Wednesday, December 29, 2021

युवा नेते मा. संदिपजी कोयटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

युवा नेते मा. संदिपजी कोयटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
..सातारा दि.३०.प्रतिनिधी प्रा अजय शेटे
.लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन युवविंग चे युवा नेते ..समता पतसंस्थेचे संचालक ..समता एज्युकेशन सोसायटी चे विश्वस्त तसेच 2014 साली लिंगायत आरक्षण आंदोलनात स्वतः रस्त्यावर उतरून रास्ता रोको आंदोलन करणारे..कराड मध्ये प्रसंगी जेल मध्ये जाणारे..लिंगायत आरक्षण आंदोलनाचे क्रांती सैनिक ..तमाम लिंगायत युवकांचे आशास्थान श्री . संदिपजी कोयटे साहेब यांना वीरशैव लिंगायत समाज संघटना..लिंगायत टिव्ही..आणि प्रदिपजी साखरे..यांचे कडून वाढदिवसाच्या लक्ष..लक्ष..हार्दिक शुभेच्छा **

Monday, December 27, 2021

हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्नेहमेळावा सामाजिक उपक्रमांनी साजरा हरदिन मॉर्निंग ग्रुपची सामाजिक चळवळ प्रेरणादायी -सीए रविंद्र कटारिया





हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्नेहमेळावा सामाजिक उपक्रमांनी साजरा 
हरदिन मॉर्निंग ग्रुपची सामाजिक चळवळ प्रेरणादायी -सीए रविंद्र कटारिया

                                      ग्रुपच्या सदस्यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प
 




हरदिन मॉर्निंग ग्रुपचा स्नेहमेळावा सामाजिक उपक्रमांनी साजरा 
हरदिन मॉर्निंग ग्रुपची सामाजिक चळवळ प्रेरणादायी -सीए रविंद्र कटारिया
अहमदनगर दि 27 
 (प्रतिनिधी adv शितल बेद्रे )
हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून तब्बल एकवीस वर्ष सामाजिक योगदान देऊन वृक्षरोपण व संवर्धनाची मोहिम राबविणार्‍या ग्रुपच्या सदस्यांचा स्नेहमेळावा भिंगार येथील चौंडेश्‍वरी मंदिराच्या सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी करण्यात आली. 

ज्येष्ठ नागरिकांची मोफत नेत्र व आरोग्य तपासणी
ग्रुपच्या सदस्यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प



उत्कृष्ट  सामाजिक कार्याबद्दल  लिंगायत TV live च्या प्रतींनिधी adv शीतल बेदरे यांचा सत्कार 
कार्यक्रमाचे उद्घाटन सीए रविंद्र कटारिया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, नगरसेवक किशोर बोरा, जालिंदर बोरुडे, विद्या जोशी, किशोर भिंगारकर, भारती कटारिया, सविता परदेशी, रमेश वराडे, दिपक बडदे, दिलीप ठोकळ, सुंदर पाटील, दिपक अमृत, दिलीप गुगळे, सर्वेश सपकाळ, दिलीप बोंदर्डे, अभिजीत सपकाळ, भारती कटारिया, सविता परदेशी, प्रांजली सपकाळ, सुनिता वराडे, विद्या जोशी, अ‍ॅड. शितल बेद्रे, संगिता सपकाळ, उषा ठोकळ, सुरेखा आमले, जयश्री बडदे, लक्ष्मी गायकवाड, सरिता अटकर, आरती बोराडे, संध्या हिकरे, राहुल दिवटे, कन्हैय्या बुंदेले, प्रविण परदेशी, सुभाष गोंधळे, नामदेव जावळे, दिपक घोडके, संतोष हजारे, विकास निमसे आदी ग्रुपचे सदस्य उपस्थित होते.   
प्रास्ताविकात संजय सपकाळ म्हणाले की, सन 2000 साली हरदिन मॉर्निंग ग्रुपची स्थापना करण्यात आली. मागील 21 वर्षे अविरतपणे ग्रुपचे सामाजिक कार्य सुरू आहे. वृक्षरोपण, संवर्धन व आरोग्याप्रति जागरूक राहून दररोज सकाळी ग्रुपचे सदस्य योग प्राणायाम करतात. महिला दिन, कामगार दिन साजरा करुन विविध सण, उत्सव सामाजिक उपक्रमाने साजरे करण्यात आले आहेत. भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे उन्हाळ्यात झाडांना ग्रुपच्या सदस्यांनी पन्नास हजार रुपये खर्च करून पाणी दिले व वाळत चाललेली झाडे जगवली. आरोग्य, नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबीर राबविण्यात आले. माणुसकीची भिंत व कोरोना काळात गरजूंना किराणा वाटप करुन दुर्बल घटकांना आधार देण्याचे काम करण्यात आले. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्ततींना एकत्र करुन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, पर्यावरण व आरोग्य चळवळ चालवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. 
सीए रविंद्र कटारिया म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपची सामाजिक चळवळ प्रेरणादायी आहे. या ग्रुपचे रूपांतर एका मोठ्या परिवारात झाले आहे. सर्व एकत्र येऊन सामाजिक उपक्रम राबवीत असून, गरजूंना आधारही देत आहे. सर्व एकत्र आल्याने विचारांची देवाण-घेवाण होऊन मोठे सामाजिक कार्य उभे राहिले आहे. संजय सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रुपची उत्तमपणे वाटचाल सुरू असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या स्नेह मेळाव्यात हरदिनच्या सदस्यांना फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून नेत्रदान संकल्प अर्जाचे वितरण करण्यात आले. मरणोत्तर नेत्रदान करणार्‍या सदस्यांनी सदर अर्ज भरुन दिले. यावेळी सिनेसंगीत व करमणुकीचे कार्यक्रम पार पडले. भिंगार छावणी परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत ज्येष्ठ नागरिकांच्या गटात पहिल्या तीन क्रमांकाचे विजेते ठरलेल्या ग्रुपच्या सदस्यांचा गौरव करण्यात आला. वाढदिवस रक्तदान, वृक्षरोपण आदी सामाजिक उपक्रम राबवून साजरे केल्याबद्दल व विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.  हिमोग्लोबीन व रक्ततपासणी बालाजी कार्ले, प्रविण शेळके, देविदास खळदकर यांनी केली. नेत्र तपासणी डॉ. सचिन सोनवणे, डॉ. अमोल पिल्ले, मायाताई आल्हाट यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपक अमृत यांनी केले. आभार रमेश वराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विलास दळवी, शिवाजी बनकर, सुरेंद्रसिंह सोहेल (बिल्ला), संतोष बोबडे, पांडूरंग अटकर, अजय खंडागळे, सुरेश त्रिमुखे, भास्कर भालेराव, आजिनाथ रासकर, सचिन खिस्ती, रमेश कडूस, चेतन वजगडेकर, नंदू आहिरे, रमेश त्रिमुखे, संदिप सोनवणे, बाबासाहेब बेरड, महावीर गांधी, जयकुमार मुनोत, अशोक पराते, सुभाष त्रिमुखे, विकास भिंगारदिवे, मनोहर पाडळे, सरदारसिंह परदेशी, राकेश वाडेकर, हरिश साळुंके, सुभाष नाबरिया, विनोद खोत, रामनाथ गर्जे, तुषार घाडगे,विठ्ठल राहिंज, योगेश करांडे, राजू कांबळे, मुकेश क्षीरसागर, प्रशांत मुथा, निखील नहार, सुयोग चंगेडे, संपत बेरड, पोपट भांड, प्रसाद भिंगारदिवे, मच्छिंद्र बेरड, प्राज्ञक खिरोडे, अशोक लोंढे, धनंजय नामदे, अविनाश जाधव, माधव भांबुरकर, संदीप छजलाणी, आसाराम बनसोडे, भिमराव फुंदे, वैभव खिरोडे, जालिंदर अळकुटे, संजय भावसार, जालिंदर बोंदर्डे, सचिन कस्तुरे, अरुण क्षीरसागर, दिनकर धाडगे, प्रेमपालसिंग, सुधीर बग्गन, सोहम चौधरी, संकेत अटकर, प्रिया बुंदेले, किरण फुलारी आदींनी परिश्रम घेतले.

Saturday, December 25, 2021

धर्मरत्न डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य श्री क्षेत्र काशी पिठाचे उत्तराधिकारी

 


              धर्मरत्न डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य श्री क्षेत्र काशी पिठाचे  उत्तराधिकारी 



.

..सातारा.. दि.22.  .प्रा.अजय शेटे.. वडूज..9823540239. लिंगायत TV live प्रतींनिधी    .वीरशैव लिंगायत धर्माचे पवित्र स्थान असलेल्या श्री क्षेत्र काशी येथील जंगम वाडी मठ संस्थानच्या उत्तराधिकारी पदी धर्मरत्न जगद्गुरू श्री श्री श्री डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महा स्वामीजी यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे..

..श्री क्षेत्र काशी येथील हे मठ संस्थान भारतातील वीरशैव लिंगायत धर्माचे अतिशय पवित्र स्थान समजले जाते.जगद्गुरू पंच आचार्य यांचे वास्तव्य येथे असते.तसेच येथे वीरशैव लिंगायत धर्माचे वैदिक धर्म शिक्षण व दिक्षाविधी कार्यक्रम येथे पार पाडले जातात.येथे धर्म शिक्षण घेवून अनेक महास्वामी संपूर्ण भारत व परदेशात असलेल्या मठ संस्थान गादी द्वारे वीरशैव लिंगायत धर्माच्या मानव धर्म व विश्व शांती या तत्त्वांचा प्रचार व प्रसार संपूर्ण जगभर करत असतात..

..अशा पवित्र श्री तीर्थ क्षेत्री पदी निवड झाल्याबद्दल वीरशैव लिंगायत धर्म संघटना व लिंगायत टी. व्ही.यांच्या वतीने डॉ.मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी जीं ना शिवशरणार्थ व शतशः नमन..**

Friday, December 24, 2021

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासह कराड दक्षिण मध्ये ७ आरोग्य केंद्रांना मंजुरीनवीन वर्षात हि आरोग्य केंद्रे उभारली जाऊन कार्यान्वित होतील.



माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरासह कराड दक्षिण मध्ये ७ आरोग्य केंद्रांना मंजुरी
नवीन वर्षात हि आरोग्य केंद्रे उभारली जाऊन कार्यान्वित होतील. 
 कराड: दि 25 :-  लिंगायत TV live प्रतिनिधी  दिव्या महाजन 
कोरोना काळात शासकीय आरोग्य यंत्रणेवर जो ताण पडला  त्यांची नोंद घेत सामान्य नागरिकांना आरोग्य सेवा शासकीय खर्चाने मिळण्यासाठी  आरोग्य केंद्रे वाढविण्याची गरज होती या अनुषंगाने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कराड, मलकापूर व सैदापूर येथे ७ नागरी आरोग्य केंद्रे मंजूर झाली आहेत. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कराड शहरातील शुक्रवार पेठ येथे २, छत्रपती संभाजी महाराज भाजी मार्केट येथे १, वाखाण रोड येथे १ याचबरोबर मलकापूरमधील लक्ष्मीनगर व आगाशिवनगर येथे प्रत्येकी १, आणि सैदापूर येथे १ असे एकूण ७ नागरी आरोग्य केंद्र मंजूर झाले आहेत. 

कोरोनाच्या काळात वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांना आरोग्य सुविधा देताना आरोग्य यंत्रणेची दमछाक होत होती. असलेली यंत्रणा अपुरी पडत होती. अश्या परिस्थितीत प्रशासनासोबत वेळोवेळी बैठका  घेऊन माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या, वेळोवेळी बेड वाढविले गेले व नागरिकांना आरोग्य सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला. आरोग्य केंद्रे वाढविली पाहिजेत यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करीत कराड दक्षिण मध्ये नागरी आरोग्य केंद्रे मंजूर करून आणली. हि नागरी आरोग्य केंद्रे मंजूर करण्यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. एन रामास्वामी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे सहकार्य लाभले. 

हे नागरी आरोग्य केंद्र सुरु करणेसाठी तालुका आरोग्य अधिकारी व पंचायत समिती यांच्या समन्वयाने स्वतःच्या मालकीची जागा किंवा कमाल मासिक रु. १५,०००/- पर्यंत भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून द्यायची आहे. सदर नागरी आरोग्य केंद्रासाठी १५०० ते २५०० sq ft इमारत असणे आवश्यक आहे. त्यामध्ये पाणी पुरवठा, शौचालय, वीज याची उपलब्धता आहे तसेच या नागरी आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), औषध निर्माता, स्टाफ नर्स, शिपाई या पदांची नियुक्ती केली जाणार आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे आरोग्य सुविधा वाढविण्यावर असलेल्या धोरणांमुळे कराड दक्षिण मधील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. 

कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यात आज पासून नवे नियम लागू ,! सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध


कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यात आज पासून नवे नियम लागू ,! 
सर्व प्रकारच्या समारंभांमध्ये उपस्थितांच्या संख्येवर निर्बंध
सातारा दि 24  प्रतिनिधी प्रसाद वाकडे
कोरोना संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी आरोग्याचे नियम पाळावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.  ते आज मध्यरात्रीपासून लागू राहतील.

विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. संसर्ग वाढू द्यायचा नसेल तर सर्वांनी जबाबदारीने आरोग्याचे नियम पाळणे, मास्क व्यवस्थित वापरणे आवश्यक आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

एवढेच नव्हे तर केंद्रीय आरोग्य विभागाने देखील सर्व राज्यांसाठी संसर्ग रोखण्याकरिता पुरेशी काळजी घेण्यास व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. सध्याच्या निर्बंधाचे स्वरूप हे प्राथमिक स्वरूपाचे असून ते आत्ताच न लावल्यास भविष्यात अधिक कठोर निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यात देखील गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून येत आहेत.  ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.

आज दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आलेल्या आदेशात खालीलप्रमाणे  अतिरिक्त निर्बंध असतील.

·         संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
·         लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
·         इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
·         उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
·         क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
·         वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
·         उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
·         याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
·         जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.
...

Wednesday, December 15, 2021

हम भी किसींसे कम नहीं ' चा अनोखा अनुभव ..पती पाठोपाठ पत्नीच्याही डॉक्टरेट मुळे जुळून आला दुग्ध शर्करा योग..तारळे गावचे सुपुत्र डॉ.किरण तोडकर आणि त्यांची पत्नी dr श्वेता तोडकर झाडे यांचे यश..


 हम  भी किसींसे  कम नहीं ' चा अनोखा अनुभव 
..पती पाठोपाठ पत्नीच्याही  डॉक्टरेट मुळे जुळून आला दुग्ध शर्करा योग..
तारळे गावचे सुपुत्र  डॉ.किरण तोडकर आणि त्यांची पत्नी dr श्वेता तोडकर झाडे यांचे यश
..सातारा दि.14.. प्रसाद वाकडे लिंगायत TV live प्रतिनिधी 
 तारळे गावचे सुपुत्र  डॉ.किरण तोडकर यांनी यंदाच अमेरिकेत संशोधन करून डॉक्टरेट पदवी मिळवली.त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची पत्नी श्वेता तोडकर ..झाडे यांनीही त्याच विद्यापीठात उच्चरक्तदाब या विषयावर संशोधन करून पी.एच.डी. ( विद्यावाचस्पती ) हि पदवी प्राप्त केली आहे.पती..पत्नीच्या या अनोख्या कामगिरीचे तारळे विभागात खूप कौतुक होत आहे.
..कराडच्या कृष्णा इन्स्टिट्यूट मध्ये मेडिकल क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री.रामेश्वर व सौ.शोभा झाडे यांच्या डॉ.श्वेता  या कन्या आहेत.त्यांचे प्राथमिक शिक्षण हे कृष्णा स्कूल ला झाले.हुबळी येथे त्यांनी नर्सिंग चे शिक्षण पूर्ण  केले.
..पुढे कृष्णा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स येथे एम. ए स्सी.नर्सिंग ची उच्च पदवी प्राप्त केली.त्यानंतर त्यांनी तेथेच नर्सिंग कॉलेज ला दोन वर्षे व्याख्याते म्हणून काम पाहिले.दरम्यान 2013 मध्ये त्यांचा विवाह तारळे येथील डॉ.किरण तोडकर यांच्याशी झाला.
..2013 ते 2015 दरम्यान त्यांनी रुबी हॉलच्या नर्सिंग कॉलेज मध्येही व्याख्याते म्हणून  अध्यापनाचे काम केले.त्यानंतर पुढे उच्च शिक्षणासाठी पती डॉ. किरण यांच्याबरोबर त्या कॅनडा ला गेल्या.
.. क्वीन एलिझाबेथ शिष्यवृत्ती अंतर्गत उच्च रक्तदाब या विषयावर पी.एच.डी.करण्यासाठी 2016 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ क्युबेक ट्रा यों रिव्हर्स ..कॅनडा येथे त्यांनी प्रवेश घेतला.दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय युरोपियन जर्नल ऑफ हाय पर टेन्शन मध्ये उच्च रक्तदाब या विषयावर दोन पेपर प्रसिद्ध केले.
..स्पेन मधील बार्सिलोना येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय उच्च रक्तदाब परिषदेत पोस्टर प्रेझेंटेशन मध्येही प्रथम पारितोषिक मिळविले .प्रा.डॉ.लीन यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.श्वेता तोडकर यांनी पी.एच. डी.मिळविली.तसेच पती  डॉ.किरण तोडकर यांनीही याच वर्षी याच विद्यापीठातून डॉक्टरेट ची पदवी मिळविली आहे.
..डॉ.तोडकर दाम्पत्याचे डॉ.सुरेश भोसले..श्री.अतुल भोसले यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले.त्यांच्या या अतुलनीय यशाबद्दल वीरशैव लिंगायत समाज संघटना उंब्रज व श्री जानाई देवस्थान ट्रस्ट उंब्रज, लिंगायत टि. व्ही. यांच्या वतीनेही हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा 
..



Tuesday, December 14, 2021

वडूज नगरपंचायत निवडणूक पुर्वीच विरोधकांचे राजकारण सुरू ,?????? विरोधकांकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या उमदेवार यादीवर आक्षेप

वडूज नगरपंचायत निवडणूक पुर्वीच विरोधकांचे राजकारण सुरू ,?????? विरोधकांकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या उमदेवार यादीवर आक्षेप 
.. वडूज दि.15.प्रणाली वाकडे लिंगायत TV live प्रतिनिधी 
. वडूज नगरपंचायत निवडणूक मध्ये दि.13 रोजीची उमेदवार अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख झाल्यानंतर राहिलेल्या उर्वरित उमेदवारांची यादी काही विरोधकांनी नगरपंचायत मधील कागद घेवून त्यावर पेन ने लेखी स्वरूपात लिहिली. व ती सोशल मीडिया वरून बेकायदा प्रकाशित केली जात आहे.
..यामध्ये प्रभाग क्र.7 मधील खुल्या पुरुष गटातील अपक्ष उमेदवार श्री.सुयोग विजय शेटे यांचे नाव हेतुपूर्वक पणे वगळून सदर यादी प्रकाशित करण्यात येवुन मतदारांची दिशाभूल करण्यात येत आहे..
..त्यावर बा श्री.सुयोग शेटे यांनी मा.निवडणूक अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करून दाद मागितली आहे.त्यावर तातडीने कार्यवाही करत सहाय्यक निवडणूक अधिकारी श्री.अमित पंडित यांनी उत्तर देत लेखी स्वरूपा त सदर तक्रार पोलीस प्रशासन सायबर गुन्हे शाखा यांचेकडे दाखल करण्यासाठी रीतसर लेखी परवानगी पत्र दिले आहे.
.. सदर मतदार यादी साठी नगरपंचायतीच्या नावाचे कागद कसे प्राप्त झाले.शिवाय सदर अक्षर कोणाचे आहे. व सदर यादी कोणी  प्रसिद्ध केली.याची कायदेशीर चौकशी होऊन संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरत आहे.**

Sunday, December 12, 2021

राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद : राष्ट्रीय लोकन्यायालयात १५ हजार २१ प्रकरणे सामंजस्याने मिटली. ; राज्यात दुसऱ्या क्रमांकावरराष्ट्रीय लोकन्यायालयात १५ हजार २१ प्रकरणे सामंजस्याने मिटली

 





राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद : राष्ट्रीय लोकन्यायालयात १५ हजार २१ प्रकरणे सामंजस्याने मिटली. ; राज्यात दुसऱ्या क्रमांकावरराष्ट्रीय लोकन्यायालयात १५ हजार २१ प्रकरणे सामंजस्याने मिटली

अहमदनगर:- दि  11 प्रतींनिधी Adv शीतल बेद्रे 




जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर, बार असोसिएशन, अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशन यांच्या वतीने शनिवार (दिनांक ११ डिसेबर २०२१) आयोजित कऱण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत प्रत्यक्षरित्या कामकाज करण्यात आले. जिल्हा न्यायालय आणि जिल्ह्यातील तालुका न्यायालये यामध्ये एकूण १५ हजार २१ दाखल पुर्व प्रकऱणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली. लोकअदालतीत परस्पर समझोता करुन प्रकरण निकाली काढले . जिल्हयामध्ये ७ हजार ७६३ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर २४ ९२ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला तसेच तब्बल ५० कोटी १४ लाख २५ हजार ३११ इतक्‍या रकमेची वसुली करण्यात आली. या राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन जिल्हा न्यायालय, अहमदनगर तसेच सर्व तालुका न्यायालय येथे करण्यात आले. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयातील दिवाणी प्रकरणे, फौजदारी एन. आय. अँक्ट प्रकरणे, बँकेची कर्ज वसुली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार कायद्यातील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज महावितरणची समझोतायोग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरचे दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्याकरीता ठेवण्यात आली होती. 



लोकअदालतमध्ये प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये हजारो प्रकरणे मिटविण्यात आली. जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयामध्ये कोव्हीड-19 नियमांचे तंतोतंत पालन करून नागरीकांची प्रकरणे आपसामध्ये समझोता करून मिटविण्यात आली.लोकन्यायालयाचे दिवशी बरेच नागरीक मैत्रीच्या संबंधासह आपसातले वाद मिटवून हसत बाहेर जाताना दिसून आले. जिल्हा न्यायालय, अहमदनगर येथे ही लोकअदालत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगरचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा आणि जिल्हा न्यायाधीश क्र. 1 मिलींद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अहमदनगर बार असोसिएशन अध्यक्ष अँड.अनिल सरोदे, जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, सेंट्रल बार असोसिएशन अँड. एस.जे. काकडे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांच्या उपस्थितीत पार पडले.

लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्ध धटनेमध्ये वीरमरण आलेले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ बिपिन रावत व इतर अधिकारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बॅंका व महानगरपालिका,ग्रामपंचायत यांची दाखलपूर्व प्रकरणेही यामध्ये मिटवण्यात आली. ही लोकअदालत न्यायाधीश, वकील, पोलीस, विधी स्वयंसेवक व न्यायालयाचे कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्‍वीरीतीने पार पडली. या लोकअदालतीमध्ये ठेवलेल्‍या प्रलंबित प्रकरणांची संख्‍या ४९ हजार २७ इतकी होती. पैकी, तडजोडीने मिटविलेल्‍या प्रकरणांची संख्‍या ११ हजार ३५३ इतकी आहे. यावेळी जिल्हा न्यायालयाचे प्रांगण रांगोळी व फुलांच्या माळांनी सजविले होते.



पारंपरिक न्यायालयाला आगळे वेगळे स्वरूप प्राप्त झालेले होते.महानगरपालिका आणि ग्रामपंचायत कर वसुली प्रकरणे या मध्ये ठेवण्यात आली होती.

या साठी वेगळा मंडप व पक्षकरासाठी सुविधा यासाठी अनेक काऊंटर ठेवले होते. कर वसुली प्रकरणांना नागरिकां चा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

सूत्र संचालन ॲड.अभय राजे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन ॲड. स्वाती नगरकर यांनी केले.




लिंगायत टि. व्ही .यवतमाळ चे प्रतिनिधी संकेत हरसुलकर यांना स्काऊट चा राष्ट्पती पुरस्कार .






लिंगायत टि. व्ही .यवतमाळ चे प्रतिनिधी  संकेत हरसुलकर यांना स्काऊट चा राष्ट्पती पुरस्कार  .




.सातारा.. दि.११.; -  प्रतींनिधी प्रा अजय शेटे 
.लिंगायत टि. व्ही .यवतमाळ चे प्रतिनिधी श्री.संकेत ज्योती गजानन हरसुलकर यांना भारत स्काऊट & गाईड चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे.श्री. संकेत हे संघाचे संघनायक असून त्यांच्या बरोबर इतर तीन सदस्य होते.. ..हा राष्ट्रीय पुरस्कार हा स्काऊट ची राष्ट्रीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या स्काऊटर ला दिला जातो.हा पुरस्कार प्राप्त करणे हे प्रत्येक स्काऊट र चे अंतिम ध्येय असते.हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी आधी राज्यस्तरीय परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते.त्यानंतर हा राज्य पुरस्कार दिला जातो.हा पुरस्कार राज्य स्तरावरील सर्वोच्च सन्मान समजला जातो. ..संकेत यांची हि राष्ट्रपती पुरस्काराची परीक्षा नागार्जुन बेस कॅम्प ..रामटेक .. जि.नागपूर येथे झाली होती.त्यामध्ये एकूण चार जणांच्या संघातील तीन जण उत्तीर्ण झाले. ..त्यांना यासाठी स्काऊट मास्टर श्री. मान गावकर सर् यांचे खूप सहकार्य व मार्गदर्शन लाभले.या बद्दल त्यांना मा.राज्यपाल ..महाराष्ट्र राज्य यांच्या सहीचे प्रशस्तीपत्र प्राप्त झाले आहे.लवकरच त्यांना भारताच्या राष्ट्रपतींच्या सहीचे प्रमाणपत्र प्राप्त होईल व ते राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रपती भवन येथे कार्यक्रमात ते प्रदान करण्यात येईल.. ..श्री.संकेत गजानन हरसूल कर यांचे या यशाबद्दल त्यांचे भारत स्काऊट & गाईड संघटना पदाधिकारी.. शिक्षक..लिंगायत समाज संघटना व लिंगायत टि. व्ही.च्या सर्व चमू कडून हार्दिक अभिनंदन व भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा **

Thursday, December 9, 2021

सुजाता वाकडे यांचा सेवा गौरव पुरस्काराने सन्मान

सुजाता वाकडे यांचा सेवा गौरव पुरस्काराने सन्मान
कोरेगाव दी 9 प्रतींनिधी : कोरेगाव शहरातील आदर्श कॉलनी येथील अंगणवाडी क्रमांक ३३३ च्या उपक्रमशील अंगणवाडी सेविका सौ. सुजाता संतोष वाकडे यांच्या उत्कृष्ठ शिक्षण सेवेचा सातारा येथील भक्ती रिसर्च सेंटरच्या वतीने सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. माजी पोलीस अधिकारी सौ. राधा चंद्रकांत महामुनी यांच्या हस्ते शाल व सन्मानपत्र देवून हा गौरव करण्यात आला. यावेळी साप्ताहीक धनसंतोषच्या संपादिका सौ. विमलताई नलावडे, भाऊसाहेब नलावडे, भक्ती रिसर्च सेंटरचे संस्थापक डॉ. अशोक पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी श्रीमती कुसुमताई मोहिते व संतोष वाकडे यांची विशेष उपस्थिती होती. सौ. सुजाता वाकडे यांनी अंगणवाडीच्या माध्यमातून केलेल्या सेवेचा आजवर अनेक पुरस्कारानी सन्मान झाला असून कोरेगाव तालुक्यातील एक आदर्श व उपक्रमशील अंगणवाडी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे, शिक्षणाचा पाया भक्कम करत असताना मुलांवर चांगले संस्कार करत दर्जेदार उपक्रम आजवर त्यांनी राबविले आहेत, शासनाचे अनेक प्रबोधन कार्यक्रमही त्यांनी राबविले आहेत, संपूर्ण कोरोना काळातही त्यांनी आरोग्य जागृतीचे प्रभावी कार्य केले आहे. क्रांती महिला मंडळ, संस्कृती ग्रुप, सोनेरी सखी मंच या माध्यमातूनही त्या अनेक सामाजिक उपक्रमात कार्यरत आहेत, त्यांच्या या सेवाभावी कार्याचा भक्ती सेंटरच्या वतीने सन्मान करण्यात आला असून या सन्मानाने त्यांना अधिक उत्तमरित्या काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले, शिवाय शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची प्रेरणा त्यांचे पती संतोष वाकडे यांच्या मुळेच मिळाल्याचं त्यानी आवर्जुन सांगितलं. यापुढेही कायम उत्कृष्ट कार्य करत राहणार असल्याचे सांगून त्यांनी या सन्माना बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सौ. सुजाता वाकडे यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

वडूज नगरपंचायत निवडणूक ओबीसी राजकीय आरक्षण निर्णय झाल्यावरच घ्यावी


 वडूज नगरपंचायत निवडणूक ओबीसी राजकीय आरक्षण निर्णय झाल्यावरच घ्यावी 

 वडूज नगरपंचायत निवडणूक ओबीसी राजकीय आरक्षण निर्णय झाल्यावरच घ्यावी 
 वडूज दि.9.. ..प्रा.अजय शेटे..
सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे 27 टक्के राजकीय आरक्षण अतिरिक्त होत आहे.या सबबीखाली ओबीसी प्रभागातील  निवडणूक घेण्यास परवानगी नाकारली.यासाठी भारतीय जनता पार्टी .. वडूज व खटाव तालुक्याच्या वतीने मा.निवडणूक अधिकारी श्री. राम हरी भोसले साहेब व सहाय्यक निवडणूक अधिकारी  श्री.अमित पंडित साहेब यांना निवेदन देण्यात आले व ओबीसी राजकीय आरक्षण निश्चित झाल्याशिवाय वडूज नगर पंचायतीची निवडणूक घेण्यात येवू नये अशी मागणी करण्यात आली..त्याच बरोबर इतर अनेक मागण्या करण्यात आल्या .त्याच बरोबर दि.12 नोव्हेंबर रोजी  अज्ञानातून जाहीर करण्यात आलेल्या वडूज नगरपंचायतीच्या पहिल्या  आरक्षण सोडतीचा जाहीर निषेध करण्यात आला.
..शासन..प्रशासन व न्याय व्यवस्था यांच्या दृष्ट चक्रात ओबीसी समाजावर अन्याय होवू नये..
..केंद्र शासन व राज्य शासन  आरक्षण हे सर्व जाती .. धर्मांना समान असावे..केंद्रात एक व राज्यात दुसऱ्या प्रवर्गा चे आरक्षण हि पद्धत बंद व्हावी..
..निवडणूक नियमानुसार उमेदवार हा कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा हे सूत्र असताना ज्यांनी मार्च 2021 मध्ये नगरपंचायती चा सर्व कर भरला आहे.ते उमेदवार डिसेंबर 2021च्या  नगरपंचायत निवडणुकीवेळी कायद्याने थकबाकीदार ठरू शकत नसतानाही त्यांचा मार्च 2022 अखेर सर्व कर भरून घेतला जात आहे व हेतुपूर्वक पणे आर्थिक लूट केली जात आहे.. हि प्रथा बंद व्हावी.
..कोणत्याही पक्षाचा उमेदवारी अर्ज भरताना त्या प्रभागातील एक सूचक आवश्यक करण्यात आला आहे..परंतु अपक्ष उमदेवार म्हणून अर्ज भरताना 5 सूचक असावे असा नियम आहे.तो जाचक आहे.तेव्हा त्यासाठी फक्त 2 च सूचक ची अट ठेवण्यात येवुन अतिरिक्त 3 सदस्यांची अट रद्द करण्यात यावी..
..निवडणूक आयोग स्थानिक निवडणूक प्रक्रियेसाठी अतिशय कमी असा एक महिन्याचा कालावधी निश्चित करत आहे.तो वाढवून दिड महिन्याचा केला जावा .
..अधिकारी वर्गाने स्वतःच्या स्टाफ च्या माहिती बैठका घेताना सर्व विभागांच्या एकामागोमाग सलग घेवू नयेत.तर दोन बैठकी मध्ये अर्ध्या तासांचे अंतर ठेवून त्या अर्ध्या तासात बाहेर ताटकळत बसलेल्या ग्राहकांचे समस्या निराकार ण  करावे..
..निवडणूक कार्यासाठी अंतर्गत प्रतिक्रिया राबविणारे अधिकारी अथवा शिक्षक हे स्थानिक पातळीवरील ओळखीचे  नेमू नयेत तर ते बाहेरगावचे नेमले जावेत.
..सर्व धर्म व सर्व जातींची निवडणूक प्रक्रिया हि एकाच वेळी राबवली जावी..
..सदोष मतदार यादी पूर्णपणे निर्दोष झाल्यावरच निवडणूक प्रक्रिया राबवावी ..
..अशा विविध प्रकारच्या मागण्या यावेळी लेखी स्वरूपात करण्यात आल्या..
 ..या निवेदनावर ओबीसी सेल प्रमुख प्रा.संजय कुंभार..श्रीकांत बनसोडे काका.. इकबाल शेख..शिवशंकर चव्हाण..राहुल लोहार..साजित मुलाणी..प्रा.अजय शेटे यांची प्रतिनिधी म्हणून स्वाक्षरी करण्यात आली आहे.

Saturday, December 4, 2021

वडूज नगरपंचायत निवडणूक वाढीव मुदत देवून पुढे ढकलावी

वडूज नगरपंचायत निवडणूक वाढीव मुदत देवून पुढे ढकलावी 
.. वडूज दि.४ प्रतिनिधी प्रा अजय शेटे
.निवडणूक आयोगातर्फे वडूज ता.खटाव.. जि.सातारा चा निवडणूक कार्यक्रम दि.१ डिसेंबर ते दि.२८ डिसेंबर २०२१ अखेर जाहीर करण्यात आला असून सदर कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशासन गडबड करीत आहे.तरी सदर निवडणूक मुदतवाढ देवून पुढे ढकलावी .अशी मागणी प्रा.अजय शेटे व ग्रामस्थ यांनी केली आहे.
..खटाव तालुका व वडूज पंचक्रोशीत सध्या अवकाळी पावसाने थैमान घातले असून संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे..एस. टी.वाहतूक सेवा बंद व अपुरी असले मुळे अनेक अडचणी उभ्या रहात आहेत. कोरोना साथ अद्याप निवळली नसून नवीन ओमि क्रॉ न साथीची शक्यता आहे..वीज पुरवठा खंडित होऊन कमी दाबाने होत आहे..ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गर्दी होत आहे..सदोष मतदान  याद्या अशा अनेक अडचणींचा सामना उमेदवार व मत दार यांना करावा लागत आहे.
..तेव्हा वरील अडचणींचा विचार करून हि मागणी जोर धरत आहे **

Friday, December 3, 2021

महत्त्वाची बातमी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत महत्त्वाचा बदल: जीवाला असलेला धोका लक्षात घेत सुरक्षा अपग्रेड .


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत महत्त्वाचा बदल: जीवाला असलेला धोका लक्षात घेत सुरक्षा अपग्रेड .
नवी दिल्ली:दि 3 
 विशेष  प्रतिनिधी adv 
शितल बेद्रे

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सुरक्षेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राणे यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेत त्यांची सुरक्षा अपग्रेड करून त्यांना आता झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत अधिकृत सूत्रांकडून आज माहिती देण्यात आली. 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गेल्या डिसेंबर महिन्यात वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. यात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अर्थात सीआयएसएफचे सशस्त्र कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले होते. आता ही सुरक्षा वाढवण्यात आली असून राणे यांना झेड दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या माहितीला सीआयएसएफचे उपमहानिरीक्षक आणि मुख्य प्रवक्ता डॉ. अनिल पांडेय यांनी दुजोरा दिला. राणे यांना झेड सुरक्षा मिळाल्याने आता राणे देशात कुठेही दौऱ्यावर गेले तर त्यांच्याभोवती सहा ते सात सशस्त्र कमांडोंचे सुरक्षाकडे असणार आहे. 
नारायण राणे यांच्या सुरक्षेचा अलीकडेच आढावा घेण्यात आला. त्यातून जी माहिती उपलब्ध झाली त्या आधारे राणे यांना असलेला धोका लक्षात घेत केंद्रीय यंत्रणांनी राणेंची सुरक्षा वाढवण्याची शिफारस केली होती. त्यानुसार नारायण राणे यांना झेड सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक प्रमुख व्यक्तींना सीआयएसएफची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे. 
दरम्यान, नारायण राणे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. शिवसेना विरुद्ध राणे हा संघर्ष सातत्याने उफाळून येत असतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राणे यांच्यावर थेट अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याच दरम्यान, राणे यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी उग्र निदर्शने केली होती. या सगळ्या घटना लक्षात घेता राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे बोलले जात आहे

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...