Thursday, July 7, 2022

खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूप..!मुलांचे आरोग्य धोक्यात ,?????


खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेला तलावाचे स्वरूप..!
मुलांचे आरोग्य धोक्यात ,?????
खानापूर दि 7 – शिवकुमार कल्याणी खानापूर प्रतिनिधी
 देगलूर तालुक्यातील खानापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणाला काल व आज  झालेल्या पावसामुळे तलावाचे स्वरूप आले आहे.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शाळेच्या पटांगणात तुडुंब पाणी साचले आहे.पावसाळ्यात शाळेच्या पटांगणात साचलेल्या पाण्याचा निचरा होण्याची कोणतीही व्यवस्था शाळा व्यवस्थापनाने केलेली नसल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे.एकीकडे शासनाकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेचे धडे गिरवले जात आहेत,तर दुसरीकडे अशा प्रकार पाहायला आढळत असल्याने स्वच्छ भारत मिशन व त्यासाठी येणारा निधी व यंत्रणा फक्त कागदावरच पाहायला मिळते का असा प्रश्न उपस्थित होतो आहे
शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी शासनाच्या वतीने दक्षतेबाबत सूचना देण्यात आल्या असतांना सुध्दा पटांगणात पाणी साचने ही खेदजनक बाब आहे.जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळल्या जात तर नाही ना ? असा प्रश्न आता अनेक पालकांना पडला आहे.विद्यार्थी हे आपल्या देशाच भविष्य आहे. त्यांच्या आरोग्याला जपणं हि शिक्षकांची व शालेय व्यवस्थापन समिती तथा गाव प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. पण हल्ली  त्याच काहीही घेणं देणं राहिलेले नाही असं नागरिकांतुन चर्चा ऐकायला मिळते.व असा आरोप पालक वर्गाच्या वतीने व्यक्त केला जात आहे.आजकाल जिल्हा परिषद शाळेत शिकणारे सर्व विद्यार्थी हे वंचीत तथा अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून आलेले आहेत.संबधीत विभागाने सदर समस्येकडे तात्काळ लक्ष घालून विषय निकाली काढण्यात यावा व गरिबांच्या मुलांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबवावा अशी मागणी पालक वर्ग व गावातील सुजाण नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...