Tuesday, May 30, 2023

पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर ,विशेष लेख - प्रा.अजय शेटे.

 पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर ,विशेष लेख - प्रा.अजय शेटे.





 पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर 
विशेष लेख - प्रा.अजय शेटे.



सातारा, दि.30 -  
राणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी  या गावात झाला.त्यांचे वडील व्यंकोजीराव शिंदे हे माळवा प्रांत साम्राज्याचे पाटील होते.त्यावेळी मुलींना शिक्षणास बंदी होती.परंतु अहिल्याबाई यांना त्यांच्या  वडीलांनी शिक्षण दिले.त्या लहानपणापासून अतिशय आदर्श व कुटुंबांचे संस्कार घेवून समाजसेवेत अग्रेसर होत्या.
एकदा इंदोर संस्थानचे राजे मल्हारराव होळकर हे माळवा प्रांतात आले असता ते' छावणी' या गावी आले.त्यावेळी तेथील श्री शंकराच्या मंदिरासमोर आठ वर्षाची एक लहान मुलगी गरीब लोकांना अन्नदान करत होती.तिचे ते कार्य पाहून त्यांनी अधिक चौकशी केली असता ती अहिल्या असल्याचे त्यांना समजले.तेव्हा त्यांनी तिच्या वडिलांना आपला राजपुत्र मुलगा खंडेराव याचे साठी तिला लग्नाची मागणी घातली.


आणि वयाच्या फक्त आठव्या वर्षी अहिल्या इंदोर संस्थान ची राणी बनली.
तिथून पुढे सलग वीस वर्षे त्यांच्या संस्थान ची खूप भरभराट झाली.
    परंतु त्यानंतर ई. स.1754 च्या एका घनघोर युद्धात त्यांचे पती खंडेराव यांना वीरमरण आले. त्यावेळी 'सती 'जाण्याची प्रथा  अस्थित्वात होती.त्यांनी त्यासाठी तयारी पण केली होती.परंतु प्रगत विचाराचे सासरे मल्हारराव यांनी पहिल्यांदा विरोध करून त्यांना सती जाण्यापासून रोखले.त्यानंतर  बरोबर बारा वर्षांनी त्यांचे सासरे मल्हारराव हे इ. स.1766 मध्ये निर्वतले.त्यामुळे सन 1767 मध्ये स्वतः अहिल्याबाई होळकर यांनी राजमुकुट परिधान करून त्या इंदौर संस्थानच्या महाराणी बनल्या.सन 1767 ते सन 1795 पर्यंत त्यांनी इंदोर संस्थानचे नाव संपूर्ण भारत वर्षात गाजवून सोडले.
त्या अतिशय देवभक्त व न्यायप्रिय होत्या.सर्वांना त्या समान न्यायदान करत असत. राजा व प्रजा असा वेगळा भेदभाव त्यांनी कधी केला नाही.त्याबाबत एक कथा त्यांची सम न्यायदानाची पद्धत सांगून जाते.
त्यांचा मुलगा असलेला युवराज मालोजीराव याने इंदोर शहरात वेगाने घोडा रथ चालवून एका गायीच्या वासरास धडक दिली व तो वेगाने निघून गेला.यात वासरू जागेवरच गतप्राण झाले.त्यामुळे तीची आई गाय विव्हल अवस्थेत तिथेच बसून राहिली.सर्व प्रजा गर्दी करून हे दृश्य पहात होती.थोड्याच वेळात तेथून महाराणी अहिल्याबाई यांचा रथ आला.त्यावेळी अधिक चौकशी केली असता त्यांना त्यांच्या पुत्राचा पराक्रम समजला.त्यांनी त्या वासराच्या अंत्यसंस्काराची सोय करून त्या गोमातेस स्वतःच्या गोशाळेतून पालन पोषण आहार देण्यास सांगितले व त्या तडक राजदरबारात आल्या.त्यांनी युवराज मालोजीराव यांच्या पत्नी सूनबाई यांना बोलावून विचारले की,अशा प्रकारचा अपराध केला तर त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची शिक्षा करावी.त्यावर सूनबाईनी सांगितले की,त्याला सरळ कडक देहदंडाची शिक्षा देण्यात यावी .त्याबरोबर त्यांनी प्रधान व शिपाई याना पाठवून मालोजीराव यांना कैदी बनवून पकडुन आणले व देहदंडाची शिक्षा सुनावलीआणि जिथे ते वासरू मरण पावले होते त्याच चौकात हातपाय दोरखंडाने बांधून मालोजीराव यांना आणून टाकले. व घोडागाडी वेगाने अंगावर घालण्यास सांगितले.परंतु त्या अश्वरथास चालविण्यासाठी कोणीही सारथी तयार झाला नाही.हे पाहून स्वतः त्या रथामध्ये  बसल्या व रथ चालवू लागल्या.त्यावेळी तीच गाई त्या रथाला वारंवार आडवी येवू लागली व तिने अहिल्याबाईंना रोखले.हा चमत्कार पाहिल्यावर प्रधान मंडळींनी त्यांना शिक्षेत बदल करण्याची विनवणी केली.त्यामुळे नाईलाजाने त्यांनी मालोजीराव यास नगरातून बाहेर काढले व त्याचे युवराज म्हणून असलेले सर्व अधिकार काढून टाकले. ही दंतकथा ज्या चौकबाजारात  घडली त्याला त्यामुळेच 'आडा बाजार '  असे नाव पडले आहे.  ही घटना अहिल्याबाई महाराणी झाल्या त्या नंतर एकाच वर्षात घडली. त्यामुळे आई व पत्नी यांचेपासून दूर राहावे लागले मुळे पुढे  दुखी मनाने खचून अतिशय बिकट अवस्थेत मालोजीराव त्याच वर्षी मरण पावले.अशा प्रकारे ओळीने पती,सासरे व त्या नंतर एका वर्षात पोटचा मुलगा मरण पावल्याचे दुःख पचवून त्यांनी इंदोर संस्थान चा राज्यकारभार मोठ्या जिद्दीने चालू ठेवला.

एक स्त्री ही इंदोर संस्थान चा राज्यकारभार पहात आहे.हे पेशवे साहेबांना योग्य वाटत नव्हते.त्यांनी इंदोर संस्थानच्या वेशीवर सैन्य नेवून इंदोर संस्थान वर पुरुष राजा बसवण्याचा आग्रह धरला.परंतु  त्यांनी आपले सेनापती तुकोजीराव यांना पेशवे सरकार यांचे कडे पाठवून एक पत्र त्यांच्या स्वाधीन केले.त्या मध्ये लिहले होते की, माझ्या वडिलांनी मला बंदी असताना  पण शिक्षण दिले,माझे सासरे यांनी मला' सती 'जाण्यापासून रोखले.दोघेही स्त्री चा आदर करणारे होते.समानता मानणारे होते.त्यामुळेच मी स्त्रियांचे सैन्य उभे करू शकले.आपण जबरदस्ती करून मला पायउतार कराल तर आमचे स्त्रियांचे सैन्य तुमच्याशी युद्ध करेल.जर त्यात तुम्ही जिंकला तर एका दुःखी स्त्रीचे राज्य हिसकावून घेतले असे दूषण तुम्हाला लागेल.आणि जर आम्ही जिंकलो तर हा अपमान  तुम्ही पचवू शकणार नाही.असे टोचणारे शब्द ऐकल्यावर पेशवे सैन्याचा विचार बदलला व त्यांनी आम्ही फक्त  तुमच्या शोक दुःखात सामील होण्यास आलो आहोत असे म्हणून त्यांनी महाराणी अहिल्याबाई यांची गाठ घेतली व दुखवटा काढून ते आल्या पावली माघारी फिरले.
      अहिल्याबाई या परकीय यावनी सत्तेपासून आपले राज्य सुरक्षित रहावे म्हणून सदैव तत्पर असत.त्यासाठी त्यांनी भगवान श्री शिवशंकराची उपासना करून आपले मनोसामर्थ्य प्रचंड वाढवले.श्री महादेवावर त्यांची खूप श्रद्धा होती त्यामुळे त्या नेहमी त्याची भक्ती करत.त्यांनी आपल्या राज्यात महेश्वर व इंदोर येथे अनेक मंदिरे बांधली.तसेच  सोमनाथ सह अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. त्यालाच सध्या ' जुने सोमनाथ ' किंवा ' अहिल्याबाई मंदिर ' असे म्हणतात.धर्मशाळा बांधल्या,शिक्षणाची सोय केली,पाण्यासाठी मोठ्या विहिरी खोदल्या.पूजापाठ संस्कार केंद्रे उभारली. लष्करी शिक्षण देवून स्त्री सैन्याची पलटण उभी केली.

                                
श्री भगवान शिवशंकरा प्रती असलेल्या भक्तिभावामुळे त्यांचा राजपत्रात व राजआज्ञेत  सर्वात शेवटी स्वतःच्या मोहोर व स्वाक्षरी ऐवजी 'श्री शिव शंकर ' अशी नोंद त्या करत असत .त्यांनी छापलेल्या नाण्यांवर श्री शंकर, श्री नंदी,बेलपत्र यांची अनेक प्रकारची चित्रे होती.
अतिशय भक्तिभावाने त्यांनी आपले राज्य चालवले.सुशासन,दूरदर्शी कारभार पारदर्शक कारभार पद्धत यामुळे त्यांची कारकीर्द खूप गाजली. "आपल्या राज्याची सर्व संपत्ती ही श्री परमेश्वराची असून आपण फक्त तिचे राखणदार आहोत "असे त्या मानत. दि.31मे  रोजी त्यांची 297 वी जयंती पार पडत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास व आदिवासी विकास मंत्री  मा.ना.आण्णासाहेब डांगे ,इस्लामपूर यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर लिहलेले 'पुण्यश्लोक मातोश्री महाराणी साहेब - देवी अहिल्याबाई होळकर '  हे पुस्तक सर्व इतिहास प्रेमी,स्पर्धा परीक्षा अभ्यासक,  तसेच राजकीय ,सामाजिक रसिक वाचक यांनी जरूर वाचावे व आपल्या जीवनात त्यांच्या राजकारभार तत्वांचा अंगीकार करावा येव्हढीच त्यांच्या 298 व्या जयंती निमित्त माफक अपेक्षा. त्याच्या पराक्रमी कर्तुत्वाला त्रिवार वंदन . जय देवी अहिल्याबाई - जय शिव शंकर.  


मा.विनयजी कोरे साहेब यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन

 मा.विनयजी कोरे साहेब यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन 



 मा.विनयजी कोरे साहेब यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन 






कराड , दि.30 - रविंद्र  वाकडे 

 लिंगायत समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जगदज्योती म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात सिंहाचा वाटा असणारे महाराष्ट्र राज्याचे विकासाभिमुख नेतृत्व , माजी मंत्री तथा आमदार मा.विनयजी कोरे ( सावकर) साहेब यांचा तमाम लिंगायत समाजाच्या वतीने बुधवार दि.31 मे 2023 रोजी , सायं.5 वा.हुतात्मा स्मृती मंदिर पार्क चौक,सोलापूर येथे भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बसव ब्रिगेड चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.अविनाश भोसीकर ( भाऊ ),प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे लिंगायत नेते मा. पी.संगमेश्वर, मा. वेण्णा ईश्र्वराप्पा  हे लाभणार आहेत.

तसेच मा. राज्यमंत्री व आ.विजयकुमारजी देशमुख, मा. आ.प्रणितीताई शिंदे,जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ चे चेअरमन मा.शिवाजी सावंत साहेब, जि. प.सदस्य  मा.अमरजी पाटील, छत्रपती फाऊंडेशनचे मा.संतोषभाऊ पवार, युवा नेत्या मा.शितलताई म्हेत्रे, मा. स्वागताध्यक्ष खलीलभाई शेख,मा.डीपीडीसी सदस्य जुबेर बागवान, एम.के.फाऊंडेशनचे मा.महादेवजी कोगणुरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष बसव ब्रिगेड प.महाराष्ट्र उपाध्यक्ष मा.संतोषजी वायचळ,निमंत्रक बसवब्रिगेड सोलापूर शहर अध्यक्ष मा.अमित राजशेखर रोडगे हे असून ,सदर कार्यक्रमाला सर्वांनी हजर राहून या सोनेरी क्षणाचे साक्षीदार व्हावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Saturday, May 27, 2023

तरुणांनी मोबाईल पासून दूर राहायला शिकले पाहिजे. पुस्तके वाचली पाहिजेत. महापुरुषांची आत्मचरित्र वाचा ते आपलं भविष्य घडवतात. DYSP शिवम विसापूरे .

 तरुणांनी मोबाईल पासून दूर राहायला शिकले पाहिजे. पुस्तके वाचली पाहिजेत. महापुरुषांची आत्मचरित्र वाचा ते आपलं भविष्य घडवतात. DYSP  शिवम  विसापूरे .



             


तरुणांनी मोबाईल पासून दूर राहायला शिकले पाहिजे. पुस्तके वाचली पाहिजेत. महापुरुषांची आत्मचरित्र वाचा ते आपलं भविष्य घडवतात. DYSP  शिवम  विसापूरे .




कराड दि २७   :- दिलीप महाजन 

कराड येथे शिवसेवा चँरिटेबल ट्रस्ट च्या वतीने चरेगाव (ता.कराड) येथील शिवम विसापूरे यांनी राज्यसेवा परीक्षेच्या निकालात डीवायएसपी म्हणून यश मिळल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी ते सत्काराला उत्तर देताना बोलत होते.कराडचे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे अध्यक्षस्थानी होते. माजी नगरसेवक विनायक विभूते, अनिल खुंटाळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे, उदय हिंगमिरे, नंदकुमार नवाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

विसापूरे म्हणाले, मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. पण हे शिक्षण सुरू असतानाच मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली होती. या परीक्षा मी देत गेलो. गतवर्षी माझी नायब तहसीलदार म्हणून निवड झाली असून त्याचे ट्रेनिंग सध्या सुरू आहे. तर यावर्षी डी वाय एस पी म्हणून माझी निवड झाली आहे. असे यश चिकाटीने अभ्यास केल्यास इतर विद्यार्थीही मिळवू शकतात .आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करायला नक्कीच तयार आहे.

 अरुण घाटे म्हणाले, खरंतर सेवा करण्याचे अनेक मार्ग आहेत. परंतु प्रशासकीय सेवेत जाऊन लोकांची सेवा करण्यासारखा दुसरा चांगला मार्ग नाही. शिवम विसापुरे यांना तो मिळाला असून ते चांगली सेवा करतील असा आम्हाला विश्वास आहे.

प्रमोद सुकरे यांनी आपल्या प्रास्ताविकात चरेगाव सारख्या ग्रामीण भागातील शिवम विसापूरे यांनी वयाच्या २५/२६ व्या वर्षी मिळवलेले यश हे इतरांना प्रेरणादायी आहे असे सांगितले.  विनायक विभुते यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप चिंचकर, सुनील महाजन, संजय शेटे, शिवानंद डुबल ,आनंद शेटे,राजेंद्र घाटे आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमास रामचंद्र लाकोळे, बाजीराव शेट्टी, राजू खलीपे, गणेश हिंगमिरे, बाजीराव शेटेनावर, दीपक जोते, प्रा. हेमंत शेटे, चंद्रशेखर नकाते, प्रमोद तोडकर, रेश्मा कोरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

                  




कराड येथे स्पर्धा परीक्षेतून डीवायएसपी झालेल्या शिवम विसापूरे यांचा सत्कार करताना नंदकुमार बटाणे, विनायक विभूते, राजू शेटे,प्रमोद सुकरे आदी.




Thursday, May 25, 2023

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय (व्हाया ) लिंगायत प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

 

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय  (व्हाया ) लिंगायत प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.



वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनच्या वतीने राज्यस्तरीय  (व्हाया ) लिंगायत प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.



कोपरगाव , दि.26 -प्रतिनिधी

 वीरशैव लिंगायत समाजातील आंतरराष्ट्रीय संस्था असलेल्या वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन(व्हाया)च्या वतीने लिंगायत लोकनेते व्हाया चे अध्यक्ष मा.काकासाहेब कोयटे व कार्याध्यक्ष मा.सुनीलशेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाया लिंगायत प्रिमियर लिग राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन कोपरगाव येथे समता इंटरनॅशनल स्कूल च्या महात्मा बसवेश्वर क्रीडांगणावर केले असल्याची माहिती ' व्हाया युथवींग ' चे अध्यक्ष मा.प्रदिप साखरे यांनी दिली.





याबाबत पुढे अधिक माहिती देताना लिंगायत संघर्ष समितीचे उपाध्यक्ष श्री.भगवान कोठावळे म्हणाले की, समता इंटरनॅशनल स्कूलच्या महात्मा बसवेश्वर क्री डांगणावर २७ व २८ मे २०२३ रोजी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा वीरशैव लिंगायत समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील  एकूण १२  संघ सहभागी होणार असून ,पुणे येथील विश्वेश्वर सहकारी बँक यांच्या कडून विजेत्या संघाला १ लाख रुपयांचे रोख बक्षीस व विश्वेश्वर चषक प्रदान करण्यात येणार आहे.तर उप विजेत्या संघाला लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे उपाध्यक्ष श्री.राजाभाऊ मुंडे यांच्या कडून ५१ हजार रुपये रोख व चषक देण्यात येणार आहे.

तसेच या स्पर्धेतील  'मॅन ऑफ द मॅच' , ' मॅन ऑफ द सिरीज ' , उत्कृष्ट बॉलर, उत्कृष्ट बॅट्समन या सारखी विविध बक्षिसे राहुरी येथील आदर्श पतसंस्थेचे चेअरमन श्री.शिवाजी आप्पा कपाळे, माजलगाव येथील मंगलनाथ पतसंस्थेचे चेअरमन श्री.रविंद्र कानडे, नाशिक येथील श्री.गणेश भोरे आदींनी जाहीर केली असल्याचे  लिंगायत संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री.चंद्रशेखर दंदणे यांनी सांगितले.

समाजातील तरुणांच्या खेळातील कौशल्याला नवा आयाम देण्यासाठी होत असलेल्या या भव्यदिव्य क्रिकेट लिग  स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी समन्वयक म्हणून श्री. सौरभ दंदणे व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व लिंगायत संघर्ष समिती चे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.



Monday, May 22, 2023

मा.मंगेशजी चिवटे यांचे अनोखे दातृत्व स्वतःला मिळालेली पुरस्काराची रक्कम दिली मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला


मा.मंगेशजी चिवटे यांचे अनोखे दातृत्व 
स्वतःला मिळालेली पुरस्काराची रक्कम दिली मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला

मा.मंगेशजी चिवटे यांचे अनोखे दातृत्व 
स्वतःला मिळालेली पुरस्काराची रक्कम दिली मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला,


मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केले विशेष कौतुक 

सातारा, दि.22 - प्रा अजय शेटे
 मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख व मा.मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेशजी चिवटे साहेब यांना  महाराष्ट्र दिना निमित्त जनहित फाऊंडेशन यांच्या वतीने  'महाराष्ट्र अभिमान ' पुरस्कार 2023 या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले .त्या पुरस्काराचे मिळालेले 25 हजार रुपये अधिक आपल्या स्वतःच्या जवळील 25 हजार रुपये असे एकूण 50 हजार रुपये असे त्यांनी आपण मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला देणार असल्याचे त्याच वेळी  जाहीर केले होते.त्यानुसार  त्यांनी ही रक्कम महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी जलसंपदा मंत्री मा.गिरीश जी महाजन हजर होते.
मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने राज्यातील एकही सर्वसामान्य रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही.याची आपण पूर्णपणे काळजी घेत असून,रुग्णांना  दिलासा देण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहे.असे यावेळी त्यांनी  सांगितले .
मा.मंगेशजी चिवटे यांच्या या अनोख्या दातृत्वाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून विशेष  कौतुक होत आहे.वीरशैव लिंगायत समाज संघटना,लिंगायत टिव्ही लाईव्ह  न्यूज चॅनेल तर्फे ही त्यांचे विशेष अभिनंदन व त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Monday, May 8, 2023

महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पदाधिकारी ,जयश्रीताई पहेलवान शिवैक्य.

 महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पदाधिकारी ,जयश्रीताई पहेलवान शिवैक्य.




महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पदाधिकारी ,जयश्रीताई पहेलवान शिवैक्य.




सातारा , दि.8 प्रतिनिधी

 महाराष्ट्र वीरशैव सभेच्या पदाधिकारी व ज्यांनी आपल्या उभ्या हयातीत म.बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित एक अंकी नाटक सादर केले अशा शरणी जयश्रीताई पहेलवान ,सांगली या आज  लिंगैक्य झाल्या.वीरशैव सभेची सतत सेवा करण्यात त्यांनी आपले उभे जीवन अर्पण केले.त्या वीरशैव महासभेचे अध्यक्ष शिवराज शेटकार यांच्या भगिनी होत.

त्यांना अखिल भारतीय वीरशैव महासभा,बेंगलोर .जिल्हा अध्यक्ष, लातूर व सर्व पदाधिकारी ,सदस्य,लिंगायत टिव्ही लाईव्ह  न्यूज चॅनेल यांचे तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

Sunday, May 7, 2023

लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न .

 लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न .


      

लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ संपन्न .


                                             

सातारादि.6 - रविंद्र वाकडे.

म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,वीरशैव लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ सातारा यथील औन्द्कर मठात  संपन्न झाला .



कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली या वेळी उपस्थित  समाज बंधू आणि भगिनी.



सातारा जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक 2023 मध्ये विजयी झालेल्या लिंगायत समाजातील सर्व विजयी झालेले समाज बांधव सत्कार केला या मध्ये जावळी - महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक   मा.प्रकाशशेठ जेधे भाऊ,कोरेगाव चे मा.सुनिलशेठ निदानमा.ॲड.अमोल राशिनकर




खटाव - वडूज चे मा.संकेतशेठ म्हामणेपाटण चे मा.बाळासाहेब महाजननिरा - पुरंदर चे मा.पंकजशेठ निलाखे ईत्यादि मान्यवर यांचा  सत्कार समाजाचे वतीने मान्यवर हस्ते करण्यात प. पू.औंधकर महाराज मठ ,बुधवार पेठ,सातारा येथे  हा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी  सौ सुषमाताई महाजन माजी नगराध्यक्ष पाटण ,आणि सौ प्रियांका ताई राशिनकर सरपंच बोधेवाडी यांचा सत्कार हि या वेळी करण्यात आला .सातारा जिल्हा हा खुप मोठा आहे आणि येथे शिक्षण घेण्यासाठी जिल्ह्या मधून अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण  घेण्यासाठी येऊ ईच्छत  आहेत मात्र काही अडचणी मुळे जमत नाही तेव्हा त्यांच्या  साठी एक वसतिगृह  या ठिकाणी झाले तर अनेक गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय कमी दरात  करता येईल या साठी मी मदत करण्यासाठी तयार आहे  समाजातील इतर बांधवानी ही या साठी  सहकार्य करावे,असे मनोगत जावली येथील जेष्ट सामाजिक कार्यकर्ते मा. विलासराव जेधे माजी सरपंच सायगाव जावली

                                     



 समाजाच्या वतीने करण्यात आलेला सत्कार हा इतर सर्व सत्कारा पेक्षा हि खूप मोठा आहे ,सत्कार मूर्ती विजयी उमेदवार यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर दादा कस्तुरे यांनी केलं सूत्र संचालन महादेव मेंडगिरी यांनी  केलं तर आभार प्रदर्शन अक्षय विघ्ने यांनी केलं या कार्यक्रमा साठी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 



रुकारी इस्टेट प्रायोजित टिम ची लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव इंटरनॅशनल समिती बरोबर संयुक्त सभा संप्पन्न.

 

रुकारी इस्टेट प्रायोजित टिम ची लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव इंटरनॅशनल समिती बरोबर संयुक्त सभा संप्पन्न.




रुकारी इस्टेट प्रायोजित टिम ची लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव इंटरनॅशनल समिती बरोबर संयुक्त सभा संप्पन्न.



सातारा, दि.8 - रवींद्र  वाकडे

वीरशैव इंटरनॅशनल ( व्हाया ) प्रिमियर लिग या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातून ' आम्ही पुणेकर ' प्रायोजित अष्ठविनायक sity-  रूकारी इस्टेट या टिमच्या खेळाडूंची लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर एक संयुक्त सभा रविवार दि.7 मे 2023 रोजी  सकाळी 11 वा.श्री संत माई हॉल ,श्री संत शिवगंगा बार्शीकर ट्रस्ट ,शिवाजी नगर, पुणे येथे संप्पन्न झाली.





या प्रसंगी '  व्हाया '  चे अध्यक्ष मा.काकासाहेब कोयटे,लिंगायत संघर्ष समिती,महाराष्ट्र चे अध्यक्ष मा. सुनिल रूकारी ,महासचिव मा.भगवान कोठावळे,कोषाध्यक्ष मा.श्रीकांत तोडकर,पुणे शहर अध्यक्ष मा.दत्तात्रय वायचळ,कार्याध्यक्ष मा. स्वप्नील खडके व टिमचे मुख्य प्रायोजक  मा. सागरशेठ रुकारी,  पुणे जिल्हा समन्वयक मा. मिलींद वलवडकर , पुणे शहर समन्वयक मा.जितेंद्र मोटे उपस्थित होते.

या दरम्यान एकूण 30 खेळाडूंचा संघ तयार करण्यात येवून फॉर्म भरण्यात येवून नोंदणी करण्यात आली .या वेळी सर्व नवोदित खेळाडूंनी आपला परिचय करून दिला.यातून अंतिम 15 खेळाडूंचा संघ शनिवार व रविवार अशा दोन दिवशी अंतर्गत सामने घेवून जाहीर करण्यात येणार आहे.या वेळी महाराष्ट्र राज्य रणजी खेळाडू मा.हर्षद खडीवाले यांचे विशेष मार्गदर्शन घेण्यात येणार आहे.स्वप्नील खडके यांनी सूत्र संचालन केले.नियोजन भगवान कोठावळे यांनी विषद केले.या नंतर संघाचे मुख्य प्रायोजक सागरशेठ रुकारी टिम प्रायोजित केल्याची अधिकृत घोषणा केली.आणि विजयाची खात्री बाळगली.




हा 'आम्ही पुणेकर ' हा संघ विजयी झाल्यास तर त्यांना ' विश्वेश्वर चषक ' व रु.1,00,000 /- व्हाया संघटने तर्फे देण्यात येतीलच.शिवाय रुका री इस्टेट यांचे तर्फे पण या संघास आणखी 1,00,000/- रुपयांचे बक्षीस देण्यात येईल . सर्व खेळाडूंनी हा  ' विश्वेश्वर चषक ' व इतर बक्षिसे आपण जिंकणारच असा खात्रीशीर आशावाद प्रायोजकांना बोलून दाखवला.यावर प्रायोजकांनी ज्याप्रमाणे विश्वेश्वर बँकेने हा चषक व बक्षिस प्रायोजित केले आहे.तसेच महाराष्ट्र पातळी वरील सर्व स्पर्धा नाही संपूर्ण सहकार्य केले जाईल.असे आश्वासन दिले. मा.काकासाहेब कोयटे म्हणाले की,आजच्या तरुणांनी समाजाच्या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे.यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन केले गेले आहे.दत्तात्रय वायचळ यांनी आभार मानले.तसेच येत्या शनिवारी मा.विजय उत्तुरे यांच्या ' स्पोर्ट्स मिलेनियम ' संस्थेच्या मैदानावर एकत्रित भेटण्याचे नियोजन करण्यात आले.




Friday, May 5, 2023

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ .

 

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ .



कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 मध्ये विजयी झालेल्या बांधवांचा सत्कार समारंभ .


सातारा, दि.6 -रविंद्र वाकडे.

 म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ,वीरशैव लिंगायत समाज व वीरशैव लिंगायत भजनी मंडळ,सातारा यांचे तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक 2023 मध्ये विजयी झालेल्या जावळी - महाबळेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक  मा.प्रकाशशेठ जेधे भाऊ,कोरेगाव चे मा.सुनिलशेठ निदान, मा.ॲड.अमोल राशिनकर, खटाव - वडूज चे मा.संकेतशेठ म्हामणे, पाटण चे मा.बाळासाहेब महाजन, निरा - पुरंदर चे मा.पंकजशेठ 

निलाखे यांचा सत्कार समारंभ समर्थ  शैक्षणिक संस्था / सावकार इन्स्टिट्यूट चे सचिव  मा.निशांत भैय्या गवळी - सावकार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि.7.5.2023 रोजी सकाळी 11 वा. प. पू.औंधकर महाराज मठ ,बुधवार पेठ,सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Monday, May 1, 2023

सकारात्मक विचारधारा नेहमी यशाकडे वाटचाल करते.. डॉ. शिवानंद बिडवे.

 सकारात्मक विचारधारा नेहमी यशाकडे वाटचाल करते.. डॉ. शिवानंद बिडवे.



                   

सकारात्मक विचारधारा नेहमी यशाकडे वाटचाल करते.. डॉ. शिवानंद बिडवे.



  तुळजापूर दि  १ :-  प्रतिनिधी 

विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचारधारा ठेवली पाहिजे ही विचारधारा यशस्वीतेकडे मार्गक्रमण करते असे प्रतिपादन उस्मानाबादचे तहसिलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी केले. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.

स्पर्धेमध्ये कु. शिवअस्मिता साठे हीने प्रथम क्रमांक, कु. अंकिता क्षिरसागर हीने द्वितीय क्रमांक तर कु. स्वरांजली बडुरे हीने तृतीय क्रमांक पटकावला.तसेच कु. सानिका रोडे, कु. भक्ती साठे व कु. दिव्या तिकोणे या मुलींनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली.


                     

यावेळी कु. कृष्णाई उळेकर यांचा सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, श्री नागनाथअप्पा वझे यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन तर श्री वैजिनाथप्पा टाकणे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सुरूवातीला कु. कृष्णाई उळेकर यांची मुलाखत प्रा. विवेक कोरे यांनी घेतली.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार उस्मानाबाद मा. डॉ. शिवानंद बिडवे  तर प्रमुख अतिथी म्हणून मा. राजकुमार केलुरकर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सौ. दिपा मस्के, सौ. संजिवनी तोडकरी, सौ. महानंदा टाकणे, सौ. शुभांगी करिशेट्टी, सौ. संगिता नडमणे,सौ. रेश्मा टाकणे, कु. कृष्णाई उळेकर, कु.कोमल तिकोणे, कु. अंकीता क्षिरसागर, कु.गौरी टाकणे, महादेव तोडकरी, ओंकार मस्के, विक्रम बचाटे, ओंकार साडेगावकर, महेश नडमणे, अजिंक्य आडसकर, वैजिनाथ टाकणे, अरूण तोडकरी,औदुंबर वझे, अभिषेक कोरे, महेश पाटील, गोविंद साठे, प्रमोद क्षिरसागर, महादेव बडुरे, प्रकाश टाकणे, सचिन उपासे, नागराज तोडकरी, प्रफुल्लकुमार शेटे,प्रभाकर उळेकर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.विवेक कोरे तर आभार प्रदर्शन ॲड. ओंकार मस्के यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीने पुढाकार घेतला.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...