Friday, October 28, 2022

लिंगायत समाजाची उदगीर नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात सोमवारी उदगीर येथे महत्वाची बैठक.


लिंगायत समाजाची उदगीर नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात सोमवारी उदगीर येथे महत्वाची बैठक.




लिंगायत समाजाची उदगीर नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात सोमवारी उदगीर येथे महत्वाची बैठक.

उदगीर दि २८  - प्रतिनिधी 

लिंगायत महासंघाच्या वतीने उदगीर येथे सोमवार दिनांक ३१ आक्टोबर २०२२ रोजी लिंगायत समाजाची उदगीर नगरपालिका व जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी लिंगायत महासंघाचे प्रांतांध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर हे उपस्थित राहणार आहेत.तरी उदगीर शहर व तालुक्यातील निवडणूक लढवु इच्छिणाऱ्या उमेदवार व आजी माजी नगरसेवक,नगरसेविका जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य ( सर्व पक्षीय) आदींनी उपस्थित रहावे असे आवाहन लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील व शहराध्यक्ष सुभाष शेरे यांनी केले आहे.ही बैठक सोमवार दिनांक ३१आक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी ९८९००९९७९२ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन लिंगायत महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

Monday, October 24, 2022

आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. अनभिज्ञ सम्राज्ञी..राणी चेन्नमा . .प्रा.अजय शेटे वडूज खटाव.. सातारा..9823540239

  आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. अनभिज्ञ सम्राज्ञी..राणी चेन्नमा .

.प्रा.अजय शेटे वडूज खटाव.. सातारा..9823540239
आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. अनभिज्ञ सम्राज्ञी..राणी चेन्नमा .
.प्रा.अजय शेटे वडूज खटाव.. सातारा..9823540239




सातारा  दि ..आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. अनभिज्ञ सम्राज्ञी..राणी चेन्नमा .

.राणी चेन्नमा यांचा जन्म सध्याच्या पुणे बेंगलोर महामार्गावरील ' काकती ' या गावातील किल्ल्यात झाला.आंध्र प्रदेशातील काकतिय लिंगायत संप्रदायाचे उपासक असलेल्या राजघराण्यातील धुल प्पा देसाई आणि त्यांची पत्नी पद्मावती यांच्या पोटी तिचा जन्म झाला. लहापणापासूनच तिला तिरंदाजी..घोडेस्वारी..तलवार युद्ध..भाला युद्ध..अशा मर्दानी क्रीडा खेळांची आवड होतीच ..शिवाय तिने त्यामध्ये विशेष प्राविण्य पण मिळविले होते..तिला संस्कृत..कानडी..मराठी आणि उर्दू या भाषा अवगत होत्या.. ..भारताच्या इतिहासात सर्वात पहिल्यांदा या रणरागिणी ने शौर्य..धैर्य..यांचे प्रदर्शन करत आपले धर्म व देशप्रेम दाखवून दिले. ..कित्तुर चेन्नमा ला केलाडी ची राणी असे पण संबोधले जाते. या केलाडी राज्याची स्थापना चौदा नायक यांनी ई. स.1499..मध्ये केली होती. ताली कोट च्या लढाईत विजयनगर साम्राज्याचे विघटन झाल्यानंतर त्यांच्या शिलेदारांनी लहान..लहान स्वतंत्र राज्ये स्थापन केली.या लहान राज्यांना पोर्तुगीज..आणि विजापूरी व इतर मुघल सैन्याकडून सतत धोका होता.त्यामुळे 14 संस्थाने एकत्र करून लिंगायत सोमशेखर नायक हा 1664..मध्ये केलाडीचा राजा झाला. ..राणी चेन्नमा हि पूर्वाश्रमीची एका लिंगायत व्यापाऱ्याची मुलगी होती. केलाडीच्या श्री रामेश्व रा च्या जत्रेत चेन्नमा ला पहिल्यांदा पहिल्या नंतर राजा सोमश्र्वराने तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ई. स.1667 मध्ये ' बिदनुर ' या शहरात लग्न केले.राजाच्या मदतीने राणी चेन्नमा ने राजकारण..राज कौशल्य ..युद्ध साहित्य इत्यादी क्षेत्रात शिक्षण घेतले.. ..पुढे राज्यात अंतर्गत बंडाळी होऊन प्रधान भारती मावूत याने राजाची विश्वासघात करून हत्या केली.तेव्हा राजेशाही नृत्यांगना कलावती हिच्या वडिलांनी राणी चेन्नमा ला राजसिंहासनावर बसवले.आणि बसा प्पा नायक याला एका राज्याचा वारस मुलगा म्हणून दत्तक घेतले.. .. आद्य लिंगायत राणी ..कित्तुर चेन्नम्मा ..केलाडी चेन्नमा.. ..जन्म..23 ऑक्टोबर 1648.. ठिकाण.. कित्तूर्..जिल्हा..बेळगाव..राज्य..कर्नाटक..भारत.. ..मृत्यू..21 फेब्रुवारी 1729.. ठिकाण.. बैल होंगल ..कर्नाटक.. ..महान कार्य.. छ. शिवाजी महाराज पुत्र छ.राजाराम महाराज यांचे रक्षण करून आश्रय दिला व भावी संरक्षण केले.. ..प्रमुख चळवळ..1724..ते..1729 पर्यंतचे भारतीय स्वातंत्र्य युद्ध. ..प्रमुख स्मारक..कित्तुर..
..त्यानंतर राजकीय सुरक्षेसाठी चेन्नमाचे दुसरे लग्न राजा रुद्रम्मा याचाशी झाले. रुद्रम्मा तिला एक मुलगा झाला.पण त्याचा लवकरच मृत्यू झाला.त्यानंतर थोड्याच दिवसात रुद्रम्मा चा पण मृत्यू झाला.. ..त्यातूनही न डगमगता तिने राज्याच्या सुरक्षेसाठी तिसरे लग्न राजा मल्ल सर्जा देसाई यांच्याशी केले.परंतु पुढे त्याचाही मृत्यू लवकर झाला.त्यामुळे तिने आपला सावत्र मुलगा शिवलिंग याला तेथील गादीवर बसवले. व त्याचा राज्याभिषेक केला.पण पुढे सन 1724 मध्ये त्याचाही मृत्यू झाला.. ..तेव्हा जबाबदारी ओळखून राणी चेन्नमा ने केलाडीच्या प्रशासन विभागाचा ताबा घेतला.आपल्या राज्याच्या सिंहासनावर गद्दार प णे ताबा घेवू पाहणाऱ्यांना तिने यशस्वी प्रतिकार केला.आणि विजापुरी सुलताना बरोबर युद्ध करून विजय मिळविला.. ..पुढे तिने छ.शिवाजी महाराज यांच्याशी राज्याचे सहसंबंध वाढवले..परंतु केलाडी राज्यात पुन्हा अंतर्गत बंडाळी वाढली.त्यामुळे विजापूर सुलतान पुन्हा केलाडी वर चा लून आला. व त्याने वेढा टाकला. ..यावेळी सुलतानाने आपला मध्यस्थ जन्नोपंत याला राणी चेन्नमा शी बोलणी करण्यास पाठवले.पण हा एक फसवा साफ ळा होता.कारण त्याच्या मागे त्याचे सैन्य पण राज्यात आतपर्यंत घुसले होते.पूर्व शत्रू भरमे मावूत यानेच विजापूर सुलतानाला हाताशी धरून हा नवीन कट रचला होता. ..तेव्हा संभाव्य धोका ओळखून राणी चेंनामा ने पुढील युद्धाची तयारी करण्यासाठी लवचिक धोरण स्विकारले . जन्नोपंता ला तीन लक्ष रुपये देवू केले व वेळकाढू पणाचे धोरण स्वीकारले. ..तेवढ्या मिळालेल्या अवधीत राणी चेन्नमा ने आपले सर्व सैन्य सर्व साधन संपत्ती व अन्न.. धांन्यासह बिदानुर किल्ल्यावरून भुवन गिरी किल्ल्यावर हलवले..



 ..राणीने संपूर्ण बिदानुर किल्ला युद्धात जळालेल्या पृथ्वी सारखा करून ठेवला.जेव्हा सुलताना चे सैन्य किल्ल्यावर पोहोचले तेव्हा तेथे सैन्याला साधे अन्न..पाणी सुद्धा मिळू शकले नाही.शिवाय कोणतीही साधन संपत्ती मिळाली नाही.त्यामुळे भुकेने व्याकुळ होवून सुलतानी सैन्य हतबल झाले.. ..इकडे भुवन गिरी किल्ल्यावर राणी चेन्नमा ने आपले अगणित सैन्य गोळा केले.आणि आपल्या राजमंत्री व युद्ध निती कार जाणकारांच्या सल्ल्याचे पालन करून सुलताना विरोधात ' गनिमी कावा' केला. ..आधीच हतबल व निराश झालेल्या प्रचंड सैन्याने भुवन गिरी कडे कूच केली.पण चेन्नमा च्या आक्रमक सैन्याने विजापूरी सैन्य पूर्णपणे नष्ट केले..आणि सुलतानाला अतिशय वाईट रित्या पराभूत केले..युद्ध विजया नंतर राणी चेन्नमा ने देशद्रोही भरमे मावूत व जन्नोपंत यांना त्यांच्या शिष्यासह फाशी दिली.. ..त्यानंतर राणीने राज्याची आर्थिक परिस्थिती परिस्थिती सुधारण्यासाठी पोर्तुगीजांना जवळ केले. तिने केलाडी बंदरातून मिरची..मसाल्याचे पदार्थ व तांदूळ निर्यात करण्यास सुरुवात केली. छ.शिवाजी महाराज यांच्याशी गुपचूप अंतर्गत जवळीक ठेवून आदिलशहा आणि पोर्तुगीज यांचे पासून राज्याचे रक्षण केले. ..केलाडी राज्य आणि पोर्तुगीज यांच्यातील मिरची व मिरी यांच्या व्यापारामुळे पोर्तुगिजांनी तिला ' रिना डी पिमेंटा ' म्हणजेच मिरपूड राणी.. क्विन.. हि उपाधी दिली.पुढे मुघल व पोर्तुगिज यांनी म्हैसूर चा राजा चिक्क देव राय वो डे यार याचे कान भरून केलाडी वर हल्ला करण्यास भाग पाडले.पण भारत मातेच्या या शूर मुलीने सर्व तीन लढ्यातील हल्ल्याचा प्रतिकार केला.आणि मोठ्या धैर्याने आपल्या राज्याचे रक्षण केले. व राजाच्या निदर्शनास त्याची चूक आणून देवून शांतता प्रस्थापित केली.. ..सन 1680 मध्ये छ.शिवाजी महाराजांच्या मृत्यू झाला त्या नंतर औरं ग जेबाने 1686 मध्ये विजापूर व गोवळकोंडयावर आक्रमण केले.त्यानंतर त्याने मराठ्यांना वश व फितूर करण्यावर लक्ष केंद्रित केले.आणि छ.संभाजी महाराज यांना पकडण्यात यश मिळवले..पुढे त्यांना अतिशय निर्घृण पणे मारले.त्यांच्या मृत्यू नंतर छ.राजाराम महाराज यांचा रायगडावर राजा म्हणून राज्याभिषेक झाला.. ..त्यानंतरही मोगलांनी रायगडाला वेढा घातला.पण शुर मराठे छ.राजाराम महाराज यांना सुरक्षित प णे पळवून ने वू शकले..त्यावेळी ते केलाडीच्या दिशेने जात आहेत.अशी माहिती मुघल सैन्याला मिळाली..तेव्हा औ रंग जेबा ने राणी चेन्नमा ला केलाडी राज्यात छ.राजाराम महाराज यांना येवू न देण्याचे फर्मान काढले.अन्यथा केलाडी वर आक्रमण केले जाईल .असा दम दिला गेला..पण राणी चेन्नमा ला हिंदवी स्वराज्याची सर्व परिस्थिती माहीत होती..आणि तिच्या राजाचे रक्षण करणे आपले आद्य कर्तव्य आहे.असे मानून तिने बादशहाचे हे फर्मान मोठ्या जिद्दीने धुडकावून लावले. व छ. राजाराम महाराज सैन्यासह केलाडी ला पोहोचल्यावर तिने त्यांचा मोठा सन्मान केला व आपला राजश्रय व संरक्षण देवून आपल्या हिंदवी राजधर्माचे पालन केले.. व मुघल सैन्या विरोधात लढाईची तयारी केली. ..हे समजल्यावर बादशहाने राणीला पत्र लिहून छ.राजाराम महाराज व त्यांचे मराठा सरदार यांना चांगल्या पद्धतीने आपल्या ताब्यात देण्याची विनंती केली.. व हेतुपूर्वक पणे ठरवून विचार करण्यास वेळ द्यावा असे सांगितले. व वेळकाढू पणा करून पावसाळा सुरू होवू दिला.त्यानंतर तिने बादशहाला सांगितले की.. छ.राजाराम महाराज हेच फक्त आता मराठ्यांचे राजे शिल्लक राहिले आहेत.शिवाय त्यांनी आधीच अतिशय आणीबाणीच्या परिस्थितीत आपले राज्य सोडले आहे..तेव्हा आपला मुघ लकी प्रस्ताव मी सरळ..सरळ नाकारत आहे. छ.शिवरायांचे पुत्र असलेल्या छ.राजाराम महाराज यांना मी माझ्या पूत्रा समान मानते.आणि त्यांचे रक्षण करणे माझे आद्य कर्तव्य समजते. ..त्यामुळे बादशहाने अतिशय चिडून अझ मथ आरा च्या नेतृत्वाखाली केलाडीवर आक्रमण केले.. ..ऐन पावसाळ्यात मोगलांनी बिड नू र मध्ये प्रवेश केला.हे वातावरण मोगल सैन्याला त्रासदायक ठरले.आणि राणी चा गनिमी कावा यशस्वी ठरला.त्याचा बरोबर फायदा केलाडी सैन्याने उठविला. व. बादशहाच्या सैन्यावर प्रचंड ताकदीनिशी आक्रमण केले. व त्यांना पराभूत केले. व मुघल सैन्याला ठार करून त्याचे घोडे ..संसाधने.. व रसद काबीज केली.. बादशहा औरंगजेब याच्या दारुण पराभवामुळे व राणी चेन्नमा हिच्या गनिमी काव्याच्या लष्करी डावपेचां मुळे या आलमगि रा ने अतिशय चिडून तिची ..' स्त्री अस्वल " म्हणजेच घोळून..घोळून व खेळवून खेळवून मारणारी अशी अव्हेलानात्मक तुलना केली..पुढे युद्ध काही दिवस चालू राहून शांत झाले.. ..त्यानंतर राणी चेन्नमा ने छ.राजाराम महाराज यांना सर्व मदत करून व संरक्षण देवून ..सुरक्षित अशा तामिळनाडू मधील ' जिंजी ' किल्ल्यावर जावून राहण्यास मदत केली. व मराठ्यांचा शेवटच्या राजाच्या प्राणांचे रक्षण केले.. ..पुढे छ .राजाराम महाराज यांनी राणी चेन्नमा ना एक पत्र लिहले.त्यात ते म्हणतात की.. त्या बिकट आणि बाणीच्या परिस्थितीत जेव्हा मोठ्या राज्याचे राजे आणि राज्यकर्त्यांनी बादशहाला घाबरून मला मदत करण्यास नकार दिला.तेव्हा तुम्ही मला मोठ्या धैर्याने आश्रय दिला आणि हिंदू धर्माचे रक्षण करण्यास मदत केली.तुमचे हे शौर्य आणि औदार्य मी कधीही विसरू शकणार नाही.ज्यांनी छ.शिवाजी महाराजां चा मुलगा असलेल्या. छ.राजाराम यांचे रक्षण केले.मुघल सैन्याला मोठ्या धाडसाने पराभूत केले.आणि मराठा राज्य व राजा यांना वाचवले. अशा माझ्या दुसऱ्या मातेस माझा नमस्कार असो.देवी श्री भवानी तुम्हाला सर्व सुख देवो..मी देवाला प्रार्थना करतो कि..त्याची केलाडी राज्याची जमीन आनंदाचे घर बनू शकेल.. ..तुमचाच मुलगा.. छ.राजाराम.. ....................................... .. कर्नाटकातील केलाडी राज्याचेच एक भाग असलेले 'बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर् ' हे एक महान संस्थान होते. आपला सावत्र मुलगा शिवलिंग रुद्रसर्ज याच्या मृत्युनंतर राणी चेन्नमा ने त्यांचा दत्तकपुत्र गुरुलिंग मल्ल सर्ज याला गादीवर बसवून स्वतः राज्यकारभार पाहण्यास सुरुवात केली.तेव्हा ह्या दत्तक विधानाला नाकारून ब्रिटिश एजंट व धारवाड प्रांताचा कलेक्टर थ्याकरे याने पुन्हा कित्तुर संस्थान ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले तेव्हा मोठे युद्ध झाले.राणी चेन्नमा ने स्वतः लढाईत भाग घेवून रण मैदान गाजवले व 3 सप्टेंबर 1724..मध्ये त्याला युद्धात ठार मारले.पुढे डी क न या इंग्रज अधिकाऱ्याने 23..सप्टेंबर 1724..रोजी कित्तुर ला पुन्हा वेढा दिला. सन 1724..ते..सन 1729..असा पाच वर्षे राणी चेन्नमा ने इंग्रजांना मोठ्या त्वेषाने प्रतिकार केला. ईस्ट इंडिया कंपनी व इंग्रज सरकार यांच्या संस्थान खालसा करण्याच्या धोरणाला त्यांचा प्रचंड विरोध होता.ब्रिटिश दडपशाही ला त्यांनी मोठा प्रतिकार केला. व भूमिगत राहून शेवटपर्यंत विरोध केला. ..पण संगाप्पा व हु राकडली या राणीच्या दोन फितूर सरदारांनी इंग्रजांना शहरात शिरण्याचा चोरवाटा दाखविल्याने इंग्रजांनी कित्तुर किल्ल्यात घुसून शेवटी 3..डिसेंबर 1724..रोजी राणी चेन्नमा ला पकडलेच..तिला पकडुन पुढे ' बेल होंगल '..बैल होनंग ळ ..येथील कारागृहात डांबून ठेवले.या तुरुंगातच 2.. फेब्रुवारी 1729..रोजी शूर केलाडी.. कित्तूर् राणी चेन्नमा चे निधन झाले. . ..बेळगाव पासून 50.. कि.मी.दूर असलेले कित्तुर संस्थान खालसा करून बेळगाव जिल्ह्याला जोडले गेले..या वेळी इंग्रजांनी किल्ल्यामध्ये जी लूट केली त्या मध्ये 16..लक्ष रुपये रोख..4..लक्षांचे जवहिर..घोडे.. उंट..हत्ती यासह 36..तोफा..बंदुका..तलवारी.. आणि प्रचंड दारूगोळा त्यांना मिळाला...
..राणी चेन्नमा यांच्या निधनानंतर सन 1729 मध्ये सांगलीच्या सयाप्पा पाटील यांनी देसायांच्या दत्तक मुलास पुढे करून इंग्रज सत्तेला कायदेशीर आव्हान उभे केले होते.परंतु या आव्हानाला ही ब्रिटिशांनी शह दिला. * सन 1857 सालच्या बंडा पूर्वी तसेच झाशी ची राणी लक्ष्मीबाई यांच्या पूर्वीही ..वर्षे आधी एका भारतीय शूर लिंगायत रणरागिणी भारतीय स्वातंत्र्य युद्धात नाव अजरामर करून गेली.. शौर्य..धैर्य..यांचे प्रदर्शन करत जिने ब्रिटिश सतेला आवाहन देवून जबरदस्त हादरा दिला.त्या होत्या केलाडी.. कित्तूर् राणी चेन्नमा..त्याच्या या महान भारत देश प्रेम कार्यास विनम्र अभिवादन ..अभिवादन * ..राणी चेन्नमा यांच्या या महान कार्याची दखल घेवून मा.राष्ट्रपती प्रतिभताई पाटील यांच्या हस्ते दिल्ली येथील विधान भवनात 2007..साली त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे..**

Saturday, October 22, 2022

श्रीशैल जगद्गुरु करणार सुक्षेत्र येडुर ते महाक्षेत्र श्रीशैल अशी 560 किमी ची पदयात्रा द्वादश पीठारोहण समारंभाला मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उपस्थित राहणार

 श्रीशैल जगद्गुरु करणार सुक्षेत्र येडुर ते महाक्षेत्र श्रीशैल अशी 560 किमी ची पदयात्रा  द्वादश पीठारोहण समारंभाला मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उपस्थित राहणार


 श्रीशैल जगद्गुरु करणार सुक्षेत्र येडुर ते महाक्षेत्र श्रीशैल अशी 560 किमी ची पदयात्रा  द्वादश पीठारोहण समारंभाला मा.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी उपस्थित राहणार



सातारा, दि.23 -रविंद्र वाकडे.

 जानेवारी 2023 मध्ये श्रीशैल सूर्यसिंहासन महापी ठाचे जगद्गुरु डॉ.चन्नसिद्धराम पंडिताराध्य भागवदपाद यांचा द्वादश पीठारोहण महोत्सव आणि  जन्मसुवर्णमहोत्सव साजरा होणार आहे.

या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन स्वतः जगद्गुरुनी दिले.



10 ते 15 जानेवारी या  पाच दिवसीय महासम्मेलना दरम्यान एक दिवस  उपस्थित राहण्याचे आश्वासन मा.पंतप्रधान यांनी दिल्याचे मंदृपचे रेणुका शिवाचार्य महास्वामी यांनी सांगितले.

मा.पंतप्रधान यांच्याशी औपचारिक संवाद साधताना श्रीशैल जगद्गुरु म्हणाले की, आपल्या देशातील श्री ज्योतिर्लिंग क्षेत्रे एकामागून एक विकसित होत आहेत.ही अतिशय आनंदाची बाब आहे. मा.पंतप्रधानांच्या आगमनाने श्रीशैल क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाची पण घोषणा होईल.संपूर्ण जगात भारताला विश्वगुरू बनवण्याच्या त्यांच्या निर्धाराला त्यामुळे अधिक बळकटी येईल.त्यानंतर मा.पंतप्रधान म्हणाले की,येथील सर्व संतांनी पूर्वीपासून सर्वसामान्य समूह विकासाचे ध्येय ठेवले होते.त्यांचेच कार्य पूर्ण करण्याचे काम माझ्या हातून होत आहे.





यानिमित्त बेळगाव जिल्ह्यातील सुक्षेत्र येडूर ते महाक्षेत्र श्रीशैल असा एकूण 29 ते 33 दिवसांचा 560 किमी पदयात्रेचा कार्यक्रम असून श्रीशैल जगद्गुरु श्रीशैल येथे 42 दिवसांचे अनुष्ठानही करणार आहेत.10 ते 15 जानेवारी या दरम्यान समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. 



या कालावधीत अखिल भारत वीरशैव महासभा अधिवेशन,राष्ट्रीय वेदांत संमेलन , राष्ट्रीय वचन संमेलन,वीरशैव साहित्य संमेलन यासह अनेक सामाजिक,धार्मिक व  सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.



या कार्यक्रमात देशविदेशातील भाविक सामील होणार आहेत.मा.पंतप्रधान यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देताना औसा संस्थानचे डॉ.शांतवीरलिंग शिवाचार्य,श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी हजर होते.




Monday, October 17, 2022

वीरशैव लिंगायत धर्माचे जगद्गुरूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट

 वीरशैव लिंगायत धर्माचे जगद्गुरूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट


वीरशैव लिंगायत धर्माचे जगद्गुरूंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट



सातारा दि १७ :- प्रणाली वाकडे 

दि.17-10-2022 सोमवार रोजी सायं.5 वाजता भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांना जानेवारी महिन्यात श्रीशैल्य पिठामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण श्री शैल्य जगदगुरू श्री श्री श्री 1008 डॉ.चनसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी व डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज यांनी दिले. यांच्या समवेत केंद्रीय संसदीय मंत्री ना. प्रल्हाद जोशी उपस्थित होते. मा. पंतप्रधान मोदीजीनी निमंत्रण स्वीकारून कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी आनंदाने होकार दिला.

श्रीशैल्य जगदगुरु  श्री श्री श्री 1008  डॉ.चनसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजीसोबत वीरशैव लिंगायत समाजातील विविध समस्यांवर व देशातील विविध प्रश्नांवर तब्बल 20 मिनिट विस्तृत चर्चा केली.



लिंगायत समाजाचे शंभर सदस्य येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजयी होतील.प्रा सुदर्शनराव बिरादार


लिंगायत समाजाचे शंभर सदस्य येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजयी होतील.प्रा सुदर्शनराव बिरादार 





लिंगायत समाजाचे शंभर सदस्य येणा-या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजयी होतील.प्रा सुदर्शनराव बिरादार 
शिरूर अनंतपाळ दि 17  - प्रा अजय शेटे प्रतिनिधी 
लिंगायत महासंघाच्या वतीने शिरूर अनंतपाळ येथे आज रविवार दिनांक १६आक्टोबर रोजी लिंगायत समाजाची शंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या मठात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकिच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना  लिंगायत महासंघाचे प्रांतांध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार म्हणाले कि, लिंगायत समाजाची राजकीय क्षेत्रातील भागीदारी वाढवायची आहे.जिल्हयात पाच लाख लिंगायत मतदार आहेत.पण सर्व पक्षीय मिळून सहा सदस्य जिल्हा परिषद व बोटावर मोजता येणारे पं स सदस्य .एवढ्यावर समाजाला न्याय मिळणार नाही.आता सर्व पक्षीय नेत्यांनी विचार करुन लिंगायतांना लोकसंख्येच्या आधारावर जागा द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली.यात कोणता पक्ष लिंगायत समाजाला मदत करत़ ते आम्हाला बघायचे आहे.





लिंगायत समाजाला योग्य वाटा द्यावा अन्यथा आम्ही आपला घाटात करु.लिंगायत समाजांनी आपला माणुस कोणत्याही पक्षातुन निवडणूक लढवत असतील तर त्यांना मदत करावी.असे झाले तर १००सदस्य आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत आपण निवडून आणु असे प्रा सुदर्शनराव बिरादार यांनी सांगितले.यावेळी लिंगायत महासंघाचे जिल्हासंघटक काशिनाथ मोरखंडे, सिद्रामप्पा पोपडे, लिंगायत महासंघाचे शहर सरचिटणीस लि़गेश्वर  बिरादार, गोरोबा काका शिवणे,शिवाजी पांडे, तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, तालुका संघटक विठ्ठलराव पाटील,संग्राम हावा,हत्तरगे ताई,कुरे ताई या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.






Friday, October 14, 2022

लिंगायत समाजाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर रविवारी शिरूर अनंतपाळ व देवणी येथे बैठक

 लिंगायत समाजाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर रविवारी शिरूर अनंतपाळ व देवणी येथे बैठक




लिंगायत समाजाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर रविवारी शिरूर अनंतपाळ व देवणी येथे बैठक. 

 


लातूर दि :- १४ प्रतिनिधी ,  
दिवाळी नंतर होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर लिंगायत समाजाची शिरूर अनंतपाळ व देवणी येथे रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी लिंगायत महासंघाच्यावतीने बैठक आयोजित करण्यात आली आहे. रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता शंकरलिंग शिवाचार्य महाराज मठसंस्थान शिरूर अनंतपाळ येथे तर देवणी येथील मठात दुपारी 2.30 वा. लिंगायत समाज बांधवांची बैठक लिंगायत महासंघाच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका लढवू इच्छिणार्‍या भावी उमेदवारांनी व विद्यमान उमेदवारांनी तसेच दोन्ही तालुक्यातील प्रत्येक गावच्या समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन लिंगायत महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे.
या बैठकांना लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके, जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे, जिल्हा उपाध्यक्ष शिवानंद भुसारे, माधव मल्लिशे, नवनाथ डोंगरे, दिलीप सोलगे तसेच शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे, शिरूर अनंतपाळ तालुका संघटक विठ्ठलराव पाटील तसेच देवणी तालुकाध्यक्ष शेषेराव मानकरी, व शहराध्यक्ष विजयकुमार लुल्ले व दोन्ही तालुक्यातील लिंगायत महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी आवाहन केल्याचे लिंगायत शहर सरचिटणीस लिंगेश्‍वर बिरादार यांनी सांगितले. तसेच 23 ऑक्टोबर रोजी वरील विषयासंदर्भात लातूर व उदगीर येथे सुध्दा अशा बैठकांचे आयोजन करण्यात आल्याचेही लिंगेश्‍वर बिरादार यांनी सांगितले.




 



Wednesday, October 12, 2022

नागणसूर येथे लिंगैक्य बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 90 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

नागणसूर येथे लिंगैक्य बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 90 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.



नागणसूर येथे लिंगैक्य बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 90 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.



सातारा, दि.11 -  रविंद्र वाकडे.

 अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील ग्रामदैवत व महाराष्ट्राच्या मंठस्थ नागणसूरचे नंदादिप परमपूज्य बसवलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या 90 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दि 7,8 व 9 ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या 90 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हे मठ संस्थान व श्री स्वामीजींचे जीवन कार्य या विषयीची अधिक माहिती प्रसारित करण्यासाठी https://basavalingeshwar.com वेबसाईटचे उद्घाटन दि.8 रोजी नुकतेच करण्यात आले आहे.




    नागणसूर विरक्त मठाचे अधिपती परमपूज्य डॉ.अभिनय बसवलिंग महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

त्या प्रमाणे 11 हजार सुवासिनींची ओटी भरणे,7000 जंगम गणाराधना विधी,सामूहिक विवाह समारंभ आयोजन व एक लाख एक हजार भक्तांना पुरणपोळीचा महाप्रसाद अन्नदान कार्यक्रम पार पाडण्यात आला.



या कार्यक्रमात दि.8 रोजी पहाटे 6 वा.श्री शिवलिंगास  महारुद्रा भिषेक करण्यात आला.तसेच स.9 वा. षटस्थळ ध्वजारोहण करण्यात आले. स.11 वा.एकूण अकरा हजार सुवासिनींचा ओटी भरण कार्यक्रम पूर्ण करण्यात आला.या नंतर सात हजार जंगम गणाराधना पूजा विधी पार पाडण्यात आला.या नंतर कर्नाटक,महाराष्ट्र,आंध्रप्रदेश सह देशातील कानाकोपऱ्यातून असलेल्या सद्भभक्ताना एक लाख,एक हजार पुरणपोळी व तूप अशा महाप्रसादाचे अन्नदान वाटप करण्यात आले.दुपारी चार  वाजता नवागत वधू - वरांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पाडण्यात आला.

दि.9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता श्री बसवलिंग महास्वामीजींच्या प्रतिमेची व धर्मग्रंथाची मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आली.या मिरवणुकीत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.त्याच बरोबर लेझिम, टिपरी,झांज, भजन यांचे सादरीकरण अनेक सांस्कृतिक मंडळाकडून करण्यात आले. सर्व भक्तांना सलग दोन दिवस अन्नदान महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




हे मठ संस्थान मु.पो.नागणसूर , ता.अक्कलकोट, जि.सोलापूर येथे असून,त्यास श्री बसवलिंगेश्र्ववर समाधी मठ संस्थान उर्फ 'तुप्पीन मठ ' असे संबोधले जाते.या आश्रम संस्थानला पूर्व व दक्षिण  दिशा असे दोन मोठे प्रवेशद्वार असून,या संस्थांनचे मूळ अधिपती श्री. प. पू.बसवलिंगेश्वर स्वामी महाराज यांनी आपल्या अमोघ वाणीने व समुपदेशक मार्गदर्शनाने येथील जनतेच्या जीवनात आमूलाग्र सारासार विचारसरणी व विवेकवाद रुजवला.




हे एक स्वयंभू व जागृत मठ संस्थान असून त्यास ' गद्दुगे मठ ' असे पण म्हटले जाते.हे मठ संस्थान उच्च प्रतीचे लाकूड व मार्बल फरशी दगड यापासून बनवले गेलेे असून ,आतमध्ये श्री स्वामीजींचे जीवन चरित्र दर्शन घडवणारे ' मुख दर्शन ' नावाचे चित्र प्रदर्शन करण्यात आले आहे.श्री.स्वामीजी हे स्वतः बल उपासक होते.रोज पहाटे व्यायाम करून त्यांनी आपली शरीरयष्टी मजबूत बलदंड बनवून आरोग्य साधनेचे महत्त्व पुढील पिढीला पटवून दिले होते. व या पवित्र मठसंस्थानला नावलौकिक प्राप्त करून दिला.त्यामुळे त्यांना ' पैलवान योगी ' असे पण म्हटले जायचे.



त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा  व गुरुकृपेेस पात्र व्हावे.असे आवाहन डॉ.अभिनव बसवलिंग महास्वामिजी यांनी सर्व भाविक भक्तांना केले आहे.





सदरचा पुण्यतिथी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मौजे नागण सूर येथील स्थानिक रहिवाशी व सार्वजनिक मंडळे यांनी अथक परिश्रम घेतले.







Saturday, October 8, 2022

तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य : औसेकर महाराज तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांची झाली पाण्याची सोय वीरशैव व्हीजन व आस्क मी तर्फे 3500 पाणी बाटल्यांचे वाटप



तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य : औसेकर महाराज तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांची झाली पाण्याची सोय वीरशैव व्हीजन व आस्क मी तर्फे 3500 पाणी बाटल्यांचे वाटप


तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य : औसेकर महाराज तुळजापूरला पायी जाणाऱ्या भक्तांची झाली पाण्याची सोय वीरशैव व्हीजन व आस्क मी तर्फे 3500 पाणी बाटल्यांचे वाटप

 सोलापूर दि ७ : राजशेखर बुरुकुले सोलापूर 

 भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देणे ही भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीचा अवलंब करणाऱ्या अनेक संस्था आज समाजात कार्य करीत आहेत त्यापैकीच वीरशैव व्हिजन ही एक संस्था आहे. तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या तहानलेल्या भक्तांना पाणी देणे महत्तम कार्य असल्याचे प्रतिपादन औसा संस्थानचे सद्गुरु गोरखनाथ महाराज औसेकर यांनी केले.




          तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या श्री तुळजाभवानी भक्तांसाठी पिण्याचे थंड पाण्याच्या बाटल्या वीरशैव व्हीजन व आस्क मी हेल्पलाइन तर्फे वितरित करण्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर  नीलकंठ सहकारी बॅंकेचे संचालक जयनारायण भुतडा, आस्क मी हेल्पलाइनचे संचालक राहुल शेटे, समर्थ रोडलाईन्सचे संचालक आप्पासाहेब लोणी, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.

             तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांसाठी विविध ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करण्यात येते. काही ठिकाणी औषधोपचारही केले जातात. मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या वाटेत भेडसावत असल्याचे काही भक्तांनी वीरशैव व्हिजनला सांगितले. त्यामुळे वीरशैव व्हिजनने भक्तांना वाटेत पिण्यासाठी थंड पाण्याच्या बाटल्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. याचा 3500 भाविकांनी लाभ घेतला.

            यावेळी सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, सोमनाथ चौधरी, महेश शिंदे, तुकाराम मुळे उपस्थित होते.

              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीकांत लोणी, मन्मथ कपाळे, गणेश सूर्यवंशी, मनोज चौधरी, आदित्य सिद्धे, महादेव हारके सनी आरळीमार, महेश घुले, सचिन वैद्य यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : वीरशैव व्हिजनच्या वतीने पाण्या पाण्याच्या बाटल्या वितरित करताना गोरखनाथ महाराज औसेकर, जयनारायण भुतडा, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे, विजयकुमार बिराजदार, राजेश नीला, सोमनाथ चौधरी



Tuesday, October 4, 2022

कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर)

 कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) 


कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) 


सातारा दि ४ प्रा अजय शेटे 

कोल्हापूर जिल्हाचे नव्हे, तर अखंड महाराष्ट्राचे लाडके नेते म्हणून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाचे व कुस्ती क्षेत्रावर फार मोठे प्रेम असणारे लिंगायत समाजाचे  आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) यांच्याकडे पाहिले जाते वारणा समुहाचे प्रमुख,जनसुराज्य शक्ती पक्षाचे,सुराज्य फौंडेशनचे संस्थापक पन्हाळा-शाहूवाडी तालुक्याचे आमदार यांसह महत्वाच्या पदांवर आज कार्यरत आहेत समाजामध्ये सर्वांना बरोबर घेऊन काम करणे.जिद्द आणि निष्ठा या जोरावर सर्वसामान्य शेतकरी केंद्रबिंदू मानून १९५८ मध्ये पहिला ऊस गळीत हंगामा सुरू करून कै.तात्यासाहेब कोरे यांनी पंचक्रोशीत शेतकरी चळवळीस प्रारंभ केला काही वर्षात नावारूपास आलेल्या वारणा उद्योग व सहकार समुह पुढे चालवणारे लाडके आमदार डाॅ.विनय कोरे यांनी समाजासमोर नावीन्यपूर्ण आदर्श ठेवला अशा या नेत्याचा आज वाढदिवस होत आहे.




याबरोबरच देशासह राज्यात कोरोना विषाणू रोगाने लोकांची पिळवणुक झाली असून वारणा परिसरातील लोकांना हक्काचे कोरोना केअर सेंटर आमदार डाॅ.विनय कोरे यांनी उभारणी करून अत्यंत कमी दरात कोरोना पेंशटला उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

गगणाला गवसणी घालण्याची इच्छा-शक्ती असणारे माजी मंत्री आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) यांच्या रुपाने समाजाला लाभला आहे अशा गतिमान नेतृत्वाची अशीच चढती कमान राहो, हिच आज वाढदिवसादिनी अपेक्षा....





Saturday, October 1, 2022

खानापूर सार्वजनिक दुर्गा मंडळातर्फे रविवार दि 2 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन..!


खानापूर सार्वजनिक दुर्गा मंडळातर्फे रविवारी दि  2 रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन..!
 
खानापूर दि 1  :- शिवकुमार कल्याणी ।
दुर्गा माता सार्वजनिक नवरात्रौत्सव समिती खानापूर या मंडळाचे हे २३ वे वर्ष असून त्यानिमित्त २३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार, दि. २ आक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी  सकाळी 9 वाजता सदर रक्तदान शिबीर दुर्गा मंडळाच्या भवनात  होणार असल्याची माहिती खानापूर सार्वजनिक मंडळाचे  मंडळाचे अध्यक्ष संतोष कदम यांनी दिली.
रक्तदाता हा रुग्णाचा जीवनदाता असून, रुग्ण व उपचार यामधील अमृतासारखा महत्त्वाचा संजीवनी देणारा देवदूत आहे. त्यामुळे सदर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या मध्ये खानापूर व परिसरातील युवकांनी स्वयंस्फूर्तीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून पुढे येत रक्तदान करण्याचे आवाहन दुर्गा मंडळातर्फे करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत श्री गोळवलकर गुरुजी रक्तपेढी नांदेड , रक्तपेढीतर्फे या शिबिरात रक्तसंकलन केले जाणार आहे. इच्छुक रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान करण्यासाठी मंडळातील कार्यकर्त्यांशी संपर्क करावे , व रक्तदाता म्हणून या सामाजिक उपक्रमात सहभाग घ्यावा असे शोषल मिडीयातून संदेश फिरवण्यात येत असुन, रक्तपेढीतर्फे  व मंडळातर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे,सदर मंडळाची स्थापना इ.स.२००० साली झाली असुन दर वर्षी अनेक सामाजिक उपक्रम या मंडळाने राबवले आहेत,व याही वर्षी उत्सवात,महारक्तदान शिबीर, समाज प्रबोधनपर किर्तन,व्याख्यान, महाराष्ट्राची लोककला असणारे भारूड,देवीचा जागर गोंधळ, महाप्रसाद, अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन यासाठी मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव, पदाधिकारी,व मार्गदर्शक विजय धनसुरे, विश्वनाथ ताडकोले, निळकंठ पटणे, उमाकांत पाटील,बालाजी तुरुकवाड, विनोद रायकोडे, राजेंद्र भायकटे, सुनिल ठिगळे,हावगी पाटील,सर्व पदाधिकारी, सदस्य मेहनत घेत आहेत ..

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...