Wednesday, July 20, 2022

गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा-- सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांची मागणी



      गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा--

      सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांची मागणी 





 


गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा--

सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांची मागणी




सिन्नर { नाशिक ] दि.१८: श्यामसुंदर झळके लिंगायत TV Live प्रतिनिधी 

 सिन्नर हे नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ असून येथे श्री गोंदेश्वराचे प्रसिद्ध मंदिर आहे.बाराव्या शतकातील प्रारंभास साधारण ११६० च्या सुमारास हे मंदिर बांधल्याची इतिहासात नोंद आहे.भारत सरकारने या मंदिराला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून ४ मार्च १९०९ मध्ये घोषित केले आहे.हे मंदिर हेमाडपंथी दक्षिण स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. गोंदेश्वर मंदिरामुळे सिन्नरच्या सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक वैभवात मोलाची भर पडली आहे.हे मंदिर पाहण्यासाठी भारतभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात.सिन्नर बारागाव पिंप्री रस्त्यावर सिन्नर न्यायालयाच्या मागे हे पुरातन मंदिर आहे.विशेष म्हणजे गोंदेश्वर मंदिराच्या पर्यटन विकासासाठी  तसेच सुशोभीकरणासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्यातून विविध अनेक कामे मार्गी लागतील.परंतु  आश्चर्याची व खेदाची बाब म्हणजे या मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक नसल्यामुळे बाहेरून येणाऱ्या पर्यटकांची फजिती होते.बसस्थानका पासून  ते विचारपूस करता करता वावीवेस पर्यंत येऊन सरळ बारागावपिंप्री रस्त्याने खरजे मळ्यात गोंदेश्वर मंदिराच्या मागील भागात पोहचतात तर काही सरळ कानडी मळ्यात पेट्रोलपंपापर्यंत जाऊन माघारी येतात.यामुळे पर्यटकांची तारांबळ उडते तसेच त्यांचा वेळ वाया जातो व शेवटी साधा बोर्ड नगरपालिकेला लावता येत नाही का अशी प्रतिक्रिया कानावर पडते. विशेष म्हणजे या परिसरात न्यायालय,तहसीलदार, पोलीस ठाणे व अनेक प्रशासकीय कार्यालये आहेत.परंतु गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा फलक नाही याचा खेद वाटतो.याकडे पुरातत्व विभागाचे लक्ष नाही. तसेच लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम खाते दुर्लक्ष करते. नेमके हे काम कोणाच्या अधिकारात येते हा प्रश्न सिन्नरकरांच्या मनात कायम आहे. 


   

श्री. गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा या आशयाचे निवेदन नायब तहसीलदार सागर मुंदडा याच्याकडे देताना सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके


सिन्नर येथील
 सामाजिक कार्यकर्ते श्यामसुंदर झळके यांनी या बाबत नुकतेच नायब तहसीलदार सागर मुंदडा यांना निवेदन दिले असून त्यात लवकरात लवकर गोंदेश्वर मंदिराकडे जाणारा दिशादर्शक फलक लावावा अशी  मागणी केली आहे.श्रावण महिना तसेच महाशिवरात्री ला भाविकांची गर्दी होत असते, थोड्याच दिवसात श्रावण महिन्याचे आगमन होत आहे.या पार्श्वभूमीवर हा फलक लावावा अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.





No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...