Wednesday, August 31, 2022

श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे श्रावणमास तपोनुष्ठान भक्तीभावात संपन्न भक्तांनी दिलेली 16 लाखाची गुरुदक्षिणा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी प्रदान

 

श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे श्रावणमास तपोनुष्ठान भक्तीभावात संपन्न भक्तांनी दिलेली 16 लाखाची गुरुदक्षिणा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी प्रदान 



श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे श्रावणमास तपोनुष्ठान भक्तीभावात संपन्न भक्तांनी दिलेली 16 लाखाची गुरुदक्षिणा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी प्रदान 




पुणे दि ३०  : प्रसाद वाकडे प्रतिनिधी 

श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचा 32 वा श्रावणमास तपोनुष्ठान पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्समध्ये संपन्न झाला. ओम नमः शिवाय प्रतिष्ठान आणि काशी जगद्गुरू तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा अनुष्ठान सोहळा 32 दिवस चालला.

          दररोज सकाळी इष्टलिंग महापूजा, संध्याकाळी सिद्धांत शिखामणी ग्रंथावर आध्यात्मिक आशीर्वचन परमपूज्य महास्वामीजी देत होते. या सोहळ्यात १० ऑगस्ट रोजी काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचा जन्म अमृतमहोत्सव तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

             याप्रसंगी भक्तांनी 1 रुपयापासून 1 लाख रुपयांपर्यंत गुरुदक्षिणा महास्वामीजींच्या चरणी अर्पण केली. ही रक्कम एकूण 16 लाख रुपये झाली. महाराष्ट्रातील गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी ही रक्कम शिष्यवृत्ती म्हणून देण्याची घोषणा महास्वामीजी यांनी याप्रसंगी केली.

            तसेच याप्रसंगी महास्वामीजी यांच्या १२ भक्तांनी १२ विद्यार्थ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये शिष्यवृत्ती म्हणून निरंतर देण्याचा संकल्प केला. अनुष्ठान सोहळ्याची फलश्रुती म्हणजे गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची चिरंतन व्यवस्था होय. काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी २००२ पासून विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा प्रारंभ लातूर येथे केला. भारतातील विविध प्रांतातील ५०० विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ आजपर्यंत घेत आहेत. ही संख्या भविष्यात वाढविण्याची इच्छा महास्वामीजींनी याप्रसंगी व्यक्त केली.

           तपोनुष्ठान समाप्ती प्रसंगी काशीपीठाचे नूतन जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचा अड्डपालखी सोहळा मोठ्या भक्तीभावाने संपन्न झाला. हजारो महिला पंचपीठाचा वेश परिधान करून कलश, आरतीसह या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. ढोल, ताशा यासह अनेक पारंपरिक वाद्यासह हजारो भक्तगण सहभागी झाले होते. भारतातील विविध प्रांतातील 25 हून अधिक शिवाचार्यगण यावेळी उपस्थित होते. 

            महास्वामीजींच्या जन्म अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 'विभूती वैभव' विशेषांकाचे प्रकाशन झाले. तपोनुष्ठान सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रातील 8 मान्यवरांना काशीपीठाच्या वतीने पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. काशीपीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

         पिंपरी चिंचवड येथील सामाजिक कार्यकर्ते महेश स्वामी यांनी या सोहळ्याचे नेतृत्व केले. चिंचवडे लॉन्सचे खंडूशेठ चिंचवडे यांनी या समारंभासाठी चिंचवडे लॉन्स सवलतीच्या दरात देऊन सहकार्य केले. श्रावण मास अनुष्ठान यशस्वीतेसाठी ओम नमः शिवाय प्रतिष्ठान आणि तपोनुष्ठान आध्यात्मिक समिती यांचे पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

      


फोटो ओळी : श्री काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या श्रावणमास तपोनुष्ठान समारोपप्रसंगी नूतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य, मंद्रूपचे रेणुक शिवाचार्य व उपस्थित शिवाचार्यगण

Tuesday, August 30, 2022

निवृत्त शिक्षक नानासाहेब जाधव यांचे निधन



निवृत्त शिक्षक नानासाहेब जाधव यांचे निधन







                                           निवृत्त शिक्षक नानासाहेब जाधव यांचे निधन





उंब्रज दि 30 :- प्रतिनिधी
  उंब्रज गावचे रहिवाशी व  कापील (ता. कराड) येथील सेवानिवृत्त शिक्षक नानासाहेब भाऊसो जाधव (वय ८५) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. नाना मास्तर म्हणून ते परिचित होते. बालरोग तज्ज्ञ डॉ. अभय जाधव आणि दै. लोकतमतचे उंब्रज प्रतिनिधी अजय जाधव यांचे ते वडील होत. 
ते जुन्या पिढीतील प्राथमिक शिक्षक होते. फलटण तालुक्यात त्यांनी शिक्षकी सेवेला प्रारंभ केला. त्यानंतर मेढा आणि कराड तालुक्यातील चरेगाव, उंब्रज येथे सेवा बजावली. तालुका मास्तर पदावरून ते निवृत्त झाले होते. नोकरीच्या निमित्ताने ते उंब्रज (ता. कराड) येथे स्थायिक झाले होते.

 मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. उंब्रजमधील मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर कापील या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. रक्षा विसर्जन विधी गुरूवारी (दि. १ सप्टेंबर) सकाळी १० वाजता कापील येथे होणार आहे.

सौ.शोभा खलिपे यांच्या सेवानिवृत्तीने शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण होणार - तुकाराम साठे


     सौ.शोभा खलिपे यांच्या सेवानिवृत्तीने शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण       होणार - तुकाराम साठे




 सौ.शोभा खलिपे यांच्या सेवानिवृत्तीने शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण होणार - तुकाराम साठे



कडेगाव दि :- प्रसाद वाकडे प्रतीनिधी 

जि.प.शाळा नेवरीच्या विद्यमान वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ.शोभा खलिपे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त जिल्हा परिषद शाळा नेवरी येथे सत्कार समारंभ संपन्न झाला. सौ.शोभा खलिपे या शिक्षण क्षेत्रातील 36 वर्ष 6 महिन्याच्या प्रदीर्घ सेवेतून 31 ऑगस्ट 2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत, त्यानिमित्ताने जि.प.शाळा नेवरी, शा.व्य.स.नेवरी, ग्रामपंचायत नेवरी व ग्रामस्थ यांच्याकडून सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस सांगली जिल्हा सरचिटणीस मा.जगदीश महाडिक, शा.व्य.स.अध्यक्षा सौ.दिपाली महाडिक, उपाध्यक्ष मा.मुकुंद महडिक व सर्व सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.






यावेळी बोलताना सहकारी शिक्षक तुकाराम साठे म्हणाले, की सौ.शोभा खलिपे या खरोखरच आदर्श शिक्षिका आहेत. त्या नेवरी शाळेत आल्या आणि शाळा नावारूपाला आली. शिक्षण क्षेत्रासोबत त्यांचे सामाजिक क्षेत्रात देखील नेहमीच सक्रिय असतात. सौ.शोभा खलिपे यांच्यासारख्या अनुभवी व आदर्श व्यक्तिमत्त्वाच्या सेवानिवृत्तीने शिक्षण क्षेत्रात पोकळी निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.


यावेळी मा.श्रीकांत खलिपे, शा.व्य.स.माजी अध्यक्ष मा.सचिन महाडिक, शा.व्य.स.माजी अध्यक्ष मा.रमेश महाडिक, मा.दत्तात्रय पाटील, मा.सुनील कुंभार, मा.चित्रा सूर्यवंशी, मा.सोमनाथ महाडिक, मा.राहुल सुकटे, मा.अश्विनी महाडिक, मा.पूजा सकट, मा.विश्र्वशिला महाडिक, मा.जयश्री ढवळे, पत्रकार मा.अरुण साळुंखे, मा.रामचंद्र साळुंखे सर्व सेवा सोसायटी सदस्य, अँड.अंश खलिपे, दादा ढवळे - मुख्या,जि.प.शाळा येतगाव, पुष्पाताई सावंत-मुख्या,जि.प.शाळा तुपेवाडी (ये), तसेच नेवरी शाळेतील शिक्षिका वनिता बाबर, दिपाली उडखेडे, भारती कांबळे, नेवरी केंद्रातील शिक्षक, नेवरी ग्रामस्थ व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन महाकू ढवळे यांनी केले.




Thursday, August 25, 2022

रामेश्वरमध्ये होणार काशीपीठाच्या शाखामठाची स्थापना : श्री काशी जगद्गगुरू

रामेश्वरमध्ये होणार काशीपीठाच्या शाखामठाची स्थापना : श्री काशी जगद्गगुरू
सातारा दि 25  :  प्रसाद वाकडे लिंगायत TV live प्रतिनिधी

तमिळनाडूमध्ये वीरशैव समाज 50 लाखापेक्षा जास्त आहे. समाजाला मार्गदर्शन करून वेळोवेळी संस्कार देण्यासाठी, धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी तमिळनाडूत मठ नाही ही गरज ओळखून रामेश्वर येथे काशीपीठाची शाखा मठ निर्माण करणार असल्याची माहिती काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी दिली.
           या मठामध्ये गुरुकुल, वेद पाठशाळा, यात्री निवास निर्माण करण्याचा संकल्प महास्वामीजींनी केला आहे. काशी महास्वामीजींनी रामेश्वर यात्रा करून सर्व स्थळांना भेटी दिल्या. तेथील मुख्य बसस्थानकासमोर हायवे लगत एक एकर जमीन घेण्याचे महास्वामीजींनी निश्चित केले आहे.  
          दिवाळीमध्ये ही जमीन खरेदी करून महास्वामीजी भक्तांना दिवाळी भेट देणार आहेत. या मठात भक्त, शिवाचार्य, महास्वामीजी निवास, अन्नछत्र होणार आहे. नूतन काशी जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य  महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बागलकोट येथील बसवेश्वर वीरशैव विद्यावर्धक संघाचे चेअरमन तथा बागलकोटचे आमदार वीरण्णा चरंतीमठ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती निर्माण करून याचा विकास करण्याचा निर्धार केल्याचे काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.
       काशी महास्वामीजींनी कर्नाटकातील गदग बिसनळ्ळी येथे पीठाची शाखा काढून वेद पाठशाळेचा प्रारंभ केला आहे. तेलंगणा, आंध्राच्या भक्तांसाठी हैदराबादजवळ शादनगर येथे गुरुकुल आणि शाखा मठाची स्थापना केली आहे. केरळ येथील कोल्लम जिल्ह्यात जंगमवाडी मठाची स्थापना झाली आहे. केरळमध्ये पंधरा लाखाहून अधिक वीरशैव समाज आहे. महाराष्ट्रातील लातूर येथे वेद पाठशाळा, मंदिर स्थापन करून त्या माध्यमातून जनप्रबोधन सुरू आहे. पूर्व जगद्गुरूंनी स्थापन केलेले पुण्यातील शाखा मठ सध्या कार्यरत आहे.
              उत्तर भारतात हरियाणातील कुरुक्षेत्रामध्ये पेहवा क्षेत्रात सरस्वती नदीकाठी प्राचीन जंगमवाडी मठ आहे. या मठाचा जीर्णोद्धार काशी महास्वामीजींनी केला आहे. तेथे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन महास्वामीजी करीत आहे. प्रत्येक राज्यात काशीपीठाची शाखा मठ स्थापन करून तेथील सद्भक्तांना वेळोवेळी धर्म संदेश, संस्कार देण्याचा महास्वामीजींचा उद्देश आहे.

             काशी रामेश्वर यात्रा करणारे हजारो भक्त असतात. काशीहून रामेश्वर, रामेश्वरहुन काशी अशी यात्रा करण्याची परंपरा आहे. काशी जंगमवाडी मठामध्ये यात्रेकरूंसाठी सुसज्ज व्यवस्था आहे. याप्रमाणे रामेश्वर येथे देखील पाच हजार भक्तांसाठी निवास आणि प्रसाद व्यवस्था करण्याची महास्वामीजींची योजना आहे.

             ही योजना तयार झाल्यानंतर भक्तांसमोर ठेवण्यात येईल. या नूतन योजनेमध्ये भक्तांनी आपापल्या परीने सेवा करावी. योजना पूर्ण करण्यासाठी सर्वांनी संकल्प करण्याचे आवाहन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी केले आहे.

नवी मुंबईत लिंगायत समाजाचा ‘श्रावण संध्या’ कार्यक्रम उत्साहात साजरा.शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी ने आयोजित केले होते कार्यक्रम.


नवी मुंबईत लिंगायत समाजाचा ‘श्रावण संध्या’ कार्यक्रम उत्साहात साजरा.
शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी ने आयोजित केले होते कार्यक्रम.
नवी मुंबई दि 23 :  महादेव मेंडगिरी  प्रतिनिधी
नवी मुंबई, पनवेल, ठाणे आणि मुंबई परिसरात राहणारा लिंगायत समाज एकत्रित यावा आणि लिंगायत धर्म विचार तथा संस्कार आपल्या कुटुंबामध्ये रुजावेत यासाठी शरण संकुल चॅरिटेबल सोसायटीच्या वतीने दरवर्षी पवित्र श्रावण महिन्यामध्ये ‘श्रावण संध्या’ ह्या कौटुंबिक कार्यक्रमाचे आयोजन करत असते. यावर्षी सुद्धा रविवार दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी नवी मुंबई येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये ‘श्रावण संध्या’ कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडले. 
आपल्यातील असणाऱ्या सुप्त कलेला आणि आपल्यातील प्रतिभेला वाव देण्यासाठी शरण संकुल संस्थेने सर्वांसाठी ‘श्रावण संध्या’ च्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठावर परिवारातील अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ सदस्यांना यात भाग घेत येतो, चित्रकला स्पर्धा, वचन गायन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा वगैरे अनेक स्पर्धेचे आयोजन केले गेले होते,
 या स्पर्धेमध्ये अनेकांनी भाग घेऊन सर्व उपस्थितांसमोर आपली कला सादर केली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री रसिका धामणकर (स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘लग्नाची बेडी, फेम राघवची आई राजश्री) उपस्थित होत्या, 
सन्माननीय पाहुणे म्हणून मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी (विशेष कार्य अधिकारी) व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे प्रमुख श्री मंगेश चिवटे उपस्थित होते. प्रसिद्ध लेखक, पत्रकार शरण साहित्य अध्यासन केंद्राचे प्रमुख श्री चन्नवीर भद्रेश्वरमठ यांना प्रमुख वक्ते म्हणून आमंत्रित केले होते, या सर्वांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.

 समाजात अंधश्रद्धा कशी भिनत जाते आणि त्याला आपण कसे बळी पडत गेलो याचे अतिशय सुलभ पद्धतीने श्री चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी विवेचन केले. महात्मा बसवेश्वरांनी म्हणूनच कर्मकांड पोथी पुराण यांना नाकारत श्रमाला महत्व दिले आणि सर्वसमावेशक समानतेची विचारधारा समाजामध्ये वचन साहित्यद्वारे रुजवली असे श्री चन्नवीर भद्रेश्वरमठ यांनी आपल्या भाषणात सांगितले. प्रसिद्ध अभिनेत्री रसिक धामणकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लहान मुले आणि महिलांचा उत्साह पाहून भारावून गेले. मुंबई सारख्या मोठ्या शहरात लिंगायत समाजाला एकत्र आणण्याचे खूप मोठे कार्य शरण संकुल ही संस्था अतिशय प्रामाणिकपणे करत असल्याचे पाहून खूप अभिमान वाटल्याचे अभिनेत्री रसिका धामणकर यांनी सांगितले. मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष चे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले की, आपल्या समाज बांधवांकडून सन्मान होणे हा खरंच माझ्यासाठी गौरवस्पदाचा क्षण आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षच्या माध्यमातून समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत वैद्यकीय सुविधा मोफत पोहोचविण्याचे कार्य मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने निरंतर रुग्ण सेवा कार्य चालू असल्याचे असे श्री मंगेश चिवटे यांनी सांगितले. शरण संकुल च्या “शिक्षण निधी’ ला श्री मंगेश चिवटे यांनी त्वरित देणगी देत आपले अमूल्य योगदान दिले आणि इतर लोकांना सुद्धा या ‘शिक्षण निधी’ मध्ये भरभरून योगदान देण्यास सांगितले. स्पर्धेत भाग घेतलेल्यांना आणि विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमास सर्वप्रथम हजर असणाऱ्या पहिल्या दहा दाम्पतीयांना विशेष भेटवस्तु देण्यात आली. दहावी व बारावी मध्ये गुणवत्तापूर्णक उत्तीर्ण झालेल्या लिंगायत समाजाच्या विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे सन्मान करून प्रत्येकांना रोख रककमेची पारितोषिक देण्यात आली. प्रसिध्द भरतनाट्यम् नृत्यांगना कु. ऐश्वर्या साखरे आणि त्यांच्या चमूने सर्वांसमोर अतिशय सुंदर नृत्य सादर केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ.सुनीता बिराजदार, सौ.सुवर्णा मेणकुदले, सौ.वृंदा येळमली, सौ.वैशाली मेणकुदले, सौ.सुषमा जिरळी, सौ.भारती यांनी काम पहिले. कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अशाप्रकारे शरण संकुल चॅरिटेबल सोसायटी ने आयोजित केलेला ‘श्रावण संध्या-२०२२’ हा पारिवारीक कार्यक्रम खूप उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. सभागृह उपस्थितांनी पूर्ण भरून गेले होते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सर्वानी सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता खूप मोलाचे सहकार्य केले. संस्थेचे श्री शिवयोगीमठ, श्री रामलिंगय्या, श्री सुनील पाटील, श्री जगदिशप्पा, श्री के. उमापती, श्री प्रकाश अवरनळ्ळी, श्री वैजनाथ आग्रे, श्री सिद्धप्पा हसबी, श्री प्रकाश जंगम, श्री मंठाले, श्री महेश मुक्कनवार, श्री बडदाले व श्री आनंद गवी यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आनंद गवी यांनी केले.

परमपूज्य डॉ. धारेश्वर महाराज यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूकीबद्दल जाहीर निषेध,जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अतिशय अशोभनीय वर्तन


परमपूज्य डॉ. धारेश्वर महाराज यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूकीबद्दल जाहीर निषेध,जाहीर निषेध 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अतिशय अशोभनीय वर्तन 




परमपूज्य डॉ. धारेश्वर महाराज यांना दिलेल्या अपमानास्पद वागणूकीबद्दल जाहीर निषेध,जाहीर निषेध 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अतिशय अशोभनीय वर्तन 

सांगली दि.25 -  adv अंश खलीपे लिंगायत TV live विशेष प्रतिनिधी

वीरशैव लिंगायत धर्माचे धर्मगुरू व श्री क्षेत्र धारेश्र्वर संस्थांचे आद्यगुरू  परमपूज्य डॉ. निळकंठ धारेश्र्वर महाराज यांना निमणी ता.तासगाव येथे श्री मारुती मंदिराच्या कलशारोहण व श्री विठ्ठल - रखुमाई यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी रविवार दि.21 ऑगस्ट रोजी आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी सर्व धार्मिक विधी अतिशय उत्तम प्रकारे पार पडल्यानंतर रितसर ठरलेली दक्षिणा देण्याची वेळ आली.त्यावेळी रितसर रकमेबाबत मोठा वादविवाद झाला.त्यावेळी स्थानिक स्वामींनी जे ठरवले होते त्याप्रमाणे  मानधन रक्कम द्यावी अशी मागणी करण्यात आली.शिवाय या कामासाठी महाराजांना दोन वेळा प्रवास करावा लागला. त्यांचा प्रवास खर्च द्यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी स्थानिक स्वामींच्या समोर कार्यक्रमाच्या आयोजकांनी परमपूज्य महाराजांबद्दल अपशब्द वापरून अपमानास्पद भाषेचा  वापर केला.शिवाय आम्ही जी रक्कम दिली आहे त्यापेक्षा जास्त रक्कम देणार नाही.तसेच महाराज काय अमेरिकेतून आले आहेत काय ? तुम्ही कार्यक्रम ॲडजेस्ट करत आलाय. असे उर्मटपणे बोलून हेटाळणी केली व वंदनीय महाराजांचा पाणउतारा करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यावेळी जगन्नाथ म्हस्के,निमणी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन विलासराव पाटील ,कृषी उत्पन्न बाजार समिती चे माजी सभापती नवनाथ म्हस्के यांच्यासह आयोजक हजर होते.
यावेळी स्थानिक स्वामींनी वंदनीय महाराज यांना त्यांचा दोन वेळचा प्रवास खर्च व ठरलेली दक्षिणा देण्यात यावीच असे म्हणून वादात उडी घेतली.यावेळी जोरदार शाब्दिक चकमक उडाली.
यावेळी जाणकार बुजुर्ग नागरिकांनी या राष्ट्रवादी काँग्रेस च्या ' खाटुम - खुटुम '  संस्कृतीतील  लोकांना  वंदनीय महाराजांचे पावित्र्य व विद्वत्ता आयुष्यात समजणार नाही.असे उद्गार काढलेव अशा ऐन वेळी विश्वासघात करून शब्द  बदलणाऱ्या  अव्यवहार्य संस्कृतीचा जाहीर निषेध नोंदवला.
वंदनीय परमपूज्य डॉ.धारेश्र्वरकर महाराज यांना दिल्या गेलेल्या या अशोभनीय वागणूकीमुळे सर्व लिंगायत समाजात समाज संतप्त झाला असून मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. लवकरच या घटनेचे परिणाम प्रस्तुत घातकी व्यवस्थेला भोगावे लागतील.एव्हढे  मात्र नक्की आहे.
तेव्हा असे अशोभनीय भ्याड कृत्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा व कार्यकर्त्यांच्या वीरशैव लिंगायत समाज संघटना , लिंगायत टिव्ही लाईव्ह यांच्या वतीने जाहीर निषेध.

Wednesday, August 24, 2022

महाजंगम - पूज्य श्री डॉ.बसवलिंग पट्टदेवरु


महाजंगम - पूज्य श्री डॉ.बसवलिंग पट्टदेवरु 




... तोचि साधू ओळखावा 
जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले ||
तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||

मृदू सबाह्य नवनीत | तैसे सज्जनाचे चित्त ||
ज्यासी आपंगिता नाही | त्यासी धरी जे हृदयी ||

दया करणे जे पुत्रासी | तोचि दासा आणि दासी ||
तुका म्हणे सांगू किती | तोचि भगवंताचि मूर्ती || 

       संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचे प्रत्यक्ष आचरण पूज्य श्री डॉ बसवलिंग पट्टदेवरु यांच्या नित्य आचरणातून दिसून येते. सर्वस्वाचा त्याग केलेले हे संन्यासी अनाथांचे नाथ झाले. वृध्द, निराधार, अबला यांचे आश्रयदाते झाले. रंजल्या - गांजल्या लोकांना आपल्या पोटाशी धरले. दीन, दलित, उपेक्षित, कष्टकरी, कामगार यांच्या जीवनात सुखाचे नंदनवन फुलविले. त्यांचे मातृहृदय गरीबांचे दु:ख, दारिद्र्य, अज्ञान पाहून द्रवते. सर्वांप्रती समत्व भाव आहे. संत तुकारामांना अभिप्रेत असलेले संतत्व अप्पाजींच्या कार्यातून ओसंडून वाहताना दिसते. 

▪️अनाथ मुलांसाठी कोर्टाच्या कठड्यात

चेन्नय्याच्या घरचा दासाचा पुत्र ,
कक्कय्याच्या घरची दासीची पुत्री, 
दोघे गोवर्या वेचण्यास गेले असता संग झाला, 
त्या दोघांच्या पोटी मी जन्मलो कूडलसंगाच्या साक्षीने..! 

        महात्मा बसवण्णा या वचनातून समाजाने अनैतिक, अनौरस , दासीपुत्र म्हणून शतकानुशतके जगणे नाकारणाऱ्या समाजातील एका दुर्बल घटकाशी आपल्या जन्माची नाळ जोडून त्यांच्याठायी आत्मसन्मान जाणवतात. महात्मा बसवण्णांच्या विचारांचा वारसा समर्थपणे चालविणारे पूज्य श्री डॉ बसवलिंग पट्टदेवरु गत तीन दशके निराधार, गरीब, अनाथ , डोंबारींची मुले यांच्या संगोपन व शिक्षणाची जबाबदारी घेऊन करीत असलेले कार्य या बसव विचारांचे प्रत्यक्ष आचरणच होय. अनैतिक संबंधातून जन्माला आलेले अर्भक आईला नको असते. आपल्या प्रतिष्ठेपायी ती आपण जन्म दिलेल्या एका दिवसाच्या बाळाला उकिरड्यावर, दवाखान्यात, रेल्वे - बसस्थानकच्या निर्जनस्थळी उघड्यावर टाकून जाते. अशी अर्भके हिंस्र प्राण्यांची शिकार बनतात. त्यातून बचावली आणि माणसांच्या नजरेस पडली तर त्यांचे पुढे काय होते कुणास ठाऊक . परंतु असे नवजात अर्भक असल्याचे वृत्त अप्पाजींना कळले तर, अशा एक - दोन दिवसांच्या अर्भकांना आपल्या गुरुकुलात आणून त्यांचे संगोपन केले जाते. अप्पाजींनी आजपर्यंत अशा पंच्याऐंशी मुलांचे पालकत्व स्वीकारुन त्यांचे संगोपन केले आहे.यात अधिक संख्या मुलींची आहे. त्यातही अपंग, मतिमंद, दृष्टीहीन अर्भकांची संख्या अधिक आहे. नंतरच्या काळात शासनाच्या आदेशाप्रमाणे ती मुलं दत्तक दिली जात आहेत. आजपर्यंत ७० मुलांना दत्तक देण्यात आले आहे. बहुतांश मुले अत्यंत श्रीमंत कुटूंबात गेली आहेत. अप्पाजींच्या मातृहृदयाने अशा अनाथ मुलांना मातापित्याचे छत्र मिळाले. ते चांगल्या संस्कारात वाढले. चांगल्या कुटुंबांनी त्यांना दत्तक घेतले. ते चांगले नागरिक झाले. अन्यथा अशी मुले समाजविघातक कार्याकडे प्रवृत्त होऊन समाजात हिंसा, अन्याय, अत्याचार करीत असतात. अशा मुलांना चारित्र्यसंपन्न नागरिक बनवून राष्ट्र व समाजस्वास्थ्य राखण्यात अप्पाजींची दूरदृष्टी किती महत्वपूर्ण आहे! माणुसकीचे हे काम करताना अप्पाजींना कोर्टाच्या कठड्यात उभे रहावे लागले. 

🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

          अप्पाजी नेहमीप्रमाणे सकाळी वृत्तपत्र वाचत होते. त्यांची नजर एका बातमीकडे गेली. ती बातमी होती, ' निर्जनस्थळी एक नवजात अर्भक सापडले.' ही बातमी वाचताच अप्पाजींचे हृदय कळवळले. क्षणभरातच त्यांच्या मनात, ' त्या नवजात शिशूस आणून गुरुकुलात संगोपन करावे ' असा विचार आला. लगेच त्यांनी गुरुबसवास बोलावून त्या नवजात शिशुचा शोध घेण्यास सांगितले. तसा शोध घेतल्यानंतर तो शिशू पोलिसस्टेशनमध्ये नेण्यात आल्याचे कळाले. अप्पाजींनी पोलिसस्टेशनला फोन करून चौकशी केली. त्या शिशूच्या संगोपनाची जबाबदारी घ्यायचे असेल तर, तुम्हाला ते कोर्टात जाऊन घ्यावे लागेल , असे सांगण्यात आले. अप्पाजी कोर्टात जाण्यास तयार झाले. सोबत एका वकिलास घेऊन अप्पाजी कोर्टात हजर झाले. कोर्टात सहजपणे तो शिशू देतील असे वाटले होते. परंतु, न्यायमूर्तींनी अप्पाजींना कोर्टाच्या कठड्यात उभे रहायला सांगितले. अप्पाजी कोर्ट कठड्यात उभे राहिले. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्या शिशूच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. तेंव्हा तो शिशू अप्पाजींच्या हातात देण्यात आला. त्या शिशूला आपल्या हृदयाशी धरत असताना नकळतपणे त्यांच्या डोळ्यातून आसवं टपकली. पाहणाऱ्या लोकांचे डोळेही पाणावले. त्या एक - दोन दिवसांच्या बालकात त्यांना खर्या अर्थाने बसव दर्शन झाले. नंतरच्या काळात अशा नवजात शिशूंची संख्या वाढत गेली. बसव सिध्दांताचे आचरण करणाऱ्या अप्पाजींना अनंत कोटी जप, कोटी बिल्वार्चन, लक्ष दीपोत्सव यापेक्षाही अशा अनाथ मुलांचे संगोपन करण्यात अधिक पुण्यप्राप्तीची धन्यता वाटते. अशा अनाथ मुलांप्रती ते किती संवेदनशील आहेत म्हणजे, ते आपला वाढदिवस अशा अनाथ मुलांचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. 

▪️वृध्द निराधार व मनोरुग्ण यांना आश्रय 

          आज एकत्रित कुटूंब पध्दती लुप्त होत जाऊन , विभक्त कुटुंब पध्दती वाढत आहे. शहरीकरणाचा वाढता वेग आणि संकोचित मनोवृत्ती यामुळे वृध्द आई- वडिलांची हेळसांड होत आहे. आपल्या जीवनाची इमारत उभी करण्यासाठी ज्यांनी स्वत:चे आयुष्य पणाला लावले , अशा आई - वडिलांची त्यांच्याच घरात अडचण वाटू लागली आहे. आपल्या मुलांच्या परकेपणाच्या वागणुकीमुळे अस्वस्थ होऊन अनेक वृध्द जेंव्हा मठात येतात तेंव्हा अप्पाजी त्यांना आपल्या मठात आश्रय देतात. त्यांच्या निवास व जेवणाची व्यवस्था करतात. त्यांचे आरोग्य ठीक नसेल तर त्यांच्यावर डॉक्टरांकरवी उपचार करतात. त्यांच्या मुलांना बोलावून घरातील समस्या विचारतात. त्यांना समजावून सांगतात. त्यानंतर जर त्यांना आपल्या आईवडिलांना घरी न्यावेसे वाटले तर , तशी परवानगी देतात. अन्यथा, मठातच त्यांची व्यवस्था करतात. वृध्दांप्रमाणेच अनेक निराधार, विधवा, मनोरुग्ण मठास येतात. अनेक विधवांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे आपल्या संस्थेत काम देवून , त्यांच्या कुटुंबाचा आधार होतात. त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देतात. निराधारांना आश्रय देतात. मनोरुग्णांना मानसोपचार तज्ञांकडून उपचार करतात. अप्पाजींनी अनेक निराधार मुलामुलींची लग्ने लावून त्यांचा संसारही फुलविला आहे. 

▪️विधवांची ओटीभरणी 

           भारतीय समाज व्यवस्थेने विधवांचे फार हाल केले आहेत. बालवयात झालेले लग्न, व्यसनाधीन असलेला पती , आणि अनेक कारणांमुळे होणारा त्यांचा मृत्यू या सर्वांची शिकार फक्त स्त्री होते. विधवांना पुनर्विवाहाची मान्यता नसल्यामुळे ते आपले संपूर्ण जीवन अत्यंत हलाखीत जगतात. समाजातील कोणत्याही शुभकार्यात त्यांना कोणीही मानसन्मान देत नाही. त्यांची उपस्थिती अशुभ मानली जाते. विधवांच्या भाळी लिहीलेले हे दु:ख , सामाजिक मूकबहिष्कृतता, स्वत:विषयीची करंटेपणाची भावना नष्ट करण्यासाठी अप्पाजी आपल्या अनेक मोठमोठ्या कार्यक्रमात विधवांच्या ओटीभरणाचे कार्यक्रम आयोजित करतात. विधवा महिलांना साडी चोळी देऊन त्यांचा सन्मान केला जातो. त्यामुळे समाजमनात विधवांविषयी असलेली न्यूनत्वाची भावना संपुष्टात येईल असे प्रयत्न केले जातात. 

▪️आंतरजातीय विवाह

        भारतीय समाजातील जातीव्यवस्था संपुष्टात आणायचे असेल तर, आंतरजातीय विवाह हा एक समर्थ पर्याय असल्याचे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. याची प्रत्यक्ष कृती महात्मा बसवण्णांनी बाराव्या शतकातच केली होती. हाच आदर्श समोर ठेवून अप्पाजींनी स्वतः पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय विवाह लावून दिले आहेत. बसवप्रणीत लिंगायत धर्मात इष्टलिंग दीक्षेनंतर पूर्वाश्रमीची जात नष्ट होऊन ते लिंगायत होतात. या तत्वानुसार आंतरजातीय विवाह करुन घेणार्या दांपत्यांना इष्टलिंगदीक्षा देण्यात येते. त्यानंतर त्यांचा विवाह लिंगायत धर्म पध्दतीने लावण्यात येतो. आजवर सुमारे वीस आंतरजातीय विवाह अप्पाजींनी आपल्या मठात लावून दिले आहेत. जातीयवादी मनोवृत्तीच्या लोकांनी यास विरोधही केला. परंतु, अप्पाजी त्या विरोधाला भीक न घालता , हे महात्मा बसवण्णा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य म्हणून निडरतेने करीत आहेत.

🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

▪️दया असावी सकळ प्राणीमात्रांठायी

         महात्मा बसवण्णांचा विचार प्रत्यक्ष आचरणात आणणारे अप्पाजी हे सकल जीवात्म्यांंचे कल्याण इच्छितात. सर्व प्राणीमात्रांठायी दयाभाव बाळगतात. यास एक प्रत्यक्ष उदाहरण देता येईल. एकदा भालकी नजीकच्या डोणगापूर येथून एका मोठ्या ट्रकमधून आठ - दहा गायी नेण्यात येत होत्या.अप्पाजी सकाळी वायुविहारासाठी त्याच रस्त्याने गेले होते. त्यांचे लक्ष सहजपणे त्या ट्रककडे गेले . त्यांनी तो ट्रक थांबवून चौकशी केली. त्या सर्व गायी कत्तलखान्यास नेल्या जात होत्या. ते ऐकून अप्पाजींना वाईट वाटले. त्यांनी लगेच त्या सर्व गायी खरेदी केल्या आणि मठातील शेतीच्या गोठ्यात त्या सोडण्यात आल्या,तिथेच त्यांचे संगोपन करण्यात आले नंतर गुरुकुल परिसरात ' शरण तुरुगाही रामण्णा गो शाळा ' सुरू करण्यात आली. याचप्रमाणे भालकी तालुक्यातील केसरजवळगा गावाजवळ थोडेसे वयस्कर बैल नेणार्या दोन ट्रकपैकी एका ट्रकचा अपघात झाला. त्या ट्रकमध्ये नऊ बैल होते. त्यापैकी दोन बैल जागीच मृत्यू पावले. शिल्लक सात बैलांना अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. तीन चार बैलांचे पाय मोडले होते. ही बातमी अप्पाजींना कळाली. त्यांनी आपले प्रतिनीधी त्या जागी पाठवून , ते सात बैल आपल्या गोशाळेत घेऊन आले. दुसऱ्या ट्रकमध्ये जे नऊ बैल होते, ते ही प्रशासनाच्या परवानगीने संगोपनासाठी घेण्यात आले. अशाप्रकारे अप्पाजींनी प्राणीमात्रांठायी दयाभाव व्यक्त केला आहे. 

▪️स्वधर्म निष्ठा : परधर्म सहिष्णुता 

        अप्पाजी हे लिंगायत स्वतंत्र धर्म आंदोलनातील अग्रगण्य मठाधिपती होत. त्यांची संपूर्ण निष्ठा स्वधर्मास समर्पित असली तरी , त्यांनी कधीही अन्य धर्माचा द्वेष केला नाही. श्रीमठात सर्व जाती - धर्मातील लोकांना मुक्त प्रवेश आहे. मठाच्या प्रसाद निलयात सर्व मुलांना प्रवेश देऊन त्यांच्या निवास, भोजनासह शिक्षणाची मोफत व्यवस्था केली आहे. 
         अप्पाजी आपल्या मठाच्या अनेक कार्यक्रमात सर्व धर्मातील धर्मगुरूंना आग्रहाने आमंत्रित करतात. ते स्वत: अनेकदा बौध्द , मुस्लिम आणि ख्रिश्चन बांधवांच्या कार्यक्रमास जातात. भालकी, बीदर आणि बसवकल्याण येथील कुराण प्रवचने आणि बायबल प्रवचनात अप्पाजी सहभागी होऊन त्या बांधवांना लिंगायत तत्वज्ञानाचा परिचय करून देतात. सातारा येथे परिवर्तनवादी संघटनेच्या वतीने दरवर्षी साजरा होणार्या ' महम्मद पैगंबर जयंती उत्सव ' कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी सर्व समाजाला बंधुत्वाचा संदेश दिला आहे. 
        जात, धर्म, पंथ, वर्ण आणि लिंग यापेक्षा व्यक्तीच्या ठायी असलेली गुणवत्ता , आचार, विचार महत्त्वाचे असतात. निसर्गदत्त प्रतिभा ही सर्व बंधनातून मुक्त असते हा अप्पाजींचा दृढभाव. कन्नडमध्ये रमजान दर्गा यांनी बसवण्णांविषयी विपुल लेखन केले आहे. त्यांची कन्नडमधील पुस्तके मराठीत अनुवादित करुन प्रकाशित केली आहेत. धर्मांधता आणि जातीयता नष्ट करण्यासाठी अप्पाजी अनेक आंतरजातीय विवाह स्वत: घडवून आणले आहेत. नवलिंग पाटील नावाचा कलावंत आज सुप्रसिद्ध आहे. ते जन्माने मुस्लिम. लहान बालक असताना ते मठात आले. त्यांना आई वडील नव्हते. त्या बालकास इष्टलिंग दीक्षा दिली. शालेय शिक्षणात लक्ष नसल्यामुळे त्यास संगीत शिक्षण दिले. त्याचे लग्न लावून दिले. त्याच्या मुलांना मोफत शिक्षण दिले. ते आज दूरदर्शनवर कार्यक्रम करतात. हास्य कलावंत म्हणून त्यांची ख्याती राज्यभर आहे. अप्पाजींची ही सर्वधर्म सहिष्णुतेची दृष्टी या देशातील राजकारणी आणि समाजधुरीणांनी अवगत केली पाहिजे. 
        अप्पाजींची ही सर्वधर्म समभावाची वागणूक पाहूनच डॉ मुक्तंबी या मुस्लिम महिलेने ' भालकीय बेळकू ' ( भालकी प्रकाश ) ही काव्यकृती रचली आहे. याशिवाय डॉ मुक्तंबी अध्यक्ष असलेल्या ' अमरावती शिवय्या हिरेमठ प्रतिष्ठान ' च्या वतीने दरवर्षी ' पूज्य श्री डॉ बसवलिंग पट्टदेवरु साहित्य पुरस्कार ' दिला जातो. या घटनेवरून अप्पाजींच्या मनातील सौहार्दतेची साक्ष पटते. 

🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

▪️साधकांचा मायबाप 

        पूज्य श्री डॉ बसवलिंग पट्टदेवरु म्हणजे लिंगायत धर्म प्रसाराची सच्ची तळमळ असलेले धर्मगुरू होत. आपण स्वतः चरजंगम होऊन कर्नाटक पाठोपाठ महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यात संचार करीत आहेत. देश - विदेशात बसवतत्व प्रसारकार्य अधिक जोमाने व्हावे , या उद्देशाने त्यांनी धर्मप्रसारकांची एक फळीच निर्माण केली आहे. अप्पाजींचे मातृहृदय, विनम्रवृत्ती सर्वसमावेशक स्वभाव आणि अंतरी अपार बसव निष्ठा यामुळे अनेक युवक अप्पाजींच्या सहवासात आले आणि कायमचे धर्म प्रसारक जंगम झाले. भालकी मठाच्या प्रसाद निलयात शिक्षण घेण्यासाठी आलेला राजकुमार मुलगे नावाचा विद्यार्थी अप्पाजींच्या सहवासात आला आणि सर्वस्वाचा त्याग करुन तो गुरूंच्या सेवेत रमला. त्याचा त्याग सेवाभाव व धर्मनिष्ठा , क्रियाशीलता पाहून अप्पाजींनी त्याला जंगमदीक्षा दिली. आणि आपला उत्तराधिकारी केले. आज तेच श्री गुरुबसव पट्टदेवरु म्हणून  ओळखले जातात. बसवकल्याण तालूक्यातील तोगलूर गावातून महादेव सिध्दगोंडा हे संन्यास घेण्यासाठी भालकी मठास आले. अप्पाजींनी त्यांना जंगमदीक्षा देऊन त्यांचे नामकरण पूज्य श्री महालिंगदेवरु असे केले. तेलंगणात बसवतत्व प्रसार करण्यासाठी अप्पाजींनी त्यांना तेलुगू शिक्षण दिले. कोट्यवधी रुपये खर्च करून संगारेड्डी येथे दोन एकर जागा घेऊन तिथे अनुभव मंटप निर्माण कार्य सुरु आहे. महालिंगदेवरु संगारेड्डी येथे राहून तेलंगणात लिंगायत धर्म प्रसार कार्य करीत आहेत. तेलंगण राज्यातील थडीहिप्परगा येथील पूज्य श्री शेषराव महाराज यांनी आपल्या गावात श्री बसवेश्वर मठ बांधला आहे. त्यांचे चिरंजीव बसवराज जुबरे यास अप्पाजींकडूनच जंगमदीक्षा देण्यात आली आहे. त्यांचे नामकरण पूज्य श्री बसवलिंग देवरू असे करण्यात आले आहे. त्यांचे शिक्षण मराठीत झाले आहे.ते महाराष्ट्रात लिंगायत धर्मप्रसार कार्य करीत आहेत.
        अप्पाजींची बसवनिष्ठा आणि बसवतत्वाधारित लिंगायत धर्म संस्कारपध्दती पाहून गदगचे जगद्गुरु डॉ तोंटद सिध्दलिंग महास्वामी यांनी अनेक नवोदित मठाधिशांना प्रशिक्षणासाठी भालकी मठास पाठवले आहे. पूज्य श्री गुरुपाद देवरु, पूज्य श्री शिवानंद देवरु,पूज्य श्री निरंजन देवरु, पूज्य श्री मृत्यूंजय देवरु, पूज्य श्री चंद्रशेखर देवरु, पूज्य श्री शिवप्रसाद देवरु हा पूज्य गदग स्वामीजींनी पाठविलेला साधकवृंद  आहे.यांनी भालकी मठात तीन - पाच वर्ष राहून लिंगायत धर्म संस्काराचे प्रशिक्षण प्राप्त केले आहे.यातील पूज्य श्री गुरुपाद देवरु व पूज्य श्री मृत्यूंजय देवरु हे मठाधिपती झाले आहेत. पूज्य निरंजन देवरु अप्पाजींकडून जंगमदीक्षा घेऊन प्रवचनाद्वारे धर्मप्रसार कार्य करीत आहेत. पूज्य शिवानंद देवरु जंगमदीक्षा घेऊन बसवकल्याण अनुभव मंटपचे संचालक म्हणून कार्य करीत आहेत. पूज्य श्री मल्लिकार्जुन देवरु व पूज्य श्री रेवणसिध्द देवरू यांनी काही वर्षे भालकी मठात राहून लिंगायत धर्म संस्कार शिकून घेतले. सुलफल स्वामीजींच्या मध्यस्तीने अप्पाजींनी  स्वतः सर्व खर्च करून गुलबर्गा जिल्ह्यातील कवलगा येथील विरक्त मठास पट्टाधिकार करुन पूज्य श्री म. नि. प्र. अभिनव षण्मुख महास्वामीजी असे नामकरण केले आहे. तसेच पूज्य श्री रेवणसिध्द देवरू यांना भालकी तालुक्यातील गौरचिंचोळी गावातील सिध्दरामेश्वर मठास पट्टाधिकार करुन, त्यांचे नामकरण पूज्य श्री सिध्दरामेश्वर देवरु असे करण्यात आले आहे. याशिवाय पूज्य अप्पाजींनी गृहस्थ जीवनाचा त्याग करुन संन्यस्थ होऊ इच्छिणाऱ्या अनेकांना जंगमदीक्षा देऊन त्यांच्या खांद्यावर धर्मप्रसाराची धुरा सोपविली आहे. पूज्य शंकरलिंग स्वामीजी हे अप्पाजींकडून जंगमदीक्षा घेऊन हुमनाबाद जवळील धुमनसुरु येथे बसवमुक्तीनाथ आश्रम बांधून बसवतत्वाचे प्रसार कार्य करीत आहेत. 
गदग जिल्ह्यातील श्री बसवराज वेंकटापूर यांना जंगमदीक्षा देऊन त्यांचे नामकरण पूज्य श्री बसवराज स्वामी असे केले आहे. ते राज्यभर बसवतत्वावर प्रवचने देतात. पूज्य जयदेव स्वामीजी हे सद्य स्थितीत भालकी मठातच सेवा कार्य करीत आहेत.बसवतत्व प्रसार कार्य करणार्या अनेक युवा प्रवचनकार व मठाधीश यांना अप्पाजींनी सुरुवातीच्या काळात सर्वतोपरी सहकार्य करुन त्यांची प्रतिभा लोकाभिमुख करण्यात फार मोठे योगदान दिले आहे. दोन्ही डोळ्यांनी आंधळे असलेले पूज्य बसवानंद स्वामीजी यांची प्रवचने बिदर जिल्ह्यात आयोजित करुन त्यांना पाठबळ दिले आहे. पूज्य श्री वचनानंद स्वामीजी हे कर्नाटकचे योगगुरू म्हणून राज्यभर परिचित आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातही अप्पाजींनी त्यांना खूप सहकार्य केले आहे. अनेक प्रवचनकारांना आर्थिक सहकार्य करुन त्यांना बसवतत्व प्रसार कार्यात प्रोत्साहन दिले आहे. बिदर जिल्ह्यात पूज्य श्री चेन्नबसव पट्टदेवरु यांच्याकडून जंगमदीक्षा घेऊन बसवतत्व प्रसार कार्य करणाऱ्यांना अप्पाजींनी वेळोवेळी सहकार्य केले आहे. अशा प्रकारे जे निष्ठेने बसवतत्व प्रसार कार्य करतात , त्यांच्या पाठीशी अप्पाजी खंबीरपणे उभे राहतात. म्हणूनच त्यांना ' साधकांचा मायबाप ' असे म्हंटले जाते. बसवकल्याण मध्ये अनुभव मंटप परिसरात बसवतत्वाधारित लिंगायत धर्म प्रसार कार्य करणार्या अशा साधकांचे एक प्रशिक्षण केंद्र सुरू करावे असा अप्पाजींचा संकल्प आहे. त्या दिशेने त्यांचे प्रयत्नही सुरू आहेत. 

🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯

▪️उत्तराधिकारीची निवड व पट्टाधिकार 

         पूज्य श्री डॉ बसवलिंग पट्टदेवरु हे हिरेमठ संस्थानचे मठाधिपती झाल्यापासून आजपर्यंत निरंतर जगाच्या कल्याणासाठी आपला देह कष्टवीत आहेत. ' जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती | देह कष्टविती  परोपकारे  || ' या संत वचनाप्रमाणे अप्पाजी आपले जीवन परोपकारार्थ व्यतीत करीत आहेत. मन तरुण असले तरी आता ते वयाची सत्तरी गाठत आहेत. पद, प्रतिष्ठा, सन्मान, सिंहासन, मिरवणूक, पालखी, सोन्या - चांदीचा टोप असा कुठलाही बडेजाव न मिरवता , ते अगदी सामान्यांसारखे जीवन जगतात. ते कधीही मठाच्या अधिकारपदाला चिकटून बसले नाहीत. वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केल्यानंतर अप्पाजींनी आपला उत्तराधिकारी म्हणून श्री गुरुबसव देवरु यांची निवड करुन २०१६ साली अत्यंत भव्य स्वरुपात त्यांचा पट्टाधिकार केला. पट्टाधिकारानंतर त्यांचे नामकरण पूज्य श्री गुरुबसव पट्टदेवरु असे करण्यात आले आहे. या घटनेतही अप्पाजींनी परंपरागत उत्तराधिकारी निवडण्याची प्रथा मोडीत काढून नवी वाट चोखाळली आहे. 
          पूज्य श्री गुरुबसव पट्टदेवरु हे अत्यंत बसवनिष्ठ व क्रियाशील स्वामीजी आहेत. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्यामुळे शिक्षणासाठी म्हणून भालकी मठाच्या प्रसाद निलयात रहायला आले. शिक्षण घेत घेत ते अप्पाजींच्या सेवेत अधिक रमले. विनम्र वृत्ती, सेवाभाव आणि क्रियाशीलता यामुळे ते अप्पाजींच्या कृपाशीर्वादास पात्र ठरले. निस्सीम गुरुभक्ती, अविरत कायकनिष्ठा,राष्ट्रप्रेम, सेवाभावना,स्वच्छ व निर्मळ मन, सदैव नावीन्याचा ध्यास, समजूतदारपणा, विनम्रता आणि लिंगप्रभूने डोलावे असे बोलणे यामुळे ते सर्वांच्या प्रेमादरास पात्र ठरले. या सर्वांपेक्षा आजच्या या झगमगाटाच्या दुनियेत सर्वस्वाचा त्याग करुन समाजसेवेसाठी समर्पित होण्यास सिध्द झाले, हे या भूमीचे महद् भाग्यच होय. भालकी मठाच्या सर्वांगीण विकासात पूज्य श्री गुरुबसव पट्टदेवरुंचा सिंहाचा वाटा आहे. अप्पाजींच्या कार्याची क्रियाशक्ती होऊन ते कार्य करीत आहेत. अप्पाजींचे सर्व संकल्प सिध्दीस नेण्याचे सामर्थ्य पूज्य श्री गुरुबसव पट्टदेवरुंच्या क्रियाशक्तीत आहे. ते कर्नाटक, तेलंगण व महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध पावलेल्या मठाचे उत्तराधिकारी होऊन उभय सद्गुरूंच्या कार्याला उत्तूंग कीर्तीचा कळस चढवतील यात शंका नाही. 

▪️साष्टांग हे करी दंडवत 

      अप्पाजींच्या कार्याची अथांगता पाहिल्यानंतर सहजपणे संत तुकारामांच्या एका अभंगातील ओळी ओठावर येतात. ' काय वाणू आता न पुरे ही वाणी | मस्तक चरणी ठेवितसे || ' अथवा ' श्री संताचिया माथा चरणावरी | साष्टांग हे करी दंडवत || ' अप्पाजींच्या या उत्तूंग कार्याला अभिवादन करण्यासाठी शासन, समाज व अनेक संघ - संस्था यांनी विविध पुरस्कार देऊन त्यांच्याप्रती असलेला आदर व्यक्त केला आहे. कन्नड भाषा, साहित्य व संस्कृती रक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल कर्नाटक सरकारने २००६ साली अप्पाजींना ' सुवर्ण कर्नाटक एकीकरण पुरस्कार ' देऊन सन्मानित केले आहे. शरण साहित्याचे प्रकाशन आणि प्रसार - प्रचार कार्याच्या सन्मानार्थ अखिल भारतीय शरण साहित्य परिषदेने २००८ साली ' रमणश्री शरण पुरस्कार ' दिला आहे. २०१० साली गुलबर्गा विद्यापीठाने ' मानद डॉक्टरेट पदवी ' देऊन गौरवान्वित केले आहे. २०१२ साली कर्नाटक सरकारने ' कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार ' दिला. २०१६ साली धारवाडच्या मुरुघा मठाने ' मृत्यूंजय महांत पुरस्कार ' दिला आहे. २०२० साली कर्नाटक सरकारने ' बसव राष्ट्रीय पुरस्कार ' देऊन अप्पाजींच्या कार्याचा गौरव केला आहे. अनेक संघ - संस्था व संघटनांनी अनेक पुरस्कार , सन्मानपत्र , पदव्या देऊन अप्पाजींच्या कार्याचा गौरव केला आहे. 


▪️जगाला प्रेम अर्पावे

         सानेगुरुजींना ' मातृहृदयी ' असे म्हंटले जाते. हेच संबोधन पूज्य अप्पाजींविषयी बोलताना सर्वसामान्य लोक वापरतात. साने गुरुजींनी लिहिलेल्या ' खरा तो एकचि धर्म ' या गीतातील प्रत्येक शब्दास आपल्या सेवेतून कृतिरुप देण्याचे काम पूज्य अप्पाजींनी केले आहे. दीनदलित, गरीब, अनाथ, निराधार, वृध्द, असहाय्य, विधवा, मतिमंद, अपंग, लमाणी, डोंबारी , कामगार, कष्टकरी, मजूर या दुर्बल घटकांच्या जीवनात शिक्षणाचा, विकासाचा, प्रगतीचा नंदादीप प्रज्वलित करण्यासाठी आपले उभे आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांच्या दृष्टीने हेच खरे  बसव दर्शन आहे. हाच खरा धर्म आहे. हीच खरी पूजा आहे. साने गुरुजींनी जो प्रेमाचा धर्म सांगितला , तो धर्म आपल्या प्रत्यक्ष जगण्यातून जिवंत ठेवण्याचे काम पूज्य अप्पाजींनी आपल्या निरंतर मानवीय सेवाकार्यातून करीत आहेत. ही लोकाराधनाच त्यांच्या दृष्टीने जंगमत्व आहे. अप्पाजी जंगमत्वाने जगलेले महाजंगम ! 
✍🏼 लेखक -
💐श.राजेश्वर ब जुबरे , 
तेलंगण.
📞8904638908

📖 प्रकाशक - 

💐महाराष्ट्र बसव परिषद , 
हिरेमठ संस्थान ,
भालकी ,
जि. बीदर ,
(कर्नाटक) 

✍🏼 संकलन - 
🙏🏻श.शिवशरण गोविंदे ,
📞7709030011
ज्ञानदासोही अनुभव मंटप 
(सोशल मिडिया )
चपळगाव वाडी , 
ता. अक्कलकोट ,
जि. सोलापूर ,
(महाराष्ट्र )

Tuesday, August 23, 2022

रविवारी राज्यस्तरीय मोफत वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळावा पिंपरी चिंचवड येथे काशी जगद्गुरुंचे लाभणार सानिध्य

रविवारी राज्यस्तरीय मोफत वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळावा
पिंपरी चिंचवड येथे काशी जगद्गुरुंचे लाभणार सानिध्य




रविवारी राज्यस्तरीय मोफत वीरशैव लिंगायत वधू-वर परिचय मेळावा
पिंपरी चिंचवड येथे काशी जगद्गुरुंचे लाभणार सानिध्य
पुणे दि  23 : ओम नमः शिवाय अधिष्ठान व श्रावणमास तपोनुष्ठान समिती यांच्या वतीने डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात राज्यस्तरीय मोफत वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचे वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक महेश स्वामी यांनी दिली.
            काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे तपोनुष्ठान पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स याठिकाणी सुरू आहे. दरवर्षीच्या श्रावण महिन्यातील यंदा त्यांचे बत्तीसावे तपोनुष्ठान आहे. यावर्षी या निमित्ताने अनेक धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

           रविवार दि. 28 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड येथील चिंचवडे लॉन्स येथे होणाऱ्या या मेळाव्यात वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचे मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागातील हजारो वधू-वर उपस्थित राहणार आहेत. ज्यांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी रविवारी बायोडाटासह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
               परमपूज्य काशी जगद्गुरू आणि पंचपीठाच्या अनेक शिवाचार्यांच्या सानिध्यात पुणे जिल्ह्यात होणारा हा 25 वा मोफत वधू-वर मेळावा आहे. या राज्यस्तरीय वीरशैव लिंगायत सर्व पोटजाती वधू-वर परिचय मेळाव्यात उपस्थित राहण्याऱ्या वधू-वर आणि पालकांच्या चहा, नाष्टा आणि प्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
           वधू-वर मेळावा यशस्वी होण्यासाठी ओम नमः शिवाय अधिष्ठान व श्रावणमास तपोनुष्ठान समितीचे महेश स्वामी आणि त्यांचे सर्व सहकारी प्रयत्नशील आहेत.


Monday, August 22, 2022

समाजातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे कल्पवृक्ष आहेत-- विनायक कारेगांवकर ,पोलिस उपनिरीक्षक वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठानचा उपक्रम

 समाजातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे कल्पवृक्ष आहेत-- विनायक कारेगांवकर ,पोलिस उपनिरीक्षक

वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठानचा उपक्रम




समाजातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे कल्पवृक्ष आहेत-- विनायक कारेगांवकर ,पोलिस उपनिरीक्षक

वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठानचा उपक्रम



यवतमाळ  ( विदर्भ ) दि २१ :- निलेश शेटे यवतमाळ  लिंगायत TV Live प्रतिनिधी

वीरशैव हितसंवर्धक मंडळ आणि वसुधा प्रतिष्ठान, यवतमाळ द्वारा जेष्ठ नागरिप्रतिनिधी क आणि गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन  महात्मा बसवेश्वर सांस्कृतीक भवन येथे आयोजित करण्यात आले, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षपदी जेष्ठ साहित्यिक डॉ.अशोक मेनकुदळे,प्रमुख पाहुणे म्हणुन  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक श्री विनायक कारेगांवकर, चंद्रशेखर उमरे,वीरशैव हितसंवर्धक मंडळाचे अध्यक्ष डॉ. जयेश हातगांवकर, उपाध्यक्ष प्रा.डॉ. किशोर मांडगावकर, सचिव निलेश शेटे, लिंगायत महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.विद्या बेलोरकर उपस्थित होते,



महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात  आली,समाजातील जेष्ठांचा सत्कार सोहळा शाल,श्रीफळ,रोख,सन्मानचिन्ह,तसेच  विद्यार्थांना गौरव चिन्ह, रोख  प्रमाणपत्र आणी समाजातील दिवंगत कै सौ. सुनेत्रा अरविंद मांडगावकर,कै सौ हेमा व श्रीनिवास देशमुख, कै.दिंगाबर डोंगरे स्मृती प्रित्यर्थ तसेच श्रीमती पुष्पाताई हातगांवकर  ह्यांचे द्वारा रोख रक्कम देऊन  गौरविण्यात आले,




तसेच समाजातील विशेष नैपुण्य दाखविलेले,सुवर्ण पदक प्राप्त कु.नभा उमरे,माती वाचवा फाऊंडेशनचे विराज बेलोरकर,योगा मध्ये जागतिक रेकॉर्ड करणारी सिध्दी चांदेकर ,योगगुरू प्रदिप उमरे ह्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.



ह्या प्रसंगी बोलताना लाचलुचपत विभागाचे विनायक कारेगांवकर म्हणाले




समाजातील ज्येष्ठ नागरिक हे अनुभवाचे कल्पवृक्ष आहेत

त्यांच्या प्रेरणा व अनुभव कल्पवृक्षांप्रमाणेच काम करतात. मला जेव्हा अडीअडचणी येतात, मार्ग सापडत नाही, तेव्हा मी ज्येष्ठांकडून आवर्जून मार्गदर्शन घेतो, मनुष्याचा वृद्धापकाळ हा नेहमी समाधानी आणि आनंदपूर्ण असायला हवा. त्यासाठी सामाजिक आणि कौटुंबिक सहाय्य त्यांना लाभले पाहिजे जेणेकरून शेवटची काही वर्षे त्यांना परमानंद मिळू शकेल. असा उदात्त हेतू लक्षात घेऊन तरुणपिढीने त्यांना सन्मानयुक्त जगवणे गरजेचे आहेअसे ते म्हणाले



 कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अशोक मेनकुदळे म्हणाले प्रत्येकाने आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सांभाळ करणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अशी कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. आपण सर्वांनी  ज्येष्ठ नागरिकांचे महत्व समजून घेतले पाहिजे, कारण ते आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक आणि हितचिंतक राहिलेले असतात.तसेच गुणवंताना मार्गदर्शन करतानाकष्टातून घेतलेल्या शिक्षणाची पाळेमुळे खोलवर जातात. कष्ट करून ज्यांनी शिक्षण घेतलं ती मुले शिक्षण क्षेत्रात पुढे गेलेली आहेत. कष्ट करण्याची सवय ठेवा. कष्टातून चांगला अनुभव मिळतो. आपल्या जीवनातील स्वप्नांना कष्टाचं बळ द्या आणि आपलं पुढील आयुष्य उज्वल बनवा असे मनोगत व्यक्त केले.



ह्या कार्यक्रमाचे संचालन भुषण तंबाखे   व आभार प्रदर्शन निलेश शेटे ह्यांनी केले,ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गिरीष गाढवे,गजानन हातगांवकर,वीरभद्र पाटील,

रमेश केळकर,विनोद देशमुख, विनोद नारिंगे,जयंत डोंगरे,राजु कुऱ्हेकार,निर्मल ठोंबरे,अशोक तेले,मंगेश शेटे, बाळासाहेब दिवे,सुधाकर केळकर,सुरेश शेटे,प्रदिप उमरे,प्रकाश चनेवार,अशोक जिवरकर सौ.कल्पना देशमुख, सौ.पद्मश्री हातगांवकर सौ जुही शेटे,सौ.शिला तेले,सौ.स्वाती हातगांवकर,सौ.जिवरकर ताई ईत्यादी  सदस्यांचे  सहकार्य लाभले.




श्रीशैल पीठाच्या आयोजित धर्मकार्यात भक्तांनी सहभाग घ्यावा-श्रीशैल जगदगुरू.. आयोजित बैठकीत सिध्दाराम म्हेत्रे यांची उपस्थिती

 

श्रीशैल पीठाच्या आयोजित धर्मकार्यात भक्तांनी सहभाग घ्यावा-श्रीशैल जगदगुरू..

आयोजित बैठकीत सिध्दाराम म्हेत्रे यांची उपस्थिती


श्रीशैल पीठाच्या आयोजित धर्मकार्यात भक्तांनी सहभाग घ्यावा-श्रीशैल जगदगुरू..

आयोजित बैठकीत सिध्दाराम म्हेत्रे यांची उपस्थिती


चपळगाव प्रतिनिधी दि २१ - वीरशैव धर्मातील महत्वाच्या गणल्या जाणाऱ्या श्रीशैलम येथील पीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डाॅ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपुर्तीनिमीत्त व त्यांच्या पीठारोहण कार्यक्रमास बारा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल येत्या ऑक्टोबर महिन्यापासून विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या सर्व कार्यक्रमांसाठी भक्तांनी तन-मन-धनाने सहभागी होण्याचे आवाहन श्रीशैल पीठाचे जगदगुरू डाॅ.चन्नसिध्दराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी केल्याची माहिती माजी ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.



वीरशैवांसाठी श्रीशैल येथे होणार मोठे हाॅस्पिटल..!

श्रीशैल पीठाचे धर्मकार्य आणि सामाजिक बांधीलकी जाणून आंध्र प्रदेश शासनाने दहा एकरची जागा देण्याचे कबूल केले असून पाच एकर जागा पीठाला हस्तांतरित झाली आहे.या जागेवर मोठे हाॅस्पिटल,कंबी मंटप,यात्री निवास आणि गुरूकुल पध्दतीने शाळेची निर्मीती करण्यात येणार आहे.यासाठी भक्तांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन पत्रकान्वये करण्यात आले आहे.



                या सर्व कार्यक्रमांच्या पूर्वतयारीसाठी श्रीशैलम येथे जगदगुरूंनी आयोजित केलेल्या बैठकीत माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे हे आपल्या शिष्टमंडळासह उपस्थित होते.पूढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की,या सर्व कार्यक्रमांची सुरूवात पदयात्रेने होणार असून २९ ऑक्टोबरपासून श्रीक्षेत्र येडूरहून श्रीशैलपर्यंत पदयात्रा संपन्न होणार आहे.पदयात्रेच्या दरम्यान विविध गावांमध्ये धर्मजागृती,लिंगदिक्षा, व्यसनमुक्ती विषयक धर्मोपदेश, वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न होणार आहे.या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या सद्भक्तांनी १ सप्टेंबर पूर्वी आपली नावे समितीकडे नोंदवणे आवश्यक आहे.तसेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून श्रीशैल क्षेत्रामध्ये रुद्राभिषेक,बिल्वार्चन,महामंगलआरती जगद्गुरूंची इष्टलिंग महापूजा तुलाभार,रुद्रहवन,अन्नदान व विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.




    विशेष म्हणजे १० जानेवारी २०२३ पासून श्रीशैल येथे या कार्यक्रमाच्या अखेरीस वीरशैव महासभेचे महाअधिवेशन,राष्ट्रीय वेदांत संमेलन, राष्ट्रीय वचन संमेलन,राष्ट्रीय वीरशैवागम समावेश आणि मराठी, तेलगू,कन्नड तसेच वीरशैव साहित्य गोष्टी,मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती म्हेत्रे यांनी दिली.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे,लक्ष्मण चितळे,जटप्पा मुतगी आदी उपस्थित होते.





सौ शोभा खलीपे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार

                      सौ.  शोभा खलीपे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार 


                     सौ.  शोभा खलीपे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार 




कडेगाव दि.22 - दिलीप महाजन प्रतिनिधी

सौ.शोभा खलिपे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार समारंभ जि.प.शाळा तोंडोलीच्या प्रांगणात संपन्न झाला. सौ.शोभा खलिपे या 36 वर्षे 6 महिन्याच्या शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असल्याकारणाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती व सावित्रीबाई फुले प्रतिमा पूजन, तसेच इशस्तवन व स्वागतगीताने करण्यात आली. यावेळी मा.अनिस नायकवडी - गटशिक्षणाधिकारी पं.स.कडेगाव, मा.ज्ञानेश्वर चिमटे - विस्तार अधिकारी पं.स.कडेगाव, मा.विकास राजे - विस्तार अधिकारी पं.स.खानापूर, केंद्रप्रमुख मा.मधुकर जंगम, मा.नानासाहेब कांबळे, मा.विलास शेळके, मा.अशोक महिंद यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.





यावेळी बोलताना मा.नायकवडी म्हणाले, सौ.शोभा खलिपे यांनी 36 वर्षे 6 महिन्याच्या शिक्षण क्षेत्रातील सेवेत 36 पिढ्या घडवण्याचे महान कार्य केले आहे. तसेच कुटुंब आणि नोकरी याचा समतोल योग्यरीत्या साधला. शाळेतील मुलांना घडवत त्यांनी स्वतःच्या मुलांना देखील योग्यरीत्या घडवले. त्यांच्यात असणारा विनम्रपणा तसेच सहकाऱ्यांना सोबत घेऊन जाण्याची भावना प्रत्येक शिक्षकाने घेण्याजोगी आहे. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्यांच्या संख्येवरून त्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पोचपावती सर्वांना पाहायला मिळत आहे.

यावेळी सौ.शोभा खलिपे म्हणाल्या, शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात मला काम करण्याची संधी मिळाली आणि नवीन पिढी घडवण्याच्या कार्यात माझा हातभार लागला याचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच सर्व शिक्षक बंधू-भगिनी, मित्रमंडळी, पाहुणेमंडळी, पालक, ग्रामस्थ, पदाधिकारी, ज्ञात-अज्ञात सर्व व्यक्तींनी आजपर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल तुमचे आभार न मानता पुढील आयुष्य तुमच्या ऋणात घालवेन.




यावेळी कडेगाव तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका, पालक, ग्रामस्थ, तोंडोली गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शिवशंभु प्रतिष्ठानचे पदाधिकारी, साद फाउंडेशनचे पदाधिकारी, ग्रामविकास संस्थेचे पदाधिकारी, तसेच पत्रकार बांधव, आप्तिष्ट यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सौ शोभा खलिपे व त्यांच्या परिवारास शुभेच्छा,दिल्या .

कार्यक्रमाचे संयोजन तोंडोली व नेवरी केंद्र तसेच शा.व्य.स.तोंडोली व नेवरी यांनी केले. प्रास्ताविक व निवेदन मा.गोरख मोहिते तसेच आभार प्रदर्शन मा.महकु ढवळे यांनी केले.




भीमसेन महाराज की जय', 'कुंती माता की जय' च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत भीम - कुंतीच्या जयजयकाराने उंब्रज नगरी दुमदुमली

 


भीमसेन महाराज की जय', 'कुंती माता की जय' च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत

भीम - कुंतीच्या जयजयकाराने उंब्रज नगरी दुमदुमली





भीमसेन महाराज की जय', 'कुंती माता की जय' च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत

भीम - कुंतीच्या जयजयकाराने उंब्रज नगरी दुमदुमली





 उंब्रज दि २२:- प्रसाद वाकडे प्रतिनिधी  लिंगायत TV Live 

भीमसेन महाराज की जय', 'कुंती माता की जय' च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत   सोमवारी भीम - कुंतीच्या जयजयकाराने उंब्रज नगरी दुमदुमली. यात्रेला भाविकांचा अभूतपूर्व उत्साह मिळाला. रथातून कुंती मातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. भीमसेन महाराज व  कुंती मातेेेचा जयजयकार करत उंब्रज येथील मातापुत्र भेटीचा अनोखा सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी पार पडला.  




     प्रतिवर्षी श्रावणातल्या शेवटच्या शनिवारी उंब्रज येथे भीम कुंती उत्सव साजरा केला जातो. गत दोन वर्षांत कोरोनामुळे उत्सवांवर निर्बंध होते मात्र ही सर्व कसर सोमवारी भरुन काढत भाविकांनी भीमकुंती उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुख्य मिरवणुकीत कुंती मातेला घेऊन बसण्यासाठी भीम मंडपात बोली लिलावास सकाळी १०.३० वाजता प्रारंभ झाला. यामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सुमारे तासभर लिलाव बोलीसाठी चढाओढ झाली. यावेळी दिपक हिंदुराव घाडगे यांनी एक लाख एक  हजाराची सर्वाधिक  बोली बोलून कुंती मातेच्या रथात बसण्याचा मान मिळविला. यात्रेच्या इतिहासात ही लिलाव बोली विक्रमी ठरली आहे. 



  दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास  मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला. या मिरवणुकीत बॅंडच्या  तालावर ठेका धरणारे तरूण युवक,  त्यापाठोपाठ टाळ मृदुंगाच्या तालावर अभंग वाणी गात हरिनामाचा जयजयकार करणारे भजनी मंडळ असा लवाजमा मिरवणुकीत  सहभागी झाला. फुलांनी अच्छादलेल्या छत्र्या, रथाला जुंपलेले अश्व, गुलालाची उधळण आणि तरुणाईचा जल्लोष हे यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. दुपारी मुख्य मिरवणूक बाजारपेठेत येताच 'भीमसेन महाराज की जय', 'कुंती माता की जय' च्या जयघोषात गुलाल खोबऱ्याची उधळण करीत परिसर दुमदुमून गेला. मिरवणूक मार्गावर ठीक ठिकाणी कुंती मातेचे दर्शन घेण्यासाठी महिलांसह भाविकांनी गर्दी केली होती.



  कुंती मातेची मिरवणूक बाजारपेठेतून महामार्गाच्या पश्चिमेस कॉलेज रोडवरील मारुती मंदिरास प्रदक्षिणा घालून पुन्हा बाजारपेठ मार्गे मिरवणूक सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भीम मंडपात दाखल झाली. या ठिकाणी भीम व कुंती माता यांच्या भेटीचा अभूतपूर्व व पारंपारिक सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यानंतर  विधिवत पूजाअर्चा करून कुंती मातेची भीमसेन महाराजांशेजारी प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी भाविकांनी भीम महाराज व कुंती मातेचा जयजयकार  केला.सोहळ्यास उंब्रजसह परिसरातील हजारो भाविकांची गर्दी झाली होती.




कुंती माता व पुत्र भीम यांच्या भेटीच्या सोहळ्याच्या पूर्व संध्येपासून भीम व कुंती यांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. उत्सवानिमित्त बाजारपेठेत खेळणी, पाळणे, मेवा मिठाई तसेच गुलाल खोबऱ्याच्या  दुकानांमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मिरवणूक पार पाडण्यासाठी भिमसेन मंडळाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच ग्रामपंचायत प्रशासन, उंयांनी परिश्रम घेतले तसेच  यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी उंब्रज पोलीस स्टेशन च्या वतीने  योग्य बंदोबस्त ठेवण्यात आला होता 



लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...