Sunday, October 31, 2021

डॉ राजेंद्र घुटे यांचे उद्योग क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे यांना मिळालेल्या पुरस्काराने सातारा जिल्ह्यामधील उद्योजकांनी आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन खासदार श्रीनिवासजी पाटील

डॉ राजेंद्र घुटे यांचे उद्योग क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे यांना मिळालेल्या पुरस्काराने सातारा जिल्ह्यामधील उद्योजकांनी आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन खासदार श्रीनिवासजी पाटील
उंब्रज दि .३० प्रतिनिधी डॉ राजेंद्र घुटे यांचे उद्योग क्षेत्रातील कार्य कौतुकास्पद आहे यांना मिळालेल्या पुरस्काराने सातारा जिल्ह्यामधील उद्योजकांनी आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन खासदार श्रीनिवासजी पाटील यांनी उंब्रज तालुका कराड येथे केले, तर सत्काराला उत्तर देताना डॉ राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे बोलले की हा पुरस्कार उंब्रज ग्रामस्थ , माझे मित्र परिवार समाज बांधव व कुटुंबातील सर्वांचे सहकार्य मिळाले मुळे हा पुरस्कार मला मिळाला उंब्रज मधील इतर उद्योजकांनी देखील असे पुरस्कार मिळवून आपल्या गावाचे नाव उज्वल करावे, उंब्रज येथील लिंगायत समाजातील प्रसिद्ध उद्योजक डॉ राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला पुरस्कार आणि अमेरिकन विद्यापीठा ची डॉक्टरेट ही पदवी मिळाल्या बद्दल उंब्रज ग्रामस्थांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात केले यावेळी ते या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा खासदार श्रीनिवासजी पाटील हे होते तर पालकमंत्री मा ना बाळासाहेब पाटील यांचे शुभहस्ते सत्कार समारंभ आयोजित करणेत आला प्रमुख उपस्थिती मध्ये कराड अर्बन बँकेचे कुटुंब प्रमुख मा सुभाषराव जोशी ,कराड अर्बन बँकेचे चेअरमन मा डॉ सुभाषराव एरम हे होते मा खासदार श्रीनिवासजी पाटील यांचा सत्कार सत्यम पेट्रोकेमिकल चे विक्रांत घुटे यांचे हस्ते मा ना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा सत्कार करण घुटे यांचे हस्ते अर्बन कुटुंब प्रमुख मा सुभाषराव जोशी यांचा सत्कार सिध्दार्थ बाजारे यांचे हस्ते तर मा डॉ सुभाषराव एरम यांचा सत्कार सागर तोडकर यांचे हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा गोपाळराव येळवे यांनी केले तर आभारप्रदर्शन adv प्रमोद पुजारी यांनी केले सत्यम पेट्रोलिकेमिकल चे वतीने दादासाहेब देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले मित्र परिवार यांचे वतीने डॉ कोडुगले उंब्रज ग्रामस्थ यांचे वतीने जेष्ठ लेखक परवडकर मा दत्ता आबा जाधव , लिंगायत समाज उंब्रज यांचे वतीने लिंगेश्वर फणसे यांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉ राजेंद्र प्रल्हाद शेठ घुटे यांना शुभेच्छा दिल्या समस्त लिंगायत समाज उंब्रज यांचे वतीने मा डॉ राजेंद्र प्रल्हाद शेठ घुटे यांना महात्मा बसवेश्वर महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली या कार्यक्रमास उंब्रज आणि परिसरातील ग्रामस्थ, व्यापारी ,तसेच लिंगायत समाज उंब्रज हे बहुसंख्येने उपस्थित होते

Friday, October 22, 2021

आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. अनभिज्ञ सम्राज्ञी..राणी चेन्नमा

आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. अनभिज्ञ सम्राज्ञी..राणी चेन्नमा ..प्रा.अजय शेटे वडूज खटाव.. सातारा..9823540239
..राणी चेन्नमा यांचा जन्म सध्याच्या पुणे बेंगलोर महामार्गावरील ' काकती ' या गावातील किल्ल्यात झाला.आंध्र प्रदेशातील काकतिय लिंगायत संप्रदायाचे उपासक असलेल्या राजघराण्यातील धुल प्पा देसाई आणि त्यांची पत्नी पद्मावती यांच्या पोटी तिचा जन्म झाला. लहापणापासूनच तिला तिरंदाजी..घोडेस्वारी..तलवार युद्ध..भाला युद्ध..अशा मर्दानी क्रीडा खेळांची आवड होतीच ..शिवाय तिने त्यामध्ये विशेष प्राविण्य पण मिळविले होते..तिला संस्कृत..कानडी..मराठी आणि उर्दू या भाषा अवगत होत्या.. ..भारताच्या इतिहासात सर्वात पहिल्यांदा या रणरागिणी ने शौर्य..धैर्य..यांचे प्रदर्शन करत आपले धर्म व देशप्रेम दाखवून दिले. ..कित्तुर चेन्नमा ला केलाडी ची राणी असे पण संबोधले जाते. या केलाडी राज्याची स्थापना चौदा नायक यांनी ई. स.1499..मध्ये केली होती. ताली कोट च्या लढाईत विजयनगर साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर त्यांच्या शिलेदारांनी लहान..लहान स्वतंत्र राज्ये स्थापन केली.या लहान राज्यांना पोर्तुगीज..आणि विजापूरी व इतर मुघल सैन्याकडून सतत धोका होता.त्यामुळे 14 संस्थाने एकत्र करून लिंगायत सोमशेखर नायक हा 1664..मध्ये केलाडीचा राजा झाला. ..राणी चेन्नमा हि पूर्वाश्रमीची एका लिंगायत व्यापाऱ्याची मुलगी होती. केलाडीच्या श्री रामेश्व रा च्या जत्रेत चेन्नमा ला पहिल्यांदा पहिल्या नंतर राजा सोमश्र्वराने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ई. स.1667 मध्ये ' बिदनुर ' या शहरात लग्न केले.राजाच्या मदतीने राणी चेन्नमा ने राजकारण..राज कौशल्य ..युद्ध साहित्य इत्यादी क्षेत्रात शिक्षण घेतले.. ..पुढे राज्यात अंतर्गत बंडाळी होऊन प्रधान भारती मावूत याने राजाची विश्वासघात करून हत्या केली.तेव्हा राजेशाही नृत्यांगना कलावती हिच्या वडिलांनी राणी चेन्नमा ला राजसिंहासनावर बसवले.आणि बसा प्पा नायक याला एका राज्याचा वारस मुलगा म्हणून दत्तक घेतले.. .. आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. ..जन्म..23 ऑक्टोबर 1648.. ठिकाण.. कित्तूर्..जिल्हा..बेळगाव..राज्य..कर्नाटक..भारत.. ..मृत्यू..21 फेब्रुवारी 1729.. ठिकाण.. बैल होंगल ..कर्नाटक.. ..महान कार्य.. छ. शिवाजी महाराज पुत्र छ.राजाराम महाराज यांचे रक्षण करून आश्रय दिला व भावी संरक्षण केले.. ..प्रमुख चळवळ..1724..ते..1729 पर्यंतचे भारतीय स्वातंत्र्य युद्ध. ..प्रमुख स्मारक..कित्तुर..
..त्यानंतर राजकीय सुरक्षेसाठी चेन्नमाचे दुसरे लग्न राजा रुद्रम्मा याचाशी झाले. रुद्रम्मा तिला एक मुलगा झाला.पण त्याचा लवकरच मृत्यू झाला.त्यानंतर थोड्याच दिवसात रुद्रम्मा चा पण मृत्यू झाला.. ..त्यातूनही न डगमगता तिने राज्याच्या सुरक्षेसाठी तिसरे लग्न राजा मल्ल सर्जा देसाई यांच्याशी केले.परंतु पुढे त्याचाही मृत्यू लवकर झाला.त्यामुळे तिने आपला सावत्र मुलगा शिवलिंग याला तेथील गादीवर बसवले. व त्याचा राज्याभिषेक केला.पण पुढे सन 1724 मध्ये त्याचाही मृत्यू झाला.. ..तेव्हा जबाबदारी ओळखून राणी चेन्नमा ने केलाडीच्या प्रशासन विभागाचा ताबा घेतला.आपल्या राज्याच्या सिंहासनावर गद्दार प णे ताबा घेवू पाहणाऱ्यांना तिने यशस्वी प्रतिकार केला.आणि विजापुरी सुलताना बरोबर युद्ध करून विजय मिळविला.. ..पुढे तिने छ.शिवाजी महाराज यांच्याशी राज्याचे सहसंबंध वाढवले..परंतु केलाडी राज्यात पुन्हा अंतर्गत बंडाळी वाढली.त्यामुळे विजापूर सुलतान पुन्हा केलाडी वर चा लून आला. व त्याने वेढा टाकला. ..यावेळी सुलतानाने आपला मध्यस्थ जन्नोपंत याला राणी चेन्नमा शी बोलणी करण्यास पाठवले.पण हा एक फसवा साफ ळा होता.कारण त्याच्या मागे त्याचे सैन्य पण राज्यात आतपर्यंत घुसले होते.पूर्व शत्रू भरमे मावूत यानेच विजापूर सुलतानाला हाताशी धरून हा नवीन कट रचला होता. ..तेव्हा संभाव्य धोका ओळखून राणी चेंनामा ने पुढील युद्धाची तयारी करण्यासाठी लवचिक धोरण स्विकारले . जन्नोपंता ला तीन लक्ष रुपये देवू केले व वेळकाढू पणाचे धोरण स्वीकारले. ..तेवढ्या मिळालेल्या अवधीत राणी चेन्नमा ने आपले सर्व सैन्य सर्व साधन संपत्ती व अन्न.. धांन्यासह बिदानुर किल्ल्यावरून भुवन गिरी किल्ल्यावर हलवले.. ..राणीने संपूर्ण बिदानुर किल्ला युद्धात जळालेल्या पृथ्वी सारखा करून ठेवला.जेव्हा सुलताना चे सैन्य किल्ल्यावर पोहोचले तेव्हा तेथे सैन्याला साधे अन्न..पाणी सुद्धा मिळू शकले नाही.शिवाय कोणतीही साधन संपत्ती मिळाली नाही.त्यामुळे भुकेने व्याकुळ होवून सुलतानी सैन्य हतबल झाले.. ..इकडे भुवन गिरी किल्ल्यावर राणी चेन्नमा ने आपले अगणित सैन्य गोळा केले.आणि आपल्या राजमंत्री व युद्ध निती कार जाणकारांच्या सल्ल्याचे पालन करून सुलताना विरोधात ' गनिमी कावा' केला. ..आधीच हतबल व निराश झालेल्या प्रचंड सैन्याने भुवन गिरी कडे कूच केली.पण चेन्नमा च्या आक्रमक सैन्याने विजापूरी सैन्य पूर्णपणे नष्ट केले..आणि सुलतानाला अतिशय वाईट रित्या पराभूत केले..युद्ध विजया नंतर राणी चेन्नमा ने देशद्रोही भरमे मावूत व जन्नोपंत यांना त्यांच्या शिष्यासह फाशी दिली.. ..त्यानंतर राणीने राज्याची आर्थिक परिस्थिती परिस्थिती सुधारण्यासाठी पोर्तुगीजांना जवळ केले. तिने केलाडी बंदरातून मिरची..मसाल्याचे पदार्थ व तांदूळ निर्यात करण्यास सुरुवात केली. छ.शिवाजी महाराज यांच्याशी गुपचूप अंतर्गत जवळीक ठेवून आदिलशहा आणि पोर्तुगीज यांचे पासून राज्याचे रक्षण केले. ..केलाडी राज्य आणि पोर्तुगीज यांच्यातील मिरची व मिरी यांच्या व्यापारामुळे पोर्तुगिजांनी तिला ' रिना डी पिमेंटा ' म्हणजेच मिरपूड राणी.. क्विन.. हि उपाधी दिली.पुढे मुघल व पोर्तुगिज यांनी म्हैसूर चा राजा चिक्क देव राय वो डे यार याचे कान भरून केलाडी वर हल्ला करण्यास भाग पाडले.पण भारत मातेच्या या शूर मुलीने सर्व तीन लढ्यातील हल्ल्याचा प्रतिकार केला.आणि मोठ्या धैर्याने आपल्या राज्याचे रक्षण केले. व राजाच्या निदर्शनास त्याची चूक आणून देवून शांतता प्रस्थापित केली.. ..सन 1680 मध्ये छ.शिवाजी महाराजांच्या मृत्यू झाला त्या नंतर औरं ग जेबाने 1686 मध्ये विजापूर व गोवळकोंडयावर आक्रमण केले.त्यानंतर त्याने मराठ्यांना वश व फितूर करण्यावर लक्ष केंद्रित केले.आणि छ.संभाजी महाराज यांना पकडण्यात यश मिळवले..पुढे त्यांना अतिशय निर्घृण पणे मारले.त्यांच्या मृत्यू नंतर छ.राजाराम महाराज यांचा रायगडावर राजा म्हणून राज्याभिषेक झाला.. ..त्यानंतरही मोगलांनी रायगडाला वेढा घातला.पण शुर मराठे छ.राजाराम महाराज यांना सुरक्षित प णे पळवून ने वू शकले..त्यावेळी ते केलाडीच्या दिशेने जात आहेत.अशी माहिती मुघल सैन्याला मिळाली..तेव्हा औ रंग जेबा ने राणी चेन्नमा ला केलाडी राज्यात छ.राजाराम महाराज यांना येवू न देण्याचे फर्मान काढले.अन्यथा केलाडी वर आक्रमण केले जाईल .असा दम दिला गेला..पण राणी चेन्नमा ला हिंदवी स्वराज्याची सर्व परिस्थिती माहीत होती..आणि तिच्या राजाचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे.असे मानून तिने बादशहाचे हे फर्मान मोठ्या जिद्दीने धुडकावून लावले. व छ. राजाराम महाराज सैन्यासह केलाडी ला पोहोचल्यावर तिने त्यांचा मोठा सन्मान केला व आपला राजश्रय व संरक्षण देवून आपल्या हिंदवी राजधर्माचे पालन केले.. व मुघल सैन्या विरोधात लढाईची तयारी केली. ..हे समजल्यावर बादशहाने राणीला पत्र लिहून छ.राजाराम महाराज व त्यांचे मराठा सरदार यांना चांगल्या पद्धतीने आपल्या ताब्यात देण्याची विनंती केली.. व हेतुपूर्वक पणे ठरवून विचार करण्यास वेळ द्यावा असे सांगितले. व वेळकाढू पणा करून पावसाळा सुरू होवू दिला.त्यानंतर तिने बादशहाला सांगितले की.. छ.राजाराम महाराज हेच फक्त आता मराठ्यांचे राजे शिल्लक राहिले आहेत.शिवाय त्यांनी आधीच अतिशय आणीबाणीच्या परिस्थितीत आपले राज्य सोडले आहे..तेव्हा आपला मुघ लकी प्रस्ताव मी सरळ..सरळ नाकारत आहे. छ.शिवरायांचे पुत्र असलेल्या छ.राजाराम महाराज यांना मी माझ्या पूत्रा समान मानते.आणि त्यांचे रक्षण करणे माझे आद्य कर्तव्य समजते. ..त्यामुळे बादशहाने अतिशय चिडून अझ मथ आरा च्या नेतृत्वाखाली केलाडीवर आक्रमण केले.. ..ऐन पावसाळ्यात मोगलांनी बिड नू र मध्ये प्रवेश केला.हे वातावरण मोगल सैन्याला त्रासदायक ठरले.आणि राणी चा गनिमी कावा यशस्वी ठरला.त्याचा बरोबर फायदा केलाडी सैन्याने उठविला. व. बादशहाच्या सैन्यावर प्रचंड ताकदीनिशी आक्रमण केले. व त्यांना पराभूत केले. व मुघल सैन्याला ठार करून त्याचे घोडे ..संसाधने.. व रसद काबीज केली.. बादशहा औरंगजेब याच्या दारुण पराभवामुळे व राणी चेन्नमा हिच्या गनिमी काव्याच्या लष्करी डावपेचां मुळे या आलमगि रा ने अतिशय चिडून तिची ..' स्त्री अस्वल " म्हणजेच घोळून..घोळून व खेळवून खेळवून मारणारी अशी अव्हेलानात्मक तुलना केली..पुढे युद्ध काही दिवस चालू राहून शांत झाले.. ..त्यानंतर राणी चेन्नमा ने छ.राजाराम महाराज यांना सर्व मदत करून व संरक्षण देवून ..सुरक्षित अशा तामिळनाडू मधील ' जिंजी ' किल्ल्यावर जावून राहण्यास मदत केली. व मराठ्यांचा शेवटच्या राजाच्या प्राणांचे रक्षण केले.. ..पुढे छ .राजाराम महाराज यांनी राणी चेन्नमा ना एक पत्र लिहले.त्यात ते म्हणतात की.. त्या बिकट आणि बाणीच्या परिस्थितीत जेव्हा मोठ्या राज्याचे राजे आणि राज्यकर्त्यांनी बादशहाला घाबरून मला मदत करण्यास नकार दिला.तेव्हा तुम्ही मला मोठ्या धैर्याने आश्रय दिला आणि हिंदू धर्माचे रक्षण करण्यास मदत केली.तुमचे हे शौर्य आणि औदार्य मी कधीही विसरू शकणार नाही.ज्यांनी छ.शिवाजी महाराजां चा मुलगा असलेल्या. छ.राजाराम यांचे रक्षण केले.मुघल सैन्याला मोठ्या धाडसाने पराभूत केले.आणि मराठा राज्य व राजा यांना वाचवले. अशा माझ्या दुसऱ्या मातेस माझा नमस्कार असो.देवी श्री भवानी तुम्हाला सर्व सुख देवो..मी देवाला प्रार्थना करतो कि..त्याची केलाडी राज्याची जमीन आनंदाचे घर बनू शकेल.. ..तुमचाच मुलगा.. छ.राजाराम.. ....................................... .. कर्नाटकातील केलाडी राज्याचेच एक भाग असलेले 'बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर् ' हे एक महान संस्थान होते. आपला सावत्र मुलगा शिवलिंग रुद्रसर्ज याच्या मृत्युनंतर राणी चेन्नमा ने त्यांचा दत्तकपुत्र गुरुलिंग मल्ल सर्ज याला गादीवर बसवून स्वतः राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.तेव्हा ह्या दत्तक विधानाला नाकारून ब्रिटिश एजंट व धारवाड प्रांताचा कलेक्टर थ्याकरे याने पुन्हा कित्तुर संस्थान ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा मोठे युद्ध झाले.राणी चेन्नमा ने स्वतः लढाईत भाग घेवून रण मैदान गाजवले व 3 सप्टेंबर 1724..मध्ये त्याला युद्धात ठार मारले.पुढे डी क न या इंग्रज अधिकाऱ्याने 23..सप्टेंबर 1724..रोजी कित्तुर ला पुन्हा वेढा दिला. सन 1724..ते..सन 1729..असा पाच वर्षे राणी चेन्नमा ने इंग्रजांना मोठ्या त्वेषाने प्रतिकार केला. ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रज सरकार यांच्या संस्थान खालसा करण्याच्या धोरणाला त्यांचा प्रचंड विरोध होता.ब्रिटिश दडपशाही ला त्यांनी मोठा प्रतिकार केला. व भूमिगत राहून शेवटपर्यंत विरोध केला. ..पण संगाप्पा व हु राकडली या राणीच्या दोन फितूर सरदारांनी इंग्रजांना शहरात शिरण्याचा चोरवाटा दाखविल्याने इंग्रजांनी कित्तुर किल्ल्यात घुसून शेवटी 3..डिसेंबर 1724..रोजी राणी चेन्नमा ला पकडलेच..तिला पकडुन पुढे ' बेल होंगल '..बैल होनंग ळ ..येथील कारागृहात डांबून ठेवले.या तुरुंगातच 2.. फेब्रुवारी 1729..रोजी शूर केलाडी.. कित्तूर् राणी चेन्नमा चे निधन झाले. . ..बेळगाव पासून 50.. कि.मी.दूर असलेले कित्तुर संस्थान खालसा करून बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले..या वेळी इंग्रजांनी किल्ल्यामध्ये जी लूट केली त्या मध्ये 16..लक्ष रुपये रोख..4..लक्षांचे जवहिर..घोडे.. उंट..हत्ती यासह 36..तोफा..बंदुका..तलवारी.. आणि प्रचंड दारूगोळा त्यांना मिळाला...
..राणी चेन्नमा यांच्या निधनानंतर सन 1729 मध्ये सांगलीच्या सयाप्पा पाटील यांनी देसायांच्या दत्तक मुलास पुढे करून इंग्रज सत्तेला कायदेशीर आव्हान उभे केले होते.परंतु या आव्हानाला ही ब्रिटिशांनी शह दिला. * सन 1857 सालच्या बंडा पूर्वी तसेच झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्वीही ..वर्षे आधी एका भारतीय शूर लिंगायत रणरागिणी भारतीय स्वातंत्र्य युद्धात नाव अजरामर करून गेली.. शौर्य..धैर्य..यांचे प्रदर्शन करत जिने ब्रिटिश सतेला आवाहन देवून जबरदस्त हादरा दिला.त्या होत्या केलाडी.. कित्तूर् राणी चेन्नमा..त्याच्या या महान भारत देश प्रेम कार्यास विनम्र अभिवादन ..अभिवादन * ..राणी चेन्नमा यांच्या या महान कार्याची दखल घेवून मा.राष्ट्रपती प्रतिभताई पाटील यांच्या हस्ते दिल्ली येथील विधान भवनात 2007..साली त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे..**

Tuesday, October 19, 2021

आदर्श गाव हिवरे बाजार ता. जि. अहमदनगर येथे अखिल भारतीय जनजागृती अभियानाचे (पॅन इंडिया अवेरनेस आणि आऊटरिच कॅम्पेन) आयोजन अहमदनगर दि 17 :- लिंगायत TV live प्रतिनिधी ॲड. शीतल बेद्रे, विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर , अहमदनगर बार असोसिएशन, सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर, ग्रामपंचायत हिवरे बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ ऑक्टो.२०२१ रोजी आदर्श गाव हिवरे बाजार ता. जि. अहमदनगर येथे अखिल भारतीय जनजागृती अभियानाचे (पॅन इंडिया अवेरनेस आणि आऊटरिच कॅम्पेन) आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाप्रसंगी विविध मान्यवरांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.रेवती देशपांडे दंडे साहेब सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अहमदनगर यांनी केले.या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.सुधाकर यार्लगड्डासाहेब प्रमुख जिल्हा न्यायधीश साहेब यांनी कायदेविषयक मार्गदर्शन केले. आदर्शगाव हिवरे बाजार चे सरपंच पद्मश्री.पोपटराव पवार साहेब यांनी मार्गदर्शन केले. मा.ॲड. श्री.सुभाष जे. काकडे (ज्येष्ठ विधीज्ञ )अध्यक्ष सेंट्रल बार असो. यांनी शिक्षणाचे अधिकार यासंबंधी मार्गदर्शन केले.मा.ॲड. भूषण ब-हाटे अध्यक्ष बार असो. यांनी अन्न विषयक कायदा या बद्दल मार्गदर्शन केले. मा.ॲड. सतीश पाटील जिल्हा सरकारी वकील अहमदनगर यांनी सामाजिक सेवा विषयी कायद्यातील तरतुदी बद्दल माहिती दिली. मा. निखिल ओसवाल साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी मा. श्री. ए.पी. कुलकर्णी साहेब,दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अहमदनगर.श्री डी आर दंडे साहेब, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर अहमदनगर, श्रीमती रेश्मा होजगे (बी. डि. ओ.),ॲड. शेखर दरंदले,ॲड. अनुराधा येवले,ॲड.विक्रम वाडेकर,ॲड. योगेश गेरांगे,ॲड. सौरभ काकडे,ॲड. शीतल बेद्रे, विधी सेवा प्राधिकरण अहमदनगरचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन मा.चंद्रकांत खाडे साहेब विस्तार अधिकारी अहमदनगर यांनी केले.

Monday, October 18, 2021

उंब्रज च्या वैभवात भर घालणारे भव्य आणि दिव्य असे शिवस्मारक उंब्रज मध्ये लवकरच साकारणार असा संकल्प उंब्रज तालुका कराड येथील श्री शिवयोध्या प्रतिष्ठान यांचे वतीने काल स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर करण्यात आला


उंब्रज च्या वैभवात भर घालणारे भव्य आणि दिव्य असे शिवस्मारक उंब्रज मध्ये लवकरच साकारणार असा संकल्प उंब्रज तालुका कराड येथील श्री शिवयोध्या प्रतिष्ठान  यांचे वतीने काल स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर करण्यात आला 
उंब्रज दि 18 :-  लिंगायत TV live प्रतिनिधी प्रसाद वाकडे
उंब्रज च्या वैभवात भर घालणारे भव्य आणि दिव्य असे शिवस्मारक उंब्रज मध्ये लवकरच साकारणार असा संकल्प उंब्रज तालुका कराड येथील श्री शिवयोध्या प्रतिष्ठान  यांचे वतीने काल स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर करण्यात आला 
श्री शिवयोध्या प्रतिष्ठान उंब्रज तालुका कराड यांचे वतीने दि १७ रोजीउंब्रज येथे श्री.छ.शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी  संकल्प अभियानाचे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे   आयोजन करण्यात आले होते या वेळी उंब्रज तालुका कराड येथील, श्री शिवयोध्या प्रतिष्ठानचे शिवभक्त व ग्रामस्थ उंब्रज  उपस्थित होते यावेळी जगदिश्वर महादेवांचे व श्रीमंत  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शंभू महादेवांच्या साक्षीने उंब्रज बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी  श्री .छ.शिवाजी महाराज यांचा सोळा फूट उंच भव्य आणि दिव्य  अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला. संकल्प पूर्तीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी 31 उंब्रजकरांनी हातात बंधन बांधून लवकरात लवकर अश्वारूढ पुतळा उभारण्याची शपथ घेतली.नुकताच  घटस्थापना शारदिय नवरात्रोत्सवच्या शुभदिनी  लोकवर्गणीचाही शुभारंभ करण्यात आला आहे.  शिवस्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावें म्हणून उंब्रज आणि परीसरातील सर्व शिव भक्त व नागरिकांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.श्री.छ.शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासारखे  पवित्र शिवकार्य दुसरे असूच शकत नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपसातील राजकिय तथा वैयक्तिक मतभेद विसरून या शिवकार्यात योगदान द्यावे असे आवाहनही श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांचे वतीने करण्यात आले आहे.राज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी  संकल्प अभियानाचे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे   आयोजन करण्यात आले होते या वेळी उंब्रज तालुका कराड येथील, श्री शिवयोध्या प्रतिष्ठानचे शिवभक्त व ग्रामस्थ उंब्रज  उपस्थित होते यावेळी जगदिश्वर महादेवांचे व श्रीमंत  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन शंभू महादेवांच्या साक्षीने उंब्रज बाजारपेठेतील मध्यवर्ती ठिकाणी  श्री .छ.शिवाजी महाराज यांचा सोळा फूट उंच भव्य आणि दिव्य  अश्वारूढ पुतळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला. संकल्प पूर्तीचे ध्येय पूर्ण करण्यासाठी 31 उंब्रजकरांनी हातात बंधन बांधून लवकरात लवकर अश्वारूढ पुतळा उभारण्याची शपथ घेतली.नुकताच  घटस्थापना शारदिय नवरात्रोत्सवच्या शुभदिनी  लोकवर्गणीचाही शुभारंभ करण्यात आला आहे.  शिवस्मारकाचे काम लवकर पूर्ण व्हावें म्हणून उंब्रज आणि परीसरातील सर्व शिव भक्त व नागरिकांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.श्री.छ.शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासारखे  पवित्र शिवकार्य दुसरे असूच शकत नाही. त्यामुळे सर्वांनी आपआपसातील राजकिय तथा वैयक्तिक मतभेद विसरून या शिवकार्यात योगदान द्यावे असे आवाहनही श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांचे वतीने करण्यात आले आहे.

Thursday, October 14, 2021

श्रीमती कलावती शेटे..यांचे निधन

 





श्रीमती कलावती शेटे..यांचे निधन 

 


वडूज दि.14 प्रतिनिधी..वडूज येथील प्रसिद्ध व्यावसायिक श्री.संजय व श्री.राहुल हरिहर शेटे  यांच्या मातोश्री आणि आणि लिंगायत TV live  चे खटाव तालुका प्रतिनिधी प्रा अजय शेटे यांची चुलती  श्रीमती कलावती हरिहर शेटे ..वय..90 यांचे गुरूवार दि.रात्री 8.30.. वा.वृद्धापकाळाने निधन झाले..त्या काकू या नावाने परिचित होत्या. सावडणे विधी रविवार दि.17 रोजी सकाळी 7.30 वा.करण्यात येणार आहे.

..परमेश्वर मृतात्म्यास शांती देवो हिच भावपूर्ण श्रद्धांजली **

Wednesday, October 13, 2021

प्रा.नंदकुमार कुंभार यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.पदवी केली संपादन





प्रा.नंदकुमार कुंभार यांनी शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.पदवी केली संपादन
रमेशकुमार मिठारे :लिंगायत TV Live विशेष प्रतिनिधी
निमशिरगाव , ता. शिरोळ येथील नंदकुमार विरभद्र कुंभार यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. ही पदवी जाहीर झाली. नाईट काॅलेज कोल्हापूर येथे सहायक प्राध्यापक म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. " स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी तील कृषीजन समूहाची भाषा " या विषयावरील प्रबंध त्यांनी प्रा. डॉ. जी.एस. पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाकडे सादर केला होता. या अभ्यासासाठी त्यांना ज्येष्ठ लेखक राजन गवस, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे, प्रा. डॉ. नंदकुमार मोरे,  सौ. रजनीताई  मगदूम यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 
   नंदकुमार कुंभार हे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत या पदवीपर्यंत पोहचले आहेत. मराठी विषयातील या पदवीबरोबरच त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे बीएस्सी. हाॅर्टीकल्चर व एम्.एड करीताही  लघु शोधप्रबंध सादर करून पदवी संपादन केलेली आहे. त्यांनी तीन विद्यापीठातून तीन विषयातील पदव्युत्तर पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केल्या आहेत.  तसेच वेगवेगळ्या नियतकालिकांतून त्यांचे संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले आहेत. सध्या देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या समग्र व्यक्तिमत्वाचा संशोधनपर अभ्यास  करत आहेत. 
   शैक्षणिक कार्याबरोबरच ते सामाजिक कार्यातही अग्रेसर असतात. त्यांचे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने कार्याला सुरुवात झाली आणि उच्चशिक्षित व काम करण्याची धडपड यामुळे सलग दोन वेळा ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आले. उत्तम वक्तृत्व व कार्य करण्याची क्षमता तसेच कुशल संघटन कौशल्याच्या आणि कल्पकतेच्या जोरावर ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नावलौकिक संपादन करत आहेत. त्यांच्यावर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या विचारांचा प्रचंड पगडा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केलेले आहे. 
    या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.


महात्मा बसवेश्वर उद्यानाचे शुक्रवारी जुळे सोलापुरात भूमिपूजन

 




महात्मा बसवेश्वर उद्यानाचे शुक्रवारी जुळे सोलापुरात भूमिपूजन 


  


सोलापूर :-लिंगायत TV Live  प्रतिनिधी :- रमेशकुमार मिठारे 





  सोलापूर महानगरपालिकेच्या जूळे सोलापूरातील आरक्षित जागेवर जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात येत असून त्याचे भुमीपूजन शुक्रवार दि.15 ऑक्टोबर 21 रोजी सकाळी 11 वाजता होणार असल्याची माहिती उपमहापौर राजेश काळे यांनी दिली. 
जूळे सोलापूरातील वसुंधरा कॉलेज समोरील 3 हजार चौरस मीटर मोकळी जागा महानगरपालिकेने आरक्षित ठेवली होती. त्याठिकाणी उद्यान निर्मितीचा ठराव उपमहापौर राजेश काळे आणि नगरसेवक अविनाश बोमड्याल यांनी मांडला होता. सभागृहात तो मंजूर झाल्यानंतर त्यास होणाज्या आर्थिक तरतुदीस एकमताने मंजूरी देण्यात आली आहे. प्रभाग 24 चे नगरसेवक तथा उपमहापौर राजेश काळे यांच्याकडे प्रभागातील लिंगायत समाजबांधवानी मागणी केल्यानुसार सदर उद्यानास जगतज्योती महात्मा बसवेश्वर असे नाव देण्यात आले. उपमहापौरांच्या भांडवली निधीतून 20 लाख आणि मनपा कडून 20 लाख असे एकुण 40 लाख रुपयांचा निधी उद्यान विकासासाठी मंजूर झाला आहे. 
सदर उद्यानात जॉगिंग पार्क, वॉकिंग ट्रॅक, बाळगोपाळांसाठी खेळणी ज्येष्ठा साठी बैठक स्थान, हिरवळ, विविध फुला फळांची झाडे लावून उद्यान विकसीत करण्यात येणार आहे. जूळे सोलापूरातील भारती विद्यापीठ ते आसरा या मुख्य रस्त्यालगत निसर्ग रम्य जागेत हे उद्यान निर्माण होत असल्याने या परिसरातील नागरीकांतून समाधान व्यक्त होत आहे. असेही राजेश काळे यांनी सांगितले
                                        महात्मा बसवेश्वरउद्यान विकास समिती 
जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यान निर्मितीसाठी आणि भविष्यात त्यामध्ये नाविण्यपूर्ण विकास योजना राबविण्यासाठी जूळे सोलापूर परिसरातील समाज बांधवानी एकत्र येऊन उद्यान विकास समिती गठित केली आहे. यामध्ये सर्वसी विजयकुमार हत्तुरे, डॉ.बसवराज बगले, संतोष केंगनाळकर, श्रीकांत कुलकर्णी,  डॉ.मल्लिकार्जुन तरनळ्ळी, प्रदिप तडकल, दयानंद भिमदे, मल्लिनाथ आकळवाडी, सकलेश बाबुळगावकर, राजेश्वरी भादुले, सुरेश स्वामी, संपदा जोशी, अनिल उपरे, परमेश्वर कलशेट्टी, शितल जालीमिंचे, डॉ.राजेश पटवर्धन, शोभा स्वामी, टी.बी. जाधव (माजी सैनिक नगर) विनया ढेकळे, संजय जम्मा, संतोष जाधव, मनोज देवकर आदींचा समावेश करण्यात आला आहे. 
भविष्यात ही समिती सरकार कडून आणि विविध लोकप्रतिनिधी कडून निधी मिळवून या उद्यानात महात्मा बसवेश्वरांचे स्मारक, विचार संपदेसाठी वाचनालय, प्रार्थना गृह, ध्यान मंदिर, शरणसाहित्य यासह विविध विकास कामे करण्यात येणार आहे.  असल्याची माहिती विजयकुमार हत्तुरे यांनी दिली.
जूळे सोलापुरातील सर्व समाज बांधवाना एकत्रित करून बसव चळवळ गतिमान करण्यासाठीचे केंद्रबिंदु असणार आहे.  12 व्या शतकात जाती व्यवस्था नष्ट करून पहिल संसद स्थापन करणारे थोर संत महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने उद्यान निर्मिती करण्याच्या उपमहापौर राजेश काळे यांच्या भुमिकेचे स्वागत सोलापूरातील सर्व लिंगायत बांधवानी केले आहे असे यावेळी राजशेखर हिरेहब्बु म्हणाले. 

विजयादशमिच्या मुर्हतावर शुक्रवार सकाळी 11 वाजता जगतज्योती महात्मा बसवेश्वर उद्यानाचे भूमिपूजन खासदार डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या हस्ते, मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य, होटगी मठाचे डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य आणि सैफुलच्या शिवयोग धामचे शरणबसवलिंग शिवयोगी महाराज यांच्या धार्मिक अधिष्ठानाखाली होणार आहे. सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख, शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, गटनेते शिवानंद पाटील, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, माजी कुलगुरु इरेश स्वामी, बसवराज शास्त्री हिरेमठ, राजशेखर हिरेहब्बु, लिंगायत समन्वय समितीचे महासचिव विजयकुमार हत्तुरे, अमर पाटील, ए.जी पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील, विश्वनाथ शेगावकर, शहाजी पवार, मनिष देशुख, विक्रम देशमुख, डॉ.एस.एस. पाटील, गुरुशांत धुत्त्तरगांवकर, विक्रम खेलबुडे, डॉ.जि.के देशमुख, प्रा.ए.डी जोशी, प्रा.शिवानंद शिरगांवे, आयुक्त पि.शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे आणि एन.के. पाटील, नगरअभियंता संदिप कारंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन होणार आहे. असेही राजेश काळे  यांनी सांगितले

महात्मा बसवेश्वर उद्यानाचे शुक्रवारी जुळे सोलापुरात भूमिपूजन

Saturday, October 9, 2021

लखीमपुर येथील शेतकरी हिंसाचाराच्या निषेधार्थ पुणें मार्केट यार्ड सोमवारी बंद

लखीमपुर येथील शेतकरी हिंसाचाराच्या  निषेधार्थ पुणें मार्केट यार्ड सोमवारी बंद 

पुणे : दि 9  Adv शितल बेद्रे  प्रतिनिधी लिंगायत TV Live  :-  लखीमपुर येथील शेतकरी हिंसाचाराच्या  निषेधार्थ पुण्यातील मार्केट यार्ड सोमवारी दि.11 रोजी बंद  ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी दि.9सकाळी 11 वाजता शारदा गजानन मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत पुण्यातील  अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

दरम्यान महाविकास आघाडीने लखीमपुर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मार्केट यार्ड मधील सर्व संघटनांची संयुक्त बैठक झाली. यामध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा देऊन मार्केट यार्ड बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात  आला. यावेळी लखीमपुर येथील शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या बैठकीमध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नागरे  विजय चोरगे, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, नितीन जामगे, विशाल केकाने, दीपक जाधव,भरत शेळके, दत्तात्रय गजघाटे, विकास थोपटे, सूर्यकांत चिंचवले, गणेश शिर्के, विजय सोनवणे, किसन गोविंदवाड, तुकाराम लिमकर,सदाशिव मरगळे, टेम्पो पंचायतीचे गणेश जाधव  चंद्रकांत जवळकर, सुरेश टक्कर, राजू रेणुसे,तोलणार संघटनेचे राजेंद्र चोरगे, हनुमंत बहिरट, प्रवीण पाटील, संतोष ताकवले, किशोर भानूसगरे,महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन चे विवेक ओंबासे, भारतीय कामगार सेनेचे दादा तुपे व कामगार उपस्थित होते.

Wednesday, October 6, 2021

** कर्नाटक राज्य रयत संघटनेची बैठक संपन्न *


** कर्नाटक राज्य रयत संघटनेची बैठक संपन्न **
 धारवाड.. दि.3. प्रतिनिधी .कर्नाटक राज्य रयत संघटनेची बैठक मोठया उत्साहात पार पडली.यावेळी अनेक विषयांवर चर्चा होऊन मार्गदर्शन करण्यात आले.
..यावेळी चिकोडी जिल्हा अध्यक्ष श्री.राजू पोवार दादा यांनी तडफदार भाषण करून उपस्थितांची मने जिंकली व आपल्या खास शैलीत मार्गदर्शन केले..
.. सदर कार्यक्रम मंगळवारी पाटील पुटप्पा भवन ..धारवाड येथे संपन्न झाला.यावेळी कोलार..चित्रदुर्ग .. बल्लारी.. विजय पूर..बेळगाव..धारवाड..तसेच कर्नाटक राज्यातील विविध ठिकाणाहून पदाधिकारी उपस्थित होते.
..यावेळी  चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पोवार दादा यांच्या नेतृत्वाखाली निपाणी तालुकाध्यक्ष..आय. एन.बेग..कार्याध्यक्ष प्रवीण सूतळे.  हुन्नर् गीं.. सेक्रेटरी कल गोंडा कोटगे. बेनाडी.संघटनेचे कार्यकर्ते मल गोंडा मिरजे..भीमा मला बादे..( बेनाडी )..तसेच निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल..उपस्थित होते.**

Tuesday, October 5, 2021

प्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदींचे निधन,रामायण' मालिकेतील रावण काळाच्या पडद्याआड


प्रसिद्ध अभिनेते अरविंद त्रिवेदींचे निधन,
रामायण' मालिकेतील रावण काळाच्या पडद्याआड
मुंबई :दि 6 :- प्रा अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी 
रामानंद सागर यांच्या लोकप्रिय मालिका ‘रामायण’मध्ये रावणाची  भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी  यांचे निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामानंद सागर यांच्या ‘रामायण मालिके’तील रावणाच्या व्यक्तिरेखेने नव्वदच्या दशकात त्रिवेदींनी प्रेक्षकांवर गारुड केले होते.
हृदयविकाराच्या झटक्याने निधन
अरविंद त्रिवेदी यांच्या पार्थिवावर आज (बुधवार) सकाळी मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ते दीर्घ काळापासून आजारी होते, पण काल ​​रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी दिली.
‘रामायण’मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांच्या आणखी अनेक पात्रांचेही कौतुक झाले होते. त्यांनी ‘विक्रम और वेताल’ या टीव्ही मालिकेतही काम केले होते. या मालिकेनेही छोट्या पडद्यावर बराच काळ वर्चस्व गाजवले होते.
गुजराती रंगभूमीपासून कारकिर्दीला सुरुवात
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांचे बंधू उपेंद्र त्रिवेदी हे देखील गुजराती चित्रपटसृष्टीतील एक सुप्रसिद्ध नाव आहे आणि त्यांनी गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. अरविंद त्रिवेदी यांनी गुजराती भाषेत धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे गुजराती प्रेक्षकांमध्ये ओळख मिळवली, तिथे त्यांनी जवळपास 40 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते.
निधनाच्या अफवा
कोरोना लॉकडाऊनच्या काळात रामायण ही मालिका टीव्हीवर पुन्हा प्रसारित करण्यात आली होती. त्या काळात अरविंद त्रिवेदी आजारी असल्यामुळे अनेक वेळा त्यांच्या मृत्यूच्या अफवाही पसरल्या होत्या. अरविंद त्रिवेदींच्या मृत्यूच्या अफवा या वर्षी मे महिन्यातही उठल्या होत्या, पण त्यावेळी पुतणे कौस्तुभ यांनी पुढे येऊन स्पष्टीकरण देत खोटे वृत्त न पसरवण्याची विनंती केली होती.
भाजपची खासदारकी
अरविंद त्रिवेदींनी किमान 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2002 मध्ये त्यांना केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षही बनवण्यात आले. याशिवाय, ते 1991 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर खासदार झाले आणि पाच वर्षे पदावर राहिले होते.

Monday, October 4, 2021

लिंगायत टिव्ही चॅनेल प्रतिनिधी श्री.विनायक सुधीर चिवटे यांचे चित्रकार सुपुत्र चि.दिग्विजय यांनी काढलेल्या चित्रांची रोहित पवार यांचे कढुन प्रशंसा* मा पवार कुटुंबीयांना चित्रे भेट *

लिंगायत टिव्ही चॅनेल प्रतिनिधी श्री.विनायक सुधीर चिवटे यांचे चित्रकार सुपुत्र चि.दिग्विजय यांनी काढलेल्या चित्रांची रोहित पवार यांचे कढुन प्रशंसा
** मा पवार कुटुंबीयांना चित्रे भेट *"
..करमाळा दि.2..सोलापूर जिल्हा लिंगायत टिव्ही चॅनेल प्रतिनिधी श्री.विनायक सुधीर चिवटे यांचे चित्रकार सुपुत्र चि.दिग्विजय यांनी मा.पवार कुटुंबीयां वरील राजकीय प्रेमापोटी काढलेली रेखाचित्रे हा संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय बनली होती..
.. चि.दिग्विजय हा करमाळा येथील रहिवासी असून कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयात ई.8 वी त शिकत आहे..तो एक उत्तम चित्रकार असून त्याने नुकतेच लोकनेते मा.शरदराव जी पवार साहेब.. व मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांची रेखाचित्रे रंगविली होती..
.. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून आज एका कार्यक्रमादरम्यान मा.रोहितदादा पवार साहेब भेटले असता त्याने हि चित्रे आपल्या स्वहस्ते त्यांना भेट देवून आपले कलाप्रेम दाखवून दिले..
.. यावेळी करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैय्या लाल देवी.. मा.आमदार जयवंतराव जगताप यांचे सुपुत्र व युवा नेते शंभूराजे जगताप..राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष संतोष जी  वारे  व इतर पदाधिकारी उपस्थित होते..

जगभरातून फेसबुक ,व्हाट्सप्प ,आणी इन्स्टग्राम बंद पडले मुळेसोशल मीडिया वर अवलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी आज हवाल दिल ,,,,,?


जगभरातून फेसबुक ,व्हाट्सप्प ,
आणी  इन्स्टग्राम बंद पडले मुळे
सोशल मीडिया वर अलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी आज हवाल दिल ,,,,,?
सातारा दि 4 प्रतिनिधी लिंगायत TV live   प्रसाद वाकडे
जगभरातून फेसबुक ,व्हाट्सप्प ,
आणी  इन्स्टग्राम बंद पडले मुळे
सोशल मीडिया वर अवलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी आज हवाल दिल 
सोमवारी रात्री 9 
 वाजलेपासून जगभरातू न फेसबुक ,व्हाट्सप्प ,
आणी  इन्स्टग्राम बंद पडले मुळे सोशल मीडिया वर अवलंबून असणारे सोशल मीडिया प्रेमी आज हवाल दिल झाले असून या बाबतीत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत  या मुळे आज काही जण निवांतपणे झोपले तर काही जणांची झोप उडाली आहे पाहुयात आता हे कधी  चालू होते आहे ते

Sunday, October 3, 2021

** जनसुराज्य शक्तीचा उद्गाता आणि लिंगायत समाजाचा बुलंद आवाज मा आमदार डॉ विनयजी कोरे सावकार **







** जनसुराज्य शक्तीचा उद्गाता आणि लिंगायत समाजाचा बुलंद आवाज मा आमदार डॉ विनयजी कोरे सावकार *लिंगायत TV live  दि 4 :- विशेष प्रतिनिधी ..प्रा.अजय शेटे.. वडूज..9823540239.
.. वारणा नगर चे आमदार मा.डॉ.विनय जी कोरे यांचा आज वाढदिवस ..त्यानिमित्त त्यांचे वाढदिवस अभिष्टचिंतन **
.. मा.सहकार महर्षी स्व.तात्यासाहेब कोरे यांचे नातू म्हणून मा. आ.डॉ.विनय जी कोरे संपूर्ण महाराष्ट्र व भारताला परिचित आहेत..
..आपल्या आजोबांच्या पथ ध्येयावर पाऊल ठेवत . मा.विनय जी कोरे संपूर्ण वारणा खोऱ्याचे नाव संपूर्ण जगभरात उज्वल करण्यासाठी अहोरात्र धडपडत आहेत..
..राजकारणा मध्ये आपली स्वतःची विचारधारा ठळकपणे प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी जनसुराज्य शक्ती नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना स्वतःच्या हिमतीवर करून दाखवली आहे..
..आपल्या कुटुंबाने दिलेल्या संस्काराची जाणिव ठेवून त्यांची व पुढील पिढीची वाटचाल त्यांनी प्रगतीपथावर चालूच ठेवली आहे..
.. देव जोतिबा देवाची भक्ती.. आशीर्वाद  व राजर्षी  शाहू महाराजांचा आदर्श यांच्या जोरावर वारणा नगरला सहकार क्षेत्राचे रोड मॉडेल बनवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.. कुस्ती सारख्या रांगड्या खेळाला त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर नेवून ठेवले. व कोल्हापूरची कुस्ती सातासमुद्रापार पोहचवली.. व महाराष्ट्रातून मोठे पैलवान तयार करण्यास हातभार लावला..
..त्यांच्याच देखरेखी खाली आज वारणा दूध संघ..सहकारी साखर कारखाना..बँक..फार्मसी व मेडिकल कॉलेज..कृषी महाविद्यालय.. इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी कॉलेज..इंग्लिश अकादमी.. मिलिटरी अकादमी..कोडोली हायस्कूल..सह्याद्री कुकुट पालन संस्था.. वारणा ब झा र.. ला.शास्त्री भवन..आंतरराष्ट्रीय कुस्ती व कृषी प्रदर्शन.. वारणा महिला गृह उद्योग.. आंतरराष्ट्रीय व्यापार विनिमय..यांचे कार्य नित्यनेमाने प्रगती पथावर चालू आहे..
..शिक्षण हि महान अशी सामाजिक गुंतवणूक आहे .आणि ती त्यांनी वारणेच्या खोऱ्यात यशस्वी कारण दाखवली..हरितक्रांती कशी असावी हे वारणेला जाऊनच प्रत्यक्ष अनुभवावे..नवमहाराष्ट्र घडवताना समृद्धी चे ध्येय काय असावे..शेतकऱ्यांची मुले शिकली तर काय चमत्कार करू शकतात..?..सहिष्णुता..उत्तम नेतृत्व..घरंदाज संस्कार..संकल्प सिद्धी.. व जनकल्याण तळमळ हे सर्व आपल्याला वारणा खोऱ्याच्या प्रगतीवरून दिसून येते..
..बळीराजाच्या कष्टाला योग्य वाव मिळाला तर सहकाराची गंगोत्री कशी सर्वांना समृद्ध करते. हि किमया विश्वाला दाखवून देणाऱ्या मा.आमदार डॉ.विनय जी कोरे साहेब यांना आजच्या या वाढदिना दिवशी हार्दिक शुभेच्छा *"
..लिंगायतांचा बुलंद आवाज, 
वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे मार्गदर्शक, 
वारणा उद्योग समुहाचे अध्यक्ष लोकनेते आ. मा. विनयजी कोरे साहेब (सावकार ) 
यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा 💐🎂
            प्रदीप साखरे 
🔸वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन🔸लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र, लिंगायत  TV Live

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लिगल डिपार्टमेंटच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ॲड.राणीताई स्वामी यांची नियुक्ती



अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लिगल डिपार्टमेंटच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ॲड.राणीताई स्वामी यांची नियुक्ती
लातूर दि प्रतिनिधी :- 
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या लिगल डिपार्टमेंटच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी ॲड.राणीताई स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ॲड.राणीताई स्वामी गेली अनेक वर्षे झाले संघटनेचे काम करत आहेत.त्यांच्या कामाची दखल घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांनी त्यांना महाराष्ट्राच्या लिगल डिपार्टमेंट च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर त्यांची निवड करून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.राणीताई या एल.एल.बी.पास असुन त्यांचे एल.एल.एम चे शिक्षण सुरू आहे.त्या समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात.संपूर्ण महाराष्ट्रभर त्या संघटनेचे कामकाज कशाप्रकारे तळागाळापर्यंत पोहोचेल याचा प्रयत्न करत असतात.ही संघटना आज दिली रजिस्टर आहे.ग्रामीण भागात दारूबंदीचा विषय असेल,महिला सक्षमीकरण असेल यामध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्य सुरू आहे.आणि हे पोहोचविण्याचे काम ॲड.राणीताई स्वामी मोठ्या प्रयत्नाने करत आहेत.त्यांच्या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Saturday, October 2, 2021

विरोधकांना कोलांटउड्या मारणारांच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याची वेळ यु टी जाधव चेअरमन सां जि प्राथ. शिक्षक बँक


विरोधकांना कोलांटउड्या मारणारांच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याची वेळ
 यु टी जाधव चेअरमन सां जि प्राथ. शिक्षक बँक
सांगली दि 2 :-  प्रतिनिधी 
उमेश पाटील 
  सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या विरोधी नेते व संचालकांचे खोटे बोल पण रेटून बोल हा फंडा वारंवार उघड होत असल्याने त्यांच्यावरील सभासदांमधील विश्वासाहार्यता कमी होऊ लागल्याने त्यांनी आता इतर संघटनांतून कोलांटउड्या मारून शिक्षक बँकेवर संचालक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बंदुक ठेऊन हवेत बार काढण्याचे तंत्र अवलंबले आहे.

परंतु शिक्षक बँकेचे सभासद सुज्ञ व जागरूक आहेत. त्यांना हिताचा कारभार करणारी व सभासदांच्या उन्नतीबरोबर समाजात कामधेनूची उंची वाढविण्याचे काम शिक्षक समितीच करू शकते. हा विश्वास सार्थ ठरल्याने सत्तेसाठी वाट्टेल ते बिनबुडाचे आरोप करणाऱ्या विरोधी सक्रिय टोळीचा बंदोबस्त त्यांच्या कर्मानेच होणार आहे.

सर्व कर्जावरील व्याजदर टप्प्या टप्प्याने कमी करणे, टप्प्या टप्प्याने डिव्हीडंट वाढविणे, दुर्दैवी शिक्षक सभासदांच्या कुटुंबास वरदायणी ठरलेली मृत संजीवनी योजना, वैद्यकीय मदत, एटीएम, आरटीजीएस, एन ई एफ टी, कोअर बँकिंग प्रणाली, असे अनेक निर्णय घेण्यात आम्ही यशस्वी झाल्याने

सामान्य सभासदात, जनमानसात , व सांगलीसह सोलापूर जिल्ह्यात सांगली शिक्षक बँकेची प्रतिमा कामधेनू म्हणून उंचावली आहे. त्याचा सार्थ अभिमान आमच्यासह जिल्ह्यातील सभासदांना आहे.त्यामुळेच राज्यातील अनेक जिल्हयातून सांगली शिक्षक बँकेचे स्वागत करण्यासाठी प्राथमिक शिक्षक बांधव आसुसलेले आहेत.

ज्यांनी नेहमीच शिक्षक बँकेवर शिंतोडे उडवण्यासह ,सोलापूरकर सभासदांचा  द्वेष केला तेच आता मताच्या जोगव्यासाठी पायघड्या घालू लागले आहेत. परंतु तुमची आजपर्यंतची रणनीती त्यांनी ओळखली असुन योग्य वेळेची वाट पाहात आहेत. 

त्यामुळे सांगली जिल्हयातील विरोधी गटात बेडुक उड्या मारून सामील झालेल्या व गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांनी जरा सबुरीने घ्यावे व तुमच्या संचालक व नेतेमंडळींना तोंड उघडायला सांगावे. आम्हाला केले जाणारे सवाल त्यांनाच करा तुम्हाला तेच उत्तर देतील.विनाकारण तुमचे खांद्ये झिजवु नका.
यावेळी राज्यनेते विश्वनाथ मिरजकर, माजी राज्य कोषाध्यक्ष किरणराव गायकवाड, राज्य संघटक सयाजीराव पाटील, पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष किसनराव पाटील, पार्लमेंटरी बोर्ड सचिव शशिकांत भागवत, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, सरचिटणीस दयानंद मोरे, व्हा . चेअरमन राजाराम सावंत, तुकाराम गायकवाड, शशिकांत बजबळे, रमेश पाटील, सुनिल गुरव, महादेव माळी, शिवाजी पवार, श्रेणिक चौगुले, अर्चना कोळेकर, सदाशिव पाटील, श्रीकांत माळी, हरिबा गावडे, बाळासो आडके आदी संचालक उपस्थित होते.

दत्तवाड मध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा


दत्तवाड मध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा
दत्तवाड दि  2  :- प्रतिनिधी  रमेश मिठारी

     कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दत्तवाड  येथील ज्येष्ठ नागरिक संघटनेचे संस्थापक व सामाजिक कार्यकर्ते भाऊसो चौगुले व बंडा परीट यांच्या विशेष प्रयत्नाने दत्तवाड येथील रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृह येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ वयोवृद्ध श्रीमती ताराबाई दत्ता पुजारी वय 96 वर्षे, दस्तगीर इमाम पाकजादे वय वर्षे 92 व मारुती महादेव सूर्यवंशी वय वर्षे 85 अशा या ज्येष्ठांचा सत्कार सरपंच  चंद्रकांत कांबळे व प्राध्यापक जे. पी. जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आला या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त प्राध्यापक जे पी जाधव सर यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले आज समाजात ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा महत्वपूर्ण घटक असल्याने त्यांचे राहणीमान सुसह्य व्हावे व त्यांच्या आरोग्याच्या सोयी चांगल्याप्रकारे होण्याकरता यासाठी घरातील कुटुंबांनी योग्य प्रकारे त्यांची काळजी घेणे ही काळाची गरज आहे कारण त्यांच्या वयोवृद्ध मुळे व वार्धक्यामुळे शरीर जीर्ण झालेले असते आणि त्यातच शारीरिक व्याधी मागे लागतात शारीरिक व्याधी साठी वैद्यकीय उपचारांची गरज या वयात असते कारण म्हातारपण हे नैसर्गिकतेने बहाल केलेले दुसरे बालपण होय त्याकरिता ज्येष्ठांचे ही शारीरिक व मानसिक आणी आरोग्याचे निवारण व्हावे यासाठी नियमित योगासने करून आपला आयुष्य जास्तीत जास्त कशा प्रकारे टिकवावा याबद्दल महत्वपूर्ण माहिती या कार्यक्रमावेळी दिले याप्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच चंद्रकांत कांबळे प्राध्यापक जे.पी. जाधव सर, बाबा महाराज मठाचे श्री भालचंद्र पाटील ,ग्रामपंचायत सदस्य नूर काले, श्री शशिकांत उपाध्ये ज्येष्ठ पत्रकार रमेशकुमार मिठारे व मिलिंद देशपांडे आदी मान्यवरांसह माजी सरपंच कुबेर कल्लाप्पा कमते दत्तात्रय सुतार सुभाष शेंडगे, गुलाब अली मुल्ला, मारुती कुंभार, विष्णू खरपी आणि धनपाल सुरवंशी आधी ज्येष्ठ नागरिक यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रमेशकुमार मिठारे यांनी केले स्वागत व प्रास्ताविक भाऊसो चौगुले व आभार बंडा परीट यांनी केले


Friday, October 1, 2021

मिरज दंगलीतील संशयितांवर गुन्हे मागेमिरज दंगलीतील १०६ जणांवरील गुन्हे मागेजिल्हा न्यायालयाचे आदेश ः सामाजिक सलोख्यासाठीचा शासन प्रस्ताव मान्य


मिरज दंगलीतील संशयितांवर गुन्हे मागे
मिरज दंगलीतील १०६ जणांवरील गुन्हे मागे
जिल्हा न्यायालयाचे आदेश ः सामाजिक सलोख्यासाठीचा शासन प्रस्ताव मान्य


सांगली दि  2 :- 
प्रतिनिधी उमेश पाटील 

 मिरजेत सन २००९ साली झालेल्या दंगल प्रकरणी संशयित १०६ जणांचे गुन्हे मागे घेण्यात आले. सामाजिक सलोखा रहावा यासाठी गुन्हे मागे घ्यावेत, असा प्रस्ताव राज्य शासनाने दिला होता. तो जिल्हा न्यायालयाने मान्य केला. यात मुख्य सूत्रधार म्हणून आरोप झालेले माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, विकास सुर्यवंशी, सुनिता मोरे, राष्ट्रावादीचे अभिजीत हारगे, शाहिद बेपारी, इम्रान नदाफ यांचा समावेश आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी याबाबतचा आदेश दिला.
अधिक माहिती अशी, की मिरज येथे गणेशोत्सव काळात वादग्रस्त कमान उभी करण्याच्या कारणातून दंगल उसळली होती. तीत पोलिस व नागरिकांवर दगडफेक करुन सार्वजनिक मालमत्तेचे दीड लाखाचे नुकसान केल्याबद्दल १०६ जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. त्यात माजी महापौर बागवान हे मुख्य सूत्रधार असल्याचा खुलासा खुद्द तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी केला होता.
गेल्या बारा वर्षांपासून या प्रकरणात खटला सुरु आहे. हा खटला मागे घेण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आणि न्यायालयाकडे याबाबत परवानगी मागितली. सत्र न्यायालयाने दाखल खटले मागे घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे १०६ जणांवरील आरोप रद्द केले. संशयितांकडून अशा प्रकराचे कृत्य पुन्हा झाले नाही. सामाजिक सलोखा राखण्यासाठी हा निर्णय गरजेचा आहे, असे शासनाने प्रस्तावात म्हटले होते. आरोपींनी केलेले विशिष्ट कृत्य व त्यांचा सहभाग स्पष्ट होत नाही. केवळ साक्षीच्या आधारावर आरोपी दोषी ठरवण्याची शक्यता नाही. रेकॉर्डवरील कागदपत्रे व पुरावे पुरेसे नाहीत. आरोपीवर खटला चालवल्याने सार्वजनिक शांततेस बाधा येइल म्हणून खटला मागे घेऊन आरोपींना मुक्त करण्याची विनंती मान्य करण्यात येत असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
साक्षीदारांनी या प्रकरणात नावे सांगितली, मात्र प्रत्येक संशयिताची विशिष्ट भूमिका सिद्ध झाली नाही. दंगलीत सहभागी झालेल्या व्यक्तीनी पोलिस कर्मचारी व जनतेवर दगडफेक केली, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे. आरोपींनी नुकसानीची एक लाख ६० हजार रुपये रक्कम जमा केली आहे, असा उल्लेख आदेशात आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. मिरज दंगलीच्या गुन्ह्यात यापूर्वी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश खाडे, माजी नगरसेवक मकरंद देशपांडे, नगरसेवक पांडूरंग कोरे यांच्याविरुद्ध दाखल खटले २०१७ मध्ये शासनाने मागे घेतले आहेत. 

मा. पवार साहेबांच्या कार्याला कलेद्वारे अभिवादन पत्रकार विनायक चिवटे यांचे सुपुत्र चि.दिग्विजय याची कलाकृती


 मा. पवार साहेबांच्या कार्याला कलेद्वारे अभिवादन पत्रकार  विनायक  चिवटे यांचे सुपुत्र  चि.दिग्विजय याची कलाकृती
..सोलापूर दि.29..आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री व नामदार श्री शरदचंद्र पवार साहेब 
यांच्या राजकीय कार्याला एका बाल कलाकाराने आपल्या अंगभूत कलेद्वारे अभिवादन केले आहे.
..लिंगायत टि. व्ही.चॅनेल चे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी श्री.विनायक सुधीर चिवटे यांचे सुपुत्र चि.दिग्विजय हा उत्तम चित्रकार आहे.आपल्या या अंगभूत कलेच्या द्वारे त्याने मा.शरदराव जी पवार साहेबांचे एक सुंदर पेन्सिल रेखाचित्र बनवले आहे.त्यामुळे हे चित्र सध्या येथे अतिशय कौतुकाचा विषय बनले आहे.
.. चि.दिग्विजय हा करमाळा येथील रहिवाशी असून तो कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयात ई.आठवीच्या वर्गात शिकत आहे.
.. सदर रेखाटलेले चित्र मा.पवार साहेब यांचे पर्यंत पोहचविणे चा त्याचा मानस आहे..

https://youtu.be/tGhq2BHSfIA
लिंगायत समाजाचे हक्काचे व्यासपीठ
 📡 *लिंगायत TV Live* 📹

लिंगायत टिव्ही लाईव्ह चॅनल साठी जिल्हा ,तालुका आणि शहर  प्रतिनिधी ,पत्रकार
नियुक्ती करण्यात येणार आहे तरी या क्षेत्रात काम करू इच्छुकांनी व समाज कार्याची आवड असलेल्या बंधुभगिनी यांनी  संपर्क साधावा व या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे हि विनंती🙏
 *ईमेल: lingayattv@gmail.com* 
 *whatsap मोबाईल:  8698002755* 
 🔸 *लिंगायत TV live हे चॅनेल* *like आणि subscribe  करा* 🔸


लिंगायत धर्माच्या अनुभव मं ट प समितीस स्वतःच्या मालकीची एक एकर जागा दान, बिलोली.. जि.नांदेड चे माजी आमदार आदरणीय गंगाधर पटणे साहेब यांचा स्तुत्य उपक्रम

लिंगायत धर्माच्या अनुभव मं ट प समितीस स्वतःच्या मालकीची एक एकर जागा दान, बिलोली.. जि.नांदेड चे माजी आमदार आदरणीय गंगाधर पटणे साहेब  यांचा स्तुत्य उपक्रम
 ..नांदेड दि.२९ प्रतिनिधी प्रा अजय शेटे
..बिलोली.. जि.नांदेड चे माजी आमदार आदरणीय गंगाधर पटणे साहेब यांनी लिंगायत धर्माच्या अनुभव मं ट प समितीस स्वतःच्या मालकीची एक एकर जागा दान देवून भू - दानाचे महान पुण्यकर्म प्राप्त केले आहे..
..या महत्त्वाच्या ठिकाणच्या जागेची किंमत जवळ जवळ साठ लाख रुपये आहे.केवळ बस व 
स मितीची निष्ठा व बस व भक्ती डोळ्यासमोर ठेवून मा. पटणे साहेबांनी हि जागा कायदेशीर रित्या समितीच्या नावे केली आहे.आगामी काळात लवकरच  या जागेवरच नवीन अनुभव मंडपाची उभारणी करण्यात येईल.असे समिती तर्फे स्पष्ठ करण्यात आले..
..या समिती द्वारे देव..देश.. व..धर्मासाठी समर्पित होणाऱ्या शरणांची फळी आम्ही निर्माण करू व राष्ट्र आणि राष्ट्र धर्म  सर्वतोपरी मानून मानवतेच्या कल्याणासाठी आमची संस्था कटिबद्ध राहील.असेही समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले.
..आज रोजी आदर्श शिक्षक व जयराम अंबेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक व मार्गदर्शक मित्र मा.चंद्रकांत पाटील .. साव ळीकर यांच्या सेवा निवृत्तीच्या अनुषंगाने येथे  नियोजित अनुभव मं ट पा च्या फलकाची उभारणी करण्यात येवुन पूजन करण्यात आले..
..या प्रसंगी अंतर भारतीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय माजी आमदार मा. गंगाधरजी पटणे साहेब..महाराष्ट्र राज्याचे निवृत्त शिक्षण संचालक मा.डॉ.गोविंद नांदे डे..शिक्षण विस्तार अधिकारी मा.शिरीष आळं दे..राष्ट्रवादी काँग्रेस चे बिलोली तालुका अध्यक्ष मा.नागनाथ पाटील सावळी कर.. बस व अनुभव मं ट प समितीचे अध्यक्ष मा.हणमंत आप्पा औ रा दे..ज्येष्ठ मार्गदर्शक मा.शिव हार पाटील ताक बीड कर..राष्ट्रवादी काँग्रेस चे नायगाव तालुका कार्याध्यक्ष मा.श्याम भाऊ चौंडे ..युवा प्रबोधनकार मा.बसवराज गुडपे दे गावकर .. मित्रवर्य मा.केशवजी पांडा ग ळे..उपस्थित होते..
.. मा. पटणे साहेबांच्या या दातृत्वा चे समितीचे सचिव मा.शिवानंद है ब त पुरे यांनी स्वागत करून आभार मानले .

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...