लान्स नायक मा.रमाकांत लामतुरे यांचा भव्य नागरी सत्कार
सातारा, दि.13 - रवींद्र वाकडे प्रतिनिधी
सेवानिवृत्त सैनिक लान्स नायक मा.रमाकांत वीरपाक्षअप्पा लामतुरे हे भारतीय सैन्य दलातील नोकरीतून 17 वर्षाच्या प्रदिर्घ सेवेतून नुकतेच सेवानिवृत झाल्यामुळे छ.संभाजी राजे ग्रुप,कारला व ग्रामस्थ तसेच आप्तस्वकीय यांच्या वतीने त्यांचा किल्लारी गावापासून भव्य मोटार सायकल रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी वाटेत त्यांच्यावर सर्व शालेय विद्यार्थी व स्त्रीपुरूष नागरिकांतर्फे पुष्पहार अर्पण करून पुष्पवृष्टी करण्यात आली.यावेळी रस्त्यांवर दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा , कारला येथे त्यांचा सहपरिवार नागरी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय गुत्तेदार नरेंद्र रामराव काळे,प्रमुख पाहुणे औसा तालुक्याचे आमदार मा.अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अँड.परिक्षीत पवार, लेफ्टनंट ऋषिकेश बाबळसुरे,भाजपा तालुका उपाध्यक्ष बंकट पाटील , भाजयुमो चे तालुका अध्यक्ष सचिन अनसरवाडे, म.बसव परिषद पुणेचे नृसिंह मुळे,सेलुकर परिवार,विशाल मुरुंबे,विशाल घोटाळे,विशाल कवे,बालाजी निकम,पुणे येथील उद्योजक प्रविण साखरे, सौ.विद्या बलक्षे,सिद्धेश्वर बिराजदार,विजयकुमार साखरे आणि परिवार ,पुणे. मा.सरपंच पारधेवाडी सौ.मंगल व श्री.देवानंद साखरे परिवार,प्रशांत तोडकरी ई.मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी सरपंच विलास काळे यांनी तर सूत्रसंचालन दयानंद सेलुकर यांनी व आभार सौ.केशराई विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश पवार यांनी मानले.
हा सत्कार समारंभ आयोजित केल्याबद्दलआभार व्यक्त करताना मा.रमाकांत लामतुरे यांनी अतिशय खडतर परिस्थितीत वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे भाग्य आपणास लाभले .तसेच ज्या शाळेत शिकलो तिथेच आज सत्कार होत आहे .हे अभिमानाने सांगितले.तसेच मार्गदर्शक ,पाठीराखे ,आयोजक छ.संभाजीराजे ग्रुप व कारला ग्रामस्थ व उपस्थित सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त केले .
या कार्यक्रमास कारला, कारलावाडी ,कुमठा,किल्लारी, यळवट, वाणेवडी, तांबरवाडी, किनिवरे येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी सर्वांसाठी अल्पोपहार सोय पण करण्यात आली होती.
No comments:
Post a Comment