव्यात व त्याचे पालन करावे .असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात सर्व लिंगायत धर्मियांना मुक्त प्रवेश आहे.नावनोंदणी फी रु.300/ - (  अक्षरी - रू.तीनशे फक्त )  आहे.उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांचेसाठी ऑनलाईन फी रू.200/- ( अक्षरी - रू.दोनशे फक्त ) आहे.दिव्यांग तसेच पुनर्विवाहासाठीचे वधू वर यांची नोंदणी विनामूल्य आहे.

नावनोंदणी फॉर्म व्यवस्थित भरून ,सोबत फोटोसह बायोडा टा देण्यात यावा,दुपारचे भोजन सर्वांसाठी आहे.नोंदणीकृत वधू वर यांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.उपस्थित वधू वरांचीच माहिती व्यासपीठावरून प्राधान्याने घोषित करण्यात येईल.वधू वर माहिती पुस्तिका 20 जानेवारी 2023 पर्यंत घरपोच मिळेल.

ऑनलाईन नोंदणी साठी तपशील पुढीलप्रमाणे आहे.

खातेदाराचे नाव - Mahatma Basveshwar samajik seva mandal,satara. बँकेचे नाव -Shri warana sahakari bank , Ltd,warananagar.

खाते क्रमांक - 3970330900000005 , IFSC code - HDFCOCSWSBL.

याबाबतच्या अधिक माहितीसाठी  श्री. श्रीनिवास कामळे, उपाध्यक्ष,9373451418.  श्री सिद्धराज शेटे, मा.कोषाध्यक्ष ,  8408999900 यांचेशी संपर्क करावा 




Saturday, November 26, 2022

श्री क्षेत्र बसवकल्याण येथे ' अनुभव मंटप ' उत्सवाचे आयोजन



 श्री क्षेत्र बसवकल्याण येथे ' अनुभव मंटप ' उत्सवाचे आयोजन



 श्री क्षेत्र बसवकल्याण येथे ' अनुभव मंटप ' उत्सवाचे आयोजन 

 


सातारा, दि.25 -     प्रा.अजय शेटे

 भालकी  येथील हिरेमठ संस्थांनचे मठाधिश व महाराष्ट्र बसव परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.बसवलिंग पट्टदेवरू यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दि.26 व रविवार दि.27 नोव्हेंबर 2022 रोजी लिंगायत धर्माचे श्री क्षेत्र बसवकल्याण येथे दोन दिवसीय राष्ट्रीय अनुभव मंटप उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.+




म.बसवेश्वर व समकालीन भक्तांची कायकभुमी , क्रांतिभूमी म्हणजे श्री क्षेत्र बसव कल्याण होय.या ऐत्याहसिक नगरीत म.बसवेश्वर यांनी  जगातील पहिल्या लोकशाही संसदेचे प्रारूप असलेल्या अनुभव मंट पाची  स्थापना केली.

सुरुवातीला 770 शरण हे त्या अनुभव मंटपाचे  सदस्य होते.शर णांच्या या सामूहिक संवादातून वचन साहित्य निर्माण झाले आणि त्यातून घडून आलेली कल्याण क्रांती ही देशातील दुःख ,दारिद्र्य,अज्ञान,अंधश्रद्धा ,जातीयता,अस्पृश्यता,लिंगभेद,




वर्णभेद व पुरोहितशाही नाकारून  सकल जीवाम्यांच्या कल्याणासाठी कार्यरुपात आणलेली अप्रतिम समग्र क्रांती होती.भारतभर विखुरलेला लिंगायत समाज आणि सर्व समतावादी विचारधारा एकत्र याव्यात .या हेतूने गेल्या 42 वर्षांपासून डॉ. पट्टदेवरू दरवर्षी राष्ट्रीय अनुभव मंटपाचे आयोजन करतात..कर्नाटक राज्यातील श्री क्षेत्र बसवकल्याण येथे 26 व 27 नोव्हेंबर रोजी  होणाऱ्या या उत्सवात चिंतन सभा,विविध विषयावर मान्यवरांची व्याख्याने,तसेच मराठी भाषेतील इतर आठ ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे.

तरी सदर कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र बसव परिषदेचे  राज्या ध्यक्ष मा. बी.एम.पाटील आणि संचालक राजू जुबरे यांनी केले आहे.**


Thursday, November 24, 2022

बसवेश्वर उद्यानासाठी दोन कोटींची मागणी जुळे सोलापूरच्या विकासाची आयुक्तांची हमी.



 बसवेश्वर उद्यानासाठी दोन कोटींची मागणी  जुळे सोलापूरच्या विकासाची आयुक्तांची हमी. 




  बसवेश्वर उद्यानासाठी दोन कोटींची मागणी  जुळे सोलापूरच्या विकासाची आयुक्तांची हमी. 
   सोलापूर  दि 25  : -

 जुळे सोलापुरातील महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मितीचे रखडलेले काम जलदगतीने पूर्ण करावे आणि त्यासाठी आगामी अर्थसंकल्पात दोन कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करावी,तसेच शिवबसव चौकात महात्मा बसवेश्वर प्रवेशद्वाराचे स्वागत कमान उभारण्यात यावे आणि जुळे सोलापुरात सर्व नागरी सुविधा द्या अशी मागणी लिंगायत शिष्टमंडळाने केली आहे.
             महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सौ.शीतल उगले यांची भेट घेऊन या विषयांची निवेदने दिली.यावेळी म्हैसूर पगडी परिधान करून,शाल,पुष्पगुच्छ तसेच महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा देऊन डाॅ.बगले यांच्या हस्ते नूतन आयुक्तांचा सत्कार करण्यात आला.
              सिध्देश्वर सोशल फौंडेशनचे अध्यक्ष आनंद मुस्तारे,लिंगायत महासंघाचे शहर अध्यक्ष सचिन शिवशक्ती,बसवप्रेमी चन्नबसवेश्वर गुरूभेटी,समाजसेवक संदीप भंडारे,शशिकला कस्पटे,शिवानंद बगले,सिध्दाराम खुटेकर,प्रदीप जाधव,धर्मराज पुजारी,निंगोंडा तळे,सैफन ईनामदार,अशोक पांचाळ,चंद्रशेखर भूरे,सिध्दलिंग मसूती,आमसिध्द मुटाळे आदि बसवप्रेमी यावेळी उपस्थित होते.
             या भेटीत आयुक्त उगले यांनी महात्मा बसवेश्वर उद्यानाच्या उभारणीसाठी तात्काळ नगर अभियंता यांना कार्यवाहीचे निर्देश देऊन त्यासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूदही करण्यात येईल अशी ग्वाही दिली.शिवबसव (सैफूल ) चौकात स्वागत कमानी बाबत पाहणी करून सकारात्मक निर्णय घेऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

● *गुंठेवारी बांधकामे नियमित करा...!* 
            सोलापूरच्या हद्दवाढ भागातील गुंठेवारी बांधकामे नियमित करा आणि नागरिकांची गैरसोय त्वरीत दूर करा अशी विनंती डाॅ.बसवराज बगले,संदीप पांढरे,शिवानंद बगले,सिध्दाराम खुटेकर यांनी केली.त्यावर गुंठेवारी मिळकतींची योग्य ती आकारणी करून मोजणीबाबतही कार्यवाही करून जनहिताचा निर्णय लवकरच घेण्यात येईल अशी हमी आयुक्तांनी दिली.
*हद्दवाढचा निधी तिथेच खर्च करा... 
             जुळे सोलापुरातून सर्वाधिक कर संकलन होतोय मात्र त्या तुलनेत विकास कामे होत नाहीत,हद्दवाढ भागातील निधी अन्यत्र खर्च न करता त्याच भागात खर्च करा, जुळे सोलापूर भागात मुबलक पाणीपुरवठा करा,स्वच्छता आणि आरोग्य सुविधा वाढवा अशा विविध मागण्यांबाबत डाॅ.बगले यांनी आयुक्तांशी चर्चा केली.त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन आयुक्तांनी शिष्टमंडळाला दिलासा दिला.

Monday, November 14, 2022

भारतीय आवाजाचे मनभावन सादरीकरण - श्वेता उमरे ला आपले बहुमोल मत द्या

 भारतीय आवाजाचे मनभावन सादरीकरण - श्वेता उमरे ला आपले बहुमोल मत द्या 





भारतीय आवाजाचे मनभावन सादरीकरण - श्वेता उमरे ला आपले बहुमोल मत द्या 



  सातारा दि १५   भारतीय आवाजाचे मनभावन सादरीकरण - श्वेता उमरे ला आपले बहुमोल मत द्या     लिंगायत  समाजातील सर्व बंधू आणि भगिनींना मी  श्वेता उमरे लिंगायत शरणी यवतमाळ  ,माझा नमस्कार शरणू शरणार्थी . मी भारतातील सर्वोत्कृष्ट मोटिव्हेशनल स्पीकर, सक्सेस ग्यान द्वारे सुपर स्पीकर सीझन 2 च्या सर्वात मोठ्या शोधात टॉप 250 चा एक भाग आहे 🎙️




मी एक फॉरेन्सिक सायंटिस्ट आहे 👩‍🔬 प्रश्नित दस्तऐवजांमध्ये विशेष. मी पंतप्रधान पुरस्कारप्राप्त सार्वजनिक स्पीकर देखील आहे, भारताच्या पहिल्या राष्ट्रीय युवा संसदेचा विजेता आहे आणि विविध आंतरराष्ट्रीय संमेलनांमध्ये राष्ट्रीय युवा प्रतिनिधी म्हणून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे 🌍





जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी तिच्या आवाजाचा वापर करून बदल घडवून आणणारी व्यक्ती बनणे हे माझे ध्येय आहे.

सुपर स्पीकर सीझन 2 च्या टॉप 10 फायनलिस्टमध्ये जाण्यासाठी, मला तुमच्या मतांची गरज आहे. मतदान प्रक्रिया अत्यंत सोपी आहे आणि त्यासाठी तुमच्या कोणत्याही तपशीलांची आवश्यकता नाही, फक्त एक क्लिक करा! 🗳️

या मजकुराच्या शेवटी दिलेल्या लिंकवर टॅप करा आणि “VOTE” वर क्लिक करा.

मताशी संलग्न तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. ती माझ्या आयुष्याची कहाणी आहे. तुम्हाला माझे काम आवडल्यास कृपया मला कळवा!

जर तुम्ही माझ्यासाठी काही मिनिटे काढू शकलात आणि हा संदेश तुमच्या कामात, मित्रमैत्रिणींमध्ये आणि कुटुंबाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करू शकलात, तर माझ्यासाठी ते जग असेल.

तुमचा पाठिंबा माझ्या आयुष्यात नेहमीच महत्त्वाचा राहिला आहे. माझ्या प्रवासात मला मदत केल्याबद्दल मी तुमचा मनापासून ऋणी आहे.तरी मी

कु.श्वेता शिरीष उमरे   माझा हा व्हिडिओ आणि link शेयर करा आणि मला जास्तीत जास्त वोट मिळ्वून  दयावे ही नम्र विनंती, माझ्या पूढील भविष्यासाठी 

तुमचे मत महत्त्वाचे आहे ♥️🙏🏻     🔸 लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र 🔸

🔹 वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन 🔹 लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र 

 वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (VIA)

लिंगायत कन्या यवतमाळची कु.श्वेता शिरीष उमरे  ही नॅशनल युथ पार्लमेंट मधे पंतप्रधान पुरस्कार विजेती व पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनाही आपल्या भाषणाने प्रभावीत करणार्या या कन्येला सुपर स्पिकर 2 मध्ये वोट करुन विजेती करुया खालील लिंक वर क्लिक करून वोट करा हा मॅसेज शेअर करा आणि  तीला जास्तीत जास्त वोट मिळवून देऊया  🙏🏻           


          Link -

https://superspeaker.com/super-speaker-season-2-round-3-main-challenge/?contest=video-detail&video_id=236566

Sunday, November 13, 2022

खानापूर चे ग्रामदैवत विरभद्र स्वामी यात्रेस प्रारंभ.

 


खानापूर चे ग्रामदैवत विरभद्र स्वामी यात्रेस प्रारंभ. 


खानापूर चे ग्रामदैवत विरभद्र स्वामी यात्रेस प्रारंभ. 


खानापूर दि  14;-  ( शिवकुमार कल्याणी,) लिंगायत टिव्ही लाईव्ह:

खानापूर ता.देगलूर येथे प्राचीन काळापासून चालू असलेली विरभद्र स्वामी यात्रेला दि ( १० ) गुरुवार पासुन सुरुवात झाली असुन हि यात्रा दि (१६) पर्यंत चालणार आहे अशी माहीती विरभद्र मठाचे मठाधिपती श्री गुंडयाप्पा स्वामी,व शिवराज स्वामी यांनी दिली.




 खानापूर चे ग्रामदैवत श्री विरभद्र स्वामी महाराजाच्या यात्रेला दि (१०) गुरुवार पासुन सुरुवात झाली असुन यात्रेच्या पहील्या दिवशी दि १०रोज गुरुवारी विरभद्र स्वामी महाराजास हाळद लागते.व मानाचे अभीषेक होतात.दि १५ रोजी सकाळी मठात धगधगते अग्निकुंड प्रज्वलित केले जाते त्यातुन ,श्री विरभद्र स्वामी यांची प्रतिकृती घेवुन मठाधिपती यातुन अकरा वेळा फेरी मारतात ,व त्यानंतर गावकरी यातुन चालतात,हे अग्निकुंड तुडवल्यामुळे शरीरातील व्याधी, रोग,बाधा नष्ठ होतात अशी येथे अख्यायिका आहे, 




त्यानंतर गावभरातुन ग्रामदैवत विरभद्र स्वामी यांची रथयात्रा निघते व यामध्ये अनेक भाविक मोठ्या भक्तिभावाने सामिल होतात,या रथयात्रेत भजणी मंडळी,व गावातील महिला व तरुण तरुणी कलश,व पताके घेऊन चालतात,या मठाचे अनेक राज्यांत शिष्यगण आहेत ते आवर्जून येतात





या यात्रेसाठी महाराट्रासह शेजारील कर्नाटक,आध्र प्रदेष मध्यप्रदेश ,आदी राज्यातील अनेक भावीक येथे  दर्शनासाठी येउन दर्शन घेतात. विरभद्र स्वामी हे नवसाला पावनारे देवस्थान असुन येथे ईछ्या पुर्ण होण्यासाठी नवस बोलले जातात. व ते पुर्ण करण्यासाठी भावीक येथे येतात. येथे नवस पुर्ण झाल्यानंतर जावळ, अभिषेक ,अन्नपुजा असे विधी करतात..या यात्रेत सर्वांनी सामिल होऊन भगवान विरभद्र स्वामी यांचे आशिर्वाद घ्यावे असे आवाहन यात्रा समिती तथा मठाधिपती गुंडय्याप्पा स्वामी, शिवकुमार स्वामी,शिवराज महाराज मठवाले यांनी केले आहे..





Saturday, November 12, 2022

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यामुळे संघटनेला प्रेरणा

 

भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यामुळे संघटनेला प्रेरणा 



 भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यामुळे संघटनेला प्रेरणा 



सातारा, दि.13 -प्रा.अजय शेटे. 

भाजपा चे प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यामुळे संघटनेला मोठी प्रेरणा मिळाली आहे.त्या अनुषंगाने आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुकात पक्षाची प्रगतिकारक  घौडदौड अधिक वेगाने होणार आहे 

सातारा येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पक्षाचा सुरुवाती पासूनचा तत्वनिष्ठ  संघर्षकारी इतिहास विषद केला.

जनसंघाचे रूपांतर भाजपा मध्ये करताना पहिले राष्ट्रीय अध्यक्ष मा.अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनात पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत प्रचंड आत्मविश्वास होता.

तसेच महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष स्व.उत्तमराव पाटील यांनी नवीन संघटना बांधणीचे शिवधनुष्य मोठ्या ताकदीने पेलून   संघटना वाढीस लावली.त्यांच्यासह आलेल्या इतर सर्व  दहा प्रदेश अध्यक्ष यांनी जिवाचे रान करून पक्षाची ध्येय धोरणे समाजाच्या तळागाळात पोहचवून संघटना वाढीस लावली.

 आता 11 वा प्रदेश अध्यक्ष म्हणून आपल्यावर जबाबदारी येवून पोहोचली आहे.आता पक्षाची परिस्थिती बरीच सुस्थितीत आहे.ती आणखीन कायमस्वरूपी चांगली बनवण्यासाठी आपण नव्या मुळ संघटनेला नवीन संघटनेला बरोबर घेवून मोठ्या ताकदीने आगामी निवडणुका सामोरे जाऊन ग्रामपंचायत,पंचायत समिती,जिल्हा परिषद या निवडणुकीत भाजपा चे प्रतिनिधी निवडून आणण्यासाठी मोठे प्रयत्न करणार असून ,या पुढील विधानसभेत भाजपा चे 200 आमदार निवडून आणून स्वबळावर एकहाती सत्ता स्थापन करणार आहोत.असे आत्मविश्वासाने सांगितले.

भाजपाच्या उभारणीत जुन्या मुळ संघटनेचे योगदान खूप मोठे असून,ज्या काळात पक्षाचे काम करण्यासाठी धाडसाने कोणी पुढे येत नव्हते त्यावेळी मोठा विरोध पत्करून तसेच मोठे नुकसान सोसून अनेक नेते व कार्यकर्ते यांनी भाजपा चे विचार समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवले.त्यासाठी त्यांनी आपले तन - मन ,- धन अर्पण करून प्रसंगी कारावास पण सोसला.अशा सर्व सर्व जुन्या कार्यकर्त्यांना भाजपाच्या  पुढील काळात पन्नास टक्के सत्तेत सामावून घ्यावे.त्यांच्या मागील कार्याची उचित दखल घ्यावी.त्यासाठी लवकरच भाजपा च्या प्रदेश अध्यक्ष यांच्यासह सर्व मंत्र्यांना,नेत्यांना व पदाधिकाऱ्याना पत्र व्यवहार केला जाणार असून ,त्यांना त्यांच्या पूर्वकार्याचे फळ म्हणून  प्रगतीची संधी देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे अनेक जुन्या जाणकार नेते व कार्यकर्ते यांनी यावेळी आपल्या  खाजगी मनोगतात बोलून दाखविले.

या कार्यक्रमाला भाजपाचे सर्व  पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख व बुथप्रमुख मोठ्या संख्येने हजर होते.  **

Friday, November 11, 2022

अक्कमहादेवी एक युग स्त्री : डॉ. वैशाली कडूकर 'महायोगिनी अक्कमहादेवी' कादंबरीचे प्रकाशन

              अक्कमहादेवी एक युग स्त्री : डॉ. वैशाली कडूकर 'महायोगिनी       अक्कमहादेवी' कादंबरीचे प्रकाशन



      अक्कमहादेवी एक युग स्त्री : डॉ. वैशाली कडूकर 'महायोगिनी अक्कमहादेवी' कादंबरीचे प्रकाशन



सोलापूर  दि १० : प्रतिनिधी 

 जननी आणि जन्मभूमी ही निर्मितीची केंद्रे आहेत. जी निर्मिती करू शकते ती कधीच अबला नसते. हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. 12 व्या शतकात अक्कमहादेवींनी केलेले धाडस अतुलनीय आहे. व्यक्तीमुळे जेव्हा नवीन युगाची सुरुवात होते तेव्हा त्या व्यक्तीला युगपुरुष संबोधले जाते. तसेच अक्कमहादेवी या स्त्रीने बाराव्या शतकात नवीन युगाची सुरुवात केली.  त्यांच्या विचारावरून व कार्यावरून त्या एक युग स्त्री असल्याचे सिद्ध होते. महायोगिनी अक्कमहादेवी या कादंबरीमुळे अक्कमहादेवी यांचे चरित्र समाजासमोर येण्यास मदत होणार आहे असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर यांनी केले.

           प्रा. डॉ. श्रुती वडगबाळकर लिखित, सुविद्या प्रकाशन प्रकाशित आणि वीरशैव व्हिजन आयोजित 'महायोगिनी अक्कमहादेवी' या कादंबरीच्या प्रकाशन प्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर उद्योगपती दत्ताअण्णा सुरवसे, साहित्यिका डॉ. स्मिता पाटील, अक्कनबळग महिला मंडळाच्या अध्यक्षा सुरेखा बावी, लेखिका व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर, सुविद्या प्रकाशनचे प्रकाशक बाबुराव मैंदर्गीकर व वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.

             लेखिका श्रुती वडगबाळकर यांनी कादंबरी लेखनाविषयीचे त्यांचे अनुभव सांगून या कादंबरीचे महत्त्व स्पष्ट केले. डॉ. स्मिता पाटील यांनी या कादंबरीचे वेगळेपण सांगून ही कादंबरी प्रत्येक व्यक्तीने एकदा तरी वाचली पाहिजे असे सांगितले. कारण या कादंबरीतून केवळ अध्यात्मच नाही तर जीवन जगण्याचे साध्य नेमके काय आहे हेही दिसून येते असे स्पष्ट केले.

             यावेळी साहित्यिका सुरेखा शहा, अरविंद जोशी, प्रा. भीमाशंकर बिराजदार ,महेश अंदेली, जे. जे. कुलकर्णी, शोभा मोरे, दशरथ वडतीले, पद्माकर कुलकर्णी, अर्जुन व्हटकर, श्री.अवधूत म्हमाणे, डॉ.नसीमा पठाण , डॉ. अनिल सर्जे, चन्नवीर भद्रेश्वरमठ, रंजीता चाकोते, डॉ.सुहास पुजारी, अनेक नामवंत लेखक, उद्योजक, मान्यवर साहित्यिक  उपस्थित होते.

             सुरुवातीला राजशेखर बुरकुले यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाबुराव मैंदर्गीकर यांनी केले. लेखिका वंदना कुलकर्णी यांनी कादंबरी वरील अभिप्राय वाचन केले. सूत्रसंचालन  प्रा. डॉ. शुभदा उपासे-शिवपुजे यांनी केले तर आभारप्रदर्शन राहुल बिराजदार यांनी केले.

        कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागेश बडदाळ, विजयकुमार बिराजदार, संजय साखरे, राजेश नीला, महेश मैंदर्गीकर, मनोज पाटील, मेघराज स्वामी, महेश विभुते, संगमेश कंठी, सोमनाथ चौधरी, बसवराज जमखंडी, गौरीशंकर अतनुरे, अमोल कोटगोंडे यांनी परिश्रम घेतले.


फोटो ओळी  : 'महायोगिनी अक्कमहादेवी' या कादंबरीचे प्रकाशन करताना डॉ. वैशाली कडुकर, दत्ता सुरवसे, डॉ. स्मिता पाटील, डॉ. श्रुती वडगबाळकर, सुरेखा बावी, बाबुराव मैंदर्गीकर, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, अमित कलशेट्टी

Tuesday, November 8, 2022

वीरशैव लिंगायत समाज जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि सामर्थ्यवान बनला पाहिजे यासाठी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि औद्योगिक समस्या सरकार दरबारी पोहचविण्यासाठी माझा जन्मभर प्रामाणिक प्रयत्न राहणार-रामदास पाटील सुमठाणकर (कपिलधार धर्मसभेत प्रतिपादन)



वीरशैव लिंगायत समाज जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि सामर्थ्यवान बनला पाहिजे यासाठी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि औद्योगिक समस्या सरकार दरबारी पोहचविण्यासाठी माझा जन्मभर प्रामाणिक प्रयत्न  राहणार-रामदास पाटील सुमठाणकर
 (कपिलधार धर्मसभेत प्रतिपादन)  






वीरशैव लिंगायत समाज जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे आणि सामर्थ्यवान बनला पाहिजे यासाठी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि औद्योगिक समस्या सरकार दरबारी पोहचविण्यासाठी माझा जन्मभर प्रामाणिक प्रयत्न  राहणार-रामदास पाटील सुमठाणकर
 (कपिलधार धर्मसभेत प्रतिपादन)  
लिंगायत टिव्ही लाईव्ह नांदेड*:-
शिवकुमार कल्याणी विशेष प्रतिनिधी 
राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी सुरूवात केलेली कपिलधार येथे वीरशैव लिंगायत समाजाची भव्य धर्मसभा संपन्न झाली. ही धर्मसभा समस्त पदयात्रा मठ संस्थान बिचकुंदा यांनी  प्रति वर्षाप्रमाणे आयोजित केली होती.यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रामदास पाटील यांनी वीरशैव लिंगायत समाजाच्या वर्तमान स्थिती बद्दल अभ्यासपूर्ण मांडणी केली व वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी  प्रयत्न आवश्यक असल्याचे मत मांडले.
वीरशैव लिंगायत समाज जगला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, सामर्थ्यवान बनला पाहिजे यासाठी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक, राजकीय आणि औद्योगिक समस्या सरकार दरबारी पोहचविण्यासाठी माझा जन्मभर प्रामाणिक प्रयत्न  राहणार असल्याचे बोलले. आपण हि समाजाचे काही देण लागतो,
यां यभावनेतून निरपेक्ष वृतीने,समाजाच्या भल्यासाठी आपसातील मतभेद सोडून एकत्र यावे असेही अहवान केले.
यावेळी धर्मपिठावर नांदेडचे खासदार मा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी
वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन दरबारी सर्वोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ष ब्र 108 वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, उपाध्यक्ष ष ब्र 108 विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मन्मथ धाम मांजरसुबा, ष ब्र 108 वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ, ष ब्र 108 सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकुंदा,ष ब्र 108 रायपटनकर महाराज, ष ब्र 108 मलायगिरी महाराज, लातूर भाजपा अध्यक्ष गुरुनाथ मगे, हिंदू वीरशैव लिंगायत मंच चे देवगिरी प्रांत संयोजक नितीन शेटे, बस्वराज मंगरूळे, उदय चौडा, मनोहर भोसीकर, कीर्तनकर मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष शिवाराज नावंदे गुरुजी,श्री विजय धोंडगे, इत्यादी मान्यवर व मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
यावेळी समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ, प्रत्येक जिल्ह्यात तरुणासाठी निवासी वसतिगृह, मंगळवेढा येथे शासनाने जागा संपादित करून भव्य स्मारक उभारणे, कीर्तनकार प्रवचनकार,
पुरोहित, पुजारी जंगम,गायक वादक यांना मासिक वेतन,या समाजातील मठ संस्थानांना संरक्षण देणे आणि मालमतेच्या संरक्षणार्थ स्वतंत्र प्राधिकरण नेमणे, सोलापूर विद्यापीठाच्या धर्तीवर सर्व विद्यापीठात महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र स्थापन करणे, वीरशैवातील मन्मथस्वामी,लक्ष्मण महाराजांसह अनेक संतांचे ग्रंथ, अभंग, गाथा आणि अनेक शरनाचे वचन साहित्याचा शोध घेऊन संग्रहीत करणे आणि संशोधन करणे, केंद्रशासनाच्या  प्रशाद योजनेअंतर्गत सर्व मठाचे जीर्णोद्धार करणे, प्रत्येक गावात स्वतंत्र स्मशानभूमी आणि स्मशानभूमीवर झालेले अतिक्रमण मुक्त करणे, आणि महत्त्वाचं म्हणजे वीरशैव लिंगातील सर्व पोटजाती ह्या इतर मागासवर्गीय(obc ) संवर्गात वर्ग करणे, जंगम मधील बेडा जंगम, बुडगा जंगम इत्यादी पोट जातीतील तांत्रिक अडचणी दूर करून जात प्रमाणपत्र मिळणे सुलभ करणे इत्यादी अशा अनेक मागणीबाबत तात्काळ शासनाकडे  प्रयत्न करणार असल्याचे बोलले.मा देवेंद्रजी फडवणीस यांच्याकडे विशेष बैठक लावून वीरशैव लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचही सांगितले. तसेच आपला धर्म हा हिंदू धर्म असुन, हिंदुवाची कास धरून समाजाने संघटित व्हावे असेही बोलले. समाजात अनेक संघटना आहेत त्यांचं ही समाजासाठी उपयुक्त काम आहॆ असं सांगून काही विघातक प्रवृत्ती नक्कीच दूर व्हाव्यात असेही बोलले. समाजाने काळानुसार स्वतः मध्ये बदल करून स्वतःचे सामर्थ्य वाढवलं पाहिजे असे ते बोलले.

Wednesday, November 2, 2022

मुंबई येथे भव्य लिंगायत मोर्चाचे आयोजन

 


                                 मुंबई येथे भव्य लिंगायत मोर्चाचे आयोजन 


                                 मुंबई येथे भव्य लिंगायत मोर्चाचे आयोजन 



सातारा, दि.1 -    प्रा.अजय शेटे. 

मुंबई येथे रविवार दि.18 डिसेंबर रोजी आझाद मैदान या ठिकाणी भव्य अशा लिंगायत महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्वसामान्य लिंगायत जनतेतून गेली अनेक वर्षे लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता व अल्पसंख्यांक दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ,कर्नाटक विधी मंडळात याबाबत यशही मिळाले आहे.परंतु महाराष्ट्रात नांदेड,लातूर,कोल्हापूर,सांगली,

यवतमाळ ,परभणी ,संभाजीनगर ,सोलापूर,नाशिक,पुणे येथे लाखोंच्या संख्येने मोर्चे  निघाले.यामधून राज्यातील लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर संघटित झाला.परंतु सरकारने  अजूनही लिंगायत बांधवांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार केला नाही.  




अल्पसंख्यांक दर्जा व आर्थिक विकास महामंडळ मिळणे हा लिंगायतांचा हक्क आहे.यातून समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रश्न तसेच तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटेल व लिंगायतांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होईल.लोकशाही मध्ये जो समाज संघटित होऊन संघर्ष करतो त्याच समाजाचे भवितव्य सुरक्षित व चांगले राहते.

त्यामुळे याच सर्व मागण्या घेवून रविवार , दि.18 डिसेंबर 2022 रोजी  पहिल्यांदाच लिंगायतांचा महामोर्चा मुंबईत दिवसभर होणार आहे.

या महामोर्चात लिंगायत धर्माला स्वतंत्र संविधानिक मान्यता द्या,लिंगायत धर्मियांना अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करा, म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा,मंगळवेढा येथील म.बसवेश्वर यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम त्वरित करा,विधानभवन परिसरात म.बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा उभा करा.अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत.




तरी राज्यातील सर्व लिंगायत बांधवांनी या मोर्चात लाखोंच्या संख्येने सामील व्हावे व या ऐत्याहासिक प्रसंगांचे साक्षीदार व्हावे.असे आवाहन अखिल भारतीय लिंगायत समन्वय समिती यांनी केले आहे.

तसेच या मोर्चाच्या अधिक माहितीसाठी मोबाईल संपर्क क्रमांक 9923232229,9615221008,8975521520,9021962214,9370111165,9137561012,9604487007,9420625234 यावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.**

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...