Sunday, February 26, 2023

श्रीमती सुलोचनाताई कल्याणी शिवैक्य .

             श्रीमती सुलोचनाताई कल्याणी शिवैक्य .




                    श्रीमती सुलोचनाताई कल्याणी शिवैक्य .


कराड  , दि.27 - दिलीप महाजन 

  लिंगायत समाजातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिवंगत उद्योजक व महाराष्ट्र वीरशैव सभेचे माजी अध्यक्ष कै.निळकंठराव कल्याणी यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुलोचनाताई निळकंठराव कल्याणी, वय 90 यांचे  शनिवार दि.25 फेब्रुवारी रात्री त्यांच्या वडगाव शेरी येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात भारत फोर्ज चे सर्वेसर्वा बाबासाहेब कल्याणी व गौरीशंकर कल्याणी हे दोन महान उद्योजक पुत्र असून,एक विवाहित कन्या सुगंधा हिरेमठ या आहेत.

कल्याणी परिवाराचा  नातवंडे ,नातेसंबंध व व्यावसायिक गोतावळा परिवार खूप मोठा आहे.त्यांच्यावर समाजबांधव व आप्तेष्ट यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्री शिवशंकर व आई तुळजाभवानी यांच्या चरणी त्यांना सद्गती लाभो हीच  सातारा ,कराड  येथील समस्त  लिंगायत समाज संघटनेच्या वतीने  भावपूर्ण श्रद्धांजली   .

Wednesday, February 22, 2023

बसव कल्याणमध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन,राज्यातून सुमारे २ लाख समाज बांधव उपस्थित राहणार .

 बसव कल्याणमध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन,राज्यातून सुमारे २ लाख समाज बांधव उपस्थित राहणार .

 

 बसव कल्याणमध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन,राज्यातून सुमारे २ लाख समाज बांधव उपस्थित राहणार .

कराड  दि. 22 : रवींद्र वाकडे   प्रतिनिधी  

जागतिक लिंगायत महासभा आणि सर्व बसवतत्त्व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ४  व ५ मार्च रोजी बसवकल्याण (कर्नाटक) येथे प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. प्रदीप वाले बापुअध्यक्ष राष्ट्रीय लिंगायत संघ  आणि असे आवाहन जागतिक लिंगायत महासभा यांचे वतीने करण्यात आले आहे.

                    

                                                                       

जागतिक लिंगायत महासभेद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात म्हंटले आहे की१२ व्या शतकातील बसवादी शरणांचा त्याग व बलिदानाच्या समग्र क्रांती गर्भातून उगम पावलेला धर्म म्हणजे लिंगायत धर्म होय. लिंगभेदजातीभेदवर्गभेद याचे समूळ उच्चाटन करून विश्वबंधुत्वाच्या आधारावर उभारलेल्या लिंगायत धर्माला सांविधानिक मान्यता मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. स्वतंत्र धर्माचे आंदोलन आणि आरक्षणासाठीचा संघर्ष हा परस्पर विरूद्ध नसूनत्या पुरक आहेत. ज्याप्रमाणे बौद्धजैनशिख यांनी स्वतंत्र धर्माची सांविधानिक मान्यता मिळविली असूनही आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्याप्रमाणे त्या दोन्हीचा लाभ घेण्याचा अधिकार लिंगायतांना आहे. ही सत्यता लिंगायतांनी जाणून घेतली पाहिजे.

त्यासाठीच ऐतिहासिक अशा बसवकल्याणमध्ये प्रथमच राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. व मार्च रोजी बसवकल्याण येथील थेर मैदानात आयोजित या अधिवेशनात लिंगायत धर्मइतिहासपरंपरासाहित्यसंस्कृतीलिंगायत समाजाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल या महत्वपूर्ण विषयांवर अभ्यासकसाहित्यिकलेखकविचारवंत व विविध मठांचे मठाधीश मार्गदर्शन करतील. याशिवाय अधिवेशनात महिला सत्रयुवा सत्रांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावेळी देशातील विविध राज्य व विदेशातील लिंगायत बांधव सहभागी होणार आहेत. तसेच आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या सर्व पोटजातींतील समाज बांधवही उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात येणार असून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन  संजय हिरेकर केंद्रीय समन्वयक राष्ट्रीय लिंगायत संघ,राजशेखर तंबाके उपाध्यक्ष राष्ट्रीय लिंगायत संघ सागर कस्तुरे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख ,आणि जागतिक लिंगायत महासभा यांच्या वतीने करण्यात  आले.यावेळी पत्रकार परिषदेसाठी शिवानंद डुबल,राजीव खलीपे ,रवींद्र वाकडे,सतीश बेडके, उदय हिंगमीरे /भैया,गणेश हिंगमीरे,गुरुनाथ कचरे, राजेंद्र भादुले,रविंद्र मुंढेकर ,संदीप मुंढेकर, नंदकुमार बटाणे, अशोक ससुंदी, प्रमोद तोडकर, स्नेहल तोडकर, दिलिप महाजन, संजय शेटे (तात्या ),प्रमोद तोडकर,प्रमोद सुकरे,उदय महाजन कोकरूड ,सौ नंदादेवी विभूते,सौ अश्विनी आबांली, सौ मनीषा बटाणे,सौ उषाताई चौत्रे, सौ साधना राजमाने,सौ स्नेहल तोडकर आणि इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते







Monday, February 13, 2023

लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यां सरलाताई पाटील यांचा जीवनसंघर्ष प्रेरणादायी आमदार- सतेज पाटील "आधारवड" पुस्तक प्रकाशन सोहळा

 लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यां सरलाताई  पाटील यांचा जीवनसंघर्ष प्रेरणादायी  आमदार- सतेज पाटील

"आधारवड" पुस्तक प्रकाशन सोहळा



लिंगायत समाजाच्या कार्यकर्त्यां सरलाताई  पाटील यांचा जीवनसंघर्ष प्रेरणादायी  आमदार- सतेज पाटील
"आधारवड" पुस्तक प्रकाशन सोहळा




सातारा दि  13 :- रविंद्र वाकडे  प्रतिनिधी  ,
कोल्हापूर येथील लिंगायत समाजातील ज्येष्ठ सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या सरलाताई पाटील यांचे विचार आणि जीवनसंघर्ष नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत,असे मत आमदार सतेज पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केले.




 सरलाताई पाटील यांच्या जीवन चरित्रावर आधारीत 'आधारवड' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. हॉटेल विकसर फर्न येथे झालेल्या या कार्यक्रमास आ. विनय कोरे, प्रा. डी. यु. पवार, काकासाहेब कोयटे आदी उपस्थित होते.सतेज पाटील म्हणाले, सरलाताईंनी लिंगायत समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. काँग्रेसमध्येही त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. अनेक सामाजिक कामे केली. पदरमोड करून लोकांना मदत केली आहे. आ.सरलाताईंना काँग्रेसने काय दिले? : आ. कोरे म्हणाले सरलाताईंच्या कुटुंबियांचा कॉंग्रेसमध्ये मोठा दबदवा होता. उमेदवारी कोणाला द्यायची हे त्यांच्या कुटूंबातून ठरत होते. सरलाताईंचे त्यांच्या वडिलांवर खूप प्रेम असल्यानेच त्यांचे काँग्रेसवरही प्रेम आहे. सतेज पाटील माझे मित्र आहेत. त्यांची अडचण मला करायची नाही.



  पण काँग्रेसने सरलाताईंना काय दिले, असा टोलाही आ. कोरे यांनी यावेळी लगावला.शिवप्रसाद पाटील यांनी स्वागत केले. अमरदीप पाटील यांनी प्रास्तविक केले.सूत्रसंचालन निनाद काळे यांनी केले. लेखिका सविता नाबर यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली.

Tuesday, February 7, 2023

बसव कल्याण मध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन.

 बसव कल्याण मध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन.



बसव कल्याण मध्ये होणार दोन दिवसीय प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन.

                                                   

    सातारा दि  7 :- रविंद्र वाकडे   प्रतिनिधी 

जागतिक लिंगायत महासभा आणि सर्व बसवतत्त्व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ४  व ५ मार्च रोजी बसवकल्याण (कर्नाटक) येथे प्रथम राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती जागतिक लिंगायत महासभेद्वारे देण्यात आली आहे. 

जागतिक लिंगायत महासभेद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, १२ व्या शतकातील बसवादी शरणांचा त्याग व बलिदानाच्या समग्र क्रांती गर्भातून उगम पावलेला धर्म म्हणजे लिंगायत धर्म होय. लिंगभेद, जातीभेद, वर्गभेद याचे समूळ उच्चाटन करून विश्वबंधुत्वाच्या आधारावर उभारलेल्या लिंगायत धर्माला सांविधानिक मान्यता मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. स्वतंत्र धर्माचे आंदोलन आणि आरक्षणासाठीचा संघर्ष हा परस्पर विरूद्ध नसून, त्या पुरक आहेत. ज्याप्रमाणे बौद्ध, जैन, शिख यांनी स्वतंत्र धर्माची सांविधानिक मान्यता मिळविली असूनही आरक्षणाचा लाभ घेत आहेत. त्याप्रमाणे त्या दोन्हीचा लाभ घेण्याचा अधिकार लिंगायतांना आहे. ही सत्यता लिंगायतांनी जाणून घेतली पाहिजे. 

                      


त्यासाठीच ऐतिहासिक अशा बसवकल्याणमध्ये प्रथमच राष्ट्रीय लिंगायत महाअधिवेशन आयोजित करण्यात येत आहे. 4 व 5 मार्च रोजी बसवकल्याण येथील थेर मैदानात आयोजित या अधिवेशनात लिंगायत धर्म, इतिहास, परंपरा, साहित्य, संस्कृती, लिंगायत समाजाची सद्यस्थिती आणि भविष्यातील वाटचाल या महत्वपूर्ण विषयांवर अभ्यासक, साहित्यिक, लेखक, विचारवंत व विविध मठांचे मठाधीश मार्गदर्शन करतील. याशिवाय अधिवेशनात महिला सत्र, युवा सत्रांचा देखील समावेश करण्यात आला आहे. यावेळी देशातील विविध राज्य व विदेशातील लिंगायत बांधव सहभागी होणार आहेत. तसेच आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या सर्व पोटजातींतील समाज बांधवही उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात अभ्यासपूर्ण चर्चा करण्यात येणार असून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने या अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन जागतिक लिंगायत महासभेद्वारे करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी   बसवराज धनुरू ९४४८१४९४०१,राजशेखर तंबाके 9422414077या नंबरवर संपर्क साधावा.



Monday, February 6, 2023

महात्मा बसवेश्‍वरांच्या विचारांच्या प्रसारासाठी सर्व माध्यमांचा वापर करावा प्रा.सुदर्शनराव बिरादार.

  महात्मा बसवेश्‍वरांच्या विचारांच्या प्रसारासाठी सर्व माध्यमांचा वापर करावा प्रा.सुदर्शनराव बिरादार.

महात्मा बसवेश्‍वरांच्या विचारांच्या प्रसारासाठी सर्व माध्यमांचा वापर करावा प्रा.सुदर्शनराव बिरादार.

                                                 

निलंगा दि 5  :- प्रतिनिधी 

 बाराव्या शतकातील महान समाजसुधारक महात्मा बसवेश्‍वरांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करायचा असेल तर सर्व माध्यमांचा वापर करावा लागेल असे लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी निलंगा येथे लिंगायत महासंघाच्यावतीने संगन्नबसव मठात आयोजित समग्र महात्मा बसवेश्‍वर ग्रंथ वितरण सोहळ्यात बोलताना प्रतिपादन केले. 

ते पुढे म्हणाले बाराव्या शतकातील महान समाजसुधारक असलेल्या महात्मा बसवेश्‍वरांचे अनेक क्षेत्रात खुप मोलाचे कार्य आहे. जगातल्या विचारवंताच्या पंक्तीत सर्वात वरचे त्यांचे स्थान आहे. त्यांनी सांगितलेले कायक, दासोह, इष्टलिंगाचे महत्वही खूप मोलाचे असून त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहचण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करावा लागेल. त्याचाच भाग म्हणून समग्र महात्मा बसवेश्‍वर या ग्रंथाची निर्मिती मी केली आहे. देशपातळीवर महात्मा बसवेश्‍वरांचा प्रसार करणारी, संशोधन करणारी, माहिती देणारी बसव मिशन संस्था असायला पाहिजे. तसेच बसव विचारावर चालणारे लोक दिसले पाहिजेत तरच त्याचे अनुकरण होईल. त्यासाठीही प्रयत्न होणे गरजेचे आहे. 

समग्र महात्मा बसवेश्‍वर या ग्रंथाच्या 108 प्रतीच्या मोफत वितरण सोहळा कार्यक्रमासाठी निलंगा येथील विरक्त मठाचे संगन्नबसवण्ण महास्वामी तसेच प्रमुख पाहूणे म्हणून प्राचार्य डॉ.एम.एस.दडगे, डॉ.श्रीधर अहंकारी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, प्रा.डॉ.गजेंद्र तरंगे, पंचायत समिती सदस्य गोकार्णा पाटील, डॉ.अरविंद भातांब्रे, डॉ.विक्रम कुडूंबले, कमलाकर डोके, तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे, लातूर शहर सरचिटणीस लिंगेश्‍वर बिरादार, देवणी शहराध्यक्ष विजयकुमार लुल्ले, पृथ्वीराज जीवणे तसेच शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष निळकंठ शिवणे आदिंची उपस्थिती होती. यावेळी 128 जणांना मोफत ग्रंथाचे वाटप करण्यात आले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत महासंघाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे, सरचिटणीस अशोक काडादी, शहराध्यक्ष डॉ.मन्मथ गताटे, एन.आर.स्वामी, एम.एम.बिरादार, सुर्यकांतअप्पा पत्रे, नागनाथप्पा निला, नागनाथ स्वामी, राजप्पा वारद, दिलीप रंडाळे, गदगेअप्पा भुसनूरे, दत्ता कल्लप्पा बिरादार, शिवाप्पा भुरके, रामेश्‍वर तेली, विलास व्होनाळे, अप्पासाहेब बिरादार, बुध्दीवंत मुळे, करीबसवेश्‍वर पाटील, रत्नेश्‍वर गताटे, श्रीकांत आष्टुरे, अमर मुगावे, बसवराज बसपूरे तसेच लिंगायत महासंघाच्या महिला अध्यक्षा सौ.संगीता गडवंते, उपाध्यक्ष वैशाली व्होनाळे, सचिव गुणवंती गताटे आदिंनी परिश्रम घेतले.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार किशन कोलते यांनी मानले.



Sunday, February 5, 2023

श्री महादेव देव देवस्थान ट्रस्ट व तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर, वीरशैव लिंगायत समाज आणि अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महादेव मंदिर सातारा येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

 श्री महादेव देव देवस्थान ट्रस्ट व तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर, वीरशैव लिंगायत समाज आणि अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमाने  महादेव मंदिर सातारा येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. 



श्री महादेव देव देवस्थान ट्रस्ट व तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर, वीरशैव लिंगायत समाज आणि अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमाने  महादेव मंदिर सातारा येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. 



  सातारा दि ६  :- प्रतिनिधी महादेव मेंडगिरी 

श्री महादेव देव देवस्थान ट्रस्ट व तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर, वीरशैव लिंगायत समाज आणि अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ  यांच्या संयुक्त विद्यमाने  महादेव मंदिर सातारा येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. 

         श्री महादेव देव देवस्थान ट्रस्ट व तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने वीरशैव लिंगायत समाज आणि अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ सातारा यांच्या सहकार्याने 153रविवारपेठ, सातारा महादेव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भजन, सामूहिक नरजन्मरहस्य ग्रंथ पारायण, प्रवचन आणि अभिषेक बिल्वार्चन शिवदीक्षा महामंगलारती वगैरे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत .शिवदीक्षा घेण्यासाठी  आधिक माहिती संपर्क करावा  श्रीनिवास कामळे  सातारा मो.--९३७३४५१४१८

शुक्रवार दिनांक 17/02/2023रोजी दुपारी 2ते5 सामूहिक पारायण, गुरुवर्य श्री ष ब्र प्र 108 पद्मभास्कर डॉक्टर नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वरमहाराज यांचे आशीर्वचन,शनिवार दिनांक 18/02/2023स८ते११अभिषेक बिल्वार्चन, शिवदीक्षा महामंगलारती फराळ दूध प्रसाद वाटप.

तसेच रविवार दिनांक 19/02/2023 रोजी सायंकाळी ४वाजता महिला मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम व महाप्रसाद

डबाभोजन‌.चे आयीजन करण्यात आले असून समाज बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन, श्री तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर वीरशैव लिंगायत समाज आणि अक्कमहादेवी महिला भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.


जागतिक लिंगायत महासभा बेंगलोरच्या वतीने दिनांक चार व पाच मार्च रोजी बसवकल्याण (जि. बिदर) येथे प्रथम लिंगायत धर्म महाअधिवेशन.

 जागतिक लिंगायत महासभा बेंगलोरच्या वतीने दिनांक चार व पाच मार्च रोजी बसवकल्याण (जि. बिदर) येथे प्रथम लिंगायत धर्म महाअधिवेशन.


जागतिक लिंगायत महासभा बेंगलोरच्या वतीने दिनांक चार व पाच मार्च रोजी बसवकल्याण (जि. बिदर) येथे प्रथम लिंगायत धर्म महाअधिवेशन.

                                                        

सातारा दि 5  ;- रविंद्र  वाकडे  प्रतिनिधी 

जागतिक लिंगायत महासभा बेंगलोरच्या वतीने दिनांक चार व पाच मार्च रोजी बसवकल्याण (जि. बिदर) येथे प्रथम लिंगायत धर्म महाअधिवेशन आयोजित केले आहे.

     या महाअधिवेशनात प्रत्येक गावातील सर्व समाज बांधवांनी सहभागी होण्याचे नियोजन करण्याचे ठरले. यासंदर्भात माहिती देण्यासाठी लिंगायत धर्म महासभेच्या सांगली व कोल्हापूर जिल्हा कोअर कमिटी आणि तालुकाध्यक्ष यांची मीटिंग जयसिंगपूर येथे पार पडली. यावेळी सोलापूर येथील श्री सिद्धरामेश्वर,  बसवकल्याण येथील महात्मा बसवांना,  जगनमता अक्कमहादेवी,  श्री अल्लमप्रभूदेव, अक्कनगलंबिका,   चन्नबसवेश्वर, मडिवाळ माचीदेव, आंबिगर चौडया आदीसह शरण स्थळांची आणि अनुभव मंडप विषयी माहिती कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पिंपळे यांनी दिली.

      जागतिक लिंगायत महासभेच्या वतीने आयोजित या महाअधिवेशनाची माहिती राज्य सरचिटणीस बी. एस. पाटील यांनी दिली. तसेच उपस्थित सर्वांनी आपल्या भागामध्ये, प्रत्येक गावामध्ये किमान एक लक्झरी करण्याचा निर्णय जाहीर केला.

       कोल्हापूर जिल्ह्यातून किमान दहा हजार शरण बांधव या महाधिवेशनात सहभागी होण्याचे नियोजन करण्याचे ठरले. तसेच सांगली जिल्ह्यातूनही किमान दहा हजार शरण बांधव या महाअधिवेशनात सहभागी होण्यासाठी नियोजन करण्याचे ठरले. 

      या नियोजन बैठकीस लिंगायत धर्म महासभेच्या महिला राज्य अध्यक्षा श्रीमती वैशाली दिलीप पाटील,  महिला राज्य सरचिटणीस सौ. रश्मी अशोक चौगुले, सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल बापू कोठावळे, महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्रीदेवी संजय कबाडे, महिला मिरज तालुकाध्यक्षा श्रीमती जयश्री दीपक खिलारे, शिरोळ महिला तालुकाध्यक्षा सौ. सारिका शिवप्रभू आवटी, कोल्हापूर जिल्हा सचिव संजय पानदारे आदी सह सांगली व कोल्हापूर जिल्हा कोअर कमिटी सदस्य उपस्थित होते.



Wednesday, February 1, 2023

श्री तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर मठाचे 33 वे नूतन उत्तराधिकारी म्हणून श्री आदिराज शिवाचार्य यांची रितसर दत्तक पत्रान्वये नियुक्ती. तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान क्षेत्र धारेश्वर ,पाटण येथे आज ष ब्र प्र १०८ पद्मभास्कर डाॅ निलकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचा ३८वा पिठारोहन वर्धापन दिन आणि तिलकोत्सव व दत्तक विधान सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा.

 श्री  तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर  मठाचे  33 वे नूतन  उत्तराधिकारी म्हणून श्री आदिराज शिवाचार्य यांची रितसर दत्तक पत्रान्वये नियुक्ती.  तीर्थक्षेत्र आदिमठ  संस्थान  क्षेत्र धारेश्वर ,पाटण येथे आज ष ब्र प्र १०८ पद्मभास्कर डाॅ निलकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचा ३८वा  पिठारोहन  वर्धापन दिन आणि   तिलकोत्सव व दत्तक विधान  सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा.



श्री  तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर  मठाचे  33 वे नूतन  उत्तराधिकारी म्हणून श्री आदिराज शिवाचार्य यांची रितसर दत्तक पत्रान्वये नियुक्ती.  तीर्थक्षेत्र आदिमठ  संस्थान  क्षेत्र धारेश्वर ,पाटण येथे आज ष ब्र प्र १०८ पद्मभास्कर डाॅ निलकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांचा ३८वा  पिठारोहन  वर्धापन दिन आणि   तिलकोत्सव व दत्तक विधान  सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा.



पाटण , दि.1 - रवी वाकडे

श्री तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थांन धारेश्र्वर मठाचे 33 वे नूतन उत्तराधिकारी म्हणून  रितसर दत्तक पत्र करून श्री आदीराज शिवाचार्य  यांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती हजारो भाविकांच्या साक्षीने करण्यात आली. हा धार्मिक सोहळा अतिशय  उस्ताहात संपन्न  झाला.

त्यानुसार श्री  आदीराज शिवाचार्य यांचे नाव अधिकृत रित्या जाहीर करण्यात आले.  महाराष्ट्रामधील लाखो  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदिमठ धारेश्वर (पाटण/ सातारा ) मठाला नवे शिवाचार्य  अशा रितीने जाहीर करण्यात आले. पाटण तालुक्यातील धारेश्वर मठ येथे हजारो भाविकांच्या साक्षीने हा धार्मिक सोहळा मंगळवारी दि. 31 जानेवारी रोजी संपूर्ण दिवसभर  मोठ्या उस्ताहात संपन्न झाला .

श्री धारेश्वर मठाचे  नूतन उत्तराधिकारी  श्री आदीराज शिवाचार्य हे  केवळ 14 वर्षाचे असून २१ वर्षानंतर त्यांचे  सर्व धार्मिक शिक्षण पूर्ण  झाले नंतर  ते सर्व धार्मिक विधीत सहभागी होणार आहेत. या उत्तराधिकारी सोहळ्यास अनेक महाराज, साधू, संत, महंत व शिवाचार्य उपस्थित होते. हजारो भाविकांच्या साक्षीने हा धार्मिक सोहळा संपन्न झाला.  नूतन उत्तर अधिकारी यांचा तिलकरोहन तथा दत्तक विधान असा दैदिप्यमान सोहळा अनेक धार्मिक विधींनी संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये अनेक शिवाचार्य संत महंत उपस्थित होते .विशेष म्हणजे श्री गुरु मंहंत्तया रविशंकर शिवाचार्य महास्वामीजी रायपाटणकर यांच्या दैवत साक्षीने हा कार्यक्रम संपन्न झाला .या कार्यक्रमांमध्ये श्री वाळवेकर महाराज ,श्री माढेकरकर महाराज,श्री परंडकर महाराज तसेच  अनेक साधूसंत उपस्थित होते. अध्यक्ष श्री. बाळलिंग स्वामी मुंबई,सचिव श्री. रमेश स्वामी, मुंबई यांचे माहेश्वर वैदिक मंडळ, मुंबई व इतर स्वामीच्या  वेद व मंत्र घोषात  हा  कार्यक्रम संपन्न झाला.

श्री धारेश्र्वर मठ येथे श्रीराम, पांडव यांचा अधिवास असल्याचे ऐतिहासिक दाखले दिले जातात. या मठात  विविध प्रकारच्या धर्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते असते.श्री धारेश्वर मठ निसर्गाच्या सानिध्यात आहे. याठिकाणी बारमाही डोंगरातून पाणी वाहत असते. लिंगायत समाजातील अनेक वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...