सुलोचना येवले शिवैक्य
वडूज, दि.23 - प्रा.अजय शेटे प्रतिनिधी
वडूज शिक्षण विकास मंडळाचे माजी उपाध्यक्ष कै.मधुकर जगन्नाथ येवले यांच्या पत्नी व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री.संजय मधुकर येवले यांच्या मातोश्री कै.सुलोचना मधुकर येवले यांचे आज शनिवार , दि.23.04.2022 रोजी सकाळी 7 वा.अल्पशा आजाराने निधन झाले.परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. हिच परमेश्वर चरणी प्रार्थना.
त्या ' बाई ' या नावाने परिचित होत्या.शिव गर्जना भजनी मंडळ,महिला भजनी मंडळ यांच्या त्या सदस्या होता. तसेच त्या अतिशय धार्मिक वृत्तीच्या व मनमिळावू होत्या.सर्वांशी गोड व प्रेमाने बोलून त्यांनी आपल्या संबंधातील सर्व व्यक्तींना मानसिक व भावनिक आधार देण्याचे काम केले होते.त्यांच्या निधनाने एक चांगली मार्गदर्शिका हरपल्याची भावना सर्वांना जाणवत आहे.
वीरशैव लिंगायत समाज संघटना, ,लिंगायत टिव्ही लाइव्ह , शिक्षण विकास मंडळ उच्च न्यायालय नियुक्त समिती, वडूज शिक्षण विकास मंडळ, मा.मुख्याध्यापिका,उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शाळा व्यवस्थापन समिती, हु. प.विद्यालय व ज्युनियर कॉलेज शिक्षक शिक्षिका, म.फुले प्राथमिक शिक्षण केंद्र,प्रेरणा पूर्व प्राथमिक शाळा शिक्षक,शिक्षिका व सर्व शिक्षकेतर कर्मचारी असे सर्वजण मिळून येवले कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.शाळा संकुला तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
No comments:
Post a Comment