Thursday, March 31, 2022

समता पतसंस्थेची आर्थिक प्रगती उच्च श्रेणीत


 समता पतसंस्थेची आर्थिक प्रगती उच्च श्रेणीत 
    सातारा, दि.1-   प्रा.अजय शेटे, 
लिंगायत लोकनेते व महात्मा बसवेश्वर स्मारक समितीचे शासकीय सदस्य व समता पतसंस्था ,कोपरगाव चेअरमन मा.काकासाहेब कोयटे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली समता पतसंस्थेने नुकत्याच संपलेल्या मार्च 2021 ते मार्च 2022 या आर्थिक  वर्ष अखेरीस उत्तुंग आर्थिक भरारी घेवून उच्च मानांकन श्रेणीत टिकून राहण्याची किमया साध्य केली आहे.
       या गत आर्थिक वर्षात संस्थेने 662 कोटी रुपयांच्या ठेवी , 526 कोटींचे कर्जवाटप,175 कोटींची गुंतवणूक,725 कोटींचा निव्वळ नफा,1188 कोटी रुपयांचे समिश्र व्यवसाय व 171 कोटी रुपयांचे व्यावहारिक आर्थिक उद्दिष्ट्य साध्य करून उत्तम सफलता प्राप्त केली आहे.सोनेतारण व्यवहारात तर गतवर्षी 80% नी विक्रमी वाढ झाली असून संस्थेच्या या सर्व यशात सर्व सभासद,हितचिंतक व  व्यवस्थापन यांचा सहभाग असून त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करून आभार मानण्यात आले आहेत.

श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा कार्यक्रम आयोजन


 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा कार्यक्रम  आयोजन 
   वडूज दि.1-  प्रा अजय शेटे,प्रतिनिधी लिंगायत TV live 
श्री स्वामी समर्थ ( अक्कलकोट कर महाराज )देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट , वडूज तर्फे श्री स्वामी समर्थ नगर , दहिवडी रोड , वडूज, ता.खटाव, जि.सातारा ( महाराष्ट्र) येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे श्री महाराजांचा प्रकट दिन सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
    वडूज येथील हे मंदिर शांती, समाधान व समृद्धी प्राप्तीचे अध्यात्मिक केंद्र असून अशा सोहळ्याचे हे सलग 10 वे वर्ष आहे. शनिवार दि.2.4.2022 रोजी सकाळी 7 वा.श्रींची रुद्राभिषेक पूजा व महामृत्युंजय मंत्र हवन विधी तसेच रविवार दि.3 रोजी स.7 वा.श्रींची महाभिषेक पूजा ,स. 9 वा.भजन, स.10.30 वा. स्वामी भक्त सौ.सुनेत्रा भंडारे ,विटा यांचे किर्तन होणार आहे. दु.12.30 वा.श्री स्वामी समर्थ प्रकट सोहळा , दु.12.45 वा.श्रींचा पालखी सोहळा ( मंदिर प्रदक्षिणा )  त्यानंतर दु.1 ते रात्री 9 वा.पर्यंत महाप्रसाद अन्नदान कार्यक्रम  दानशूर अन्नदाते श्री. घाडगे बंधू ( सर्व ) , ललगुण यांचे तर्फे देण्यात येणार आहे.
   तरी सर्व भाविक भक्तांनी कोरोना नियम काटेकोर पाळून कार्यक्रमाला हजर रहावे व श्रींच्या कृपा दृष्टीचा लाभ करून घ्यावा असे आवाहन श्री.शरदचंद्र गोडसे, प्रा.नागनाथ स्वामी,विद्याधर कुलकर्णी, बचाराम साबळे , नितिन लंगडे, अनिल खडके,सौ. ललिता स्वामी  व  श्री स्वामी समर्थ  देवस्थान ट्रस्ट यांचे तर्फे करण्यात आले आहे .
            कार्यक्रम पत्रिका


Wednesday, March 30, 2022

माजी पोलीस महासंचालक रामराव पवार यांचे निधन


  माजी पोलीस महासंचालक रामराव पवार यांचे निधन 
  सातारा दि 31:- प्रा अजय शेटे लिंगायत Tv live प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील चितळी या गावचे सुपुत्र व मुबई पोलीस दलामध्ये आपल्या अतुलनीय शौर्य पराक्र मा च्या जोरावर अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर पोहचलेले मा.रामराव पवार साहेब यांचे आज पहाटे 1.30 वा.पुणे येथील घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
     चितळी गावातील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाले.अतिशय प्रामाणिक, सरळमार्गी,तत्वनिष्ठ व शिस्तबद्ध सेवक ते जगातील दोन नंबरचे समजले जाणाऱ्या मुंबई पोलीस दलातील उच्च अधिकारी अशी त्यांनी आपली नोकरीची कारकीर्द  सतत चढत्या आलेखात ठेवून गाजवून सोडली.पोलीस दलातील त्यांच्या दराऱ्याची अंडरवर्ल्ड ला पण आदरयुक्त भीती वाटत असे.पोलीस दलातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
      पोलिस महासंचालक कै.रामराव पवार ,काका हे ठाणे येथील अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार साहेब यांचे वडील आहेत.त्यांचे पार्थिव आज दुपार पर्यंत त्यांच्या मूळ गाव चितळी येथे आणण्यात येणार असून सायंकाळी अंतिम अंत्यसंस्कार होणार आहेत.
    त्यांना गावाकडे सर्वजण काका या नावाने ओळखत असतं.
चितळी गावच्या सामाजिक..राजकीय..शैक्षणिक..दैवी कार्यात त्यांचे नेहमीच मोठे योगदान रहात असे..
    त्यांच्या निधनाने चितळी सह खटाव तालुका व महाराष्ट्र पोलीस दल यांना धक्का बसला असून परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हिच परमेश्वर चरणी प्रार्थना लिंगायत TV live आणि समस्त लिंगायत समाज सातारा जिल्हा यांचे वतीने  भावपूर्ण श्रद्धांजली

Saturday, March 26, 2022

जुनी सायकल करा दान..शिक्षण घेवूद्यात , प्रभूराज प्रतिष्ठान,लातूरयांचा उपक्रम


जुनी सायकल करा दान..शिक्षण घेवूद्यात , प्रभूराज प्रतिष्ठान,लातूर
यांचा उपक्रम 
सातारा, दि.26 -  प्रा . अजय शेटे लिंगायत TV live प्रतिनिधी
प्रभूराज प्रतिष्ठान,लातूर च्या वतीने मौजे 
हरंगुळ येथे मोलमजुरी करून उपजिविका करणाऱ्या काही कुटुंबातील मुलींना जिल्हा प्रशाला शाळेत शिकण्यासाठी काही किलोमीटर वरून चालत येजा करावे लागते.त्यांना शिक्षण घेण्यासाठी येणारी अडचण व संभाव्य समस्या लक्षात घेवून काही मित्रांनी एकत्र येवून ' जुनी सायकल दान करा ' हा उपक्रम राबव ला .यात सामाजिक कार्यकर्ते उमाकांत क्षीरसागर यांनी  सुरुवातीला दोन सायकली जमा केल्या व त्यांची दुरुस्ती करून त्याला संपूर्ण नवीन स्वरूप देवून चालविण्यास योग्य बनवल्या व या गरजू कुटुंबातील मुलींना वाटप करण्यात आल्या.
     अशा प्रकारचे उपक्रम व सामाजिक कार्य करण्यासाठी समाजातील व्यक्तींनी नवनवीन कल्पना राबवाव्यात आणि समाजातील गरजू व्यक्तींना त्याचा लाभ करून द्यावा.त्यामुळे समाजा पुढील अनेक अडचणी कमी होतील.असे आवाहन यावेळी करण्यात आले.
    यावेळी प्रभूराज प्रतिष्ठान चे अँड.अजय कलशेट्टी , समाजसेवक उमाकांत क्षीरसागर ,उपसरपंच धनराज पाटील,माऊली दहिफळे ,विशाल झुंजे पाटील,वैभव जाधव, प्रशालेचे मुख्याध्यापक,  शिक्षक व ग्रामस्थ हजर होते .

Friday, March 25, 2022

कै.नारायणराव ताडकोले यांचे उद्या प्रथम पुण्यस्मरण.



कै.नारायणराव ताडकोले यांचे उद्या प्रथम पुण्यस्मरण..
 खानापूर: दि 27  शिवकुमार कल्याणी लिंगायत TV live
 कै.नारायण रामजी ताडकोले यांचे प्रथम पुण्यस्मरण दिन  दिनांक २९ मार्च मंगळवार रोजी खानापूर  येथे त्यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात येणार असून या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ताडकोले कुटुंबियांनी केले आहे.
देगलूर तालुक्यातील  खानापूर येथे नारायणराव ताडकोले यांचा जन्म तसा एक सधन शेतकरी कुटुंबात झाला.त्यांचे आईवडील
 कै.रामजी व गंगाबाई यांना दोन मुली व नारायणराव हे एकुलते पुत्र होते, अर्थातच एकुलता एक मुलगा असल्याने  ते आईवडीलांचे लाडके होते,कै ताडकोले यांनी त्याकाळातील माध्यमीक शिक्षण घेतलं होतं,समाजकार्याच्या आवडीने कुठलाही राजकीय वारसा नसतानाही त्यांनी गावातील राजकारणात सहभाग घेतला , त्यांना त्यावेळी ईरवंतरावजी अटकळे यांचे मार्गदर्शन लाभले व ते त्यांचे राजकीय गुरू होते असे काही जुने लोक आजही सांगतात, त्याबरोबरच गावातील अनेक दिग्गजांची साथ त्यांना मिळाली त्यामध्ये प्रामुख्याने नरसिंगराव राजप्पा पाटील, रेवणनाथराव पाटील (गुरुजी) हणमंतराव बाबाराव पाटील,व हणमंतराव पा.घरडे या व्यक्तींचा उल्लेख करावाच लागेल,कै.ताडकोले यांनी आपल्या कुशाग्र बुद्धीमत्ता व मृदुभाषा व सुसंस्कृतस्वभाव,व गावातील सर्व स्तरातील जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची ,व भेदभाव न करता सर्वसमावेशक अशा विचार सारणीच्या जोरावर नारायणराव ताडकोले हे सन १९८५ साली गावचे प्रथम नागरिक (सरपंच) झाले आणि त्यांनी समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन सक्रिय राजकीय वाटचाल  सुरू केली.अनेक वर्षे त्यांनी गावचे सरपंच म्हणून ग्रामवासयांची सेवा करुन अनेक योजना औद्योगिक विकास महामंडळ, नृसिंह सहकारी सुत गिरणी, ग्रामपंचायत अंतर्गत किमान भाडेतत्त्वावर गाळ्यांचीनिर्मिती, आरोग्य उपकेंद्र,गाव ते फाटा पथदिवे, गावातील हेमाडपंथी महादेव मंदिर जिर्णोद्धार,या सारख्या महत्वकांक्षी व दुरोगामी योजना गावात राबवल्या व एक विकासाचे पर्व निर्माण केले व गावच्या विकासासाठी तळमळ असणारा ग्रामीण नेता म्हणून खानापूर पंचक्रोशीत   नावलौकिक मिळविला होता.

गावातील राजकारण करीत असताना त्यांनी नेहमीच खानापूरातील   होतकरू विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन, व तरुणांना मोलाचे सहकार्य ही केले होते.सोबत असणार्या अनेक बेरोजगारांना शासनदरबारी प्रयत्न करूण नोकर्या मिळवून दिले , अनेक कुटुंबांना शुन्यातून उभं केलं, गावातील व देगलूर तालुक्यावरील व जिल्हा पातळीवरील विविध राजकीय पदं त्यांनी भुषविली त्यात सरपंच, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती देगलूर, अध्यक्ष मजूर फेडरेशन नांदेड, अध्यक्ष अखिल भारतीय कुल्लेकडगी समाज, संचालक आडत व्यापारी शिक्षण संस्था (देगलूर महाविद्यालय) अशा विविध क्षेत्रातील पदांचा समावेश होता,  मात्र कधीच पदअभिमान येऊ दिला नाही, कायम ग्राउंड लेवलवर राहूनच कार्य करण्याची कसब त्यांच्या अंगी होती ,अशाच त्यांच्या जीवनप्रवासात त्यांना कर्करोग या दुर्धर आजाराने ग्रासलं मात्र आपल्या अंगी असलेल्या लढवय्या वृत्तीने  त्यांनी कर्करोग व मधुमेह यासारख्या गंभीर आजारांना झुंज देत, हे दुर्धर आजार सोबत घेऊनही जनसेवा केली ,शेवटी या आजारांमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली आणि खर्या अर्थाने लढवय्या नेता  असलेले नारायणराव ताडकोले अनंतात विलीन झाले.अशा या व्यक्तीमत्वास विनम्र अभिवादन..
 मंगळवार दिनांक २९ मार्च रोजी त्यांचे प्रथम , पुण्यस्मरण दिन  असुन पुर्वसंध्येला म्हणजेच २८ मार्च सोमवारी सायंकाळी सुप्रसिद्ध  किर्तनकार ह.भ.प कृष्णा महाराज राऊत यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले असून खानापूर व परिसरातील जनतेने या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन ताडकोले कुटुंबियांनी केले आहे.

Sunday, March 20, 2022

प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणारा साक्षात्कारी संत..श्री तुकाराम महाराज प्रा.अजय शेटे.वडूज.



प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणारा साक्षात्कारी संत..श्री तुकाराम महाराज 
प्रा.अजय शेटे.वडूज.

रविवार दि.20
 संत तुकाराम महाराज बीज..बीज म्हणजे मूळ..वारकरी संप्रदाय ज्या.बिजावर फोफावला..वाढला..समृध्द झाला.. तो संत तुकाराम यांच्या प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड घालणा ऱ्या साक्षात्कारी तत्वज्ञानावर.संत तुकाराम हे देहूचे कर्म वाणी.एका सुखवस्तू कुटुंबात संत तुकारामांचा जन्म झाला.त्यांचे आडनाव अंबिले.. व पदवी मोरे.तीन भावांमध्ये तुकाराम मधले.थोरले बंधू विरक्त वृत्तीचे.त्यातच अचानक पणे अनेक आपत्ती या कुटुंबावर कोसळ ल्या.आईवडील वारले.थोरली वहिनी वारली.नेहमी आजारी असणारी पहिली पत्नी वारली.आणि कर्जबाजारी होण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला..
..त्यामुळे संत तुकाराम हरी चिंतनात रममाण झाले.भाम गड डोंगरावर जाऊन ते आपली अभंग गाथा लिहू लागले.प्रपंचात आलेले सर्व चांगले वाईट अनुभव त्याच्या अभंगातून चित्रित झाले.त्यामुळे ते सर्वसामन्य जनांचे वाटू लागले. भागवत धर्माची पताका अंगावर घेवून त्यांनी जनजागृतीचे वादळ निर्माण केले.
..हेच देव आणि अध्यात्म भक्तीचे वादळ गेली साडे तीनशे वर्षे झाली तरी समाज मनावर गारुढ करून राहिले आहे.जमिनी पासून  आकाशाला गवसणी घालत ..समुद्राचा गहन पणा घेवून ..हिमालयाची उंची गाठत संत तुकारामांनी प्रपंच आणि परमार्थ साधत भक्ती कशी करावी .याची शिकवण आपणास दिली आहे..
..ज्या प्रमाणे देव आणि दानव यांच्या समुद्र मंथनातून निघालेले हलाहल श्री शंकरांनी प्राशन करून त्याचे अमृत बनविले.तसेच संसारातील सर्व दुःख पचवून संत तुकारामांनी श्री शंकर बनून  देव आणि अध्यात्म भक्तीचे तत्वज्ञान समाजात रुजविले.
..संत तुकारामांना प्रचलित पंडित आणि गावगुंड यांचा त्रास सोसावा लागला..पण त्यां च्या श्री  विठ्ठल भक्तीने त्यांना तारले.त्यांची अभंग गाथा इंद्रायणी ची जल परीक्षा देवून अबाधित राहिली .यातच संत श्री तुकाराम महाराज व त्यांची अभंगगाथा यांचे महान महात्म्य जाणवून येते .
..मन हा मोगरा..अर्पूनी ईश्वरा..पुनरपि संसारा येणे नाही..
हे सत्य वेळेत समजून घेवून सर्वांनी वेळे त हरी चरणात लिन होण्याचा महान संदेश देवून संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन झाले...
..श्री राम कृष्ण हरी..पांडुरंग हरी ..जय हरि विठ्ठल..जय विठू माऊली ..

Tuesday, March 15, 2022

गायीच्या वासराचा नामकरण सोहळा दिमाखात संपन्न


गायीच्या वासराचा नामकरण सोहळा दिमाखात संपन्न 
.
खानापूर ( देगलूर
 दि.15...लिंगायत टिव्ही साठी शिवकुमार कल्याणी खानापूर देगलूर
खानापूर ( देगलूर) येथील शेतकरी मारोती मारज वाडे व त्यांची पत्नी या दांपत्याने आपल्या लाल कंधारी जातीच्या सोनी गाईने नुकताच काही दिवसापूर्वी एका गोंडस वासराला जन्म दिला होता.
..ज्या प्रमाणे आपण गाईला आई मानतो त्याप्रमाणे तिच्या वासराला मुलगा मानून त्या वासराचे बारसे स्वतःच्या घरच्या आवारात मंडप घालून पाळणा सजवला.त्या दिवशी त्यांनी आपल्या सोनी गाईला व तिच्या वासराला स्वच्छ आंघोळ घालून सजवले व तिची विधिवत पूजा करून नामकरण सोहळ्यासाठी तयार केले.त्यानंतर वासराला छान सजविलेल्या पाळण्यात ठेवून सुवासिनी महिलांकडून घुगऱ्या व पेढे वाटून पाळणा गीते म्हणण्यात आली. व वासराचे नाव  ' बसवण्णा ' ठेवण्यात आले.नंतर सर्व शेजारी व आप्तेष्टांना गोडधोड अन्नदान करण्यात आले.त्यामुळे संपूर्ण खानापूर मध्ये या वासराच्या बारशाची लगबग पहायला मिळाली.
..या  बारसे उपक्रमामुळे भूतदयेचा एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवण्यात आला.या मारजवडे दांपत्याला पूर्वीपासून पशुधना चे संगोपन करण्याचा छंद आहे.दरवेळी आपल्याला दूध देवून आपले पोषण करणाऱ्या व कुटुंबाला हातभार लावणाऱ्या या मुक्या प्राण्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्यांनी या बारसे सोहळ्याचे आयोजन केले.
..पूर्वीच्या काळी शेतीसाठी बैलांची मागणी मोठ्या प्रमाणात असायची हे बैल सांभाळण्याचा खर्च खूप मोठा येत असे.आता शेतीचे यांत्रिकीकरण झाले असून या बैलांचा वापरच राहिला नाही.त्यामुळे  हे पशुधन काळाच्या ओघात नामशेष होईल का काय ? अशी भीती वाटून राहिली आहे.या गोधन..पशुधन वंशाची जोपासणूक होणे अत्यंत गरजेचे आहे.यासाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी देशी गाईचे महत्त्व ओळखून गोपालन करण्याची गरज असल्याचे श्री.मारोती मारज वाडे यांनी यावेळी सांगितले.
..दरम्यान आपल्या पोटच्या मुलांप्रमाणे जनावरांना देखील जीव लावणारे कुटुंब नव्याने पहायला मिळाल्याची भावना खानापूर पंचक्रोशीतील नागरिकांनी व्यक्त केली.

श्री आद्य जगदगुरु रेणूकाचार्य जयंती वीरशैव बांधवानी मोठया भक्ती भावाने साजरी करावी.. ईश्र्वरस्वामी.. होळी मठ .

 श्री आद्य जगदगुरु  
रेणूका चार्य जयंती वीरशैवानी  मोठया भक्ती भावाने साजरी करावी.. ईश्र्वरस्वामी.. होळी मठ यांचे भावनिक आवाहन..
..सातारा.. दि.15....प्रा.अजय शेटे.. वडूज. विशेष लेख 
बुधवार दि.16 मार्च 2022 रोजी श्रीआद्य जगद्गुरू रेणूकाचार्य यांची जयंती आहे.जगातील सर्व धर्मांमध्ये वीरशैव हा एक प्राचीन धर्म मानला जातो.या धर्माला प्राचीन इतिहास असून युगायुगांची परंपरा लाभली आहे. इष्टलींग धारणेच्या वीर व्रताचे प्रबोधन करणारा .. पंचसुत के नाकारणारा .. अन्य धर्मांना विरोध न करता त्यांच्यात समनव्यय साधण्याचा उपदेश करणारा..लिंग दिक्षे मध्ये वर्ण..जाती..लिंगभेद न पाळणारा.. लिंगांग सामरस्यं बोधक विद्द्येत रममाण व्हा असा उपदेश करणारा असा हा धर्म होय.या धर्मात व्यक्तीची योग्यता व उत्कट शिवभक्ती पाहून ..तिच्या जातीचा विचार न करता दिक्षा दिली जाते.दिक्षेनंतर सर्वांना शिवस्वरूप मानण्यास हा धर्म सांगतो.
..या धर्माने उद्योगाचे व श्रमाचे महत्त्व प्रतिपादन केले आहे.स्वकष्टार्जित संपत्ती प्रथम शिवार्पण करून नंतर गुरु..लिंग..जंगम यांना आणि समाजातील दुर्बल घटकांना दान करून मग तिचा उपभोग घेण्यास सांगितले आहे.त्याप्रमाणे अन्न देखील शिवा र्पित  करून प्रथम भुकेल्यास देवून नंतर स्वतः ग्रहण करण्यास सांगितले आहे.अशी शिकवण देणारा जो धर्म आहे.त्याला वीरशैव धर्म म्हणतात.

.. वेद..आगमव उपनिषद् यातून वरील तत्वांचे प्रतिपादन केले आहे. हि तत्वे लोक मनात बिंब व ण्या साठी शिवाच्या आज्ञेने पंच  शिवगणांनी लिंगा तून प्रादूर्भुत होऊन या धर्माची प्रतिष्ठापना केली असे परंपरा मानते.हे पंच शिवगण म्हणजेच पंचाचार्य  असून हेच वीरशैव धर्माचे संस्थापक होत.या शिवगणानी अनुक्रमे कृतयुगात एकाक्षर..द्युक्षर.. त्र्यक्षर..चतुरक्षर.. व पंचाक्षर या नावांनी त्रेता युगात एकवकत्र.. द्विवक्र.. त्रिवक्र.. चतुर्वक्र .. व पंचवक्र या नावांनी ..द्वाप्रारयुगात रेणुकदारुक..घंटा कर्ण..धेनु कर्ण.. व विश्व कर्ण या नावांनी आणि कलियुगात रेवणाराध्य .. मरुळाराध्य.. एकोरामाराध्य ..पंडिताराध्य व विश्वाराध्य या नावांनी अवतार घेतला.पंचाचार्यांनी रंभापुरी..उज्जयिनी..
केदार.. श्रीशैल व काशी क्षेत्र येथे पंच पिठांची स्थापना केली . हीचं वीर शैवांची महापिठे होत.
..पंचाचार्यांच्या या दिव्य परंपरेतील श्री जगद्गुरू रेणुकाचार्य हे रंभापूरी पिठाचे आचार्य होते.फाल्गुन शुद्ध त्रयोदशीला तेलंगणा प्रांतातील सुप्रसिद्ध कोल्ली पाकी क्षेत्रातील सोमेश्वर महा लिंगातून ते प्रादूर्भूत झाले.या प्रदेशाला ' श्रीसिद्धांत शिखामनी ' त त्रिलींग देश असे म्हटले जात असे.या शिवाय इष्टलींग ..प्राण लिंग व भाव लिंग या त्रिलिंगाची पूजा करणाऱ्या वीर शैवांची संख्या या प्रदेशात अधिक असल्यामुळेही याला त्रिलींग देश असे म्हटले आहे.
श्री शैल मल्लिकार्जून..कोल्ली पाकी सोमेश्वर..आणि द्राक्षाराम क्षेत्रातील भीम नाथ ( रामनाथ ) हि तीन लिंगे या प्रदेशात असल्यामुळे याला त्रिलींग देश असे म्हटले जात असे.
..या शिवाय इष्टलिंग ..प्राणलिंग व भावलिंग या त्रिलिंगांची पूजा करणाऱ्या वीर शैवांची संख्या या प्रदेशात अधिक असल्यामुळेही याला त्रिलिंग देश असेही एक मत आहे.विशेष म्हणजे सोमेश्वर लिंगातून रेणुका चार्य  ..भीमनाथ लिंगातून एकोरामाराध्यव मल्लिकार्जून लिंगातून पंदितराध्य यांचा उद्धार झाल्यामुळे हि तीनही लिंगे वीरशैवांची श्रद्धास्थाने होत.
J
..सोमेश्वर लिंगातून प्रादुर्भूत झाल्यावर श्री जगद्गुरू रेणुकाचार्य आकाश मार्गाने मलय पर्वतावर गेले.आणि तेथे अगस्त्य महर्षीं ना त्यांनी शिवद्वैताचा उपदेश केला.तोच उपदेश श्री शिवयोगी शिवाचार्यानी ' श्रीसिद्धांत शिखामनी ' या ग्रंथात ग्रंथित केला आहे. महर्षी अगस्ति नी प्रत्यक्ष श्रीरामाला आदित्यहृदय कवचाचा उपदेश केला होता.अशा थोर अगस्त्य ऋषिना दिक्षा देवून आणि शिवद्वैवता चा उपदेश करून त्यांच्या मनातील संदेह जगद्गुरू रेणुका चार्य यांनी दूर केला .यावरून त्यांचे थोरपणही सहज लक्षात येते.
.त्यांनी जो उपदेश केला त्याचा सारांश अशा प्रकारे सांगता येईल .धर्म हा आचरणासाठी असतो.अहिंसा.. अस्ते य..सत्य..ब्रह्मचर्य.. दया..क्षमा..दान..पूजा..जप.. व ध्यान यांचे आचरण करणे म्हणजे धर्म होय.धर्माचरण केल्यामुळे व्यक्तित्वाचा विकास होतो.आणि व्यक्तित्व विकसित झाले मुळे समाजाचे कल्याण साधते.धर्माचरण करताना अन्य धर्म तत्वांचे खंडन करू नये.शिवदिक्षा घेतलेल्या लोकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये.जीवाचा अध्यात्मिक विकास होऊन त्याला शिवभाव प्राप्त व्हावा यासाठी षट स्थलांचे आचरण करावे. षटस्थ लातील 101 उपस्थले म्हणजे मानवी मनाचा क्रम बद्ध विकासच होय.जगद्गुरू रेणुकाचार्या नी अगस्त्य महर्षिना पदविडी  सूत्रांचा उपदेश केला. पडविडी म्हणजे पद विधी होय.श्रीगुरु ला शरण गेल्यावरच कोणतेही तत्व प्राप्त करून घेता येते.असा या सूत्राचा अर्थ होय.दिक्षाविधी स्पष्ट करताना सामाजिक असमानता दूर करण्याचा त्यांनी जसा उपदेश केला त्याप्रमाणेच सोपाधिक.. निरुपाधिक व सहज असे दान प्रकार सांगून आर्थिक असमानता दूर करण्याचीही शिकवण दिली .याशिवाय जे लोक शिव यात्रा करतात त्यांच्यासाठी अन्न व जलाची व्यवस्था करण्यास सांगितले.श्री.रेणुका चार्य हे एक महान पुरुष होते. शुद्धा चरण ..शुद्ध विचार आणि 
अष्टमहासिद्धी या गुणांनी ते संपन्न होते.तीन कोटी आचार्या ची रूपे धारण करून त्यांनी श्रीलंकेत त्रिकोटी लिंग स्थापना केली.असे ते महासिद्ध पुरुष होते.त्यांनी कलियुगात रेवण सिद्ध या नावाने अवतार घेतला.आद्य शंकराचार्यांना लिंग प्रदान केले.कोल्हापूरच्या गोरक्ष राजाचे गर्वहरण केले.कांची मध्ये वरद राज मूर्तीचे शिरकंपन थांबविले.अशा त्यांच्या अनेक चमत्कार कथा ' रेणूका विजय पुराणात ' वर्णिलेल्या आहेत.अशा या महान रेणुका चार्य स्वामींची जयंती फाल्गुन शुद्ध त्रयोदशी ..बुधवार दि.16 मार्च रोजी सर्व वीरशैवानी अवश्य साजरी केली पाहिजे व त्यांनी जो महान उपदेश केला त्या बद्दल त्यांना मानवंदना दिली पाहिजे .असे अधिकार वाणीचे आवाहन ईश्वर स्वामी होळीमठ यांनी सर्व वीरशैवाना केले आहे.

Saturday, March 12, 2022

महात्मा बसवेश्वर समितीच्या सदस्य पदी लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक व लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांची फेरनिवड


महात्मा बसवेश्वर समितीच्या सदस्य पदी लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक व 
लिंगायत  लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांची फेरनिवड 
सातारा.. दि.12....प्रा.अजय शेटे
महाराष्ट्र शासनातर्फे मंगळवेढा ( सोलापूर ) येथे उभारण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर समितीच्या सदस्य पदी लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक व लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.
..तसेच लिंगायत संघर्ष समितीचे ज्येष्ठ नेते मा.आमदार मनोहर पटवारी..राज्य संघटक मा.गुरुनाथ बडूरे..मराठवाडा अध्यक्ष मा.उदय चौंडा..मंगळवेढा चे युवा नेते अँड.शैलेश हावनाळे..या पदाधिकाऱ्यांचा समावेश पण या स्मारक समितीत करण्यात आला आहे.
..या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा आम्हाला सार्थ अभिमान असून लिंगायत बांधवांना याचा आनंद झाला आहे.या सर्व समिती सदस्यांचे लिंगायत संघर्ष समिती ..महाराष्ट्र राज्य तसेच वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन..अभिनंदन ..

Friday, March 11, 2022

म.बसवेश्वर पुतळा विटंबना प्रकरणी जाहिर निषेध


म.बसवेश्वर पुतळा विटंबना प्रकरणी जाहिर निषेध 
वडूज दि.11...प्रा.अजय शेटे..
संभाजी नगर ( बजाज नगरी.. वाळूंज ) येथील श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे सप्ताह चालू असताना ५० ते ६० समाज कंटकानी एकत्र येत मंदिरा शेजारी असलेल्या म.बसवेश्वर महाराज  पुतळ्याची विटंबना केली. हि घटना सामाजिक दृष्ट्या अतिशय निंदनीय असून सदर 
समाज कंटकाना त्वरित अटक होऊन त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा व त्यांना अतिशय कडक शिक्षा व्हावी. अन्यथा  वीरशैव लिंगायत समाज संघटना संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन उभे करेल .
यासाठी मा.तहसीलदार श्री.किरण जमदाडे वडूज..खटाव यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनावर अध्यक्ष श्रीकांत म्हाम णे..उपाध्यक्ष  प्रा.अजय शेटे..सरचिटणीस अमित गाडवे..खजिनदार नितीन येवले.. श्री.अविनाश तोडकर..श्री.सोमनाथ येवले..
 श्री.राहुल  म्हामणे ..श्री.अमोल म्हामणे..  म.बसवेश्वर समिती महाराष्ट्र राज्य  सर चिटणीस श्री. प्रदिप शेटे..समन्वयक सौ.अर्चना नितीन येवले व सर्व समाज बांधव यांच्या सह्या करण्यात आल्या आहेत.

Thursday, March 10, 2022

खानापूर येथे चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन...


खानापूर येथे चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन...
देगलूर (खानापूर) दि 10 :-
शिवकुमार कल्याणी (खानापूर)  लिंगायत TV live प्रतिनिधी
देगलूर तालुक्यातील खानापूर येथे हरीहर भजनी मंडळ,व सद्गुरू सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने दि १२ रोज शनिवार रात्री ८वाजत ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या एकदिवसीय प्रवचन तथा दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील भक्तीमार्गाचा पुरस्कार करणा-या वारकरी सांप्रदायामध्ये देगलूरकर घराण्याचे नाव मोठ्या अदबीने घेतले जाते. २५० वर्षांपुर्वी गुंडामहाराज देगलूरकर यांनी सुरु केलेली ही परंपरा त्यांचे वंशज चंद्रशेखर महाराज, चैतन्य महाराज व गुरुराज महाराज देगलूरकर २१ व्या शतकामध्येही समर्थपणे सांभाळत भक्तीमार्गाचा प्रचार व प्रसार करीत आहेत.
देगलूरकर घराण्याने कीर्तन, प्रवचन,चक्रीभाजन, वारी, प्रवचन, चातुर्मास सेवा आणि  लेखनाच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात वारकरी सांप्रदायाचा खूप मोठा प्रसाराचे अतुलनीय कार्य केले आहे.
 यामुळे आपल्या अभंगवाणीने व प्रवचनाने भक्तगण श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणार्या प्रसिद्ध प्रवचन तथा  किर्तनकार ह भ प चंद्रशेखर  महाराजांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ खानापूर पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी  घ्यावा असे आवाहन हरिहर भजनी मंडळ व सद्गुरू सेवा समिती तथा समस्त गावकरी मंडळीच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आले आहे .

खानापूर येथे चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन...

Tuesday, March 8, 2022

लिंगायत धर्म महासभा मेळावा आणि शाखा फलकाचे अनावरण उस्थाहात संपन्न


लिंगायत धर्म महासभा मेळावा आणि शाखा फलकाचे अनावरण उस्थाहात संपन्न
   मिरज दि 7 :-  सौ राणी खिलारे   प्रतिनिशी लिंगायत TV live
 म्हैसाळ ( ता. मिरज )येथे लिंगायत धर्म महासभा मिरज तालुका कार्यकारणी मेळावा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला. यावेळी येथील मुख्य आबासाहेब  शिंदे चौकात लिंगायत धर्म महासभा शाखा फलकाचे अनावरण महिला राज्याध्यक्षा  श्रीमती वैशाली पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.  त्यानंतर येथील सनबे आण्णा हॉलमध्ये कार्यकारणी मेळावा संपन्न झाला. 
      प्रारंभी महात्मा बसवेश्वर प्रतिमापूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यास अध्यक्षस्थानी आप्पासो चौगुले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लिंगायत धर्म महासभा महिला राज्याध्यक्ष श्रीमती वैशाली दिलीप पाटील,  राज्य सरचिटणीस बी.  एस. पाटील,  जिल्हाध्यक्ष राहुल बापू कोठावळे,  महिला जिल्हाध्यक्षा सौ.  रश्मी अशोक चौगुले,  जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.  प्राजक्ता नंदकुमार कोरे,  लिंगायत धर्म महासभेचे मिरज तालुका अध्यक्ष सोमनाथ माळी,  महिला तालुकाध्यक्षा श्रीमती जयश्री दीपक खिलारे,  जिल्हा सचिव प्रमोद शेटे,  जिल्हा कोअर कमिटी सदस्य कमिटी सदस्य धोंडीराम मगदूम,  मिरज शहराध्यक्ष जितेंद्र ढोले आदी मान्यवर उपस्थित होते. 
      यावेळी यावेळी लिंगायत धर्म महासभेच्या महिला व पुरुष विभागात शाखाध्यक्ष,  तालुका कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य तसेच कोअर कमिटी सदस्य निवडीची पत्रे देण्यात आली. 
      राज्य सरचिटणीस बी.  एस.  पाटील यांनी लिंगायत धर्म संविधानिक मान्यता,  अल्पसंख्यांक दर्जा याविषयी प्रशासकीय कार्याची माहिती दिली.  सध्या केंद्र सरकारकडे याविषयी लिंगायत धर्म महासभेचा प्रस्ताव विचाराधीन आहे.  यासंदर्भात दिल्लीपासून बेंगलोर पर्यंत अनेक प्रशासकीय अधिकारी तसेच धर्म मान्यता चळवळीत कार्य करणाऱ्या बऱ्याच अधिकारी, कार्यकर्त्यांचेबरोबर चर्चा केली असल्याचे बी.  एस.  पाटील यांनी सांगितले. 
       या कार्यात प्रत्येक गावचा सहभाग नोंदविण्यासाठी प्रत्येक गावामध्ये लिंगायत  धर्म महासभा  शाखा कमिटी स्थापन करावी असे आवाहन करण्यात आले.
      सध्या जैन,  शीख समाजाला ज्या निकषांवर  अल्पसंख्यांक दर्जा मिळाला आहे ते सर्व निकष लिंगायत समाज पूर्ण करू शकत असल्याने योग्य रीतीने प्रशासकीय कार्य पूर्ण केल्यास आपणास नक्कीच यश मिळणार असल्याचे बी.  एस. पाटील यांनी सांगितले.  त्यानंतर उपस्थितांनी हे मार्गदर्शन ऐकून अद्याप  ज्या  गावामध्ये नसेल तिथे शाखा कमिटी  करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.
     स्वागत , प्रास्ताविक धोंडीराम मगदूम यांनी,  आभार प्रदर्शन शाखाध्यक्ष गुरु संगलगे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.  संजय पाटील सर आणि महावीर देसाई सर यांनी केले

Sunday, March 6, 2022

हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. मीरा टाले-बुट्टेकर यांची निवड.

हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा पदी सौ. मीरा टाले-बुट्टेकर यांची निवड.
    हिंगोली दि 7:-  प्रतिनिधी- लिंगायत धर्म महासभा (महाराष्ट्र राज्य) च्या हिंगोली महिला जिल्हाध्यक्षा  पदी अ‍ॅड. सौ. मीरा सतीश टाले-बुट्टेकर (बी. एससी., एल. एल. एम.) यांची निवड करण्यात आली. महिला राज्याध्यक्षा श्रीमती वैशाली दिलीप पाटील यांनी त्यांची निवड केली या निवडीसाठी लिंगायत धर्म महासभा राज्य अध्यक्ष आर. एस. देशिंगे (पुणे), राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील आणि हिंगोली जिल्हा अध्यक्ष गजानन होनराव यांचे सहकार्य लाभले.

Saturday, March 5, 2022

लिंगायत समाजातील उद्योजक पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी डॉ.नरेंद्र दाभोलकर पुरस्काराने सन्मानित


लिंगायत  समाजातील उद्योजक पद्मभूषण बाबासाहेब  कल्याणी डॉ.नरेंद्र दाभोलकर पुरस्काराने सन्मानित 
..सातारा.. दि.5...रविंद्र वाकडे 
सातारा जिल्ह्यातील कोळे गावचे सुपुत्र भारत फोर्ज या कंपनीचे मालक व यशस्वी उद्योजक श्री.बाबासाहेब  कल्याणी यांना सन 2021 चा डॉ.नरेंद्र दाभोलकर सामाजिक पुरस्कार जाहीर करण्यात येवून पुणे येथे प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार दरवर्षी सातारा नगरपालिकेच्या वतीने सामाजिक कार्य करणाऱ्या महान व्यक्तीस प्रदान करण्यात  येतो.एक लाख रुपये..सन्मानचिन्ह..मानपत्र ..शाल..श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
..उद्योजक बाबासाहेब कल्याणी व श्रीमंत उदयनराजे भोसले यांचे पूर्वीपासून अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत.या संबंधाच्या जोरावरच श्री.कल्याणी यांनी आपली जागा रू.एक मात्र भाडे करार तत्वावर सातारा नगरपालिकेला दिली आहे.सातारा नगरपालिकेचे स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रात मोठे नाव आहे. व डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचे सामाजिक कार्य खूप महान आहे.या दोन्हींच्या माध्यमातून हा पुरस्कार आपणाला मिळाला याचा आपणास खूप मोठा अभिमान वाटत आहे.असे सत्काराला उत्तर देताना उद्योजक कल्याणी यांनी सांगितले.
..उद्योजक कल्याणी यांच्या भारत फोर्ज कंपनी तर्फे महाराष्ट्रातील 100 गावात तसेच सातारा जिल्ह्यातील 28 गावांमध्ये जलसंधारण..पाणी.प्राथमिक शिक्षण..आरोग्य..वीज या क्षेत्रात सामाजिक विकास कामे चालू असून जवळ जवळ 5 लाख लोकांना यांचा फायदा होत आहे.
..  श्री.कल्याणी सदर एक लाखाचा धनादेश हा सातारा येथील गरजू व्यक्ती अथवा सामाजिक संस्थेसाठी दान केला जा वा अशी मनिषा व्यक्त करून सन्मानाने परत करत मनापासून आभार व्यक्त केले.
..श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या पुढाकाराने सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री.अभिजीत बापट साहेब..उपनगराध्यक्ष मनोज शेंडे..पुरस्कार समितीचे सदस्य विनोद कुलकर्णी.. हरिष पाटणे..अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले..सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे..यांच्या हस्ते समस्त सातारकर जनतेच्या वतीने  या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल समस्त  लिंगायत समाज  वीरशैव इंटरर्नेशनल असोसिएशन (VIA) आणि लिंगायत संघर्ष समिती यांचे वतीने अभिनंदन करणेत येत आहे

Tuesday, March 1, 2022

महाशिवरात्रीनिम्मित हेमाडपंथीय संगमेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी



महाशिवरात्रीनिम्मित हेमाडपंथीय संगमेश्वर मंदिरात भाविकांची मांदियाळी
मायणी:-दि०१ :- प्रा अजय शेटे
   मायणी  येथील प्रसिद्ध प्राचीन काळातील हेमाडपंती शिव मंदिरात यंदा महाशिवरात्री निम्मित मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी झाली होती. याठिकाणी येणाऱ्या भाविकांना प्रसादाचे वाटप शिवभक्तांकडून करण्यात आले.
           दरवर्षी याठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या उत्साहात पूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा उत्सव साजरा होतो. गेल्या दोन वर्षापासून देशावर ती कोरोना महामारी असल्यामुळे अनेक निर्बंधाना जनतेला सामोरे जावे लागले.याकाळात  धार्मिक स्थळांवर दर्शनास बंदी घालण्यात आली होती.याकारणाने कोणतेही उत्सव साजरे केले गेले नाहीत. परंतु आता परिस्थिती हळूहळू सुधारत आल्याने सरकारने निर्बंध शिथिल केल्याने महाशिवरात्रीचा यंदाचा उत्सव सर्वत्र मोठ्या आनंदात व भक्तिभावाने संपन्न झाला.
           शिवभक्तांकडून प्रसादाचे वाटप
       महाशिवरात्रीनिम्मित मंदिरास विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीत सजवण्यात आले होते.दरवर्षीप्रमाणे येथील शिवभक्त उमेशबापू पुस्तके,विजय परदेशी यांच्याकडून महाप्रसादाचा उत्कृष्टरित्या नियोजन करण्यात आले होते. या उपक्रमास अमोल भिसे,मनोहर घाडगे,विजय भोंगाळे,रंगा साळुंखे,दत्ता पाटोळे,विशाल कांबळे,तानाजी पाटोळे,विक्रम भोंगाळे यांची साथ मिळाली.तर मंदिरातील पुजारी बाबुराव पाटोळे यांनी या धार्मिक कार्यकामाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य असे नियोजन केल्याचे दिसून आले.

विशेष चौकट - *कर्तव्यासोबत व धार्मिक संस्काराचीही जोपासना*
          मायणी दुरक्षेत्राच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी महादेव मंदिरास भेट देत कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली. आपल्या कर्तव्यासोबतच आपल्या धार्मिक परंपरेच्या संस्काराची जोपासना करीत आपले पती रमेश शिंदे यांचेसोबत महादेवाचे दर्शन घेतले.त्यांच्या या कृतीचे भाविकांनी कौतुक केले.
       
    महाशिवरात्रीनिमित्त येणार्‍या भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप करताना उमेश पुस्तके, विजय परदेशी व अमोल भिसे .

    हेमाडपंथीय संगमेश्वर मंदिरास भेट देत महादेवाचे दर्शन घेताना पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर सोबत त्यांचे पती रमेश शिंदे.
        

जागतिक महिला दिना निमित्त कोल्हापूर येथे विविध कार्यक्रम


जागतिक महिला दिना निमित्त कोल्हापूर येथे  विविध कार्यक्रम 
.सातारा दि.1:- प्रा.अजय शेटे 
  श्री बसव लिंग स्वामी यांच्या आशीर्वादाने जागतिक महिला  दिन 8 मार्च चे औचित्य साधून कोल्हापूर येथील श्री बसव  केंद्र.लिंगायत समाज संस्था. व राणी चेन्नमा महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कला गुण दर्शन व मनोरंजन कार्यक्रम शनिवार दि.5 मार्च 2022 रोजी दु.3 ते 7 या वेळेत चित्रदुर्ग मठ .दसरा चौक ..कोल्हापूर या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
..या कार्यक्रमात संगीत खुर्ची स्पर्धा ..लहान व मोठा गट. स्पॉट गेम्स..लहान व मोठा गट.ग्रुप गेम्स.खाद्यपदार्थ स्टॉल .मिमिक्री.कॉमेडी नक्कल लहान गट. म.बसवेश्वर अनुभव मंटप परीक्षेचे प्रशस्तीपत्र वितरण.अशा क्रमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून इचलकरंजी च्या नगराध्यक्षा मा. सौ.अलका ताई स्वामी .मोनार्क स्टील उद्योग समूहाच्या सुप्रसिद्ध उद्योजिका मा. सौ.श्रीदेवी पाटील.तसेच सौ.वैशाली पाटील. सौ.आशा शेंडे या उपस्थितीत राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.राजश्री संतोष सावर्डेकर.उपाध्यक्षा सौ. वारणा वडगावकर..सौ.शुभांगी चितारी.. सौ.अर्चना हिडदुग्गी. श्रीमती नंदा निर्वाणी. कार्याध्यक्षा श्रीमती महानंदा पाटील.सचिव सौ.श्वेता तारळी.सहसचिव सौ.उमा आंबोळे.खजिनदार सौ.स्नेहा शिंत्रे.सल्लागार समिती सौ.सरलाताई पाटील..सौ.मंदाकिनी तंबाके.. सौ.सुजाता वाली..सौ. शिल्पश्री सावर्डेकर..सौ.कांचन ताई पाटील.सौ.सुनीता खोत.सौ.विद्या बनशोडे.कार्यकारी सदस्य सौ. दिपा निर्वाणी..सौ.पूजा आंबोळे..सौ.अवंती तंबाके.सौ.मंगल पाटील.सौ.प्रियांका पंजे.सौ.सुरेखा मुरगुडे.सौ.वैजयंती पाटील..सौ.वंदना जमदाडे..सौ.स्मिता शेटे..सौ.मधुमती मुरदंडे..सौ.शोभा मिरजे..सौ.जयश्री कोरे..सौ.मीना राजमाने..सौ.वैशाली गाडवे ..सौ.श्रद्धा पद्माई..सौ.सुजाता परमाने अशी कार्यकारी समिती गठीत करण्यात आली आहे.
..या कार्यक्रम स्थळी राणी चेन्नमा महिला मंडळाची सभासद नोंदणी पण करण्यात येणार असून विविध गुण दर्शन आणि स्पर्धा तसेच खाद्यपदार्थ स्टॉल मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक 8975848400..8830357746..9545776699 यावर पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.असे समितीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे..


युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष पदी पत्रकार प्रविण मिरजकर यांची बिनविरोध निवड


युवा पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा अध्यक्ष पदी  पत्रकार प्रविण मिरजकर यांची बिनविरोध निवड
मिरज दि 28 :- प्रतिनिधी
 : युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याची शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे बैठक पार पडली
या बैठकीत युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी प्रवीण मिरजकर यांची बिनविरोध निवड झाली. युवा पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
   युवा पत्रकार संघाच्या वर्धापदिनानिमित्त विवीध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहे. या संदर्भात शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे बैठक व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
   या वेळी बोलताना संस्थपाक अध्यक्ष यांनी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व सभासद पदाधिकारी यांना पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवून दिली कोणत्या पद्धतीने कार्यक्रम आयोजीत करण्यात येणार आहे याची थोडक्यात रूपरेषा सांगितली
 राज्यस्तरीय पुरस्कार कोणत्या पद्धतीने कोणत्या व्यक्तींसाठी आसतात या मध्ये काय काम केले पाहिजे, अशा सर्व गोष्टींची माहिती सविस्तर त्यांनी सर्व सभासद पदाधिकारी यांना दिली.
  नविन नवोदित पत्रकार यांना मार्गदर्शन केले. पत्रकार संघा मध्ये काम कोणत्या पद्धतीने केले पाहिजे
संघटना कशी चालते अशा अनेक गोष्टंविषयी माहिती त्यांनी दिली.
  तसेच युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या  कोल्हापूर महीला जिल्हा अध्यक्षपदी रविना पाटील यांची निवड करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
 राज्य महीला अध्यक्षा अर्चना चव्हाण व महिला आघाडीच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले..
यावेळी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते.

वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न


वडूज येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात संपन्न 
वडूज.दि.28. :- .प्रा.अजय शेटे. वडूज प्रतिनिधी 
येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज मध्ये मराठी राजभाषा दिन सकाळी 8 ते 10 या वेळेत  साजरा करण्यात आला.
..यावेळी  श्रेष्ठ कवी  कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन वरिष्ठ शिक्षिका प्रा. सौ.रोहिणी बडवे यांचे हस्ते करण्यात आले.
..या कार्यक्रमात प्रा.रोहिणी बडवे..प्रा.सौ.ज्योती कुलकर्णी..प्रा.अजय शेटे..प्रा. सौ.राधिका डोंबे..प्रा. संदिप तिवाटणे..प्रा.प्रशांत कुलकर्णी..विद्यार्थी..विद्यार्थिनी  यांची मराठी भाषा गुणगान करणारी भाषणे झाली..सर्वांनी मराठी भाषा गीते गायली..ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख प्रा.शंकरराव जाधव यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद भूषविले व आपले मनोगत व्यक्त केले..
..या वेळी मराठी राजभाषा का ? तिच्या अभिजात दर्जाच्या मागणीचे विशेष..मराठी भाषा इतिहास..संत साहित्य..आधुनिक कविता लेखन..तिचे संरक्षण व संवर्धन या विषयी मनोगते व्यक्त करण्यात आली..
..उच्च न्यायालय नियुक्त सदस्य डॉ.हेमंत पेठे..सतीश शेटे..नितीन जाधव..गोविंद भंडारे यांनी कार्यक्रमास शुभ चिंतन व्यक्त केले ..
..कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.सौ.मंगल काळे यांनी केली. व सूत्रसंचालन प्रा. सौ.ज्योती पाटील यांनी केले.आभार प्रा.रवींद्र येलमर यांनी मानले.
..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.सौ.वासंती शेळके..प्रा.निवास मगर..प्रा.शुभांगी पंडीत..विद्यार्थी..विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.

कोण होणार करोडपती चे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नावनोंदणी सुरु.


कोण होणार करोडपती चे नवीन पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, नावनोंदणी सुरु.
मुंबई १ :- प्रतिनिधी प्रणाली वाकड़े
बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर  पैसे जिंकण्याची संधी देणारा कोण होणार करोडपती चा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे . करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येकजण पाहतो पण हे सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे स्वबळावर आणि ज्ञानावर मिळणाऱ्या यशाची चव चाखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा . कारण लवकरच येतोय कोण होणार करोडपतीचा पुढचा सिझन हीच आहे वेळ धनलक्ष्मी,प्रतिष्ठा प्रेक्षकांची  मनं जिंकण्याची आणि  कोण होणार करोडपती' या जगविख्यात कार्यक्रमाच्या तिसऱ्या  सिझनमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे.

सोनी मराठी वाहिनीवर 'कोण होणार करोडपती' हा मराठी रियॅलिटी शो अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. मनोरंजनासोबत ज्ञानार्जन' हे वैशिष्ट्यं असणार्‍या या कार्यक्रमात स्वत:ला अवगत अ  सलेलं आणि मिळवलेलं ज्ञान तुम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं याची प्रचिती मागील दोन सिझनमुळे सगळ्यांना आली. यंदाही कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर सूत्रसंचालन करणार आहेत. स्वतःचा अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर सहभागिंशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम मोठ्या खुबीने करतात, त्यामुळे स्पर्धेतील यंदाही 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर सूत्रसंचालन करणार आहेत. 

स्वत:च्या अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर स्पर्धेतील सहभागींशी प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम मोठ्या खुबीने करतात. त्यामुळे स्पर्धेतील सहभागी स्पर्धक आत्मविश्वासाने खेळअधिक चांगल्या प्रकारे खेळू शकतात.मागच्या वर्षी सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना १० प्रश्न विचारले जात होते. पण यंदा १४ दिवस १४ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. जितके जास्त प्रश्न तितक्याच जास्त संधी. त्यामुळे 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमामध्ये त्वरित सहभागी व्हा. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २३ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. 

२३ फेब्रुवारी पासून सुरु झालेले हे प्रश्न, ८ मार्च पर्यंत विचारण्यात येणार असून ७०३९०७७७७२  या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह अँपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करून घेऊ शकतात.करोडपती होण्याचं तुमचं स्वप्न आता खऱ्या अर्थाने  साकार होऊ शकतं. ज्ञान, मनोरंजन आणि रसिकप्रेक्षकांचे प्रेम मिळवण्यासाठी तयार रहा. कारण सोनी मराठी वाहिनी लवकरच घेऊन येत आहे, 'कोण होणार करोडपती'!

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...