Monday, March 27, 2023

प्रा.अजय शेटे यांना केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्रदान .

 प्रा.अजय शेटे यांना  केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्रदान .




 प्रा.अजय शेटे यांना  केंद्र शासनाचा महाराष्ट्र समाज भूषण पुरस्कार प्रदान .


                                                         


सातारा, दि.27 - रविंद्र वाकडे  

 केंद्र शासनाची शाखा असलेल्या ,भारतीय मजदूर कल्याण सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा सन 2023 सालाचा उल्लेखनीय सामाजिक कार्य पुरस्कार वडूज , ता.खटाव, जि.सातारा येथील रहिवासी प्रा.अजय शेटे यांना नुकताच प्रदान करण्यात आला . शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ,मानाचा फेटा,सन्मान चिन्ह, पदक ,प्रशस्तीपत्र व रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.




रविवार दि.26 रोजी , सौभाग्य मंगल कार्यालय, पाटण रोड,उंब्रज येथे दुपारी 11 ते 3 या वेळेत झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार त्यांना भारतीय मजदूर सेवा संघाच्या पुणे मंडलच्या अध्यक्षा श्रीमती मिनाक्षीताई पोळ,संघाचे राष्ट्रीय ऑर्गनायझिंग सेक्रेटरी मा. शैलेश कुमार गौतम , गव्हर्निंग बॉडी महाराष्ट्र अध्यक्ष शांती कुमार बोडके,प्रदेशाध्यक्ष बनसोडे सर्,सातारा जिल्हा महासचिव गोरख खाडे,जिल्हा अँक्शन कमिटी अध्यक्ष योगेश पोळ,दिशा केंद्रीय समिती सदस्या संगीता साळुंके,, छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षा सुनंदा देसाई या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

भारतीय मजदूर संघाच्या वतीने संपूर्ण देशात विविध उपक्रम राबविले जातात. मजदूर लोकांसाठी सामाजिक,आर्थिक व कौटुंबिक विकासाचे अनेक उपक्रम राबवले जातात.त्यासाठी समाजातील तडफदार  व उल्लेखनीय काम करणाऱ्या नेते व कार्यकर्त्यांच्या कार्याची यथोचित दखल हा संघ घेत असतो.त्यामुळेच अशा व्यक्ती या संघाच्या पुरस्काराच्या मानकरी ठरतात.

या पुरस्काराबद्दल प्रा.अजय शेटे म्हणाले की, मी समाजाच्या निकोप प्रगतीसाठी अनेक प्रकारच्या अत्यावश्यक मागण्या शासन दरबारी करून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केला. समाजात कार्य करताना चांगले काम करत रहायचे व अन लगेच सोयीस्कर रित्या विसरून जायचे,फळाची अपेक्षा ठेवायची नाही.रोज चांगले पेरत रहायचे.किती उगवल याचा विचार करायचा नाही.समक्ष चांगले काम होत असताना सुद्धा लोक त्याकडे डोळेझाक करतात.कौतुकाचे चार शब्द पण बोलत नाहीत.प्रसंगी  स्व -  स्वार्थासाठी अन्याय करण्यास पण मागे पुढे पहात नाहीत. अशी जळकट विचारांची कंजूस माणसे पावलोपावली आढळतात.तसेच समाजात अमाप पैसा असलेली अनेक गरीब दरिद्री माणसे  असतात .पण भारतीय मजदूर संघ  या संघटनेने व त्यांच्या समतुल्य संघटनाच्या  पदाधिकाऱ्यांनी माझ्या सामाजिक कार्याची अप्रत्यक्ष  दखल घेवून माझ्या ध्यानीमनी नसताना सुद्धा माझी या मानाच्या पुरस्कारासाठी निवड करून मला खरोखर आश्चर्याचा धक्का दिला आहे. तसेच माझे कौतुक करून  मला खरोखर आणखी चांगल्या कार्यासाठी प्रेरणा दिली आहे.ती कायम स्मरणात राहील. या संघटनेत खऱ्या अर्थाने विचारांची श्रीमंती आढळली आहे.त्याबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.या पुरस्कार प्राप्ती बद्दल श्री.युवराज काटकर,सौ.काटकर मॅडम,श्रीमती पद्मिनी कळसकर, सौ.शारदा भस्मे,श्री.शिंदे ,सौ.शिंदे मॅडम यांनी खास अभिनंदन केले आहे.

कार्यक्रमाला संघटनेचे संपूर्ण भारत व महाराष्ट्र राज्यातील अनेक पदाधिकारी स्त्री - पुरुष उपस्थित होते.या कार्यक्रमात भारत देशप्रेम ,शिवगर्जना ,प्रतिज्ञा,राष्ट्रगीत असे अनेक उपक्रम सादर करण्यात आले.

सर्वांना चहा,पाणी,नाष्टा,जेवण,थंड पेये ,यांची सोय संघटने तर्फे उत्तम प्रतीने केली गेली होती.



Thursday, March 16, 2023

म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लिंगायत समाजाच्या वतीने विशेष सत्कार.

म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लिंगायत समाजाच्या  वतीने विशेष सत्कार.





म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लिंगायत समाजाच्या  वतीने विशेष सत्कार.



सातारा, दि.16 - रविंद्र वाकडे 
लिंगायत समाजातील तरुणांना रोजगार व स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी बरीच वर्षे  मागणी असलेले म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ,राज्याच्या 2023.24 मधील अर्थसंकल्पात भरीव अशा 50 कोटी रुपये निधीची तरतूद केल्याबद्दल  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे  उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा लिंगायत समाजातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.


यामध्ये  श्री ष ब्र 108 शांतवीर शिवाचार्य महाराज,औसा.श्री ष ब्र 108 महादेव शिवाचार्य महाराज, वाई. श्री ष ब्र 108 श्रीकांत शिवाचार्य महाराज, नागणसूर.श्री ष ब्र 108 निळकंठ शिवाचार्य महाराज,मैदर्गी. श्री ष ब्र 108 सुगरेश्वर शिवाचार्य स्वामीजी ,कर्नाटक.या वंदनीय गुरुजनांनी मा.अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष सत्कार करून,आशीर्वाद दिले.




यावेळी माजी मंत्री व आ.सुभाष देशमुख, आ.ज्ञानराज चौगुले, आ.सचिन कल्याणशेट्टी, भाजप प्रवक्ते शिवानंद हैबतपुरे अभिमन्यू पवार उपस्थित होते.

Thursday, March 9, 2023

लिंगायत, गुरव, रामोशी, वडार समाजासाठी नवीन महामंडळाची स्थापना, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस .




लिंगायत, गुरव, रामोशी, वडार समाजासाठी नवीन महामंडळाची स्थापना, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा.




लिंगायत, गुरव, रामोशी, वडार समाजासाठी नवीन महामंडळाची स्थापना, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
सातारा दि 9 :- रविंद्र वाकडे 
Maharashtra Budget 2023 |  शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) आज सादर केला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Finance Minister Devendra Fadnavis) यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मोठी घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पामध्ये नवीन महामंडळांची स्थापना करण्याची आणि भरीव निधी देण्याची घोषणा केली आहे.
 
 
 देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणा (Maharashtra Budget 2023)

- असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
- लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (Jagatjyoti Mahatma Basaveshwar Economic Development Corporation)
- गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ (Sant Kashiba Gurav Youth Economic Development Corporation)
- रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (Raje Umaji Naik Economic Development Corporation)
- वडार समाज : पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ (Pailwan  Maruti Chavan-Vadar Economic Development Corporation)- ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
- प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार

Thursday, March 2, 2023

घर बंदूक बिरयानी'चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न.‘आहा हेरो’ गाणे प्रदर्शित.

 

घर बंदूक बिरयानी'चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न.‘आहा हेरो’ गाणे प्रदर्शित.




घर बंदूक बिरयानी'चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न.‘आहा हेरो’ गाणे प्रदर्शित.


                                            


पुणे दि २८ :- रविंद्र वाकडे  प्रतिनिधी 

 प्रदर्शना अगोदर सोशल मिडिया वर  धुमाकूळ घालणारा  घर बंदूक बिरयानी'चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न.‘आहा हेरो’ गाणे प्रदर्शित.  बहुप्रतीक्षित 'घर बंदूक बिरयानी'  या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. 


काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील 'गुन गुन' हे प्रेमभावना व्यक्त करणारे गीत प्रदर्शित झाले. या गाण्याला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. ‘गुन गुन’ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता 'घर बंदूक बिरयानी'तील आणखी एक गाणं झळकले आहे. नुकताच  'घर बंदूक बिरयानी'चा भव्य म्युझिक लाँच दिमाखदार सोहळा पार पडला. यावेळी दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे, नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे आकाश ठोसर, सायली पाटील, श्वेताबंरी घुटे,संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, गीतकार वैभव देशमुख, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘आहा हेरो’ या गाण्याच्या प्रदर्शनासोबतच ‘घर बंदूक बिरयानी’चे मेकिंगही या वेळी दाखवण्यात आले. या म्युझिक लाँच सोहळ्यात ‘आहा हेरो’ या गाण्यावर गाण्यातील कलाकार, ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी ठेका धरला. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 




   या चित्रपटातील प्रत्येक गाणे श्रवणीय आणि सुंदररित्या चित्रित करण्यात आले आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने 'गुन गुन' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांचा सुमधुर आवाज लाभलेले गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळणारे आहे. 'आहा हेरो' या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून 'घर बंदूक बिरयानी' हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे. गणेश आचार्य यांचे नृत्य दिग्दर्शन लाभलेले हे जबरदस्त गाणे सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.

गाण्यांबद्दल संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र म्हणतात, '' चित्रपटातील गाणं हे केवळ गाणं नसून तो कोणाच्या आयुष्याचा प्रवास असतो, भावना असतात. त्यामुळे त्याला संगीतही त्याच धाटणीचे हवे. नागराज सरांसोबत मी याआधीही काम केलं आहे. चित्रपटाच्या छोट्याछोट्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष असते. संगीतामध्येही त्यांचा तितकाच सहभाग असतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपसुकच जुळून येतात.’’ 




निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, ''आहा हेरो हे गाणं माझ्यासाठी खूप खास आहे. ए. व्ही. प्रफुल्लचंद्रचे या चित्रपटाला संगीत लाभले आहे. त्यामुळे ही गाणी संगीतप्रेमींना नक्कीच आवडणार, हा विश्वास मला पहिल्या दिवसापासून आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये ए. व्ही प्रफुल्लचंद्र म्युझिकल, असे का लिहिले आहे, हे प्रेक्षकांना ७ एप्रिलनंतर कळणार आहे.’’ 

झी स्टुडिओजचे व्यवसाय प्रमुख मंगेश कुलकर्णी म्हणतात, ‘’ बिर्याणीमध्ये सगळे जिन्नस असतात आणि त्याची प्रत्येकाची एक खासियत असते, जी बिर्याणीला अधिक चविष्ट बनवतात. तशीच या चित्रपटात विविध प्रकारची गाणी आहेत, जी संगीतप्रेनींना नक्कीच आवडतील आणि मुळात नागराज मंजुळे यांच्या प्रत्येक चित्रपटातील गाणी ही खासच असतात. तशीच ‘घर बंदूक बिरयानी’तीलही आहेत.’’



लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...