Tuesday, May 31, 2022

कागल येथे म.बसवेश्वर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण सोहळा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि अभिनेते नाना पाटेकर यांची उपस्थिती


कागल येथे म.बसवेश्वर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण  सोहळा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि अभिनेते नाना पाटेकर यांची उपस्थिती
सातारा, दि.1 -  प्रा.अजय शेटे.प्रतिनिधी लिंगायत TV live
कागल नगरपरिषद ,कागल व लिंगायत समाज,कागल यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या लिंगायत समाज संस्थापक व थोर समाज सुधारक म.बसवेश्वर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार व प्रसिद्ध अभिनेते मा.नाना पाटेकर यांच्या शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री मा.हसन मुश्रीफ साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.सौ.माणिक रमेश माळी मा.नगराध्यक्षा ,कागल नगर परिषद यांच्या उपस्थितीत शनिवार , दि.4 जून रोजी सायं.5 वा.शाहू उद्यान,निपाणी वेस,कागल येथे होणार आहे.
    या कार्यक्रमाला मा.प्रताप उर्फ भैय्या माने ,संचालक के. डी .सी. सी. बँक,कोल्हापूर , मा.युवराज पाटील बापू,संचालक गोकुळ दूध, मा.प्रकाश गाडेकर, मा.नगराध्यक्ष,कागल नगरपरिषद, मा. नविद मुश्रीफ साहेब,संचालक गोकुळ दूध, मा.रमेश माळी,उपनगराध्यक्ष,कागल नगर परिषद, मा.चंद्रकांत गवळी ,चेअरमन श्रीनाथ उद्योग समूह, मा. बाळ पाटील,गाव कामगार पाटील, मा.बाबगोंडा पाटील, मा. रायगोंडा पाटील तात्या, मा.एम . आर.चौगुले सर्,पिंपळगाव खुर्द, मा.बापूसो पाटील,सुळकुड, मा. सरलाताई पाटील,कोल्हापूर, मा.वसंत आंबी, मा.सुनील गाताडे,अधक्ष,कोल्हापूर जिल्हा तेली समाज, मा.शिवानंद माळी, म्हाकवे, मा.बबनराव बनशोडे, मा. बाबूराव माळी, मा.सुरेश गाताडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
तसेच मा.सतीश राजू,योगेश गाताडे, मा.सौरभ पाटील,संजय चितारी,रमेश पाटील,सुनील माळी, सुहस हिंगे,सुनील माळी,प्रकाश पाटील,अमोल पाटील,सुरेश पाटील,बाबूराव पुंडे सर्,शरद पाटील गुंड्या,गणपती संतमाळी,बाळासो माळी काँट्रॅक्टर,विष्णू कुंभार,डॉ.विनोद आवटे,काकासो पाटील,हिंदुराव पाटील,डॉ.विजयकुमार रुकडे,चंद्रकांत हळभावी,गंगाराम कुंभार पप्पू,अमोल कांडगावकर,राजू माळकर तेली,अमोल माळी, बाळगोंडा मगदूम,प्रकाश आंबी,संग्राम परीट, आनंदा परीट,साताप्पा माळी, सिध्दगौंड पाटील शिवकृपा,रावसाहेब परीट,कल्लाप्पा परीट,अमित चोळके,अविनाश विभुते,श्रीधर चकाते हे मान्यवर हजर राहणार आहेत.
तरी सदर कार्यक्रमाला सर्वांनी हजर रहावे,असे आवाहन कार्यक्रम संयोजक कागल नगरपरिषद व लिंगायत समाज,कागल यांनी केले आहे 


लिंगायत टिव्ही ची स्थापना का आणि , ! कशासाठी ?



लिंगायत टिव्ही ची स्थापना का आणि , !कशासाठी ?




               लिंगायत टिव्ही ची स्थापना का आणि , !कशासाठी ?



सातारा दि :- मनोगत  प्रा.अजय शेटे.लिंगायत TV live
पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख



वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना या व इतर आपल्या धर्म व समाजात कार्यरत असणाऱ्या सर्व संघटना यांचे कार्य इतर प्रसार माध्यमांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रसारित केले जात नाही.कदाचित कधीतरी एखादी बातमी देवून इतर आपले कार्यक्रम यांची साधी दखल ही इतर प्रसार माध्यमातील प्रचलित यंत्रणा घेत नाही.हे वारंवार आपल्याला जाणवून येत होते.किंबहुना चांगल्या कार्यक्रमाला प्रसिद्धी न देता आपल्याला जास्तीत जास्त अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता.




आपण इतर सामाजिक घडामोडींचे नीट निरिक्षण केले तर समजून येईल की,इतर धर्म व समाज जाती यांचे कार्यक्रम अतिशय शुल्लक दर्जाचे असतात.परंतु अशा कार्यक्रमाची फक्त मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी केली जाते व नुसता सुशोभित भपका करून त्या प्रवाहात आपल्याला खेचण्याचा प्रयत्न केला जातो.

विशिष्ट देव, महाराज,मठ संस्थाने,श्लोक,स्तोत्रे,सद्गुरू त्यांची व्याख्याने,भजने,कीर्तने,पूजा साहित्य,पुस्तके अशाप्रकारच्या गोष्टींचे नुसते हेतुपूर्वक ठरवून ब्रॅण्डिंग व मार्केटिंग चालू आहे.आणि त्यामध्ये आपल्याला सेवा भावाच्या नावावर गुंतवून टाकले जात आहे.म्हणजे प्रत्येक गोष्ट आपला सेवाभाव असला तरी पुढील लोकांचा तो सरळसरळ शुद्ध व्यवसाय,धंदा आहे.
या वरून आपणास हे समजून येते की,सध्या प्रचलित ज्या अनेक संघटना आहेत.त्यात त्यांचा सरळसरळ काही तरी स्वार्थ आहे.पण आपला मात्र तो परमार्थ व सेवाभाव आहे.
तेव्हा आपला धर्म,जात, संस्कृती,आपले देव, सद्गुरू,महाराज,आपले साहित्य,मंत्र,श्लोक,भजन कीर्तन,आपली भाषा,आपले समाजसेवक,नेते मंडळी यांच्या बद्दल आपले विचार सकारात्मक,स्वार्थी का करू नयेत ? असा विचार एकदा तरी आपल्या सर्व समाज बांधवांनी करावा.हा विचार रुजावा.म्हणून लिंगायत टिव्ही ची रचना ही अनेक कार्यकर्त्यांनी पदरचे पैसे घालून रितसर कायदेशीर रित्या नोंद करून केली आहे.यामागे आपल्या सेवाभावी दानशूर  लोकांचे खूप मोठे योगदान आहे.




तेव्हा आपल्या समाजातील सर्व कलाकार मंडळी,विचारवंत,समाज कार्यकर्ते,नेते मंडळी यांचे कार्य आपल्या समाजाबरोबर आपल्या वैयक्तिक स्थानिक संबंधावर इतर समाजातील लोकांना कळावे .या हेतूने लिंगायत टिव्ही ची रचना केली आहे. 
आपणही आपले वाढदिवस,आपले सामाजिक कार्य,कौतुक सोहळा, उद्योग धंदा व्यवसाय जाहिराती ,आपल्या अंगातील इतर कला व विद्या यांचे जर सादरीकरण करायचे असेल तर आपले लिंगायत टिव्ही हे हक्काचे व्यासपीठ आपण मोठ्या मेहनतीने तयार करून उभे केले आहे.तेव्हा बाहेर इतर प्रसार माध्यमात अवास्तव जादा पैसे खर्च करून आपल्या कौशल्याची प्रसिद्धी करण्यापेक्षा आपल्या हक्काच्या लिंगायत टिव्ही मध्ये योग्य  खर्चात आपली योग्य ती सर्व प्रकारे  प्रसिद्धी केली जाईल.तरी सर्वांनी जास्तीत जास्त आपल्या लिंगायत टिव्ही ला सहकार्य करून सर्व समाजाच्या सेवेची व उन्नतीची संधी द्यावी.
.आज जर आपण घरात पहात असलेल्या सर्व टिव्ही वाहिन्या पाहिल्या तर अनेक जाती धर्माच्या टिव्ही वाहिन्या सुरू आहेत.तसेच काहींनी आपल्या सेवाभाव वृत्तीवर पैसे कमावून प्रसिद्ध अशा टिव्ही वाहिन्या विकत घेतल्या आहेत.असे सर्व ठिकाणी दिसून येईल.नेते  मंडळींची निवड असुद्यात,पदाधिकारी नेमणे असूद्या,खेळाडू निवड असूद्या अथवा कलाकार निवड असूद्यात.विशिष्ठ जाती धर्माचेच व जातीचेच अभिनेते व अभिनेत्री यांची निवड करून त्यांना छोटा पडदा व मोठ्या पडद्यावर संधी दिली जात आहे.यातील काही तर निव्वळ ठोकळे आहेत.त्यांना ग चा म पण येत नाही.पण त्यांना खूप काही येत आहे असे दाखवून त्यांचे खोटे कौतुक केले जात आहे. व त्यांना पद,पैसा,प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत..आणि आपले मात्र सोने असून सुद्धा माती च्या मोलाने दुर्लक्षित करून प्रवाहाच्या बाहेर फेकले जात आहे.तेव्हा सर्वांनी सर्व बाबतीत अखंड सावधान राहून  उघड्या डोळ्यांनी वाटचाल केली पाहिजे व आपला दैवी, धार्मिक, देशप्रेमी,राजकीय ,सामाजिक,भौतिक व आर्थिक प्रगती ही अशी सकारात्मक स्वार्थ ठेवून केली पाहिजे. कळावे.हिच सर्वांना कळकळीची नम्र  विनंती .




आम्हा सर्वांचे लाडके लोकनेते आमचे काका आणि काकु उर्फ मा.काकासाहेब कोयटे व सौ.सुहासिनी ताई यांना विवाह दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


 आम्हा सर्वांचे लाडके लोकनेते आमचे काका आणि काकु उर्फ मा.काकासाहेब कोयटे व सौ.सुहासिनी ताई यांना विवाह दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
सातारा, दि.31 - प्रा.अजय शेटे.
 लिंगायत संघर्ष समितीचे नेते,महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन चे कृतिशील अध्यक्ष मा.काकासाहेब कोयटे व कोपरगावच्या मा.नगराध्यक्षा सौ.सुहासिनी ताई कोयटे यांच्या विवाहदिनाच्या निमित्ताने त्यांना वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांचे कडून हार्दिक शुभेच्छा,हार्दिक शुभेच्छा

Monday, May 30, 2022

पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर .प्रा.अजय शेटे.


पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर ,विशेष लेख - प्रा.अजय शेटे.




 पुण्यश्लोक मातोश्री राणीसाहेब अहिल्याबाई होळकर 
विशेष लेख - प्रा.अजय शेटे.



सातारा, दि.30 -  
राणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म 31 मे 1725 रोजी महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी  या गावात झाला.त्यांचे वडील व्यंकोजीराव शिंदे हे माळवा प्रांत साम्राज्याचे पाटील होते.त्यावेळी मुलींना शिक्षणास बंदी होती.परंतु अहिल्याबाई यांना त्यांच्या  वडीलांनी शिक्षण दिले.त्या लहानपणापासून अतिशय आदर्श व कुटुंबांचे संस्कार घेवून समाजसेवेत अग्रेसर होत्या.
एकदा इंदोर संस्थानचे राजे मल्हारराव होळकर हे माळवा प्रांतात आले असता ते' छावणी' या गावी आले.त्यावेळी तेथील श्री शंकराच्या मंदिरासमोर आठ वर्षाची एक लहान मुलगी गरीब लोकांना अन्नदान करत होती.तिचे ते कार्य पाहून त्यांनी अधिक चौकशी केली असता ती अहिल्या असल्याचे त्यांना समजले.तेव्हा त्यांनी तिच्या वडिलांना आपला राजपुत्र मुलगा खंडेराव याचे साठी तिला लग्नाची मागणी घातली.


आणि वयाच्या फक्त आठव्या वर्षी अहिल्या इंदोर संस्थान ची राणी बनली.
तिथून पुढे सलग वीस वर्षे त्यांच्या संस्थान ची खूप भरभराट झाली.
    परंतु त्यानंतर ई. स.1754 च्या एका घनघोर युद्धात त्यांचे पती खंडेराव यांना वीरमरण आले. त्यावेळी 'सती 'जाण्याची प्रथा  अस्थित्वात होती.त्यांनी त्यासाठी तयारी पण केली होती.परंतु प्रगत विचाराचे सासरे मल्हारराव यांनी पहिल्यांदा विरोध करून त्यांना सती जाण्यापासून रोखले.त्यानंतर  बरोबर बारा वर्षांनी त्यांचे सासरे मल्हारराव हे इ. स.1766 मध्ये निर्वतले.त्यामुळे सन 1767 मध्ये स्वतः अहिल्याबाई होळकर यांनी राजमुकुट परिधान करून त्या इंदौर संस्थानच्या महाराणी बनल्या.सन 1767 ते सन 1795 पर्यंत त्यांनी इंदोर संस्थानचे नाव संपूर्ण भारत वर्षात गाजवून सोडले.
त्या अतिशय देवभक्त व न्यायप्रिय होत्या.सर्वांना त्या समान न्यायदान करत असत. राजा व प्रजा असा वेगळा भेदभाव त्यांनी कधी केला नाही.त्याबाबत एक कथा त्यांची सम न्यायदानाची पद्धत सांगून जाते.
त्यांचा मुलगा असलेला युवराज मालोजीराव याने इंदोर शहरात वेगाने घोडा रथ चालवून एका गायीच्या वासरास धडक दिली व तो वेगाने निघून गेला.यात वासरू जागेवरच गतप्राण झाले.त्यामुळे तीची आई गाय विव्हल अवस्थेत तिथेच बसून राहिली.सर्व प्रजा गर्दी करून हे दृश्य पहात होती.थोड्याच वेळात तेथून महाराणी अहिल्याबाई यांचा रथ आला.त्यावेळी अधिक चौकशी केली असता त्यांना त्यांच्या पुत्राचा पराक्रम समजला.त्यांनी त्या वासराच्या अंत्यसंस्काराची सोय करून त्या गोमातेस स्वतःच्या गोशाळेतून पालन पोषण आहार देण्यास सांगितले व त्या तडक राजदरबारात आल्या.त्यांनी युवराज मालोजीराव यांच्या पत्नी सूनबाई यांना बोलावून विचारले की,अशा प्रकारचा अपराध केला तर त्या व्यक्तीला कोणत्या प्रकारची शिक्षा करावी.त्यावर सूनबाईनी सांगितले की,त्याला सरळ कडक देहदंडाची शिक्षा देण्यात यावी .त्याबरोबर त्यांनी प्रधान व शिपाई याना पाठवून मालोजीराव यांना कैदी बनवून पकडुन आणले व देहदंडाची शिक्षा सुनावलीआणि जिथे ते वासरू मरण पावले होते त्याच चौकात हातपाय दोरखंडाने बांधून मालोजीराव यांना आणून टाकले. व घोडागाडी वेगाने अंगावर घालण्यास सांगितले.परंतु त्या अश्वरथास चालविण्यासाठी कोणीही सारथी तयार झाला नाही.हे पाहून स्वतः त्या रथामध्ये  बसल्या व रथ चालवू लागल्या.त्यावेळी तीच गाई त्या रथाला वारंवार आडवी येवू लागली व तिने अहिल्याबाईंना रोखले.हा चमत्कार पाहिल्यावर प्रधान मंडळींनी त्यांना शिक्षेत बदल करण्याची विनवणी केली.त्यामुळे नाईलाजाने त्यांनी मालोजीराव यास नगरातून बाहेर काढले व त्याचे युवराज म्हणून असलेले सर्व अधिकार काढून टाकले. ही दंतकथा ज्या चौकबाजारात  घडली त्याला त्यामुळेच 'आडा बाजार '  असे नाव पडले आहे.  ही घटना अहिल्याबाई महाराणी झाल्या त्या नंतर एकाच वर्षात घडली. त्यामुळे आई व पत्नी यांचेपासून दूर राहावे लागले मुळे पुढे  दुखी मनाने खचून अतिशय बिकट अवस्थेत मालोजीराव त्याच वर्षी मरण पावले.अशा प्रकारे ओळीने पती,सासरे व त्या नंतर एका वर्षात पोटचा मुलगा मरण पावल्याचे दुःख पचवून त्यांनी इंदोर संस्थान चा राज्यकारभार मोठ्या जिद्दीने चालू ठेवला.
एक स्त्री ही इंदोर संस्थान चा राज्यकारभार पहात आहे.हे पेशवे साहेबांना योग्य वाटत नव्हते.त्यांनी इंदोर संस्थानच्या वेशीवर सैन्य नेवून इंदोर संस्थान वर पुरुष राजा बसवण्याचा आग्रह धरला.परंतु  त्यांनी आपले सेनापती तुकोजीराव यांना पेशवे सरकार यांचे कडे पाठवून एक पत्र त्यांच्या स्वाधीन केले.त्या मध्ये लिहले होते की, माझ्या वडिलांनी मला बंदी असताना  पण शिक्षण दिले,माझे सासरे यांनी मला' सती 'जाण्यापासून रोखले.दोघेही स्त्री चा आदर करणारे होते.समानता मानणारे होते.त्यामुळेच मी स्त्रियांचे सैन्य उभे करू शकले.आपण जबरदस्ती करून मला पायउतार कराल तर आमचे स्त्रियांचे सैन्य तुमच्याशी युद्ध करेल.जर त्यात तुम्ही जिंकला तर एका दुःखी स्त्रीचे राज्य हिसकावून घेतले असे दूषण तुम्हाला लागेल.आणि जर आम्ही जिंकलो तर हा अपमान  तुम्ही पचवू शकणार नाही.असे टोचणारे शब्द ऐकल्यावर पेशवे सैन्याचा विचार बदलला व त्यांनी आम्ही फक्त  तुमच्या शोक दुःखात सामील होण्यास आलो आहोत असे म्हणून त्यांनी महाराणी अहिल्याबाई यांची गाठ घेतली व दुखवटा काढून ते आल्या पावली माघारी फिरले.
      अहिल्याबाई या परकीय यावनी सत्तेपासून आपले राज्य सुरक्षित रहावे म्हणून सदैव तत्पर असत.त्यासाठी त्यांनी भगवान श्री शिवशंकराची उपासना करून आपले मनोसामर्थ्य प्रचंड वाढवले.श्री महादेवावर त्यांची खूप श्रद्धा होती त्यामुळे त्या नेहमी त्याची भक्ती करत.त्यांनी आपल्या राज्यात महेश्वर व इंदोर येथे अनेक मंदिरे बांधली.तसेच  सोमनाथ सह अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. त्यालाच सध्या ' जुने सोमनाथ ' किंवा ' अहिल्याबाई मंदिर ' असे म्हणतात.धर्मशाळा बांधल्या,शिक्षणाची सोय केली,पाण्यासाठी मोठ्या विहिरी खोदल्या.पूजापाठ संस्कार केंद्रे उभारली. लष्करी शिक्षण देवून स्त्री सैन्याची पलटण उभी केली.

                                
श्री भगवान शिवशंकरा प्रती असलेल्या भक्तिभावामुळे त्यांचा राजपत्रात व राजआज्ञेत  सर्वात शेवटी स्वतःच्या मोहोर व स्वाक्षरी ऐवजी 'श्री शिव शंकर ' अशी नोंद त्या करत असत .त्यांनी छापलेल्या नाण्यांवर श्री शंकर, श्री नंदी,बेलपत्र यांची अनेक प्रकारची चित्रे होती.
अतिशय भक्तिभावाने त्यांनी आपले राज्य चालवले.सुशासन,दूरदर्शी कारभार पारदर्शक कारभार पद्धत यामुळे त्यांची कारकीर्द खूप गाजली. "आपल्या राज्याची सर्व संपत्ती ही श्री परमेश्वराची असून आपण फक्त तिचे राखणदार आहोत "असे त्या मानत. दि.31मे  रोजी त्यांची 297 वी जयंती पार पडत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी ग्रामविकास व आदिवासी विकास मंत्री  मा.ना.आण्णासाहेब डांगे ,इस्लामपूर यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर लिहलेले 'पुण्यश्लोक मातोश्री महाराणी साहेब - देवी अहिल्याबाई होळकर '  हे पुस्तक सर्व इतिहास प्रेमी,स्पर्धा परीक्षा अभ्यासक,  तसेच राजकीय ,सामाजिक रसिक वाचक यांनी जरूर वाचावे व आपल्या जीवनात त्यांच्या राजकारभार तत्वांचा अंगीकार करावा येव्हढीच त्यांच्या 298 व्या जयंती निमित्त माफक अपेक्षा. त्याच्या पराक्रमी कर्तुत्वाला त्रिवार वंदन . जय देवी अहिल्याबाई - जय शिव शंकर.  

युवा ग्रामोद्योजक विकास कार्यक्रमाचे आयोजन


युवा ग्रामोद्योजक विकास  कार्यक्रमाचे आयोजन 

सातारा, दि.27-  प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी 
भारतीय युवा शक्ती ट्रस्ट व एच डी एफ सी बँक परिवर्तन योजना यांच्या संयुक्त विद्यमाने युवा ग्रामोद्योजक विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या नवीन धोरणा प्रमाणे आज नोकरी मागणाऱ्या व्यक्ती उद्या नोकरी देणाऱ्या बनणार आहेत.तसेच अनेक युवकांचे स्वतः उद्योजक बनण्याचे स्वप्नही पूर्ण होणार आहे 
या योजनेसाठी असलेली पात्रता पुढीलप्रमाणे आहे.हे उद्योजक युवक वय वर्षे 18 ते 35 या वयोगटातील असावेत.त्यांनी उत्पादन,व्यापार व सेवा क्षेत्रातील व्यवसाय करणारे असावेत.तसेच ते सातारा जिल्ह्यातील रहिवासी असावेत .
या उद्योजकांना ट्रस्ट व बँकेतर्फे समुपदेशन करण्यात येवून त्यांच्यासाठी उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.तसेच मेंटर तत्वानुसार विश्वासू सल्लागारां
मार्फत पहिली दोन वर्षे सतत  मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच राष्ट्रीयीकृत बँके मार्फत रू.एक लाख ते रू.पन्नास लाखांपर्यंत विनातारण व विना जामीन कर्ज मिळवून देण्यात येणार आहे. सदर उद्योजकाला विविध प्रदर्शनामध्ये सहभागी होण्याची संधी मिळवून देण्यात येणार आहे.तसेच मेळावे व विविध पुरस्कार यासाठी त्यांची शिफारस करण्यात येणार आहे
    याबाबत अधिक माहितीसाठी भारतीय युवा शक्ती ट्रस्ट ,रत्न कल्याण ,पहिला मजला,युनियन बँक ऑफ इंडिया च्या वर ,रेल्वे स्टेशन रोड,
कराड, पिन क्र.415110 व जी- 34 राजधानी टॉवर,सातारा,पिन क्र.415001, मोबा. क्र.8010566272 व 9822683794,मेल - byst.satara@cil.in website-www.bystonline.org यावर संपर्क साधावा.या संस्थेच्या सर्व सेवा ह्या मोफत असून,हेल्प लाईन क्र.१८००- १२१ -१८१- १८१ असा आहे.तरी इच्छुक नव उद्योजकांनी त्वरित संपर्क साधावा. असे  आवाहन ट्रस्ट व बँक यांचेमार्फत केले गेले आहे.

Sunday, May 29, 2022

सामूहिक विवाह ही लोकचळवळ व्हावी : श्री काशी जगद्गुरू सर्वधर्मीय 35 जोडपी झाले विवाहबद्ध


सामूहिक विवाह ही लोकचळवळ व्हावी : श्री काशी जगद्गुरू 
सर्वधर्मीय 35 जोडपी झाले विवाहबद्ध
बागलकोट दि 25 : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकांवर झालेला आहे. विवाह समारंभ पार पाडणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. त्यामुळे सामूहिक विवाह ही सध्याच्या काळातील गरज बनली आहे. प्रत्येक गावागावात सामूहिक विवाह समारंभ झाले पाहिजेत. सामूहिक विवाह ही लोकचळवळ बनली पाहिजे असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
             बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातील गिरीसागर येथील सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, काशीचे नुतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, बागलकोटचे आमदार इरण्णा चरंतीमठ, गिरीसागर कल्याण मठाचे मठाधिपती रुद्रमणि शिवाचार्य, मंद्रूप मठाचे मठाधिपती रेणुक शिवाचार्य तसेच बिलकेरी, कोळनुर, बिळगी, चळगेरी, मणीकेरी, मुत्तती आणि येमेगनूर येथील मठाधिपती उपस्थित होते.
          यावेळी गिरीसागर कल्याण मठाचे मठाधिपती रुद्रमणि शिवाचार्य यांच्या जन्म सुवर्णमहोत्सव आणि पट्टाभिषेक अमृतमहोत्सव निमित्त 35 जोडप्यांचा विवाह पार पडला.
             ते पुढे म्हणाले की सामूहिक विवाह समारंभ ही अनेक लोकांना उपयोगी आहे. सर्वधर्मीय सामूहिक विवाहामुळे समाजात एकोपा निर्माण होतो. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होता येते. अशा विवाह समारंभात जगद्गुरु, धर्मगुरू, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित राहून आशीर्वाद देतात. त्यामुळे सामूहिक विवाह समारंभात लग्न होणे ही देखील भाग्याची गोष्ट आहे.

खटाव तालुक्याचे तरुण तडफदार आणि लिंगायत समाजाचे युवा नेते मा.सुरेंद्र मा. सुरेंद्रदादा गुदगे विशेष लेख.. प्रा अजय शेटे




खटाव तालुक्याचे तरुण तडफदार आणि लिंगायत समाजाचे युवा नेते मा.सुरेंद्र 
मा. सुरेंद्रदादा गुदगे 
विशेष लेख.. प्रा अजय शेटे
सातारा, दि.28 - खटाव तालुक्याचे भाग्यविधाते व उरमोडी प्रकल्पाचे भगीरथ ,कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मा.उपाध्यक्ष स्व. आ.भाऊसाहेब गुदगे काका यांच्या आदर्शवत पावलावर पाउल ठेवून कार्य करणारे खटाव तालुक्याचे तरुण तडफदार नेते मा.सुरेंद्र दादा गुदगे यांचा आज वाढदिवस..
मा.दादा हे मायणी अर्बन बँकेचे विद्यमान चेअरमन आहेत.तसेच ते मायणी जिल्हा परिषद गणाचे सदस्यही आहेत.एखाद्या आमदार,खासदार यांच्यापेक्षाही त्यांचा विकास कामाचा वेग अतिशय वाखाणण्यासारखा आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पक्षप्रतोद म्हणूनही राज्य पातळीवर ते करत आहेत.मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे पण ते अध्यक्ष आहेत.जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.अशा प्रकारे आपल्या घराण्याच्या स्वहिमतीवर व कर्तृत्वावर मा.सुरेंद्र दादांनी करून दाखविलेली नेत्रदिपक प्रगती त्यांच्या उच्चविद्याविभूषित व संस्कारक्षम कार्यपद्धतीची पोहोच पावतीच देत आहे.
म्हणून आजच्या या वाढदिवसाच्या शुभदिनी त्यांना वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही च्या वतीने हार्दिक शुभेच्छा. 


विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत : डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्यकाशीपीठाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण


विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत : डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य
काशीपीठाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण
सोलापूर दि 28  : विद्यार्थ्यांना काशी पीठाकडून मिळालेली शिष्यवृत्ती म्हणजे पीठाचा प्रसाद आणि आशीर्वाद आहे. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. विद्यार्थ्यांची प्रगती  म्हणजेच देशाची प्रगती होय. विद्यार्थ्यांनी शिकून परदेशी न जाता देशातच राहून सेवा करावी. काशी पीठाचे कार्य पुढे चालू ठेवण्याबरोबरच तो वाढविण्याचा आमचा निर्धार आहे. शिष्यवृत्ती देण्याबरोबरच यापुढील काळात विद्यार्थ्यांना पूर्णपणे दत्तक घेण्याचा देखील आमचा मानस आहे असे प्रतिपादन काशी पीठाचे नूतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांनी केले.
             श्री जगद्गुरु विश्वाराध्य ज्ञानसिंहासन,  काशीपीठ, जंगमवाडी मठ,  वाराणसीचे जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या श्री जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंद्रूपचे मठाधिपती रेणूक शिवाचार्य, आ. विजयकुमार देशमुख, माजी आमदार शिवशरण पाटील, माजी कुलगुरू इरेश स्वामी, सिद्धय्या स्वामी-हिरेमठ, डॉ. राजेंद्र घुळी, शशिकांत रामपुरे, शांतय्या स्वामी, राजकुमार पाटील, डॉ. अनिल सर्जे, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर उपस्थित होते.             
         यावेळी सोलापूर शहरातील 18 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 12 हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले. उर्वरित 382 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम ऑनलाइन जमा केली जाते. काशी पीठाची शिष्यवृत्ती घेऊन शिकलेली विद्यार्थिनी लक्ष्मी बुगडे हिला आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. यावेळी तिने आपल्या पगारातून काशी पीठाच्या शिष्यवृत्ती विभागास देणगी म्हणून दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. तसेच विजया भीमाशंकर जम्मा यांनी काशी पीठाच्या शिष्यवृत्ती विभागास 11 हजार रुपये रोख देणगी देऊन 1 लाख रुपये आणखी देणार असल्याचे सांगितले.
             यावेळी बोलताना आ. देशमुख म्हणाले की काशी पीठाचे धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य श्रेष्ठ असे आहे. अशा काशी पीठाला नूतन जगद्गुरु म्हणून सोलापुरातील होटगी मठाचे मठाधिपती डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य लाभले आहेत हे आपल्या सोलापूरकरांचे भाग्यच म्हणावे लागेल 
               याप्रसंगी देणगीदार विजयकुमार भोगडे, प्रमिला नंदगावकर, निवृत्ती गायकवाड, शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, त्यांचे पालक, बृहन्मठ होटगी संस्थेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि भक्तगण उपस्थित होते.
                कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर यांनी काशीपीठाकडून देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसंबंधी संपूर्ण माहिती दिली. उपस्थितांचे स्वागत डॉ. अनिल सर्जे यांनी तर आभारप्रदर्शन सिद्धय्या स्वामी-हिरेमठ यांनी केले. 
              कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजशेखर बुरकुले, राजेंद्र बलसुरे, गुरुशांत रामपुरे, डॉ. जितेंद्र बिराजदार, संतोष बिराजदार, महारुद्रय्या स्वामी, मनोज हिरेमठ, शांतय्या स्वामी, ओंकार मुंडे आदींनी परिश्रम घेतले. काशीपीठाच्या फेसबुक पेजवरून संपूर्ण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले.

वीरशेेेैव हितसंवर्धक मंडळाची नविन कार्यकारीणी जाहिर

 


वीरशेेेैव हितसंवर्धक मंडळाची नविन कार्यकारीणी जाहिर
यवतमाळ दि 29 प्रतिनिधी निलेश शेटे लिंगायत TV live
वीरशेेेैव हितसंवर्धक मंडळाची नविन कार्यकारीणी जाहिर
अध्यक्षपदी डॉ.जयेश हातगांवकर, उपाध्यक्षपदी डॉ.प्रा. किशोर मांडगावकर,तर सचिव पदी निलेश शेटे ह्यांची निवड
लिंगायत समाज यवतमाळच्या वीरशैव हितसंवर्धक मंडळ, यवतमाळची २०२२-२०२५ करिता नवनीवार्चीत कार्यकारिणीची सर्व सम्मंतीने निवड करण्यात आली.
वीरशैव हितसंवर्धक मंडाळाची २०२१-२२ची वार्षीक आमसभा डॉ.अशोक मेनकुदळे ह्यांचे अध्यक्षेते खाली महात्मा बसवेश्वर भवन येथे संप्पन झाली,प्रास्तावीक सचिव निलेश शेटे ह्यांनी केले तसेच  २०२१-२२ चे संपुर्ण जमा खर्च वाचुन दाखवुन त्यास मान्यता सर्वानुमते  देण्यात आली.ह्यानंतर नविन कार्यकारीणी ची निवड  सर्वानुमते करण्यात आली ह्या मध्ये अध्यक्ष डॉ.जयेश हातगांवकर, उपाध्यक्षपदी डॉ.प्रा. किशोर मांडगावकर, सचिव पदी निलेश शेटे,सहसचिव पदी गजानन हातगांवकर, कोषाध्यक्ष पदि गिरीष गाढवे,सदस्य म्हणुन विनोद देशमुख, नागेश कुल्ली, रमेश केळकर, राजु कुऱ्हेकार,जयंत डोंगरे,भुषण तंबाखे,ह्यांची निवड करण्यात आली आणि सल्लागार पदी अध्यक्ष म्हणून डॉ.अशोक मेनकुदळे, चंद्रशेखर उमरे रविंन्द्र दिवे,सुधाकर केळकर,सुरेश शेटे,महेश्वरराव गाढवे,प्रकाश चनेवार,अशोक तेले,विनोद नारिंगे,विजय देशमुख,
तांत्रिक प्रमुख प्रदिप उमरे,निर्मल ठोंबरे ह्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.ह्यानंतर नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.जयेश हातगांवकर ह्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सर्वांचे आभार मानले तसेच भविष्यात मंडळाला विशिष्ट उंचीवर नेण्याचा मानस व्यक्त केला आणि  नवनिर्वाचीत कार्यकारिणीत नवीन व तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.त्यामुळे आता 
लिंगायत समाजामध्ये नवनवीन कार्य करू असे आश्वासित केले,
नवनिर्वाचीत कार्यकारीणीची लिंगायत समाजातील सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे.

Saturday, May 28, 2022

डॉ.शिवमूर्ती बसाप्पा शाहीर शिवैक्य


 डॉ.शिवमूर्ती बसाप्पा शाहीर शिवैक्य 
सातारा, दि.28 -प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
 नाशिक जिल्ह्याचे समाजभूषण असलेले धोंडबे या गावचे सुपुत्र व सोलापूर येथे स्थायिक होऊन वैद्यकीय व्यवसाय व समाज कार्य यामध्ये भरीव योगदान देणारे डॉ.शिवमूर्ती बसाप्पा शाहीर हे शुक्रवार दि.28 रोजी शिवैक्य झाले.
लिंगायत समाजाच्या जुन्या पिढीतील ते पाहिले एम. बी. बी.एस डॉक्टर  होते.ते महाराष्ट्र वीरशैव सभा,पुणे चे संस्थापक आधारवड होते.सोलापूर जिल्ह्याचे प्रांताध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.तसेच सोलापूरच्या शैक्षणिक,सहकार व कृषी क्षेत्रातही भरीव योगदान दिले होते.श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे ते विद्यमान विश्वस्त होते.श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी चेअरमन म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले होते.श्री वीरशैव महाजन सभा ट्रस्टचे ते उपाध्यक्ष पण होते.समाजकार्यातील भीष्माचार्य व मार्गदर्शक श्रद्धास्थान म्हणूनही त्यांच्याकडे आदराने पाहिले जात असे त्यांच्या लिंगैक्य होण्याने समाज चळवळीतील एक विद्यापीठ काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वांना अतिशय दुःख झाले आहे.
त्यांना वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.ओम शांती!

Friday, May 27, 2022

डॉ.अशोक नगरकर यांना उच्च ऊर्जा स्त्रोत प्रणाली विकास व सुरक्षा पुरस्कार प्राप्त


डॉ.अशोक नगरकर यांना उच्च ऊर्जा स्त्रोत प्रणाली विकास व सुरक्षा पुरस्कार प्राप्त 
सातारा, दि.27 - प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी 
डी. आर .डी. ओ, ( सुरक्षा संशोधन विकास संस्था ) पुणे या संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.अशोक गोविंद नगरकर यांना  राष्ट्रीय उच्च ऊर्जा स्त्रोत प्रणाली विकसन व सुरक्षा कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारा अतिशय मानाचा असा  ' उच्च ऊर्जा विकास व सुरक्षा ' पुरस्कार देवून नुकतेच ' संरक्षक व भेदक क्षेपणास्त्र संशोधन प्रयोगशाळा , ' डी.आर डी. ओ. चंदिगढ - पंचकुला  येथील कार्यक्रमात गौरविण्यात आले आहे.
हा पुरस्कार राष्ट्रीय स्वरूपाचा असून भारतीय केंद्र शासनाच्या सहकार्याने प्रदान करण्यात येतो.प्रशस्तीपत्र,ट्रॉफी व इतर लाभ असे या पुरस्काराचे स्वरूप असून उपस्थित सर्व मान्यवर वरिष्ठ शास्त्रज्ञ यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. 
या कार्यक्रमासाठी बहिस्थ शास्त्रज्ञ मार्गदर्शक तसेच उच्च ऊर्जा स्त्रोत संशोधन व शिक्षण विभाग डी आर डी ओ चे वरिष्ठ शास्त्रज्ञ मा. के पी एस मूर्ती, टी बी आर एल , डी आर डी ओ चे वरिष्ठ संचालक मा.प्रतीक किशोर, सर्वसाधरण क्षेपणास्त्र प्रणाली चे वरिष्ठ संचालक मा.डॉ.नारायण मूर्ती,सतीश धवन अंतरिक्ष व अंतराळ संशोधन केंद्र , इस्त्रो चे वरिष्ठ संचालक मा.राजा राजन तसेच आर्मामेंट क्लस्टर , डी. आर, डी. ओ .चे वरिष्ठ संचालक मा.पी. के.मेहता साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
   डॉ.अशोक गोविंद नगरकर यांना हा श्रेष्ठ पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल वीरशैव इंटरनॅशनल,लिंगायत संघर्ष समिती,वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांच्या तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा,हार्दिक शुभेच्छा.

सामूहिक विवाह ही लोकचळवळ व्हावी : श्री काशी जगद्गुरू सर्वधर्मीय 35 जोडपी झाले विवाहबद्ध


सामूहिक विवाह ही लोकचळवळ व्हावी : श्री काशी जगद्गुरू 
सर्वधर्मीय 35 जोडपी झाले विवाहबद्ध
बागलकोट दि 26 : राजशेखर बुरुकुले प्रतिनिधी
 कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. त्याचा परिणाम समाजातील प्रत्येक घटकांवर झालेला आहे. विवाह समारंभ पार पाडणे हे प्रत्येकाला जमेलच असे नाही. त्यामुळे सामूहिक विवाह ही सध्याच्या काळातील गरज बनली आहे. प्रत्येक गावागावात सामूहिक विवाह समारंभ झाले पाहिजेत. सामूहिक विवाह ही लोकचळवळ बनली पाहिजे असे प्रतिपादन काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी केले.
             बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्यातील गिरीसागर येथील सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, उज्जैन जगद्गुरु डॉ. सिद्धलिंग राजदेशीकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, काशीचे नुतन जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, बागलकोटचे आमदार इरण्णा चरंतीमठ, गिरीसागर कल्याण मठाचे मठाधिपती रुद्रमणि शिवाचार्य, मंद्रूप मठाचे मठाधिपती रेणुक शिवाचार्य तसेच बिलकेरी, कोळनुर, बिळगी, चळगेरी, मणीकेरी, मुत्तती आणि येमेगनूर येथील मठाधिपती उपस्थित होते.
          यावेळी गिरीसागर कल्याण मठाचे मठाधिपती रुद्रमणि शिवाचार्य यांच्या जन्म सुवर्णमहोत्सव आणि पट्टाभिषेक अमृतमहोत्सव निमित्त 35 जोडप्यांचा विवाह पार पडला.
             ते पुढे म्हणाले की सामूहिक विवाह समारंभ ही अनेक लोकांना उपयोगी आहे. सर्वधर्मीय सामूहिक विवाहामुळे समाजात एकोपा निर्माण होतो. एकमेकांच्या सुखदुःखात सामील होता येते. अशा विवाह समारंभात जगद्गुरु, धर्मगुरू, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील हजारो मान्यवर उपस्थित राहून आशीर्वाद देतात. त्यामुळे सामूहिक विवाह समारंभात लग्न होणे ही देखील भाग्याची गोष्ट आहे.

Thursday, May 26, 2022

श्री शनी जयंती निमित्त सोळशी येथे अनेक कार्यक्रम


 श्री शनी जयंती निमित्त सोळशी येथे अनेक कार्यक्रम 
सातारा, दि.26 -  प्रा.अजय शेटे.प्रतिनिधी
शनिवार दि.28 ते सोमवार दि.30 मे अखेर श्री शनैश्वर जयंती निमित्त श्री क्षेत्र सोळशी येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मठाधिश नंदगिरी महाराज यांनी दिली.
यावेळी समाजामध्ये उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना श्री शनैश्वर कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे .
शनिवार ते सोमवार अखेर येथील श्री शिव मंदिरात एक कोटी बेलार्पण व महारुद्राभिषेक केला जाणार आहे तसेच शनिवारी श्री शिवलीलामृत पारायण व इतर धार्मिक कार्यक्रम तसेच रविवारी दु.एक वाजता श्री शनी महात्म्य पारायण , गोपूजन,धर्म ध्वजवंदन व भजन आदी कार्यक्रम होतील सोमवारी पहाटे पासून धार्मिक विधी व दुपारी अडीच वाजता श्री त्यागेश्वर महाराजांची पालखी मिरवणूक काढली जाईल संध्या. सहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री शनैश्वर कृतज्ञता पुरस्काराचे वितरण करण्यात येईल.
यंदाचा युवा धर्मरक्षा पुरस्कार मा.धनंजय देसाई, भूमिपुत्र पुरस्कार मा.मंगेश धुमाळ,गोरक्षा पुरस्कार मा.शिवशंकर स्वामी, प्रगतशील शेतकरी पुरस्कार मा.जालिंदर सोळस्कर यांना देण्यात येणार आहे.त्यानंतर श्री शनैश्वर जन्मोत्सव सोहळा व महाआरती करण्यात येईल .
या कार्यक्रमाला सोलापूरचे खासदार डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी,द्वारकेचे जगद्गुरु सूर्योचार्य कृष्णानंदगिरी महाराज, शांतीगिरी महाराज,बुद्ध गिरी शितलगिरी  महाराज,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदींसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तेव्हा सदर कार्यक्रमास सर्व भाविक भक्तांनी हजर रहावे.असे आवाहन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट व सेवेकरी मंडळ यांनी केले आहे.
  तसेच हे हिंदू देवस्थान असून लिंगायत समाजाचे पवित्र असे स्थान आहे.येथे सर्व धार्मिक संस्काराचे जातं केले जाऊन अनेक गरजू विद्यार्थ्यांना शाळेत व धार्मिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते.संस्थान तर्फे येणाऱ्या सर्व भक्तांना वेळेनुसार नाष्टा,भोजन व चहाचा महाप्रसाद दिला जातो.तसेच अनेक उपक्रम हे पूर्णपणे मोफत केले जातात.असे मा.नंदगिरी महाराज यांनी बुधवार दि.25 रोजी संध्या. 6 वा.संस्थान मध्ये दर्शनासाठी गेलेल्या श्री.सतीश शेटे,प्रा.एन .एस.गोडसे सर्,प्रा.नागनाथ स्वामी , श्री.प्रदिप शेटे,श्री अशोक काळे,डॉ.चंद्रशेखर येवले यांना सांगितले.

Wednesday, May 25, 2022

आयुष्यात "श्रद्धा" आणि "श्रबुरी" महत्वाची : स्व.विलासराव देशमुख साहेब यांची एक अविस्मरणीय आठवण,विशेष लेख - मंगेश चिवटे


आयुष्यात "श्रद्धा" आणि "श्रबुरी" महत्वाची : स्व.विलासराव देशमुख साहेब यांची एक अविस्मरणीय आठवण,
विशेष लेख - मंगेश चिवटे,
जवळपास 11 वर्षांपूर्वी, 2009 साली मार्च-एप्रिल महिन्यात स्व. विलासराव देशमुख साहेब यांच्या समवेत लोकसभा निवडणुकांच्या काळात स्टार माझा ( सध्याचे ABP माझा ) वृत्तवाहिनीचा राजकीय प्रतिनिधी म्हणून  " एक दिवस, एक नेता " कार्यक्रम करण्याची संधी संपादक राजीव खांडेकर सर यांनी दिली होती...माझे वरिष्ठ सहकारी निलेश खरे सर यांनी यावेळी काही महत्वाच्या नेत्यांसोबत तू कार्यक्रम कर, भरपूर शिकायला मिळेल - अनुभव येईल असे सांगत तुझ्या आवडत्या स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्यासमवेत तू कार्यक्रम कर असे सांगितले...
आदरणीय स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्या झंझावाती प्रचारसभा त्यावेळी मी अनुभवल्या... खरं तर मुख्यमंत्री म्हणून 2009 साली निवडणुकांना सामोर जाण्याची प्रचंड त्यांची प्रचंड इच्छा होती...पण नियतीला ते मान्य नव्हते...26/11च्या हल्ल्यानंतर ते मुख्यमंत्री 
पदावरून पायउतार झाले होते..परंतु तरीही विदर्भ, मराठवाडा सहित संपूर्ण महाराष्ट्रा मध्ये तूफानी प्रचार सभा घेत होते...काँग्रेस पक्षासाठी सतत...अविरत आणि अविश्रांत...झटत होते...एका दिवसात जवळपास 6 ते 7 प्रचारसभा घेत होते...घसा बसलेला असताना स्व.विलासराव वारंवार कंठ सुधारक वटी खात भाषणं देत होते...

आमचे चार्टेड फ्लाइट नागपुर मधून टेक ऑफ करण्याच्या अगोदर..साहेबांना एक फोन आला...बहुतेक समोरच्या व्यक्तीला साहेबांचा आवाज नीट ऐकू जात नसावा...*तेव्हा साहेब पुन्हा म्हणाले..बोला, बोला...*" मी विलास देशमुखच बोलतोय"...मला थोडेसे विचित्र वाटत होते...*कारण जेव्हापासून राजकारण समजू लागले तेव्हापासून कायम "विलासराव देशमुख "असेच नाव एकत आलो होतो...न राहवून मी साहेबाना विचारले साहेब "आपण फोनवर  स्वतःला संबोधित करताना विलास देशमुख असे म्हणालात...ऐकायला थोड़े विचित्र वाटले...कारण आम्ही आजपर्यंत फ़क्त विलासराव देशमुख असेच एकत लहानाचे मोठे झालो.." 
*त्यावर साहेबानी अतिशय मार्मिक उत्तर दिले होते...*
*"मोठेपणा हा कधी स्वतःहून घ्यायचा नसतो...तो दुसऱ्यांनी द्यायला हवा...आणि त्यासाठीच कर्तुत्ववान व्हा..."*

आज गल्ली तले "राव, भाऊ, शेट, दीदी, दादा, नेते, सरकार " ही विशेषण लावणारे पुढारी कुठे....आणि विलासराव साहेब कुठे...?? 

*अजुन एक गोष्ट त्यांनी मला प्रवासात सांगितली....साहेब नेहमी म्हणायचे....आयुष्यात दोन गोष्टी खुप महत्वाच्या....*
*" श्रद्धा "आणि " श्रबुरी"....ही शिर्डीच्या साईं बाबांची शिकवण....जीवनात संयम खुप महत्वचा....पराभावाने खचून जावू नका...आणि विजयाने उन्माद येवू देवू नका...*

( स्व.देशमुख साहेब "सबुरी"च्या ऐवजी "श्रबुरी" म्हणायचे ) 
 
आणखी एक आठवण 

*तुम्ही जसा विचार मनात आणाल तसेच घडेल, त्यामुळे सकारात्मक विचार करा - स्व.विलासराव देशमुख*

साधारणतः 2002 साली , मी नववीत असताना माझ्या गावी करमाळा पासून 30 किलोमीटर अंतरावर श्री मकाई सहकारी साखर कारखाना येथे स्व. विलासराव देशमुख साहेब हेलिकॉप्टरने भूमिपूजनच्या की गळीत हंगामच्या  कार्यक्रमाला येणार होते अशी माहिती मिळाली होती...एकाचवेळी 2 गोष्टींची इच्छापूर्ती होणार होती, एक म्हणजे स्व.विलासराव देशमुख यांस प्रत्यक्षात पाहणे आणि दुसरे म्हणजे हेलिकॉप्टर पाहणे...

...याच मकाई कारखानाचे संस्थापक स्व.दिगंबरजी बागल यांच्या नेतृत्वाखाली सख्खे मोठे बंधू श्री महेश चिवटे यांची श्री मकाई कारखान्यावर तज्ञ संचालक म्हणून निवड झालेली होती..घरात वडीलबंधू शिस्तप्रिय असल्याने आणि दरम्यान शाळेत परीक्षा सुरू असल्याने कार्यक्रमाला जाण्याचा हट्ट करणे जवळपास अशक्य होते...

अजूनही लक्ख आठवतंय..त्यादिवशी चाचणी परीक्षा होती..आणि सकाळी 11 वाजता आमच्या महात्मा गांधी शाळेसमोर श्री मकाई कारखाना येथे कार्यक्रम ठिकाणी निघण्याच्या तयारीत असलेला एक कार्यकर्त्यांचा 407 टेम्पो उभा होता...मनात घालमेल सुरू झाली, एका बाजूला शाळा आणि दुसऱ्या बाजूला स्व.विलासराव देशमुख साहेब यांस समक्ष पाहण्याची - भेटण्याची तीव्र इच्छा... क्षणात निर्धार केला आणि टेम्पोत बसलो...धुरळा उडवीत टेम्पो भिलरवाडी येथे मकाई कारखाना ठिकाणी पोहोचला...

टेम्पोतून उतरताना पाहिलं, हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत होत...जिथं हेलिकॉप्टर उतरणार होतं, त्या जागेजवळ गेलो...तिथं प्रचंड पोलीस बंदोबस्त होता...हेलिपॅड जवळ येणाऱ्या आम्हा लोकांना पोलीस हुसकावून लावत होते आणि बेभान जनता हुरर...हुररर...करत शिट्ट्या वाजवीत होती..

हेलिकॉप्टर खाली उतरले...प्रचंड धुरळा उडाला...नाका-तोंडात माती गेली...हेलिकॉप्टरच्या पंख्याची गर- गर थांबली तशी धुरळा खाली बसला..आणि हेलिकॉप्टरमधून गॉगल घातलेलं - अंगावर जॅकेट चढविलेलं ऐटदार व्यक्तीमत्व बाहेर पडल...ते रुबाबदार म्हणजे अर्थातच स्व.विलासराव देशमुख साहेब यांचंच होत...हेलिपॅडच्या बाजूला जी बांबूचे वर्तुळाकार सुरक्षा कवच केले होते त्या ठिकाणहुन जनता स्व.विलासरावाना हात दाखवत होते...हाका मारत होते..साहेब देखील हसतमुखाने सर्वांना हात उंचावून प्रतिसाद देत होते...स्व.दिगंबर बागल यांनी स्व.विलासराव देशमुख यांचे हेलिपॅडवर स्वागत केले..आणि अलिशान गाड्यांचा ताफा स्टेजच्या ठिकाणी निघून गेला...

स्व.विलासराव देशमुख साहेबांना जवळून पाहता यावे यासाठी गर्दीतून वाट काढत स्टेजच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला...पण काही शक्य झाले नाही...थोड्याच वेळात स्व.विलासराव देशमुख इतर मान्यवरांच्या सहित स्टेज वर दाखल झाले...मी दूर असलो तरी स्व.विलासरावांना नजरेत भरण्याचा प्रयत्न करत होतो...साहेब भाषणाला उभे राहिले आणि पब्लिक मध्ये शिट्ट्या, टाळ्या आणि एकच गदारोळ सुरू झाला...एवढ्या लहान वयात मला राजकीय परिपक्वता नव्हती, त्यामुळे स्व.विलासराव यांनी केलेल्या शाब्दिक कोट्या आणि नेमके कुणाला कोपरखळी मारली आठवत नाही...परंतू पब्लिकने साहेबांचे भाषण डोक्यावर घेतले होते... जवळपास 15 - 20 मिनिटे फक्त हशा - टाळ्या आणि शिट्या सुरू होत्या...मध्येच पब्लिक मधून कुणीतरी ईव...ईव...ईव...आवाज काढत स्व.विलासराव देशमुख साहेबांच्या भाषणाला प्रतिसाद देत होत...

स्व.देशमुख साहेबांच भाषण संपणाच्या दिशेने सुरू असतानाच स्टेजच्या डावीकडील एक घोळका उठला आणि संरक्षण D box च्या शेजारी धावू लागला...स्व.देशमुख साहेब यांस जवळून भेटण्याची सर्वांनाच इच्छा होती...मला हा अंदाज आल्याने मी देखील या घोळक्याचे दिशेने निघालो...आपल्या चाहत्यांना नाराज करतील ते विलासराव कसे...?? भाषण संपल्यावर स्व.देशमुख साहेब  तडक व्यासपीठावरून खाली आले आणि आणि सर्वांशी हस्तांदोलन करायला सुरूवात केली..स्व. विलासराव यांच्या हातात हात दिलेल्या लोकांचा आनंद अवर्णनीय होता..पण , या भाऊगर्दीत सहभागी झालेला मी निराश झालो होतो...कारण स्व.देशमुख यांच्यापर्यंत मला पोहोचताच आलं नव्हतं...स्व. देशमुख साहेब यांच्याशी आयुष्यात एकदा तरी हस्तांदोलन करायचच, एकदा तरी मुख्यमंत्र्यांना जवळून भेटायचच हा मनोमन निर्धार त्याक्षणी केला...स्व.विलासराव देशमुख यांचं हेलिकॉप्टर पुन्हा गर गर उडत आकाशात गुडूप झालं...मी आकाशाकडेच पाहत राहिलो...हेलिकॉप्टरच्या पंखाचा आवाज कानात घुमत होता, आणि माझा निर्धार आणखी पक्का होत होता.... स्व.विलासराव देशमुख साहेब यांची माझी झालेली ही दूरवरूनची का होईना पण पहिली भेट...

एक दिवस - एक नेता या कार्यक्रमात संपूर्ण दिवसभर स्व.विलासराव देशमुख साहेब यांच्यासमवेत हेलिकॉप्टर मधून आणि चार्टर विमानातून फिरण्याची संधी मिळली. एक खूप मोठ्या मनाचा माणूस आणि संवेदनशील राजकारणी अनुभवता आला. 

*स्व.विलासराव देशमुख साहेब यांची हेलिकॉप्टरमध्ये मुलाखत घेऊन झाल्यानंतर त्यांना माझ्या पहिल्या भेटीचा हा किस्सा वजा माझा निर्धार सांगितला..आणि स्व.देशमुख साहेब यांनी मनापासून दाद दिली...आणि एकच वाक्य म्हणाले , आयुष्यात आपण जसा विचार करतो, तशा गोष्टी घडतात...त्यामुळें नेहमी सकारात्मक विचार करा..*

सोबतच, नववीत असताना एवढया लहान वयात राजकारण - समाजकारणची कशी आवड होती? असा प्रश्न स्व. विलासरावानी मला विचारला..मी माझे आजोबा स्वातंत्र्यसैनिक - नगराध्यक्ष कै मनोहरपंत चिवटे आणि वडील पत्रकार श्री नरसिंह चिवटे यांचा पत्रकारितेचा संदर्भ दिला.. *त्यावेळी स्व.देशमुख साहेबांनी मला स्वातंत्र्यसैनिकाचे नातू आहात..त्यामुळे नावाला आयुष्यभर जपा असा सल्ला दिला...*

साहेब..आपण आज असता तर वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला नक्कीच आलो असतो...आपल्या 75 व्या जयंती निमित्त हार्दिक अभिवादन....



खानापूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.


खानापूर येथे महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
खानापूर दि 24 :-  शिवकुमार कल्याणी प्रतिनिधी लिंगायत TV live
 महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात अनुभव मंटपा च्या माध्यमातून जगाला लोकशाहीची देणगी दिली आहे.स्त्री पुरुष समानता व सामाजिक समतेचा संदेशा सोबत महात्मा बसवेश्वरांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली असल्याचे प्रतिपादन खानापूर चे उपसरपंच श्री अनिल पाटील,  यांनी केले. खानापूर येथे, महात्मा बसवेश्वर जयंती समीतीने आयोजित केलेल्या बस्वव्याख्यान सोहळा व बसव व्याख्यानमालेत ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते.

  यावेळी बसव पिठावर गावातील सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, सर्व सेवा सहकारी सोसायटी सदस्य, जेष्ठ नागरिक ,तथा विविध समाजातील लोकप्रतिनिधींचे सत्कार शाल व श्रीफळ देऊन बसव समीतीच्या वतीने करण्यात आले,
 यावेळी व्यासपीठावर व्याख्याना पुर्वी संगीत सुरमणी रवीराज किडींले व त्यांच्या संच्यातर्फ अतिशय सुश्राव्य असे मंत्रमुग्ध करणारे बस्वगायन झाले व उपस्थितांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला ,
 त्यानंतर
, व्याख्यानमालेचे मुख्य वक्ते प्रा. डॉ.राजशेखर सोलापुरे यांच्या व्याख्यानाला सुरूवात झाली.
“बसव विचारांची वर्तमानातील उपयुक्तता” या विषयावर बोलताना प्रमुख वक्ते डॉ. राजशेखर सोलापुरे म्हणाले की माणसाला माणूस बनवण्यासाठी बसव विचार आवश्यक असून काम करणाऱ्या माणसाला प्रतिष्ठा देण्याचे काम
बसवेश्वरांनी केले आहे. महात्मा बसवेश्वर इतिहासाचे गायक नव्हे तर नायक होते. देशाचा प्रधानमंत्री कसा असावा याचा आदर्श आपल्या आचार व विचारातून बसवेश्वरांनी जगासमोर मांडला आहे. देशात देवालय नाहीतर ग्रंथालयाची गरज असून माणसाला सक्षम बनवण्यासाठी बसवेश्वरांच्या वचन साहित्याची आवश्यकता आहे. लिंगायत धर्मात कोणत्या प्रकारचे
सुतक नाही. महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत ओळख देऊन जाती संपले आहेत म्हणून आज जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी बसवण्णांच्या विचाराची गरज आहे. नैतिक राजकारणाचा आदर्श निर्माण करण्याचे काम बसवेश्वरांनी केले असून आजची संसद बसवेश्वराच्या विचाराने काम केल्यास भारत महासत्ता होईल असे परखड मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व  आभार संजय आगलावे यांनी केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अनंत  पाटील खानापूरकर,माजी सरपंच भगवान विभुते ,मारोती परबते,राजेश्वर अटकळे , ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी गौतम मंगनाळे, गौतम वाघमारे, पंडीत वाघमारे, खानापूर मठातील गुरू श्री शिवराज महाराज मठवाले, बसवजयंती उत्सवाचे
 मन्मथ परबते, उपाध्यक्ष राजु वळंके सचिव अरविंद धनसुरे,विनोद रायकोडे,विजय धनसुरे बसवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी ,सदस्य,तथा गावातील  बसवप्रेमी समाज बांधव उपस्थित होते..

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...