Thursday, January 27, 2022

पत्रकार मोहन मस्कर-पाटील यांचे हृदयविकाराने निधन..

 



पत्रकार मोहन मस्कर-पाटील यांचे हृदयविकाराने निधन..




पश्चिम महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्साहाचा खळखळता झरा लुप्त झाला..




 सातारा दि  २७ :-  तब्बल अडीच दशके पत्रकारितेत सक्रिय असलेले  पत्रकार मोहन मस्कर- पाटील (वय ४४) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने पश्चिम महाराष्ट्राच्या पत्रकारिता क्षेत्रातील उत्साहाचा खळखळता झरा लुप्त झाला.

मोहन मस्कर- पाटील यांचे पत्रकारिता क्षेत्रात मोठे योगदान असून, त्यांना राज्य शासनाचा पुणे विभागाचा नानासाहेब परुळेकर पत्रकारिता पुरस्कार, स्वच्छता अभियानांतर्गत निर्मल ग्राम अभियानाचा जिल्हा स्तरीय पुरस्कार मिळाला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानसह देश, राज्य पातळीवरील अनेक संस्थांच्या फेलोशीप त्यांना मिळाल्या होत्या. मुलगी नको असलेल्या कुटुंबात मुलीचे नाव 'नकुसा' ठेवले जात होते. त्याविरोधात मोहन पाटील यांनी विपुल लेखन करुन ही प्रथा समाजातून दूर होण्यासाठी काम केले. त्याची पडसाद राज्यभर उमटून 'नकुसां'ची नावे बदलण्याची चळवळ उभी राहिली. त्याची दखल घेत त्यांना 'लेक लाडली'चा पुरस्कार त्यांना मिळाला होता.

मराठी पत्रकारिता क्षेत्रात काम करताना त्यांनी राजकीय, सामाजिक, गुन्हेगारी, प्रशासकीय क्षेत्रात विपुल लेखन केले. पत्रकारितेच्या मूल्यांचे जतन करत त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमठवला. रंजल्या, गांजलेल्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी नेहमीच तीव्रतेने लेखन केले. याशिवाय, समाजातील बदल अचूकपणे टिपून केलेले लेखन समाजाला दिशा देणारे ठरले आहे.

मोहन यांच्या निधनाने साताऱ्यास पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, चळवळीच्या क्षेत्राचे नुकसान झाले. त्यांच्या जाण्याने तब्बल अडीच दशकांचा अनुभव हरपला आहे. त्यांची पत्रकारिता उदयोन्मुख पत्रकारांसाठी सदैव मार्गदर्शक, दिशादर्शक ठरणारी आहे. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक प्रश्नांना वाचा फोडली असून, त्याचे परिणामही दूरगामी झाले आहेत. ते सध्या 'पुण्यनगरी'च्या सातारा कार्यालयात उपसंपादक म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी लोकमत, तरुण भारत या दैनिकांत काम केले आहे.

मोहन यांचे मूळ गाव चिंचेवाडी, ता. शिराळा, जि. सांगली असून, ते सध्या सातारा येथील समर्थ मंदिर परिसरात राहत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रशासकीय यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. त्यांच्यावर चिंचेवाडी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.


Saturday, January 22, 2022

उंब्रज तालुका कराड येथील कुमारी योगिता विजापुरे हिने आपल्या लग्नाच्या सुरुवातीला गावदेवाची सुरुवात केली छ्त्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करून.

 

उंब्रज तालुका कराड येथील कुमारी योगिता विजापुरे हिने आपल्या लग्नाच्या सुरुवातीला गावदेवाची सुरुवात केली  छ्त्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करून.



उंब्रज तालुका कराड येथील कुमारी योगिता विजापुरे हिने आपल्या लग्नाच्या सुरुवातीला गावदेवाची सुरुवात केली  छ्त्रपती शिवाजी महाराज यांची पूजा करून.




उंब्रज दि  22 :- प्रतिनिधी  प्रसाद  वाकडे 
उंब्रज तालुका कराड येथील  विक्रम इलेक्ट्रॉनिक चे  विक्रम विजापूरे यांची कन्या योगिता चा विवाह निश्चित झाला असून पारंपरिक पद्धतीने लग्नाच्या अगोदर  गावदेव केले जातात आणि याची सुरुवात ही ग्रामदैवतेचे दर्शनानी केली जाते  मात्र विक्रम विजापूरे यांच्या कन्येने या परंपरेस फाटा देऊन संपूर्ण महाराष्ट्रचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे यांचे आशीर्वाद घेऊन केले असून या भावी पिढी समोर एक वेगळा आदर्श ठेवला असून या मुळे उंब्रज आणि परिसरात या विषयावर  योगिता चे नाव आदरानी घेतले जात आहे , तिने आज च्या तरुण आणि तरुणीसाठी आज नव्या रितीला वाट करून दिली  योगिताने  आपल्या  लग्नाच्या सुरुवातीला गावदेवाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजेन केली , या  वेळी सोबत वडील विक्रम विजापुरे ,निकिता , अंकिता.  इत्यादी उपस्थित होते , योगिताचे लग्न २३/०१ /२०२२ रोजी होणार  असून तिच्या या विवाहासाठी  उंब्रज ग्रामस्थ आणि समस्त शिव भक्तानी  शुभेच्छा दिल्या .

जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद , जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी सांगली, दि. 22, उमेेेश  पाटील सांगली 
प्रतिनिधी

: राज्य शासनाकडील दि. २० जानेवारी २०२२ रोजीच्या परिपत्रकान्वये स्थानिक परिस्थितीचा विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास इयत्ता 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू ठेवणे अगर बंद ठेवण्याचे अधिकार प्रदान केले आहेत. सांगली जिल्ह्यातील दि. 21 जानेवारी 2022 रोजी संपणाऱ्या आठवड्याचा कोविड-19 च्या RTPCR व RAT तपासणीचा पॉझीटीव्हीटी दर 23.99 टक्के इतका जास्त आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत रूग्णांच्या संख्येत व कोविड पॉझीटीव्हीटीच्या तपासणी दरामध्ये सातत्याने व वेगाने वाढ होत आहे. या परिस्थीतीचे अवलोकन करून जिल्ह्यातील वाढत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अभिजीत चौधरी यांनी खालील बाबी वगळता सांगली जिल्हा स्थलसीमा हद्दीतील इयत्ता 1 ली ते 12 वी च्या सर्व शाळा दि. 31 जानेवारी 2022 रोजी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (१) विविध शैक्षणिक बोर्डाकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम. (२) प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करावयाचे कामकाज. (३) शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, किंवा इतर तत्सम प्राधिकरणांकडून राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम. बंद ठेवण्यात आलेल्या 1 ली ते 12 वी च्या शाळा ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबत शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सांगली व शिक्षण विभाग, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका यांनी सर्व शाळांना त्यांच्या स्तरावरून कार्यप्रणालीबाबत स्वतंत्र सूचना/ निर्देश निर्गमित करावेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

Thursday, January 20, 2022

कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धगंगा मठाचे मठाधीश,शिवकुमार स्वामीजी

कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धगंगा मठाचे मठाधीश,शिवकुमार स्वामीजी.
सातारा दि 21:- महादेव मेंडगीरी प्रतिनिधी लिंगयात TV live
कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धगंगा मठाचे मठाधीश *प.पू. शिवकुमार स्वामीजी यांची आज पुण्यतिथी*. ते मृत्यूसमयी १११ वर्षांचे होते. लिंगायत समाजाचे गुरू असलेले स्वामीजी *'वॉकिंग गॉड'* म्हणून ओळखले जायचे. सिद्धगंगा मठाद्वारे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात स्वामीजीनी विपुल कार्य केले. मठाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत तब्बल १३० शैक्षणिक संस्थांची उभारणी झाली आहे.

७०० वर्षांचा इतिहास असलेला सिद्धगंगा मठ लिंगायत समाजाचा सर्वात मोठा म्हणून ओळखला जात असला तरी तो सर्वाना खुला आहे. सर्व जाती धर्माच्या तब्बल आठ हजार मुलांना मोफत शिक्षण त्याचबरोबर त्यांच्या राहण्या, जेवणाची सोय या मठामार्फत केली जाते. या मठाची चूल कधीच बंद होत नाही. रोज २० हजारहून अधिक भाविकांना इथे अन्नदान केले जाते. भारतीय संस्कृतिविषयक सर्व भाषांतील पुस्तके या मठात जतन करून ठेवण्यात आली आहेत. स्वामीजींच्या आधुनिक विचारसरणी आणि कार्यामुळे हा मठ चर्चेच्या केंद्रस्थानी आला. राज्य सरकारने त्यांना *"कर्नाटक रत्न"* तर केंद्र सरकारने त्यांना  *"पदमभूषण'* पुरस्काराने गौरवान्वित केले आहे. 

कर्नाटकच्या आणि लिंगायत समाजाच्या सामाजिक शैक्षणिक पटलावर आपला अमीट ठसा उमटवणाऱ्या शिवकुमार स्वामीजींना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

Tuesday, January 18, 2022

लिंगायत समाजातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व आप्पा उर्फ श्री बीबी बहिरट सर. त्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण . आणि या निमित्ताने त्यांना वाहिलेली शब्द रुपी श्रद्धांजली .

 




लिंगायत समाजातील एक आदर्श  व्यक्तिमत्त्व आप्पा उर्फ श्री बीबी बहिरट सर. त्यांचे आज प्रथम पुण्यस्मरण . आणि या निमित्ताने त्यांना वाहिलेली शब्द रुपी श्रद्धांजली .


 


 लिंगायत समाजातील एक आदर्श  व्यक्तिमत्त्व आप्पा उर्फ श्री बीबी बहिरट सर .

लिंगायत समाजातील एक आदर्श  व्यक्तिमत्त्व आप्पा उर्फ श्री बीबी बहिरट सर हे समाजातील आणि रयत शिक्षण संस्थेमधील सर्वांचे  आवडते , सगळ्यांचे लाडके आप्पा हे गजब व्यक्तिमत्व होतं ते जेवढे रागीट होते तितकेच मायाळू व प्रेमळ  होते. वडील ,भाऊ, मामा ,मुलगा, काका ,मेहुणा अशा सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यांनी जेवढे व्यवस्थित पार पाडल्या तेवढ्याच सामाजिक व आर्थिक जबाबदारीही पार पाडल्या. रयत शिक्षण संस्थेची 33 वर्ष सेवा करून सेवानिवृत्तीनंतरही संस्थेची सेवा ते अविरत करतच होते एक  हुशार व अभ्यासू व्यक्ती म्हणून ते संस्थेत प्रसिद्ध होते तसेच त्यांच्या सेवाकाळात त्यांनी शिक्षकेतर संघटनेची तालुका व जिल्हाध्यक्ष पद भुषविले होते .त्यांच्या कारकिर्दीचा आलेख बघितला तर त्यांच्या वडिलांना पण ते एवढे पुढे जातील असे कधी वाटले नव्हते ,लहानपणी गावातील सगळ्यात आगाऊ मुलगा, कायम त्रास देणारा ,दररोज एक तरी भांडण घरी घेऊन येणारा त्रासदायक मुलगा होते. अभ्यासाकडे कधी विशेष लक्ष दिलेच नाही दहावीपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण केले व पुढील शिक्षणासाठी फलटण येथे आले आपली  परिस्थिती बेताची होती पण त्यातही पदवी पूर्ण करून रयत शिक्षण संस्थेत क्लार्क या पदावर रुजू झाले .त्यानंतर ते त्यांच्या आयुष्यात भरपूर शिकत गेले आणि शिकवत ही गेले. त्यांनी स्वतःची परिस्थिती बेताची असताना सुद्धा सामाजिक बांधिलकी जपत  खूप जणांना मदत केली .कौटुंबिक जबाबदारीत तीन मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यास आधार दिला . सातारा येथे स्वतःची जागा घेऊन स्वतःचे घर बांधले त्यांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांची पत्नी शुभदा बहिरट यांनी मोलाची साथ दिली .अशा या धाडसी हजरजबाबी मनमिळावू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या व्यक्तीने कायम स्वतःबरोबर इतरांनाही पुढे नेले, परंतु काळ कोणासाठी थांबत नाही अशा या उत्तुंग व्यक्तीमत्वा चे निधन दिनांक 19 जानेवारी रोजी 2021 रोजी झाले. आज त्यांच्या जाण्यास वर्षपूर्ती होत असली तरी त्यांचे अस्तित्व जाणवत आहे .सगळ्यांच्या मनातील त्यांची जागा कायम शाश्वत राहणार आहे. त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांची मुलगी या नात्याने वाहिलेली शब्दांजली त्यांना अर्पण.

प्रणाली वाकडे उंब्रज 

Monday, January 17, 2022

ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन; मंगळवारी अंत्यसंस्कार.


  ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांचे निधन; मंगळवारी अंत्यसंस्कार.
   कोल्हापूर :दि 17   ॲड. शीतल सतिष बेद्रे  प्रतिनिधी  
कष्टकरी, शेतकरी व कामगारांचे नेते व ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांचे सोमवारी वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. प्रकृती खराब झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र ते उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली प्राध्यापक पाटील यांच्या पार्थिवावर मंगळवार दि. १८ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत डॉ. एन. डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सदर बाजार - विचारे माळ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात  ठेवले जाणार असल्याचे.  ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली.

Thursday, January 6, 2022

लिंगायत महासंघाच्या वतीने महात्मा बसवेश्वर दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन संपन्न



लिंगायत महासंघाच्या वतीने महात्मा बसवेश्वर दिनदर्शिका 2022 चे प्रकाशन संपन्न
लातूर दि :-  प्रतिनिधी प्रणाली वाकड़े लिंगायत TV live

लिंगायत महासंघाच्या वतीने महात्मा बसवेश्वर दिनदर्शिका 2022 या दिनदर्शिकेचे लातूर येथे काल प्रकाशन करण्यात आले. अतिशय सुंदर व आकर्षक असलेली दिनदर्शिका, एक परिपूर्ण दिनदर्शिका काढण्यात आली आहे. या महात्मा बसवेश्वर दिनदर्शिकेचे लातूर येथे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी लिंगायत महासंघाचे  माणिक मुळे, विश्वनाथप्पा मिटकरी, विश्वनाथप्पा सावळे स्वामी, जिल्हा उपाध्यक्ष मल्लिकार्जुन कुडुंबले, शहराध्यक्ष बलराज खंडूमलके, तर शहर सरचिटणीस लिंगेश्वर बिरादार, तुकाराम कावळे, सौ राधिका कावळे सुर्यकांत बजगुडे आदींची उपस्थिती होती.
या महात्मा बसवेश्वर दिनदर्शिकेचे मोफत वितरण करण्यात येत असून दिनदर्शिकेचे सर्व पदाधिका- यांनी कौतुक केले आहे.

अकलूज येथे वीरशैव लिंगायत दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन संपन्न

अकलूज येथे वीरशैव लिंगायत दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन संपन्न
अकलूज दि 6 :- महादेव मेंडगीरी लिंगायत TV live प्रतीनिधी
अकलूज येथे वीरशैव लिंगायत दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन संपन्न
अकलूज येथील महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय संस्थेने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. शनिवार दि १जानेवारी २०२२ रोजी या दिनदर्शिकेचे प्रकाशन डि.वाय.एस.पी. श्री. बसवराज शिवपुजे साहेब याच्या हस्ते करण्यात आले. 
शिखर शिंगणापूर येथील राजगुरू सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांचे वाढदिवसानिमित्त संस्थेकडून दरवर्षी १ जानेवारीला वीरशैव लिंगायत दिनदर्शिकेचे प्रकाशन केले जाते. याही वर्षी हि प्रथा पाळण्यात आली.
गेली ७ वर्षे संस्था हा उपक्रम राबवीत आहे. या दिनदर्शिकेत अकलूज परिसरातील सर्व समाजबांधवांचे टेलिफोन/ मोबाईल क्रमांक छापले आहेत. हि दिनदर्शिका म्हणजे समाजाची टेलिफोन डिरेक्टरीच आहे. अकलूजमधील समाज बांधवांनी आपापल्या व्यापार/ व्यवसायाच्या जाहिराती देऊन या उपक्रमासाठी हातभार लावला आहे. दरवर्षी दिनदर्शिकेच्या सुमारे २००० प्रती छापल्या जातात आणि लिंगायत समाजासह अन्य समाज बांधवानाही त्या विनामूल्य दिल्या जातात. 
दिनदर्शिका प्रकाशन सोहळा महादेव मंदीर, अकलुज येथे संपन्न झाला. यावेळी तात्यासाहेब गुळवे,उत्कष॔ शेटे, आदित्य आर्वे, अशोक शेटे, विलास क्षीरसागर, राजू आर्वे तसेच महात्मा बसवेश्वर संस्थेचे अध्यक्ष सचिन गुळवे, उपाध्यक्ष सचिन कथले आणि समाजबांधव उपस्थित होते.

Tuesday, January 4, 2022

अनाथांची माय अनंतात विलीन .. थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन

 अनाथांची माय अनंतात विलीन 
.. थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे निधन 
..प्रा.अजय शेटे.. वडूज..9823540239.
..सातारा.. दि.4..वर्धा येथील विदर्भ कन्या ..थोर समाजसेविका.... अनाथांची माय माउली ह्या उपाध्या प्राप्त केलेल्या सिंधूताई सपकाळ यांचे आज मंगळवार दि.4 रोजी रात्री 9.00 वाजता पुणे येथील ग्यलक्सि हॉस्पिटल येथे निधन झाले..
.. सिंधूताई सपकाळ यांचे जीवन चरित्र अतिशय प्रेरणादायी असे होते.सिंधूताईंच्या आईंचा शिक्षणाला विरोध होता पण वडील मात्र शिक्षण प्रेमी असलेमुळे त्याचे ई.4 थी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होऊ शकले.त्यानंतर त्यांच्या आईने शिक्षणास प्रचंड विरोध करून त्यांना म्हशी राखण्यास पाठवू लागली.तेव्हा शिक्षण प्रेमा मुळे त्या म्हशी नदीच्या पाण्यात बसवून शाळेत जात..पण एक दिवस त्याच म्हशी  दुसऱ्या व्यक्तीच्या शेतात शिरल्या व त्यांनी पीक खाल्ले त्यावेळी आईकडे तक्रार गेली व सिंधू ताईंची शिक्षण चोरी आईस समजली..या गोष्टीचा प्रचंड राग येवुन त्यांच्या आईने  बालवयात वयाच्या 10 व्या वर्षी त्यांचे लग्न एका निरक्षर अडाणी अशा 35 वर्षे वयाच्या इसमाबरोबर लावून दिले..
..पुढे सिंधुताई संसारात रमल्या पण त्यांची वाचनाची आवड काही कमी झाली नाही.. किराणा दुकाना तून आलेले रद्दीचे पेपर  त्या वाचून काढत असत..या गोष्टीचा राग त्यांच्या पतीस येई. व तो त्यांना मारहाण करीत असे..
..पुढे सिंधू ताईंनी शेताबरोबर गुरे सांभाळली ..वर्ध्याचे जिल्हाधिकारी रंगनाथन यांच्याकडे स्थानिक दलाल शेणखत कसे अल्प दरात घेतात व शेतकऱ्यांची फसवणूक करतात हि गोष्ट निदर्शनास आणून देवून दलाली बंद केली व शासकीय दराने शेणखत विक्रीस सुरुवात केली व शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून दिला.
.. पुढे विसाव्या वर्षी  सिंधुताई गरोदर राहिलेल्या असताना मागील राग मनात धरून स्थानिक दलालाने त्यांच्या पतीचे कान भरवून सिंधूताईंच्या पोटी जन्माला येणारे बाळ हे आपलेच आहे असे सांगून त्यांचे चारित्र्य हनन केले..
..त्यामुळे पतीने प्रचंड रागाने त्यांना गाईच्या गोठ्यात मारहाण करून बेशुद्ध पाडले..तशा अवस्थेतच त्यांनी एका बाळास जन्म दिला..त्यानंतर पतीने त्यांना उपाशी पोटी घरातून कायम चे बाहेर हाकलून दिले..त्या दुसऱ्या गावात फाटक्या कपड्या निशी आल्या .त्या गावातील स्मशानभूमी जवळ थांबल्या..रात्र झाल्यावर त्यांना प्रचंड भूक लागली .त्या व त्यांचे बाळ रडू लागले..तोच लांबून काही माणसे मेलेले प्रेत घेवून येताना दिसली..बाळाच्या  रडण्याचा आवाज ऐकू येवू नये म्हणून त्या दूरवर अंधारात जावून बसल्या.. थंडी खूप पडली होती.गावकरी प्रेताचा अग्निसंस्कार करून निघून गेल्यावर त्या जळक्या चिते जवळ आल्या.आणि स्वतःला व बाळाला शेकुत लागल्या.जवळच सव्वा रुपया व पीठ ठेवलेले दिसले.त्यांनी जवळच पडलेल्या फुटक्या मडक्यात असलेल्या पाण्यात ते पीठ कालवून त्याची भाकरी तयार केली व झाडांची पाने गोळा करून त्यावर थापली व चीतेच्या निखाऱ्यावर भाजून खाल्ली व आपल्या बाळाला दूध पाजले. व तेथेच उबीत झोपून गेल्या.
..  सकाळी दहा दिवसांचे बाळ बरोबर घेवून त्या वर्ध्याच्या रेल्वे स्टेशन वर आल्या .दिवसभर रेल्वेत भीक मागत व रात्री तेथेच स्टेशनवर झोपत..असे दिवस काढता काढता त्यांनी भिकऱ्यांच्या पोरांचे पालनपोषण सुरू केले व त्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली..
..हळू हळू त्यांचे हे महान कार्य अनेकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांच्या या महान कार्याला अनेकांची मदत मिळू लागली. व तेथेच एक जागा भाड्याने घेवून त्यांचा अनाथ आश्रम सुरू झाला..अनेक आईबाप नसलेल्या मुलांच्या त्या माय बनल्या.पुढे त्यांनी 350 भाकड गाईंचे पालन पोषण करून त्यांना जीवनदान दिले..गो रक्षण करून देशी गाईंचे महत्त्व पटवून दिले.
..त्यांच्या या महान कार्याची महती पुढे देशभर व जगभर पसरली.त्यामुळे त्यांना 22 देशांत परदेश प्रवास करण्याचे भाग्य प्राप्त झाले. इंग्लंड राणी साहेब एलिझाबेथ यांचे बरोबर बंकिम हँग पॅलेस राजवाड्यात राजघराण्यातील व्यक्तींसोबत राज भोजन करण्याचा योग आला..अनेक परदेश वाऱ्या त्यांनी केल्या पण .. घार उडे आकाशी..पण तिचे चित्त पिलापाशी..या न्यायाने त्या पुन्हा लगेच आपल्या मायभूमी तील अनाथ आश्रमात माघारी येत व अनाथ मुले व गाई यांच्या माय बनून जात..
..सिंधू ताईना मराठी साहित्य वाचनाची खूप आवड होती. ग. ल.ठोकळ.. ग. दि.माडगुळकर..सुरेश भट यांच्या अनेक कविता त्यांना पाठ होत्या..सुरेश भटांच्या गझले प्रमाणेच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जगून काढले 
..त्या नेहमी म्हणत की..
..इतकेच मला जाताना सरणावर कळले होते..
..मरण्याने केली सुटका ..जगण्याने छळले होते..
..मी एकटीच त्या रात्री आशेने तेवत होती..
...मी विझले तेव्हा .. सारे आकाश उजळले होते.. सारे आकाश उजळले होते..
..अशा या माय माऊलीस भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन **
..
..

अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन


अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांचे पुण्यात निधन

पुणे: दि 4 :-   ॲड. शीतल सतिष बेद्रे प्रतिनिधी लिंगायत TV live
 अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ  यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी त्यांचं निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले. महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या.

Sunday, January 2, 2022

तीन मुले असून मुलींनीच दिला आईला खांदा.



तीन मुले असून मुलींनीच दिला आईला खांदा
औरंगाबाद दि 2  :-  लिंगायत TV live प्रतिनिधी  प्रसाद वाकडे
...मौजे लिहाखेडी ता. सिल्लोड (हल्ली मुक्काम औरंगाबाद) येथील गं.भा.चंद्रभागाबाई आनंदा साखळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले..त्यांना तीन मुले आणि तीन मुली आहेत..मोठा मुलगा हनुमंता आनंदा साखळे,कृषी अधिकारी,मधला मुलगा बाळाराम आनंदा साखळे, हाय कोर्टात क्लर्क,तर लहान मुलगा नबाजी आनंदा साखळे कंपनीत नोकरीला आहेत...आईने अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून ह्या तीनही मुलांना मोठे केले..नोकरीला लावले पण शुद्ध हरपलेल्या ह्या मुलांनी आईस सांभाळायला सपशेल नकार दिला..अतिशय प्रामाणिक,नम्र,गरीब,कष्टकरी असलेल्या आईस मुलांनी सांभाळायला नकार दिल्यामुळे गेल्या वीस वर्षांपासून चंद्रभागाबाई यांचा सांभाळ त्यांची मुलगी सुभद्रा व जावई श्रीकृष्ण टाकसाळे हे करत होते...इतक्या वर्षांपासून अनेकदा मुलगी व जावई यांनी फोन करून सुद्धा ही तीनही मुलं सख्या आईला साधे भेटायला सुद्धा आले नाहीत की कधी विचारपूस केली नाही.आज आईचे निधन झाल्याचे कळल्यावर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणी दोन भाऊ आले व दूरवर उभे राहिले.. सर्वात मोठा मुलगा आलाच नाही..हे सर्व पाहून चंद्रभागाबाई यांच्या तिन्ही लेकिंनी व हर्सूल बालाजी नगर परिसरातील सर्व मंडळीनी तसेच नातलगांनी आईच्या प्रेतालासुद्धा मुलांना हात लावू देणार नाही असा पावित्रा घेतला..शेवटी जिजाबाई, सुभद्रा व सुनीता ह्या तिन्ही लेकींनी आईस खांदा दिला व सर्व अंतिमसंस्कार पूर्ण केले...अंतिम समयी माजी उपमहापौर विजय औताडे यांचेसह परिसरातील नागरिक,नातलग,मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.. आयुष्यभर काबाड कष्ट करून मुलांना मोठे करून आज ते चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत पण सख्या आईच्या म्हातारपणात,आजारपणात लक्ष न देणाऱ्या,आईला घराबाहेर काढणाऱ्या ह्या मुलांबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे तर...लेक सुभद्रा  आणि जावई श्रीकृष्ण  टाकसाळे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आईच्या केलेल्या सेवेसाठी सर्वत्र कौतुक होत आहे..

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...