Saturday, November 27, 2021

विदर्भ एक्स्पो 2021 च्या धर्तीवर... चला अमरावती..प्रगतीच्या वाटेवर ची हाक ....


  विदर्भ एक्स्पो 2021 च्या धर्तीवर... चला अमरावती..प्रगतीच्या वाटेवर ची हाक ..
.. अमरावती दि.25..प्रतिनिधी प्रा अजय शेटे. 
लिंगायत संघर्ष समिती शाखा अमरावती.. वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन.. व वीरशैव समाज समिती अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने समाजाच्या सामाजिक व आर्थिक प्रगती क रि ता   दि. 25.. व.. दि.26 डिसेंबर 2021 रोजी  ' विदर्भ एक्स्पो 2021' या  भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..
..या कार्यक्रमात सर्वांना रोजगार  ..लघुउद्योग..व्यवसाय.. व कर्ज मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला आहे..
..या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष.. व लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे समन्वयक  मा.श्री.ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे हे भूषविणार आहेत..तसेच वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे कार्याध्यक्ष.. तसेच लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे अध्यक्ष.. व विश्वेश्वर सहकारी बँक ..पुणे चे अध्यक्ष मा.श्री. सुनील शेठ रूकारी यांचीही या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राहणार आहे..
.. या VIA  बिझी नेस एक्स्पो मध्ये समाजाच्या सामाजिक.. व..आर्थिक प्रगतीसाठी उद्योजक..व्यापारी..शेतकरी.. इंजिनिअर..नोकरदार..गृहिणी..
सुशिक्षित बेरोजगार..होतकरू तरुण..तरुणी अशा सर्वांसाठी औद्योगिक व्यापारी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे..तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने   सांस्कृतिक.. व्यावसायिक आघाडीवर असलेल्या अमरावती सह विदर्भाला औद्योगिक राजधानी बनवण्याचा मानस आहे.या मेळाव्यात महिलांसाठी लघुउद्योग मशिनरी प्रात्यक्षिक ..सुशिक्षित तरुण.. तरुणींना नोकरी व व्यवसायासाठी कर्ज मार्गदर्शन करण्यात येणार आहे.तसेच यावेळी लिंगायत समाजातील यशस्वी व्यक्तींच्या मार्गदर्शनपर मुलाखती पण होणार आहेत..
...या कार्यक्रमाचे आयोजन लिंगायत संघर्ष समिती ..अमरावती यांनी केले असून या समितीचे अध्यक्ष श्री.रवींद्र अन् वाने ..कार्याध्यक्ष शिवराज पा र ट क र..उपाध्यक्ष अरुण कापसे..श्रीकांत बा ल टे.. अजय कल्याणकर सचिव विजय ओडे..कोषाध्यक्ष प्रा.डॉ.रविकांत कोल्हे..मुख्य समन्वयक प्रवीण काशीकर..समन्वयक छ ग न डोईजड..महोत्सव संयोजक सुधीर हजारे ..सहसचिव उदय गाडवे..कार्यकारिणी सदस्य जितेंद्र कल्याणकर..सुधीर कापसे..गजानन आजने ..कार्यकारिणी सदस्य संजय मुंजा ळे..युवा आघाडी अध्यक्ष पराग गन थ डे..सचिव पराग गाड वे..सदस्य राहुल लट्टी.. अध्यक्षा महिला आघाडी सौ.उज्वला कल्याणकर ..उपाध्यक्षा ज्योती अन् वाने ..लता कोल्हे..सचिव अलका कापसे..सहसचिव स्वाती काशीकर..समन्वयक सीमा ओडे..कार्यकारिणी सदस्य शीतल ग न थ डे ..रुपाली गायकी.. वीणा आजने.. यांनी सर्वांनी कार्यक्रमाला हजर राहण्याचे आवाहन केले आहे..
..या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क कार्यालय उघडले असून ते डॉ. निचत यांच्या  दवा खा न्या समोर..पृथ्वी ट्रॅव्हल्स कार्यालय .. दे व र ण क र नगर ..अमरावती.येथे आहे.अधिक संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्र.7972412288..9822570927..9422156608..9970262726..8956399997..8600106514..9834055996..9423123160..9623923306...या वर संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.. या कार्यक्रमाचे स्थळ श्री.हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ..अमरावती हे असून या ठिकाणी सर्वांनी हजर रहावे.असे आयोजकांतर्फे जाहीर करण्यात आले आहे..**
..

Friday, November 26, 2021

वडूज नगरपंचायती चे बेकायदेशीर स्थलांतर गावाच्या हितासाठी रोखले जावे प्रा.अजय शेटे..

वडूज नगरपंचायती चे बेकायदेशीर स्थलांतर गावाच्या हितासाठी रोखले जावे प्रा.अजय शेटे..
..गेले बरेच दिवस मु.पो. वडू ज.. ता.खटाव.. जि.सातारा येथील प्रभाग क्र.6 मधील मूळ नगरपंचायत कार्यालय जुन्या तहसील कार्यालयात स्थलांतर करण्याचा प्रयत्न हा बेकायदेशीर असून तो रोखला जावा.अशी मागणी प्रा.अजय शेटे व ग्रामस्थ वडूज यांनी मा.जिल्हाधिकारी.. मा.तहसीलदार.. मा.मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधित विभागाकडे केली आहे.. ..या नगरपंचायतीची सध्याची इमारत हि नवीन असून नुकतीच काही वर्षापूर्वी बांधली आहे.तिच्यावर अजून एक ते दोन मजले बांधकाम होऊ शकते..तेव्हा विनाकारण जागेचा अडचणीचा मुद्दा समोर करून सदर कार्यालय हे जुन्या तहसील कार्यालय इमारती मध्ये भाडे तत्वावर नेण्याचा बेकायदेशीर प्रयत्न केला जात आहे..यासाठी दिले जाणारे अवास्तव भाडे हे नागरिकांना भुर्दंड बसविणारे आहे.. .. सदर तहसील कार्यालयाची हि इमारत जुन्या स्वरूपाची असून ती मुदतबाह्य होत चालली आहे..तिचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने होणे गरजेचे आहे. ..तसेच नगरपंचायतीच्या मालकीची अजून एक मोठी जागा बाजार चौक जवळ आहे.तेथे जुने व्यापारी संकुल आहे.तेथे नवीन व्यापारी संकुल उभे करून मूळ मालकांना दुकानाचे गाळे देवून तेथे वाढीव कार्यालय व पार्किंग जागा.. वाढीव दुकान गाळे तयार केले जावू शकतात. ..तसाच प्रकार हा वडूज मुलकी कार्यालय चावडी बाबत पण होत आहे.. ..तरी सदर दोन्ही कार्यालये मूळ जागेतच नवीन वाढीव बांधकाम करून चालवली जावीत.अशी मागणी जोर धरत आहे..*

Saturday, November 20, 2021

** खरा महानायक **विशेष लेख ..प्रा.अजय शेटे..वडूज.


** खरा महानायक **
विशेष लेख ..प्रा.अजय शेटे..वडूज..
9823540239.
..खरा महानायक कोण ? हा जर प्रश्न आपल्या बॉलिवूड प्रेमींना विचारला तर दिलीपकुमार..राजेश खन्ना..देव आनंद..जितेंद्र..पासून ते सर्वश्रेष्ठ महानायक अमिताभ बच्चन  पर्यंत अनेकांची नावे तोंडा त येतील..तसेच बॉलिवूड च्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीवर मसाला चोळून भाष्य करणारी आपली महाराष्ट्रातील प्रसार माध्यमे व पत्रकार मंडळी नुकत्याच ताज्या घडलेल्या व अभिनेता सलमान पुत्र असलेल्या चरसी आर्यन खान व बॉलिवूड मधील ड्रग  मन..हेरॉईन ..ते आर. डी.एक्स विश्व.. अंडर वर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ते अभिनेता संजय दत्त पर्यंत मादक चर्चा व वादविवाद करण्यात  जवळ जवळ आठवडाभर गुंतले होते..
..पण त्याच वेळी मात्र कर्नाटक व सीं मे  ची  प्रसार माध्यमे व पत्रकार मात्र एक वेगळाच विषय घेवून समाजासमोर प्रदर्शित होत होते. त्याचे कारण हि तसेच आदर्शवादी होते..
..ते म्हणजे कन्नड लिंगायत सुपरस्टार अभिनेते डॉ.राजकुमार यांचा सुपुत्र असलेल्या आणि अतिशय कमी अशा ४६ व्या वयात कॉलीवूड चा सुपरस्टार बनलेल्या पुनीत राजकुमार या लिंगायत अभिनेत्याचे नाव सलग एक आठवडाभर कर्नाटक दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर २४ तास गाजत होते..त्याचे कारण म्हणजे या गुणी अभिनेत्याचा हृदय विकाराच्या झटक्याने झालेला अचानक मृत्यू..आणि हाच मृत्यू कर्नाटक व सीमा वादी जनतेला हळहळ करायला लावणारा ठरला..तसेच त्याच्या  लोकप्रियतेमुळे केवळ सुरक्षेसाठी कर्नाटक सरकारला कलम १४४ घोषित करावे लागले..
..काय असावी या मागची जादू हे जर आपण नीट पाहिले तर लक्षात येईल की.या तरुण गुणी  अभिनेत्याने एकापाठोपाठ एक असे २१ सुपरहिट आदर्श चित्रपट कर्नाटक फिल्म इंडस्ट्रीला दिले..आणि तिचा दर्जा संपूर्ण  भारतात उंचावला..हाच अभिनेता २६ अनाथाश्रम..४६ मोफत शाळा..१६ वृद्धाश्रम..१९ गोशाळा..चालवत होताच शिवाय १८००  अनाथ विद्यार्थी..विद्यार्थिनी यांचे पालक बनून त्याने त्यांना पूर्णपणे दत्तक घेतलेले होते..आणि हा सर्व खर्च तो स्वताच्या उत्पन्नातून करायचा..
..त्याच्या मृत्यूनंतरही अनेक साधकबाधक चर्चा झाल्या..त्यामध्ये जिम ला प्रवेश देताना पहिली आरोग्य तपासणी केली जाऊन अहवाल तपासला जावा..पूरक खाद्य पदार्थ त्याची उपयोगिता..प्रमाणित गरज आणि अतिरेकी सेवन याचे सपरिणाम व दुष्परिणाम..तसेच अती व्यायामा मुळे होणारी दमछाक व त्यातून होणारा बलव्यय..योग्य अयोग्य व्यायाम पद्धती..परंतु मरण हे कधी मरणाराचे नसते.तर त्याच्या मागे उरणारांचे असते..या न्यायाने विचार केला तर पुनीत ने जिवंत असताना केलेल्या सामाजिक कार्याचे मरण आज त्याच्या बरोबरच होणार होते..परंतु पेरलेली माणसे पण कधी कधी उगवतात या उक्तीनुसार पुनीत चाच जिवलग  मित्र असलेला कॉली वूड चा दुसरा सुपरस्टार  अभिनेता विशाल हा पुढे सरसावला आणि यापुढे हे महान कार्य मी पुढे चालू ठेविन असा संकल्प तात्काळ त्याने आपल्या प्रिय मित्राच्या पर्थिवासमोर जाहीर केला.आणि आपल्या मित्राला खरोखरच ची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले..त्याच्या या निर्णयामुळे कर्नाटकच्या सामाजिक क्षेत्राला एक नवीन पालक मिळाला आणि बरीच शी काळजी कमी झाली..
..आपल्याकडे थोड्याफार रकमेची देणगी अथवा शुल्लक मदत केली तरी त्याचे खूप मोठे प्रदर्शन केले जाते..त्यामुळे एका हाताचे दुसऱ्या हाताला कळून न देता दान करणारांची त्यांच्यापुढे खूप मोठी गोची होते..पूनित राजकुमार ने जिवंत असताना कधीही त्याच्या कामाची जाहिरात केली नाही..ती फक्त अखंड कर्म करत राहिला..१०० पेरले तर ८० तरी उगवेल असे त्याचे कार्य कमी वेळात जास्त वाढले..त्याने मा पंतप्रधान निधी साठीही ५० लाख रुपयांची देणगी दिली..आत्ता खास मुलींच्या शिक्षणासाठी त्याचे नवीन शैक्षणिक प्रकल्प उभा करण्याचे कार्य चालू होते.मदती साठी सादर केलेल्या कोणत्याही खेळासाठी..सामाजिक व करमणूक कार्यक्रमासाठी त्याने कधीही बिदागी घेतली नाही.. असे सर्व शो तो विनामा न धन सादर करायचा..कन्नड भाषेतील कौन बनेगा करोडपती या माली केचा तो स्टार्ट तो एंड अँकर होता.परंतु एकदा आयोजकांनी हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह प्रश्न टाकल्यावर त्याने स्वतः हून आहे त्याच ठिकाणी तो शो सोडून दिला. व आपले मनापासून चे हिंदू धर्म प्रेम दाखवून दिले..
..आपल्या मृत्यूनंतर आपले डोळे दान केले जावेत. हा त्याचा मानस त्याची आई..पत्नी.. व मुला..मुलीने पूर्ण केला.आणि त्याला कर्नाटक सरकारच्या मालकीच्या फिल्म स्टुडिओ मध्ये शासकीय इत मा ता त देहाग्नी देण्यात आला..
..जो आव डे सर्वांना.. तोची आवडे देवाला.. मरावे परी कीर्ती रुपी उरावे..या न्यायाने सर्वांनी खारीच्या वाट्याने का होईना समाज व्यथा रथाची दोरी पुढे ओढावी व  आपण जिवंत प्रेते नाही आहोत.हे भावी बॉलीवूड ला दाखवून द्यावे.. हिच खऱ्या अर्थाने सुपरस्टार पुनीत राजकुमार च्या कार्याला आणि त्याच्यात लपलेल्या एका खऱ्या महानायकाला पण भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल..तसेच त्याच्या डोळे दिपावणाऱ्या समाज कार्याला पण विनम्र अभिवादन..
..शेवटी एव्हढेच म्हणता येईल..
..जिंदगी के परदे पर ..इतना खूब निभा वाे किरदार..
.. कि , परदा गिरनेपर भी तालिया बजती रहे ...** माहिती संकलन आणि लेखन प्रा अजय शेटे , रविंद्र वाकडे

Friday, November 19, 2021

इंडियन आयडल मराठी २२ नोव्हेंबरपासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वा. सोनी मराठीवर


इंडियन आयडल मराठी  २२ नोव्हेंबरपासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वा. सोनी मराठीवर
              
सातारा दि 20 विशेष प्रतिनिधी adv शितल बेद्रे 
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचा उत्स्फूर्त प्रतिसाद
: सोनी मराठी वाहिनीवर येत्या २२ नोव्हेंबर रोजी सुरू होणार्या  इंडियन आयडल मराठी  या कार्यक्रमाची सध्या फार चर्चा आहे. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा  अशी टॅगलाइन हे ब्रीदवाक्य असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था  करते आहे. प्रादेशिक भाषेत इंडियन आयडल पहिल्यांदाच सुरू होणार असून त्याला साजेसे असे परीक्षकही लाभले आहेत. 

संगीतविश्वातली एक नावाजलेली आणि लोकप्रिय जोडी अर्थातच महाराष्ट्राचे लाडके अजय-अतुल परीक्षकाच्या खुर्चीत दिसणार आहेत. मराठी आयडल आणि त्यातही अजय-अतुल हे परीक्षण करणार असल्याने रसिकांची उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. आयडलच्या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राला अभिमान वाटेल असेच एकापेक्षा सो एक कलाकार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून ऑडिशनला आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम गायक/गायिका महाराष्ट्राला मिळतील, यात शंका नाही. 

अजय-अतुल यांनी  मनोरंजनसृष्टीत खूप कष्टाने स्वतःचं वेगळं नाव कमवलं. त्यांच्या सांगीतिक प्रवासाचे रसिक साक्षीदार आहेत. शून्यातून आवाजाच्या आणि स्वरांच्या साथीने स्वतःच्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या मुलांचं स्वप्न सोनी मराठी वाहिनीच्या माध्यमातून रसिकांना बघता येणार आहे. देशाचा अभिमान असलेले अजय-अतुल आता महाराष्ट्रासाठी आवाज शोधणार, ही उत्सुकतेची बाब आहे आणि या कार्यक्रमाची निर्मिती फ्रिमेन्टल संस्था करत आहे.  उत्कृष्ट स्पर्धक, अनुभवी परीक्षक यांना घेऊन सुरू होणारा हा सुरांचा प्रवास २२ नोव्हेंबरपासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर रसिकांना बघायला मिळणार आहे.

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या आणखी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.एकूण बळी 13


 जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत जखमी झालेल्या आणखी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
अहमदनगर दि 20 :- विशेष  प्रतिनिधी adv शितल बेद्रे
 जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत (Ahmednagar District Civil Hospital fire)जखमी झालेल्या आणखी एका रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

गोदाबाई पोपट ससाणे वय 70 वर्षे रा वांगदरी ता श्रीगोंदा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या १३ झाली आहे.

Wednesday, November 17, 2021

श्री.गुरुपती रुद्रपशुपती लिंगायत मठ मिरज यांच्या वतीने २०नोंव्हेबर रोजी बसव पुरस्कार, सत्कार व वधु-वर मेळावा


श्री.गुरुपती रुद्रपशुपती लिंगायत मठ मिरज यांच्या वतीने २०नोंव्हेबर रोजी बसव पुरस्कार, सत्कार व वधु-वर मेळावा
मिरज दि 17 :-   प्रतिनिधी रमेश मिठारी
  लिंगायत समाजातील सर्व पोट जाती साठी वधू-वर परिचय मेळावा शनिवार दिनांक २०नोंव्हेंबर रोजी सकाळी १०:०० ते दुपारी २:०० पर्यंत लिंगायत मठ, सोमवार पेठ मिरज या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जगद्गुरु श्री.गुरुमुर्ती रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी , प्रमुख उपस्थिती श्री.गुरुमुर्ती गुरुनिर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी,श्री.गुरुमुर्ती रुद्रपशुपती उर्फ विजयकुमार महास्वामीजी-मिरज,श्री.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी,मासुलकर महाराज-मासोरी मठ कराड,श्री.महादेव महाराज महास्वामीजी-कवठेमहांकाळ, पाहूणे -सुदर्शन बिरादार-लातूर, बसवराज कनजे-पुणे, मच्छिंद्र भोसले-सोलापूर , सुहास मजती-मिरज या मान्यवरांच्या उपस्थितीत  सुरेश शेटे, महादेव तेली, रमेशकुमार मिठारे, डॉ.सरिता पट्टणशेट्टी, यांना बसव पुरस्कार ने सन्मानित करण्यात येणार आहे.तर डॉ.रविंद्र आरळी ,शिवाणी सगरे, डॉ.कपिलेश्वर गुळभिले व वेदिका हारगे यांचा विशेष सत्कार गौरव सोहळा ठेवण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमास समाज बांधवांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजक प्रदिप वाले यांनी केले आहे.

बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे यांचे कामगिरीचा धडाका चालुच

बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे यांचे कामगिरीचा धडाका चालुच 

बलात्काराच्या गुन्ह्यात दोन वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीस सिनेस्टाईल पाठलाग करून अटक
फलटण,दि.१७ :- प्रतिनिधी 
 बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे यांनी बलात्काराच्या गुन्ह्यात दोन वर्षापासुन फरारी असलेल्या आरोपीस  पाठलाग करून अटक आज अटक केली. 
ग्रामीण पोलीस स्टेशन गु.र.नं.१२/२०२० आय.पी.सी.कलम.३६३,३६६,
३७६(२)(एन),२१२,३४ बालकांचा लैंगीक अत्याचारापासुन संरक्षण अधिनीयकम २०१२ चे कलम
४,६,१७ प्रमाणे दाखल असुन सदर गुन्हयातील आरोपी नामे संदिप धनाजी भोसले रा.निंबळक
ता.फलटण जि.सातारा हा गुन्हा घडले पासून सुमारे दोन वर्षापासुन फरार होता.
मा.श्री.अजयकुमार बंसल पोलीस अधिक्षक सो.सातारा व श्री.अजित बो-हाडे अपर पोलीस
अधिक्षक सो.सातारा यांनी जिल्ह्यातील पाहिजे फरारी आरोपी यांना पकडणे बाबत शोध मोहिम राबविलेने श्री.तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी सोा.फलटण, श्री.धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस यांनी पाहिजे फरारी आरोपी पकडणे बाबत अक्षय सोनवणे
सहा.पोलीस निरीक्षक यांना आदेश दिला होता.
अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक तसेच गणेश अवघडे पोलीस अंमलदार व चालक यादव पो.हया.ब.नं.९७८ असे रात्रगस्त करीत असताना अशाय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक यांना गोपनिय बातमीदार मार्फत सदर फरारी आरोपी हा त्याचे राहते घरी येणार असलेची माहिती मिळालेने सदर
आरोपी यास पकडणे करीता मौजे बाजेगाव ता.फलटण गावचे हद्दीत सापळा रचुन सदर फरारी आरोपी यास पकडणेचा प्रयत्न केला असता सदर आरोपी हा पोलीस गाडी पाहून तेथुन परतुन जावू लागताच अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक तसेच गणेश अवघडे पोलीस अमलदार यांनी सदर फरारी
आरोपीचा २ किलो मिटर सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास मोठया शिताफीने पकडले. सदर गुन्हयाचा पुढील तपास अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक हे करीत आहेत. सदरची कामगिरी ही श्री.तानाजी बरडे उपविभागीय पोलीस अधिकारी सो.फलटण,
श्री.धन्यकुमार गोडसे पोलीस निरीक्षक फलटण ग्रामीण पोलीस यांचे मार्गदर्शनाखाली बरड पोलीस दुरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी श्री.अक्षय सोनवणे सहा.पोलीस निरीक्षक, चालक यादव पो.हवा.घ.नं.९७८
व गणेश अवघडे पो.कॉ.ब.नं.२५०१ यांनी केलेली आहे.

मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ सत्र न्यायालयात बदली


मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ सत्र न्यायालयात बदली करण्यात आली
अहमदनगर दि :- adv शितल बेद्रे प्रतिनिधी
मुंबई सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. एस. सातभाई यांची यवतमाळ सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांच्याकडून या आदेशावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. मात्र अचानक ही बदली झाल्यामुळे कोर्टाच्या वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. न्या. एच. एस. सातभाई हे 'प्रीव्हेंशन ऑफ मनी लाँड्रींग ॲक्ट' या विशेष कोर्टाचं कामकाज पाहत होते. सध्या त्यांच्याकडे अनेक महत्त्वाची न्यायप्रविष्ट प्रकरणं असल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र सदन घोटाळा, हेक्सवर्ल्ड यांसह अन्य काही हायप्रोफाईल प्रकरणांचा यात समावेश होता. मुळचे नाशिकचे असलेले न्यायाधीश एच. एस. सातभाई यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यासह या प्रकरणातील अनेक आरोपींना पुराव्यांअभावी निर्दोष मुक्त केलं होतं. ज्यात समीर भुजबळ, पंकज भुजबळ, चमणकर कुटुंबिय आणि अन्य आरोपींचा समावेश होता.



इतकंच नव्हे तर सोमवारीही एच.एस. सातभाई यांच्या कोर्टात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रिमांड, शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांचा अटकपूर्व जामीन तर एकनाथ खडसे यांचं भोसरी प्रकरणही सुनावणीसाठी होतं.

Monday, November 15, 2021

गंगापूरच्या पोलिस नाईकाने दहा हजार रुपयांची मागणीमुळे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात


गंगापूरच्या पोलिस नाईकाने दहा हजार रुपयांची मागणीमुळे ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात
गंगापूर औरंगाबाद दि  :  adv शितल बेद्रे प्रतिनिधी 
गंगापूर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक यांनी दहा हजार रुपयांची मागणी (Police demanded Rs 10,000 from Nathe' केल्यामुळे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात (In the net of the bribery department)अडकले. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस नाईक हरिचंद्र अशोक नरके, (Police Naik Harichandra Ashok Narke) ( वय 40) यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000/- रु लाचेची मागणी केल्याचे उघडकीस झाल्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद (Bribery Prevention Department, Aurangabad) च्या वतीने कारवाई करण्यात आली असून गंगापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिचंद्र अशोक नरके( Harichandra Ashok Narke) यांनी तक्रारदार यांना दाखल गुन्हयात मदत करण्यासाठी व पो.स्टे ला जमा केलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी  10,000/- रुपये लाचेची मागणी करीत असल्याची तक्रारदार यांनी तक्रार दिली. या तक्रारींचे अनुषंगाने लाचेच्या मागणीची शहानिशा केली असता, हरिचंद्र अशोक नरके( Harichandra Ashok Narke) , यांनी 10,000/- रुपये लाचेची मागणी केल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाणे गंगापूर येथे रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक .डॉ. राहुल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक मारुती पांडत (Superintendent of Police. Rahul Khade, Upper Superintendent of Police Vishal Khambe, Deputy Superintendent of Police Maruti Pandat) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शुभांगी सूर्यवंशी (Police Inspector Shubhangi Suryavanshi) यांनी केली आहे.
या कारवाईत त्यांना  पो.ना. राजेंद्र सिनकर, पो अं. विलास चव्हाण, केवलसिंग घुसिंगे, चालक पा.अ. चांगदेव बागुल (Po.Na. Rajendra Sinkar, Po no. Vilas Chavan, Kevalsingh Ghusinge, Driver P.A. Changdev Bagul) यांनी मदत केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका आजपासुन

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका आजपासुन
कोल्हापूर दि 14 :- प्रणाली वाकडे
  मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका आजपासुन सोनी मराठीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिका आजपासुन सुरु 
श्री छत्रपती शाहू महाराज यांनी स्वराज्य सौदामिनी ताराराणी मालिकेच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठीवर  'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेतून उलगडणार आहे. या मालिकेनिमित्त रविवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४:३० वाजता, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथे महाराणी ताराराणी यांना मानवंदना दिली गेली. या सोहळ्याला कोल्हापूरचे  श्री छत्रपती शाहू महाराज, इतिहासकार जयसिंगराव पवार आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे,   सोनी मराठी चे बिझनेस हेड श्री. अजय भाळवणकर  यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर, आनंद काळे हे उपस्थित होते. 

मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले आहे, अशा ताराराणींची गाथा सोनी मराठी वाहिनीवर स्वराज्य सौदामिनी ताराराणी  या मालिकेतून  १५  नोव्हेंबरपासून , सोम.-शनि. संध्या.  ७:३०  प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. 

करारी नजर, स्पष्ट शब्दोच्चार, पहाडी आवाज आणि शिवकुळातले जाज्वल्य तेज यांमुळे स्वरदाला प्रेक्षकांची विशेष प्रशंसा लाभते आहे. स्वरदाच्या आजवरच्या अभिनय प्रवासातले हे एक वेगळे आव्हानात्मक रूप आहे. डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित ही मालिका ताराराणींचा दुर्दम्य आत्मविश्वास, स्वराज्याप्रती अढळ निष्ठा, स्वराज्यासाठी केलेला त्याग आजच्या पिढीसमोर मांडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्य अबाधित राखून ते वर्धिष्णू करणार्या जाज्वल्य इतिहासाचे अपरिचित पर्व ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेतून उलगडणार आहे.

जीवात जीव आणि श्वासात श्वास असेपर्यंत हे स्वराज्य अबाधित राहील आणि त्या औरंग्याची कबर दख्खनच्या मातीत खोदली जाईल!’ हे स्वराज्याबद्दलची जाज्वल्य निष्ठा आणि करारीपणा व्यक्त करणारे ताराराणींचे शब्द आणि युद्धभूमीवर मोगलांना सळो की पळो करून सोडणारे त्यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व साकारणे; हे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे. 'मराठ्यांच्या मुली ज्या हाताने फुगडी खेळतात, त्याच हाताने गर्दनही मारू शकतात!' ह्या उद्गारातून महाराणी ताराराणींची लढवय्या व्यक्तिमत्त्वाची झलक दिसली आहे. १५ नोव्हेंबरपासून ताराराणी आणि औरंगजेब यांना छोट्या पडद्यावर समोरासमोर पाहणे,  म्हणजे इतिहासातला तो काळ साक्षात अनुभवणे!
पहायला विसरू  नका स्वराज्य सौदामिनी ताराराणी , सोम.-शनि.संध्या. ७:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर. 

प्रमुख उपस्थिती
डॉ. अमोल कोल्हे - (मालिकेचे निर्माते)
श्री. अजय भाळवणकर - (बिझनेस हेड, सोनी मराठी)
●उपस्थित कलाकार आणि त्यांच्या व्यक्तिरेखा
स्वरदा थिगळे - स्वराज्य सौदामिनी ताराराणी  
यतीन कार्येकर- औरंगजेब
संग्राम समेळ- छत्रपती राजाराम राजे
संताजी घोरपडे - अमित देशमुख
धनाजी जाधव - रोहित देशमुख
हंबीरराव मोहिते - आनंद काळे

श्रीमंत छ.शिवाजी महाराज यांचा चालता..बोलता..इतिहास... शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.

श्रीमंत छ.शिवाजी महाराज यांचा चालता..बोलता..इतिहास...
  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.विशेष लेख
प्रा.अजय शेटे..वडूज.
.. ज्यांनी खऱ्या अर्थाने इतिहास वाचून नाहीतर आपल्या जीवन अनुभवातून जिता.. जागता केला.आपल्या अमोघ वक्तृत्व वाणी ने शिवमहिमा मनामनात व घराघरात पोहचवला.शिवचरित्र नसानसांत भिनवले.ते शिवशाहीर बाबासाहेब उर्फ बळवंत मोरोपंत पुरंदरे यांचा जन्म 29 जुलै 1922 रोजी झाला..
..शिवशाहीर बाबासाहेब यांना 100 वर्षाचे निरामय शतायुषी आयुष्य लाभले.गेली 70 वर्षे ते सत्य इतिहास संशोधनाचे कार्य करत आले.यासाठी त्यांना इतिहास संशोधक  कै.ग. ह.खरे यांचे गुरू म्हणून मार्गदर्शन लाभले.पुणे विद्यापीठाच्या ' मराठा इतिहासाची शकावली ..सन 1740 ते 1764 ' या भारत इतिहास संशोधन मंडळाने केलेल्या प्रकल्पात संशोधक म्हणून कार्य करण्याची मोठी संधी मिळाली .
..त्यांनी ऐत्याहासिक विषयात सावित्री.. जाळ त्या ठिणग्या.. मुजऱ्याचे मानकरी..राजा 
शि वछत्रपति..शेलार खिंड..महाराज.. पुरंदरेंचा सरकारवाडा.. शन वार वाड्यातील शमादान.. शिलंगणाच सो नं..पुरंदरच्या बुरुजावरुन ..कलावंती णी चा सज्जा..महाराजांची राज चिन्हे..पुरंदरे ची नौबत.. ई.साहित्य लेखन केले.राजा छत्रपतीं या ग्रंथाच्या 16 आवृत्ती प्रकाशित होऊन 5 लाखा हून अधिक प्रती खपल्या हा एक विक्रम आहे..
..बाबासाहेबांनी शिवचरित्रावर देश..विदेशात मिळून एकूण 12 हजाराच्या वर व्याख्याने दिली हा पण एक विक्रम आहे..
..त्यांनी  छ.शिवरायांच्या जीवनावरील ' जाणता राजा ' या भव्यदिव्य दृश्य नाटकाचे दिग्दर्शनही केले .या महा नाट्याचे निर्माते म्हणून त्यांनी गेल्या 27 वर्षात 1250 हून अधिक प्रयोग केले.हे नाटक मराठी..हिंदी..इंग्रजी सह इतर 5 देशी..विदेशी भाषेत अनुवादित झाले.या नाटकात एकूण 150 स्त्री..पुरुष कलावंत काम करतात.शिवाय 4 हत्ती  व 20 घोडे यांची पण महत्वाची भूमिका आहे.या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी कमीत कमी 10 एकराचे मैदान लागते. व तेथील फिरता रंगमंच उभारणीसाठी आधीचे 10 दिवस व उतरविण्यासाठी नंतरचे 5 दिवस लागतात..हा पण एक विक्रम आहे..
..त्यांच्या या ऐत्याहसिक कार्याची दखल घेवून सन 2015 मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांचा ' महाराष्ट्र भूषण '  व भारत सरकारने सन 2019 मध्ये ' पद्मविभूषण ' हा सर्वोच्च पुरस्कार देवून  त्यांचे देशप्रेमी कार्याचा गौरव केला आहे..
..वंदनीय बाबासाहेब नेहमी म्हणत ..मी छ.शिवाजी महाराजांच्या पायाचा पावन स्पर्श झालेल्या  प्रत्येक जागेवर पोहचलो आहे..एक स्वर्ग फक्त बाकी राहिलाय..
आज त्यांनी आपली ती अखेरची इच्छा पण पूर्ण करून घेतली..
.. महाराष्टातील गड किल्ले..मराठा साम्राज्य..ऐत्याहसिक दस्तऐवज व कागदपत्रे यांच्याकडे तरुणांना नव्या अभ्यासू दृष्टीने पाहण्याचा आयाम देणारा एक महान शिवशाहीर देह रूपाने आपल्या तून निघून गेला असला तरी तो त्यांच्या ऐत्याहसिक कार्य..कीर्ती रूपाने आपल्या स्मरणात कायम राहील...
..वंदनीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तमाम जनतेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कार्यास विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा .. मानाचा मुजरा..**

Friday, November 12, 2021

स्वराज्याची महाराणी ताराराणींना शोभायात्रेतून मानवंदना


स्वराज्याची महाराणी ताराराणींना शोभायात्रेतून मानवंदना  
कोल्हापूर दि १२ :  विशेष प्रतिनिधी श्रीपती कोरे
ज्या विरांगनेपुढे औरंगजेब निष्प्रभ ठरला अशी, हिंदुत्व रक्षणासाठी मराठ्यांची सर्वश्रेष्ठ सम्राज्ञी असे जिचे वर्णन केले गेले अश्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या  कन्या ,आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी, महाराष्ट्राच्या इतिहासातील एक कर्तृत्ववान राजस्त्री ताराराणीं अशा या रणरागिणीची शौर्य गाथा सर्वांपर्यंत पोहचावी या उद्देशाने सोनी मराठी घेऊन येत आहे स्वराज्य सौदामिनी ताराराणी. 

या मालिकेनिमित्त १४ नोव्हेंबर रविवारी, कोल्हापुरातील ताराराणी चौक स्टेशन रोड येथून १. ३ किलो मी पर्यंत शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे. सरसेनापती संताजी, धनाजी यांना बरोबर घेऊन मोगलांना सळो  कि पळो करून सोडणाऱ्या रणरागिणी, करवीर संस्थापिका सेनानी महाराणी ताराराणी यांना ढोल ताशांच्या गर्जनात, साहसी खेळांच्या रूपात, ढाल - तलवार भगवा फडकवत, इतिहासाचा जागर करत या शोभायात्रेच्या माध्यमातून मानवंदना दिली जाणार आहे. या सोहळ्याला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून कलाकार स्वरदा थिगळे, संग्राम समेळ, रोहित देशमुख, अमित देशमुख, यतिन कार्येकर हेही उपस्थित असतील.

Saturday, November 6, 2021

अस्तित्व फाऊंडेशन सातारा जिल्हा अध्यक्ष पदी रविंद्र वाकडे यांची नियुक्ती

अस्तित्व फाऊंडेशन सातारा जिल्हा अध्यक्ष पदी रविंद्र वाकडे यांची नियुक्ती सातारा दि 4 :- प्रतिनिधी महादेव मेंडगीरी , उंब्रज तालुका कराड येथील पत्रकार आनि सामाजिक कार्यकर्ते रविंद्र वाकडे यांची निवड, अस्तित्व फाऊंडेशन चे अध्यक् आणी शिवचरित्रकार शुभम चौहान आणि सौ वैष्णवी भोर सचिव अस्तित्व फाऊंडेशन यांनी सातारा जिल्हा अध्यक्ष या पदावर नियुक्ती करन्यात आली, सातारा जिल्ह्यातील कामाची दखल घेत रविंद्र वाकडे यांचे वर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली ,यावेळी रविंद्र वाकडे म्हणाले की अस्तित्व फाऊंडेशन यांच्या माध्यमातून जास्तीत युवकांनापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार , शिवचरित्र पोहोचविणार आहोत,त्यांच्या या निवडी बद्दल उंब्रज मधील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...