Wednesday, July 6, 2022

विटा मर्चंटस को. ऑ. बँक निवडणुकीत जय सहकार पॅनेल चे सर्व उमेदवार विजयी विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी यांची रणनिती यशस्वी


 विटा मर्चंटस को. ऑ. बँक निवडणुकीत जय सहकार पॅनेल चे सर्व उमेदवार विजयी 
 विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी यांची रणनिती यशस्वी 
प्रा.अजय शेटे.
सातारा, दि.7 - विटा मर्चंटस को. ऑ.बँक लि.विटाच्या नुकत्याच झालेल्या रविवार दि.3 जुलै रोजी च्या सन 2022 ते 2027 या पंचवार्षिक निवडणुकीत ' जय सहकार पॅनेल ' चे सर्वच्या सर्व उमेदवारांनी ' कपबशी ' या चिन्हावर विक्रमी मतांनी निवडून येवून बँकेवर आपली एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे.
विद्यमान चेअरमन मा.विनोदजी गुळवणी यांनी आखलेल्या निवडणूक रणनिती मुळे हे यश प्राप्त झाल्याचे सहकारातील सर्व जाणकारांनी सांगितले. 
या निवडणुकीत विटा शहर सर्वसाधारण गटात विद्यमान अध्यक्ष मा.विनोद गुळवणी हे स्वतः 4043 अशा विक्रमी मतांनी विजयी झाले .
याच पॅनेल मधील श्री.वैभव म्हेत्रे4071,अशोक डोंबे 4071,विजय शहा 4061,राजेंद्रकुमार शहा 4061,दत्तात्रय कलेढोणे 4065,बाळकृष्ण शितोळे 4050,विनय भंडारे 4052,निरंजन गुळवणी 4060,तुषार मेहता 4046,रघुनाथ पवार 4037,अमित सगरे 3938 या 12 उमेदवारांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला .
     याच पॅनेल चे श्री.भगवान देवकर ,अशोक चांदणे,प्रदिप देशपांडे,विलास कुलकर्णी, सौ.पूजा स्वामी,रोहिणी दिवटे,रामचंद्र भिंगारदेवे,गौरव काकडे,उत्तम चोथे असे एकूण नऊ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत .
विटा बँक हि गेली साठ वर्षे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रणी बँक असून या बँकेने रिझर्व्ह बँकेच्या उद्दिष्ठानुसार 100 कोटींचे ठेव उद्दिष्ठाकडे यशस्वी वाटचाल होत असून, सद्यस्थितीत बँक 25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज प्रकरणे मंजूर करण्यास सक्षम आहे.बँकेच्या 24 शहरात मिळून एकूण 30 शाखा असून त्यांना वेळोवेळी रिझर्व्ह बँकेचे उच्च मानांकन प्राप्त झाले आहे. कोरोना काळातही बँकेने आपली योग्य प्रगती साधली आहे.
हे नवीन संचालक मंडळ निवडून आणण्यात बँकेच्या सर्व सभासदांचे मोलाचे योगदान असून त्यांनी दाखविलेल्या विश्वासास बांधील राहून नवीन संचालक मंडळ बँकेची भावी काळात प्रगती साधेल.असे सर्व नवनिर्वाचित सदस्यांच्या वतीने जाहीर करण्यात आले.
या निवडीबद्दल खानापूर चे आमदार मा.अनिलजी बाबर,
वडूज शाखा स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य मा.सतीश शेटे, 
वडूज शिक्षण विकास मंडळ उच्च न्यायालय नियुक्त सदस्य  डॉ.हेमंत पेठे,गोविंद भंडारे,नितीन जाधव,दिलीप जमदाडे,रमेश जंगम व सर्व सभासद यांच्या वतीने खास अभिनंदन करण्यात आले.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...