देगलूर तालुक्यातील खानापुर गाव व खानापूर सर्कल परिसरातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे . शेतकऱ्यांच मोठे नुकसान
देगलूर खानापूर.दि.१० ;- शिवकुमार कल्याणी (प्रतिनिधी )
देगलूर तालुक्यातील खानापुर गाव व खानापूर सर्कल परिसरातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे नदी,नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत. शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले असून, शेकडो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे, प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या हाती निराशाच येते आहे, कधी आस्मानी तर कधी सुलतानी अशा संकटांचा सामना या भागातील शेतकरी करीत आहेत,अत्यंत महागामोलाचं बि- बियान,कर्ज काढून काळ्या आईच्या उदरात मोठ्या उमेदीने त्यांनी पेरले होते,व अनेक स्वप्ने पाहिली होती कि या वर्षी तरी निसर्ग साथ देईल व आपलं काहीतरी भलं होईल असे वाटत होते, अत्यंत कष्टाने केलीली मेहनत एका पुराण वाहून नेली.अजून तरी पाऊस चालूच आहे असाच पाऊस चालू राहीला तर अत्यंत भयान परिस्थिती उद्भवेल.गावातील व खानापूर महसूल मंडळातील अनेक शेतकऱ्यांना पुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सदरील शेतकऱ्यांच्या शेतीचे पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी....!



No comments:
Post a Comment