Wednesday, September 29, 2021

माहेरची आणि सासरची नाळ जोडायला येतीये कुसुम फक्त सोनी मराठीवर


माहेरची आणि सासरची नाळ जोडायला येतीये कुसुम फक्त सोनी मराठीवर 
 
मुंबई  २९ सप्टेंबर २०२१ : सोनी मराठी वाहिनीवर  कुसुम  ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. 
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या  शीतली  या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. बालाजी टेलिफिल्म्स आणि सोनी मराठी वाहिनी घेऊन येत आहे नवीन मराठी मालिका, कुसुम. कुसुम  ही मालिका ४ ऑक्टोबरपासून, संध्या. ८:३० वा. 
सोनी मराठी वाहिनीवरून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 
आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासार आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात येणार आहे. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी कुसुम या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली. दुनियेसाठी खपायचं आणि आईबापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जबाबदाऱ्या  उत्तम पार पाडते.
 
२००१ साली हिंदीमध्ये  कुसुम नावाची मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेचा हा मराठी अवतारआहे. तेव्हाही  ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती आणि रेकॉर्ड ब्रेकर ठरली होती. कुसुम  दोन दशकाच्या आधी जेव्हा आली होती तेव्हा तिने त्या काळच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता जेव्हा कुसुम येतेय तेव्हा ती आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करते. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल. सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्याली एक वाटते.   
 
 या मालिकेबद्दल एकता कपूर म्हणाली की २१ वर्षानंतर  कुसुम  प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येते आहे. मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर  कुसुम  आणण्याची संधी मला मिळाली.  कुसुम  ही  मालिका मजा खूप जवळची आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा येते आहे. प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे. आणि मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली. पाहायला विसरू नका  कुसुम , ४ ऑक्टोबर पासून, संध्या. ८:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर

आरोही हेल्थ केअर सेंटर चे उद्घाटन

 आरोही हेल्थ केअर सेंटर चे उद्घाटन
 वडूज दि.19 प्रतिनिधी .. वडूज येथे बाजार चौक..धान्य बाजार मधील श्री गजानन हाइट्स या व्यापारी संकुलात हे आरोग्य केंद्र  सुरू करण्यात आले आहे.
या शॉपीचे उद्घाटन नगर पंचायतीच्या उप नगराध्यक्षा सौ.किशोरी पाटील मॅडम यांच्या हस्ते पूजन करून  करण्यात आले.
..यावेळी मा. पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.अजय शेटे हे उपस्थित होते..हे केंद्र व डू ज व पंचक्रोशी यांच्या सेवेला पात्र ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
..या केंद्राला नगरसेवक अनिल माळी..महेश गुरव ..शहाजी गोडसे.. दिपक बोडरे.. दिपक गोडसे .. संतोष पाटील यांनी भेट देवून शुभ चिंतन व्यक्त केले..
..या केंद्राच्या माध्यमातून सर्व वयाच्या स्त्री..पुरुष रुग्णांवर सांधेदुखी.. व मणक्याचे विकार यावर अतिशय कमी सेवा शुल्क घेवून मोफत उपचार केले जाणार आहेत असे या केंद्राचे संचालक अविनाश सरवदे व अश्विन म्हामने यांनी सांगितले..

Tuesday, September 28, 2021

संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात संपन्न



संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात  संपन्न
संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात  संपन्न
औरंगाबाद दि 28:-  प्रतिनिधी
संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात व सर्व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.या वेळी श्री मन्मथस्वामी व क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते मा.खा.चंद्रकांत खैरे साहेब,   उदघाटक डॉ शिवकुमार संतपुरे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, 
माजी नगरसेवक विरभद्र गादगे, मा.सौ.कविता नावंदे(जिल्हा क्रीडधिकारी), मा.सौ.अंजली मिटकर-हुरणे(औषधी निरीक्षक), मा.सौ. भारती सोसे(क.प्रकल्प अधिकारी मा.उ. वि. के.), मा.श्री. सागर अप्पा वाडकर, यांची उपस्थिती होती. 
अहवाल वाचन प्रा.नंदकिशोर गवंडर यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री शिवा अप्पा खांडखुळे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जयश्री लद्दे यांनी केले.सचिव कैलासअप्पा झारेकर यांनी आभार प्रदर्शन केले.या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व संचालक व कर्मचारी वृंद,सभासद यांची उपस्थिती होती.

आर..फिट न्यूट्रीशन शॉपी चे उद्घाटन

 आर..फिट न्यूट्रीशन शॉपी चे उद्घाटन 
वडूज... दि.19 प्रतिनिधी .श्री अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर येथील कर्मवीर नगर मध्ये आर..फिट न्यू ट्री श न शॉपी चे उद्घाटन प्रसिद्ध वाहन व्यावसायिक श्री.वसंत राव माळी बापू व  मा.पंतप्रधान आत्मनिर्भर योजनेचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.अजय शेटे यांच्या हस्ते मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत केले गेले..तरुण स्त्री..पुरुष खेळाडू व युवावर्ग यांचे आरोग्य या शॉपी च्या माध्यमातून जपले जाईल .असे या वेळी प्रा.अजय शेटे यांनी सांगितले..
..तरुण वर्गातील जिम चे आकर्षण व बलसंवर्धना साठी या शाखेच्या माध्यमातून तरुण मुले..मुली तसेच गृहस्थ जीवन जगणारे स्त्री ..पुरुष यांचे साठी जिम व्यायाम प्रशिक्षण व त्यास आवश्यक असणारा पूरक आहार यांची माहिती व पुरवठा करण्यात येणार आहे.असे या शॉपीचे संचालक व सर्टि फांईड ट्रेनर  ऋतुराज राजेश माळी यानी सांगितले..
..कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर या शाखेच्या माध्यमातून आरोग्य जागृती व  देशी..विदेशी पोषक व शक्तिशाली  अन्न व पेये  यांचे बाबतीत नक्कीच जागृती होईल असे सहाय्यक संचालक श्री .राजेश माळी यांनी सांगितले 

Saturday, September 25, 2021

निस्वार्थी समाज कार्याचा पुन्हा सन्मानसा.पोलीस तपास पुन्हा गौरवमातुछाया ट्रस्ट तर्फे मुंबई सत्कार


निस्वार्थी समाज कार्याचा पुन्हा सन्मान
सा.पोलीस तपास पुन्हा गौरव
मातुछाया ट्रस्ट तर्फे मुंबई सत्कार
मनमाड दि प्रतिनिधी 
देशातील कोरोना कार्यकाळात संबंध नाशिक सह जवळील जिल्हातील पोलीस अधिकारी,शासकीय अधिकारी,समाजासाठी चांगली सेवा बजावणारा अधिकारांचा समाज सेवकांचा जिल्हासह,अनेक शेजारील जिल्हाल्यात स्व:ताचा खर्चाने फिरुन,निस्वार्थ पणे सेवा भावी वुर्ती ठेवुन,सामाजीक कार्याला वाहुन घेत,स्व:ताचा जिवाची कुठली ही पर्वा न करता,पोलीस दलाचा अधिकारी,पोलीस कर्मचारी,डाँक्टर नर्स ,खर्रा अर्धाने समाजाची सेवा करणारे समाज सेवकांचा साप्ताहिक पोलीस तपास तर्फे मनोधैर्य बहुमान वाढविणारे,लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते व शिव व्यापारी सेनेचे जिल्हा अध्यक्ष,व राज्य संघटक, कट्टर ऐक निष्ठ स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक,व साप्ताहिक पोलीस तपासचे महाराष्ट्र चिफ श्री.गणेश शांतीलाल देशमुख यांचा सामाजीक कार्याची,सेवाभावी वुर्त्तीची,समाजा प्रति असलेल्या तळमळीची,ज्या ही कार्यात हात घालेल त्या कार्याला त्या कामाला ऐकनिष्ठेने पुर्ण करुनच सोडणार,मातीचे हि सोनेच करणारा,तुटेगे लेकीन झुकेगे नही असा अहवलियाचा कार्याची दखल घेत, कल्याण ( मुंबई ) येथील तळागाळातील गोर गरीबाना मदत करणारी समाजासाठी कार्य करणारी संस्था "मातुछाया ट्रस्टने" कोरोना योध्दाचा सन्मान देत त्यांचा कार्याचा बहुमान गौरव केला आहे,लवकरच मुंबई येथे सत्कार करुन श्री गणेश देशमुखाना हे कोरोना योध्दा सन्मान बहाल  केला जाणार आहे,नाशिक जिल्हातील ऐका छोटयाशा मनमाड सारख्या शहरातुन कुठलीही राजकीय पार्श्वभुमी नाही,कुठलेही राजकीय पाठबळ किंवा पाठींबा नसतांना,स्व:ताचा कुर्तुत्वाने मनमाड सह नाशिक जिल्हाची संपुर्ण महाराष्ट्रात आपल्या धडाकेबाज कार्याने ओळख निर्माण करुन,वेगळा ठसा उमटवणारे श्री.गणेश देशमुखांचा बहुमान हा नाशिक जिल्हा,मनमाड शहरांचा,तसेच सर्व लिंगायत समाज बांधवांचा सत्कार आहे.शाब्बास.... गणेशआप्पा*
🔸 *लिंगायत संघर्ष समिती नासिक* *जिल्हा समिती व उत्तर* *महाराष्ट्र* 🔸

Friday, September 24, 2021

लिंगायत समाजातील सर्वानी एकत्रआले पाहिजे या साठी समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे राजुशेठ घुटे

 समाजातील सर्वानी एकत्र
आले पाहिजे या साठी समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे  राजुशेठ घुटे 
उंब्रज दि :-  प्रतिनिधी
लिंगायत समाजातील सर्वानी एकत्र
आले पाहिजे या साठी समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे  राजुशेठ घुटे 
राजूशेठ घुटे यांनी उदयोग क्षेत्रामध्ये लिंगायत समाजाचे नाव उज्वल केले . उंब्रज तालूका कराड येथील लिंगायत समाजातील उदयोजक् राजूशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला पुरस्कार आणी उदयोग ग्रामीण भागात   चांगले काम केल्या बद्दल् अमेरिकेन युनिव्हर्ससिटी ची डॉक्टरेट ही पदवी मिळाल्या बद्दल उंब्रज मधील समस्त लिंगायत समाज यांचे वतीने  राजूशेट  घुटे  यांचा सत्कार करणेत आला  यावेळी बोलताना राजूशेठ बोलले की लिंगायत समाजासाठी सर्व सहकार्य करणार आहे  सर्व समाजांनी एकत्र आले पाहिजे  असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले ,
यावेळी उंब्रज मधील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनी हजर  होते

Thursday, September 23, 2021

खानापुरात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा.


खानापुरात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा..
 खानापूर: दि 23 प्रतिनिधी लिंगायत TV live  ( शिवकुमार कल्याणी )
राष्ट्रसंत,लिंगैक्य, डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे प्रथम स्मृतिदिन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला,गुरूवर्यांनी राष्ट्रप्रेम, पर्यावरण संरक्षण,व किर्तन, सत्संग व भजनातुन समाजप्रबोधनाचे अतुल्य कार्य केले,वयाचे शंभरी पार केल्यानंतर  ते ज्या तडफडीने समाजाला मार्गदर्शन करीत होते ती त्यांच्यातली ऊर्जा आश्चर्यकारकच  होती, अध्यात्मिक क्षेत्रातील एक विज्ञाननिष्ठ कर्मयोगी अशी गुरूमाऊली राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची ओळख होती,अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्याप्रति शब्दसुमनांजली अर्पण केली, खानापूर येथील विरभद्र स्वामी मठात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन  माजी उपसरपंच अनंत पाटील खानापूर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी राष्ट्रसंताच्या स्मृतींची पुष्पपुजा करून अभिवादन करण्यात आले,व तदनंतर भावीक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले, यावेळी , ग्रामपंचायत सदस्य राजेश्वर अटकळे, मारोती परबते,रवी कामशेटे, नांदेड ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार ताडकोले, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पटणे,संजय धनसुरे, बसवेश्वर भजनी मंडळाचे शंकर पटणे , उमाकांत स्वामी व इतर अनेक गावकऱ्यांची उपस्थिती होती..

गावचा कृती आराखडा तयार करणे, विविध विकासकामांचे नियोजन तथा तंटामुक्त समितीची स्थापना यासाठी या महिन्यात ग्रामसभा घेण्याची विरोधी पक्षाची मागणी


गावचा कृती आराखडा तयार करणे, विविध विकासकामांचे नियोजन तथा तंटामुक्त समितीची स्थापना यासाठी या महिन्यात ग्रामसभा घेण्याची विरोधी पक्षाची मागणी ..
 खानापूर:दि 23 प्रतिनिधी:-  ग्रामपंचायतीच्या कारभाराचे वर्ष एप्रिल महिन्यांच्या १ तारखेला सुरु होते आणि ते त्यानंतर येणाऱ्या मार्च महिन्यांच्या ३१ तारखेला संपते. या वर्षाला आर्थिक वर्ष किंवा वित्तीय वर्ष असे म्हणतात. प्रत्येक वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या एकूण सहा सभा घेणे कायद्याने बंधनकारक आहे. गरज पडली तर तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषदेची स्थायी समिती आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले तर असाधारण बैठकही बोलावता येते. ग्रामपंचायतीच्या एकूण सहा ग्रामसभांपैकी चार ग्रामसभा ठराविक महिन्यामध्ये बोलावणे आवश्यक आहे. वित्तीय वर्षातील पहिली ग्रामसभा एप्रिल / मे मध्ये, दुसरी ग्रामसभा १५ ऑगस्ट [स्वातंत्र दिनी], तिसरी ग्रामसभा ऑक्टोबर मध्ये, आणि चौथी ग्रामसभा २६ जानेवारी [प्रजासत्ताक दिन] रोजी घेणे अपेक्षित आहे. तसेच उर्वरित दोन ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या सोयीनुसार घेण्यात याव्यात. दोन ग्रामसभेमध्ये तीन महिन्यापेक्षा जास्त अंतर असू नये असा शासन नियम आहे.त्या अनुषंगाने ,१५ आगस्ट ते ३१ आगस्ट दरम्यान ग्रामसभा घ्यायला हवी होती मात्र ती कोरोना परिस्थिती मुळे झाली नसुन आता गावात मागील सहा महिन्यांपासून एकही कोरोना रूग्ण नाहीत, त्यामुळे ग्रामसभा घेण्यास परिस्थिती अनुकूल आहे,व गावचा कृती आराखडा तयार करणे, विविध विकासकामांचे नियोजन तथा तंटामुक्त समितीची स्थापना यासाठी या महिन्यात ग्रामसभा घेण्यात यावी अशा आशयाचे निवेदन खानापूर चे ग्रामविकास अधिकारी गणेश कोकणे यांना खानापूर ग्रामपंचायत च्या विरोधी पक्षातर्फे देण्यात आले आहे,सदर निवेदनावर,सौअनुसया अनंतराव पाटील, सौ.प्रतिभाताई अटकळे,सौ.अर्चना विश्वनाथ ताडकोले,सौ.शिवनंदा परबते,सौ.राजाबाई यनलवार व श्रीदेवी कामशेटे यांच्या स्वाक्षरी आहेत.

Wednesday, September 22, 2021

* महाराष्ट्र सहकार महर्षी..आणि लिंगायत समाजाचे लोकनेते मा.काकासाहेब कोयटे *

* महाराष्ट्र सहकार महर्षी..आणि लिंगायत समाजाचे लोकनेते  मा.काकासाहेब कोयटे  *



    वडूज.दि लिंगायत TV live विशेष प्रतिनिधी  प्रा.अजय शेटे.. 

.


.वीरशैव लिंगायत  संघर्ष समितीचे समन्वयक मा. ओमप्रका या श उर्फ काकासाहेब कोयटे यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या सदस्य पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे..
..अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील व्यापारी वर्गांने  मिळून 1986 साली समता को. ऑप.क्रेडिट सोसाय टीची स्थापना केली..त्यामध्ये सिंहाचा वाटा हा मा.काकासाहेब कोयटे यांनी उचलून चे अरमन होण्याचा मान पटकावला..
..सन 2020..21 या आर्थिक वर्षात या सोसायटीने 1000 कोटींचा व्यावसायिक उद्दिष्ट टप्पा पार केला.यावरून या संस्थेची प्रगती आपल्या लक्षात येते..याचे सर्व श्रेय मा. ओमप्रकाश कोयटे याना जाते..त्यांच्या या कार्याची दखल घेवून च त्यांची महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्ष पदी त्यांची प्रथम त्यांची निवड झाली..
..समता को. ऑप. सोसायटी च्या  एकूण 13 व्यावसायिक शाखा संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत आहेत व अजून 10 शाखांचा विस्तार लवकरच होणार आहे..
..या सोसायटीने ग्रामीण भागात कार्यक्षेत्र असूनही जवळजवळ 600 कोटींचे डि पाँ झि ट मिळवले असून इतर व्यवसायात 1000 कोटींचे रेकॉर्ड ब्रेक उद्दिष्ट पार केले आहे..
..प्रगत बँकिंग प्रणालीचा वापर करत या संस्थेने अल्पावधीतच हे यश मिळवले आहे. 
RTGS..NEFT..IMPS यासारख्या वेगवान  व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत..मोबाईल बँकिंग..QR कोड.. चॅनेल फायनांसशियल सिस्टीम..याद्वारे ऑनलाईन मेसेज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. व सर्व व्यवहार विंना पावती व विना कागद करण्यात आला आहे.शिवाय ही सुविधा फक्त इतर सोसायटी क्षेत्रापुरती मर्यादित नसून सर्व मोठ्या राष्ट्रीयीकृत बँकांशी जोडली गेली आहे.
..सन 2020..21 या आर्थिक वर्षात सोने तारण व्यवहार हा एक 100 कोटीच्या घरात पोहचला आहे व येत्या पुढील वर्षात तो 200 कोटींच्या घरात पोहच विण्याचा मानस आहे..सोसायटीच्या बाबतीत अधिक माहिती हवी असल्यास www.samatapat.com या वेबसाईटवर संपर्क करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे..
..समता संस्थेच्या या सर्व प्रगतीत मा.लोकनेते काकासाहेब उर्फ ओमप्रकाश कोय टे यांचा सिंहाचा वाटा आहे.त्यांना तंत्र सल्लागार संचालक संदीप कोयटे यांचीही मोलाची साथ मिळाली आहे..
..त्यांच्या या बँकिंग प्रणालीतील उल्लेखनीय कार्याची दखल घेवून
नव्यानेच स्थापन झालेल्या स्वतंत्र  सहकार मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री  मा. अमितजी शहा.. मा.शरदराव जी पवार साहेब यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर सदस्य म्हणून नेमणूक करून त्यांच्या उचित कार्याचा गौरव करून अभिनंदन ही केले आहे.
..महाराष्ट्र राज्य लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव लिंगायत समाज संघटना यांच्या वतीनेही त्याच्या कार्याच्या कौतुकाचा ठराव करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. मा.काकासाहेब उर्फ ओमप्रकाश कोयटे यांची भावी आयुष्यात अशीच प्रगती होत राहो हिच समाज बांधवां तर्फे हार्दिक शुभेच्छा **

Sunday, September 19, 2021



           लिंगायत समाजातील एक आदर्श शिक्षीका सिंधुताई सुकरे





      लिंगायत समाजातील एक आदर्श शिक्षीका सिंधुताई सुकरे

नांदगाव तालुका कराड येथील  दक्षिण मांड व्हॅली  शिक्षण   संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ  तुकाराम सुकरे  गुरुजी  यांच्या पत्नी  आणि पत्रकार प्रमोद सुकरे ,ग्रामपंचायत सदस्य  प्रशांत सुकरे यांच्या मातोश्री स्व. सौ सिंधुताई  सुकरे  यांच्या तृतीय पुण्यसम्रान निमित्त त्यांच्या कार्याचा आढावा,

लिंगायत TV Live  शब्दांकंन दिलीप महाजन



लिंगायत समाजातील एक आदर्श शिक्षीका सिंधुताई सुकरे

नांदगाव तालुका कराड येथील  दक्षिण मांड व्हॅली  शिक्षण   संस्थेचे अध्यक्ष विश्वनाथ  तुकाराम सुकरे  गुरुजी  यांच्या पत्नी  आणि पत्रकार प्रमोद सुकरे ,ग्रामपंचायत सदस्य  प्रशांत सुकरे यांच्या मातोश्री स्व. सौ सिंधुताई  सुकरे  यांच्या तृतीय पुण्यसम्रान निमित्त त्यांच्या कार्याचा आढावा,

 एक आदर्श शिक्षिका , आदर्श गृहीणी  ,आदर्श माता, आदर्श संघटीका ,हौशी ,मनमिळाऊ  आणि अजात शत्रू  अशी स्वतःची एक वेगळी ओळख त्यांनी नांदगाव आणि परिसरात  निर्माण केली होती , त्यांना गावात आणि परिसरात सुकरे बाई  या नावानी सर्वजण ओळखत होते , त्यांचा जन्म   सांगली  जिल्ह्यातील  तडसर या गावी  एका शेतकरी कुटुंबात झाला  ,आई वडील ,आणि चार भाऊ एक बहीण  या कुटुंबातील  त्या सर्वात  मोठ्या  होत्या   प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गावातच झाले  तर d ed  चे शिक्षण  कस्तुरबा अध्यापक  विद्यालय  सांगली  येथे झाले ,शिक्षण पूर्ण होताच  माहुली तालुका  खानापूर  या ठिकाणी   शिक्षिका   या पदी  त्यांची कामाची सुरुवात झाली  नंतर  1972 साली त्यांचा विवाह  नांदगाव तालुका कराड येथील विश्वनाथ   सुकरे गुरुजी  यांचे सोबत झाला  दीर जावा अशा  अशा  मोठ्या कुटुंबात  घर आणि  नोकरी   करत  होत्या  सण 1985 मध्ये  सासूबाई  यांची सावली गेल्यावर  सर्व कुटुंबाची जबाबदारी आणि नोकरी  केली , सुमारे  38 वर्ष शिक्षिका  म्हणून  काम केले  या मध्ये 30 वर्षे   च्या कालावधी मध्ये   अनेक  विद्यार्थी  डॉक्टर , वकीलउद्योजक  इंजिनिअर  तयार झाले , नोकरी कालावधीत  त्यांचा सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रातील  योगदानाबद्दल  आदर्श शिक्षिका चे पुरस्कार त्यांना मिळाले सुकरे  गुरुजी आणि सुकरे परिवाराचा   सामाजिक  शैक्षणिक   राजकीय   क्षेत्रातील  कराड तालुक्यातील नावलौकिकाचे  सर्व श्रेय  हे स्व सौ सिंधुताई सुकरे  यांचे कडे जाते  त्यांचा या कार्यानि लिंगायत समाजाचे नाव  कराड तालुक्यात उज्वल केले आहे त्यांना  अभिवादन




 







 

Friday, September 17, 2021



साताराची सुकन्या जान्हवी हिने केला योगविश्वातला सलग तिसरा विश्वविक्रम , सातारचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर

सातारच्या जान्हवीने योगविश्वातला ८तास १३ मिनिटे २१ सेकंद  स्थिर राहून तिसरा विश्वविक्रम करत रचला इतिहास



सातारा दि ८  प्रणाली  वाकडे  विशेष प्रतिनिधी 

सातारच्या जान्हवी जयप्रकाश इंगळे हिने सुप्त बद्ध कोनासन या आसन मध्ये ८तास १३ मिनिटे २१ सेकंद स्तब्ध,काहीही हालचाल न करता स्थिर राहून तिसरा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे...या विश्वविक्रमाची नोंद योगा बुक आँफ रेकाँर्ड मध्ये झाली असून नुकतेच कुरियर ने गोल्ड मेडल,सर्टीफिकेट,बँच होल्डर,टी-शर्ट आदी प्राप्त झाले..


जान्हवी या सातारा जिल्ह्यामधून योगविश्वात जागतिक विश्वविक्रम करणार्या पहिल्या युवती आहेत.. जान्हवी हिने या आधी सलग ५ तास १ मिनिट १७ सेकंदा स्थिर राहून सिद्धासन आसन मध्ये पहिला विश्वविक्रम केला आहे..तसेच मार्च महिन्या मध्ये महिला दिनाचे औचित्य साधून नऊवारी साडी मध्ये १ तास १९ मिनिटे ३४सेकंदामध्ये दहा हजार वेळा तितली क्रिया करून  दुसरा नवा जागतिक विश्वविक्रम प्रस्थापित करत तो समस्त महिलांना समर्पित केला...नऊवारी साडी मध्ये योगविश्वात विश्वविक्रम करणार्या पहिल्या युवती आहेत... 

जान्हवी या गेली १४वर्षे योगसाधना करत असून त्या आयुष मिनिस्ट्री सर्टिफाईड योगा टिचर आहेत... इंटरनँशनल आणि काँर्पोरेट योगा ट्रेनर आहेत...त्याच बरोबर जान्हवी यांनी देशविदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्राविण्य मिळवले आहे....जान्हवी या मँराथाँन रनर हि आहेत...जान्हवी कि योगशाला याच्या त्या संस्थापक असून  सर्ववयोगटासाठी आँनलाईन पद्धतीने सध्या योगवर्ग घेत आहेत ..जान्हवी कि योगशाले मार्फत एप्रिल२०२० पासून आज पर्यंत कोरोना काळात सर्वांसाठी आणि कोरोना पेशेंट होम क्वाँरनटाईन ,आयसोलेट पेंशेट साठी मोफत योगा सेशन घेत असून याची दखल  लंडन बुक आँफ रेकाँर्डने घेतली असून लंडन बुक आँफ रेकाँर्डने कमिटमेंट सर्टिफिकेट देऊन गौरव केला आहे....

आंतरराष्ट्रीय योग दिवसा निमित्त सामाजिक संस्था,एनजिओ,डाँक्टर,पत्रकार,आरोग्यसेवक,नर्स,पोलिस विद्यार्थी आणि पालक अशा एक हजार लोकांना आँनलाईन मोफत योगा सेशन घेऊन योग दिवस साजरा केला...जान्हवी यांना द ग्लोबल आयकाँन आँफ इंडिया,महाराष्ट्र आदर्श युवती क्रिडा रत्न पुरस्कार,द प्राईड आँफ इंडिया,द बेस्ट योगा गुरु,महाराष्ट्र शिवरत्न पुरस्कार  तामिळनाडू योग असोसेशन तर्फे योगाचारिणी अवाँर्ड,इंटरनँशनल इंस्पिरेशन वुमन अवाँर्ड,निशान ए हिंद इंटरनँशनल अवाँर्ड,क्रिडा पुरस्कार ,कलाम्स स्पार्कलिंग डायमंड अवाँर्ड,आयुष मिनिस्ट्री Ycb  तर्फे प्लाटिनम टिचर अवाँर्ड, वुमन्स पाँवर अँंड वाँईस अवाँर्ड,अमृत संतान इंटरनँशनल अँवार्ड...अशा अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे...अमेरिका,लंडन कँनडा येथील संस्थानी देखील त्यांचा गौरव केला आहे..त्याच बरोबर इतर हि विश्वविक्रमा मध्ये त्यांनी भाग घेतला असून हायरेंज बुक, इंटरनँशनल बुक मध्ये नोंद झाली आहे.....जान्हवी यांचे सर्व स्तरातून कौतक होत असून खा.श्री.छ.उदयनराजे भोसले,राजमाता आईसाहेब कल्पनाराजे भोसले,खा.श्रीनिवास पाटील..मा.नगराध्यक्षा रंजना रावत,नगरसेविका सौ.दिपाली गोडसे,श्री.राजू गोडसे,नगराध्यक्षा सौ.माधवी कदम,सौ.रचनाताई पाटील,सौ.चेतना सिन्हा,कराड नगराध्यक्षा सौ.रोहिणी शिंदे.,कृषी बाजार समितीचे सदस्य श्री राजेंद्र भिलारे, सर सेनापती हंबीरराव मोहिते यांचे वशंज जयाजीराव मोहिते...रविंद्र झुटिंग, श्री.राजेंद्र चोरगे,श्री.वसंतशेठ जोशी,श्री.किशोर शिंदे,श्री.दत्ता बनगर,श्री.सुनिल काटकर,,श्री चंद्रशेखर घोरपडे,योगा बुकचे फाऊंँडर &सिईओ श्री राकेश  भारद्वाज,जिल्हा क्रिडा अधिकारी श्री.युवराज नाईक आणि आपला सातारा न्यूज ,आदी अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या ...

 

Wednesday, September 15, 2021

पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणारडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारीमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही


पैठणच्या संतपीठाचे अभ्यासक्रम सुरु होणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे जबाबदारी
मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर तातडीने कार्यवाही
मुंबई दिनांक १५: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेतला होता तेंव्हा त्यांनी पैठण येथील संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सोपविण्याची सुचना केली होती त्यानुसार  उच्च व तंत्रशिक्षण विभागाने  यासंबंधीचा शासननिर्णय निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे संतपीठाच्या कामाला आता वेग मिळाला आहे.

पैठण येथील संतपीठामध्ये भारतीय परंपरा, संस्कृती, संत संप्रदाय, संत साहित्य, किर्तन, प्रवचन, तत्वज्ञान आदी बाबींशी संबंधित प्रमाणपत्र,पदविका,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवण्यासाठी संतपीठाचे शैक्षणिक व्यवस्थापन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाकडे ५ वर्षांसाठी  किंवा पुढील आदेश होईलपर्यंत जे लवकर होईल त्या काळासाठी सोपवण्याचा निर्णय  काही अटींच्या अधीन राहून घेण्यात आला आहे.

*अभ्यासक्रमाविषयी...*
यानिर्णयानुसार विविध प्रमाणपत्र, पदविका,पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांना आवश्यक त्या प्राधिकरणाची मान्यता घ्यावी लागेल. निरनिराळ्या संप्रदायांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास घटकांची निवड करून अभ्यासक्रमांची निर्मिती करण्यात येईल. संतपीठाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रत्येक संप्रदायाच्या अभ्यासक्रमांना योग्य ते स्थान देण्यात येणार असून तयार करण्यात आलेला अभ्यासक्रम चालवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला आवश्यकतेनुसार तज्ज्ञ व्यक्तींची मानधन किंवा तासिका तत्वावर तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती कंत्राटी स्वरूपात बाह्य स्त्रोतामार्फत करता येऊ शकेल. यासाठीचा खर्च विद्यापीठाला स्व निधीतून करावा लागणार असून  संतपीठाच्या जागेची तसेच इमारतीची मालकी शासनाकडेच राहील. फक्त शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी ही इमारत विद्यापीठाकडे सोपविण्यात आली आहे.

*संतपीठाविषयी...*
मराठवाडा विकासाच्या ४२ कलमी कार्यक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे संतपीठ स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली होती. या संतपीठाची नोंदणी मुंबई सार्वजनिक विश्वस्त कायदा १९५० नुसार करण्यात आली असून यासाठी ज्ञानेश्वर उद्यानानजीकची १७.८ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे.  संतपीठाच्या प्रशासकीय इमारत, वसतीगृह आणि वाचनालय इमारत बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली होती त्यानुसार संतपीठाची प्रशासकीय इमारत,दोन वसतीगृहाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.सुरुवातीला सांस्कृतिक कार्य विभागाकडे असलेला हा विषय नंतर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला होता.
...

Sunday, September 12, 2021

उमदीत ओढा पात्रात बुडून दोघी बहिणींचा मृत्यू लहान भाऊ बचावला


उमदीत ओढा पात्रात बुडून दोघी बहिणींचा मृत्यू लहान भाऊ बचावला
सांगली प्रतिनिधी 
उमेश पाटील 
          उमदी ता.जत येथे ओढा पात्रात पोहायला गेलेल्या दोन्ही सख्ख्या बहिणीचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. कु.रेणुका शिवानंद ऐवळे (वय -७) व  कु.लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय-११) अशी दुर्दैवी बहिणींची नावे आहेत.  तर त्याच्या सोबतच पोहायला गेलेला लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय-६) हा बचावला गेला.

         अधिक माहिती अशी की, ऐवळे कुटुंबिय हे काही दिवसापासून उमदी गावात ओढ्यालगत असणाऱ्या आपल्या घरात रहात होते. तसेच मोलमजुरी करून ऐवळे कुटुंब घर चालवतात.. आज रविवारी सकाळी घरातील सर्व लोक दुसऱ्यांच्या शेतात कामासाठी गेले होते. घरात दोन मुली व एक मुलगा यांना घरात सोडले होते. दुपारी आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहीणी व एक भाऊ असे तिघे मिळुन वडापात्रात आंघोळी करण्यासाठी गेले . परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका शिवानंद ऐवळे (वय-७) व लक्ष्मी शिवानंद ऐवळे (वय-१२) या दोन्ही सख्ख्या बहीणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्याचवेळी त्यांच्या सोबतच गेलेला लहान भाऊ  मायाप्पा शिवानंद ऐवळे (वय-६) याने दोन्ही बहीणीला पाण्यात बुडताना पाहून आरडाओरडा सुरू केला. 

   त्यावेळी ओढ्यालगत जनावरे राखणारा संभाजी माने व प्रकाश वाघमारे यांनी मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारून बाहेर काढले परंतु दुर्दैवाने मुलींचा मृत्यू झाला होता. तर लहान भाऊ मायप्पा यास वाचवण्यात यश आले. या घटनेने  उमदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Saturday, September 11, 2021

लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान करणेत आला


लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना  योद्धा पुरस्काराने  सन्मान करणेत आला
नाशिक दि प्रतिनिधी :- 
लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना  योद्धा पुरस्काराने  सन्मान करणेत आला
सन्मान निस्वार्थी समाजकार्याचा              सन्मान लिंगायत संघर्ष समिती नासिक जिल्ह्याचा  सन्मान साप्ताहिक पोलीस तपासचा
साप्ताहिक पोलीस तपासचे मालक व संपादक मा.श्री.राजु.ग.जाधव ( सर ) मुंबई व लिंगायत संघर्ष समिती नासिक चे नेते तसेच साप्ताहिक पोलीस तपास महाराष्ट्र प्रमुख क्राईम रिपोटर ( चिफ ) श्री.गणेश शांतीलाल देशमुख (मनमाड जि.नाशिक ) यांचा कोरोना काळातील महामारीशी लढत असतांना.अशा कठीण परिस्थीतीत आपण आपल्या जिवाची पर्वा न करता,समाज व समाजातील सामान्य नागरीकांन साठी करत असलेले सेवा कार्य अतुलनिय आहे,आपल्या सेवेने सर्वांसमोर मानवतेचे एक नविन उदाहरण ठेवलेले आहे,कोरोना काळात आपण केलेल्या धैर्याला व उर्मिला आम्ही सलाम करतो,आणि आपले " कोरोना योध्दा सन्मान पञ " देऊन  स्टार वेल्फेअर फाऊडेशन ( डोबिवली पश्चिम जिल्हा ठाणे ) याचा पुरस्काराने सन्मानीत करत आहे, आपल्या हातुन नेहमीच असे समाजकार्य घडत राहो आणि उभा कठीण काळात आपणास व आपल्या परीवारास निरोगी तसेच उदंड आयुष्य लाभो हिच सदिच्छा*     *शुभेच्छुक*  *लिंगायत संघर्ष समिती* *महाराष्ट्र, नासिक जिल्हा* *सर्व सदस्य व पदाधिकारी.*

विरभद्र विरशैव गणेश मंडळाची तिस वर्षांची परंपरा कायम


विरभद्र विरशैव गणेश मंडळाची तिस वर्षांची परंपरा कायम
खानापूर प्रतिनिधी: शिवकुमार कल्याणी लिंगायत TV live
 करोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवावर मर्यादा आल्या असल्या तरी देगलूर तालुक्यातील, विरभद्र विरशैव गणेश सार्वजनिक मंडळांने भक्तीच्या वेगळ्या वाटा चोखाळत मागील तिस वर्षांची उत्सवाची परंपरा आणि मांगल्य कायम ठेवण्याच्या प्रयत्न केला आहे. सरकारी नियमांप्रमाणे लहान मूर्ती ठेवण्यात आली असून, देखावे, चलचित्र आदींना फाटा देण्यात आला आहे. मुखदर्शन तथा आरती प्रसाद साठी गर्दी होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाते आहे, येत्या सोमवारी गणेश मंडळातर्फे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन गावातील तथा खानापूर परिसरातील अधिकाधिक जनतेने या उपक्रमात सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे, अवांतर सजावट व इतर खर्च टाळून समाजपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक व आयोजक निळकंठ पटणे, विनोद रायकोडे  यांनी सांगितलं आहे यामुळे खानापुरात यंदा गणेशोत्सवातून आरोग्य आणि समाजसेवेच्या माध्यमातून गणरायाच्या भक्तीचे सूर आळवले जाणार आहेत. या मंडळाची स्थापना ई.स १९९१ साली येथील मठाचे मठपती कै.बाबुअप्पा स्वामी व मंडळाचे प्रथम अध्यक्ष उमाकांत अटकळे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली  होती व आज तिस वर्षापासुन ते अखंडित आहे,व सामाजिक बांधिलकी जपत असल्याचं दिसतं आहे.व या करिता मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, संघटक, मार्गदर्शक मेहनत घेत आहेत..

Friday, September 10, 2021

वीरशैवांचा आधारवड कोसळला माजलगांवकर महाराज शिवचरणी लीन


वीरशैवांचा आधारवड कोसळला
माजलगांवकर महाराज शिवचरणी लीन
चंद्रशेखर शिवाचार्य नूतन मठाधिपती


माजलगांव : दि :-  लिंगायत TV live प्रतिनिधी
येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती सद्गुरू श्री. तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे आज (१० सप्टेंबर) रोजी दुपारी १ वा. वृध्दपकाळाने निधन झाले.ते. ९४ वर्षाचे होते. गेल्या एक महिन्यापासून श्री माजलगांवकर महाराज शारीरिक व्याधीग्रस्त होते. मात्र गेल्या आठ दिवसात त्यांची प्रकृती अधिकच खालावली. दरम्यान शुक्रवारी दुपारी १ वाजता त्यांनी माजलगांव येथील मठात अखेरचा श्वास घेतला. माजलगांवकर महाराजांच्या जाण्याने देशातील सम्रगी वीरशैव समाज शोकसारात बुडाला असून वीरशैवांचा आधारवड कोसळला असल्याची प्रितिक्रिया हिमवत्केदार महापीठाचे जगद्गुरू श्री.श्री.श्री. १००८ भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजींनी आपली शोकसंदेता व्यक्त केली. माजलगांवकर महाराजाचे निधन झाले त्यावेळी जगद्गुरू माजलगांव मठातच उपस्थित होते. महाराजांच्या प्रकृतीची चौकशी करण्याच्या निमित्ताने ते गुरूवार सायंकाळीच माजलगांवी आले होते. या वेळी श्रीगुरू देवांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर, श्रीगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिखर शिंगणापूरकर, अंबाजोगाईचे श्रीगुरू शंभुलिंग शिवाचार्य महाराज, पाथ्रीच्या कांचबसवेश्वर मठाचे श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज, पूर्णा येथील श्री गुरू डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, माळकवठा येथील श्रीगुरू पंचाक्षरी शिवाचार्य महाराज यांच्या सह हजारो समाज बांधव उपस्थित होते. दरम्यान माजलगांवकर महाराजांच्या पार्थीवावर उद्या सकाळी ११ वाजता मठाच्या आवारातच समाधीविधी करण्यात येणार आहे.
    गेल्या सहासात दशकात देशातील वीरशैव समाजाच्या झालेल्या जडण घडणीत सिंहाचा वाटा उचलणार्‍या माजलगांवकर महाराजांनी वीरशैव समाजाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. दि. २ डिसेंबर १९२७ साली गुलबर्गा जिल्ह्यातील परुताबाद येथे संगम्मा व श्री शिवलिंगय्या हिरेमठ स्वामी यांच्या उुरी त्यांचा जन्म झाला. परुताबाद, सोलापूर येथे आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९५४ साली माजलगांव मठाची सूत्रे त्यांनी स्वीकारली. मठाची सूत्रे  हाती घेतल्यानंतर गेल्या सात दशकामध्ये महाराजांनी माजलगांव मठासह समग्र वीरशैव समाजाला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. औरंगाबाद, बीड, कपिलधार, बार्शी, गेवराई आदी ठिकाणी माजलगांव मठाचा विस्तार करून या मठाला धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात सर्वोच्य स्थानी नेण्याची त्यांची कामगीरी नेत्रदिपक आहे.
     सिध्दयोगी तपस्वी म्हणून सर्व जाती धर्मात लोकप्रिय ठरलेल्या माजलगांवकर महाराजांना त्यांचे तपःसामर्थ्य पाहुन रंभापुरी महापीठाचे तत्कालीन जगदगुरू श्री वीरगंगाधार शिवाचार्य भगवत्पाद यांनी तपोरत्नं या उपधीने गौरविले. त्याच प्रमाणे वीरशैवांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र कपिलधारच्या विकासातील त्यांचे अतुल्य योगदान लक्षात घेवून विद्यमान काशी जगदगुरू डॉ.श्री. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी श्री क्षेत्र उद्धारक श्री प्रभु या उपाधीने सम्मानीत केले आहे.

Thursday, September 9, 2021

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.पुण्यात आजपासून कलम 144 लागू; उल्लंघन केल्यास कारवाई





कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे.
पुण्यात आजपासून कलम 144 लागू; उल्लंघन केल्यास कारवाई

पुणे : दि  10 :- adv शीतल बेंद्रे
लिंगायत tv live
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून पुणे शहरात कलम १४४ लागू करण्यात येणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून आजपासून (ता. 10) जमावबंदीचा आदेश लागू असेल, तर 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत कलम 144 लागू करण्यात येईल. दरम्यान, याबाबतचे आदेश नुकतेच पुणे शहर पोलीस सहाय्यक आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी जारी केले आहेत.

Monday, September 6, 2021

शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम कर्तव्यभावनेतून करा – जगदाळे,स्वाती चेणगे - बाजारे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान


शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम कर्तव्यभावनेतून करा – जगदाळे,स्वाती चेणगे - बाजारे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
कराड : ( लिंगायत TV live )
शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा पाया असून तो मजबुत असेल तरच त्यावर कळस चढतो. तो शिक्षणाचा पाया मजबुत करण्याचे काम कर्तव्यभावनेतून करा, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी कराड येथे केले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने कराड पंचायत समितीच्या वतीने आयोजित 'स्व. यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार' वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, सागर शिवदास, प्राचार्य गणपतराव कणसे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात स्वाती बाजारे, खुर्शिद पटेल, जयश्री कुंभार, शारदा क्षीरसागर, माधवी चव्हाण, शोभा शिंदे, हरिदास माने, संभाजी यादव यांच्यासह २४ गुरूजनांना पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
दिशा देण्याचे काम ही नैतिक जबाबदारी कोरोनामुळे शिक्षणाचा पॅटर्न बदलला आहे. या बदलत्या काळात ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थी जोपर्यंत शिकत नाही, तोपर्यंत प्रगतीच्या गप्पांना अर्थ नाही. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा देश घडवण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम करावे, असे आवाहन मानसिंगराव जगदाळे यांनी यावेळी केले. मातापित्यांच्या नंतर वंदनीय स्थान गुरूला असते. विद्यार्थी घडला, तर तो आयुष्यभर आपल्या शिक्षकाचे नाव काढत असतो. त्याला दिशा देण्याचे काम करणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. पुरस्काराच्या रूपाने ही जबाबदारी आणखी वाढली आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी याप्रसंगी केलेजे काम स्वीकारले, ते आनंदाने करा !केवळ पाठ्यपुस्तक म्हणजे शिक्षण नव्हे. त्याच्या पलीकडे जावून ज्ञानकण वेचावे लागतील व ते विद्यार्थ्यांमध्ये पेरावे लागतील. त्यासाठी वाचन वाढवून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे लागेल, असे सांगत, जे काम स्वीकारले आहे, ते लादले आहे या भावनेतून नव्हे, तर आनंदाने करा, असा कानमंत्र प्राचार्य कणसे यांनी गुरूजनांना दिला. यावेळी प्रणव ताटे, रमेश चव्हाण, वनिता पलंगे, शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी, सन्मती देशमाने यांचीही भाषणे झाली. पुरस्कार विजेत्यांपैकी हणमंत ताटे, विक्रम पाटील, माधवी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी स्वागत, उपसभापती रमेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
पुरस्कारप्राप्त गुरूजनांची यादी,श्रीमती खुर्शिद पटेल (हजारमाची),सौ. जयश्री अरूण कुंभार (चरेगाव),सौ. शारदा सुधाकर क्षीरसागर (शामगाव),सौ. माधवी सोमनाथ चव्हाण (कोरेगाव),सौ. शोभा विजय शिंदे (हेळगाव),हरिदास रामचंद माने (मस्करवाडी - इंदोली),संभाजी राजाराम यादव (शिवाजीनगर - काले),सौ. कुसुम पोपट देसाई (वानरवाडी),सौ. विजया शिरिष पाटील (सैदापूर),श्रीमती मनिषा तानाजी माने (पाचवड मळा),सौ. स्वाती सूर्यकांत बाजारे (मसूर मुली),संजय महादेव शेंडे (बांदेकरवाडी),सौ. आशाताई उत्तम निकम (कोर्टी),विक्रम वसंत पाटील (पवारमळा, रेठरे बुद्रुक),सुरेश आनंदा चव्हाण (केसे),श्रीकांत नामदेव बाबर (डेळेवाडी),सौ. मनिषा शंकर रामुगडे (उंब्रज मुली} ,सौ. मिनाक्षी अशोक गायकवाड (उंडाळे),महेशकुमार उत्तमराव बोंगाळे (कोडोली),सौ. सुवर्णा कुमार पाटील (वहागाव),प्रल्हाद पांडुरंग कदम (मालखेड),श्रीमती विजया प्रकाश पाटील (शिंगणवाडी),तानाजी शामराव गुजर (भरेवाडी),राजाराम सिदू जगताप (म्हासोली)

Sunday, September 5, 2021

उंब्रज येथील प्रसिद्ध उद्योजक मा राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार प्रदान


उंब्रज येथील प्रसिद्ध उद्योजक मा राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार प्रदान
उंब्रज दि ५:- प्रतिनिधी (लिंगायत TV live प्रसाद वाकडे)
उंब्रज येथील प्रसिद्ध उद्योजक मा राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार प्रदान करणेत आला.
नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार 4 सप्टेंबर  2021 रोजी ताज हॉटेल अहमदाबाद गुजरात येथे  संपन्न झाला. 

 सदरच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री माननीय महोदय श्री रामदास आठवले , श्री प्रल्हाद दामोदरदास मोदी , डॉक्टर राजकुमार टाक, माननीय श्री उदित नारायण, माननीय मंदिरा बेदी, कर्नल शैलेंद्र सिंह व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.  सदरचा पुरस्कार  मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे बंधू श्री प्रल्हाद दामोदरदास मोदी यांच्या हस्ते श्री राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला नोबल पुरस्कार व अमेरिकन विद्यापीठाची बिजनेस मॅनेजमेंट करिता डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. श्री राजेंद्र  प्रल्हादशेठ घुटे यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल लिंगायत समाज उंब्रज आणि सर्व उंब्रजकर ग्रामस्थ यांचे कडून अभिनंदन करणेत येत आहे

Saturday, September 4, 2021

राज्य सरकारच्या सहकार समिती वर सदस्य पदीलिंगायत संघर्ष समिती चे समन्वयक, लिंगायत लोकनेते मा काकासाहेब कोयटे यांची निवड


 राज्य सरकारच्या सहकार समिती वर सदस्य पदीलिंगायत संघर्ष समिती चे समन्वयक, लिंगायत लोकनेते मा काकासाहेब कोयटे यांची निवड
पुणे दि 4 प्रतिनिधीराज्य सरकारच्या सहकार समिती वर सदस्य पदी लिंगायत संघर्ष समिती चे समन्वयक, लिंगायत लोकनेते मा काकासाहेब कोयटे यांची निवड
महाराष्ट्र सरकारच्या सहकार विषयक नियामक समिती(Think tank) वर सदस्य पदी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष, सहकार महर्षी 
मा काकासाहेब कोयटे यांची निवड राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे, मा काकासाहेब कोयटे यांच्या सहकार विषयक अनुभवाचा फायदा सहकार क्षेत्राला व्हावा म्हणून हि निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल लिंगायत लोकनेते मा काकासाहेब कोयटे यांचे हार्दिक अभिनंदन 💐👍
🔸 *लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र* 🔸


Thursday, September 2, 2021

लिंगायत समाजातील उद्योजक राजेंद्र प्रल्हाद घुटे यांनावीरशैव ईंटरनँशनल असोसिएशन चे सदस्य उद्योजक मा राजेंद्र घुटे चेअरमन सत्यम पेट्रोकेमीकल्स यांना अत्यंत प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला पुरस्कार तसेच बिझनेस मँनेजमेंट क्षेत्रातील योगदानाबद्दल अमेरिकन युनिव्हर्सिटी कडुन डॉक्टरेट पदवी जाहीर,


उद्योजक राजेंद्र प्रल्हाद घुटे  सत्यम पेट्रोकेमिकल्स उंब्रज तालुका कराड यांना जागतिक  नेल्सन मंडेला पुरस्कार जाहीर

     लिंगायत समाजातील उद्योजक राजेंद्र प्रल्हाद घुटे  सत्यम पेट्रोकेमिकल्स उंब्रज तालुका कराड यांना जागतिक शांततेसाठी नेल्सन मंडेला पुरस्कार जाहीर

उंब्रज दि  3 

प्रतिनिधी 

उंब्रज तालुका कराड येथील प्रसिद्ध  लिंगायत समाजातील जेष्ठ उद्योजक राजेंद्र प्रल्हाद घुटे  सत्यम पेट्रोकेमिकल्स उंब्रज तालुका कराड यांना जागतिक शांततेसाठी नेल्सन मंडेला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि बिझनेस मॅनेजमेंट क्षेत्रात काही भरीव  कामगिरी केल्याबद्दल अमेरिकन युनिव्हर्सिटी, यूएसए कडून डॉक्टरेट पदवी देखील देण्यात आली आहे. हा पुरस्कार 4 सप्टेंबर 2021 रोजी ताज हॉटेल, अहमदाबाद येथे अत्यंत प्रतिष्ठित लोक आणि सुप्रसिद्ध व्यक्तींच्या उपस्थितीत देण्यात  येणार आहे.

वीरशैव ईंटरनँशनल असोसिएशन 

चे सदस्य उद्योजक मा राजेंद्र घुटे चेअरमन सत्यम पेट्रोकेमीकल्स यांना अत्यंत प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला पुरस्कार तसेच बिझनेस मँनेजमेंट क्षेत्रातील योगदानाबद्दल अमेरिकन युनिव्हर्सिटी कडुन डॉक्टरेट पदवी जाहीर,

असा पुरस्कार व पदवी मिळविणारे महाराष्ट्रातील व लिंगायत समाजातील एकमेव असणारे मा राजेंद्र घुटे यांचे वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन व  लिंगायत संघर्ष समिती  समस्त लिंगायत समाज उंब्रज यांचे वतीने हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस     






लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...