सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदारे यांना स्मशानभूमीसाठी जागा मिळावी अशा आशयाचे निवेदन वीरशैव लिंगायत सामाजिक संघटना सिन्नर
सिन्नर- दि 30 :-- शाम सुंदर झळके प्रतिनिधी
सिन्नरमध्ये वीरशैव लिंगायत समाजाची संख्या लक्षणीय असून त्यांना स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा नसल्यामुळे समाजाची कुचंबणा होत आहे.वीरशैव लिंगायत धर्म परंपरेनुसार अग्निसंस्कार न करता, जमिनीत खोलवर पाच सहा फूट खोल खड्डा खोदून त्यात पार्थिव आसनस्थ स्थितीत दफन केले जाते व त्यावर समाधी बांधण्याची प्रथा कित्येक वर्षांपासून चालत आलेली आहे. सिन्नरमध्ये दोन शासकीय तसेच सहकारी औद्योगिक सहकार वसाहती असल्यामुळे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातून वीरशैव लिंगायत समाजाचे लोक सिन्नरमध्ये येऊन स्थिरावले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस संख्या वाढत असताना स्मशानभूमी (रुद्रभूमी) करीता स्वतंत्र जागा नाही त्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागते.फार पूर्वी संगमनेर नाक्याजवळ नगरपालिका हद्दीत मोकळी जागा होती तेथे अंत्यविधी होत असे त्यावेळी समाजाची संख्या नगण्य होती त्यामुळे अडचण येत नव्हती.आता तेथेपण अतिक्रमण झाल्यामुळे लिंगायत समाजाला कोणीच वाली राहिला नाही.या ठिकाणी दशनाम गोसावी समाजाची स्मशानभूमी आहे पण त्यात दुसऱ्या समाजातील लोकांना अंत्यविधीसाठी जागा देत नाही.त्यांच्यातही पार्थिव दफन करण्याची प्रथा आहे.या सर्व बाबींचा विचार करून वीरशैव लिंगायत समाजासाठी स्वतंत्र रुद्रभूमी साठी जागा मिळावी अशी मागणी सिन्नर तालुका वीरशैव लिंगायत सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी सिन्नर नगरपरिषदे चे मुख्याधिकारी संजय केदार यांना निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी डॉ.विजय लोहारकर, सोमनाथ लोहारकर, मुकुंद वाळेकर,राहुल घोंगाणे, संतोष वाळेकर,किरण लोहारकर,दिलीप ठेंगे,अविनाश आष्टुरे,विजय गवंडर,मुकुंद बोरीकर,सुनील लोहारकर,विजय आष्टुरे, सुहास आष्टुरे, मंगेश लोहारकर,गणेश अंकद,सतीश लोहारकर,मंगेश जंगम,अनिकेत पाचपाटील आदींच्या स्वाक्षरी आहेत.
No comments:
Post a Comment