Tuesday, January 31, 2023

मा.भगवान कोठावळे यांची राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी निवड .

 मा.भगवान कोठावळे यांची राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी निवड .



 मा.भगवान कोठावळे यांची राज्य पतसंस्था फेडरेशनच्या संचालकपदी निवड .



सातारा ,दि.1 -रविंद्र वाकडे.

 अर्थसिद्धी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री.भगवान कोठावळे यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन या राज्यस्तरीय संस्थेत संचालक म्हणून निवड झाली आहे.

महाराष्ट्रातील 16000 पेक्षा जास्त व हजारो कोटींच्या उलाढाल असणाऱ्या  संस्थांमधून या संस्थेला हा बहुमान मिळाला आहे.

हा सर्व अर्थसिद्धी पतसंस्थेच्या पारदर्शक कार्याचा बहुमान आहे,असे मला वाटते अशी प्रतिक्रिया मा.संचालक भगवान कोठावळे यांनी दिली आहे.

अर्थसिद्धी पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री.श्रीकांत तोडकर पतसंस्थेच्या सर्व संचालक,कर्मचारी,दैनंदिन ठेव प्रतिनिधी,सभासद व खातेदारांच्या तसेच , लिंगायत संघर्ष समिती , लिंगायत समाज संघटना,लिंगायत TV live यांच्या वतीने मा.भगवान कोठावळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे   .

Friday, January 27, 2023

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया)ने कर्नाटकात यशस्वी केली, ग्लोबल बिझनेस समिट .

  वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया)ने  कर्नाटकात यशस्वी केली, ग्लोबल बिझनेस समिट .



  वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया)ने  कर्नाटकात यशस्वी केली, ग्लोबल बिझनेस समिट .



सातारा, दि.27 - 

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (VIA) व ILYF ने  कर्नाटक राज्यात  बेंगलोर येथे आयोजित केलेल्या ऐतिहासिक अशा वीरशैव लिंगायत बिझनेस कॉनक्लेव्ह 2023 यशस्वी करून एक वेगळाच विक्रम करून दाखवला आहे.



कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडुयुरप्पाजी, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे अध्यक्ष लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे, मंत्री मुरुगेश निरानी, बी. सी. पाटीलजी, तसेच अनेक मंत्री, आमदार ,VSNA अमेरिका चे हिरेमठजी , या भव्यदिव्य कार्यक्रमाचे वर्किंग कमिटी मेंबर व  ' व्हाया ' जनरल सेक्रेटरी गुड्डिमठ साहेब, वर्किंग कमिटी मेंबर व 'व्हाया '  युथ प्रेसिडेंट प्रदीप साखरे, महाराष्ट्र  तसेच  कर्नाटक, आंध्र प्रदेश,केरळ येथून आलेले उद्योजक, व्यापारी यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन दिवस चाललेल्या या यशस्वी कार्यक्रमाला जवळपास एक लाख वीस हजार लोकांनी भेट दिली.


यावेळी अनेक  सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करण्यासाठी नोकरी मेळावा आयोजित केला गेला होता. त्यात सुमारे 8500 तरुण -  तरुणी सहभागी झाले होते. त्यातून 1700 पात्र वीरशैव लिंगायत बेरोजगारांना जागेवर नोकरीचे अपॉईंटमेंट लेटर देण्यात आले. अशा प्रकारे या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन  (व्हाया )च्या माध्यमातून महाराष्ट्राबाहेर कर्नाटकात  पण यशस्वी झाले.**

Thursday, January 26, 2023

परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित न्यू ऍक्टिव्ह ग्रुप यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्नेह मिळावा व विविध थोर व्यक्तींच्या जयंतीनिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा.


परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित न्यू ऍक्टिव्ह ग्रुप यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्नेह मिळावा व विविध थोर व्यक्तींच्या जयंतीनिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा.




परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित न्यू ऍक्टिव्ह ग्रुप यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्नेह मिळावा व विविध थोर व्यक्तींच्या जयंतीनिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा.




इचलकरंजी दि   २६ :-  शिवकुमार मुरतले 

परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित न्यू ऍक्टिव्ह ग्रुप यांच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून स्नेह मिळावा व विविध थोर व्यक्तींच्या जयंतीनिमित्त भव्य रांगोळी स्पर्धा व वेशभूषा स्पर्धा घेऊन त्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ व मान्यवर व्यक्तींच्या शुभहस्ते करण्यात आले.

प्रथम सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. स्वागत सौ.अमिता बिंरजे मॅडम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सौ राखी मुरतले मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.सारिता पांडव मॅडम यांनी केले.या नंतर सत्कारमूर्तींचा सत्कार समारंभ घेण्यात आले प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सौ.उज्वला पटेल (कोल्हापूर) यांना शाल,श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले. ,पत्रकार दिन बाळशास्त्री जांभेकर यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल श्री सुभाष भस्मे (पत्रकार) महान कार्य यांना शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले. राजमाता जिजाऊ यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सौ वृषाली साळी मॅडम यांना शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आले. तसेच रांगोळी स्पर्धेत वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण सौ सरिता ठाणेकर मॅडम यांनी केले त्यांचाही सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना आपल्या मनोगतामध्ये सौ वृषाली साळी मॅडम यांनी स्नेह मेळावा व विविध स्पर्धा घेण्याबरोबरच समाज जागृती करून प्लास्टिक मुक्ती, व कचरा विघटन किंवा कचऱ्याचा योग्य वापर कशाप्रकारे करता येतो अशा विधायक कामे करणे ही आजच्या काळाची अतिशय महत्त्वाचे गरज आहे. यासाठी विविध स्तरावर ती महिलांची जागृती करून विधवा,अनाथ,अपंग, वृद्ध अशा विविध लोकांना मदत करण्याची गरज व त्यांना आपण आपला अमुल्य वेळ देण्याही गरजेचे आहे.त्यांची विचारपूस करण्याची गरजचे आहे. तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी विविध शासकीय योजनांचा उपयोग करून त्यांना स्वतःच्या पायावरती सक्षम कसे बनवता येईल याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. याकरता सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. रांगोळी स्पर्धेचा बक्षीस वितरण

प्रथम- श्रुतिका चंद्रकांत लाटकर, द्वितीय -नंदिनी चांगदेव पाटील,तृतीय -अनिता महादेव पोद्दार, व

वेशभूषा स्पर्धेचा बक्षीस वितरण,1. प्रथम -प्रितीका बिपिन कबाडे ,2. द्वितीय- सुहाना समीर चौगुले,

3. तृतीय - शैला किशोर पोवार,या सर्व स्पर्धा व बक्षीस वितरण संपन्न झाले यानंतर अध्यक्ष मनोगत सौ कविता शिंगाडे मॅडम यांनी केले.आभार सौ रेखा बेरजे मॅडम यांनी केले

या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.दिप्ती लोकरे  व मिनाज शेख. यांनी केले. हा सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेच्या अध्यक्ष सौ कविता शिंगाडे, उपाध्यक्ष, रेखाताई बिरंजे, सेक्रेटरी सरीता पांडव, खजिनदार रजनीताई शिंदे, मिनाज शेख, सौ राखी मुरतले, अमिता बिरंजे,

संगीता हुग्गे, सुप्रिया पाटील, कविता पाटील, शाहीन मकानदार, श्री लक्ष्मण पाटील सर श्री राम आडकी,श्री शिवकुमार मुरतले सर, इत्यादींची मोलाचे सहकार्य लाभले.

Saturday, January 21, 2023

महाराष्ट्राच्या रणरागिणी मा.प्रेरणाताई होनराव यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड.

महाराष्ट्राच्या रणरागिणी मा.प्रेरणाताई होनराव यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड.


महाराष्ट्राच्या रणरागिणी मा.प्रेरणाताई होनराव यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड.

.

सातारा दि  21 :-  रवी वाकडे
 महाराष्ट्राच्या रणरागिणी मा.प्रेरणाताई होनराव यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड करण्यात आली असून या निवडी बद्दल समस्त लिंगायत समाजाकडून प्रेरणाताई  अभिनंदन केले जात आहे .
लिंगायत समाजातील युवा नेतृत्व मा.प्रेरणाताई यांना कोणताही राजकीय वारसा नसताना , ना कोणती घराणेशाही नसताना केवळ वैयक्तिक कर्तृत्वावर हे पद मिळाले आहे.पक्षाच्या सोबत एकनिष्ठ राहून त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांची निवड करण्यात आली.
मा.प्रेरणाताई यांच्या रूपाने लातूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला एक लिंगायत समाजात एक  तरुण ,तडफदार  आणि धाडशी महिला नेतृत्व प्राप्त झाले आहे.तेव्हा त्यांच्या ह्या निवडीबद्दल वीरशैव लिंगायत समाज संघटना, यांचे तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन व त्याच्या भावी प्रगतीकारक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.


वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया)व ILYF आयोजित ग्लोबल बिझनेस काॅन्क्लेव्ह2023 बेंगलोर चा उद्घाटन.

 वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया)व ILYF आयोजित ग्लोबल बिझनेस काॅन्क्लेव्ह2023 बेंगलोर चा उद्घाटन.




वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया)व ILYF आयोजित ग्लोबल बिझनेस काॅन्क्लेव्ह2023 बेंगलोर चा उद्घाटन.

                                                    

सातारा दि :- २१ प्रतिनिधी 

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन (व्हाया)व ILYF आयोजित ग्लोबल बिझनेस काॅन्क्लेव्ह2023 बेंगलोर चा उद्घाटनप्रसंगी कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ,






 माजी मुख्यमंत्री बी एस येडुयुरप्पाजी, केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, मंत्री मुरुगेश निरानी,बी एस पाटील, बसव समिती अध्यक्ष अरविंद जी जत्ती, तसेच अनेक आमदार व वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे अध्यक्ष लिंगायत लोकनेते मा काकासाहेब कोयटे, जनरल सेक्रेटरी पी आय गुड्डीमठ,युथ प्रेसिडेंट प्रदीप साखरे व कर्नाटक, आंध्र प्रदेश मधील उद्योगपती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.





Friday, January 20, 2023

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माजी मंत्री आमदार विनयरावजी कोरे सावकर यांच्या पुढाकाराने दिनांक 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न .

 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माजी मंत्री आमदार विनयरावजी कोरे सावकर यांच्या पुढाकाराने दिनांक 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न .



महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माजी मंत्री आमदार विनयरावजी कोरे सावकर यांच्या पुढाकाराने दिनांक 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न .



सातारा दि २०  :-  प्रा.अजय शेटे 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी माजी मंत्री आमदार विनयरावजी कोरे सावकर यांच्या पुढाकाराने दिनांक 29 जानेवारी लिंगायत महामोर्चा संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. 


                         

      यावेळी माजी मंत्री आमदार विजय देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी,  लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक ॲड.अविनाश भोसीकर, राज्य समन्वयक ॲड. माधवराव पाटील टाकळीकर,  केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बी. एस. पाटील, विजयकुमार हत्तुरे, सुधीर सिंहासने, प्रा. राजेश विभूते, महेश पाटील, प्रदीप बुरांडे,  वीरेंद्र मंगलगे, दया किडे, योगेश कापसे आदीसह शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

      नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी 29 जानेवारीच्या मोर्चाचे राज्य सरकार स्वागत करेल, त्याचबरोबर वरील सर्व मागण्या संदर्भात विचार करून प्रामुख्याने सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. यावेळी या मोर्चाला देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः, तसेच विनरावजी कोरे,  विजय देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांच्यासोबत निवेदन स्वीकारून समाजबांधवांना या कार्यपुर्तीचे ग्वाही देणार असल्याचे सांगितले.

Wednesday, January 18, 2023

२६ जानेवारीला लागणार ‘बांबू’

                                          २६ जानेवारीला लागणार ‘बांबू’ 


                         २६ जानेवारीला लागणार ‘बांबू’ 

                         

सातारा दि :- 17 प्रतिनिधी 

प्रेमाचा इतिहास हेच सांगतो की, खांद्यासाठी बांबू लागतो आणि बांबू लागला की, कोणाचा तरी खांदा हा लागतोच. खरंतर प्रेमात पडलेल्या सॅारी…. प्रेमात लागलेल्या अनेक बांबूचा अनुभव आयुष्यात प्रत्येकानेच घेतला असेल. हे बांबूच लागू नयेत आणि तुमचे गेलेले प्रेम यु टर्न मारून परत येण्यासाठी प्रेमाचे सायन्स पाळणे खूप गरजेचे आहे. प्रेमात बांबू कसे लागतात, याची गोष्ट सांगणारा  ‘बांबू’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्रिएटिव्ह वाईब प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित, विशाल देवरूखकर दिग्दर्शित, अंबर विनोद हडप लिखित या चित्रपटात अभिनय बेर्डे, शिवाजी साटम, अतुल काळे, पार्थ भालेराव, वैष्णवी कल्याणकर, समीर चौघुले, स्नेहल शिदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 




   चित्रपटातील ‘मी तुला त्या नजरेनं’ हे धमाल गाणेही नुकतेच प्रदर्शित झाले असून तरूणाईला भुरळ घालणारे हे गाणे रोहित राऊत आणि ज्ञानदा पवारने गायले आहे. या गाण्याचे बोल सचिन पाठक यांचे असून समीर सप्तीसकर यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक विशाल देवरूखकर म्हणतात, ‘’ मुळात तरूणाईला हा चित्रपट त्यांच्या आयुष्याच्या जवळपासचा वाटणारा आहे. युथला समोर ठेवून जरी या चित्रपटाची निर्मिती केली असली तरी तरूणांनी हा चित्रपट त्यांच्या पालकांसोबत पाहावा, असा आहे. २६ जानेवारीला ‘बांबू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा एक धमाल एंटरटेनर आहे.’’

निर्माती तेदस्विनी पंडित म्हणते, ‘’या टीमसोबत काम करताना खूप धमाल आली. चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार आहेत. प्रत्येकानेच आपली भूमिका चोख बजावली आहे. चित्रपटाची मांडणी अतिशय उत्तम आहे. मला खात्री आहे, प्रेक्षकांना ‘बांबू’ नक्कीच आवडेल.’’ 

निर्माते संतोष खेर म्हणतात, ‘’ मुळात याची कथा आम्हाला विशेष भावली. प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी बांबू लागतातच. मग ते प्रेमात असो वा इतर कशाही बाबतीत. अशीच प्रेमात ‘बांबू’ लागल्याची गोष्ट आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार असून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा हा ‘बांबू’ आहे.


Monday, January 16, 2023

लिंगायत समाजातील जेष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांना राष्ट्रपिता महात्मा फुले पुरस्कार प्रदान .

 लिंगायत समाजातील  जेष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांना राष्ट्रपिता महात्मा फुले पुरस्कार प्रदान .





लिंगायत समाजातील  जेष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांना राष्ट्रपिता महात्मा फुले पुरस्कार प्रदान .





कराड , दि.17 -रविंद्र वाकडे .

 ओगलेवाडी , ता.कराड येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांना परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा फुले पुरस्काराने  गौरविण्यात आले . मा.यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) कराड  येथे  विविध मान्यवरांच्या हस्ते त्यांना  सहकुटुंब सहपरिवार गौरविण्यात आले .

यावेळी कराड चे तहसीलदार मा.विजय पवार ,नायब तहसीलदार मा.विजय माने,प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा. आप्पासाहेब गायकवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कराड येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी पत्रकारिता प्रसार माध्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल या राज्यस्तरीय  आदर्श पत्रकार पुरस्काराने श्री. दिलीप महाजन यांना गौरविण्यात आले.


                                   

दिलीप महाजन हे गेले 25 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विविध दैनिकांत काम केले आहे. सध्या ते दैनिक ऐक्यचे ओगलेवाडी वार्ताहार म्हणून काम पाहत आहेत. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना परिवर्तन प्रतिष्ठाच्या  वतीने देण्यात येणाऱ्या या  पुरस्काराने गौरविण्यात आले .यावेळी मा. विजय पवार , प्राचार्य कादर नायकवडी ,  प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाज भूषण मा. आप्पासाहेब गायकवाड यांनी आपली मनोगते यावेळी व्यक्त केली.तसेच यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 15 जानेवारी रोजी करण्यात आले.


                  

  संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार  श्री. बबनराव तडवी ,डॉ.मनोज पाटील, अरुण भिसे ,मा.नायब तहसीलदार बी.एम .गायकवाड ,बहुजन शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रवीण लादे,सचिव बुद्धभुषण गायकवाड, सल्लागार  श्री .राजेंद्र माने, प्राचार्या सौ. विद्या मोरे ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Saturday, January 14, 2023

‘समग्र महात्मा बसवेश्‍वर’ ग्रंथाचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रकाशन सोहळा संपन्न .

 

‘समग्र महात्मा बसवेश्‍वर’ ग्रंथाचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रकाशन सोहळा संपन्न .




‘समग्र महात्मा बसवेश्‍वर’ ग्रंथाचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रकाशन सोहळा संपन्न .



लातूर दि  14   :-  प्रतिनिधी 

   ‘समग्र महात्मा बसवेश्‍वर’ ग्रंथाचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रकाशन सोहळा संपन्न .   बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्‍वरांच्या जीवन कार्य व वचनांवर आधारित माहितीचा संग्रह असलेला महाग्रंथ आज अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या समग्र महात्मा बसवेश्‍वर ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भगवंतराव पाटील चांभरगेकर महाराज हे होते.

हा प्रकाशन सोहळा लातूर शहरातील असंख्य साहित्यीकांसाठी खुप मोठी बौध्दीक मेजवानीच ठरला. सकाळी 11 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम दुपारी 4.00 वा.संपला. 4 ते 5 तास चाललेल्या या कार्यक्रमात प्रेक्षक मंत्रमुग्ध होवून महात्मा बसवेश्‍वरांचे विचार ऐकत होते. प्रा.सुदर्शनराव बिरादार लिखीत या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी भगवंतराव पाटील चांभरगेकर, प्रा.डॉ.मधुकर सलगरे, अ‍ॅड.अण्णाराव पाटील, प्रा.बी.व्ही.मोतीपवळे, प्रा.रामदास मिरजगावे, डॉ.मन्मथ भातांब्रे, अ‍ॅड.मधुकर राजमाने, प्रा.एम.बी.पठाण, संभाजीराव सुळ, प्राचार्य चंद्रशेखर भोगडे, निवृत्त पोलीस उपायुक्त नागनाथ कोडे, शिवाजीराव साखरे वाघ आदिंची उपस्थिती होती. त्यांची यावेळी समायोचित भाषणे झाली.




महात्मा बसवेश्‍वरांच्या जीवनावर संपूर्ण माहिती असलेला हा ग्रंथ खुप मोलाचा असल्याचे सर्व मान्यवरांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी ग्रंथाचे लेखक प्रा.सुदर्शनराव बिरादार यांचे सर्वमान्यवरांनी खुप कौतुक केले. यावेळी विविध संघटनांच्यावतीने लेखकांचा सत्कार करण्यात आला. मी केवळ महात्मा बसवेश्‍वरांचे विचार, प्रचार व प्रसार करण्यासाठी व त्यांच्या प्रेमापोटी या ग्रंथाची निर्मिती केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास शहरातील असंख्य महिलांची उपस्थिती होती. या ग्रंथाचे मोफत वाटप याप्रसंगी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी शहरातील साहित्यीक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील, जिल्हा संघटक काशिनाथ मोरखंडे, लिंगेश्‍वर बिरादार, वैजनाथ जट्टे, जी.जी.ब्रम्हवाले, विश्‍वनाथ मिटकरी, सिद्रामप्पा पोपडे, शिवराज शेटकार, शिवदास लोहारे, विजयकुमार कुडूंबले, चंद्रकांत शिरसे, चंद्रकांत तोळमारे, सुभाष शेरे, माणिकअप्पा मरळे आदिंनी प्रयत्न केले. यावेळी लिंगायत समाजातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांचा व लिंगायत समाजाचे निवडून आलेल्या नुतन सरपंचाचा सत्कार यावेळी करण्यात आला.

शिवकांत स्वामी यांनी कार्यक्रमाचे जोरदार सुत्रसंचलन केले तर सौ.शंकरेताई, कमलाकर डोके यांनी मान्यवरांच्या शुभेच्छांचे वाचन केले तर प्रास्ताविक ग्रंथाचे लेखक प्रा.सुदर्शनराव बिरादार यांनी केले. तर आभार कमलाकर डोके यांनी मानले.


Friday, January 13, 2023

लिंगायत समाजातील जेष्ठ दिलीप महाजन यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर , उद्या पुरस्कार वितरण .

 


लिंगायत समाजातील जेष्ठ दिलीप महाजन यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर,उद्या पुरस्कार वितरण .





 लिंगायत समाजातील जेष्ठ दिलीप महाजन यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीरउद्या पुरस्कार वितरण .



सातारा  , दि. 9 : रविंद्र वाकडे  प्रतिनिधी .
येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्यावतीने राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देण्याऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतो.यावर्षी पत्रकारिता प्रसार माध्यम क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्यस्तरीय राष्ट्रपिता जोतिबा फुले आदर्श पत्रकार पुरस्काराने ओगलेवाडी, ता. कराड येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप महाजन यांना गौरविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब गायकवाड यांनी दिली.दिलीप महाजन हे गेले 25 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.

 त्यांनी विविध दैनिकांत काम केले आहे. सध्या ते दैनिक ऐक्यचे ओगलेवाडी वार्ताहार म्हणून काम पाहत आहेत. तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रातही योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना परिवर्तन प्रतिष्ठाच्या  वतीने देण्यात येणाऱ्या  राज्यस्तरीय राष्ट्रपिता जोतिबा फुले आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तसेच यावेळी प्रतिष्ठानच्यावतीने विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचाही सन्मान करण्यात येणार आहे.`या पुरस्काराचे वितरण रविवार, दि. 15 जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाणस्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाजन यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Sunday, January 8, 2023

वीरशैव पतसंस्था सातारा यांच्या वतीने सभासदांना , भेटवस्तु वाटप ,आणि दिनदर्शिका प्रकाशन संपन्न.

 वीरशैव पतसंस्था सातारा यांच्या वतीने सभासदांना , भेटवस्तु वाटप ,आणि दिनदर्शिका  प्रकाशन  संपन्न.

                        


 वीरशैव पतसंस्था सातारा यांच्या वतीने सभासदांना , भेटवस्तु वाटप ,आणि दिनदर्शिका  प्रकाशन  संपन्न.

  सातारा दि ७  :- प्रतिनिधी 

  वीरशैव पतसंस्था सातारा यांच्या वतीने सभासदांना , भेटवस्तु वाटप ,आणि दिनदर्शिका  प्रकाशन  संपन्न.सातारा जिल्ह्यातील  लिंगायत समाजाची अर्थवाहिनी  वीरशैव पतसंस्था यांच्या वतीने संस्थेच्या सर्व सभासदांना गृहपयोगी साहित्याचे वाटप  अध्यक्ष लिंगायत समाजातील उद्योजक आणि चेयरमन  निशांत गवळी यांचे हस्ते  करण्यात आले ,



 या मध्ये ताट  ,वाट्या  फूलपात्र ,हे साहित्य देण्यात आले या वेळी बोलताना निशांत गवळी बोलले की सभासदांच्या सहकार्याने पतसंस्था अतिशय उत्तम कार्य करत आहे या मुळे संस्थेच्या वतीने सभासदांना  भेटवस्तू वाटप करण्यात आले आहे , या पूढे ही सभासदांनी संस्थेला असेच सहकार्य करावे असे आवाहन या वेळी केले  ,


                     

या वेळी संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन  करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी निशांत गवळी ,सागर कस्तुरे ,श्रीनिवास कामळे,सचिन बेलागडे,dr विभुते ,निर्मलाताई बारवडे, महेंद्र बाजारे ,व्यवस्थापक मंदार जंगम , आणि इतर सहकारी , इत्यादी मान्य वर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतातील नंबर एकचे लिंगायत उद्योजक मा.बाबासाहेब कल्याणी .

 भारतातील नंबर एकचे लिंगायत उद्योजक मा.बाबासाहेब कल्याणी .

                                    




भारतातील नंबर एकचे लिंगायत उद्योजक मा.बाबासाहेब कल्याणी .






सातारा, दि.8 - रविंद्र वाकडे  विशेष लेख 

भारतातील नंबर एकचे लिंगायत उद्योजक मा.बाबासाहेब कल्याणी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 मु.पो. कोळे, ता.कराड, जि.सातारा  गावचे थोर सुपुत्र ,आशिया खंडातील सर्वात मोठ्या फोर्जिंग उद्योग समूहाचे प्रमुख मा.बाबासाहेब कल्याणी यांनी अतिशय दूरदृष्टी व देशप्रेम डोळ्यासमोर ठेवून  ' भारत फोर्ज '  या कंपनीचा विस्तार व प्रगती केली आहे.आजच्या त्यांच्या 74 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी आजपर्यंत तब्बल 25 कोटी रुपये ' पी.एम. केयर फंड '  मध्ये योगदान दिल्याचे जाहीर केले आहे.


आज सर्वात श्रीमंत मराठी माणूस असलेले कल्याणी कुटुंब हे मूळचे शेतकरी कुटुंब.त्यांचा वडिलार्जित व्यवसाय हा आडतीचा होता.भारतीय स्वातंत्र्य चळवळीत  कुटुंबातील थोरले पुत्र मा.निळकंठराव कल्याणी यांनी मा.यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या बरोबर मोठे कार्य केले.त्याचा परिणाम म्हणजे मा. निळकंठराव यांचे  तंत्र शिक्षण अपूर्ण राहिले.परंतु 1961 साली संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली.आणि औद्योगिक क्रांती जोम धरू लागली.त्यामुळे जेष्ठ उद्योजक मा.शंतनुराव किर्लोस्कर व मा.निळकंठराव कल्याणी यांना एकत्र करून मा.यशवंतराव चव्हाण साहेब यांनी महाराष्ट्रातील औद्योगिक क्रांतीला चालना देण्याचे महत्त्वाचे काम केले.

आणि त्यानंतर मा.नीलकंठ राव कल्याणी यांनी 1966 मध्ये वेगळी अशी ' भारत  फोर्ज ' ही कंपनी स्थापन केली.सुरुवातीला या कंपनीने इलेक्ट्रिक व कृषी क्षेत्रातील अत्याधुनिक संसाधने तयार केली.
त्यानंतर 1971.72 ला भारत पाकिस्तान युद्ध तसेच चीनशी होणारे मतभेद हे लक्षात घेवून भारत देश हा संरक्षण क्षेत्रात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक बनत गेले.त्यामुळे पुढे लगेच 1972 साली मा.बाबासाहेब कल्याणी यांनी आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या कंपनीमध्ये वयाच्या 23 व्या वर्षी प्रवेश करून कंपनीची सर्व सूत्रे हातात घेवून  भारतीय लष्कराला आवश्यक असणारे संरक्षण साहित्य बनविण्यास सुरुवात केली.आणि त्यांचा हा निर्णय अतिशय योग्य ठरला.
मा.बाबासाहेब कल्याणी यांचा जन्म 8 जानेवारी 1949 रोजी झाला.त्याचे शिक्षण हे बेळगाव येथील मिलिटरी स्कूल मध्ये झाले.पुढे पुणे येथे येवून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीयर ही उच्च विद्या विभूषित पदवी संपादन केली.त्यावेळी त्यांना भारतीय लष्करातील मोठे अधिकारी होण्याची संधी प्राप्त झाली होती.परंतु आपला जन्म केवळ लष्करी  वर्दी घालून मशीनगन हातात धरण्यासाठी झाला नसून आपल्या शिक्षणाचा उपयोग हा संपूर्ण देशाचे रक्षण करण्यासाठी झाला आहे.असे मानून त्यांनी अमेरिका येथे जावून  'एम.आय. टी ' ही अतिशय उच्चविद्याविभूषित पदवी संपादन केली. व तेथे पण त्यांना नोकरी मिळत असताना केवळ मातृभूमीच्या रक्षणाचे काम करण्यासाठी ते भारतात माघारी आले व त्यांनी '  भारत फोर्ज ' ची सूत्रे हाती घेतली.त्यांच्या सुरुवातीच्या क्रांतिकारी निर्णयामुळे त्यावेळचे कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी नाराज झाले व त्यांनी त्यांना असहकार करण्यास सुरुवात केली.परंतु स्वतःच्या व्यवस्थापन गुणवत्तेवर त्यांनी त्या सर्वांना पुन्हा आपले निर्णय कसे योग्य आहेत.हे दाखवून देवून  पुन्हा कंपनीवर मजबूत पकड मिळवली ती आज पर्यंत. आज वयाचा 74 वा वाढदिवस साजरा करून रौप्य महोत्सवी अशा 75 व्या वर्षात त्यांचे पदार्पण होत आहे.
भारतीय संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरविणाऱ्या कंपनीचे मालक म्हणून बाबासाहेब प्रसिद्ध आहेत.पुणे ,मुंडवा व हैद्राबाद  तसेच जगात अनेक ठिकाणी  कंपनीचे खूप मोठे असे उद्योग विश्व आहे.भारतीय हवाई दल , नौदल,पायदळ यांना लागणारे अतिशय अत्याधुनिक असे संरक्षण साहित्य ही कंपनी पुरविते.
अवजड वाहने ,रायफल्स,मशीन गन्स,बंदुकीच्या गोळ्या, दारुगोळा,विमाने,जहाजे,क्षेपणास्त्रे,
तोफा ,  अवजड वाहने. हेलिकॉप्टर्स ,विमाने..
या त्यांनी ' मेक इन इंडिया ' या धोरणावर अतिशय दर्जेदार अशा बनवून जागतिक उद्योगाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
आज' भारत फोर्ज '  ही कंपनी अमेरिका ,जपान ,जर्मनी या देशांशी जागतिक करार करून संरक्षण क्षेत्रातील उत्पादने,अवजड ट्रक्स व वाहनांचे ॲक्सल सह इतर महत्वाचे स्पेअर पार्टस तयार करत आहे.तसेच  सन 1990 पासून ही कंपनी फोर्जिंग,मारुती उद्योग समूह,मर्सिडीज बेंझ उद्योग समूह यासारख्या तब्बल 10 हजार उद्योग समूह व त्यातील इंजिनीयर तसेच कुशल कामगार यांना बरोबर घेवून अंबानी , अदाणी या उद्योग समूहाच्या बरोबरीने पहिला मराठी उद्योग समूह म्हणून ' कल्याणी उद्योग समूह  ' काम करत आहे.त्यामुळे भारतातील सर्वात मोठी मराठी कंपनी म्हणून ' भारत फोर्ज ' व सर्वात पहिला श्रीमंत मराठी उद्योगपती म्हणून बाबासाहेब कल्याणी यांचे नाव संपूर्ण जगात व भारतात मोठ्या आदराने घेतले जात आहे.
भारत सरकारने या कंपनीची वेगवान भरारी पाहून मा.बाबासाहेब कल्याणी यांना सन 2008 साली  ' पद्मभूषण '  हा सर्वात मानाचा पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला आहे.  ' डी.आर. डी. ओ '  या अतिशय मोठ्या अशा भारतीय संरक्षण क्षेत्रात संशोधन करणाऱ्या सरकारी  कंपनीच्या समवेत आज  सर्वात शक्तीशाली अशी ' हँवित्झर ' तोफ बनवण्यात मोठे यश आले आहे.त्यास ' भारत -52 ' असे जागतिक नामकरण मिळाले आहे.अतिशय अत्याधुनिक व लाईटवेट साक्षात शत्रूसमोर व त्यांच्या विमानासमोर गोळ्यांच्या अभेद्य भिंती उभ्या करणाऱ्या रायफल्स व मशिनग न्स यांची निर्मिती वेगाने सुरू आहे.सौदीअरेबिया चे संपूर्ण संरक्षण साहित्य विशेष सुरक्षेचा करार करून ' भारत फोर्ज '  पुरवत आहे.तसेच ' सी. डी.पी. ' ही जर्मनीची आंतरराष्ट्रीय कंपनी पण त्यांनी खरेदी करून भारतीय उद्योगपतींचा दबदबा जगात वाढवला आहे.
त्यामुळे ' भारत फोर्ज ' या कंपनीला 'मल्टीनॅशनल ' कंपनी करण्याचे सर्व श्रेय हे मा.बाबासाहेब कल्याणी यांना जाते. 'आत्मनिर्भर भारत ' बनवून भारताला महासत्ता बनविण्याच्या वाटचालीत त्यांचे योगदान हे खरेच वाखाणण्यासारखे आहे.उद्याच्या गौरवशाली भारतासाठी ही मोठी यशाची नांदी आहे.सातारा नगर पालिकेला  स्वइमारतीसाठी  आपल्या स्वतःच्या मालकीची जागा केवळ 1/- रुपया या दानफळ किमतीत विकून मा.बाबासाहेब कल्याणी यांनी आपले आपल्या जन्मभूमी सातारा जिल्ह्याचे ऋण फेडण्याचा अल्पसा प्रयत्न केला आहे.कल्याणी उद्योग समूहातर्फे शासनाच्या विविध योजना व त्या अंतर्गत केली जाणारी विकास कामे तसेच गावस्वरुपी अनेक  शेती,पाणी रस्ते,वीज अशी व इतर विकास कामे यांना ' तन - मन - धन ' अर्पण करून मदत केली जाते.
' कारखाना हेच देवालय,मशीन हाच देव आणि दर्जेदार उत्पादन हिच भक्ती ' ही त्रिसूत्री अंगी बाणवून मा.बाबासाहेब कल्याणी यांनी केलेली विकासात्मक प्रगती म्हणूनच अतिशय उल्लेखनीय अशी आहे.
आज या महान उद्योगपतीचा 
74 वा वाढदिवस त्यानिमित्त त्यांना लिंगायत TV Live चॅनेल  ,,वीरशैव लिंगायत समाज संघटना उंब्रज ,सातारा , लिंगायत संघर्ष समिती ,
समस्त भारतीय उद्योग विश्व व जनतेतर्फे वाढदिवसाच्या अब्ज - अब्ज शुभेच्छा  व 75 व्या अमृत महोत्सवी कारकिर्दीस सुयश शुभचिंतन . 

Friday, January 6, 2023

डिजिटल मिडिया ऑर्गनायझेशनऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी रविंद्र वाकडेजिल्हा अध्यक्ष पदी प्रा .अजय शेटे यांची निवड , नवीन कार्यकारीणी जाहीर .

 डिजिटल मिडिया ऑर्गनायझेशनऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी रविंद्र वाकडेजिल्हा अध्यक्ष पदी प्रा .अजय शेटे यांची निवड , नवीन कार्यकारीणी जाहीर .





डिजिटल मिडिया ऑर्गनायझेशनऑफ महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी रविंद्र वाकडे,जिल्हा अध्यक्ष पदी प्रा .अजय शेटे यांची निवड , नवीन कार्यकारीणी जाहीर .


                                             


कराड , दिं.6 -  दिलीप महाजन कराड प्रतिनिधी 

डिजिटल मिडियाऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्रच्या सातारा जिल्हा अध्यक्ष पदी प्रा. अजय शेटे, जिल्हा उपाध्यक्ष पदी दिलीप महाजन आणी कुलदिप मोहिते यांची निवड  करण्यात आली ,

 मधूबन ऍग्री टुरिझम ,नाडे नवारस्ता येथे काल आयोजित करण्यात आलेल्या मिटिंग मध्ये या निवडी करण्यात आल्या , या वेळी  सांगली जिल्ह्या अध्यक्ष पदी ॲडव्हान्स न्यूज चे संपादक, ॲड. अंश खलीपे आणि महिला अध्यक्ष पदी ॲड शीतल बेद्रे सांगली यांची निवड करण्यात आली . कडेगाव तालुका अध्यक्ष पदी कुलजीत महाजन यांची निवड झाली, तर डिजिटल मि डिया ऑर्गनायझेशन ऑफ महाराष्ट्र च्या अध्यक्ष पदी रविंद्र वाकडे यांची निवड केली, आहे तसेच कराड तालुका पदी दैनिक सांजवात  चे प्रल्हाद गुजले यांची निवड पाटण तालुका पदी  आपला सातारा न्यूज चे विक्रम पवार यांची निवड खटाव तालूका पदी सचिन पवार यांची निवड करण्यात आली आहे,



 या वेळी बोलताना जिल्हा अध्यक्ष प्रा. अजय शेटे म्हणाले  सद्या सर्वत्र डिजिटल मिडिया चे काम मोठ्या प्रमाणात चालत आहे  .मात्र त्यांच्या समस्या आणि अडचणी साठी कोणी ही पुढाकार घेत नाही  ,  तेव्हा आम्ही या संघटनेच्या माध्यमातून डिजिटल मीडिया मध्ये काम करत असणाऱ्या सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या हक्कासाठी लढणार आहोत. महाराष्ट्रात सर्वत्र या संघटनेच्या माध्यमातून काम चालू करण्यात येणार असून ,लवकरच प्रत्येक जिल्ह्यात उर्वरित पदाधिकारी यांची निवड करण्यात येणार आहे तरी  इच्छुकांनी आम्हाला संपर्क करावा असे आवाहन या वेळी करण्यात आले


Wednesday, January 4, 2023

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा,16000 पतसंस्थांची शिखर संघटना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्षपदी लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.

 

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा,16000 पतसंस्थांची शिखर संघटना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्षपदी लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.


महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य अशा,16000 पतसंस्थांची शिखर संघटना महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्षपदी लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांची सलग तिसऱ्यांदा बिनविरोध निवड.



सातारा, दि.5 -रविंद्र वाकडे.

लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र चे समन्वयक, वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन चे अध्यक्ष, लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांची सहकार क्षेत्रातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांच्या मार्गदर्शनाने सहकार क्षेत्रात आजवरच्या इतिहासात पहिल्यांदा 16000 पतसंस्था, एकुण 1.5 लाख कोटी रुपयांच्या ठेवी,2 लाख कर्मचारी अशा पतसंस्थांची शिखर संघटना

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन च्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे.संपू र्ण लिंगायतांचा अभिमान असणाऱ्या लिंगायत लोकनेते मा. काकासाहेब कोयटे यांचे याबद्दल भारतातील सर्वच सहकार क्षेत्रातील दिग्गज नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या निवडीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.



आपल्या या यशाबद्दल पुन्हा एकदा  वीरशैव लिंगायत समाज संघटना,लिंगायत संघर्ष समिती ,लिंगायत व बसव विचार टिव्ही यांचेमार्फत  हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. तसेच याचा आम्हाला खरोखर मान व अभिमान वाटत आहे.असे प्रकटन 

वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे समनव्यक मा.  प्रदीपजी साखरे यांनी जाहीर  प्रसिद्ध केले आहे.**

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान , श्री . तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा ,गुरुवार दि ५ रोजी पाली यात्रा या निमित्ताने विशेष लेख .

  लाखो भाविकांचे श्रद्धास्थान , श्री . तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा ,गुरुवार दि ५ रोजी पाली यात्रा या निमित्ताने  विशेष लेख .



लाखो भाविकांचे श्रद्धास्थान  श्री . तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा ,गुरुवार दि ५ रोजी पाली यात्रा या निमित्ताने  विशेष लेख .



                 
उंब्रज दि  4 :-रविंद्र वाकडे.
पुणे- कराड मार्गावर उंब्रजवरून काशीळकडे साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर पाली हे गाव आहे. या गावावरूनच येथील देवाला '  पालीचा खंडोबा '  या नावाने ओळखतात.
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत ( खंडोबा ) पाली हे ठिकाण महाराष्ट्र्रातील सातारा या जिल्ह्यात आहे . शंकराचे अवतार असणारा पाली खंडोबा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे .पुणे- कराड मार्गावर उंब्रजवरून काशीळकडे साधारणपणे ५ कि.मी. अंतरावर पाली हे गाव आहे. या गावावरूनच त्याला ' पालीचा खंडोबा' या नावाने ओळखतात. हजारो लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात .जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते .श्री खंडोबा देवाचे मंदिर हे तारळी नदीच्या तीरावर आहे .पुण्यापासून १३५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तेथे जाण्यासाठी २ तासाचा वेळ लागतो .




सदरच्या देवस्थानात दररोज ४ वेळा पूजा अर्चा केली जाते. देवस्थान हेमाडपंथी असून ते सुमारे १ हजार वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात नारळ वाढवीत नाहीत. बकरीचा पशुबळी दिला जातो. येथे पौष महिन्यात मृग नक्षत्रावर श्री खंडोबाचे व म्हाळसाचे लग्न लागते, त्याची पौराणिक कथा खालीलप्रमाणे –

ज्यावेळी समुद्र मंथन झाले त्यावेळी श्री भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून देवांना व दैत्यांना अमृत व सुरापान यांचे वाटप केले त्यावेळेस मोहिनीचे रूपावर शंकर भाळले, त्यावेळी श्री विष्णूने शंकरास सांगितले की तू ज्यावेळी मार्तंड भैरवाचा अवतार धारण करशील त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन. त्याप्रमाणे श्री भगवान शंकराने पार्वतीच्या शरीरात प्रवेश करून मोहिनीचे रूप धारण केले व ती अतिसुंदर दिसू लागली म्हणून तिचे नाव 'महालयाशक्ती 'असे ठेवले.तीच म्हाळसा.
तिने तिम्माशेठ वाण्याच्या घरी बालकन्येचे रूप धारण केले व तिचा विवाह सदर वाण्याने मार्तंड भैरवाशी पौष शु. पौर्णिमा या दिवशी करून दिला. म्हाळसा व महाळसाकांत येथूण गुप्त झाले आणि ते शिवलिंगरूपाने प्रकट झाले. त्यावेळी पाली येथील खंडोबास मल्हारी म्हाळसाकांत हे नाव पडले. पालाई गवळण यांच्या भक्तीप्रीत्यर्थ येथे देव निर्माण झाला म्हणून  'पालाई ' या नावावरून सदर गावास पाल हे नाव पडले.
                    

सदर देवाचा पुजारी दरवर्षी बदलतो. त्याचप्रमाणे वारकरी मात्र प्रतिदिनी बदलतो. गावाची वस्ती २,५०० असून तेथील महादेवांस उमा-महेश्वर या नावाने संबोधले जाते. देवास फुलाचा कौल लावला जातो. कौल उजवा दिल्यास देवाचे करणे काही राहिले नाही व कौल डावा दिल्यास आपले काही राहिले आहे असे तेथील भाविक लोक मानतात. सदरच्या मंदिराचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असून त्यास अंदाजे रु १२ लक्ष खर्च अपेक्षित आहे. सदरचा खर्च हा भक्तांच्या देणगीतूनच करण्यात येतो. सदरच्या जीर्णोद्धाराचे काम श्री. चंद्रशेखर स्वामीनाथन शेखाई (तामिळनाडू) हे करीत आहे. सध्या देवस्थानचे व्यवस्थापक म्हणून श्री. लक्ष्मण दिगंबर वेदपाठक हे आहेत.




खंडोबाच्या लग्नकथा –
एक वाघ्या – खंडोबाला वाहिलेल्या पुरुषास ' वाघ्या 'तर स्त्रीस' मुरळी  ' असे म्हणतात. खंडोबा हे दैवत बहुपत्‍नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्‍नीकत्वामुळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्‍नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्‍नी बाणाई उर्फ पालाई  धनगर आहे. मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानण्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापार्‍याच्या घरात जन्मली. स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले ,असे सांगितले जाते.



दुसरी पत्‍नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्‍नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणार्‍यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला.
एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छुक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संतप्‍त झाली. तेव्हा बायकांचे भांडण थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.





पालीचा खंडोबा यात्रा – 
श्री खंडोबा व म्हाळसा यांची विवाह यात्रा प्रसिद्ध असून, यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविक पाल येथील मंदिरात हजेरी लावतात. भाविकांनी दिलेल्या देगणीतून ४ लाख ५१ हजार रुपये किंमतीची ११ किलो चांदी, १ लाख ७२ हजार रुपये किंमतीचे ६६ किलो पितळ आणि जवळपास ७७ हजार रुपये किंमतीचे सागवानाचे लाकूड वापरून सुमारे सात लाख रुपये किंमतीचे आकर्षक सिंहासन तयार करण्यात आले आहे.
पालचेर पश्चिमेकडील डोंगरावर खंडोबाची कुमारिका बहीण हंजाई यांचे स्थान असून त्यास विंध्यवासिनी असे म्हणतात. सदरचे ठिकाण हे १५ कि.मी. अंतरावर आहे.
अविनाश इंजेकर श्री खंडोबा पाली पुजारी  यांचा संपर्क 
मोबाईल क्र. +91 90218 64264 असा आहे.श्री खंडोबा देवाची 
इतर प्रसिद्ध स्थाने पुढील प्रमाणे आहेत.
१) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी ,२) निमगाव,३) पाली-पेंबर सातारा,४) माळेगाव,५) सातारे (औरंगाबाद),६) शेंगूड (अहमदनगर),७) नळदुर्ग (धाराशिव-उस्मानाबाद),८) वाटंबरे.


लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...