रखडलेला महामार्ग बनला जीवघेणा ! त्वरित काम पूर्ण करण्याची मागणी
शिवकुमार कल्याणी
खानापूर दि 16 : शिवकुमार कल्याणी विशेष प्रतिनिधी लिंगायत TV live
खानापूर फाटा ते मुखेड मार्गाचा गेल्या कित्येक वर्षांपासून गाजावाजा सुरू आहे. परंतु हा मार्ग अजून पूर्णत्वाला जात नाही, या महामार्गांची कामे गेल्या तीन वर्षांपासून रखडली आहेत. ठेकेदारांच्या मनमानीमुळे काम संथगतीने सुरू आहेत, त्यामुळे हे मार्ग वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत असून आतापर्यंत अनेक जणांचे अपघात झालेले आहेत. तरीही याकडे मात्र शासकीय यंत्रणा, नेते मंडळींचे दुर्लक्ष होत आहे.
त्यातल्या त्यात खानापूर ते एकलारा कार्नर हा दुपदरी सी सी रोड आहे हा महामार्ग सध्या मृत्यूमार्ग बनला आहे, मागील दोन तिन वर्षांपासून हे काम चालू असुन सदरील काम संथगतीने होत असून. काम पूर्ण करण्याचा कालावधी नेमका किती? हा प्रश्न उपस्थित होतो आहे,अर्धवट रस्त्यामुळे या ठिकाणी वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे, या मार्गावर अनेक लहान मोठे अपघात रोजच होत आहेत अनेकांना अपंगत्व आले आहे, व रस्ताकामे अर्धवट असल्याने खासकरून खानापूरकरांसाठी
वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. दरम्यान,
सध्या तालुक्यासह खानापूर महसूल मंडळाता अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे,यामुळे यंदाही हा मार्ग वाहन धारकांना वेदनादायी ठरणार असल्याचे चित्र आहे, त्यामुळे त्वरीत हे काम पूर्ण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन खानापूर येथील कांग्रेस कार्यकर्ते मारोती यन्नलवार यांनी देगलूरचे उपजिल्हाधिकारी श्रीमती सौम्या शर्मा यांना दिले त्यावेळी देगलूर बिलोली विधानसभे चे आमदार जितेश अंतापुरकर हे उपस्थित होते, त्याप्रसंगी,माजी ग्रामपंचायत सदस्य माधव इंगळे, मनसेचे अनंत कामशेटे, चैतन्य घरडे, आनंद वाघमारे,माजी पोलीस पाटील सुरेश वानोळे,व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment