Tuesday, December 27, 2022

ग्लोबल बिझनेस काॅनक्लेव्ह चे बेंगलोर येथे 20 ते 22 जानेवारी 2023 रोजी आयोजन

 

ग्लोबल बिझनेस काॅनक्लेव्ह  चे बेंगलोर येथे 20 ते 22 जानेवारी 2023 रोजी आयोजन 



ग्लोबल बिझनेस काॅनक्लेव्ह  चे बेंगलोर येथे 20 ते 22 जानेवारी 2023 रोजी आयोजन 



सातारा, दि.28 -  रविंद्र वाकडे.

  वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( VIA)वीरशैव लिंगायत समाजाच्या एकमेव अशा आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनेच्या वतीने लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे व लिंगायत भुषण मा.सुनीलशेठ रुकारी यांच्या मार्गदर्शनाखाली

 महाराष्ट्रात आतापर्यंत 8 बिझनेस एक्स्पो, व्यवसाय मार्गदर्शन शिबीरे, नोकरी मेळावे आयोजित केले गेले आहेत व आता महाराष्ट्रातील उद्योजक, व्यापारी,शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, होतकरू तरुण, तरुणी यांच्यासाठी जगभरातील वीरशैव लिंगायत उद्योगपती,साॅफ्टवेअर कंपनीचे सीईओ,ॲग्री एक्सपर्ट , एज्युकेशन स्टार्टअप कंपनी या व इतर अनेक क्षेत्रातील दिग्गज उद्योजकांना भेटण्याची व त्यांचे विचार ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्या येत आहे.




 वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनने आएलवायएफ,बसव समिती, वीरशैव समाज ऑफ अमेरिका,एआयव्हीएम,या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वीरशैव लिंगायत संघटनांना बरोबर घेऊन बेंगलोर येथे लिंगायत समाजाच्या इतिहासात पहिल्यांदाच  आंतरराष्ट्रीय बिझनेस समिटचे, बेंगलोर येथे शुक्रवार, दि 20 ,शनिवार 21 व रविवार दि. 22 जानेवारी 2023 रोजी आयोजण केले गेले आहे.* 


 यात जगभरातील प्रमुख अशा  उद्योजकांचे 300 स्टाॅल्स असणार आहेत व यातून एकमेकांना व्यापार करण्यासाठी मोठी बाजारपेठ व नवीन व्यावसायिक संधी निर्माण करून दिली जाणार आहे.


 या ऐतिहासिक व भव्यदिव्य अशा कार्यक्रमात सहभागी होणें साठी व अधिक माहितीसाठी कृपया मा.प्रदिप साखरे ,वर्किंग कमिटी,ग्लोबल बिझनेस काँनक्लेव,बेंगलोर मा.अध्यक्ष व्हाया युथवींग 9923610610 व मा. पी.आय.गुड्डिमठ, वर्किंग कमिटी,ग्लोबल बिझनेस कॉनक्लेव्ह बेंगलोर ,जनरल सेक्रेटरी ' व्हाया '9850441438 यांचेशी संपर्क साधावा.असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



या कार्यक्रमात मा.बाबासाहेब कल्याणी,डॉ.विजय संकेश्र्वर ,डॉ.अजयकुमार, डॉ. शामनुरू शिवशंकराप्पा,डॉ.प्रभाकर कोरे, मा.जगदिश शेट्टर, मा.लक्ष्मण सावदी, मा.मुर्गेश आर. निराणी , मा.अरविंद जत्ती, मा.ईश्वर खंद्रे, मा.एम.बी.पाटील, मा.आण्णासाहेब एस. जोल्ले, मा.शिवकुमार उडसी, मा.अरविंद बेल्लाद, मा.बी. वाय.विजयेंद्र, मा.ओमप्रकाश कोयटे, मा.सुनील रुकारी,नवीन कोट्टीगे, मा.संतोष केनचेंबा, मा.नेत्रावती चेन्नमा या मार्गदर्शकांचे  विशेष मार्गदर्शन लाभणार आहे.**

पिंपरी चिंचवड व पुणे लिंगायत समाज आयोजित आगळावेगळा मोफत वधू-वर पालक मेळावा संपन्न

 

पिंपरी चिंचवड व पुणे लिंगायत समाज आयोजित आगळावेगळा मोफत वधू-वर पालक मेळावा  संपन्न.


 पिंपरी चिंचवड व पुणे लिंगायत समाज आयोजित आगळावेगळा मोफत वधू-वर पालक मेळावा  संपन्न.


सातारा, दि.27 - रविंद्र वाकडे.

 समस्त पिंपरी - चिंचवड व पुणे लिंगायत समाजातर्फे खास आगळा-वेगळा  मोफत वधू - वर पालक परिचय मेळावा व इंटरॅक्शन मीटिंग चे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविवार दि.25.12.2022 रोजी सकाळी 10 ते संध्या.4 या वेळेत पार पडला.या वेळी सकाळी 10 ते 11 या वेळेत मोफत नाव नोंदणी करण्यात आली.त्यानंतर 11 ते 1 वधू - वर परिचय करून देण्यात आला. दु.1 ते 2 भोजन आयोजित करण्यात आले.त्यानंतर पुन्हा दु.2 ते 4 वधू - वर परिचय करून देण्यात आला.


पिंपरी - चिंचवड व पुणे लिंगायत समाजातर्फे खास आगळा-वेगळा  मोफत वधू - वर पालक परिचय मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ.अशोक नगरकर



या मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही.तसेच कोणत्याही पोटजातीचा विचार न करता सर्वजण एकाच छताखाली  एकत्र आले.वधू - वर किंवा पालक या पैकी कोणाही एकास उपस्थित राहण्याची परवानगी देवून कार्यक्रमात सुलभता आणण्यात आली.या कार्यक्रमाला कोणीही प्रमुख पाहुणे त्यांचे भाषण ,उपदेश अथवा संदेश यासाठी मौल्यवान वेळ वाया घालवण्यात आला नाही.मुलगा,मुलगी किंवा पालक यांनी स्वतः पुढे येवून स्वतःची  माहिती दिली. या सर्व परीचायासाठी केवळ 4 तासांचा वेळ देण्यात आला.सर्व जणांनी आपले परीचयपत्र  मोबाईल व्हॉट्सअप ग्रुपवर सरळ दाखल केले.दुपारी 1 ते 2 या वेळेत नाममात्र शुल्क रु.70 मध्ये कूपन योजनेप्रमाणे अनलिमिटेड भोजन व्यवस्था आयोजित करण्यात आली होती.एका रजिस्टर वही मध्ये सर्वांची नावे व पत्ता ,फोन नंबर्स सह नोंद केली जावून त्याचा फोटो व्हॉट्सॲप वर शेअर केला गेला. या सर्व उपस्थितांचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला जाऊन त्यावर सरळ बायोडाटा टाकण्यास परवानगी देण्यात आली.

हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या अशा मध्यवर्ती निसर्गरम्य पार्श्वभूमीवर श्री मल्लिकार्जुन मंदिर  हॉल,आकुर्डी स्टेशन जवळ,बिजली नगर पूला शेजारी ,आकुर्डी प्राधिकरण पुणे येथे आयोजित करण्यात आला.या ठिकाणी पार्किंग साठी प्रशस्त जागा उपलब्ध होती.मेळाव्याच्या विशेष माहितीसाठी डॉ.अशोक नगरकर 9823164918,श्री. चंद्रशेखर दलाल 9423239582,श्री.सुरेश वाळके 8698203488,श्री.सुरेश लिंगायत 9146091122,श्री.नरसिंह मुळे 9850160586,श्री.बसवराज कुल्लोळी,श्री.बसवराज कणजे ,श्री.दत्ता बहिरवाडे ,श्री.संतोष पताटे,श्री प्रकाश डिकोळे ,श्री.चंद्रशेखर खोचरे,श्री.संगमेश्वर शिवपुजे,श्री.भीमराव येरेगे यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास श्री नागेश देगील,श्री.बालाजी पाटील,श्री.योगेश तोडकर यांनी विशेष सहकार्य केले.तसेच या कार्यक्रमाला समस्त लिंगायत समाज,पिंपरी - चिंचवड.श्री.मल्लिकार्जुन प्रतिष्ठान ,आकुर्डी.बसववादी सोशल फाउंडेशन,चिंचवड.भारतीय समतावादी पक्ष,बसव सेवा प्रतिष्ठान,सिंहगड रोड.लिंगायत सेवा मंडळ,हडपसर.राष्ट्रीय बसव दल,भोसरी,पुणे.बसव सेवा प्रतिष्ठान,सिंहगड रोड. म.बसवेश्वर जनसेवा प्रतिष्ठान,कात्रज.शिवयोगी प्रतिष्ठान , विश्रांतवाडी.लिंगायत समाज,आळंदी.लिंगायत समाज, तळेगाव - दाभाडे.लिंगायत परिषद ,पुणे,शिवयोगी प्रतिष्ठान ,धानोरी. म.बसवेश्वर प्रतिष्ठान,कात्रज,पुणे.लिंगायत सेवा मंडळ,हडपसर यांच्या भरघोस शुभेच्छा प्राप्त झाल्या.

 मागील व या मेळाव्यास उपस्थित असलेल्या सर्व ग्रुप मेंबर्स चे नाव व फोन नंबर यांचे एक बुकलेट तयार करण्यात आले असून,ते व्हॉट्स ॲप ग्रूप वर ॲड करण्यात आले आहे.त्याचा उपयोग सर्वांना होईल.सकाळी बरोबर 10.30 ला सुरू झालेला मेळावा संध्याकाळी 4.30 वा.संपला.या मेळाव्याला अतिशय अभूतपूर्व असे यश मिळाले.एकूण 700 मेंबर्सनी आपआपले बायोडाटे दाखल केले.अतिशय सुसूत्रपणे पालकांनी व उमेदवारांनी आपली नाव नोंदणी येथे केली.स्कॅन सिस्टीम द्वारे उमेदवाराला अतिशय कमी वेळात ग्रुप मध्ये ॲड करण्यात आले.सर्वांनी आपले बायोडाटे ग्रुप मध्ये तात्काळ दाखल करून हा पेपर लेस मेळावा संपन्न करण्यास मोठा हातभार लावला.

याच पद्धतीने सर्व कार्यक्रमामध्ये नाव नोंदणी झालेल्या क्रमांका नुसार प्रत्येक उमेदवार व पालक यांनी पुढे व्यासपीठावर येवून उत्कृष्ठ ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे आपली माहिती उपस्थित सर्वांसमोर सादर केली.ती उपस्थित सर्वांनी अतिशय शांत पणे ऐकून मोठे सहकार्य केले.

  या कार्यक्रमाच्या अगदी सुरुवातीलाच अगदी थोडक्यात मा. शिवाजी साखरे, मा.धोंडेराज माळी, मा.चंद्रशेखर दलाल, मा.नारायण बहिरवाडे  साहेब , मा.अण्णाराव बिराजदार साहेब, मा. सुरेशजी वाळके यांनी शुभेच्छा संदेश दिले.डॉ.अशोक नगरकर यांनी कार्यक्रमाची रूपरेषा व सर्व मेंबर्सनी बायोडाटे कसे अपलोड करावेत तसेच कार्यक्रमाचे प्रयोजन - आयोजन व नियोजन यांची सखोल माहिती उपस्थितांना दिली.कार्यक्रमाचा संपूर्ण दिवस मा. सुरेशजी लिंगायत यांनी उत्कृष्ठ सूत्रसंचालन केले.तसेच शरण संगमेश्वर शिवपुजे,भीमराव येरगे, हंचे साहेब व इतर सर्व मान्यवरांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनापासून परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानापन्न असणाऱ्या शुभ रंगाच्या जगज्योती म.बसवेश्वर यांच्या मूर्तीचे पूजन पुष्पहार अर्पण करण्यात आला.ही मुर्ती इंजिनियर नरसिंह मुळे यांनी उपलब्ध करून दिली होती.तसेच त्यांनी या कार्यक्रमाचे डिजिटल बॅनर पण उपलब्ध करून दिले.या कार्यक्रमामध्ये सौ.अंकिता देगी ल,श्री.नागेश देगील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.' लिंगायत समाजातील पोटजात सोडा व लिंगायत जोडा ' या उक्तीप्रमाणे या दांपत्याने क्रांतिकारक विवाह करून सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे.

इंजिनीयर योगेश तोडकरी,नागेश देगील,अंकिता देगील,संगमेश्वर शिवपपुजे,भीमराव येरगे यांनी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींची नोंदणी करण्याची व्यवस्था अतिशय चोखपणे पार पाडली.त्यामुळे सर्वांचा' डेटा ' उपलब्ध झाला.लिंगायत समजातील प्रतिथयश व्यावसायिक श्री.धर्मगुत्ते सरांनी अत्यंत चांगल्या प्रकारे अनलिमिटेड स्वादिष्ट जेवण व चहा यांची व्यवस्था केवळ नाममात्र 70 रू.मध्ये कूपन सिस्टीम वर  उपलब्ध केली होती.त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळून  अतिशय शिस्तीत भोजन कार्यक्रम संप्पन्न झाला.या सात्विक रुचकर भोजनाचे सर्वांनी  खूप कौतुक केले.

या कार्यक्रमाचे काही निवडक फोटो व बुकलेट पीडीएफ फॉर्म मध्ये उपलब्ध करण्यात आले असून,त्याचा सुयोग्य वापर करून  सर्व पालक व वधू - वर यांचे फोन नंबर व माहिती उपलब्ध करून घेवून त्याद्वारे आपला विवाह योग जुळवावा अशी खात्री आयोजकांनी व्यक्त केली असून,हा एक सामाजिक सद्भावना या दृष्टिकोनातून केला गेलेला एक स्तुत्य प्रयत्न आहे.असे डॉ.अशोक नगरकर यांनी जाहीर करून या कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले.**

Sunday, December 25, 2022

शिखर शिंगणापूर येथील कोटी लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळ्याचा भूमीपूजन समारंभ संपन्न

  शिखर शिंगणापूर येथील कोटी  लिंगार्चन  व लक्ष भोजन सोहळ्याचा भूमीपूजन समारंभ  संपन्न 




शिखर शिंगणापूर येथील कोटी  लिंगार्चन  व लक्ष भोजन सोहळ्याचा भूमीपूजन समारंभ  संपन्न 




सातारा, दि.26  -  प्रा.अजय शेटे.

    तीर्थक्षेत्र फाऊंडेशन तर्फे शिखर शिंगणापूरच्या पावन भूमी मध्ये महाशिवरात्र पर्वकाळ गुरूवार दि.16 फेब्रुवारी ते  सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी कोटी लिंगार्चन व लक्षभोजन सोहळा आयोजित केला गेला आहे.या भव्य सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ रविवार दि.25.12.2022 रोजी दु.1 ते 4 या वेळेत विविध संत महात्म्यांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला .


                              

हा भूमीपूजन समारंभ प. पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी ,श्री काशी महापीठ ,वाराणसी यांच्या शुभहस्ते संप्पन्न झाला .यावेळी त्यांच्या समवेत प.पू. श्री ष ब्र 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज ( मठाधिपती शिखर शिंगणापूर ), प.पू.श्री. व. ब्र .108 सद्गुरू महादेव शिवाचार्य स्वामीजी,वाई (वाईकर महाराज) पू.श्री. ष. ब्र.108 पद्म भास्कर डॉ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज ,तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान , धारेश्वर मठ , धारेश्वर.श्री. प. ब्र.108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान, बेळंकी. (बेळंकीकर महाराज ), प.पू.मन्ना महाराज या  वीरतपस्वी व तपोरत्न महाराज यांच्या उपस्थितीत संप्पन्न झाला.

                                  


प.पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्र्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रथमच श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर नगरी मध्ये आगमन झाल्या मुळे भव्य मिरवणूक व शोभायात्रा  आयोजित करण्यात आली व त्यांच्या हस्ते श्री शंभू महादेवास अभिषेक करण्यात आला. त्यानंतर  'उमाबन ' येथील प्रशस्त जागेत भूमीपूजन करण्यात येवून कुदळ मारण्यात आली.  श्री.मोहन बडवे , मा.अध्यक्ष ,तीर्थक्षेत्र फाउंडेशन , मा. शेखरजी मुंदडा , मा.स्वागताध्यक्ष कोटी लिंगार्चन सोहळा ,समस्त वीरशैव लिंगायत समाज ,शिखर शिंगणापूर व समस्त ग्रामस्थ शिखर शिंगणापूर,श्री.मंदार बडवे,चिन्मय बडवे ,नागेश बडवे,अक्षय महाराज भोसले,आनंद कुलकर्णी,बाळासाहेब खाडे,वीरभद्र कावडे,  शितल बडवे  , अनिल बडवे,शिवकुमार शास्त्री , संदिप खाडे यांनी कार्यक्रमाचे अतिशय नेटके नियोजन केले होते.सर्वांचा अतिशय यथोचित असा सत्कार करण्यात आला.

श्री प.पू. निळकंठ शिवाचार्य धारेश्वर स्वामी महाराज यांनी सर्व पंचाचारा मधील जंगम पूजन व त्याचे महात्म्य अतिशय अभ्यासपूर्ण व ज्ञानपूर्ण रितीने कथन केले.


                                 


यानंतर जगद्गुरु मल्लिकार्जुन महास्वामीजी आपल्या भाषणात  म्हणाले की,तीर्थ क्षेत्र फाउंडेशन,शिखर शिंगणापूर यांनी या कार्यक्रमाचे खूप मोठे धनुष्य पेलले आहे.एखादे चांगले काम करताना अनेक समस्या उभ्या राहतात.परंतु येणाऱ्या सर्व समस्यांवर मात करण्याचे बळ श्री शंभू महादेव देईल.या सोहळ्यासाठी पूजन करण्यात येणाऱ्या प्रत्येक  'कंकर ' मध्ये श्री शंकर वसलेले असून,हे सर्व एक कोटी ' कंकर ' हे पवित्र अशा नर्मदा नदी मधून प्राप्त केले आहेत.त्याचे पूजन करण्याचे भाग्य अनेक भाग्यवान दाम्पत्यांना मिळणार आहे.शिवाय यावेळी लक्ष भोजन अन्नदान करण्यात येणार आहे.हे सर्वात मोठे पुण्याईचे काम आहे. याआधी असा कार्यक्रम फक्त कर्नाटक राज्यात झाला होता.परंतु तो सर्व प. पू.महाराज यांनी आयोजित केला होता.मात्र हा येथील कार्यक्रम हा सर्वसामान्य अशा सर्व नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला असून,याचे महत पुण्य सर्वांनी प्राप्त करून घ्यावे.

शिंगणापूर पोलीस स्टेशन चे पोलीस सब इन्स्पेक्टर मा.भुजबळ साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय चोख असा बंदोबस्त ठेवला होता .

या कार्यक्रमाला प्रा.नागनाथ स्वामी,  नंदकुमार खोत,गुरुलिंग स्वामी, लिंगराज साखरे,दिलीप ढोले, गुरुलींग तोडकर,अविनाश तोडकर,बसवेश्वर येवले,राजेंद्र शेटे,रविंद्र गाडवे , सुरेश म्हामणे श्रीकांत म्हामणे,सागर म्हामणे,उमेश कुलकर्णी व हजारो स्त्री - पुरुष भाविक भक्त हजर होते.


नव्या संसद भवनाला ' अनुभव मंटप अथवा बसवमंटप ' नाव देण्याची बसवप्रेमींची मागणी , पंतप्रधानांना निवेदने पाठवा - डाॅ.बसवराज बगले

 

नव्या संसद भवनाला ' अनुभव मंटप अथवा बसवमंटप ' नाव देण्याची बसवप्रेमींची मागणी , पंतप्रधानांना निवेदने पाठवा - डाॅ.बसवराज बगले 




नव्या संसद भवनाला ' अनुभव मंटप अथवा बसवमंटप ' नाव देण्याची बसवप्रेमींची मागणी , पंतप्रधानांना निवेदने पाठवा - डाॅ.बसवराज बगले 

           


     सोलापूर दि  25   :-  प्रतिनिधी 

 जगातील पहिल्या लोकशाही संसदेची मुहूर्तमेढ क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांनी केली. म्हणून दिल्लीत नव्याने निर्माण केलेल्या संसद भवनाला " अनुभव मंटप अथवा बसवमंटप " असे नामकरण करण्यात यावे,अशी मागणी देशातील सर्व समाजबांधवांनी आणि संघटनांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करावी असे आवाहन डाॅ.बसवराज बगले (सोलापूर ) यांनी केले आहे.




          बाराव्या शतकात म्हणजे हजारो वर्षांपूर्वी लोकशाही मूल्ये जपणाऱ्या निधर्मी समाज रचनेचा आरंभ 'अनुभव मंडपाच्या " रूपाने करून महात्मा बसवेश्वरांनी जगासमोर सर्वप्रथम एक आदर्श ठेवला.म्हणूनच ते जगातील " पहिले महात्मा " ठरले. मंगळवेढा प्रांतातील बिज्जळ राज्याचे प्रधानमंत्री झाल्यानंतर अनुभव मंटप या नावाने लोकशाही संकल्पनेचा शुभारंभ त्यांनी केला.सर्व धर्मियांना एकत्र करून निधर्मी तत्त्वज्ञानाची बीजे रोवली.जातीभेद नष्ट करण्याची समाजरचना मांडली,त्याच तत्वानुसार आज लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची ओळख निर्माण झाली आहे.

            अशा युगप्रवर्तकांचा वैचारिक ठेवा भविष्यात सदैव स्मरणात राहण्यासाठी दिल्लीत नव्याने बांधण्यात आलेल्या संसद भवनाला अनुभव मंटप अथवा बसवमंटप असे नामकरण झाले पाहिजे.यासाठी कर्नाटकातून खूप मोठ्या प्रमाणात उठाव सुरू झाला आहे.त्याची सुरूवात बसव तत्व प्रसारक धर्मगुरूंनी केली आहे.महाराष्ट्र,आंध्र, तेलंगणा,गोवा राज्यात खूप मोठ्या प्रमाणात वीरशैवांतील अठरापगड समाज बांधवासह लिंगायत आणि बसवप्रेमींकडून याबाबत पाठपुरावा होणे ही काळाची गरज आहे.      

              त्यासाठी समाजातील बसवप्रेमीं संघटनांनी आपली निवेदने पंतप्रधान कार्यालयास पाठवावीत.सर्व पक्षीय खासदार,आमदार,सर्व राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आणि ग्रामशाखेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रव्यवहाराची मोहीम गतीमान करावी. असे आवाहन महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले यांनी केले आहे.

Saturday, December 24, 2022

संघ - जनसंघ ते भाजपचा अभेद्य सेतू ,कै.वसंतराव नारायण शेटे यांचा 9 वा स्मृतिदिन.

 संघ - जनसंघ ते भाजपचा अभेद्य सेतू ,कै.वसंतराव नारायण शेटे यांचा 9 वा स्मृतिदिन.



संघ - जनसंघ ते भाजपचा अभेद्य सेतू ,कै.वसंतराव नारायण शेटे यांचा 9 वा स्मृतिदिन.



सातारा, दि.25 -रविंद्र वाकडे.  

 कै. मा. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती दिनीच मार्गशीर्ष गुरुवार  25 डिसेंबर  2013 दिवशीच कै.वसंतराव शेटे यांचे निधन झाले.हा एक दैवी योगायोगच होय.

 सन 1925 विजयादशमी ला रा. स्व.संघाची स्थापना नागपूर येथे डॉ.हेडगेवार यांनी केली. वडूजचे डॉ.आंबिके हे 1926 पासून त्यातील एक अनुयायी व त्यांच्याबरोबर पहिले स्वयंसेवक म्हणून कै.नारायण शेटे संघाशी संबंधित व्यक्ती.सुरुवातीला संघाची सुरुवात ही फक्त उत्सव साजरा करून झाली व त्या माध्यमातून देशप्रेमी विचार समाजात पसरू लागले होते.

4 जानेवारी 1924 रोजी वसंतराव शेटे यांचा जन्म झाला.रक्तातच वडिलार्जित देशप्रेमी संस्कार होते.7 वी पर्यंतचे शिक्षण औंध संस्थान मधून झाले.पुढील शिक्षण पूर्ण न होता वडिलार्जित किराणा व्यवसाय करावा लागला.

सन 1948 ला म.गांधी हत्याकांड झाले आणि त्यानंतर डॉ. आंबिके यांच्या हॉस्पिटलचे जळीतकांड झाले.शेटे कुटुंबाच्या घरावर सुद्धा त्यावेळी टांगती तलवार राहिली.नारायण शेटे आणि वसंतराव शेटे सलग 3 महिने  स्वतःच्या घराचा रात्रपहारा हत्यारे घेवून करत होते.शेवटी संकट टळले परंतु त्याचा परिणाम नारायण शेटे यांच्या तब्येतीवर होऊन हाय खावून त्यांचा पुढे लवकरच मृत्यू झाला.

डॉ.यशवंतराव पेठे हे कोकणातील गुहागर येथून नुकतेच  1950 साली येवून  कातरखटाव येथे वैद्यकीय व्यवसाय करत होते.स्वातंत्र्य सैनिक रामभाऊ आंबिके,वसंतराव शेटे,वसंतराव  कांबळे,विश्वनाथ येवले, भालचंद्र गोसावी,कृष्णात गाडवे यांनी विनंती करून त्यांना वडूज येथे वैद्यकीय व्यवसाय करण्यास आग्रह करून तालुक्यातील रुग्णांची मोठी सोय करून दिली.

डॉ.यशवंत पेठे व वसंतराव शेटे या जोडीने मिळून पुढे कांबळे,येवले,गाडवे कुटुंबाच्या सहकार्याने वडूज सह खटाव तालुक्यात अतिशय जोमाने संघ कार्य सुरू केले. कोळे व वडूज या सातारा जिल्ह्यातील सर्वात पहिल्या संघ शाखा ठरल्या. मा.उत्तमराव पाटील,विश्वास गांगुर्डे यांच्याबरोबर प.महाराष्ट्रात  कार्य केले , वडूज मधील शिवसेनेच्या सभेत मा.बाळासाहेब ठाकरे यांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभले. सन 1947 पासून वडूज मध्ये स्वतःचा वृत्तपत्र व्यवसाय सुरू केला.जनता पक्षाच्या काळात मोठ्या हिरीरीने काम केले.सन 1942 च्या वडूज मधील स्वातंत्र्य आंदोलनात  हुतात्मे व स्वातंत्र्यवीर यांना  मोठे सहकार्य केले होते. 'तन - मन - धन राष्ट्र आराधना ' त्यांनी अखेर पर्यंत जपली. विटा बँकेचे ते स्थानिक शाखा सल्लागार होते.खटाव व माण तालुक्यातील रस्ते,वीज,पाणी ,शिक्षण,आरोग्य याबाबतच्या मागण्या  वारंवार शासनास कळवून त्या राबविण्यास भाग पाडले.

पुढे संघाचा सहभाग राजकारणात झाला व जनसंघ नावाची राजकीय संघटना उभी राहिली यावेळी वसंतराव शेटे यांनी जनसंघाच्या तिकिटावर सन 1962 साली पहिल्यांदा जि. प. व  सन 1967 ला विधानसभा निवडणूक लढवली व क्रमांक दोनची मते मिळवली.पुढील काळात पक्षाच्या आदेशाने वेळोवेळी मा. केशवरावजी पाटील आण्णा, मा.चंद्रहार  पाटील दादा , मा.भाऊसाहेब गुदगे यांच्या अपक्ष काळातील उमेदवारीत व विजयात मोठे सहकार्य केले. पुलोद आघाडी मध्ये शरदरावजी पवार साहेब यांना संघटनेने मोठी  ताकद दिली. खटाव आणि माण तालुक्यात देशप्रेमी  कार्यकर्ते  व त्यांची संपूर्ण देशप्रेमी घराणी उभी करण्याचे खूप मोठे कार्य केले.

देशात आणीबाणी जाहीर झाल्यानंतर डॉ.यशवंत पेठे यांना 3 महिने व वसंतराव शेटे यांनी 19 महिने राजकैदी म्हणून पुणे,नाशिक येथे कारावास भोगावा लागला.त्यावेळी  त्यांच्याबरोबर तुरुंगात एकाच खोलीत मा.आण्णासाहेब डांगे पण होते .

पुढे सन 1980 साली जनसंघाचे रूपांतर भाजपामध्ये झाले आणि  पाहिले खटाव तालुका अध्यक्ष होण्याचा बहुमान वसंतराव शेटे यांना मिळाला.खटाव आणि माण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर भाजपाचे कार्य उभे राहिले. सन 1981ला अटलजी सातारा जिल्ह्यात आले तेव्हा जिल्ह्यातर्फे  एक लाख रुपयांची देणगी त्यांना पक्ष कार्यासाठी देण्यात आली.यात खटाव तालुक्यातून मोठे योगदान वसंतराव शेटे यांनी दिल्यामुळे अटलजी वडूज मध्ये येवून घरी जेवून पुढे कराडला गेले.

त्यानंतर मा. ग्राम विकास व आदिवासी विकास मंत्री आण्णासाहेब डांगे ,पुण्याचे आमदार मा.नारायण वैद्य,अरविंद लेले,  प्रा ना.स. फरांदे ,प्रकाशजी जावडेकर ,प्रमोदजी महाजन,गोपीनाथजी मुंडे  यांनी पक्ष कार्यासाठी वारंवार वडूज येथे येवून गृहभेट  घेतली.

छ.शहाजी राजे भोसले महाराज  यांच्या काळापासून कुलकर्णी ,पाटील,देशमुख,देशपांडे,शेटे व महाजन या घरण्याना महाराष्ट्रात वतनदारी होती त्यामुळे वसंतराव शेटे यांनाही फार पूर्वीपासून गावचे नगरशेठ म्हणून मान मिळाला.ते वडूज शिक्षण विकास मंडळाचे संचालक होते.

संपूर्ण 90 वर्षाच्या आयुष्यात अतिशय निष्ठेने रा.स्व.संघ - जनसंघ - भाजप अशा चढत्या क्रमाने भाजपाची प्रगती पाहण्याचा योग आला. सन 1995 ते 2000 मधील पहिल्या युती शासनामुळे स्वप्नपूर्तीचा आनंद घेता आला.

अशा या तत्वनिष्ठ नेत्याला 9 व्या  स्मृतिदिना निर्मितआपला सातारा न्यूज परिवाराचे वतीने  विनम्र अभिवादन .

Friday, December 23, 2022

मंद्रूपचेश्रीरेणुकाचार्यशिवाचार्यमहास्वामीजी_लिंगैक्य...

 

मंद्रूपचेश्रीरेणुकाचार्यशिवाचार्यमहास्वामीजी_लिंगैक्य... 




मंद्रूपचेश्रीरेणुकाचार्यशिवाचार्यमहास्वामीजी_लिंगैक्य... 



मंद्रूप,दि.२३ :- प्रतिनिधी 

 दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथील मठाचे मठाधीश श्री ष.ब्र.रेणुकाचार्य शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी ( वय ६५)यांचे शुक्रवारी सकाळी अकरा वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने उपचारादरम्यान अश्विनी रुग्णालयात निधन झाले आहे.

श्री.रेणुकाचार्य शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी आज नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी पूजेसाठी बसत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले. 

यावेळी त्यांचे बंधू संगमनाथ हिरेमठ आणि इतरांनी त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात हलविले यावेळी उपचारादरम्यानच रेणुकाचार्य शिवाचार्य महास्वामीजी हे लिंगैक्य झाले. त्यांच्या लिंगैक्यामुळे वीरशैव लिंगायत समाजासह इतर समाजाचे मोठे नुकसान झाले आहे.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो! त्यांना समस्त लिंगायत समाज यांचे वतीने भावपूर्ण_श्रद्धांजली.


Monday, December 19, 2022

समाजाच्या मनस्थितीत आता उदारता येणे आवश्यक आहे.विनाकारण अवास्तव अपेक्षा ठेऊन पालक व वधू - वरानी आपले वय जास्त होवू देवू नये.केवळ नोकरी पेक्षा इतर चांगली स्थळे पण स्विकारून योग्य वयात लवकर लग्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन उदघाटक श्री शिवराज शेटकार सातारा येथे वधू - वर - पालक परिचय मेळावा संपन्न

 


समाजाच्या मनस्थितीत आता उदारता येणे आवश्यक आहे.विनाकारण अवास्तव अपेक्षा ठेऊन पालक व वधू - वरानी आपले वय जास्त होवू देवू नये.केवळ नोकरी पेक्षा इतर चांगली स्थळे पण स्विकारून योग्य वयात लवकर लग्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन   उदघाटक श्री शिवराज शेटकार    सातारा येथे वधू - वर - पालक परिचय मेळावा संपन्न 




      समाजाच्या मनस्थितीत आता उदारता येणे आवश्यक आहे.विनाकारण अवास्तव अपेक्षा ठेऊन पालक व वधू - वरानी आपले वय जास्त होवू देवू नये.केवळ नोकरी पेक्षा इतर चांगली स्थळे पण स्विकारून योग्य वयात लवकर लग्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन   उदघाटक श्री शिवराज शेटकार    सातारा येथे वधू - वर - पालक परिचय मेळावा संपन्न 



सातारा, दि.19 -रविंद्र वाकडे 

 वीरशैव लिंगायत समाजाचा 16 वा वधू - वर पालक परिचय मेळावा प. पू.औंधकर महाराज मठ,बुधवार पेठ, सातारा येथे रविवार दि.18 रोजी सकाळी 10 ते  संध्याकाळी 5 या वेळेत मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाची सुरुवात म.बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन उद्घाटक मा.शिवराज शेटकार, मा.अध्यक्ष,अखिल भारतीय वीरशैव सभा , याच्या हस्ते करून करण्यात आली.यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.निशांतशेठ गवळी, मा. प्रदिप बापू वाले, मा.शिवराज शेटकार,भारतशेठ बारवडे, सागरदादा कस्तुरे, दिलीप ढोले,जंगम गुरुजी, लिंगायत TV Live चे  प्रा.अजय शेटे,कार्तिक स्वामी यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. व व्यासपीठावरील कार्यक्रमाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.सुवर्णा कवारे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय व स्वागत व  सचिव श्री.माधव मेंडीगेरी यांनी केले .




यावेळी एम.पी.एस.सी .परीक्षेच्या माध्यमातून शासकीय पदाला गवसणी घातलेल्या समाजातील कु. मयुरी रामचंद्र देशमाने ,कराड व कु. गणेश वसंत तोडकर , देगाव , ( विक्रीकर निरीक्षक ) सातारा यांचा विशेष सत्कार सौ.निर्मलाताई बारवडे यांच्या हस्ते करण्यात आला.



या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.सागरदादा कस्तुरे यांनी केले. ते म्हणाले की,समाजात अनेक संघटना वाढत असून त्यांच्यात एकीची भावना कमी होत चालली आहे.हे चित्र बदलून सर्वांनी संघटित झाले पाहिजे. यावेळी या सर्व मान्यवरांचा शाल,श्रीफळ व बुके देवून सत्कार करण्यात आला.   वीरशैव लिंगायत समाज,साताराच्या अध्यक्षपदी निवड झाले बद्दल मा.श्रीनिवास भाऊ कामळे , भिंगे गुरुजी,अकलूज यांचा सत्कार मा.भारतशेठ बारवडे यांच्या हस्ते  करण्यात आला.

 समाजाच्या मनस्थितीत आता उदारता येणे आवश्यक आहे.विनाकारण अवास्तव अपेक्षा ठेऊन पालक व वधू - वरानी आपले वय जास्त होवू देवू नये.केवळ नोकरी पेक्षा इतर चांगली स्थळे पण स्विकारून योग्य वयात लवकर लग्न करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन   उदघाटक श्री शिवराज शेटकार अध्यक्ष  अखिल भारतीय वीरशैव सभा ,लातूर यांनी  केले .




 वधू - वर सूचक मेळाव्यामध्ये चागले वधू वर संशोधनाचे काम उत्तम प्रतीने पार पडत आहे.प्रत्येकाने अवास्तव अपेक्षा सोडून योग्य स्थळ निवडीला प्राधान्य दिले पाहिजे.असे मत  मा.प्रदिपबापू वाले , प्रमुख अतिथी, शरण  प्रदिप (  बापू ) वाले , राष्ट्रीय लिंगायत संघ  राष्ट्रीय अध्यक्ष यांनी व्यक्त केले .



      कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री.रमेश भांदुर्गे,  म.बसवेश्वर सामाजिक सेवा मंडळ ,वीरशैव लिंगायत समाज सेवा मंडळ व लिंगायत भजनी मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.




कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर वधू - वर व स्त्री - पुरुष पालक उपस्थित होते.नवीन युवा तरुणी व महिला यांनी नोंदणी प्रक्रियेला मोलाची मदत केली. यामध्ये स्नेहल तावसकर,स्वाती बारवडे,अर्चना धबधबे,कबाडे,वासंती महापरळे,निर्मलाताई बारवडे यांनी योगदान दिले,युवा नेतृत्व अक्षय विघ्ने यांनी वधू- वरांचा उत्तम प्रकारे परिचय करून दिला. मंडळातर्फे सर्वांची उत्तम अशी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.कोषाध्यक्ष श्री.सिद्धराज शेटे यांनी आभार प्रदर्शन  केले. कार्यक्रमाच्या शेवटी चहापान करून कार्यक्रमाची अतिशय आनंदाने सांगता झाली . 

Saturday, December 17, 2022

शिखर शिंगणापूर येथील कोटी लिंगार्चन सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ

 

शिखर शिंगणापूर येथील कोटी  लिंगार्चन सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ 


 शिखर शिंगणापूर येथील कोटी  लिंगार्चन सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ 



सातारा, दि.18 - प्रा.अजय शेटे  

 तीर्थक्षेत्र फाऊंडेशन तर्फे शिखर शिंगणापूरच्या पावन भूमी मध्ये महाशिवरात्र पर्वकाळ गुरूवार दि.16 फेब्रुवारी ते  सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी कोटी लिंगार्चन व लक्षभोजन सोहळा आयोजित केला गेला आहे.या भव्य सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ रविवार दि.25.12.2022 रोजी दु.1 वा.विविध संत महात्म्यांच्या सानिध्यात संप्पन्न होत असून,या सोहळ्याचा व सत्संगाचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे.असे आवाहन तीर्थक्षेत्र फाउंडेशन यांनी केले आहे.

हा भूमीपूजन समारंभ प. पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी ,श्री काशी महापीठ ,वाराणसी यांच्या शुभहस्ते संप्पन्न होत आहे.यावेळी त्यांच्या समवेत प.पू. श्री ष ब्र 108 सिद्धलिंग शिवाचार्य महाराज ( मठाधिपती शिखर शिंगणापूर ), प.पू.श्री. व. ब्र .108 सद्गुरू महादेव शिवाचार्य स्वामीजी,वाई (वाईकर महाराज) पू.श्री. ष. ब्र.108 पद्म भास्कर डॉ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज ,तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान , धारेश्वर मठ , धारेश्वर.श्री. प. ब्र.108 शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी हिरेमठ संस्थान, बेळंकी. (बेळंकीकर महाराज )हे  वीरतपस्वी व तपोरत्न महाराज उपस्थित राहणार आहेत.




प.पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्र्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे प्रथमच श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर नगरी मध्ये आगमन होत असल्या मुळे भव्य मिरवणूक व शोभायात्रा  आयोजित करण्यात आली आहे.या सोहळ्यास भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती कार्यक्रमाचे निमंत्रक  श्री.मोहन बडवे , मा.अध्यक्ष ,तीर्थक्षेत्र फाउंडेशन , मा. शेखरजी मुंदडा , मा.स्वागताध्यक्ष कोटी लिंगार्चन सोहळा ,समस्त वीरशैव लिंगायत समाज ,शिखर शिंगणापूर व समस्त ग्रामस्थ शिखर शिंगणापूर यांनी केली आहे.



या कार्यक्रमासाठीचा संपर्क क्रमांक 9420270126 व 9420270226 असून ,कार्यक्रमाचे स्थळ उमाबन ,शिखर शिंगणापूर, ता. माण, जि.सातारा आहे .

तरी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी अवश्य घ्यावा असे आवाहन संयोजक समितीने केले आहे.


Wednesday, December 14, 2022

'विजयानंद ' चित्रपट देशभर प्रदर्शित व्ही.आर.एल लॉजिस्टिक ( VRL) ची यशोगाथा मोठ्या पडद्यावर संस्थापक सर्वेसर्वा मा.विजयानंद जी .संकेश्वर यांची प्रेरणादायी जीवनयशगाथा रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी दाखल


  'विजयानंद ' चित्रपट देशभर प्रदर्शित  व्ही.आर.एल लॉजिस्टिक  ( VRL)  ची यशोगाथा मोठ्या पडद्यावर  संस्थापक सर्वेसर्वा मा.विजयानंद जी .संकेश्वर यांची प्रेरणादायी जीवनयशगाथा रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी दाखल 





      'विजयानंद ' चित्रपट देशभर प्रदर्शित  व्ही.आर.एल लॉजिस्टिक  ( VRL)  ची यशोगाथा मोठ्या पडद्यावर  संस्थापक सर्वेसर्वा मा.विजयानंद जी .संकेश्वर यांची प्रेरणादायी जीवनयशगाथा रसिक प्रेक्षकांच्या भेटीसाठी दाखल 



सातारा, दि.14 -    प्रा.अजय शेटे . 

   वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया ) चे संस्थापक सदस्य तथा मार्गदर्शक व भारतातील सर्वात मोठ्या ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष तथा लिंगायत भूषण मा.विजयानंद जी.संकेश्र्वर यांचे प्रेरणादायी जीवन चरित्र उलघडून दाखवणारा ' विजयानंद ' या नावाचा चित्रपट सोमवार  दि.12 रोजी संपूर्ण भारतभर हिंदी सह अन्य भाषांत प्रदर्शित झाला आहे.






        या चित्रपटात विजयने आपल्या वडिलांचा वडिलोपार्जित पुस्तक विक्रीचा व्यवसाय सोडून सामान ने - आण करण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला.या दरम्यान त्याच्या वडिलांना खूप संघर्ष करावा लागतो.मात्र त्यानंतर अतिशय कठोर परिश्रम करून विजयानंद हा  व्हि.आर.एल.अर्थात विजयानंद रोड लाईन्स ( VRL) या लॉजिस्टिक कंपनीचा मालक होतो. आपल्या भारत देशात सर्वाधिक वाहने ठेवून  माल ने - आण करण्याचा विक्रमही विजयाच्या नावावरच नोंद झाला आहे.


या चित्रपटाची कथा ही त्यांचा मुलगा आनंद संकेश्र्वर व त्यांनी स्वतःच लिहिली आहे.त्यामुळे चित्रपटाचे नाव दोघांचे नाव मिळून ' विजयानंद ' असे ठेवले आहे.तेव्हा प्रत्येकाने आवर्जून पहावा असा संपूर्ण देशभर प्रदर्शित झालेला प्रेरणादायी चित्रपट आहे.

मा.विजयानंद यांचा वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन सह सर्व समाज बांधवांना अभिमान वाटत आहे .    ' विजयानंद ' या चित्रपटास   वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ( व्हाया )  , लिंगायत TV Live ,समस्त लिंगायत समाज यांचे वतीने हार्दिक शुभेच्छा

Saturday, December 10, 2022

श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे ' एक कोटी लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळ्याचे आयोजन

 



श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे ' एक कोटी लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळ्याचे आयोजन 


 श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर येथे ' एक कोटी लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळ्याचे आयोजन 



सातारा, दि.12 - प्रा.अजय शेटे.

 '  हर कण कण में शंकर ' या शाश्वत सत्यानुसार जगद्गुरु श्री विद्या नृसिंह भारती पू.शंकराचार्य करवीर पीठ ,कोल्हापूर.श्री श्री श्री जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी जी ,श्री काशी महापीठ,श्री श्री रविशंकरजी महाराज, प.पू.श्री. मन्ना महाराज, प.पू.महंत शांती गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने ' एक कोटी लिंगार्चन व लक्ष भोजन सोहळ्याचे आयोजन श्री क्षेत्र शिंगणापूर, ता.माण, जि.सातारा येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्व काळामध्ये  गुरूवार दि.16 फेब्रुवारी ते  सोमवार दि.20 फेब्रुवारी 2023 रोजी करण्यात आले आहे.या वेळी सलग पाच दिवस एक कोटी शिवलिंगाची पूजा व एक लाख शिवभक्तांना अन्नदान करण्यात येणार आहे.




या पवित्र पर्वकाळामध्ये ज्या शिव भक्तांना कोटी लिंगार्चन व अन्नदानामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांच्यासाठी अतिशय मर्यादित नोंदणी संधी उपलब्ध असून, त्यांनी आगाऊ नोंदणी साठी तीर्थक्षेत्र फाउंडेशन ,भ्रमणध्वनी क्रमांक 9420270126 ,9420270226 तसेच श्री.मोहन बडवे 9422609565 ,श्री.मंदार बडवे 9421574133,श्री.नागेश बडवे 9421211722,श्री ह. भ. प .अक्षय महाराज भोसले 8451822772,श्री.आनंद कुलकर्णी उर्फ छोटूकाका 9730337203,श्री.बाळासाहेब खाडे 9112623770,श्री.वीरभद्र कावडे /जंगम स्वामी 9423265188,श्री.चिन्मय बडवे 9403484461,श्री.अनिल बडवे 9112879002,श्री शिवकुमार शास्त्री 9356535900 यांचेशी त्वरित संपर्क साधावा.

या कार्यक्रमासाठी ज्या देणगीदार भाविक भक्तांना देणगी दान करावयाची आहे.त्यांना 80 जी कलमाद्वारे आयकरातून सूट मिळेल.

या कार्यक्रम सोहळ्याचा भूमिपूजन समारंभ रविवार दि.25 डिसेंबर 2022 रोजी प पू.श्री श्री श्री 1008 जगद्गुरु डॉ.मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी ,श्री काशी महापीठ , वाराणसी यांचे शुभहस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रथमच श्री महास्वामीजी यांचे श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर नगरी मध्ये आगमन होत असलेमुळे त्यांची भव्य मिरवणूक व शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.तरी या पवित्र सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.अशी नम्र विनंती श्री क्षेत्र शंभू महादेव देवस्थान ,शिखर शिंगणापूर कार्यक्रम समितीद्वारे करण्यात आली आहे.**

Tuesday, December 6, 2022

उंब्रज येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणे यांच्या मातोश्री कै. लक्ष्मी पाटणे यांचे दुःखद निधन.




उंब्रज येथील प्रसिद्ध  बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणे यांच्या मातोश्री कै. लक्ष्मी पाटणे यांचे दुःखद निधन.




उंब्रज येथील प्रसिद्ध  बांधकाम व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणे यांच्या मातोश्री कै. लक्ष्मी पाटणे यांचे दुःखद निधन.



उंब्रज दि 6 :-   प्रतिनिधी
उंब्रज तालुका कराड येथील प्रसिद्ध व्यापारी श्री जगन्नाथ पाटणे यांच्या पत्नी आनी बांधकाम व्यावसायिक  आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणे यांच्या मातोश्री कै. लक्ष्मी पाटणे यांचे काल सायंकाळी  7 वाजणे च्या सुमारास  अपघाता मध्ये निधन झाले मृत्यू समयी त्याचे वय 72  वर्षं  होते , त्यांचा मागे पती,  मुलं 2 , मुली 2 ,सुना आनी नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या अकस्मात निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .



समाजातील सर्व स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिन्यात आली , त्यांचं अंत्य दर्शन घेण्यासाठी समाजातील तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील  मान्यवर उपस्थित  होते , माती आणि उत्तर कार्य गुरुवार दि 8 रोजी सकाळी 9.30 वाजता उंब्रज येथे होणार आहे.

Friday, December 2, 2022

प्रति सरकारचा खंदा समर्थक जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारक स्मृतीशेष बाबुराव जंगम गुरुजी यांना त्यांच्या 98 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन

 


प्रति सरकारचा खंदा समर्थक जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारक स्मृतीशेष बाबुराव जंगम गुरुजी यांना  त्यांच्या 98 व्या जयंती निमित्त विनम्र  अभिवादन .




प्रति सरकारचा खंदा समर्थक जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक व क्रांतिकारक स्मृतीशेष बाबुराव जंगम गुरुजी यांना  त्यांच्या 98 व्या जयंती निमित्त विनम्र  अभिवादन .



सातारा, दि.2 - रविंद्र वाकडे.

सातारा येथील पोलिस मुख्यालयातून हाकेच्याच  अंतरावर असलेल्या डीएसपी गिल्बर्ट व पोलिसांचा डोळा चुकवून सन १९४३ ला एके दिवशी रात्री ९ च्या सुमारास आपण स्वतः व आपले सहकारी संपत जगदाळे , ज्ञानु गुरव, आणि सुंदरसिंग यांनी मिळून  सातारा पोलिस मुख्यालयातून तीन बंदूका पळवल्या व त्यानंतर मागे वळून न पाहता स्वातंत्र्य चळवळीत भूमिगत राहुन काम केले. या सगळ्या आठवणी सांगताना फक्त ऐकतच राहाव्यात त्या जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक व प्रतीसरकारच्या कुमठे गटाचे प्रमुख आदरणीय बाबुराव जंगम गुरुजी यांच्याकडूनच. अशा जंगम गुरुजी यांची आज जयंती.  

मृत्यूच्या आधी काही दिवसापर्यंत स्वातंत्र्य चळवळीतील आठवणी सांगताना गुरुजी त्या आठवणीत मनापासून रमत असतं. .   




          

१९४२ मध्ये सातारा येथील न्यू ईंग्लिश स्कूल मध्ये  शिकत असताना ९ ऑगस्ट १९४२ च्या चलेजाव घोषणेनंतर जनआंदोलनात  सर्व विद्यार्थी वर्गाने उठाव केला . त्यातही जंगम गुरुजी यांनी  विशेष भाग घेतला. पोलीसांनी पकडले व नंतर सोडून दिले. वयाच्या सोळाव्या वर्षी कुमठे येथे भूमिगत चळवळीत कोरेगाव - पंढरपूर रस्त्यावर  तारा तोडल्या. तात्या बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिसरकारच्या चळवळीत खूप काम आदरणीय जंगम गुरुजी यांनी केले.  सन १९४५ मध्ये मुंबई ला जावून  ' राष्ट्र सेवा दलाच्या '  शाखाही चालवल्या. प्रौढ शिक्षण वर्ग चालवले.  सन १९४६ ला वॉरंट रद्द झाले.  भूमिगत प्रगट झाले. त्यावेळेपासू न गुरुजींनी डावा समाजवादी  व त्यानंतर  राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्य केले.  सातारा जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे गुरुजी निधन होईपर्यंत सेक्रेटरी होते.

     गुरुजींच्या निधनापूर्वी काही महिने गुरुजींना  ' स्पेस मेकर '  बसवला. डॉक्टरांनी त्यांना  विश्रांतीचा सल्ला दिला .तरी पण गुरुजी घरी सुध्दा माणसात राहणेच पसंद करत.       

अशा  क्रांतिकारक गुरुजींना व त्यांच्या देशप्रेमी कार्यास विनम्र  अभिवादन व लाल बावटा सलाम .

Thursday, December 1, 2022

रोमँटिक आणि आशयघन तरुणाईला भुरळ पाडायला 'एकदम कडक' चित्रपट 2 डिसेंबरला होणार सर्वत्र प्रदर्शित जयश्री सोनुने अभिनेत्री

 रोमँटिक आणि आशयघन  तरुणाईला भुरळ पाडायला 'एकदम कडक' चित्रपट 2 डिसेंबरला  होणार सर्वत्र प्रदर्शित जयश्री सोनुने अभिनेत्री 



रोमँटिक आणि आशयघन  तरुणाईला भुरळ पाडायला 'एकदम कडक' चित्रपट 2 डिसेंबरला  होणार सर्वत्र प्रदर्शित  जयश्री सोनुने अभिनेत्री 


     


रोमँटिक आणि आशयघन  तरुणाईला भुरळ पाडायला 'एकदम कडक' चित्रपट 2 डिसेंबरला  होणार सर्वत्र प्रदर्शित जयश्री सोनुने अभिनेत्री 

सातारा दि २७ :- प्रा .अजय शेटे  

रोमँटिक आणि आशयघन  तरुणाईला भुरळ पाडायला 'एकदम कडक' चित्रपट 2 डिसेंबरला  होणार सर्वत्र प्रदर्शित जयश्री सोनुने अभिनेत्री 

रोमँटिक आणि आशयघन  तरुणाईला भुरळ पाडणार  'एकदम कडक' चित्रपटतरुणांच्या  पसंदिस उतरेल अभिनेत्री   जयश्री सोनुने यांनी सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त  केले . यावेळी  दिग्दर्शक गणेश शिंदे ,तानाजी गलगुंडे, अरबाज शेख , चिन्मय संत , अभिनेत्री रुक्मिणी सुतार इत्यादी कलाकार उपस्थित होते .यावेळी पुढे बोलताना गणेश शिंदे बोलले कि सोशल मिडिया वर या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे .

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनविले जातात. त्यातील काही चित्रपट समाजातील अवगुणांवर भाष्य करणारे होते. दरम्यान या चित्रपटामधील आकर्षक सीनने प्रेक्षकांचं लक्ष विशेष वेधून घेतलं होतं. या आकर्षक चित्रपटांच्या यादीत आणखी एका चित्रपटाची एंट्री झाली आहे, या धाटणीच्या अंतर्गत येणारा आणि तरुणाईला पसंतीस पडणाऱ्या एका नव्याकोऱ्या आकर्षक, रोमॅंटिक, संघर्षमय, आशयघन असा 'एकदम कडक' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत आणि 'शुभम फिल्म प्रॉडक्शन' यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या 'एकदम कडक' या चित्रपटात अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रुक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने हे कलाकार पडद्यावर धुडगूस घालायला सज्ज झाले आहेत. चित्रपटाचे पोस्टर, टिझर, ट्रेलर आणि नृत्यांगना मानसी नाईकच्या 'मॅडम कडक हाय' या गाण्यावरील दिलखेचक अदांनी सोशल मीडियावर धुमाकूळच घातला आहे.




आकर्षक आणि आशयघन अशा या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात एकदम कडक नेमकं काय पाहायला मिळणार आहे, हे येत्या २ डिसेंबरला सिनेमागृहात पाहणे रंजक ठरेलच. 'ओम साई सिनेफिल्म प्रॉडक्शन' प्रस्तुत आणि 'शुभम फिल्म प्रॉडक्शन' यांच्या संयुक्त विद्यमाने असलेल्या या चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची दुहेरी धुरा गणेश शिंदे यांनी पेलवली आहे. तर पटकथा आणि संवाद कल्पेश जगताप याचे असून चित्रपटाच्या संगीताची बाजू स्व.नरेंद्र भिडे, पंकज पडघन आणि उमेश गवळी यांनी सांभाळली आहे. तर सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, उमेश गवळी, सायली पंकज, सौरभ साळुंके यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात चित्रपटातील गाणी सुरबद्ध केली आहेत. तर चित्रपटातील गीत मंगेश कांगणे यांचे आहे. संपूर्ण चित्रपट छायाचित्रकार बाबा लाड यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तर चित्रपटाच्या संकलनाची बाजू आनंद कामत, संदीप जंगम आणि ओम साई फिल्म स्टुडिओ यांनी उत्तमरित्या पेलवली आहे.    

'एकदम कडक' चित्रपटाचे पोस्टर, टिझर, ट्रेलर आणि गाणी पाहता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच लागून राहिली असेल यांत शंकाच नाही, आता प्रेक्षकांमधील ही उत्सुकता अधिक ताणली न जाण्यासाठी येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.



लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...