Friday, February 23, 2024

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.



लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण            
                                                 सातारा दि 23  :-  प्रतिनिधी म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ, सातारा यांच्या वतीने नुकताच बसव भूषण पुरस्कार वितरण सोहळा सातारा येथे पार पडला.
त्यामध्ये महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष मा.ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
ते म्हणाले की,एक पुरुष शिकला तर तो शिक्षित होतो.पण एक स्त्री शिकली तर पुढची संपूर्ण पिढी शिक्षित होते.त्या प्रमाणे आपल्या लिंगायत समाजातील महिलांनी पण व्यवसायाच्या बाबतीत प्रगत आधुनिक ज्ञान घेवून स्वावलंबी होण्याच्या बाबतीत मागे राहू नये.त्यासाठी येत्या 10 मार्च ला तुळजापुर येथे व्यवसाय करण्यास लागणाऱ्या छोट्या मशिनरीचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.तसेच व्यवसाय करायला लागणाऱ्या कर्जासाठी आपल्या समाजातील बँका व पतसंस्था  सहकार्य करणार आहेत.

त्यासाठी महिलांनी तुळजापूर येथे येवून सर्व मशिनरी व त्यांना पतपुरवठा करणाऱ्या संस्थांची माहिती घेवून व आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊन सदर व्यावसायिक प्रदर्शनाचा लाभ उठवला पाहिजे .
तसेच समाजाच्या भल्यासाठी सर्व  स्त्री - पुरुषांनी समाजकार्यात हिरीरीने सहभागी होणे आवश्यक आहे.
यावेळी मा.प्रकाश शेठ गवळी,राजेंद्र घुटे, प्रदिप बापू वाले,नानासाहेब मेनकुदळे,मंडळाचे संस्थापक सागर शेठ कस्तुरे,नंदकुमार ( नंदूशेठ ) गुरसाळे,श्रीनिवास कामळे,सिद्धराज शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी मा.भारतशेठ बारवडे यांना समाज भूषण, मा.दिलीप पिलके यांना सहकार भूषण , मा.राजेंद्र आटकेकर यांना उद्योग भूषण , मा.राजेंद्र लोखंडे यांनी कृषी भूषण  व मा.महालिंग मेनकुदळे यांना साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करून विशेष सन्मानित करण्यात आले.रविवार दि.18 रोजी सायंकाळी 4 ते 7 या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत माधव मेंडीगेरी व आभार प्रदर्शन  निर्मलाताई बारवडे यांनी केले.कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते.



Thursday, February 15, 2024

महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण.




महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,दि. 18 रोजी बसव भूषण पुरस्कार 2024 चे वितरण.
सातारा, दि.16 - 
रविंद्र वाकडे
महात्मा बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,सातारा यांच्या वतीने वितरित केला जाणारा सन  2024 सालचा  अतिशय प्रतिष्ठेचा  'बसव भूषण पुरस्कार ' रविवार,दि.18 फेब्रुवारी 2024 रोजी संध्या.4 वा. प. पू.औंधकर मठ ,सातारा येथे समाजभूषण मा.भारत शेठ बारवडे , काव्य व साहित्य भूषण मा.महालिंग मेन कुदळे,सहकार भूषण मा.दिलीप पिलके, उद्योग भूषण मा.राजेंद्र आटकेकर व कृषी भूषण मा.राजेंद्र लोखंडे यांना महाराष्ट्र राज्याचे मा.मंत्री दिलीपरावजी सोपल साहेब, विरशैव इंटरनॅशनल चे असोसिएशन चे अध्यक्ष तथा सहकार महर्षी मा.ओम प्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे,लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.सुनीलशेठ रुकारी, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट चे संचालक मा.प्रकाश शेठ गवळी सावकार, पेट्रोलियम उद्योजक मां.राजेंद्रशेठ घुटे,राष्ट्रीय लिंगायत संघ अध्यक्ष मा. प्रदिपबापू वाले या मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहेत.

तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे.असे आवाहन निमंत्रक संस्थापक अध्यक्ष सागर कस्तुरे,उपाध्यक्ष श्रीनिवास कामळे,सचिव महादेव मेंडीगिरि,कोषाध्यक्ष ॲड. सिद्धराज शेटे ,संचालक सदस्य नंदकुमार गुरसाळे, किरण लखापती,सुभाष ताटे, सौ. निर्मलादेवी बारवडे ,वीरशैव लिंगायत समाज,सातारा महिला मंडळ अध्यक्षा श्रीमती नंदाताई चिंचकर,बसव विचार निमंत्रक अक्षय विघ्ने यांनी केले आहे.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...