Friday, September 30, 2022

आर - फिटनेस ठरतेय महिलांसाठी मोकळा श्वास

 

                         आर - फिटनेस ठरतेय महिलांसाठी मोकळा श्वास 


                        आर - फिटनेस ठरतेय महिलांसाठी मोकळा श्वास 




सातारा, दि.1 -   प्रा.अजय शेटे.

दि.27 व 28 सप्टेंबर रोजी संध्या.4 ते 7 या वेळेत सलग दोन दिवस ' आर - फिटनेस जिम,'  वडूज  तर्फे पंचरत्न मंगल कार्यालय येथे विविध मनोरंजक उपक्रम घेण्यात आले.

या मध्ये गरबा,दांडिया,झुंबा डान्स व होम  - मिनिस्टर सारख्या खेळांचा समावेश होता.या उपक्रमाचे या वर्षी पहिलेच वर्ष होते.तरी देखील वडूज मधील महिला - भगिनिंकडून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

रोजच्या दगदगीच्या जीवनातून थोडा काळ का होईना ,सर्व महिलांसाठी हा ' मोकळा श्वास ' होता.



आर - फिटनेस चे संचालक ट्रेनर  ऋतुराज राऊत यांच्या संकल्पनेतून गेले वर्षभर  गुरुकृपा मंगल कार्यालय येथे खास महिलांसाठी ' झुंबा व योगा ' क्लासेस घेतले जात आहेत.या माध्यमातून या संस्थेने एक पाऊल पुढे येवून महिला विश्वात खास असा एक नवा ठसा उमटवला आहे  व या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.**




Thursday, September 29, 2022

वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम संपन्न

           वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम संपन्न 



        वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम संपन्न 



सातारा, दि.30 -प्रा.अजय शेटे.  

शिवदत्त दुर्गा उत्सव मंडळ ,वडूज तर्फे सालाबाद प्रमाणे चालू 18 व्या वर्षी गुरूनिर्वाण महारुद्र पशुपती वंदनीय श्री कोळेकर महाराज यांचा आशिर्वचन कार्यक्रम येथील श्री विठ्ठल मंदिर येथे गुरूवार दि.29 रोजी संध्याकाळी 6 ते 7.30 या वेळेत पार पडला.

यावेळी वंदनीय श्री कोळेकर  महाराज यांनी सांगितले की, श्री दुर्गा देवीची नऊ रूपे व तिच्या अनुषंगाने येणारे तिचे नऊ रंग हे तिच्या ठायीच्या अनेक शक्तींचे प्रतीक आहे.त्यातून महिलांनी सद्गुण घेवून आपले दैवी व आध्यात्मिक जीवन घडवावे.तसेच संसार व समाज कार्यात कार्यरत रहावे.




 ते पुढे म्हणाले की,आपले आराध्य दैवत भगवान श्री शिवशंकर असून ,त्याची भक्तीच आपणास जीवनात तारून नेते.भक्तीयोग आणि कर्मयोग हा आपला पाया असून ,आपले धर्मग्रंथ व गुरू हेच आपले मार्गदर्शक आहेत.त्यांनी घालून दिलेल्या चालीरिती प्रमाणे आपण आपली धर्म वाटचाल केली पाहिजे.

या  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अजय शेटे यांनी केले.श्री.कुमारकाका शेटे यांच्या हस्ते श्री महाराजांचा यथोचित सत्कार करण्यात आला.श्री.संजय येवले यांनी श्री महाराजांचे पाद्यपूजन केले.श्री.बसवेश्वर येवले यांनी पंचारती ओवाळणी केली. श्री.राजेंद्र शेटे यांनी आरती गायन केले.श्री.सोमनाथ येवले यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.




 मंडळ व्यवस्थापन व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल टाकणे,वैभव टाकणे,गजानन गाडवे, अशोक जोशी अथक परिश्रम घेवून सेवाकार्य करतात.

श्री.शेखर भाऊ म्हामणे, दत्तात्रय येवले, अमित गाडवे,विकास ठिगळे, सागर येवले,दत्तात्रय गाडवे, शंकर एकांडे, राहूल म्हामणे , मिलिंद लंगडे,सुहास येवले यांचे मार्गदर्शन लाभते.




श्री शिवयोगिनी लघुरुद्र महिला मंडळच्या सर्व सदस्य महिला सदस्या व महिला कुटुंबीय श्री दुर्गा मातेची मनापासून भक्ती करून सेवा करतात.

श्री दुर्गा देवीच्या आरतीचा मान रोज नवीन कुटुंबांना दिला जाऊन  त्यांच्या तर्फेच सात्विक प्रसाद वाटप केले जाते.रोज महिला व लहान मुले - मुली यांचा रास दांडिया,भोंडला,संगीत खुर्ची,चमचा लिंबू, पोत्याची शर्यत  असे खेळ खेळले जातात.श्री दुर्गा देवीस रोज नवीन रंगाची साडी नेसवली जाऊन शुभ पूजा केली जाते.महाप्रसाद अर्पण केला जातो.




वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) एक्स्पो 2023 आता हुबळी कर्नाटक मध्ये होणार

 


 वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) एक्स्पो 2023 आता हुबळी कर्नाटक मध्ये होणार


वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) एक्स्पो 2023 आता हुबळी कर्नाटक मध्ये होणार


सातारा, दि.30 - रविंद्र वाकडे.

  वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) तर्फे लिंगायत समाजाचा सामाजिकतेतून आर्थिक विकास व्हावा व तरुण ,तरुणी ,व्यावसायिक ,उद्योजक यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यातून समाजातील प्रत्येक घटकाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ' व्हाया ' तर्फे गेल्या 12 वर्षातून महाराष्ट्रात व्यावसायिक प्रदर्शन ,सेमिनार,एक्स्पो ,नोकरी महोत्सव असे वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात.


एकमेव आंतरराष्ट्रीय व व्यावसायिक संघटना असलेल्या वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ने यावर्षी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील व्यापारी ,उद्योजक यांच्या मध्ये व्यवसाय वाढविण्यासाठी व तरुण व्यावसायिक उद्योजक घडविण्यासाठी यावर्षी ' व्हाया एक्स्पो 2023  ' हुबळी कर्नाटक येथे आयोजित केला आहे.त्यासंदर्भात आढावा बैठक 'केएलई विद्यापीठ ' हुबळी येथे 


'के एल ई ' शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लिंगायत भूषण मा. खा.प्रभाकरजी कोरे साहेब व लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे ,व्हाया सेक्रेटरी गुड्डीमठ साहेब ,व्हाया युथविंग अध्यक्ष प्रदीप साखरे व 'ए आय व्ही एम् 'चे  पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत व हुबळी ,धारवाड,बेळगाव,बेंगळुरू येथील उद्योजक उपस्थित होते.






आज प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. त्यामुळे संस्काराचा विसर पडत चाललेला दिसतो. अशा परिस्थितीत मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम राबवून एक प्रकारे संस्काराचे बीज रोवले जात आहे. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर

 


 आज प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. त्यामुळे संस्काराचा विसर पडत चाललेला दिसतो. अशा परिस्थितीत मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम राबवून एक प्रकारे संस्काराचे बीज रोवले जात आहे.  महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर .






 आज प्रत्येकजण भौतिक सुखाच्या मागे लागला आहे. त्यामुळे संस्काराचा विसर पडत चाललेला दिसतो. अशा परिस्थितीत मातोश्री सिंधुताई विश्वनाथ सुकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम राबवून एक प्रकारे संस्काराचे बीज रोवले जात आहे.  महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष व यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर.


     नांदगाव   दि २९ :- प्रतिनिधी     

   नांदगाव (ता. कराड) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका दिवंगत सिंधुताई विश्वनाथ सुकरे यांच्या ४थ्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चरेगावकर बोलत होते. कृष्णा चँरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त शिवाजीराव थोरात अध्यक्षस्थानी होते . ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि.तु.सुकरे गुरुजी, उद्योजक जगन्नाथ कुचेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत जाधव, संदीप जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

___________________________________________________________________________________

 दिवंगत सिंधुताई सुकरे यांच्या पुण्यस्मरण निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक दुर्गा उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पूजेच्या साहित्याचे वितरण करण्यात आले. तर वृक्ष चळवळ बळकट करण्याच्या उद्देशाने गावातील हरीत सेनेचे कार्यकर्ते गणेश कडोले, प्रथमेश शेटे, निलेश चौधरी आदींच्याकडे रोपे प्रधान करण्यात आली. यावेळी वन विभागातून सेवानिवृत्त झालेल्या राजेंद्र गवते  यांचा तर न्यू इंग्लिश स्कूलच्या पालक संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हितेश सुर्वे यांचा सत्कार करण्यात आला.

___________________________________________________________________________________

 चरेगावकर म्हणाले, खरंतर आम्ही सगळेच समाजाचे काहीतरी देणे लागत असतो. याची जाण ठेवून प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून काम केले तर राष्ट्र बळकट व्हायला वेळ लागणार नाही .

शिवाजीराव थोरात म्हणाले, आई हा प्रत्येकाचा पहिला गुरु आहे हे लक्षात घेऊन सिंधुताई सुकरे यांच्या मुलांनी त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ राबवलेले उपक्रम इतरांना प्रेरणा देणारे आहेत.

 संदीप जोशी म्हणाले, सिंधुताई सुकरे यांचेकडून आम्हाला प्राथमिक शिक्षणाचे धडे मिळाले. आईच्या ममतेने ज्ञानदान करणाऱ्या त्या नावाप्रमाणेच 'वास्तल्यसिंधू' शिक्षिका होत्या. 

कार्यक्रमाला दक्षिण मांड व्हँली शिक्षण संस्थेचे सचिव एस.टी. सुकरे, संचालक शंकरराव पाटील, प्राचार्य आर. बी. पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती परशुराम पाटील, वसंत माटेकर, मच्छिंद्र कुंभार, मारुती यशवंत पाटील, सयाजी शिंदे, दिलीप पाटील, संतोष पाटील, बाजार समितीचे माजी संचालक सतीश कडोले, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष जयवंत मोहिते, सुधीर पाटील, अधिकराव पाटील, माजी सरपंच प्रकाश पाटील, उत्तम पाटील, उदय पाटील, पोपटराव पाटील, विकास सोसायटीचे उपाध्यक्ष राजाराम कांबळे, जयकर पाटील, शरद शिणगारे, महेश पवार, शरद पाटील, संभाजी पाटील, अनिल पाटील, हरिहर तोडकर, मोहन कुचेकर, रोहित मुळीक ,संजय तलबार, अभिजीत माटेकर, ग्रामपंचायत सदस्या गौरी मोरे, डी.एम. मोरे, रघुनाथ पाटील, सर्जेराव पाटील, रामभाऊ साळुंखे, संभाजी पाचंगे ,धोंडीराम शिंदे, चंद्रकांत कडोले, शिवाजी माळी, सुनील शिणगारे ,नितीन आंबेकर, राजेंद्र पाटील, अमर कदम, जगन्नाथ पाटील, रघुनाथ जाधव, वैभव शेटे, प्रणव तांबवेकर, रमेश पाटील, केतन पाटील, प्रणित कुचेकर, शुभम मोरे, दिगंबर शिंदे आदींची उपस्थिती होती.

 प्रमोद सुकरे यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे यांनी सर्वांचे स्वागत केले.   काकडे सर यांनी आभार मानले. हणमंत यादव यांनी सूत्रसंचालन केले.




Wednesday, September 28, 2022

एन.एस.एस. ई.परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार

          एन.एस.एस. ई.परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार 



       एन.एस.एस. ई.परीक्षेत यश मिळविणाऱ्या गुणवंतांचा सत्कार 



सातारा, दि.28 -प्रा.अजय शेटे.

 वडूज येथील म.फुले प्राथमिक शाळेतील स्पर्धा परीक्षा एन.एस.एस. ई.मध्ये उत्तम गुण मिळवून क्रमांक व यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनी यांचा सत्कार समारंभ उच्च न्यायालय नियुक्त सदस्य मा.सतीश शेटे, मा.गोविंद भंडारे यांचे हस्ते आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे सविस्तर स्वरूप व स्पर्धा परीक्षा बाबतचे मनोगत या परीक्षेच्या आयोजक संचालिका सौ.भारती  सागर पवार मॅडम यांनी केले.

म.फुले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शितल पवार यांनी विद्यार्थी - विद्यार्थिनींनी केलेल्या अभ्यासपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. हु.परशुराम विद्यालय व ज्युनियर कॉलेज चे उपप्राचार्य मा.महेश गोडसे सर् यांनी विद्यार्थी - विद्यार्थिनी ,सह शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांच्या प्रयत्नांचे कौतुक करून ,मार्गदर्शन ही केले.

यावेळी संचालक सतीश शेटे म्हणाले की ,सर्व गुणी विद्यार्थी हे या शाळेची खरी संप्पती आहे.शाळेतील शिक्षिका,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मार्गदर्शिका व पालक वर्ग यांचेमुळे विद्यार्थ्यांची खरी जडणघडण होत असते.




यावेळी संचालक मा. गोविंद भंडारे यांचेही भाषण झाले.त्या वेळी त्यांनी सांगितले की,विद्यार्थांच्या सर्वांगीण विकासासाठी या शाळेत अनेक उपक्रम राबवून ,विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास साधला जातो.

या कार्यक्रमाला डॉ.हेमंत पेठे,श्री.नितीन जाधव यांनीही शुभचिंतन व्यक्त करून यशस्वी विद्याथ्र्यांचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला सौ. खाडे मॅडम यांनी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.

यावेळी  चि.ओजस अजय शेटे व त्याचे पालक सौ.मनिषा अजय शेटे मॅडम यांचाही सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून संचालक  मा.सतीश शेटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच इतर सर्व गुणी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. म.फुले शाळेच्या सर्व शिक्षिका,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग,विद्यार्थी - विद्यार्थिनी हजर होते.




Monday, September 26, 2022

वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद,जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण

 

वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद,जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण




वीरशैव लिंगायत वधू-वर मेळाव्यास उत्स्फुर्त प्रतिसाद,जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण



उदगीर  दि  २६  (प्रतिनिधी)ः

 लिंगायत महासंघाच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी रघुकूल मंगल कार्यालय, उदगीर येथे वीरशैव लिंगायत समाजाचा वधूवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात 450 वधू-वरांनी भाग घेवून उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला.

या मेळाव्यासाठी उद्घाटक म्हणून शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ.मनोहर पटवारी, मल्लिकार्जुन मानकरी, उदगीर हावगीस्वामी मठाचे शिवाचार्य शंभुलिंग शिवाचार्य महाराज तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे, प्रा.प्रभाकर उदगीरे, रामेश्‍वरअप्पा कानडे, लिंगायत महासंघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील गुंजोटीकर, नांदेड जिल्हाध्यक्ष उद्योजक अनिल शेटकार, प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, प्रदेश सहसचिव सुरेश वाले, लातूर लिंगायत महासंघाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके, काशीनाथ मोरखंडे, लिंगेश्‍वर बिरादार, विठ्ठलराव पाटील, निलकंठ शिवणे, नांदेडचे प्रसिध्द ठेकेदार माधवराव पटणे, चाकूर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे, कपील माकणे, गणेश पटणे, अहमदपूर अध्यक्ष महेश भिंगोले, संतोष कल्याणी, नवनाथ डोंगरे, सांगलीचे प्रदिप वाले, बसवराज पाटील कौळखेडकर, माधवराव निंगदाळे, प्रा.रामदास मिरजगावे, चंद्रकांत शिरसे, सुभाष शेरे, भिमाशंकर शेळके, राजकुमार वडले, अशोक तोंडारे, बाबुराव शेटकार, चंद्रकांत डांगे, अशोक काडादी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात प्रा.प्रभाकर उदगीरे सर नांदेड व रामेश्‍वरअप्पा कानडे माजलगाव यांना जीवनगौरव पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच उमाकांत मळगे, शिवहार येलुरकर, माधवराव लिंगदाळे, रामदास मिरजगावे, शिवकुमार हासरगुंडे, सुनिल हवा, श्रीनिवास गंगथडे, उपजिल्हाधिकारी प्रविण मेंगशेट्टी, चाकूरचे तहसीलदार शिवानंद बिडवे यांच्यासह 22 मान्यवरांना समाजभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच श्रीमती अंजुम कादरी व सौ.सुलभा साकोळकर यांना अक्कामहादेवी  पुरस्कार देवून गौरविण्यात आले. या वधूवर मेळाव्यासाठी भावी वधू व वर आणि पालकांनी मोठ्याप्रमाणात हजेरी लावली व 450 वधूवरांची नाव नोंदणीही झाली.

या मेळाव्यासाठी उदगीर तालुका व परिसरातून समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






Sunday, September 25, 2022

मौ.गंगापूर येथील सरपंच जयश्री बिरादार यांना वाणी या जातीची वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त

 

मौ.गंगापूर येथील सरपंच जयश्री बिरादार यांना वाणी या जातीची वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त




मौ.गंगापूर येथील सरपंच जयश्री बिरादार यांना वाणी या जातीची वैद्यता प्रमाणपत्र प्राप्त


उदगीर दि 25 :- संगम पटवारी प्रतिनिधी  लिंगायत TV Live 

मौ. गंगापूर  येथील ग्रामपंचायत निवडणूक सन २१ ते २५ अंतर्गत प्रभाग क्रमांक २ मधून सर्वसाधारण स्ञी या जागेवर निवडणूक लढवून प्रचंड मतांनी निवडून आल्या होत्या या निवडणुकीच्या अनुषंगाने मौजे गंगापूर ता. उदगीर ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे ओबीसी महिलांसाठी राखीव  सुटलेले असल्याने  त्यांनी सरपंचपदासाठी नामनिर्देशन अर्ज भरून (ता. ११) फेब्रुवारी २१ रोजी बहुमताने सौ. जयश्री नागभूषण बिरादार यांची सरपंचपदी  निवड करण्यात आली. सौ जयश्री नागभूषण बिरादार यांनी मा. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर यांच्याकडे वाणी या जातीच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करून वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी  दिनांक १० फेब्रुवारी २०२१ रोजी अर्ज दाखल केला होता, त्या अर्जाच्या अणूषंगाने त्याच्या विरोधात गावातील महानंदा गुरुलिंग स्वामी यांनी आक्षेप/तक्रार नोंदविली होती . या जाती-दाव्याच्या प्रकरणात मा. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, लातूर यांनी वेळोवेळी सुनावणी घेऊन सौ जयश्री नागभूषण बिरादार यांनी दाखल केलेल्या वाणी या जातीच्या दाव्याबाबत( दि .16) सप्टेंबर रोजी न्यायनिर्णय देऊन व तसेच वाणी या जातीचे जात प्रमाणपत्र वैध ठरवून त्यांना वाणी या जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी गंगापूर च्या सरपंच सौ. जयश्री नागभूषण बिरादार यांची बाजू वकील म्हणून अँड प्रसाद काळे पाटील, औरंगाबाद यांनी प्रखरपणे बाजू मांडली आणि तसेच अँड दिपक मंगले या वकीलाने त्यानां साह्य केले आक्षेपदार/तक्रारदार यांचे वकील म्हणून अँड विष्णू गाडेकर यांनी काम पाहिले.



Saturday, September 24, 2022

शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त देगलूर शहरात गणेश शिंदे यांचे व्याख्यान

 


          शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या द्वितीय                      स्मृतिदिनानिमित्त देगलूर शहरात गणेश शिंदे यांचे व्याख्यान



           शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या द्वितीय                       स्मृतिदिनानिमित्त देगलूर शहरात गणेश शिंदे यांचे व्याख्यान


 नांदेड दि २३ : जिल्हा प्रतिनिधी लिंगायत टिव्ही लाईव्ह  शिवकुमार कल्याणी

वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकरांनी एकशे पाच वर्ष समाजमनात आदर्शांची रुजवणूक करण्यासाठी अविरतपणे झिजले.  अध्यात्मिक, सामाजिक, संस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात एक उच्च आदर्श प्रस्थापित केला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ समाजमनात सद्विचारांची आणि संस्कारांची रुजवणूक व्हावी या भूमिकेतून देगलूर शहरात वसुंधरारत्न स्मृति व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगळवार दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ०५ : ३० वाजता नगरेश्वर मंदिर सभाग्रह देगलूर येथे द्वितीय व्याख्यानपुष्प आयोजित करण्यात आले आहे. या वसुंधरारत्न स्मृति व्याख्यानमालेचे पहिले पुष्प महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध युवावक्ते श्री. गणेश शिंदे हे गुंफणार आहेत. 'अस्वस्थ वर्तमानात संतांचा संदेश' या  महत्त्वाच्या  विषयावर श्री. गणेश शिंदे यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानमालेचे अध्यक्षस्थान शिवलिंग बादशहा मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर हे भूषवणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ही व्याख्यान संपन्न होणार आहे.




'जीवन सुंदर आहे' अशा विविध विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करणारे महाराष्ट्रातले एक तरुण असे कृतिशील वक्ते म्हणून गणेश शिंदे यांचा परिचय आहे. प्रबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजाच्या उत्कर्षासाठी अनेक रचनात्मक असे विधायक उपक्रम राबवण्यात त्यांची ख्याती सर्वश्रूत आहे.  ते महाराष्ट्र शासनाच्या नॅशनल इनस्टीटूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजि या संस्थेचे मुख्य सल्लागार म्हणून काम पाहतात. अशा  अभ्यासू आणि तडफदार वक्त्याचे व्याख्यान म्हणजे देगलूर परिसरातील नागरिकांसाठी एक वैचारिक मेजवानीच आहे. म्हणून देगलूर परिसरातील जास्तीत जास्त रसिक श्रोत्यांनी या व्याख्यानमालेचा सहकुटुंब उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन वसुंधरारत्न डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर व्याख्यानमाला समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




अर्थसिद्धी पतसंस्था,लिंगायत संघर्ष समिती,पुणे व श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक कार्यक्रमाचे आयोजन

 

 अर्थसिद्धी पतसंस्था,लिंगायत संघर्ष समिती,पुणे व श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक कार्यक्रमाचे आयोजन 


 अर्थसिद्धी पतसंस्था,लिंगायत संघर्ष समिती,पुणे व श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अनेक कार्यक्रमाचे आयोजन 

सातारा, दि.25 -रविंद्र वाकडे. 

ष. ब्र.श्री 108 महादेव शिवाचार्य वाईकर महाराज यांच्या आशिर्वादाने अर्थ सिद्धी पतसंस्था,लिंगायत संघर्ष समिती,पुणे व श्री संत शिवगंगा देवी बार्शीकर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवार दि.29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता सुहाग मंगल कार्यालय,बिबवेवाडी ,पुणे 411037 या ठिकाणी अर्थ सिद्धी पतसंस्था राबविणार असलेल्या नवीन विविध योजनांचा शुभारंभ तसेच वीरशैव इंटरनॅशनल व लिंगायत संघर्ष समिती प्रणित  ' शुभयोग ' वधू-  वर सूचक मंडळांचे उद्घाटन असे  कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.


तसेच याच कार्यक्रमात पुणे जिल्हा लिंगायत समाजाच्या वतीने  आशियाई पतसंस्था फेडरेशनच्या कोषाध्यक्ष पदी निवड झाले बद्दल समाजातील मान्यवर  मा.ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे व मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचे विशेष कार्याधिकारी (OSD) व मा.मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष,मंत्रालय ,मुंबई चे कक्ष प्रमुख मा.मंगेशजी नरसिंह चिवटे या दोन मान्यवरांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.


      या कार्यक्रमाला आपण सर्वांनी वेळेवर सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.असे आवाहन विनीत श्री. सुनिल नामदेवराव रुकारी( मा.अध्यक्ष, श्री सहकारी बँक लि.,श्री.अनिल भरतशेठ गाडवे ( जेष्ठ संचालक,श्री विश्वेश्वर सहकारी बँक लि.,श्री.भगवान चंद्रकांत कोठावळे ( मा.अध्यक्ष ,अर्थासिद्धी पतसंस्था ) ,श्री.श्रीकांत शामराव तोडकर ( मा.उपाध्यक्ष , अर्थसिद्धी पतसंस्था) ,श्री.अशोक नामदेवराव रुकारी ( मा.अध्यक्ष श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट ), श्री.नरेंद्र मार्तंडाप्पा व्यवहारे ( मा.उपाध्यक्ष श्री संत  शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट),डॉ.महादेव एस.सगरे ( मा.अध्यक्ष काशी विश्वनाथ शिक्षण संस्था ) श्री.विजय शंकर उत्तुरे ( मा.उपाध्यक्ष, काशी विश्वनाथ  शिक्षण संस्था ) यांनी केले आहे.




रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक ॲड.अंश खलिपे यांचा वाढदिवस फौंडेशनच्या 'अंशजल सामाजिक वाढदिवस' उपक्रमांतर्गत जि.प.शाळा बेलवडे येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप

 

रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक ॲड.अंश खलिपे यांचा वाढदिवस फौंडेशनच्या 'अंशजल सामाजिक वाढदिवस' उपक्रमांतर्गत जि.प.शाळा बेलवडे येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप ,


रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक ॲड.अंश खलिपे यांचा वाढदिवस फौंडेशनच्या 'अंशजल सामाजिक वाढदिवस' उपक्रमांतर्गत जि.प.शाळा बेलवडे येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप .



कडेगाव दि २३  :-  दिलीप महाजन   प्रतिनिधी

रुद्राक्षा फौंडेशनचे संस्थापक ॲड.अंश खलिपे यांचा वाढदिवस फौंडेशनच्या 'अंशजल सामाजिक वाढदिवस' उपक्रमांतर्गत जि.प.शाळा बेलवडे येथील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप करून साजरा करण्यात आला.

अंशजल सामाजिक वाढदिवस उपक्रमाबाबत सांगताना ॲड.अंश खलिपे म्हणाले की प्रत्येकजण घरी वाढदिवस करतातच, पण आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेने फौंडेशन अंतर्गत गेली सात वर्षे आम्ही सामाजिक वाढदिवस साजरा करत आहोत. शैक्षणिक साहित्य वाटप, अन्नदान, शैक्षणिक मुलं दत्तक घेणे अशा अनेक गोष्टी आम्ही या उपक्रमांतर्गत नेहमीच करत असतो.

यावेळी फौंडेशनच्या उपक्रमाबाबत कौतुक करताना शाळेचे मुख्याध्यापक गोरखनाथ मोहिते म्हणाले, याप्रकारचे वाढदिवस सर्वांनीच साजरे करायला हवेत. रुद्राक्षा फौंडेशनचा हा सामाजिक वाढदिवसाचा उपक्रम खरंच खूप कौतुकास्पद आहे.




यावेळी माजी मुख्याध्यापिका सौ.शोभा खलिपे, शुभंकरोती चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव श्रीकांत खलिपे, Advance खबरचे उपसंपादक शंकर पोळ, शाळेचे मुख्याध्यापक गोरखनाथ मोहिते, शिक्षक किरण पाटील, अंगणवाडी सेविका, तन्मय मोहिते व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Friday, September 23, 2022

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून व्हा आर्थिक संपन्न

       सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून व्हा आर्थिक संपन्न

     सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून व्हा आर्थिक संपन्न

कोल्हापूर दि २३ :- स्वप्नील चौगुले सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारणीतून व्हा आर्थिक संपन्न  शेतकऱ्यांनी मेहनतीने (Food Processing) पिकवलेल्या शेतमालाला रास्त भाव मिळून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील तरुणांना, बेरोजगारांना स्वतःचे व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुदान देणारी योजना म्हणजे ‘प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना’.

तरुण, बेरोजगारांना नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा अन्न प्रक्रिया उद्योग सुरू करण्याची ही सुवर्णसंधी लाभली आहे. या योजनेचा लाभ घेऊन आर्थिक संपन्नतेच्या दिशेने वाटचाल करता येऊ शकते.



शेतकरी कष्टाने पिकवलेला माल विशेषतः नाशवंत शेतमाल बाजारात आल्यावर त्याला योग्य ते मूल्य मिळेलच असे नाही. त्यामुळे त्याच्या कष्टाचे चिज होत नाही. त्यामुळे अशा नाशवंत शेतमालावर प्रक्रिया करून त्यातून त्या शेतकऱ्याला उत्पन्नाचे साधन मिळावे, यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण, शेतकऱ्यांनी घ्यावा, यासाठी जिल्हा कृषी विभाग प्रयत्नशील आहे.


अन्नप्रक्रिया (Food Processing) उद्योगातील असंघटीत क्षेत्रात 25 लाख विभाग असून, त्यातून या क्षेत्रातील 74 टक्के रोजगार निर्मिती होते. या क्षेत्रातील 66% उद्योग ग्रामीण भागात असून त्यापैकी 80 टक्के कुटुंब- आधारित उद्योग आहेत. या घरगुती उद्योगांमुळे ग्रामीण भागातील लोकांच्या संसाराला आर्थिक हातभार लागतो आणि त्यांचे शहराकडे होणारे स्थालांतर टाळले जाते. हे सर्व उद्योग साधारणपणे सूक्ष्म उद्योग क्षेत्रात येतात. त्यामुळे शासनाने सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचे धोरण आखले आहे. त्यातून ही योजना लाभदायी ठरणार आहे. या योजनेसाठी लागणारा खर्च केंद्र आणि राज्य सरकार अनुक्रमे 60:40 अशा प्रमाणात करणार आहे.

केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षात एक जिल्हा एक उत्पादन (ONE DISTRICT ONE PRODUCT) या धर्तीवर राबविली जाणार आहे. या योजने अंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याअंतर्गत, कच्च्या मालाची खरेदी, सामायिक सेवा आणि उत्पादनांचे विपणन करण्यात मदत होऊ शकेल.

योजनेचा उद्देश : Food Processing

सध्या कार्यरत असलेले व नविन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट /संस्था/कंपनी, स्वयंसहाय्यता गट व सहकारी उत्पादक गट यांची पतमर्यादा वाढविणे. उत्पादनांचे ब्रँडींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे. सामाईक सेवा जसे साठवणूक, प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.




रविवारी लिंगायत समाजाचा उदगीर येथे वधूवर मेळावाजीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण

 


रविवारी लिंगायत समाजाचा उदगीर येथे वधूवर मेळावाजीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचेही वितरण

लातूर दि २३  . प्रतिनिधी 

 लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्यावतीने रविवार दि.25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता रघूकुल मंगल कार्यालय, उदगीर येथे वीरशैव लिंगायत समाजाचा भव्य वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमात लातूर येथील बसव महामेळाव्यात लिंगायत समाजातील गुणवंतांना देण्यात येणारे जीवनगौरव, समाजभुषण व अक्कामहादेवी पुरस्काराचे वितरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांतजी खैरे यांच्या हस्ते होणार असून याप्रसंगी श्री शंभुलिंग शिवाचार्य महाराज हावगीस्वामी मठसंस्थान उदगीर, खा.सुधाकर श्रृंगारे, माजी मंत्री संजय बनसोडे, आ.बाबासाहेब पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख शिवाजीराव माने, शिवसेना जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, माजी आ.गोविंद केंद्रे, माजी आ.सुधाकर भालेराव, माजी आ.मनोहर पटवारी, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख चंद्रकांत टेंगटोल, लिंगायत महासंघाचे प्रदेशउपाध्यक्ष बसवराज करीअप्पा, लिंगायत महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष अनिल शेटकार, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष शंकरराव पाटील, लिंगायत महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुरेश वाले, लिंगायत संघर्ष समितीचे प्रदिप वाले(सांगली), लिंगायत महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष कमलाकर डोके, लिंगायत महासंघाचे जिल्हा संघटक काशीनाथ मोरखंडे यांच्यासह लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका व शहराध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार हे राहणार आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असुन हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत शिरसे, शहराध्यक्ष सुभाष शेरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.तानाजी सोनटक्के, बापूराव शेटकार, संगशेट्टी बिरादार, भिमाशंकर शेळके, अशोक तोंडारे, राजकुमार वडले, प्रा.पंडीत देवशेट्टे, शिवशेट्टे सर, प्रा.वीरभद्र घाळे, परमेश्‍वर पटवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

या मेळाव्यात प्रा.प्रभाकर उदगीरे, रामेश्‍वरअप्पा कानडे यांना जीवन गौरव तर अनेकांना समाजभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे लातूर शहर सरचिटणीस लिंगेश्‍वर बिरादार यांनी सांगितले.





कर्तुत्व व दात्रुत्वाचा अनोखा संगम..प्रचंड ऊर्जेचा खळाळणारा झरा.लिंगायत समाजाचे खंबीर लोकनेते मा. ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे.

 

कर्तुत्व व दात्रुत्वाचा अनोखा संगम..प्रचंड ऊर्जेचा खळाळणारा झरा.लिंगायत समाजाचे लोकनेते मा. ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे.



कर्तुत्व व दात्रुत्वाचा अनोखा संगम..प्रचंड ऊर्जेचा खळाळणारा झरा.लिंगायत समाजाचे लोकनेते मा. ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे.

सातारा दि २२ :- प्रा अजय शेटे प्रतिनिधी 

 महात्मा बसवेश्वरांचा मूलमंत्र "काय कवे कैलास" हाच आपला जिवनमंत्र समजून अपार कष्टाने अक्षरशः फटाके विकणे,लाँटरीची तिकिटे विकणे , किराणा व्यवसाय ते बांधकाम व्यावसायिक ते सहकार, ब्ंँकिंग ,शैक्षणिक ,सामाजिकअशा सर्वच क्षेत्रात नावलौकिक मिळविणारे एकमेव लिंगायत लोकनेते काकासाहेब..सण 1980 च्या दशकात काका युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यावेळचे देशातील युवा नेते संजय गांधी काकासाहेबांच्या पक्षातील कामाने प्रभावित होऊन खास काकासाहेबांना दिल्ली हून भेटावयास आले 



 विधानसभेची उमेदवारी देऊ केली होती परंतु अतिशय उदार मनाने आलेली आमदारकी परत करणारे काकासाहेब...महाराष्ट्र वीरशैव सभेचे अध्यक्ष झाल्यावर काकांनी सुमारे 1.5 लाख किलोमीटरचा प्रवास करून  खिचपत व दुर्लक्षित झालेल्या लिंगायत समाजाचे 2000साली नांदेड येथे सुमारे २ लाख समाज बांधवांचे महाअधिवेशन घेऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांना  समाजाच्या अनेक मागण्या अधिवेशन स्थळिच मान्य करावयास लाऊन समाजाची ताकद सर्व प्रथम दाखवून लिंगायत समाजात नवचैत्यन्य निर्माण करणारे खरे लिंगायत लोकनेते काकासाहेब कोयटे...व्यावसायिक समाज असणार्या आपल्या समाजात महाराष्ट्रातील ,देशातील नव्हे तर सबंध जगातील उद्योगपति,व्यावसायिक,यांना एकत्र करून लिंगायत भुषण बाबासाहेब कल्याणींच्या मार्गदर्शनाने वीरशैव लिंगायतांची एकमेव "वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन" स्थापन करून एक्स्पो, प्रदर्शन,उद्योग मेळावे, नोकरी महोत्सव या माध्यमातून हजारो लिंगायत तरुण तरुणींना व्यवसाय व नोकरी ला लाऊन खरया अर्थाने महात्मा बसवेश्वरांचा मूलमंत्र सत्यात उतरवीणारे वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब कोयटे...महाराष्ट्रातील सुमारे 25000 पतसंस्थाची शिखर संस्था असणार्या महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे ऐकमेव लिंगायत अध्यक्ष काकासाहेब...जागतिक सहकारी परीषदेचे भारताचे प्रतिनिधित्व व खजिनदार पद भुषविणारे एकमेव नेते तेही लिंगायत अर्थातच काकासाहेब कोयटे...लिंगायत समाजाला OBC चा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातील सर्व लिंगायत संघटनांना एकत्र करून राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपुरकर यांच्या मार्गदर्शनाने "लिंगायत संघर्ष समिती" स्थापन करून लिंगायतांचा मुंबई येथे आझाद मैदान येथे मोर्चा 


, सबंध महाराष्ट्र भर मोर्चे, व सर्वात शेवटी कराड येथे मुख्यमंत्र्याच्या शहरात जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक मुर्गाप्पा खुमसे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन करून सरकार ला लिंगायतांच्या 16  पोट जातिंना OBC चा दर्जा मिळवून देणारे लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक व या ऐतिहासिक लिंगायत आरक्षण आंदोलनाचे खरेखुरे प्रणेते काकासाहेब कोयटे...महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारक समिती ,


मंगळवेढा चे सन्मानीय सदस्य मा काकासाहेब...जगप्रसिद्ध अशा फोर्ब्स मासिकाने दखल घेऊन फ्रंट पेजवर काकासाहेबांची मुलाखत झापलेले एकमेव लिंगायत अर्थातच काकासाहेब...कोरोनाच्या या संकटसमयी लाँकडाऊन मध्ये गोरगरीब,निराधर,लोकांना 2 वेळचे जेवण सलग 2 महिने घरपोहच देणारे, महात्मा बसवेश्वर जयंती ला लाँकडाऊन मध्ये निराधार 1000 कुटुंबांना पुरणपोळीचे जेवण देऊन निराधार कुटुंबात साक्षात परमेश्वर बघणारे मा काकासाहेब...आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेने मा काकासाहेबांच्या कार्याची दखल घेऊन अवकाशात एका ताऱ्यास "ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे" असे नाव दिले आहेअशा काकासाहेबां बद्दल सांगावयास शब्द ही कमी पडतील,



असे लिंगायत सामाजातिल हजारो तरुणांचे प्रेरणास्थाण, " लिंगायत लोकनेते काकासाहेब कोयटे "आपणास वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा..वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन लिंगायत संघर्ष समिती, लिंगायत TV Live .



लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...