Monday, February 28, 2022

आज महाशिवरात्री या निमित्ताने सर्व देशभर हा दिवस अत्यंत उस्ताहात साजरा केला जातो , त्याचे महत्त्व .श्री महाशिवरात्री व्रत महात्म्य व कथासार

आज  महाशिवरात्री या निमित्ताने सर्व देशभर हा दिवस अत्यंत उस्ताहात साजरा केला जातो , त्याचे महत्त्व 
.श्री महाशिवरात्री व्रत महात्म्य व कथासार 
.सातारा दि 1 .प्रा.अजय शेटे..वडूज.लिंगायत TV live
.. मंगळवार.. दि.1मार्च 2022..रोजी माघ मासी कृष्ण पक्ष चतुर्दशी ..14..रोजी सर्व हिंदू धर्म व  वीरशैव लिंगायत धर्माला अतिशय पवित्र असणाऱ्या श्री महाशिवरात्रीचा उत्सव संपन्न होत आहे..याचा निशिथ काल मध्य रात्री 12.36 ते 1.15 असा आहे.त्यानंतर दर्श अमावस्या सुरू होत आहे..
..भगवान श्री शंकर..महादेव यांचे  प्रतीक म्हणून शिवलिंगाचे पूजन केले जाते.या शिवलिंगाचा खालील भाग श्री ब्रम्हा असून मध्य भाग श्री विष्णु नारायण आहेत व वरील भाग हा श्री शिवशंकर आहेत. हे शिवलिंग उत्पत्ती..स्थिती आणि लय यांचेही द्योतक आहे.तसेच सर्व विश्व व्यापी  ब्रम्हांडा चे  पण प्रतीक आहे.
..एका पौराणिक कथेनुसार याच रात्री श्री भगवान शंकराने  देव आणि दानव यांच्या समुद्र मंथनातून निघालेले ,' काल कूट ' नावाचे विष प्राशन करून त्याचे अमृत बनविले..तसेच श्री शिव पुराणा मधील कोटी रुद्र आख्याना नुसार जी कथा आहे.ती पुढीलप्रमाणे..
..एका जंगल वनात भिल्लांची वस्ती होती. त्यात गुरुद्रुप नावाचा अतिशय बलवान व रागीट शिकारी भिल्ल रहात होते होता..त्याच्या कुटुंबात त्याचे आईवडील..पत्नी व मुले होती. तो रोज त्या जंगलात शिकारीला जाई व हरीण अथवा इतर प्राण्यांची हत्या करी व त्यांचे मांस खाऊन आपली व कुटुंबाची उपजीविका पूर्ण करत असे.शिवाय तो चोऱ्या व दरो डे घालण्याचे काम करून लूटमार पण करत असे..असेच एकदा त्याच्या कुटुंबाने त्याच्या जवळ हरणाचे मांस खाण्याची इच्छा व्यक्त केली.. त्या शिकारीच्या शोधात तो जंगलात धनुष्यबाण व प्यायला  फक्त पाणी घेवून गेला..दिवसभर त्याने प्रयत्न करून पण त्याला हरिण दिसले नाही त्यामुळे त्याच्या शोधात तो खूप आतपर्यंत अनभिज्ञ अशा दाट जंगलात शिरला. व त्याला हरीण दिसले नाही.संध्याकाळ..रात्र होऊन खूप अंधार पडला पण रिकाम्या हाताने गेलो तर कुटुंबाची भूक आपण भागवू शकणार नाही.त्यामुळे शिकार सापडे पर्यंत रात्रभर तेथेच राहण्याचा निर्धार त्याने केलं व तो एका पाण्याच्या तळ्या जवळ आला.रात्री नक्कीच इथे पाणी पिण्यासाठी एखादे हरीण येईल आणि आपल्याला शिकार मिळेल या हेतूने तो फक्त प्यायला पाणी व हाती धनुष्यबाण घेवून शेजारच्या एका  बेल वृक्षाच्या झाडावर चढून बसला..परंतु रात्रीचा पहिला प्रहर सुरू होऊन बराच वेळ झाला तरी तिथे हरीण आले नाही..परंतु बऱ्याच वेळाने अचानक एक हरिणी तिथे पाणी पिण्यास आली.त्या बरोबर त्याने सावध पवित्रा घेण्यासाठी हालचाल केली. त्याच्या हाताच्या व शरिराच्या  हालचाली मुळे काही बेलाची पाने व हातातील पाणी त्या झाडाखाली दडून असलेल्या श्री शिवलिंगावर पडले आणि अनावधनाने त्याच्या हातून पहिल्या रात्र प्रहराची पूजा पूर्ण झाली.ती रात्र नेमकी श्री  महाशिवरात्री ची होती.श्री शिवलिंग पूजनाचे पुण्य नकळत त्याच्या हातून घडले व त्याच्या विचारात परिवर्तन होऊ लागले.पण त्याच्या  हालचाली च्या आवाजाने त्या हरिणीचे लक्ष त्याच्याकडे गेले तेव्हा त्याने शिकारीसाठी तिच्यावर बाण उगारला होता.त्यावर त्या हरिणी ने त्याची याचना करून सांगितले की माझ्या कुटुंबात माझी दोन लहान पिल्ले ..माझी एक बहिण व माझे पती असे आहेत..तेव्हा त्यांना भेटून  त्यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी सोपवून मी माघारी येते.नंतर तू तुझा कार्यभाग साधं .परंतु यास त्याने नकार दिला. व तू खोटे बोलून पळून जाणार आहेस असे ठणकावले..तेव्हा तिने मी जर असे खोटे वागणे  केले तर मला महापाप लागेल.असे म्हणून नक्की माघारी येण्याचे वचन देवून ती परत गेली.. तिने आपल्या पिल्लांना दूध पाजून सर्व कुटुंबात हि गोष्ट सांगितली व ती आपले वचन पूर्ण करण्यास माघारी निघाली.तेव्हा तिची बहिण तिला म्हणाली तू आई आहेस ..तुझ्या लहान पिल्लांना अजून तुझी खूप गरज आहे.तेव्हा तू थांब तुझ्या ऐवजी मी जाते .असे म्हणून ती त्या तळ्यावर पाणी पिण्यास गेली..तोपर्यंत महाशिवरात्रीचा दुसरा प्रहर पूर्ण झाला होता व भिल्लाच्या हालचालीने जवळील पाणी व बिल्वपत्रे खाली श्री शिवलिंगावर पडत होती.अशा प्रकारे त्याची ती पण पूजा नकळत पूर्ण झाली..तेव्हा त्याने त्या तरुण हरिणी वर शिकारीसाठी बाण उगारला त्यावर ती म्हणाली मला आत्ता मारू नकोस.माझे घरी माझी थोरली बहीण..भाऊजी व त्यांची मुले आहेत.तेव्हा त्यांना एकदा भेटून येते.तेव्हा तू माझी शिकार कर तेव्हा सुरुवातीला त्याने विरोध केला पण तिने हे वचन जर मी पूर्ण केले नाही तर मला महापाप लागेल असे सांगितल्यावर  अचानक  मतपरिवर्तन होऊन या घटनेला पण त्याने परवानगी दिली.ती कुटुंबात माघारी आलेली पाहून सर्वांना आनंद झाला.तिने सर्व हकिकत सांगितली त्यावर मोठा नर हरीण त्यांना म्हणाला आपली पिल्ले अजून लहान आहेत.तेव्हा तुमच्या महिलांची त्यांना खूप गरज आहे.तेव्हा आता मी जंगलात जातो.असे म्हणून तो जंगलात त ळ्या जवळ पाणी पिण्यास पोहचला .त्याला पाहून या शिकाऱ्याला खूप आनंद झाला..मध्ये बराच वेळ वाट पाहण्यात गेल्या मुळे तो वेळ जावा म्हणून बेलाची पाने तोडून खाली टाकत होता.आणि त्याच्या जवळील पाणी श्री शिवलिंगावर पडत राहिल्यामुळे त्याची रात्रीच्या तिसऱ्या प्रहराची पूजा पण त्याच्या नकळत घडून आली व त्याच्या विचारात बदल होत गेला..त्याने त्या तरुण नर हरणा वर शिकारीसाठी धनुष्य बाण रोखला .त्यावेळी तो हरण त्याला म्हणाला घरी माझे कुटुंब आहे.तेव्हा त्यांची एकदा शेवटची भेट घेवून लगेच येतो.नंतर तू माझी खुशाल शिकार कर.तेव्हा त्याने नकार देवून तुम्ही सर्व जण मला खोटे बोलून फसवत आहात व स्वतःचा जीव वाचवत आहात असे म्हटले.त्यावर त्या हरिणाने आम्ही जर असे केले तर आम्हाला सात जन्माचे पाप लागेल.तेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेव असे सांगितले.त्यावर त्याने त्या नर हरणास पण माघारी येण्याच्या बोलीवर जावू दिले.
..इकडे घरी पोहचल्यावर भिल्लाला दिलेल्या वचन पूर्तीची खूप चर्चा हरिणा च्या  कुटुंबात झाली.तेव्हा  वचन पूर्ती करण्यासाठी ते सर्वच कुटुंब आपल्या पिल्लांसह त्या तळ्या जवळ पोहचले त्यांनी पाणी पिले.. व आम्ही सर्वजण तुझी वचन पूर्ती करण्यासाठी आलो आहे. तेव्हा तू आमची शिकार करून तुझ्या सह सर्व कुटुंबाची भूक भाग व असे  त्या भिल्लास सांगितले
.त्यावर इतक्या सर्व हरिणा ना  पाहून त्याला सुरुवातीला  खूप आनंद झाला. पण यावेळी रात्रीचा चौथा प्रहर ही पूर्ण होऊन त्या भिल्लाच्या हातून अनेक बिल्व पत्रे व पाणी खाली सांडल्या मुळे श्री शिवलिंगाची पूजा पूर्ण झाली . व त्याच्या नकळत त्याचे पुण्यकर्म त्याला लाभले व त्याच्या विचारात पूर्ण मतपरिवर्तन झाले.त्याने विचार केला की हे सर्व कुटुंब प्राणी असून एकमेकांच्या जीवाची काळजी करतात आणि प्रसंगी एकमेकांसाठी स्वतःचा जीव ही देण्यास तयार होतात. आणि आपण माणूस असून त्यांच्या शिकारीचे दुष्कृत्य करतो व आपल्या पोटाची भूक वासना भागव तो हे मोठेच पाप आहे.तेव्हा आपण आता शिकार व लूटमार सोडून या निरपराध
 प्राण्यांसारखे प्रामाणिक जीवन जगू व इथून पुढे मानव कल्याणाचे कार्य करू असे म्हणून त्याने धनुष्यबाण बाजूला ठेवून त्यांना नमस्कार केला व जिवंत माघारी जाण्यास परवानगी दिली .
.. तेव्हा तिथे भगवान श्री शिवशंकर प्रकट झाले व त्यांनी  त्याच्या यश ..संपत्ती व समृध्दी साठी आशिर्वाद दिला..त्याने ते दिव्यदर्शन पाहून नमस्कार केला तेव्हा अशा  प्रकारे जो  माझे महाशिव रात्रीचे व्रत करून जो पूजापाठ..मंत्र व स्तोत्र पठण करेल तेव्हा त्या व्यक्तीस यश..समृद्धी.. ऐश्वर्य..धनधान्य..सुवर्ण.. पद..पैसा ..प्रतिष्ठा..नाव ..आणि मानसन्मान प्राप्त होईल.असे सांगून 'तथास्थु'म्हणून ते अदृश्य झाले..
.. ओम नमः शिवाय..ओम नमः शिवाय **

Sunday, February 27, 2022

वैकल्पीक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन : न्यायमूर्ती ए.ए. सय्यद


वैकल्पीक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन : न्यायमूर्ती ए.ए. सय्यद
अहमदनगर दि.२७  -: adv शितल बेद्रे लिंगायत TV live 
वैकल्पिक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन असून भारतीय संविधानात देखील ती समाविष्ट केलेली आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष तथा न्यायमूर्ती श्री. ए. ए. सय्यद यांनी केले. ते वैकल्पीक बाद निवारण केंद्र, अहमदनगरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सदर इमारतीचे फीत कापून व कोनशिला अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. पुढे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात मध्यस्थीने प्रकरणे मिटविण्याची भावना आनंद आणि 'सुकून' देवून जाते. वैकल्पीक याद निवारण आणि मध्यस्थीचा मुख्य उद्देश संवाद साधणे हा आहे. ब-याच वेळेला वाद वेगळाच असतो, परंतु तो वेगळ्या पध्दतीने न्यायालयासमोर मांडला जातो. सदरची इमारत फक्त पक्षकारांच्या कल्याणाकरीता तयार करण्यात आलेली आहे. महात्मा गांधींची विचारसरणी देखील दोन्ही पक्षांमध्ये संवाद साधून वाद मिटविण्याची होती. सध्या सर्व न्यायालयांमध्ये खूप प्रकरणे प्रलंबीत आहेत आणि ते न्याय संस्थेसमोर सर्वात मोठे आव्हान आहे आणि त्यामुळे न्यायसंस्थेवर अतिशय ताण व तणाव येतो. अशा वेळेला वैकल्पीक वाद निवारण पध्दतीने वाद मिटविण्याची गरज निर्माण होते. वैकल्पीक वाद निवारण पध्दतीने भारतीय संविधानाच्या कलम ३९ अ नुसार दिलेल्या मोफत विधी सेवेच्या अधिकाराची अंमलबजावणी करता येते. वैकल्पीक वाद निवारणाची संकल्पना अतिशय प्राचीन असून ती पंचायत राज पध्दतीपासून राबविली जाते आणि त्यामधून लोकांचे कल्याण साधले जाते. भारतामध्ये समोपचाराने भांडण मिटविण्याची परंपरा अतिशय प्राचीन आहे. लोकअदालतीव्दारे देखील प्रकरण चालविण्याच्या प्रक्रियेमध्ये वेळ न घालविता प्रकरण मिटविता येते. तसेच लोकअदालतमध्ये वाद मिटल्यामुळे पक्षकारांचे आपसातील संबंध चांगले राहतात. विधी सेवा प्राधिकरणातर्फे सर्व लोकांनी न्यायापासून वंचित राहू नये यासाठी विधी सेवा दिली जाते आणि त्यांना न्याय मिळविण्याकरीता मदत केली जाते. सर्व शासकिय विभागांचा आणि सचिवांचा, वकिलांचा लोकअदालत यशस्वी करण्यामागे सिंहाचा वाटा आहे.
वैकल्पीक वाद निवारण केंद्र (ए.डी.आर.) या इमारतीचा उद्घाटन सोहळा मा. न्यायमूर्ती श्री. ए. ए. सय्यद, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय तथा कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे शुभहस्ते व मा. न्यायमूर्ती श्री. रविंद्र विठ्ठलराव घुगे, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा अहमदनगर मा. न्यायमूर्ती श्री. संजय गणपतराव मेहरे, मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद तथा पालक न्यायमूर्ती जिल्हा अहमदनगर, यांच्या प्रमुख उपस्थितीत व मा. श्री. सुधाकर वें. यार्लगड्डा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे अध्यक्षतेखाली रविवार, दि. २७ फेब्रुवारी, २०२२ रोजी दुपारी ३.०० वा. संपन्न झाला आहे. न्यायमूर्ती श्री. रविंद्र घुगे यांनी न्यायालयाकडे ब-याच प्रकारची प्रकरणे येत असल्यामुळे समोपचाराने भांडण मिटल्यास वकिलांना प्रकरणे कमी पडणार नाहीत असे सांगितले. तसेच पक्षकारांना आपल्या प्रकरणांचा लवकर निपटारा करण्यासाठी आपल्या अपरोक्ष काम करणारी एक यंत्रणा आहे याचे नक्कीच समाधान होईल. एवढया लोकअदातलमध्ये प्रकरणे मिटल्यानंतर प्रत्येक पक्षकार सर्वांना आशिर्वाद देतो हे अतिशय पुण्याचे काम आहे. तसेच न्यायमूर्ती श्री. संजय मेहरे यांनी इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर त्या इमारतीची देखील सर्वांकडून काही अपेक्षा असते. या इमारतीची ज्या उद्देशासाठी निर्मिती झाली त्याकरीता त्या इमारतीचा वापर व्हावा अशी या इमारतीची अपेक्षा असेल असे सांगितले.
        सदर कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीतांनी झाली. नालसा गीत वाजविण्यात आले. तसेच श्री. डी. पी. सुराणा, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी महाराष्ट्रातील वैकल्पीक वाद निवारण केंद्राच्या इमारतींचे विश्लेषण केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी मागील तीन लोकन्यायालयात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढत बरीच प्रकरणे निकाली काढली आहेत. तसेच येत्या १२ मार्च, २०२२ रोजी , येणा-या लोकन्यायालयामध्ये प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले आहे.
मा. श्री. मिलींद तोडकर, उपसचिव, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, मा. श्री. अजित ए. यादव, प्रबंधक, मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई हे उपस्थित होते. रेवती देशपांडे, सचिव, जिल्हा विधी सेवा यांनी आभार प्रदर्शन केले आणि राष्टगिताने सदर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Saturday, February 26, 2022

मावळ्यांची शाळा या आधुनिक उपक्रमातून उलगडणार शिवछत्रपतींचा इतिहास


मावळ्यांची शाळा या आधुनिक उपक्रमातून उलगडणार शिवछत्रपतींचा इतिहास 
 
सातारा दि २६ : 
प्रसाद वाकडे  प्रतिनिधी लिंगायत TV live
ब्रिटीशांच्या गुलामीतून संघर्ष करून बाहेर आलेला आणि गेली ७५ वर्षे स्वातंत्र्य उपभोगत असलेला आपला भारत देश अनेक क्षेत्रांत प्रगती करत आहे. शिक्षण क्षेत्र देखील त्याला अपवाद नसून या ही क्षेत्रात आमुलाग्र बदल आपण पाहिले आहेत. मात्र अजूनही शाळांमध्ये इतिहास हा केवळ एक विषयापर्यंत मर्यादित राहिला आहे. सनावळी, परप्रांतातील महायुद्धे, राज्यक्रांत्या शिकताना इतिहासातून जी प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळायला हवी ती मिळताना दिसत नाही. 
 
शिवछत्रपतींचा खरा इतिहास आधुनिक तसेच रंजक पद्धतीने शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावा ह्यासाठी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले ह्यांच्या पुढाकारातून आणि मीती इन्फोटेन्मेंट ह्यांच्या तांत्रिक सहयोगातून मावळ्यांची शाळा ह्या अभिनव उपक्रमाची घोषणा सातारा येथील गांधी मैदान येथे आयोजित केलेल्या सोहोळयात करण्यात आली. छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आणि मीती इन्फोटेन्मेंटचे व्यंकटेश मांडके, अनिरुद्ध राजदेरकर आणि शंतनु कुलकर्णी ह्यावेळी उपस्थित होते. ह्या दिमाखदार सोहोळ्यास शिवाजी महाराजांच्या २९ शिलेदारांचे वंशजही उपस्थित होते. या सोहोळ्याचे सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेता अभिजित खांडकेकर ह्यांनी केले.  

ह्या सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांच्या समवेत स्वराज्ययोध्द्यांचे २८ वंशज आणि मागे पडद्यावरती, मितीइन्फोटेन्मेंट ने बनवलेल्या, लोकार्पित केलेल्या ६० स्वराज्ययोध्द्यांची चित्रे असा ऐतिहासिक प्रसंग उपस्थितांना पाहता आला.छत्रपती उदयनराजे भोसले ह्यांचे मावळ्यांची शाळा ह्या आधुनिक पद्धतीने मराठ्यांचा इतिहास शिकवण्याच्या उपक्रमाची घोषणा करणे, स्वराज्ययोध्द्यांच्या चित्रांचे लोकार्पण करणे, शिवरायांचा इतिहास मुलामुलिंपर्यंत पोहोचवणाऱ्या - राष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या खेळाचे मावळा ह्या बोर्ड गेम चे कौतुक करणे आणि ते ही स्वराज्य योद्ध्यांच्या वंशजांच्या उपस्थितीत ह्या साऱ्यांनी सोहळ्याला अलौकिक असे महत्त्व आले.
 
मावळ्यांची शाळा या उपक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील निरनिराळ्या शासकीय, निमशासकीय आणि स्वतंत्र शाळांमधून अधिकचे तास घेऊन आधुनिक आणि रंजक पद्धतीने शिवछत्रपतींनी उभारलेला स्वराज्यलढा हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला जाईल. रटाळ सनावळ्या पाठ करून घेण्याच्या रुक्ष प्रथेला खंड देत, प्रोजेक्टर्स आणि व्हिजुअल ग्राफिक्सच्या सहाय्याने आपल्या मातीमध्ये घडलेल्या आणि आपल्या मातीसाठी लढलेल्या स्वराज्ययोद्ध्यांच्या शौर्यगाथा शिकविल्या जातील. शालेय अभ्यासक्रम ज्या वीरयोद्ध्यांना विद्यार्थ्यांपासून वंचित ठेवतो त्या स्वराज्ययोद्ध्यांना त्यांच्यापर्यंत अधुनिक पद्धतीने पोहोचवताना त्यांच्या चारित्र्यातून काय शिकावे? एकूणच शिवचारित्र्यातून कोणते बोध घ्यावेत? ह्याचा अभ्यासपूर्वक विचार करून या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
 
हा उपक्रम अस्सल इतिहास प्रेरणादायी पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचवता पोहोचवता शहरातील अनेक हुशार तरूणांना रोजगार देखील देईल.  
 
विशेष म्हणजे ही सर्व व्यवस्था संपूर्णपणे नि:शुल्क असून त्यासाठी लागणारे सर्व माध्यम, माहिती, व्हिजुअल ग्राफिक्स, अॅनिमेशन आणि इच्छुकांना उपक्रम राबविण्याचे प्रशिक्षण मीती इन्फोटेन्मेंट कसलेही शुल्क न आकारता देणार आहे. इच्छुकांचे वेतन, त्यांना शाळांत पोहोचण्यासाठी लागणारी मदत इत्यादी छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले करणार आहेत.
 
सदर उपक्रमाबाबत  छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले म्हणाले की गेले अनेक दिवस आधुनिकतेच्या नावाखाली कमी कमी होत चाललेल्या मराठयांच्या इतिहासाकडे माझे लक्ष वेधले गेले. पाहायला जावे तर अशी एक गोष्ट नाही जी तुम्हाला शिवचारित्र्यातून प्रेरणादायी पद्धतीने पोहोचत नाही. मग आपलाच इतिहास आपल्या नव्या पिढीला शिकवण्यासाठी मी पाऊले नाही उचलायची तर मग कोणी? ह्याच विचाराने झपाटून मी ह्या क्षेत्रात काम करायचे ठरवले. मीती इन्फोटेन्मेंट ह्यांना मी त्यांच्या बोर्ड गेमच्या निर्मितीपासून ओळखतो. तेव्हा त्यांनी संकलित केलेल्या माहितीचा उपयोग आपल्या सातार्‍यातील मुलामुलींना झालाच पाहिजे ह्यासाठी मी प्रयत्न करत आहे . 
 
उपक्रमाच्या संकल्पनेबाबत  मीती इन्फोटेन्मेंटचे  व्यंकटेश मांडके म्हणाले की आमच्याकडे मावळा हा बोर्ड गेम बनवताना गोळा केलेले साहित्य तर होतेच. जेव्हा अशा संकल्पनेबाबतचा विचार पुढे आला तेव्हा आम्ही त्याला त्वरीत होकार दिला. आमचा मावळा हा बोर्ड गेम बनवतानाचा असलेला उद्देशच इथेही आहे! शिवरायांचा इतिहास सगळ्यांना माहीत असायलाच हवा!शुल्क न आकारता पुढे मांडण्यात आलेली ही योजना म्हणजे आपला इतिहास आपल्या तरुणांपुढे मोठ्या प्रमाणात पोहोचवण्याची अमूल्य संधी होती.   अर्थात आम्ही सार्‍यांनी त्वरित ती उचलून धरली!

मीती इन्फोटेन्मेंटचे शंतनु कुलकर्णी म्हणाले की कोणालाही कसलीही गोष्ट समजाऊन सांगण्यासाठीचे अॅनिमेशन हे अगदी सर्वात प्रभावी माध्यम आहे. आम्ही आमच्या मावळा ह्या बोर्ड गेम साठी बर्‍याच ऐतिहासिक गोष्टींच्या अॅनिमेशनचा अभ्यास आधीच केलेला होता! त्यात शुल्क न आकारता पुढे मांडण्यात आलेली ही योजना म्हणजे आपला इतिहास आपल्या तरुणांपुढे मोठ्या प्रमाणात पोहोचवण्याची अमूल्य संधी होती. अर्थात आम्ही सार्‍यांनी त्वरित ती उचलून धरली! 

मीती इन्फोटेन्मेंटचे अनिरुद्ध राजदेरकर म्हणाले की मोठी माणसं शिवरायांबाबत निरनिराळ्या पद्धतीने प्रेम व्यक्त करत राहतात. गड-दुर्गांवर जाणे, त्यांच्याबद्दल व्याख्यानमाला भरवणे इत्यादी. पण ह्यातून फक्त आपले प्रेम दिसते, ह्यातून नव्या पिढीला आपला इतिहास कळणार आहे का? मुला-मुलींना शाळांतच आधुनिक उपकरणे वापरून शिकवले असता शिवछत्रपतींचा स्वराज्यलढा रुजण्यास मदत होईल. आणि हा उपक्रम नेमके हेच करतो!

Thursday, February 24, 2022

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्याशोभायात्रेत नागरिकांसह तालीम, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा – अध्यक्ष कुलदीप गायकवाड


करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्या
शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा – अध्यक्ष कुलदीप गायकवाड
कोल्हापूर, ता. २४ – प्रणाली वाकडे प्रतिनिधी
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्ती प्रदानप्रसंगी काढण्यात येणाऱ्या शोभायात्रेत नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी आज केले.
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाकडे अंदाजे ५१ किलो वजनाची चांदीची मूर्ती आहे. ती १ मार्च २०२२ रोजी विधिवत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे सुपूर्द केली जाणार आहे. त्या निमित्ताने अंबाबाई मंदिर परिसरात शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या निमित्ताने रांगोळ्यांसह आकर्षक रोषणाईही केली जाणार आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना श्री. गायकवाड म्हणाले, सराफ संघाकडे ३१ वर्षांपासून करवीर निवासिनी अंबाबाईची चांदीची मूर्ती आहे. दरम्यान, अंबाबाई मंदिरात असणाऱ्या मूळ मूर्तीचीही अभिषेकमुळे झीज होत आहे. याच कारणासाठी आम्ही ही मूर्ती देण्याचा सर्व संमतीने निर्णय घेतला. त्यासाठी रीतसर जिल्हाधिकारी कार्यालय आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून परवानगी घेऊन मूर्ती प्रदान करीत आहोत. यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि देवस्थान समिती सचिव शिवराज नाईकवडे यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.

ते म्हणाले, एक मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अंबाबाई मंदिर परिसरात मूर्तीसह शोभायात्रा निघेल. यावेळी रांगोळी, आकर्षक रोषणाईबरोबर वाद्यांचा गजरही असेल. यामध्ये नागरिकांसह तालीम, मंडळे, संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन उत्सवाची शोभा वाढवावी.

यावेळी उपाध्यक्ष जितेंद्र राठोड, सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संजय जैन, संचालक सुहास जाधव, सुरेश गायकवाड, सुरेंद्र पुरवंत, अमोल ढणाल, सुरेश राठोड आदी उपस्थित होते.  

४ मार्चला महायज्ञ
दरम्यान, मूर्ती देवस्थान समितीकडे सुपूर्द केल्यानंतर गरुड मंडपामध्ये मूर्ती ठेवण्यात येईल. तिचा वापर दैनंदिन पूजा आणि अभिषेकसाठी केला जाणार आहे. त्यापूर्वी ४ मार्च रोजी मंदिरात मूर्तीला अभिषेक केला जाणार आहे. त्याचबरोबर महायज्ञाचेही आयोजन केले आहे. यामध्ये शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित सहकुटुंबे सहभागी होणार आहेत.

Wednesday, February 23, 2022

संत श्री गजानन महाराज प्रकट दिन , वंदनीय गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी .


 संत श्री गजानन महाराज प्रकट दिन , वंदनीय गाडगे महाराज जयंती उत्साहात साजरी .
 वडूज.. दि.23.. ..प्रा.अजय शेटे..वडूज
.गणेशवाडी येथील भूमिपुत्र व पुणे येथील  विभागीय पोलिस अधिकारी श्री.सुनील दादासाहेब घार्गे यांनी वडूज ..कर्मवीर नगर येथे बांधलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर मध्ये  तसेच जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.अशोक आबा गोडसे यांनी बांधलेल्या वाकेश्र्वर रोड वरील  मंदिरात तसेच  व्यावसायिक  श्री. दत्तात्रय रामचंद्र गाडवे  यांच्या वाड्यात आज श्री गजानन महाराज प्रकट दिंन सोहळा साजरा करण्यात आला..
..यावेळी सकाळी 8 ते 9 होमहवन..9 ते 10 सत्यनारायण महापूजा..11 ते 12 या वेळेत श्री महाराजांची आरती व पुष्पवृष्टी.. व नंतर महाप्रसाद असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला .
..त्या नंतर वंदनीय श्री गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पण करण्यात आले.. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी  श्री सुनील घार्गे साहेब व श्री.अशोक आबा गोडसे  यांनी आपले धार्मिक व सामाजिक मनोगत व्यक्त केले..
..या वेळी पुणे स्थित मारुती स्टील कंपनी चे एम.डी.श्री. दिपक बतिजा साहेब..सारसबाग ग्रुपचे संस्थापक आणि म्हाडा कंपनी चे अधिकारी सतीश राऊत..संजय नाईक सर्..श्री.शैलेश आंदेकर तसेच पुणे येथील सर्व सभासद..आत्मनिर्भर भारत अभियानचे महाराष्ट्र राज्य सचिव प्रा.अजय शेटे.. निवृत्त प्राचार्य श्री.मिलिंद घार्गे सर..श्री.हणमंत साळुंखे.. सागर पाटोळे..श्री गणेश वाडी ग्रामपंचायत व सोसायटीचे पदाधिकारी सर्व ग्रामस्थ हजर होते..

Monday, February 21, 2022

शिवबा सामाजिक संस्था उंब्रज ता कराड वतीने अनोख्या व साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी


शिवबा सामाजिक संस्था उंब्रज ता कराड वतीने अनोख्या व साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी.
कराड दि :- 20 दिलीप महाजन लिंगायत TV live  कराड प्रतिनिधी
शिवबा सामाजिक संस्था उंब्रज ता कराड वतीने अनोख्या व साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली
दिनांक 19 फेब्रुवारी उंब्रज ता कराड
संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती  उत्साहात आणि जोशात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा 
 घोषणा मय वातावरणात अक्खा महाराष्ट्र दुमदुमून निघाला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करत होता यातच उंब्रज ता कराड येथील शिवबा सामाजिक संस्थेतील छोट्या मावळ्यांनी शिवजयंती चे औचित्य साधून  साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली त्यांनी उंब्रज बाजार पेठे मधील मध्यवर्ती ठिकाणी होत असलेल्या प्रस्तावित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोळा फूट  उंच पंचधातूच्या अश्वरुढ पुतळ्यास देणगी स्वरूपात 11,111/- रुपये रोख रक्कम शिव योद्धा प्रतिष्ठान उंब्रज यांच्याकडे सुपूर्त केली
 छ.शिवाजी महाराज यांच्या 16 फूट उंच पंचधातूच्या मूर्तीस प्रशासकिय मान्यता मिळाली असून लोकसहभागातून निधी संकलनाचे काम सुरु आहे. गत दोन वर्षात कोरोनाकाळात लॉकडाऊनच्या परिस्थितीतून बाजारपेठ व्यापारी शेतकरी स्थिरावत आहेत.या आर्थिक अडचणीच्या काळातही नियोजित छ.शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूतीसाठी व आपल्या लाडक्या राजाच्या प्रेमापोटी नागरीक शिवप्रेमी व्यापारी शेतकरी नोकरदार तसेच सामाजिक संस्था गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळे भरभरून देणगी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान यांचेकडे जमा करीत आहेत.अनेकजण वाढदिवस,लग्नाचा वाढदिवस किंवा कोणतेही शुभकार्य असो या शिवकार्यासाठी देणगी देऊन साजरे करतात. 
 शिवजयंतीचे औचित्य साधुन  शिवबा  सामाजिक संस्थेच्या छोट्या मावळ्यांनी होणारा वायफळ खर्च वाचवून उंब्रज बाजारपेठेत श्री. छ. शिवाजी महाराज यांचा भव्य व दिव्य अश्वारुढ पुतळा व्हावा या भावनेने   रोख 11,111/- श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानकडे सुपूर्त केले. या छोट्या मावळ्यांनी केलेल्या लाखमोलाच्या देणगीचे व त्यांच्या वैचारीक कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Saturday, February 19, 2022

महिलांनी प्रशिक्षण घेऊन उद्यमी बनावे- शर्मिला मिस्किन कणेरी मठ येथे महिलांना प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन


महिलांनी प्रशिक्षण घेऊन उद्यमी बनावे-  शर्मिला मिस्किन
कणेरी मठ येथे महिलांना प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन.
कणेरी मठ, दि 19 प्रतिनिधी
 – महिलांनी हस्तकेलेचे प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनण्याबरोबरच उद्यमी बनावे, असे आवाहन राज्य जीएसटीच्या उपनिदेशक श्रीमती शर्मिला विनय मिस्किन यांनी आज केले.

कणेरी मठ येथे महिलांच्या समर्थ योजनेअंतर्गत प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सहायक निदेशक हस्तशिल्प केंद्राच्या वतीने महिलांसाठी दोन महिने चालणाऱ्या या प्रशिक्षण केंद्रांच्या उदघाटनप्रसंगी इंडोकाऊंट कंपनीचे राजेश मोहिते, हस्तकला विभागाचे सहायक निदेशक चंद्रशेखर सिंग, प्रशिक्षण अधिकारी रितेश कुमार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

दरम्यान, या महिलांनी बनविलेल्या हस्तकलेचे प्रदर्शन कणेरी मठ येथे आयोजित केले जाणार आहे, तर या सर्व महिलांना इंडो काऊंट रोजगाराची संधी देण्याचे आश्वासन राजेश मोहिते यांनी दिले.

Thursday, February 17, 2022

महाराष्ट्राचे महापिता स्वराजसंकल्पक श्री. शहाजीराजे यांच्या कर्नाटकातील समाधीचा संपूर्ण जीर्णोद्धार डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून करणार

महाराष्ट्राचे महापिता स्वराजसंकल्पक श्री. शहाजीराजे यांच्या  कर्नाटकातील  समाधीचा  संपूर्ण  जीर्णोद्धार डॉ  श्रीकांत  शिंदे  फाउंडेशनच्या माध्यमातून  करणार.  
सातारा दि 18:- प्रणाली वाकडे लिंगायत TV live
महाराष्ट्राचे महापिता स्वराजसंकल्पक श्री. शहाजीराजे यांच्या  कर्नाटकातील  समाधीचा  संपूर्ण  जीर्णोद्धार डॉ  श्रीकांत  शिंदे  फाउंडेशनच्या  माध्यमातून  करणार.  
नगरविकास तथा सार्वजनिक  बांधकाम  मंत्री मा.ना.श्री.एकनाथजी  शिंदे  यांची  घोषणा
कर्नाटकातील होदिगेरे ता.चेन्नागिरी, जि.दावणगेरे येथील  श्री शहाजीराजे  स्मारक  निधी  ट्रस्टला  डॉ  श्रीकांत  शिंदे  फाउंडेशन कडून  ५ लक्ष  रुपयांचा  धनादेश  सुपूर्द
श्री  एकनाथजी  शिंदे  यांनी समितीच्या  पदाधिकाऱ्यांशी video कॉलद्वारे साधला संवाद ; स्मारकाचे  काम  पूर्ण  करण्याची दिली  ग्वाही
महाराष्ट्राचे  महापिता  आणि  स्वराजसंकल्पक  श्री. शहाजीराजे यांची  कर्नाटकस्थित समाधी उघड्यावर  असल्याची  गंभीर  बाब  इतिहास संशोधक  आणि  कादंबरीकार  श्री  विश्वास  पाटील  यांनी समाजमध्यमाद्वारे  निदर्शनास  आणून  दिली  होती. ही  माहिती राज्याचे  नागरविकास व  सार्वजनिक  बांधकाम  मंत्री  श्री  एकनाथजी  शिंदे  यांच्यापर्यंत  पोहोचली असता त्यांनी  तात्काळ  संभाजीकार श्री विश्वास  पाटील  यांच्याशी  आणि  श्री शहाजीराजे  समाधी स्मारक  ट्रस्टशी  संपर्क  साधत या समाधीचा  जीर्णोद्धार  करण्याची  इचछा  व्यक्त  केली. 

गेली साडेतीनशे वर्ष होदिगेरे परिसरात छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी उघड्यावर आहे. स्वराज्य संकल्पकाच्या या समाधीसाठी छत्र उभा रहावे, परिसराचा विकास व्हावा, यासाठी तात्काळ डॉक्टर श्रीकांत शिंदे फ़ाउंडेशन कड़ून पहिल्या टप्पात पाच लाख रुपयांचा धनादेश श्री शहाजी राजे स्मारक विकास समितीकडे सुपूर्द केला. 
इतिहास  संशोधक  व संभाजीकार  विश्वास  पाटील , डॉ श्रीकांत शिंदे  फाउंडेशनचे  सदस्य  मंगेश  नरसिंह  चिवटे, बाजीराव  चव्हाण, प्रशांत  साळुंखे, अतुल  चतुर्वेदी यांच्या हस्ते  श्री शहाजी  स्मारक  अभिवृद्धी सेवा  समितीचे  अध्यक्ष  श्री  मल्लेश  शिंदे  यांच्याकडे  सुपूर्द  केला गेला. 
श्री शहाजी राजे यांच्या समाधी स्थळाच्या विकासासाठी ठोस पावले उचलली गेल्याने स्थानिकांसह महाराष्ट्रातील छत्रपती शहाजी भक्तांनी एकच जयघोष केला. जय शहाजी...जय शिवाजी... जय संभाजी... अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला. दरम्यान समाधीस्थळाचे पूजन पानिपतकार विश्वास पाटील आणि  उपस्थित  सर्व  मान्यवरांच्या  हस्ते  करण्यात  आले. 

यावेळी बंगलोरस्थित शिवभक्त श्री  अतुल चतुर्वेदी  यांनी  श्री  शहाजीराजे  यांच्या  समाधीला खास  बंगलोर  येथून आणलेले  2 भव्य  गुलाबपुष्पहार  अर्पण  केले. आमचे  बंगलोर  शहर  वसविणार्या  श्री शहाजीराजे  यांचा  आम्हाला  सार्थ  अभिमान  आहे  अशी  कृतकृत्य  भावना  श्री  चतुर्वेदी  यांनी  भावना  व्यक्त  केली.

यावेळी श्री. शहाजीराजे भोसले स्मारक अभिवृद्धी सेवा समितीचे सचिव श्री. रामचंद्र राव, सदस्य सर्वश्री श्री.मंजुनाथ पवार, श्री. शामसुंदर सूर्यवंशी,श्री.अन्नोजी राव पवार, श्री सतीश म. पवार, श्री. किरण शिंदे, श्री. सुदर्शन पवार, श्री. प्रशांत भोसले
श्री. गोविंद राजे भोसले , श्री. अन्नोजी राव आदी  उपस्थित  होते.

खानापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे दिव्यांगांना निधीचे वाटप..


खानापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे दिव्यांगांना निधीचे वाटप..
 खानापूर दि 17 :- शिवकुमार कल्याणी लिंगायत TV live प्रतिनिधी
 : देगलूर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने दिव्यांग निधीचे वाटप नुकतेच करण्यात आले. सन २०१४ पासून अपंगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी शासनाच्या ध्येय धोरणानुसार ग्रामपंचायत स्तरावर ५ टक्के निधी राखीव  ठेवण्यात आला आहे. त्याच अनुंगाने खानापूर येथे दि १६ रोजी,  ई.स.२०२१ या वर्षाची ९७ हजार ५०० निधी मंजूर झाला असून गावातल्या एकूण ३९ दिव्यांग लाभार्थ्यांना प्रत्येकी  प्रत्येकी २५०० रुपयांचे वितरण करण्यात आल्याची माहिती मिळाली,   ‌‌दिव्यांग निधीचे ग्रामविकास अधिकारी गणेश कोकणे व सर्व ग्रामपंचायत सदस्य  यांच्या हस्ते वितरण करण्यातआले,हा निधी लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका संघटक उमाकांत अटकळे यांनी मागील अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला असल्याने हा निधी आम्हाला मिळाला असे मत अनेक उपस्थित लाभार्थ्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले,
यावेळी ग्रामपंचायत चे सरपंच,उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी गणेश कोकणे,प्रहार संघटनेचे तालुका संघटक उमाकांत अटकळे, सर्व ग्रामपंचायत सदस्य,  दिव्यांग लाभार्थी तथा गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती होती ..

Tuesday, February 15, 2022

मुंबईत लिंगायत समाजाचा 1 मे रोजी राज्यव्यापी बसव महामेळावा


मुंबईत लिंगायत समाजाचा  1 मे रोजी राज्यव्यापी बसव महामेळावा

जीवनगौरव, समाजभूषण, अक्कमहादेवी व समाजभुषण उद्योजक पुरस्काराचे ही वितरण. 

सातारा दि 15 -लिंगायत महासंघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील वीरशैव लिंगायत समाजाचा राज्यव्यापी बसव महामेळावा रविवार दि 1 मे 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. 
लिंगायत महासंघाच्या वतीने आतापर्यंत सलग नऊ वेळा राज्यव्यापी बसव महामेळावे लातूर येथे  संपन्न झाले आहेत. आता हा दहावा बसव महामेळावा महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील समाजबांधवांच्या उपस्थितीत  होणार असून त्याची जोरदार तयारी लिंगायत महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. हा  लिंगायत समाजाचा राज्यव्यापी बसव महामेळावा  ऐतिहासिक होणार आहे. या महामेळाव्यासाठी  समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. व समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करणार असून समाजाची पुढील काळासाठी रणनीती आखली जाणार आहे. 
    यावेळी लिंगायत समाजातील मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार, समाजभुषण पुरस्कार, अक्कमहादेवी पुरस्कार, व लिंगायत समाजभुषण उद्योजक पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रा सुदर्शनराव बिरादार सर लिखित समग्र महात्मा बसवेश्वर या ऐतिहासिक महा ग्रंथाचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे. तसेच सरसकट लिंगायतांना ओबीसी चे आरक्षण लागू करावे, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा. लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज द्या. मंगळवेढा येथील होणाऱ्या महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम लवकर सुरू करा आदी मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांना देण्यात येणार आहे. 
हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील लिंगायत महासंघ ही संघटना व सर्व पदाधिकारी जोरदार तयारी करणार आहेत. अशी माहिती लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत  कालापाटील यांनी दिली.
कोल्हापूर ज़िल्हा लिंगायत महासंघाचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर ज़िल्यातील सर्व लिंगायत बांधवाना या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.

शिव योगिनी सौ.अर्चना येवले मुख्य समन्वयक पदी निवड .


 शिव योगिनी सौ.अर्चना येवले मुख्य समन्वयक  पदी  निवड. 
..सातारा.. दि.13.. 
..प्रा.अजय शेटे.. वडूज. लिंगायत TV live  प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनातर्फे मंगळवेढा येथे उभारण्यात येत असलेल्या जगत ज्योती म.बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या मुख्य समन्वयक पदी.
वडूज  येथील लिंगायत समाजातील कार्यकर्ते श्री.नितीन गजानन येवले यांच्या पत्नी शिव योगिनी सौ.अर्चना येवले मॅडम यांची निवड करण्यात आली आहे..
..मंगळवेढा हि संतभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.या स्मारका मुळे हि भूमी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल.आणि या पदाच्या माध्यमातून आपण म.बसवेश्वर यांचे आचार विचार व कार्य वृध्दींगत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.असे या निवडीनंतर त्यांनी सांगितले..
..त्यांच्या या निवडीबद्दल वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा 

Monday, February 14, 2022

वडूज हुतात्मा परशुराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सन 2021.22 च्या ई.12 च्या विद्यार्थी..विद्यार्थिनी यांचा शुभ चिंतन सोहळा संपन्न


वडूज हुतात्मा परशुराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सन 2021.22 च्या ई.12  च्या विद्यार्थी..विद्यार्थिनी यांचा शुभ चिंतन सोहळा संपन्न 
..प्रा.अजय शेटे..व डू ज..9823540239.
.. वडूज.. दि.14..येथील हुतात्मा परशुराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात सन 2021.22 च्या ई.12 वी विद्यार्थी...विद्यार्थिनी यांचा शुभ चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला.
..यावेळी अध्यक्ष स्थानी उच्च न्यायालय नियुक्त सदस्य श्री.सतीश शेटे हे होते.त्यांनी विद्यार्थी वर्गाला प्रेरणा दायी मार्गदर्शन केले..
..तसेच यावेळी उपप्राचार्य एम.एस.गोडसे.. ज्युनि.कॉलेज विभाग प्रमुख एस.बी.जाधव.. सौ.आर.आर.बडवे..एस.जी. 
ति वा ट णे.. एन.एस.मगर यांची भाषणे झाली.
..विद्यार्थी..विद्यार्थीनींनी हि कॉलेज बद्दल आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सौ.जे.एस.पाटील..प्रास्ताविक प्रा.ए. व्ही.शेटे..आभार प्रा.सौ.एस. एम.पंडित यांनी मानले..
..कार्यक्रमाला प्रा.पी.एस.कुलकर्णी.. प्रा. आर बी. येलमर सौ.जे. ए.कुलकर्णी..सौ. एम .एस. काळे..सौ. आर. एम.डोंबे..प्रा.सौ. व्ही. व्ही.शेळके..विद्यार्थी..विद्यार्थिनी हजर होते.. को रों ना साथी मध्ये लॉक डाऊन काळात ऑफलाईन..ऑनलाईन शिक्षण घेवून ई.12 वी च्या  बोर्ड परीक्षेला सामोऱ्या जाणाऱ्या या विद्यार्थ्यांना हा कार्यक्रम अतिशय प्रेरणा देवून गेला..

Sunday, February 13, 2022

महाराष्ट्र शासनातर्फे मंगळवेढा येथे उभारण्यात येत असलेल्या जगत ज्योती म.बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या संचालक पदी. श्री. प्रदिप शेटे यांची निवड

 महाराष्ट्र शासनातर्फे मंगळवेढा येथे उभारण्यात येत असलेल्या जगत ज्योती म.बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या संचालक पदी. श्री. प्रदिप शेटे  यांची निवड




महाराष्ट्र शासनातर्फे मंगळवेढा येथे उभारण्यात येत असलेल्या जगत ज्योती म.बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या संचालक पदी. श्री. प्रदिप शेटे यांची  निवड 



..प्रा.अजय शेटे.. वडूज..9823540239.

..सातारा.. दि.13..महाराष्ट्र शासनातर्फे मंगळवेढा येथे उभारण्यात येत असलेल्या जगत ज्योती म.बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या संचालक पदी.

वडूज  येथील लिंगायत समाजातील कार्यकर्ते श्री. प्रदिप तुकाराम शेटे यांची निवड करण्यात आली आहे..

..मंगळवेढा हि संतभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.या स्मारका मुळे हि भूमी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल.आणि या पदाच्या माध्यमातून आपण म.बसवेश्वर यांचे आचार विचार व कार्य वृध्दींगत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.असे या निवडीनंतर त्यांनी सांगितले..

..त्यांच्या या निवडीबद्दल वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा **

महाराष्ट्र शासनातर्फे मंगळवेढा येथे उभारण्यात येत असलेल्या जगत ज्योती म.बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या महासचिव पदी. योगेश नष्टे यांची निवड

 


महाराष्ट्र शासनातर्फे मंगळवेढा येथे उभारण्यात येत असलेल्या जगत ज्योती म.बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या महासचिव पदी. योगेश नष्टे  यांची निवड 



महाराष्ट्र शासनातर्फे मंगळवेढा येथे उभारण्यात येत असलेल्या जगत ज्योती म.बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या महासचिव पदी. योगेश नष्टे यांची  निवड 



..प्रा.अजय शेटे.. वडू ज..9823540239.

..सातारा.. दि.13..महाराष्ट्र शासनातर्फे मंगळवेढा येथे उभारण्यात येत असलेल्या जगत ज्योती म.बसवेश्वर स्मारक कृती समितीच्या महासचिव पदी.

दि घंची  येथील लिंगायत सामाजिक कार्यकर्ते योगेश नष्टे यांची निवड करण्यात आली आहे..

..मंगळवेढा हि संतभूमी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.या स्मारका मुळे हि भूमी महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल.आणि या पदाच्या माध्यमातून आपण म.बसवेश्वर यांचे आचार विचार व कार्य वृध्दींगत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू.असे या निवडीनंतर त्यांनी सांगितले..

..त्यांच्या या निवडीबद्दल वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा **




ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व लिंगायत लोक नेते काकासाहेब कोयटे यांची भेट


 ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व लिंगायत लोक नेते काकासाहेब कोयटे यांची भेट
प्रा.अजय शेटे.. वडूज..9823540239..
..सातारा.. दि.12..महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.हसन मुश्रीफ साहेब यांची लिंगायत संघर्ष समितीचे समन्वयक व महाराष्ट्र शासनाच्या मंगळवेढा येथील  नियोजित म.बसवेश्वर स्मारक समितीचे सदस्य लिंगायत  लोकनेते ओम प्रकाश तथा काकासाहेब कोयटे यांनी कोल्हापूर येथे भेट घेतली.
..यावेळी नियोजित स्मारकाची सरकारी मालकीची  जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी.तसेच जो मंजूर निधी घोषित के ला आहे तो त्वरित वितरीत करण्यात यावा. व इतर अनेक मागण्यांचे निवेदन मा.मंत्री साहेबांची गाठ घेवून देण्यात आले व चर्चा करण्यात आली.
..यावेळी लिंगायत संघर्ष समिती प.महाराष्ट्र कार्याध्यक्षा सरला ताई पाटील..पदाधिकारी प्रदीप वाले ..सांगली ..संजय चित्तारी ..कागल..स्मारकाचे आर्किटेक्ट संजय तोडकर उपस्थित होते.
..यावेळी या सर्व मागण्या मान्य करून कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही मा.मंत्री साहेबांनी या शिष्टमंडळाला दिली..

Saturday, February 12, 2022

हमारा बजाज चे ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे निधन उद्योग जगतात हळहळ

 

हमारा बजाज चे ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे  निधन. उद्योग जगतात हळहळ 



  

हमारा बजाज चे ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे  निधन उद्योग जगतात हळहळ 




 पुणे: दि १२ :- प्रतिनिधी  

देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या बजाज समूहाची धुरा तब्बल ४० वर्षे यशस्वीरित्या वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती व बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज  यांचे 
 पुण्यात निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राहुल बजाज यांच्या निधनामुळे एक संवेदनशील व समाजाशी नाळ जुळलेला उद्योजक हरपला आहे, अशी भावना देशभरात व्यक्त होत आहे.

नॉन कोविड न्यूमोनियामुळे त्रस्त असलेल्या राहुल बजाज यांच्यावर मागील १५ दिवसांपासून रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. न्यूमोनियामुळे त्यांचे फुफ्फुस हळूहळू निकामी होत गेले. त्यानंतर हृदयक्रियेवर परिणाम झाल. वृद्धापकाळामुळे त्यांचे शरीर उपचारांना साथ देत नव्हते. त्यामुळं त्यांची प्रकृती उत्तरोत्तर खालावत गेली आणि आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. बजाज समूहाने निवेदन प्रसिद्धीस देऊन त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

कोलकात्यातील एका उद्योजक कुटुंबात १० जून १९३८ रोजी राहुल बजाज यांचा जन्म झाला होता. वडील कमलनयन बजाज यांच्याकडून त्यांना उद्योगाचा वारसा मिळाला होता. राहुल बजाज यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली होती. हॉवर्ड विद्यापीठातून त्यांनी 'एमबीए'चं शिक्षण पूर्ण केलं होतं. १९६५ साली राहुल बजाज यांनी आपल्या पारंपरिक उद्योगाची धुरा हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोने नेत्रदीपक प्रगती केली. कंपनीची उलाढाल ७.२ कोटींवरून तब्बल १२ हजार कोटींवर पोहोचली. त्यांच्याच कार्यकाळात बजाज कंपनीने दुचाकी विक्रीमध्ये देशातील आघाडीची कंपनी बनण्याचा मान मिळवला. तब्बल ४० वर्षे त्यांनी उद्योगाचे नेतृत्व केले.2001 मध्ये पद्मभूषण मिळाले होत त्यानंतर २००५ साली त्यांनी आपले सुपुत्र राजीव बजाज यांच्याकडं कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे सोपवली. तोपर्यंत बजाज कंपनीने आंतरराष्ट्रीय बाजारातही आपले बस्तान बसवले होते.

उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी २००१ साली राहुल बजाज यांना 'पद्मभूषण' पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. २००६ ते २०१० या कालावधीत त्यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम पाहिलं होतं. रोखठोक स्वभाव असलेल्या बजाज यांचे सर्वच राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध होते

Tuesday, February 8, 2022

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व प्रेरणा ताई होनराव यांची खास भेट


 केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी व प्रेरणा ताई होनराव यांची खास भेट 
..प्रा.अजय शेटे.. वडूज..
..सातारा दि.8..भा.ज.पा.युवा मोर्चा प्रदेश सचिव तथा प्रदेश प्रवक्त्या प्रेरणा ताई उमाकांत होनराव यांनी संपूर्ण भारताला रस्त्यांच्या जाळ्यात विणून या नवीन  युगाचा दळण वळणा साठी आरंभ करणारे रोडकरी तथा केंद्रीय परिवहन मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांची दिल्ली येथे त्यांच्या निवासस्थानी खास भेट घेतली.


या वेळी मा मंत्री साहेबांनी  ताईंची वेगवेगळ्या विषयांवर अतिशय कुतूहलाने विचारपूस करून योग्य चर्चा व मार्गदर्शन केले.यावेळी नितीन दिनकर जी पण उपस्थित होते.या भेटीमुळे अनेक संकल्प पूर्ततेला जाण्याचा आनंद प्राप्त होईल.असे सौ.प्रेरणा ताई यांनी यावर बोलताना सांगितले..

कराड येथील श्रीमती रजनी सुपनेकर यांचे दुःखद निधन.


कराड येथील श्रीमती  रजनी  सुपनेकर यांचे  दुःखद निधन .
कराड दि . 8 प्रतिनिधी 
   कराड येथील श्रीमती    रजनी  सुपनेकर यांचे   दुःखद निधन कराड येथील सुपनेकर ऑइल मिल आणि लिंगायत समाजातील जेष्ठ कार्यकर्ते कै.मधुकर सुपनेकर यांच्या पत्नी  
         श्रीमती    रजनी  सुपनेकर यांचे  सोमवार दि 7 रोजी  दुःखद निधन  असून                                 कैलासवासी रजनी मधुकर सुपनेकर यांची *तिसऱ्या दिवशीची पूजा* (शिवगण आराधना) बुधवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता कराड येथे कमळेश्वर मंदिर, लिंगायत स्मशानभूमी येथे करण्यात येणार आहेत , तरी आपण सर्वांनी या प्रसंगी उपस्थित राहावे ,त्याचे मागे 2 मुले सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांना समस्त लिंगायत समाज कराड आणि उंब्रज यांचे वतीने भावपूर्ण श्रद्धांजली


Monday, February 7, 2022

वीरशैव लिंगायत समाजातील प्रतिष्ठित नागरिक व विटा बँक को ऑ.बँकेचे व्हॉईस चेअरमन लक्ष्मण पिलोबा येवले .(बापू )यांचे दुःखद निधन


वीरशैव लिंगायत समाजातील प्रतिष्ठित नागरिक व विटा बँक को ऑ.बँकेचे व्हॉईस चेअरमन लक्ष्मण पिलोबा येवले .(बापू )यांचे  दुःखद निधन.
वडूज.. दि.8..येथील  वीरशैव लिंगायत समाजातील प्रतिष्ठित नागरिक व विटा बँक को ऑ.बँकेचे व्हॉईस चेअरमन लक्ष्मण पिलोबा येवले ..बापू यांचे अल्प आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी दुःखद निधन झाले..ते जुन्या काळातील चार्टर्ड अकाउंट र होते..परंतु घरच्या मोठ्या किराणा व्यवसायामुळे त्यांनी आपले सर्व लक्ष स्वतःच्या व्यापार हिशोबाकडे वळवले होते..ते लायन्स क्लब चे पदाधिकारी होते.तसेच सन्मित्र मित्र मंडळ चे मा.अध्यक्ष होते.येथील येवले & फर्मस चे सर्वेसर्वा होते.त्याच्या पाठीमागे पत्नी..तीन मुली असा परिवार आहे..त्यांना लिंगायत टिव्ही व वीरशैव लिंगायत समाज संघटने तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Sunday, February 6, 2022

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर.


लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर.
अहमदनगर  दि 6:- लिंगायत TV लिव्ह प्रतिनिधी ॲड. शितल बेद्रे 
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा; सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार सात फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि सहा फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक सात फेब्रुवारी  रोजी राज्यात  दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

Saturday, February 5, 2022

भारताचा सूर आज हरपला , गान कोकिळे च स्वर आकाशवाणी बनून अनंतात विलीन..ख्यात नाम पार्श्व गायिका लता मंगेशकर काळाच्या पडद्यामागे


 भारताचा सूर आज हरपला , गान कोकिळे च स्वर आकाशवाणी बनून अनंतात विलीन..ख्यात नाम पार्श्व गायिका लता मंगेशकर काळाच्या पडद्यामागे , 
सातारा दि 6 :-   प्रतिनिधी विशेष लेख प्रा.अजय शेटे.. वडूज.
 गान कोकिळे च स्वर आकाशवाणी बनून अनंतात विलीन..ख्यात नाम पार्श्व गायिका लता मंगेशकर काळाच्या पडद्यामागे 
भारताची गानकोकिळा म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या ख्यातनाम पार्श्व गायिका लता मंगेशकर यांचा जन्म 20 सप्टेंबर 1929 मध्ये मध्य प्रदेश राज्यातील इंदोर या वी गावी झाला होता.
त्यांचे कुटुंबीय हे भारतातील सर्वात प्रसिद्ध कुटुंब म्हणून ओळखले जाते.त्यांचे आजोबा गणेश भट हे कऱ्हाडे ब्राम्हण होते.त्यांचे मूळ नाव हर्डीकर होते .परंतु गोवा राज्यातील मंगेशी या गावातील  श्री मंगेशी या प्रसिद्ध देवस्थान चे नावावरून त्यांनी आपले नाव मंगेशकर असे केले होते.
..त्यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म 28 डिसेंबर 1900 रोजी मंगेशी..गोवा येथे झाला होता.ते शास्त्रीय संगीतकार व गायक होते.त्यांचे पहिले लग्न हे गुजराथ येथील थालमेंर चे  व्यापारी हरिदास रामदास लाल यांच्या नर्मदा या मुलीशी झाला होता.पण ती अकाली मृत झाल्यामुळे तिचीच दुसरी लहान बहिण शेवंती हिच्याबरोबर वी त्यांचे दुसरे लग्न झाले.याच पुढे माई मंगेशकर म्हणून परिचित झाल्या.या दाम्पत्याला लता..उषा.. आशा..मीना व हृदयनाथ अशी पाच अपत्ये झाली.लता यांचे पाळण्या तील नाव 'हृद या' होते..नंतर ते ' हेमा ' असे झाले. व परत वयाच्या ६ व्या वर्षी ' लता ' हे नाव ठेवण्यात आले.
.. मा स्टर दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय संगीत नाटक करायचे त्यात त्यांनी लता यांना पहिल्यांदा बालकलाकार म्हणून अभिनयाची संधी दिली. व शास्त्रीय गायन व संगीत यांचे बाळकडू पाजले.
..1942 साली  मा.दिनानाथ हे अकाली निर्वतले.आणि वयाच्या 13 व्या वर्षी सर्व कुटुंबाची जबाबदारी लता मंगेशकर यांचेवर आली.तेथून पुढे या कुटुंबाला आधार देण्याचे कार्य मा.विनायक दामोदर कर्नाटकी यांनी केले. लता मंगेशकर यांच्यासह सर्वांचा सांभाळ त्यांनी केला. व लता यांना  1942 साली वयाच्या 13 व्या वर्षी ' पहिली मंगला गौर या चित्रपटातील  ' किती हसाल ? ' या मराठी गाण्याचे पार्श्व गायन करण्याची महत्वाची संधी प्राप्त करून दिली.
..पुढे ' मजबूर ' या हिंदी चित्रपटात त्यांना ' दिलं मेरा थोडा ' हे गाणे गाण्याची संधी त्यांना मिळाली.त्यांनी 1942 पासून आजपर्यंत जवळजवळ 20 मराठी व 980 हिंदी चित्रपटांसाठी पार्श्व गायन केले. त्यांच्या या यशात उस्ताद अमानिता खान..गुलाम हैदर..अनिल विश्वास..शंकर जयकिशन ..सलील चौ ध री या गीतकार व संगीतकार  यांचा वाटा खूप मोठा ठरला .त्यांनी मीनाकुमारी..वैजयंती माला..नर्गिस..मधुबाला पासून काजोल..माधुरी दीक्षित..ऐश्वर्या रॉय पर्यंत सर्व वयाच्या नायिकांना आपल्या जादुई आवाजाने यशाच्या शिखरावर पोहचवले.' दो आंखे बारा हात.. मुगले आझम..पासून ते हम आपके हैं कौन ' या चित्र पटा पर्यंत त्यांनी अनेक लोकप्रिय गाणी गीत रसिकांना दिली.' सत्यम..शिवम..सुंदरम ' या  गाण्याने त्यांना लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोहचवले..सन 1974 ते 1991 या काळात गाण्यांच्या ध्वनी मुद्रण   क्षेत्रात  त्यांचे नाव 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड  रेकॉर्ड ' मध्ये नोंदवले गेले..
. . लता मंगेशकर या आयुष्यभर अविवाहित राहिल्या..त्याच्या अनेक कथा चित्रपट क्षेत्र व प्रसार माध्यमांनी सांगितल्या..सन 1935 मध्ये जन्मलेल्या व त्यांचा पेक्षा वयाने 6  वर्षे लहान असलेल्या व त्यांचे लहान भाऊ प.हृदयनाथ मंगेशकर यांचे मित्र असलेल्या राजस्थान येथील डूनंगुर पुर राजघरण्यातील क्रिकेट खेळाडू  महाराजा राज सिंग यांचे बरोबर त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. पण लता या राज घराण्यातील नसल्यामुळे त्यांचा विवाह होऊ शकला नाही..पुढे त्यांच्यावरील प्रेमापोटी महाराजा राज सिंग हे पण अविवाहित राहिले.पुढे आसाम चे प्रसिद्ध गायक भूपेन हजारिका यांच्या बरोबरही त्यांच्या लग्नाचा असफल प्रयत्न झाला.  पुढे  मोठ्या असल्यामुळे त्यांनी कुटुंबाची जबाबदारी ओळखून  कायम अविवाहित राहण्याचा निर्णय कायम ठेवला..
..त्यांना 1989 साली भारत रत्न..2001साली दादासाहेब फाळके अवॉर्ड ..फिल्म फेअर..पद्मभूषण..पद्मविभूषण व इतर असे सर्व मानाचे पुरस्कार प्राप्त झाले. 
..त्यांनी महमद रफी यांच्या बरोबर सर्वाधिक गाणी गायली पण अचानकपणे त्या त्यांच्या पासून ही  दूर गेल्या व पुढे कायम दोघात अबोला राहिला. त्यानंतर मुकेश..किशोर कुमार..  म न्ना डे..हेमंतकुमार.. सुधीर फडके..रवींद्र साठे..यांच्या बरोबरही गाणी गायली.
त्यांनी एकूण 36 भारतीय भाषा व परदेशी भाषांमध्येही गाणी गायली आहेत..इंग्लंड मधील जगप्रसिद्ध अशा ' अल्बर्ट हॉल ' मध्ये गायनाचा कार्यक्रम करणाऱ्या त्या एकमेव भारतीय गायिका ठरल्या आहेत..
..त्यांच्या  पश्चात लहान बहिणी आशा भोसले..मीना खडीकर..उषा मंगेशकर व हृदयनाथ मंगेशकर यांनी ही आपल्या घराण्याची संगीत साधना लता दीदींच्या पावलावर पाऊल ठेवून आदर्श रित्या पुढे चालू ठेवली..
..त्यांचे ठाकरे कुटुंबीय व राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांच्याशी विशेष जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत..
..त्यांनी ' आता विसाव्याचे क्षण ..माझे सोनियाचे मनी ' हे शेवटचे मराठी गाणे 2020 साली गाऊन आपली गायन क्षेत्रातील तब्बल 60 वर्षाची कारकीर्द थांबवली..
..आज रविवार दि.6 रोजी सकाळी 9 वा.मुंबई येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात लता दिंदिंचे निधन झाले..गेली 27 दिवस त्यांच्यावर न्युमोनिया व कोरोना आजारावर उपचार चालू होते..शेवटी ईश्वर इच्छेपुढे कोणाचा इलाज चालत नाही. लता दीदी यांच्या आत्म्यास शांती लाभो व त्यांना सद्गती लाभो.त्यांच्या महान पार्श्वगायन कार्यास समस्त भारत वासियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.. व विनम्र अभिवादन **

Thursday, February 3, 2022

तरुण, शेतकरी व उद्योजकांना दुर्लक्षित करणारा अर्थसंकल्प - पृथ्वीराज चव्हाण




 तरुण, शेतकरी व उद्योजकांना दुर्लक्षित करणारा अर्थसंकल्प - पृथ्वीराज चव्हाण 
 पुणे : दि 3 प्रतिनिधी  प्रणाली वाकडे
मागील दोन वर्षात कोरोनाच्या दोन्ही लाटांना सामोरे जावे लागले तरीदेखील देशाची आर्थिक बाजू सक्षम करण्यासाठी काहीच बोध घेतला गेला नसल्याचा आजच्या अर्थसंकल्पातून दिसून येते. जुन्या योजना, पुन्हा एकदा डिजिटायझेशन आणि ब्लॉकचैन, ऍग्रीटेक असे शब्द वापरुन आधुनिकीकरणाचा मुलामा देण्याचा प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केलेला दिसून येतो.  देशातील तरुण, शेतकरी व उद्योजकांना दुर्लक्षित करणारा हा अर्थसंकल्प असल्याची  टीका माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

 *यापुढे श्री. चव्हाण म्हणाले कि,* कोरोना महामारीपूर्वीपासूनच देश आर्थिक आरिष्टात सापडला आहे. यामधून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी मोदी सरकारने खर्च कमी करणे, कर वाढवणे, अनुदान कमी करणे आणि शासकीय मालमत्ता विक्रीस काढणे या चतु:सूत्रीचा वापर सुरू केला आहे. आजच्या अर्थसंकल्पाचे विश्लेषण याच दृष्टिकोनातून करावे लागेल. 

अर्थसंकल्पात एकूण खर्चात जरी वाढ दाखवली असली तरीदेखील गरिबांना देण्यात येणाऱ्या तीन मुख्य अनुदानात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. अन्न, खते आणि इंधनावरील अनुदानात एकत्रितपणे १ लाख १५ हजार कोटी रुपयांची कपात केली आहे. त्याचसोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेली मनरेगा योजनेच्या तरतुदीत २५ हजार कोटींची कपात करण्यात आली आहे. हे अनुदान कमी केल्याचा थेट फटका देशातील गरीब जनतेवर पडणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अन्न-धान्यांच्या किमती तसेच खते आणि इंधनांच्या किमतीत आणखी वाढ होईल.

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे एकंदरीत महागाई वाढली असून जनसामान्यांचे रोजचे जीवन कठीण झाले आहे. यासंदर्भात कर कमी करून उपाययोजना करण्याऐवजी अनुदानच कमी केले आहे. यावरूनच मोदी सरकारचा प्राधान्यक्रमात गरिबांना किती स्थान आहे हे कळून येते. याशिवाय देशातील तरुण, शेतकरी आणि उद्योजक हे तीनही वर्ग कोरोनाच्या लाटेत उद्ध्वस्त झाले असून त्यांच्यासाठी या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद करण्यात आलेली दिसून येत नाही.  

याशिवाय आजच्या अर्थसंकल्पात शहरात रोप-वे, ई-पासपोर्ट इत्यादि दिखाऊ घोषणांची सरबत्ती करण्यात आली आहे. शहरातील मूलभूत सोयी-सुविधा किंवा मोठा गाजावाजा करून राबवण्यात आलेली स्मार्ट सिटी योजना कितपत यशस्वी झाली याबाबत एक शब्दही ऐकायला मिळत नाही.

Wednesday, February 2, 2022

चित्रपट सृष्टी तला देव हरपला....अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड..


 चित्रपट सृष्टी तला देव हरपला..
..अभिनेते रमेश देव काळाच्या पडद्याआड..
सातारा दि 3 :- .प्रा.अजय शेटे.. वडूज. लिंगायत TV live प्रतिनिधी
..सातारा.. दि..सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1929 रोजी कोल्हापूर येथे झाला होता.' जगाच्या पाठीवर ' हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट होय.अभिनेत्री सीमा यांच्या बरोबर त्यांनी पहिल्यांदा एकत्र काम केले होते.1962 मध्ये ' वरदक्षिणा ' या चित्रपटात काम करताना दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले आणि त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी लग्न केले. 2013 साली दोघांच्या लग्नाचा पन्ना सावा वाढदिवस त्यांनी अतिशय मोठ्या कार्यक्रमाने साजरा केला होता.
..अभिनेते रमेश देव यांनी मराठी व हिंदी अशा एकूण 280 चित्रपटात अभिनेता..सह अभिनेता..चरित्र अभिनेता म्हणून विक्रमी भूमिका साकार करून त्या गाजवल्या..अनेक मराठी टिव्ही मालिकांमधून पण त्यांनी अभिनयाचे काम केले..
..मेहबूबा..सरस्वती चंद्र..जीवन मृत्यू..दर्पण..संजोग..मेरे अपने हलचल..गीता मेरा नाम..जमीर..फकिरा.. यहा हैं जिंदगी..खुद्दार..मिस्टर इंडिया या हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.' आनंद ' चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या बरोबरची त्यांची भूमिका विशेष अजरामर ठरली.
..' आंधळा मागतो एक डोळा..गाठ पडली ठका ठक..देवघर.. साता जन्माची सोबती..उमज पडेल तर..पैश्याचा पाऊस..जगाच्या पाठीवर..सुवासिनी..माझी आई..बाबा होशील का ?.. चिमुकला पाहुणा..स्वप्न तेच लोच नी..गोष्ट लग्नानंतरची..वासुदेव बळवंत फडके 'हे त्यांचे मराठी चित्रपट पण खूप गाजले.त्यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांचा ' सर्जा ' हा मराठी ऐत्याहसिक चित्रपट पण खूप गाजला..
..आपल्या अभिनयाने त्यांनी रुपेरी पडद्यावरील नायकाला अधिक रुबाबदार बनवून सोडले..अशा हरहुन्नरी ..गुणी मराठी अभिनेत्याचे वयाच्या 93 व्या वर्षी मुंबई येथे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.आणि एका दर्जेदार अभिनय पर्वाचा अस्त झाला..त्यांना सर्व चित्रपट रसिक आणि लिंगायत TV live परिवाराचे  कडून भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या अभिनय कार्यास विनम्र अभिवादन 

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...