Wednesday, June 29, 2022

कोण होणार करोडपती च्या मंचावर येणार काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबादारी पेलणारे अधिक कदम

कोण होणार करोडपती च्या मंचावर येणार काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबादारी पेलणारे अधिक कदम 
  
मुंबई दि 30  :
प्रा अजय शेटे प्रतिनिधी 
 सोनी मराठी वाहिनीवरील जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे कोण होणार करोडपती. सचिन खेडेकर यांचे बहारदार सूत्रसंचलन हे या कार्यक्रमाचे विशेष वैशिष्ट्य आहे . या कार्यक्रमात  दर आठवड्यात विशेष अतिथी येत असतात . या आठवड्यात  शनिवार २ जुलै च्या कर्मवीर विशेष भागात कर्मवीरच्या रूपात अधिक कदम हॉटसीटवर येणार आहेत . काश्मिरी मुलींसाठी बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी करणारे अधिक कदम या आठवड्यातील कर्मवीर आहेत . 
 
अधिक कदम यांचा जन्म वारकरी संप्रदायात झाल्याने घरामध्ये लहानपणापासून आध्यात्मिक वातावरण आहे. ते पखवाज आणि मृदंग उत्तम वाजवतातकुठल्याही भक्तीचा पाया हा कार्यकर्तृत्वाचा असतो,असे त्यांचे मत आहे. विठ्ठलाच्या नामस्मरणात ते कायम दंग होतात.'कोण होणार करोडपती'च्या मंचावर आषाढवारीनिमित्त एका अनोख्या विठ्ठलभक्तीचे दर्शन होणार आ १८ दिवसांसाठी काश्मीरमध्ये गेलेले अधिक कदम तिथली परिस्थिती आणि घटना पाहून तिथेच राहिले. ज्या गावात हजारपेक्षा जास्त पुरुषांना आतंकवाद्यांनी मारले, त्या गावात ते राहिले. आतंकवादी अधिक यांना १९ वेळा घेऊन गेले आहेत. तिथे असणाऱ्या सैनिकांची वाईट अवस्था आणि यासारखे अनेक किस्से त्यांनी 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात कथन केले आहेत.
 
कोण होणार करोडपती'च्या याही पर्वात दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागीहोणार आहेत. समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्यासामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या कर्मवीर विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या पर्वातल्या कर्मवीर विशेष भागातअधिक कदम सहभागी होणार आहेत. अहमदनगर ते थेट काश्मीरमधील कुपवाडा असा प्रवास करणारे अधिक कदम त्या भागात 'अधिक भैय्या' म्हणून प्रसिद्ध आहेत. 'बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन' या संस्थच्या माध्यमातून ते काश्मिरी मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी उचलतात. 
 
कारण जम्मूकाश्मीरमध्ये फक्त स्त्रिया बदल घडवू शकतात, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. आत्तापर्यंत अधिक यांच्या संस्थेने १६७ मुलींना स्वतःच्यापायावर उभे करून त्यांची लग्नं लावून दिली आहेततर सध्या  २३० मुली हॉस्टेलमध्ये राहून त्यांच्या आवडीचं शिक्षण घेत आहेत. अधिक कदम यांचे हेसगळे अनुभव 'कोण होणार करोडपती'च्या मंचावरून ऐकता येणार आहेत.
 
'कोण होणार करोडपती'च्या खेळाबरोबरच अधिक कदम यांचे अचंबित करणारे अनुभव जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'कोण होणार करोडपती'- कर्मवीर विशेष,२ जुलै शनिवारी रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

Monday, June 27, 2022

विटा बँक निवडणुकीत ' जय सहकार पॅनेल च विजयी होईल - कुटुंब प्रमुख व विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी ..

 विटा बँक निवडणुकीत ' जय सहकार पॅनेल च विजयी होईल - कुटुंब प्रमुख व विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी .
.
सातारा, दि.28 - प्रतिनिधी प्रा.अजय शेटे
जवळ जवळ सात वर्षानंतर सन 2022 ते 2027 या काळासाठी दि विटा मर्चंटस को. ऑप.बँक लि. विटा ची निवडणूक लागली असून,यात 'जयसहकार ' पॅनेल हे 'कपबशी ' हे चिन्ह घेवून निवडणूक लढवत आहे.यातील 9 सदस्य बिनविरोध निवडले गेले असून,उर्वरित 12 जागांसाठी केवळ एका व्यक्तीमुळे निवडणूक चुरस होत आहे.तरी पण हे सर्व पॅनेल चे सभासद बहुमताने विजयी होतील. व बँकेला पुन्हा स्थिरता देवून प्रगतीच्या शिखरावर नेवून ठेवतील असा आत्मविश्वास विद्यमान अध्यक्ष श्री.विनोद चिंतामण गुळवणी यांनी वडूज,येथील ओंकार मंगल कार्यालय येथे रविवार दि. 27 रोजी , दु.4 ते 6 या वेळेत झालेल्या सभासद व पदाधिकारी यांच्या सभेत बोलताना व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की,विटा बँक हि गेली 60 वर्षे सहकारी क्षेत्रात काम करणारी संस्था असून,या बँकेचा कारभार हा आज अखेर 24 गावे व तीस शाखांच्या माध्यमातून सलग चालू आहे. 
कोरोना काळातही बँकेचा आलेख उंचावत राहीला आहे.रिझर्व्ह बँकेच्या नियमाने .25 कोटी रुपये पर्यंत सक्षम व्यक्तींना कर्ज पुरवठा करू शकते.
.त्यामुळे चांगले कर्जदार असलेस बँक त्वरित कर्ज मंजूर करून देण्यास सक्षम आहे .तसेच रिझर्व्ह बँकेने ही बँकेच्या कामाचे अनेक वेळा उच्च मूल्यमापन केले आहे.
तेव्हा येत्या रविवार दि.3 जुलै रोजी विटा बँक ,शाखा वडूज येथे सकाळी 8 ते दु.4 या वेळेत 
वडूज शाखेच्या सर्वच्या सर्व म्हणजे 876 सभासद मतदारांनी भरघोस मतदान करून ' जय सहकार ' पॅनेल च्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावे. तसेच इतर सभासदांनी त्या त्या गावी असलेल्या शाखेच्या  मतदान केंद्रावर मतदान करावे.असे आवाहन शेवटी त्यांनी केले.
यानंतर वडूज शाखेचे स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य मा.सतीश शेटे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, स्व.गुळवणी आण्णा यांचेपासून सर्व सभासदांचे व स्थानिक समिती पदाधिकारी यांचे कौटुंबिक नाते असून जय सहकार पॅनेल ला आपण सर्वजण मिळून विजयी करू.तसेच डॉ.हेमंत पेठे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,विटा बँक सांगली जिल्ह्यासह खटाव तालुका व इतर ठिकाणीही  व्यावसायिक वर्गाची जिव्हाळ्याची अर्थवाहिनी ठरली असून, 'जय सहकार ' पॅनेल लाच विजयी करून आपण बँकेच्या भावी प्रगतीला साथ देवू.
या सभेवेळी श्री.सुकुमार शेठ शहा, श्री.प्रकाशशेठ माळी, शेखर भाऊ म्हामणे ,  ,दिलीप शेठ माळी,  तुकाराम भादुले,गोविंद भंडारे, महेश इनामदार,अरुण तिडके,रवींद्र पेठे, दत्ताशेठ येवले, विद्याधर कुलकर्णी, आबासाहेब महामुनी,संतोष देशमाने,नंदू भंडारे,हणमंत माळी, राजेंद्र गोडसे, बापू पवार ,अशोक जोशी, श्रीकांत म्हामणे,
विटा बँक माजी कर्मचारी अधिकारी  विजय शेटे,अनिल बाबर,श्री.जमदाडे साहेब ,  व इतर सर्व सभासद हजर होते.
आभार प्रा.अजय शेटे यांनी मानले .




Tuesday, June 21, 2022

पाऊस,महापूर सुरक्षा काळजी आणि जागर विशेष लेख - प्रा.अजय शेटे


  पाऊस,महापूर सुरक्षा काळजी आणि जागर 
 विशेष लेख - प्रा.अजय शेटे.
सातारा, दि .21 - मान्सून आणि अवकाळी पावसाचा प्रश्न आणि त्यातून तयार होणाऱ्या गंभीर समस्या,नुकसान व जीवितहानी याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.कराड,पाटण तालुका,कोल्हापूर जिल्हा,सातारा,पुणे,मुंबई सारखी महानगरे येथे पावसाचे पाणी आणि समुद्र अथवा खाडीचे पाणी यांनी वेळोवेळी मोठी पूर समस्या उद्भवली जाऊन मोठ्या प्रमाणावर भौतिक नुकसान झालेले आहे.याचा विचार करून तातडीने काही गोष्टींची उपाययोजना अंमलबजावणी हि शासन ,प्रशासन स्तर,भांडवली कंपन्या व सार्वजनिक लोकसंस्था व लोकसहभाग यांच्या सहकार्याने होणे आवश्यक बनले आहे.
सन 1975 पासून आज पर्यंत जवळजवळ 47 वर्षात 15 समित्यांनी आपत्ती निवारण बाबत आपले अहवाल सादर केलेले आहेत.त्यानुसार जवळ जवळ 10 उपाय योजना सुचवलेल्या दिसून येतात .त्या पुढील प्रमाणे आहेत.
1) पाणी स्त्रोत व महापूर याबाबत ची रियल टाइम आकडेवारी संकलन यंत्रणा जास्त व्यापक, सधन व अत्याधुनिक पद्धतीने केली जावी.
2) धरण तसेच नदी पाणी विसर्ग पर्जन्य केंद्रांचा दर्जा वाढवून तिथे अत्याधुनिक यंत्रणा बसवणे.
3) डॉपलर रडार यंत्रणा बसवणे.
4 ) दररोज 24 तास आपत्ती निरीक्षण साखळ्या सातत्य तयार करणे.
5) मोठी शहरे व पूरग्रस्त ठिकाणे जाहीर होऊन त्यासाठी पूर पूर्वानुमान सुरक्षित यंत्रणा तयार ठेवणे.
6 ) उपग्रहाच्या माध्यमातून अशा पूरग्रस्त भागाचा आढावा सलग घेणे.
7) नद्या,तलाव,धरणे,बंधारे यातील गाळ व अतिक्रमित भाग काढून त्या खोल करणे व त्यांची साठवण व वहन क्षमता वाढवणे.
8 ) रुंदीकरण ,खोलीकरण करून संरक्षक भिंती उभ्या करणे .जलस्त्रोतांचे  व नद्या यांचे सरळीकरण करणे.
9 ) पाण्याचा निचरा सहज लवकर होईल अशा पद्धतीने ओढे व नाले तयार करून सुरक्षित जलनिचरा मार्ग तयार करणे. गटार मुखावर सुरक्षित भक्कम लोखंडी जाळ्या व रेलिंग बसवणे.प्लास्टिक व कचरा व्यवस्थापन करणे.
10) पूरग्रस्त भागातील अतिक्रमणे हटवून धरण,तलाव,बंधारे यांची उंची वाढवणे.
अशा मोठ्या उपाययोजना बरोबरच सध्याच्या 
11) पूर शक्यता भागातील  लोकांचे सक्तीने स्थलांतर करून त्यांना सर्व सोयींनी युक्त अशा सुरक्षित सार्वजनिक ठिकाणी अथवा पाहुणे रावळे व मित्र परिवार यांचे कडे तात्पुरत्या अथवा कायम स्वरूपात पुनर्वसन करणे.
12 ) पूल,धरणे,रस्ते,तलाव,बंधारे यांचे शासकीय ऑडिट सलग करणे. काठावरील झाडे काढून टाकणे अथवा त्यांची दूरवर पुनर्लागवड करणे.
13 ) उपनद्या जोड प्रकल्प गतीने राबवून पाण्याचे विलगिकरण करणे.
14) 25,50,100 फूट लांब व 10 ते 15 फूट रुंद तरंगत्या फायबर,प्लास्टिक जेट्या जवळच्या ठिकाणी तयार ठेवणे.
15 ) हवेच्या दुहेरी ट्यूबस,हलक्या वजनाच्या फायबर अथवा धातूच्या शिड्या, दोरखंड शिड्या ,गाठीचे व सरळ जाड दोरखंड ,लाईफ जॅकेट,लाईफ बोटी,रेनकोट,प्लास्टिक  कँड, तरंगते प्लास्टिक बॅरल तराफे, बांबूचे तराफे  तयार ठेवणे. उपयोगी दुचाकी,चारचाकी वाहने, कामाचे संपर्क क्रमांक भ्रमणध्वनी  संच तयार ठेवणे .सक्षम प्रसार माध्यम यंत्रणा तयार करणे.
16) शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवून , अन्न,पाणी ,वस्त्र,निवारा, मेडीसिन,वीज व स्वच्छ्ता गृहे पुरविणारी प्रशिक्षित यंत्रणा उभी करणे .
17) पशु पक्षी ,जनावरे यांच्या गळ्यात लाकडी ओंडणे ,घुंगुर पट्टे बांधून त्यांचा मुक्त संचार गोठा पद्धत अवलंबणे अथवा अतिशय लहान अशा त्यांना सहज तुटू शकतील अशा सैल दोऱ्यांचा वापर करणे .
हे सर्व करण्यासाठी लोकसहभाग,सामाजिक संस्था,दानशूर व्यक्ती, नामांकित फर्मस व कंपन्या यांचा उपयोग करून घेवून त्यांना योग्य तो प्रसिद्धी मोबदला देवून या  महान कार्यात सहभागी करून घेणे.तसेच पोहता येणारे व इतर  मदतनीस जीवरक्षक व स्वयंसेवक यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजन करून त्याची मदतनीस सदस्य समिती तयार ठेवणे .
अशा प्रकारे काही लहान मोठ्या  योग्य उपाययोजना  वेळेवर राबवून महापूरासारख्या व पर्यायाने तयार होणाऱ्या इतर समस्या पासून सर्व व्यक्ती व साधन संपत्ती यांना सुरक्षित ठेवणे सहजरीत्या सोपे होऊन जाईल. 
 जागर अपघात व आपत्ती निवारण संस्था, व डू ज.

Monday, June 20, 2022

मात्या-पित्यांचे छत्र हरपलेल्या 2 बहिणींना 11 हजारांची शिष्यवृत्तीश्रुती मरगुर-बबलेश्वर हिचे पहिल्या पगारातील दातृत्व




मात्या-पित्यांचे छत्र हरपलेल्या  2 बहिणींना 11 हजारांची शिष्यवृत्ती
श्रुती मरगुर-बबलेश्वर हिचे पहिल्या पगारातील दातृत्व 
वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 65 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती 
सातारा दि.19 : प्रा अजय शेटे प्रतिनिधी 
आयुष्यातला पहिला पगार म्हणजे आनंदाची पर्वणी. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात पहिल्या पगाराचे अनोखे महत्व असते. कोणी पहिला पगार आहे तसा जपून ठेवतो, कोणी आपल्या देवाला अर्पण करतो तर कोणी आई, वडील, भाऊ आणि बहिण यांच्यासाठी खरेदी करतो. मात्र नुकतीच संगणक अभियंता बनून 'कॅप जेमिनी ' या कंपनीमध्ये नोकरीस लागलेली श्रुती मरगुर-बबलेश्वर हिने तिच्या पहिल्या पगारातील 11 हजार रुपये गरीब, गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती  म्हणून देऊन समाजासमोर एक अनोखा आदर्श उभा केला आहे.
           शनिवारी 'श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालय ' येथे झालेल्या समारंभात श्रुतीच्या पहिल्या पगारातील 11 हजारांची रक्कम माता-पित्याचे छत्र हरपलेल्या अक्षता व अंकिता स्वामी या दोन बहिणींना शैक्षणिक शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आली. 
             याप्रसंगी श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे, वीरशैव व्हीजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, संगणक अभियंता श्रुती मरगुर-बबलेश्वर उपस्थित होते. 
        याप्रसंगी अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ येथील अक्षता मल्लिनाथ स्वामी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका, द्वितीय वर्ष), अंकिता मल्लिनाथ स्वामी (इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदविका, प्रथम वर्ष) यांना शिक्षणासाठी 11 हजारांची शैक्षणिक शिष्यवृत्ती मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. त्यांचे वडील मल्लिनाथ स्वामी यांचे व आई यांचे निधन झाले असून त्यांचे आजी व आजोबा शेतमजुरी करून त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहेत. तुटपुंज्या मजुरीमुळे त्यांच्या शिक्षणाचा खर्च भागत नव्हता. त्यांची हि अडचण वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांना समजली. श्रुतीने देखील आपल्या मनातील कल्पना तिचे मामा राजशेखर बुरकुले यांना सांगितली. अशा रीतीने दुतर्फा कार्य सिद्धीस पोहोचले. या दोघींसह वीरशैव व्हिजनच्या माध्यमातून आतापर्यंत 65 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
यावेळी श्रुती यांनी सांगितले की, "माझे आजोबा कै.रेवण सिद्धेश्वर मरगुर यांचा समाजसेवेचा आदर्श माझ्यासमोर आहे.ते नेहमी म्हणत असत की,प्रत्येकाला समाज काहीतरी देत असतो.तेव्हा आपणही समाजाला काहीतरी दिले पाहिजे.या भावनेतून मी हि शिष्यवृत्ती देत आहे.यापुढेही प्रतिवर्षी 11 हजार रुपये एका विद्यार्थिनीला देण्याचा माझा ठाम मानस आहे."
           याप्रसंगी प्रा. प्रमोद मेणसे, प्रा. श्रीशैल मळेवाडी, प्रा. प्रमोद शिवगुंडे, प्रा. किरण गलगली, विश्वस्त सोमेश्वर याबाजी, उपाध्यक्ष सिद्राम बिराजदार, सचिव नागेश बडदाळ, सहसचिव संजय साखरे, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, सहकार्याध्यक्ष राजेश नीला, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, गंगाधर झुरळे उपस्थित होते. 

          कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ चौधरी, शिव कलशेट्टी, राहुल बिराजदार, अविनाश हत्तरकी, अमित कलशेट्टी, सचिन विभुते, बसवराज जमखंडी, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर कोरे, चेतन लिगाडे यांनी परिश्रम घेतले. 
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर बुरकुले यांनी केले. सूत्रसंचालन विजयकुमार बिराजदार यांनी तर आभारप्रदर्शन चिदानंद मुस्तारे यांनी मानले.

Sunday, June 19, 2022

ई.10 व 12 वी बोर्ड परीक्षेत लिंगायत समाजातील विद्यार्थी - विद्यार्थिनींचे उज्वल यश


 ई.10 व 12 वी बोर्ड परीक्षेत  लिंगायत समाजातील विद्यार्थी - विद्यार्थिनींचे उज्वल यश 
सातारा, दि.19 - प्रा अजय शेटे  प्रतिनिधी लिंगायत TV live  
 ई.10 व 12 वी बोर्ड परीक्षेत  लिंगायत समाजातील विद्यार्थी - विद्यार्थिनींचे उज्वल यश
 नुकत्याच पार पडलेल्या सन 2021- 22 या शैक्षणिक वर्षातील ई.10 वी व ई 12 वी बोर्ड परीक्षेत आपल्या लिंगायत समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थी - विद्यार्थिनींनी आपल्या अनोख्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून भरघोस यश संपादन केले आहेत.
यामध्ये सातारा जिल्ह्यातील  कु.शलाका विश्वनाथ गाडे ,कोरेगाव. 98.20 % ,प्रार्थना हरिदास देशमाने 91.60%, वडूज. चि.आयुष संतोष शेटे 90.40%,खटाव, कु. उत्कर्षा सुरेश निलाखे 89.60%, अमृता अजित गाडवे 89.40%, चि.आर्यन शैलेश शेटे,ऐतवडे. चि.आयुष नितीन येवले 85.20%, वडूज.चि.दिग्विजय जयदिप पवार 85%, सातारा. चि.मयुरेश अविनाश तोडकर 80.60%, चि.पार्थ सुनिल शेटे,76%, वडूज  कु.प्रणाली रविंद्र वाकडे 62.20%, उंब्रज. कु.चैतन्य विठ्ठल भुंजे 63% ,कोरेगाव यांनी उज्वल यश संपादन केले 
त्याचबरोबर ई.12 वी वाणिज्य शाखा परीक्षेत कु.श्रावणी अतुल वैद्य 76% , नाशिक.कु.प्रेरणा हरिदास देशमाने 88.5 % वडूज, हिने उज्वल यश संपादन केले.
त्यांच्या या यशाबद्दल वीरशैव इंटरनॅशनल,वीरशैव व्हिजन,लिंगायत संघर्ष समिती, वीरशैव लिंगायत समाज संघटना,शिवा संघटना,सातारा व लिंगायत टिव्ही यांचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व भावी शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे उत्तुंग यश

हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे उत्तुंग यश 
सातारा, दि.19 - प्रतिनिधी  प्रा.अजय शेटे.
वडूज शिक्षण विकास मंडळ संचलित हुतात्मा परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज, व डू ज मधील विद्यार्थी.. विद्यार्थिनींनी  सन 2021- 22 या शैक्षणीक वर्षात ई.10 वी बोर्ड परीक्षेत उत्तुंग यश मिळविले आहे.शाळेचा एकूण निकाल 93.20% इतका लागला आहे.
          या शाळेच्या विद्यार्थिनी कु.गायत्री विठ्ठल पवार 96.60 %, कु.समृद्धी राहूल जाधव 94.80 %, कु.धनश्री संतोष खटावकर 94.80%, कु.अमृता वैभव फडतरे 94.80% कु. प्राची चंद्रकांत डोंगरे 94.60% गुण मिळवून त्यांनी उत्तुंग यश मिळविले.
    तसेच 90% वर एकूण 14 व 80% वर एकूण 27 विद्यार्थी आहेत.
तसेच इयत्ता 12 वी परीक्षेत कला विभाग कु.नयन शुक्राचार्य साळुंखे 82.67%, कु.जाधव आदर्शा दादासो 75%, कु.पाटोळे वैष्णवी बनाजी 70.67% .
वाणिज्य शाखा कु.कदम आकांशा दिनेश 77.67%, कु.चव्हाण मयुरी संदिप 70%, पाटोळे ईशा उमेश 62.67% या विद्यार्थिनींनी यश मिळविले.
        या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे उच्च न्यायालय नियुक्त सदस्य डॉ.हेमंत पेठे, मा.सतीश शेटे,नितीन जाधव,गोविंद भंडारे ,प्राचार्या नयना गंभरे,उपप्राचार्य एम.एस.गोडसे,ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख  प्रा.एस.बी.जाधव. म.फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शितल पवार यांनी अभिनंदन केले.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शाळेने मिळवलेले हे यश अतिशय कौतुकास्पद असून,
 विद्यार्थ्यांच्या या यशात त्याचे सर्व शिक्षक,शिक्षिका ,शिक्षकेतर कर्मचारी ,पालक वर्ग यांचेही खूप मोठे योगदान आहे.त्यांचेही शाळा शाळा संकुल व वडूज पंचक्रोशीतील नागरिकांतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.

Tuesday, June 14, 2022

चांदवड येथील महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद , प्रदीपशेठ साखरे



 चांदवड येथील महाआरोग्य शिबिराला उदंड प्रतिसाद , प्रदीपशेठ साखरे

सातारा, दि.14 - लिंगायत TV live प्रतिनिधी ,प्रा. अजय शेटे.
लिंगायत फाउंडेशन, लिंगायत संघर्ष समिती , नाशिक .लिंगायत जंगम ,गोसावी समाज,चांदवड यांच्या सौजन्याने रविवार दि.12 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेत महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,चांदवड येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरास सभोवतालच्या पंचक्रोशीतील रुग्णांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
अनेक रुग्णांची अतिशय योग्य तपासणी होऊन त्यांचे रोगनिदान करण्यात आले.तसेच त्यांना योग्य समुपदेशन करण्यात  येवून पथ्य व घ्यावयाची काळजी सांगण्यात आली व त्यांच्या योग्य तपासण्या करण्यात येवून ओषधोपचार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी चांदवड चे नगराध्यक्ष मा.कासलीवाल, जि. प.गटनेते मा.डॉ. कुंभार्डे यांच्यासह नगरीतील अनेक मान्यवर उपस्थित होते 
यावेळी चांदवड लिंगायत,जंगम व गुरव समाजातर्फे या महाआरोग्य शिबिरासाठी उपस्थित असलेले डॉक्टर्स व त्यांचा सहकारी स्टाफ यांचा समाजातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.
या मोफत महाआरोग्य शिबिराचे प्रमुख आयोजक कर्ते मा.सुनील तात्या कबाडे, मा.मोहन आण्णा होनराव, डॉ.कबाडे, मा.राजेंद्र कबाडे, मा.भगवानशेठ कबाडे, मा.बाळासाहेब होनराव, मा.संजय देशमुख, मा.श्याम देशमुख,
 मा.महेशशेठ कबाडे , मा.संतोषशेठ कबाडे , मा.प्रविण गाढे , लिंगायत फाऊंडेशनचे नाशिक येथील पदाधिकारी व उत्तर महाराष्ट्र प्रमुख मा.बंडू शेठ दंदणे, मा.किरण झारेकर, मा.गणेश देशमुख, मा.सागर जाल नेकर, मा.संतोष गाढे, मा.गडकरी  यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन  करून तो यशस्वीरित्या संपन्न केला .

Monday, June 13, 2022

तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्र्वर ला म.बसवेश्वर सामाजिक समता - शिवा पुरस्कार प्राप्त


 तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्र्वर ला म.बसवेश्वर सामाजिक समता - शिवा पुरस्कार  प्राप्त 
सातारा, दि.14 - प्रतिनिधी प्रा.अजय शेटे.
वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक ,शैक्षणिक,आर्थिक व संघटनात्मक विकास होण्यासाठी कलात्मक,समाजप्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत,साहित्यिक,प्रबोधनकार,संघटक व समाजसेवक असलेल्या व्यक्ती व संस्थांची निवड शासनाने केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण विभाग राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिली आहे.
सन 2016- 17 या वर्षीचा म.बसवेश्वर समता - शिवा व्यक्तिगत पुरस्कार प्रा.मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था पुरस्कारासाठी  शिवा अखिल भारतीय युवक संघटना , ओरंगाबाद या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
सन 2017- 18 या वर्षाकरिताचा म.बसवेश्वर समता - शिवा पुरस्कार नागपूर येथील मा. अभय मनोहर कल्लावार यांना तर संस्था मध्ये हाच पुरस्कार वीरमठ संस्थान, ता.अहमदपूर , जि.लातूर या संस्थेला मिळाला आहे.
सन 2018.19 करिता हाच पुरस्कार मा.विठ्ठल बळीराम ताकबिडे यांना तर 2019.20 करिता मा.उमाकांत गुरुनाथ शेटे,पुणे यांना तर संस्थेमधून म.बसवेश्वर सेवाभावी संस्था, 
फलकळस , ता. पूर्णा, जि.परभणी या संस्थेची निवड करण्यात आली आहे.
सन 2020.21 या वर्षाकरिता लातूर येथील मा. रामलिंग बापूराव तत्तापूरे व संस्थान मधून तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्र्वर,पोस्ट दिवशी खुर्द , ता. पाटण, जि.सातारा या संस्थानची निवड करण्यात आली आहे.
सन 2021.22 या वर्षाकरिता व्यक्तिगत पुरस्कार डॉ.यशवंत बाबाराव सोनटक्के ,नवी मुंबई यांना प्राप्त झाला असून,तर संस्थे मधून सारथी प्रतिष्ठान,शिवकृपा बिल्डिंग, म.बसवेश्वर नगर ,नांदेड या संस्थेची म.बसवेश्वर समता - शिवा पुरस्काराकरिता निवड करण्यात आली आहे.
सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्र्वर यांना जाहीर झालेला पुरस्कार शुक्रवार, दि.17 जून रोजी सकाळी 10.30 वा. मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते  यशवंतराव चव्हाण सभागृह , नरीमन पॉइंट ,मुंबई येथे  सद्गुरू डॉ.निळकंठ शिवाचार्य महाराज यांना प्रदान करण्यात येणार आहे.रक्कम रु.रोख 51 हजार व सन्मानपत्र अशा या पुरस्काराचे स्वरूप आहे.हा पुरस्कार म्हणजे श्री महाराज यांच्या अनेक वर्षाच्या तपश्चर्येचे फळ आहे. तसेच या मानाच्या पुरस्कारात  मठाशी संबंधित सर्व मंडळींचे  पण खूप मोठे योगदान आहे.

या शासकीय व संस्थात्मक पुरस्काराची व्यक्तिगत साठी मानधन रक्कम रुपये 25 हजार असून,संस्थेसाठी हिच मानधन रक्कम रुपये 51 हजार आहे.या रकमेचे धनादेश लवकरच वितरित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मा. बच्चू कडू यांनी दिली आहे.
पुरस्कार प्राप्त सर्व व्यक्ती , संस्था व   संस्थान यांचे लिंगायत इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांच्या वतीने  हार्दिक अभिनंदन,हार्दिक अभिनंदन .

लिंगायत फाउंडेशन,लिंगायत संघर्ष समिती, नाशिक .चांदवड मर्चंटस को ऑ.बँक यांचे वतीने चांदवड येथे दि 12 रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर


लिंगायत फाउंडेशन,लिंगायत संघर्ष समिती, नाशिक .चांदवड मर्चंटस को ऑ.बँक यांचे वतीने चांदवड येथे दि 12 रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीर 
सातारा, दि.11 - प्रतिनिधी प्रा.अजय शेटे
लिंगायत फाउंडेशन,लिंगायत संघर्ष समिती, नाशिक .चांदवड मर्चंटस को ऑ.बँक ,लिंगायत जंगम व गोसावी समाज ,चांदवड यांचे मार्फत रविवार दि.12 जून,2022 रोजी स.10 ते सायं.4 वाजेपर्यंत महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,चांदवड, ता.चांदवड, जि.नाशिक येथे भव्य मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तसेच चांदवड व आसपासच्या परिसरातील रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  इतर शिबिरापेक्षा या शिबिराची काही खास वैशिष्टे असून मानवता कॅन्सर हॉस्पिटल,नाशिक यांचे तर्फे मॅमोग्राफी,ओरल स्क्रिनिंग,कोल्पोस्कोपी.सिरम क्रिएटनी ,साखर व संपूर्ण रक्ततपासणी करण्यात येणार आहे.
तसेच ॲशुअर्ड केअर प्लस हॉस्पिटल ,नाशिक यांचेतर्फे नामांकित डॉक्टरांचा सल्ला,रक्तातील साखर तपासणी, ई. सी.जी.,हॉस्पिटल मधील विविध आजार व डॉक्टरांच्या तपासण्यावर सूट देण्यात येणार आहे.
या शिबिराच्या बाबत अधिक माहितीसाठी डॉ.प्रकाश कबाडे 9423103942, मा.बाळासाहेब कबाडे 9226225152, मा. सुनील गोसावी 9422360961, मा.सुधीर कबाडे 9823031311, मा.जितू गोसावी 9762628951 यांचेशी संपर्क साधावा. व या महा आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा.असे आवाहन लिंगायत,जंगम,गोसावी समाज,चांदवड यांचे मार्फत करण्यात आले आहे.

Friday, June 10, 2022

जादुई आवाजाची खास शैली अनंतात विलीन मुंबई दूरदर्शनचे मराठी वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे निधन


 जादुई आवाजाची खास शैली अनंतात विलीन 
मुंबई दूरदर्शनचे मराठी वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे निधन 
सातारा, दि.8 - प्रतिनिधी प्रा अजय शेटे
आपल्या जादूई आवाजाच्या शैलीने मराठी बातम्या घराघरात व मनामनात पोहचविणारे मुंबई दूरदर्शनचे मराठी वृत्त निवेदक प्रदिप भिडे यांचे आज प्रदिर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले. ते 65 वर्षांचे होते.साल नव्वदच्या दशकातील ते एक अतिशय प्रसिद्ध असे वृत्त निवेदक होते 
सन 1974 पासून त्यांनी मुंबई येथे वृत्त विभागामध्ये अनुवादक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.तसेच त्यांनी कामगार विश्व व इ - मर्क या प्रसार माध्यम कंपनीत जनसंपर्क अधिकारी म्हणूनही काही वर्षे काम केले.सन 1980 मध्ये त्यांनी खार येथे स्वतःच्या 'प्रियंका स्टुडिओ ' ची स्थापना केली होती.
मुंबई दूरदर्शन ची सुरुवात 2 ऑक्टोबर 1972. ला म.गांधी जयंती दिवशी झाली .त्यानंतर 1974 मध्ये प्रदिप भिडे हे त्या दूरदर्शन केंद्रामध्ये दाखल झाले.वयाच्या 21 व्या वर्षापासून त्यांनी आपल्या वृत्त निवेदन कौशल्यास सुरुवात केली .मराठी अभिनेत्री स्मिता पाटील,भक्ती बर्वे,ज्योत्स्ना किरपेकर या सम व्यावसायिक वृत निवेदिकांबरोबर त्यांनी  दररोज आलटून पालटून मराठी बातम्या व इतर कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना दाखवले.
मराठी वांडमय ,नाटके ,कादंबऱ्या , एकांकिका या विषयांमध्ये त्यांना विशेष रुची होती.प्रसार माध्यम क्षेत्रात काम करण्याचा आपला मानस त्यांनी सत्यात उतरवून अखेर पूर्ण केला व मुंबई दूरदर्शनची नोकरी स्विकारली.
"संस्कृत भाषेमुळे उच्चार शुद्धी होते .वाणी सात्विक बनते.त्यामुळे सर्वांनी संस्कृत श्लोक पठण करावेत आणि आवाजाची विशिष्ठ चढ उताराची शैली जर वृत्त निवेदकाने जर आत्मसात केली .तर तो नक्कीच त्याच्या कार्यक्षेत्रात यशस्वी होऊ शकतो." असे त्यांनी अतिशय ठामपणे एकदा सांगितले होते .
त्यांनी तब्बल 25 वर्षे वृत्त निवेद नाचे काम केले. 21 मे 1999 ला स्व. राजीव गांधी यांच्या निधनाची बातमी तत्कालीन वृत्त संपादिका विजया जोशी यांनी त्यांना खास पोलिसांच्या जीपने अचानक बोलावून सांगण्यास सांगितली होती. यावरून वृत्त निवेदनाच्या बाबतीत त्यांच्यावर असलेला वरिष्ठांचा विश्वास व त्यांचे खास कौशल्य यांचे प्रचिती देवून गेले होते.
असा हा अतिशय ओघावता भारदस्त  मराठी वृत्त बातम्या निवेदन करणारा आवाज प्रदिर्घ निवृत्तीनंतर आज आपल्यातून नाहीसा झाला आहे . कै.प्रदिप भिडे यांना लिंगायत टिव्ही च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व यांच्या मराठी वृत्त निवेदन सादरीकरण कार्यास विनम्र अभिवादन .ओम शांती 


Tuesday, June 7, 2022

इष्टलिंग पूजन वीरशैवांचे मुख्य आचरण : श्री काशी जगद्गुरु काशीपीठात शाहीस्नान व धर्मसभा


इष्टलिंग पूजन वीरशैवांचे मुख्य आचरण : श्री काशी जगद्गुरु          
काशीपीठात शाहीस्नान व धर्मसभा
            
वाराणसी दि 7  : 
प्रतिनिधी 
जो इष्टलिंगाची भक्तिपूर्वक पूजन करतो. त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याच्यावर येणारी संकटे टळतात. त्यामुळे इष्टलिंग पूजा हा वीरशैवांचे प्रमुख आचरण होय असे प्रतिपादन काशी जंगमवाडी पीठाचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
          काशी जंगमवाडी मठातील शाहीस्नान व धर्मसभेचे उद्घाटन करून ते आशीर्वचन देत होते. याप्रसंगी नूतन काशी जगद्गुरु डॉ. मलिकार्जुन विश्वाराध्य महास्वामी, शाकापुर तपोवन मठाचे डॉ. सिद्धाराम शिवाचार्य स्वामी उपस्थित होते.
          पुढे बोलताना काशी जगद्गुरु म्हणाले की आज वीरशैव इष्टलिंग पूजेपासून विमुख होऊन धर्माबाहेर आचरण करताना दिसून येत आहेत हे उचित नाही. नित्य इष्टलिंग पूजा करत योग्य मार्गाने चालले पाहिजे. काम, क्रोध, मोह, मध आणि मत्सर हे अवगुण सोडून दया, शांती, भक्ती, देव आणि धर्म हे लिंगगुण आत्मसात करायला पाहिजे. श्रद्धेने लिंगपूजा करणारा स्वतः लिंगच होतो. इष्टलिंग पूजा शरीराला लिंगमय शरीर बनवण्याचे उत्कृष्ट साधन आहे. यासाठी प्रत्येक वीरशैवांनी गुरूकडून इष्टलिंग गळ्यात धारण करून दररोज इष्टलिंग पूजा केले पाहिजे.
           याप्रसंगी कलबुर्गी जिल्ह्यातील जेऊरगी  तालुक्यातील शाकापुर तपोवन मठाचे डॉ. सिद्धाराम शिवाचार्य स्वामी यांना मठाचे उत्तराधिकारीपदी चि. सिद्धलिंग मरिदेव यांची नेमणूक केल्याचे पत्र जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी प्रदान केले. तसेच बाळामठाचे डॉ. गुरुमुर्ती शिवाचार्य स्वामी यांना 'शिष्य मानस हंस' हा पुरस्कार काशी जगद्गुरूंनी प्रदान केले. 
          सकाळी ब्राम्ही मुहूर्तावर काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी व नूतन काशी जगद्गुरु डॉ. मलिकार्जुन विश्वाराध्य महास्वामी यांना दशाश्वमेध घाट येथे शाहीस्नान घालण्यात आले. त्यानंतर शाकापुर मठ येथून आलेले 2 हजार भक्त वाद्यवृंदासह जलकुंभ घेऊन  यांची बग्गीमधून दशाश्वमेध घाट ते जंगमवाडी मठापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणूकीतील सुवासिनींनी डोक्यावर घेतलेले जलकुंभ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.      


सहकार भारती चे मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियानास सर्व सहकार्य राहील - मा. शशीताई अहिर


 सहकार भारती चे मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियानास सर्व सहकार्य राहील - मा. शशीताई अहिर 
सातारा, दि.7 - प्रतिनिधी प्रा.अजय शेटे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजकीय गुरू स्व.लक्ष्मणरावजी इनामदार यांच्या स्वप्नातील सहकार चळवळ प्रत्यक्ष उतरविण्यासाठी आपण अखेरपर्यंत कार्य करणार आहोत . असे मत  सहकार भारतीच्या अध्यक्षा मा.शशीताई अहीर यांनी मा. पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेच्या पहिल्या अधिवेशन व प्रशिक्षण शिबिरात पालघर,मुनोर येथील माधवधाम रिसॉर्ट येथे बोलताना व्यक्त केले.
त्या पुढे म्हणाल्या की, यशस्वी सहकार क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी मला अनेक वेळा परदेशात जावे लागले.' विना सहकार, नही उद्धार - विना संस्कार नही सहकार ' या उक्तीला न्याय देण्यासाठी खास वेगळ्या सहकार मंत्रालयाची स्थापना करण्यात आली असून, ऑल इंडिया बँक फेडरेशन मध्ये आता आपले दहा सदस्य कार्य करत आहेत.आणि सहकार क्षेत्राची प्रगती करण्याबरोबरच त्याला सुरक्षित बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.हेच सहकार भारतीचे सध्याचे खूप मोठे यश आहे.सहकार भारती मा.पंतप्रधान आत्मनिर्भर अभियान संघटनेला केंदिय योजना प्रसार व प्रचार कार्यात संपूर्णपणे सहकार्य करणार आहे.
या कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी मा.पंतप्रधान आत्मनिर्भर भारत अभियान संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.डॉ.मुकेश जी शर्मा साहेब,कार्यकारी अध्यक्ष रामजी पाल साहेब ,  सरचिटणीस भगवानराव जी बागुल साहेब मा.रामजी,झारखंड डॉ.राजन पाटील, मा.सुलोचना ताई चौधरी,मा.किन्नरी सोनार, मा.मनिषा मुरुडकर, मा.सुनिता जानवेकर, मा.पूजा मंडवाले, मा. कृपाली संखे , मा.भरत ताकवाणी, मा.जितेंद्र पुरोहित, मा.योगिता चव्हाण, मा.सातप्पा कांबळे, मा.यशोदा पर्वतकर, मा.प्रकाश खतकर हे पदाधिकारी हजर होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय अध्यक्ष मा.शिवाजीराव देवकर साहेब यांनी अमेरिकेत असून सुद्धा तेथून खास मार्गदर्शन करून शुभेच्छा व्यक्त केल्या.यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ.मुकेश जी शर्मा साहेब यांनी  राष्ट्रीय मानवाधिकारा बाबतही खास मार्गदर्शन केले व प्रशस्तीपत्र वितरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महामंत्री दिलीप क्षीरसागर यांनी केले.आभार महाराष्ट्र  राज्य सचिव प्रा.अजय शेटे यांनी मानले.


Monday, June 6, 2022

लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही पूर्ण करण्याचे मा.शरदरावजी पवार साहेब यांचे आश्वासन


 लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत  तात्काळ कार्यवाही  पूर्ण करण्याचे मा.शरदरावजी पवार साहेब यांचे आश्वासन 
सातारा, दि.3 - रवी वाकडे.
 लिंगायत समाजाच्या मागण्या रास्त असून त्या प्रलंबित आहेत.त्या संबंधी त्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही केली जावी.असा पत्रव्यवहार मा.शरदरावजी पवार साहेब यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांना केला आहे.
या मध्ये लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा,लिंगायत वाणी लोकांना आरक्षणाचा लाभ मिळावा, म.बसवेश्वर स्मारक,मंगळवेढा बाबत तातडीने अनुदान मंजूर होऊन कार्यवाही सुरू करावी,अकरा पोट जातींचा लिंगायत म्हणून समावेश व्हावा.लिंगायत समाजाच्या मठ स्थावर संपत्ती वरील अतिक्रमणे हटविली जावीत. म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.लातूर येथील विमानतळाला म.बसवेश्वर यांचे नाव द्यावे.अशा स्वरूपाच्या या काही मुख्य मागण्या आहेत.
त्या बाबत तातडीने कार्यवाही करून मा.मुख्यमंत्री साहेब यांनी संबंधित सर्व वेगवेगळ्या विभागाकडून तातडीने अहवाल मागविले आहेत व त्या बाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या बद्दल सांगली राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते मा.संजयजी शेटे यांनी मा.शरदरावजी पवार साहेब व मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांचे लिंगायत समाज संघटने तर्फे आभार व्यक्त केले आहेत 

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...