Saturday, April 30, 2022

क्रांतिसूर्यलिंगायत धर्म संस्थापक , महात्मा बसवेश्वर ,


क्रांतिसूर्य
लिंगायत धर्म संस्थापक , 
महात्मा बसवेश्वर , विशेष लेख प्रा अजय शेटे
सातारा, दि.10 मे 2024 - शुक्रवारी दि.10 मे ,अक्षयतृतीया रोजी लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची 918 वी जयंती संपूर्ण भारतभर तसेच परदेशात पण साजरी होत आहे.प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेताना म.बसवेश्वर यांचे कार्य त्या वेळच्या व आजच्या पण वेळी किती महान आहे.हे आपणास दिसून येते.
प्राचीन काळापासून ' लिंगायत ' हा एक स्वतंत्र धर्म असून तो कोणताही धर्म,जात व पंथाची पोट शाखा नाही.हे आपणास सप्रमाण दिसून येते.स्वतंत्र असण्याची जी सर्व लक्षणे असतात ती सर्व लक्षणे या धर्माबाबतही दिसून येतात.या धर्माचे आराध्य दैवत श्री शिवशंकर/ महादेव हे असून सृष्टीच्या ' उत्पती - स्थिती - लय ' या सर्व क्रियांचे ते कारक आहेत.वीरशैव लिंगायत धर्माची शक्तिपीठे संपूर्ण भारतभर व परदेशात पण  फार पूर्वीपासून असल्याची दिसून येतात.या मठ पिठातील वेदशास्त्र अभ्यासपूर्ण  मठाधिश /मठाधिपती  गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून प्रचलित आहे.या धर्माचा स्वतंत्र असा विजय ध्वज / विजय पताका फार पूर्वीपासून प्रचलित आहे.
इ. स.12 शतकाच्या पूर्वार्धात सन 1105 मध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जवळील इंगळेश्वर बागेवाडी येथे एका  शैव कर्म उपासक कुटुंबात वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेला म.बसवेश्वर यांचा  जन्म झाला.त्यांच्या वडिलांचे नाव मादिराज व आईचे नाव मदलांबिका असे होते.थोरल्या बहिणीचे नाव नागंबिका व भावाचे नाव देवराज असे होते.
       वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्या कुटूंब कर्मात त्यांचा उपनयन संस्कार करण्याचे ठरले.त्यावेळी त्यांच्या पेक्षा थोरली बहीण असलेल्या नागक्का हिचा उपनयन संस्कार झाला नाही आणि आधी आपलाच तो का केला जात आहे ? असा प्रश्न त्यांनी विद्वान शास्त्री पंडीत यांना विचारला असता ती स्त्री असून,तिला शूद्र स्थान आहे.असे शास्त्रकारांनी त्यांना सांगितले असता.समाधान कारक उत्तर न मिळाल्यामुळे व स्त्री ला समान दर्जाचे मानले जात नसल्यामुळे त्यांनी आपल्या स्वतःच्या ही उपनयन संस्कारास विरोध करून तो टाळला.त्यांच्या मते प्रचलित समाजात आदिमाया स्त्रीला शूद्र स्थान असून तिला जर सर्व बाबतीत उपेक्षित ठेवली जात असेल तर तिच्या पोटी जन्म घेणाऱ्या माझ्यासारख्या पुरुषांना उच्च कसे समजायचे ? हा विरोधाभास सहन न झाले मुळे व आपल्या क्रांतिकारक विचारांमुळे कुटुंबाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग केला व ते पशुपात शैव ज्ञान भांडार असलेल्या कृष्णा व मल प्रभा नद्यांच्या संगमावर वसलेल्या व ईशान्य मुनींनी स्थापन केलेल्या ' कुडल संगम ' या तीर्थ क्षेत्री येवून राहिले.तेथून पुढे त्यांनी वेदशास्त्र , तत्वज्ञान व भाषा अभ्यास  सुरू केला.
   वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत सलग पाच वर्षे वेदाभ्यास केल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र मंगळवेढ्याच्या बिज्जळ राजाच्या पदरी असलेले त्यांचे मामा बलदेव यांनी त्यांचे लग्न आपली मुलगी गंगाबिका हिच्याशी लावून दिले . म.बसवेश्वर यांची विद्वत्ता पाहून राजाने त्यांना कारकून म्हणून राजकारभार करण्यास नेमले.पण  आपल्या अंगभूत विद्वत्तेमुळे अल्पावधीतच त्यांनी राज्याच्या प्रधान पदापर्यंत मजल मारली.
तेथे त्यांनी सलग एकतीस वर्षे महान असे कार्य केले. व ' कल्याण ' ला राज्याची राजधानी बनवली.
येथेच त्यांनी आपल्या जीवनातील महान कार्य असलेली शरण चळवळ सुरू केली .त्या चळवळीत अग्रज ते अंत्यज अशा सर्व घटकांना त्यांनी सामील करून घेतले.स्त्री पुरुष समानतेचे तत्व अंगिकारून पुरुषांना ' शरण ' व स्त्रियांना ' शरणी ' असे संबोधून धर्म कार्यात सहभागी करून घेतले.याच शरण चळवळीचे पुढे त्यांनी विश्वव्यापक अशा  लिंगायत धर्मात रूपांतर केले.त्यामुळे सर्वांच्यात समान पातळीवर ' रोजी - रोटी - बेटी ' व्यवहार सुरू झाला.समता,समानता,सरलता, बंधुत्व ,जातीभेद,लिंगभेद  निर्मूलन, निर्मोही,निजमुक्त,
' कायक वें कैलास '( कष्ट करून जगणे व श्रमाने अर्थप्राप्ती करणे )  अनुसरून   ' दासोह ' ( जीवनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा अंगीकार करणे ) करणारी  ,विवेकवादी व सारासार विचारसरणी जागृत करणारी चर्चा घडवून प्रत्यक्ष अनुभव घेणारी शरण - शरणींची एक मोठी संघटनाच त्यांनी उभी केली.तिलाच त्यांनी ' अनुभव 
मंटप ' असे नाव दिले.
' अनुभव मंडप ' सारख्या संघटनेची स्थापना करून त्यांनी क्रौर्य व चौर्य विरोधी विचार प्रणाली रुजवली.त्यामुळे अनेक चोर, लुटारू आपला वाईट मार्ग सोडून शरण आले व अनुंभव मंडप मध्ये सामील झाले.दारू विकणारा म्हाऱय्या आपले वाईट कर्म सोडून वाटसरू यात्रिकांसाठी दूध, ताक,पाणी पुरवू लागला. कायक वे कैलास मुळे श्रम प्रतिष्ठेला महत्त्व प्राप्त झाले. भीक,भिक्षा अथवा विना कर्म फुकट खाणे बंद होऊन श्रम संस्कार रुजले गेले.अनुभव मंडपात जी वचने लिहिली गेली तीच पुढे भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वे व स्वातंत्र्य,समता व बंधुता अंगीकार करणारी जीवन मूल्ये ठरली गेली 
  सदाचारी आचरण करताना कोणाची चोरी,असंग, राग,तिरस्कार, हत्या, खुश मस्करी,परनिंदा नको . अशी वर्तणूक जपली तरच कुडल संगमेश्वर देव प्रसन्न होऊन कृपादृष्टी ठेवेल अशी समाज धारणा तयार झाली. 
म. बसवेश्वर जातीभेद निर्मूलन अनुभव देण्यासाठी  स्वतः हरळय्या शरण -  कल्याणीम्मा शरणींच्या घरी  ' दासोह ' ( कष्ट केल्यानंतर चे पोटाचे यज्ञकर्म अर्थात गरजेपुरते आवश्यक  जेवण )  करण्यासाठी गेले असता  ,अन्न दात्याना त्यांनी ' शरणू - शरणार्थी ' म्हणून दोन्ही हात जोडून नमस्कार केला.तेव्हा या दांपत्याने म.बसवेश्वर यांच्या नमस्कारा मधून उतराई होण्यासाठी पती पत्नीने चर्चा करून हरळय्या यांनी डाव्या व कल्याणीम्मा यांनी आपल्या उजव्या मांडीवर कातडे  कमावून व वळून वळून  त्यापासून सुंदर सुबक असे  डाव्या व उजव्या पायांचे  जोडे तयार केले . संपूर्ण जोडे तयार होई पर्यंत त्यांनी त्या जोड्याना जमिनीचा स्पर्श होवून दिला नाही . त्यात दोघांच्याही मांडीचे कातडे पार सोलवटून निघाले . व त्यांना खूप जीवघेण्या यातना सोसाव्या लागल्या पण गुरु प्रेमासाठी त्यांनी त्या  सो स ल्या. मग  जोडे तयार झाल्यावर त्यांनी  ते म.बसवेश्वर यांना भेट दिले.ते जोडे पाहिल्यानंतर  व त्या मागची कथा ऐकल्या नंतर  म.बसवेश्वर म्हणाले की,हे जोडे कोणत्या पशू पक्षांच्या कातडी पासून बनलेले नसून ते माझ्या शरण शरणीच्या कातडीचे बनलेले आहेत. हे मला माझ्या प्राणा हूनही प्रिय राहतील. असे म्हणून त्यांनी ते जोडे हातात घेवून नमस्कार केला व दोघांना साश्रू पूर्ण नयनांनी हृदयाशी कवटाळ ले. गुरुशिष्य यांचे एकमेका प्रती असलेले महान प्रेम यातून दिसून येते.
म.बसवेश्वर यांच्या या महान कार्यामुळे माझ्यापेक्षा कोणी लहान नाही आणि कुडल संगमेश्वर देवा पेक्षा कोणी महान नाही.ह संदेश सर्वत्र पसरला गेला.त्यामुळे शिवभक्त करलय्या ,शरणय्या,हरळ य्या ,व्यंकय्या, चेन्नय्या, शरण आदय्या, अबीर चांद य्या, घटी वाळ य्या ,माचीदेव माचय्या,बहुरूपी चौंड य्या,बुरुड केतय्या,विदर्भ ढोरकय्या,सोलापूरचे सिद्ध रामेश्वर, मडी याळ माचय्या ,काश्मीर चे महादेव ,अफगाणिस्तानचे मंगरूळ शंकरदेव,महाराष्ट्राचे ओरी लिंगदेव , अक्कमहादेवी   असे अनेक मानवतावादी शरण शरणी म.बसवेश्वर यांचे शिष्य बनले 
म.बसवेश्वर यांनी ' अनुभव मंडप ' ची स्थापना करून ते श्री अल्लंम प्रभू यांच्या अधिपत्याखाली चालविले.यात एकूण 700 शरण व 70 शरणी असे एकूण 770 साधक सामील झाले. व वेद शास्त्र व धर्म कार्यात स्त्री पुरुष समानता निर्माण झाली . यात निर्वस्त्र अशी व केवळ आपल्या केश संभाराचेच  वस्त्र  निर्माण करून तेच  परिधान करणारी, महान अशी शरणी अक्कंमा म्हणजे शुचिर्भूत दिगंबर साधनेचे मानाचे पान  ठरली.  अन्यायी राजा कौशिक याने  तिच्या स्त्री सुलभ  लज्जेला  अपमानित केल्यामुळे  तिने आपल्या साधनेच्या जोरावर फक्त श्री चेन्न मल्लिकार्जुन देवालाच आपले पती मानले . व सोलापूरचे सिद्ध रामेश्वर तिच्या सर्व देव व अध्यात्म कार्यात मदत करत असत म्हणून त्यांना आपला मुलगा मानले होते. म.बसवेश्वर आणि श्री अल्लम प्रभू यांच्या मुळे तिला 'अक्का ' म्हणजेच सर्वांची थोरली बहीण असा मान मिळाला .तिचे क्रांतिकारी वर्तन व प्रगत विचार यामुळे तिने अनुभव मंडपला वेगळ्या वैचारिक व तात्विक उंचीवर नेवून ठेवले.स्त्री म्हणजे ती नुसती स्त्री नसून ती मोह आहे .पण त्याची पेक्षा ती  ' माया '  आहे.माया म्हणजे हृदयाच्या अंतरहृदयातील अप्रतिम कलाकृती.तीच गुप्त मनाची सुप्त जाणीव जागृती असते.असे तिने आपल्या वाचनात निक्षूण  सांगितले आहे.तेव्हा अनुभव मंडप च्या कार्यात  ती स्वतः 70 शरणींचा आदर्श  ठरली. तिचे हे स्त्रीत्वा चे तत्वज्ञान त्या वेळच्या आणि आजच्या काळाच्या कितीतरी पुढे असे प्रगत आहे. एकापेक्षा एक सरस शरण शरणी अनुभव मंडप ने वेदशास्त्र व धर्म अभ्यासाला तयार केल्या.
अशा प्रकारे म.बसवेश्वर यांचे कार्य हे क्रांति प्रवन ठरले. ई.स.1167 ला नागपंचमी न च्या दिवशी म.बसवेश्वर नावाचा मानवतेचा पुजारी ,क्रांतिसूर्य शिवैक्य / लिंगैक्य झाला.
श्री अल्लं म प्रभू यांनी शरण चळवळ व अनुभव मंडप यांचे वर्णन करताना लिहिले आहे की,'  कल्याण पूर झाले पणती,त्यात तेल ही भक्ती,आचाराची वळली वाती,अनुभव वचन प्रकाश,बसव ज्योती दिव्य तेज, स्थळ भक्ती सदन, भारत देश परंपरा महान,या श्री घृष्णेश्वर लिंगाचे  मज अर्चन ,त्यात झाले मज  श्री बसव दर्शन ,श्री बसव दर्शन '.
अशा या म.बसवेश्वर यांच्या लिंगायत धर्म कार्यास  म. बसवेश्वर जयंती निमित्त सर्वांना वीरशैव लिंगायत समाज संघटनेच्या वतीने बसवमय हार्दिक शुभेच्छा..हार्दिक शुभेच्छा. शरणू शरणार्थी !
श्री बसवेश्वर महाराज की जय,ओम नमः शिवाय!

महात्मा बसवण्णा यांनी 'कायकवे कैलास' हा जगण्याचा मुलमंत्र दिला : प्रा. डॉ. भीमराव पाटीलवीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ


महात्मा बसवण्णा यांनी 'कायकवे कैलास' हा जगण्याचा मुलमंत्र दिला : प्रा. डॉ. भीमराव पाटील
वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचा शुभारंभ
सोलापूर दि 29  : प्रतिनिधी राजशेखर बुरुकुले 
महात्मा बसवण्णा यांनी माणसाचा दर्जा जातीवरून नाही तर त्याच्या आचारावरून, विचारावरून आणि कामावरून ठरविला. त्यांच्या अनुभव मंटपात सर्व जातीधर्मातील शरणांना सारखेच दिले. त्याची सुरुवात सोलापुरातील मंगळवेढा येथून केली. व्यक्तीला जगण्यासाठी आर्थिक प्राप्तीची गरज असते. त्यासाठी व्यक्तीने आळस झटकून सतत काम केले पाहिजे. याद्वारे त्यांनी 'कायकवे कैलास' हा जगण्याचा मुलमंत्र दिला असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर यांचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. भीमराव पाटील (लातूर) यांनी केले.
            वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचे शुभारंभाचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कावळे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. निलेश ठोकडे, मेतन फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यकटेश मेतन, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
           यावेळी आ. देशमुख म्हणाले की महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाजसुधारणेचा पाया घातला. त्यानंतर अनेक समाजसुधारकांनी त्यांचा वारसा चालवत महाराष्ट्राची जडणघडण केली. त्यामुळे महात्मा बसवेश्वर हे सामाजिक क्रांतीचे जनक आहेत.
             प्रारंभी चिदानंद मुस्तारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी तर आभार विजयकुमार बिराजदार यांनी मानले.
          यावेळी उपस्थितांपैकी लकी ड्रॉ मधील पाच भाग्यवान विजेत्यास वीरशैव व्हिजनचे सचिव नागेश बडदाळ यांच्यावतीने पाच भेटवस्तू देण्यात आल्या.
          यावेळी बसव केंद्राच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी, रोटरी क्लबचे डॉ. सिद्धेश्वर वाले, सावाचे अध्यक्ष महेश अंदेली, केमिस्ट असोसिएशनचे राजशेखर बारोळे, सिद्रामप्पा हुलसुरे आदी उपस्थित होते.
           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, संजय साखरे, आनंद दुलंगे, शिवानंद सावळगी, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, राजेश नीला, गणेश घाळे, शिव कलशेट्टी, अविनाश हत्तरकी, सचिन विभुते, बसवराज जमखंडी, सोमनाथ चौधरी, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर हत्तरकी, मलकप्पा बणजगोळे, अमित कलशेट्टी, चेतन लिगाडे यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेप्रसंगी प्रा. डॉ. भीमराव पाटील (लातूर), आ. विजयकुमार देशमुख, ऍड. निलेश ठोकडे, मल्लिकार्जुन कावळे, डॉ. व्यकटेश मेतन, सिद्धाराम उमदी, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे

Friday, April 29, 2022

स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत लिंगायत राणी ' चेन्नमा ' यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा सत्कार .


स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत  लिंगायत राणी ' चेन्नमा ' यांची भूमिका साकारणाऱ्या  अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा सत्कार .
नाशिक दि 29 :- प्रा अजय शेटे
 मराठी टिव्ही वरील ' शेवंता ' फेम व  सुप्रसिद्ध मराठी मालिका  'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत  लिंगायत राणी ' चेन्नमा ' यांचीभूमिका साकारणाऱ्या   हरहुन्नरी सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिची लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव इंटर नॅशनल असोसिएशन चे युवा अध्यक्ष मा.प्रदिप साखरे यांनी नुकतीच एक प्रकट मुलाखत घेतली.
यामध्ये त्यांनी तिला लिंगायत राणी चेन्नमा यांची भूमिका करतानाचा तुझा अनुभव काय ? या प्रश्नावर तिने अतिशय दिलखुलास उत्तर दिले आणि सांगितले की, माझी मराठी रसिकांच्या मनातील इमेज हि ' शेवंता ' ची होती.तिच्या बोलण्याची एक खास लकब मला अभिनय करताना वापरावी लागली होती .परंतु हि भूमिका ही खूप वेगळी होती. अगदी सुरुवातीला जेव्हा मला राणी चेन्नमा यांच्या भूमिके बद्दल विचारले गेले तेव्हा माझ्या मनावर एकदम दडपण येवून,माझी मनस्थिती द्विधा झाली.आणि मला ही अवघड ऐत्याहासिक भूमिका जमणार नाही असे वाटले.परंतु माझी आई जिद्दीला पेटली आणि तिने मला आग्रह करून आत्मविश्वास दिला की,तू ही भूमिका नक्की चांगली करू शकशील आणि मला तुला ही च भूमिका करताना पहायचे च आहे.अशा प्रकारच्या तिचा आग्रहामुळे मी त्या भूमिकेला होकार दिला व राणी चेन्नमा ची अतिशय आव्हानात्मक भूमिका मी साकारली.याचे सर्व श्रेय मी माझ्या आईला देते.

तिने साकारलेल्या या भूमिकेबद्दल लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे ,लिंगायत संघर्ष समिती युवा अध्यक्ष प्रदीप साखरे,सौ.सुहासिनी ताई कोयटे ,सौ स्वाती कोयटे,सौ.कल्याणी हुरणे,संतोष साखरे,गिरीश सोनेकर,अमोल राजूरकर यांनी त्यांचा लिंगायत विरांगणा राणी चेन्नमा यांची प्रतिमा भेट देवून सर्व लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने तिचा खास सन्मान केला

Wednesday, April 27, 2022

महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संघटना तर्फे पुणे येथे म.बसवेश्वर जयंती चे आयोजन


महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संघटना तर्फे पुणे येथे म.बसवेश्वर जयंती चे आयोजन 
सातारा, दि.27 - प्रणाली वाकडे  प्रतिनिधी 
महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संघटना,पुणे .तसेच लिंगायत संघर्ष समिती ,महाराष्ट्र यांचे तर्फे श्री श्री श्री 1008 जगद्गुरु एकोरामाराध्य व जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती  मंगळवार दि.3 मे 2022 रोजी पुणे शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
पुणे महानगर पालीकेच्या वतीने म.बसवेश्वर पुतळ्याचे पूजन मंगळवार, दि.3 मे रोजी सकाळी 9 वा.महाराणा प्रताप उद्यान,बाजीराव रोड,टेलिफोन भवन समोर , म.बसवेश्वर चौक,पुणे येथे करण्यात येणार आहे.
तसेच संध्या.6.30 वा.प्रमुख पाहुणे  मा.खासदार गिरीश बापट साहेब, मा. आ.उल्हास दादा पवार, मा. आ.अनंतराव गाडगीळ, मा आ.मोहन जोशी, मा.रमेश बागवे, मा.अभय छाजेड, मा.संजय बालगुडे, मा.अनिल गाडवे, मा.काकासाहेब कोयटे यांचे उपस्थितीत डॉ.महादेव शिवलिंग सगरे यांना ' वीरशैव भूषण ' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच या प्रसंगी मा.प्रा सतीश कुमदाळे यांचे 
' म.बसवेश्वर' यांच्यावर व्याख्यान होणार आहे.तसेच ' लोकायत' सांस्कृतिक आघाडी यांचा कार्यक्रम होणार आहे.असे मा. सुनिल शेठ रुकारी व नरेंद्र मार्तंड व्यवहारे यांनी निमंत्रण पत्रिके द्वारे जाहीर केले आहे  
या कार्यक्रमाला वीरशैव माहेश्वर मंडळ व दि विश्वेश्वर सहकारी बँक,पुणे यांचे संपूर्ण सहकार्य राहणार आहे.
या कार्यक्रमात कै.भिकुबाई मेन कुदळे पंचम लिंगायत ट्रस्ट,वीरशैव माहेश्र्वर मंडळ,वीरशैव तिराळी समाज,वीरशैव महिला भजनी मंडळ,वधू वर सूचक मंडळ,वीरशैव पद्मशाली लिंगायत कोष्टी समाज, अर्थसिद्धी नागरी सहकारी पतसंस्था,लिंगायत सेवा मंडळ,अष्टविनायक सोशल ग्रुप,श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट,वीरशैव गवळी समाज,प्रेरणा वीरशैव महिला भजनी मंडळ,वीरशैव बुरुड समाज,कर्नाटक संघ,वीरशैव ज्येष्ठ नागरिक संघ,पुणे.
वीरशैव तरुण सेवा मंडळ,येरवडा.वीरशैव सेवा मंडळ,वडगाव शेरी.वीरशैव लिंगायत सेवा मंडळ,वडगाव धायरी.वीरशैव सांस्कृतिक सेवा मंडळ,पिंपरी चिंचवड.वीरशैव धारेश्वर सेवा संघ,वडगाव धायरी.सिद्धेश्वर सेवा संस्था, धनकवडी.वीरशैव सेवा मंडळ,हडपसर.वीरशैव मंडळ,मुंढवा.बसवेश्वर सेवा संस्था,धनकवडी.श्री संत शिवगंगा देवी विद्यालय,अरण्येश्वर मित्रमंडळ,गवळीवाडी,सह.नगर ,पुणे.वीरशैव को. ऑ.बँक  लि.कोल्हापूर.अशा सर्व संस्था सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाला वीरशैव मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर ,लिंगायत संघर्ष समिती,पुणे यांचे खास सौजन्य लाभले आहे.
तरी आपल्या वीरशैव लिंगायत समाजातील सर्व बंधू भगिनी यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.असे आवाहन समाज संघटने तर्फे करण्यात आले आहे 

Tuesday, April 26, 2022

लिंगायत फाउंडेशन,नाशिक 2022 ची नवीन कार्यकारिणी , निवड आनि म.बसवेश्वर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 लिंगायत फाउंडेशन,नाशिक 2022 ची नवीन कार्यकारिणी  निवड व म.बसवेश्वर जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन 
सातारा दि 26 प्रा.अजय शेटे प्रतिनिधी
लिंगायत फाउंडेशन,नाशिक तर्फे सालाबाद प्रमाणे या वर्षीही म.बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येणार असून त्यासाठी सन 2022 ची नवीन कार्यकारिणी निवड करण्यात आली आहे.पुरुष कार्यकारिणीत अध्यक्ष श्री . संदिप रंगनाथ अप्पा लिंगायत ,उपाध्यक्ष श्री.स्वप्नील
 उत्तम बिडवई व श्री.अमित रमेश दिवटे,कार्याध्यक्ष श्री.नवनीत वसंत अप्पा गडकरी ,सेक्रेटरी सचिन जालनेकर, सहसेक्रेटरी कैलास राजमाने,खजिनदार ओंकार नगरकर,सहखजिनदार निलेश हिंगमिरे,संघटक आदित्य दंदने, मिडिया प्रमुख यश 
राजमाने यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच महिला कार्यकारिणीत अध्यक्षा सौ.सोनाली अतुल दिवटे, उपाध्यक्षा सौ.पल्लवी वैभव वाळेकर व सौ.तृप्ती अभिर आवटे,कार्याध्यक्षा सौ.सारिका कैलास राजमाने ,सेक्रेटरी सौ.अमृता महमाने,सहसेक्रेटरी सौ.नेहा खोडदे,खजिनदार सौ.अश्विनी नगरकर,सह खजिनदार सौ. प्रियंका गडकरी ,संघटक सौ.सुप्रिया लिंगायत व सौ. संगिता हिंगमिरे ,सहसंघटक सौ.सारिका रेंघे यांची निवड करण्यात आली आहे 
तसेच यावर्षीच्या म.बसवेश्वर जयंती निमित्त अनेक कार्यक्रमांची रूपरेषा आखण्यात आली आहे.ती पुढील प्रमाणे आहे.
रविवार दि.1.5.2022 रोजी जैन भवन,नाशिक रोड येथे स.10 वा.चित्रकला स्पर्धा होतील.त्यासाठी ओमकार निळकंठ , मोबा. नं.8208966157 यांचेशी संपर्क साधावा
 
रांगोळी स्पर्धा स.11 वा.सुरू होतील .यासाठी प्रविण झळके, मोबा. नं.8888894755 यांचेशी संपर्क साधावा.
तसेच सांस्कृतिक कार्यक्रमात दि.1 रोजी दुपारी 3 वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा , दिप नगरकर, मोबा.नं.9359599275.
नाच ,गाणे , वाद्य स्पर्धा दु.3 वा. दिपक पेठकर, मोबा. नं.8329806625, स्वप्निल कानडे, मोबा. नं.9850949877,हेमंत लिंगायत, मोबा. नं.9923434836 यांचे मार्गदर्शनाखाली होतील.
वरील या स्पर्धेसाठी दि.29.04.2022 पर्यंत नाव नोंदणी करावी.
रविवार दि.1रोजी दु.3 वा.वैद्यकीय आरोग्य तपासणी शिबिर होईल.त्यासाठी गोरख गडकरी, मोबा. नं.8956810100 यांचेशी संपर्क साधावा.
मंगळवार , दि.3.5.2022 रोजी स.10 वा.सिद्धेश्वर मंगल कार्यालय ,नाशिक रोड येथे तरुण वीरशैव समाज यांचे उपस्थितीत 
क्रांतीसूर्य जगदज्योती म.बसवेश्वर यांची प्रतिमा पूजन कार्यक्रम होईल.
सायं.5 वा.म.बसवेश्वर प्रतिमेची मिरवणूक यात्रा चिफ स्टोन बंगला येथून सुरू होऊन -बिटको चौक - नाशिक रोड मार्गे - अनुराधा मार्गे जैन भवन येथे समाप्त होईल.

सर्व कार्यक्रमांचा बक्षिस समारंभ,सांगता समारोह व अन्नदान महाप्रसाद ,जैन भवन ,नाशिक रोड येथे होईल.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजक म.बसवेश्वर जयंती उत्सव समिती व लिंगायत फाउंडेशन ,नाशिकरोड,नाशिक हे असून,सर्व लिंगायत समाज बांधवांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा व प्रसन्न अंत करणाने लिंगायत समाजाची एकत्र संख्या व एक रुपी ताकद  दाखवावी.असे आवाहन उत्सव समिती तर्फे सर्वांना करण्यात आले आहे.

शिवयोगिनी अक्कमहादेवी जयंती दिनी सातारा येथे ज्येष्ठ माता भगिनींचा सत्कार

 शिवयोगिनी अक्कमहादेवी जयंती दिनी सातारा येथे ज्येष्ठ माता भगिनींचा सत्कार 
सातारा , दि. 26 - प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
 लिंगायत शिव योगीनी श्री अक्कमहादेवी यांच्या जन्मदिनी सातारा येथील प.पू.औंधकर महाराज मठात सातारा वीरशैव लिंगायत समाज, म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ व वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ यांच्या वतीने समाजातील 75 वर्षांवरील 16 ज्येष्ठ माता भगिनींचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात शरणी नंदाताई चिंचकर,सावित्रीबाई कळसकर,
मालतीताई टोपे,शारदा देवर्षी, महादेवी तोडकर,विमलताई तोडकर,पुष्पाताई होनराव,शशिकला गुर साळे,शकुंतला बाई साखरे, शशिताई वांकर, कमलकाकू बारवडे,गोदावरीताई वाघोली कर,पद्माताई कवाडे, स्वप्नजा भांदुर्गे आदींचा शाल,श्रीफळ देवून गौरव करण्यात आला.
     या सत्कार सोहळ्यात 'श्री अक्कम हा देवी यांचे जीवन चरित्र ' या विषयावर निर्मला ताई बारवडे,महादेवी तोडकर,शशिकलाताई वांकर यांनी प्रवचन केले,
म.बसवेश्वर सामाजिक  सेवा मंडळाचे अध्यक्ष सागर कस्तुरे यांनी या उपक्रमाचे खूप कौतुक केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास कामळे,ज्येष्ठ मार्गदर्शक भारत शेठ बारवडे,महादेव मेंडीगिरी देसाई, सिद्धराज शेटे, नंदुशेठ गुरसाळे यांनी प्रयत्न केले.

भारतातील लिंगायत समाज व पुढील दिशा ' या विषयावर सविस्तर मा. आमदार विनय जी कोरे यांचे बरोबर बैठक संपन्न



 भारतातील लिंगायत समाज व पुढील दिशा ' या विषयावर  सविस्तर  मा. आमदार विनय जी कोरे यांचे बरोबर  बैठक संपन्न
 
सातारा, दि.26 - प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
सोमवार दि.25 रोजी वारणा नगर ( कोल्हापूर ) येथे आदरणीय शरण आमदार व माजी मंत्री विनय जी कोरे साहेब ( सावकार ) यांचे बरोबर ' भारतातील लिंगायत समाज व पुढील दिशा ' या विषयावर जवळजवळ एक तास सविस्तर चर्चा झाली.
या चर्चेत लिंगायत धर्म अल्पसंख्यांक दर्जा, म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ,उद्योग विश्वाला चालना देण्यासाठीच्या कर्ज योजना,गाव तिथे स्मशान भूमीची जागा ,अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याच वेळी कोल्हापूर येथील समन्वयक शरण राजशेखर तंबाके यांचेशी संपर्क साधून लवकरच एक मोठी बैठक आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.यामध्ये समाजातील सर्व  जगद्गुरु ,  आजी माजी  आधिकारी ,राजकीय पदाधिकारी,सर्व संघटना व समाज बांधव यांना एकत्रित बोलावून  वरील ध्येय धोरणे या विषयी एक समान अजेंडा तयार करून भावी वाटचाल निश्चित करण्यासाठी अंतिम चर्चा करण्यात येणार आहे.
तरी सर्व लिंगायत बांधवांनी आप आपल्या गाव, तालुका व जिल्हा स्तरावर याद्या तयार करून ठेवाव्यात. म.बसवेश्वर जयंती नंतर आम्ही पदाधिकारी नेते आपणा कडे येवून मार्गदर्शन करू व  याद्या गोळा करून सर्व माहिती घेवू असे लिंगायत नेते श्री.प्रदिपबापू वाले, कवठे महांकाळ.यांनी जाहीर केले आहे. तसेच अधिक माहिती साठी त्यांच्या मोबाईल क्रमांक 9423037482 यावर संपर्क साधावा.असेही त्यांनी आवर्जून  सांगितले आहे.

Monday, April 25, 2022

वीरशैव व्हिजनतर्फे बसव व्याख्यानमालेचे आयोजनप्रा. डॉ. भीमराव पाटील, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व प्रा. विजय पोहनेरकर यांची उपस्थिती


वीरशैव व्हिजनतर्फे बसव व्याख्यानमालेचे आयोजन
प्रा. डॉ. भीमराव पाटील, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व प्रा. विजय पोहनेरकर यांची उपस्थिती 
सोलापूर  दि 25 :  प्रा अजय शेटे 
जगदज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त वीरशैव व्हिजनच्या वतीने बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
             सोलापुरात बसव व्याख्यानमालेची सुरुवात करणाऱ्या वीरशैव व्हिजनच्या तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे यंदाचे आठवे वर्ष असून यावर्षीचे पहिले पुष्प शुक्रवार दि. 29 एप्रिल रोजी प्रा. डॉ.भीमराव पाटील (लातूर) हे 'महात्मा बसवेश्वरांची सप्तक्रांती' या विषयावर गुंफणार आहेत. पहिल्या पुष्पाचे उद्घाटन आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, आयकर विभागाचे उपायुक्त प्रसाद मेनकुदळे, श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोळे, बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. नीलेश ठोकडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
             दुसरे पुष्प शनिवार दि. 30 एप्रिल रोजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे (सातारा) हे 'आनंदी जगण्यासाठी' या विषयावर गुंफणार आहेत. दुसऱ्या पुष्पाचे उदघाटन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली व पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व वीरशैव महासभेचे राष्ट्रीय युवक उपाध्यक्ष सुदिप चाकोते  यांच्या उपस्थितीत होणार आहे.
             तिसरे पुष्प रविवार दि. 1 मे रोजी प्रा. विजय पोहनेरकर (औरंगाबाद) हे 'हासू आणि आसू' या विषयावर गुंफणार आहेत. समारोपाच्या पुष्पाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या हस्ते, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ. महादेवी दामा व मैंदर्गी नगरपालिकेच्या नगरसेविका सुरेखा होळीकट्टी यांच्या उपस्थितीत होणार आहे.
            वरील व्याख्यानमाला डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह येथे सांयकाळी ६ वाजता होणार आहेत. याचा लाभ घ्यावा असे आवाहन उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे यांनी केले आहे.
             पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ, आनंद दुलंगे, विजयकुमार बिराजदार, सोमेश्वर याबाजी, राजेश नीला, विजयकुमार हेले, सचिन विभुते, सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते.

Sunday, April 24, 2022

महाराष्ट्र राज्यातील विविध लिंगायत संघटनांची ऐक्याची घोषणा


 महाराष्ट्र राज्यातील विविध लिंगायत संघटनांची ऐक्याची घोषणा 
सातारा, दि.25 - प्रसाद वाकडे लिंगायत TV live प्रतिनिधी
 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख संघटना एकत्र करून एकाच ' सकल लिंगायत महा समिती ' ची स्थापना करण्यात आल्याची घोषणा सर्व समाज संघटना कडून करण्यात आली आहे.समाजाच्या काही प्रमुख मागण्या आणि प्रश्नांसाठी ही समिती कार्य करेल ,असा उद्देश यात ठेवण्यात आला आहे.

       या बैठकीच्या माध्यमातून राज्यस्तरीय समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.यामध्ये राज्यातील सर्व लिंगायत समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण तात्काळ मिळावे. श्रीक्षेत्र मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक निर्माण कार्यासाठी 500 कोटी रुपयांची निधी तरतूद व्हावी.महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना त्वरित करून त्यासाठी तात्काळ 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.श्रीक्षेत्र कपिलधार च्या विकासासाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा.लिंगायत विद्यार्थ्यांसाठी नवीन वसती गृहांची स्थापना करण्यात यावी.गाव तिथे त्वरित स्मशान भूमी साठी जागा उपलब्ध होऊन तिच्या सुशोभिकरणासाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा.अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात येवून ,ठराव करण्यात आले व ते प्रचंड टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर करण्यात आले.तसेच या सर्व विषयांचा समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला .

लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक  मा.काकासाहेब कोयटे यांच्या विशेष प्रयत्नाने पुणे येथे ही महाराष्ट्रातील प्रमुख लिंगायत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवार दि.21 रोजी आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील रुकारी, कार्याध्यक्षा सरला ताई पाटील,लिंगायत महा समितीचे अध्यक्ष सुदर्शन बिरादार,लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष विजयकुमार शेटे,महाराष्ट्र बसव परिषदेचे अध्यक्ष शिवानंद हैबतपुरे, राष्ट्रसंत मिशन चे अध्यक्ष रामदास पाटील,महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले,काँग्रेस चे प्रवक्ते नरेंद्र व्यवहारे,भाजपाच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव,मनसेचे संतोष जिरेसाल,शिवसेनेचे ज्ञानेश्र्वर खर्डे,राष्ट्रवादीचे संजय चितारी,आम आदमी पक्षाचे नरेंद्र देसाई,सौ.सुहासिनी ताई कोयटे ,उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे,भगवान कोठावळे,मराठवाडा प्रमुख उदय चौंडे,संघटक गुरुनाथ बडूरे,युवा अध्यक्ष प्रदिप साखरे,शिवलिंग ढवळेश्वर,अनिल चौगुले,चंद्रशेखर दणदणे, निशा ताई बिडवे,भगवान कोठावळे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृत राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली.
या समितीच्या प्रमुख पदी सर्वश्री  श्री.ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे ,कोपरगाव हे असून ,सुनील रूकारी,पुणे.सरला ताई पाटील ,कोल्हापूर.प्रा.सुदर्शन बिरादार,लातूर.विजयकुमार शेटे,लातूर.बसवराज कणजे,चिंचवड.शिवानंद हैबतपुरे,लातूर.रामदास पाटील, नांदेड. डॉ.बसवराज बगले,सोलापूर.प्रेरणा ताई होनराव ,लातूर.अनिल चौगुले, नाशिक.आदींचा समावेश करण्यात आला आहे.
पुढील किमान समान कार्यक्रमाचे धोरण ठरवून प्रत्येक जिल्ह्यात व शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी करण्याचे काम या राज्यस्तरीय समन्वय समिती कडून करण्यात येणार आहे.
या बैठकीला केशवराव नगरे,जयश्री तोडकर,उज्वला बसवे,संतोष लिभारे,अर्चना खडके,शिवा खांड कुळे,दत्तात्रय वायचळ,शिवानंद कथले,सतीश निळकंठ,राजेश कोठाळे,अरुण आवटे,सुधीर भुसारे, गिरीश सोनेकर,अनिल रुद्रुके,लक्ष्मी घोडके,श्रीकांत तोडकर,नंदकुमार गवंडर,निंगप्पा तळे,तुषार स्वामी,प्रा गिरजप्पा मुचाटे,बसवराज हिरेमठ यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Saturday, April 23, 2022

लिंगायत बांधवांनो जागे व्हा..रात्रच नव्हे ..दिवस पण वैऱ्याचे आहेत


लिंगायत बांधवांनो जागे व्हा..रात्रच नव्हे ..दिवस पण वैऱ्याचे आहेत


सातारा दि 23 :- रवी वाकडे
लिंगायत बांधवांनो जागे व्हा..रात्रच नव्हे ..दिवस पण वैऱ्याचे आहेत 
महात्मा बसवेश्वर जयंती मंगळवार दि.3 मे रोजी आहे.म्हणजे फक्त 10  च दिवस राहिले आहेत .पण अनेक गावामधील लिंगायत समाज या जयंती साठी उत्सुक नाही असे वाटते आहे.ठराविक जण च प्रयत्न करताना दिसत आहेत.   म.बसवेश्वर जयंती च्या दरम्यान 'रमजान ',सण येतो आहे.त्याच दिवशी श्री परशुराम जयंती पण आहे.तर आपण रमजान सणाचं नियोजन करूयात निदान त्यामुळे तर आपला समाज येईल  फक्त नावाला लिंगायत समाज  आहे,अजूनही आपल्या समाजात कसलीही एकी नाही त्यामुळे सर्व राजकीय लोक हे आपल्या समाजाचाच वापर हा फक्त सरकारी  'निरोध ' सारखा करून घेत आहेत आणि आपला समाज वापर करून देत आहेत हे दुर्दैव  आहे आणि अतिशय खेद जनक पण आहे . किव येते आपल्या समाजाची आणि खूप वाईट ही वाटते की, जगाला ज्ञान शिकविण्याऱ्या महात्मा बसवेश्वर महाराज यांची त्यांचा समाजच अवहेलना करत आहे.आपल्या भागात मुस्लीम समाज न चुकता दर शुक्रवारी जास्त वेळ व रोज थोडा तरी वेळ एकत्र सामुदायिक प्रार्थनेला एकत्र जमतात.ख्रिश्चन समाजाचे प्रस्थ ही वाढीस लागले आहे.रोज व आठवड्यातून एकदा  खास सामुदायिक प्रार्थना करणे. व त्या अनुषंगाने धर्म,जात व समाज विकासाची चर्चा करून त्याप्रमाणे कार्यवाही करणे. हि त्यांची बलस्थाने ठरत चालली आहेत.त्याचा त्यांना फायदा होत आहे.
श्री परशुराम जयंती चे ही प्रस्थ आपणाकडे वाढत चालले आहे.त्यांचे लोक खेडोपाडी जाऊन समाज संघटन करत फिरत आहे.मुख्य गावात श्री परशुराम जयंती साठी सर्वजण एकत्र जमत आहेत.
तेव्हा आपला समाज काय करत आहे? हा प्रश्न आपणासमोर पडला आहे. आठवड्यातून एकदा सर्वांनी  वीरशैव लिंगायत धर्माचा एखादा कार्यक्रम करण्यासाठी एकत्र जमून आपले सामुदायिक देव व अध्यात्म कार्य करण्यास सुरुवात करावी लागेल.रोजची कामे तर सर्वानाच आहेत.परंतु ' Busy man also gets time,lazy can't be' या इंग्रजी म्हणी प्रमाणे आपल्याला दिवसभराची चार कामे करून ,वर पाचवे आपल्या समाजाचे कार्य करावेच लागेल.आपल्या दैनंदिन उत्पन्नाच्या कमीत कमी अडीच व जास्तीत जास्त दहा टक्के रक्कम समाजासाठी खर्च करावीच लागेल.मी एकटा नाही गेलो तर कार्यक्रम थांबणार नाही.म्हणून कार्यक्रमाला जाणे टाळण्या पेक्षा मी गेल्या शिवाय कार्यक्रमा ला शोभा नाही.असे मानून समाजाच्या सर्व कार्यक्रमात सामील झालेच पाहिजे.
आपल्या समाजातील लोक इतर संघटनांची पदे,सत्संग,बैठका,वर्ग सांभाळत आहेत.त्यांचे देव..महाराज पूजत आहेत..त्यांची भाषा,शब्द बोलत आहेत. त्यांच्यासाठी वर्गणी,देणगी गों ळा करत आहेत.पण आपल्या समाजाचे  हेच सर्व आपले म्हणून काम करणारे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत.
तेव्हा आता वेळीच सावध होऊन येणारी म.बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा. व वरील संकल्प सुरू करून पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत .यासाठी आपले सर्व मठाधिपती स्वामी महाराज यांचे आलटून..पालटून कार्यक्रम घेवून मार्गदर्शन घ्यावे. तसेच श्री कोळेकर महाराज,श्री धारेश्र्वर कर महाराज,श्री वाईकर महाराज यांनी आपल्या अधिकारात समाज जागृती साठी वैयक्तिक अधिक प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच भावी काळात आपले देव,मठाधिपती महाराज,संस्थान गाद्या ,सन उत्सव,समारंभ टिकून राहतील.तेव्हा अखंड सावधान व्हा.. .जय बसवा..

Friday, April 22, 2022

लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर आधारित ' महात्मा बसवेश्वर ' या नाटकाचा प्रयोग शुक्रवार दि.13 मे रोजी सांगली येथे


लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर आधारित ' महात्मा बसवेश्वर ' या नाटकाचा प्रयोग शुक्रवार दि.13 मे रोजी सांगली येथे
सातारा, दि.23 -प्रा.अजय शेटे, प्रतिनिधी
 वीरशैव लिंगायत समाज संघटना,सांगली च्या वतीने लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर आधारित ' महात्मा बसवेश्वर ' या नाटकाचा प्रयोग शुक्रवार दि.13.05.2022 रोजी भावे नाट्यगृह ,सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे.

    या नाटकात महात्मा बसवेश्वर यांच्या  प्रमुख भूमिकेत अभिनेते शरण राजेंद्र आलम खाने हे दिसणार आहेत.तसेच इतर चाळीस कलाकारांना घेवून हे नाटक सादर होणार आहे.
सदर नाटक समस्त लिंगायत समाज,सांगली.यांचे वतीने आयोजित करण्यात आले असून समाजातील सर्वांनी हे नाटक सहकुटुंब सहपरिवार पहावे. व आपल्या रोजच्या जीवनात म.बसवेश्र्वरांच्या जीवन कार्याचा अंगीकार करून घेवून दैनंदिन जीवनात त्याचा  फायदा करून घ्यावा.असे आवाहन समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

तसेच ज्यांना कोणाला नाटक नियोजन समिती मध्ये निस्वार्थ काम करायचे आहे तसेच नाटकाची वेळ व इतर काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहेत , त्यांनी  शरण आप्पासाहेब शेगावे ,भ्रमणध्वनी क्र.9975185511,यांचेशी संपर्क साधावा.अशी विनंती संघटने तर्फे करण्यात आली आहे.

श्री वाघेश्र्वरी व श्री नवलाई देवी यांची यात्रा शांततेत पार पाडण्यात येणार , यात्रेची नियोजन बैठक संपन्न



श्री वाघेश्र्वरी व श्री नवलाई देवी यांची यात्रा शांततेत पार पाडण्यात येणार , यात्रेची नियोजन बैठक संपन्न 
सातारा , दि.20 -प्रा.अजय शेटे
 विसापूर, ता.खटाव, जि.सातारा.येथील आराध्य ग्रामदेवता श्री वाघेश्र्वरी व श्री नवलाई देवी यांच्या वार्षिक यात्रे ची नियोजन बैठक नुकतीच बुधवार, दि.20 .04.2022 रोजी सकाळी 9 वा.सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत  श्री देवी मंदिरात पार पडली.
यात्रे चा सर्वसाधारण कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे. 
शुक्रवार दि.29.04.2022 रोजी रात्री 9 वा. किर्तन.
शनिवार दि.30.04.2022 रोजी सकाळी श्री देवीचा विधिवत अभिषेक.

दुपारी बैलगाड्यां ची भव्य शर्यत होईल.या शर्यतीचे पहिले बक्षीस रु.21 हजार ,दुसरे 15 हजार,तिसरे 10 हजार,चौथे सात हजार व पाचवे 5 हजार रुपये आहे.स्पर्धेतील विजेत्यांना  जिल्हा नियोजन समिती सदस्य, पैलवान सागर भाऊ साळुंखे यांचेकडून  खास चांदीच्या ढाली देण्यात येणार आहेत. स्पर्धेला प्रवेश फी रू. 501/- आहे.स्पर्धा मैदान सकाळी 10 वा.सुरू होईल, कोणतीही गावगाडी डायरेक्ट फायनल ला पळवली जाणार नाही,पंचांचा निर्णय अंतिम राहील, समान उतरलेल्या गाड्या डबल सोडण्यात येतील, प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारी वर मैदान पहावे.सर्व स्पर्धा काटेकोर नियम व अटी पाळून होतील .संध्याकाळी देवीचा गोंधळ झाले नंतर छबिना ,श्री देवीच्या मूर्तीची ग्राम फेरी.
रविवार , दि.1.5.2022 रोजी जंगी कुस्ती स्पर्धेचा आखाडा होईल.

रात्री 9 वा. ऑर्केस्ट्रा तसेच माया उंब्रजकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल.
अशा प्रकारे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री देवीच्या यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे ज्येष्ठ  यात्रा मार्गदर्शक श्री.दिलीप ढोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले

सुलोचना येवले शिवैक्य



सुलोचना येवले शिवैक्य
वडूज, दि.23 - प्रा.अजय शेटे प्रतिनिधी
वडूज शिक्षण विकास मंडळाचे माजी उपाध्यक्ष कै.मधुकर जगन्नाथ येवले यांच्या पत्नी  व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.संजय मधुकर येवले यांच्या मातोश्री कै.सुलोचना मधुकर येवले यांचे आज शनिवार , दि.23.04.2022 रोजी सकाळी 7 वा.अल्पशा आजाराने निधन झाले.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.
त्या ' बाई ' या नावाने परिचित होत्या.शिव गर्जना भजनी मंडळ,महिला भजनी मंडळ यांच्या त्या सदस्या होता. तसेच त्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू होत्या.सर्वांशी गोड व प्रेमाने बोलून त्यांनी आपल्या संबंधातील सर्व व्यक्तींना मानसिक व भावनिक आधार देण्याचे काम केले होते.त्यांच्या निधनाने एक चांगली मार्गदर्शिका हरपल्याची भावना सर्वांना जाणवत आहे.
  वीरशैव लिंगायत समाज संघटना,  ,लिंगायत टिव्ही लाइव्ह , शिक्षण विकास मंडळ उच्च न्यायालय नियुक्त समिती, वडूज शिक्षण विकास मंडळ, मा.मुख्याध्यापिका,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शाळा व्यवस्थापन समिती, हु. प.विद्यालय व ज्युनियर कॉलेज शिक्षक शिक्षिका, म.फुले प्राथमिक शिक्षण केंद्र,प्रेरणा पूर्व प्राथमिक शाळा शिक्षक,शिक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारी असे सर्वजण मिळून येवले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.शाळा संकुला तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

सौ.निशा ताई बिडवे यांची लिंगायत संघर्ष समिती च्या प्रदेश समन्वयक पदी निवड



सौ.निशा ताई बिडवे  यांची लिंगायत संघर्ष समिती च्या प्रदेश समन्वयक पदी निवड 
सातारा , दि.23 -  प्रणाली वाकडे प्रतिनिधी

लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश समन्वयक पदी ,लिंगायत समाजाचे सक्षम नेतृत्व असलेल्या सौ.निशा ताई बिडवे यांची निवड झाली आहे.
त्या ' ग्रज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्र ' च्या अध्यक्षा पण आहेत त्यांच्या या निवडी बद्दल वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांचे वतीने त्यांचे  हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल लिंगायत समाजाची जवळजवळ एक कोटी लोकसंख्या आहे. या संघटनेच्या माध्यमातून सर्व समाज संघटना एकत्र येवू न आपल्या मागण्यांचा  एकत्रित पणे पाठपुरावा करणार आहेत.अशी माहिती लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे यांनी दिली.
    पुणे येथील सुहाग मंगल कार्यालयात झालेल्या समाज संघटनेच्या एकत्रित बैठकीस लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल नामदेवराव रुकारी,लिंगायत संघर्ष समितीच्या   कार्याध्यक्षा सौ.सरलाताई पाटील,लिंगायत महासमितीचे अध्यक्ष प्रा.सुदर्शन बिराजदार,लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष श्री.विजय कुमार शेटे,महाराष्ट्र बस व परिषदेचे अध्यक्ष श्री.शिवानंद हैबतपुरे,राष्ट्रसंत मिशन चे अध्यक्ष श्री.रामदास जी पाटील,जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष श्री.बसवराज कनजे ,बसवेश्वर स्मारक समितीचे प्रमुख श्री.बसवराज बगलें,शिवलिंग ढवळेश्वर ,भा. ज.पा. च्या प्रवक्त्या प्रेरणा ताई होनराव,निशा ताई बडवे ,काँग्रेस पक्षाचे पुण्याचे प्रवक्ते श्री.नरेंद्र व्यवहारे,संभाजी नगर शिवसेनेचे नेते श्री.ज्ञानेश्र्वर खरडे,श्री.शिवा खांडकुळे तसेच नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी अध्यक्ष श्री.अनिल चौगुले ,कागल चे नगरसेवक श्री संजय चितारी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री.संतोष जिरेसाळ, आम आदमी पार्टीचे श्री.नरेंद्र बाळासाहेब देसाई आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Thursday, April 21, 2022

वडूज , ता.खटाव, येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ - श्री जोगेश्वरी यात्रा कार्यक्रम शुभारंभ


वडूज , ता.खटाव, येथील ग्रामदैवत  श्री भैरवनाथ - श्री जोगेश्वरी यात्रा कार्यक्रम शुभारंभ 
सातारा, दि.22 -प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
 वडूज , ता.खटाव, जि.सातारा येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ व श्री देवी जोगेश्वरी यांचा यात्रा कार्यक्रम आज शुक्रवार, दि.22.04.2022 पासून सुरु होत असून आज रोजी श्री देवाचा हळदी समारंभ होणार आहे.शनिवार दि.23.04.2022 रोजी संध्याकाळी श्री देवांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.रविवार दि.24.04.2022 रोजी संध्याकाळी श्रीनाथ बाबांची घोड्यावरून मिरवणूक तसेच सोमवार , दि.25.04.2022 रोजी संध्याकाळी श्री जोगेश्वरी देवीची घोड्यावरून मिरवणूक होईल.मंगळवार दि.26.04.2022 रोजी संध्याकाळी दोन्ही देवांची घोड्यावरून मिरवणूक व छबिना
कार्य क्रम होणार आहे.बुधवार दि.27.04.2022 रोजी श्री नाथ बाबांची खीर प्रसाद कार्यक्रम होईल. व दुपारी 4 वा.कुस्त्यांचे जंगी मैदान श्री जोतिबा मंदिर समोर होईल.
अशा प्रकारे ग्रामदैवत यात्रा कार्यक्रम नियोजित करण्यात आल्याचे यात्रा समिती व देवाचे सा लकरी  श्री.सुभाष गुरव यांनी जाहीर केले आहे.अधिक माहितीसाठी त्यांच्या 9881031959 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. व सर्व भाविक भक्तांनी यात्रा कार्यक्रमात सामील होऊन श्री देवांची कृपा दृष्टी प्राप्त करून घ्यावी.असे आवाहन यात्रा समिती तर्फे करण्यात आले आहे.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...