सौ.निशा ताई बिडवे यांची लिंगायत संघर्ष समिती च्या प्रदेश समन्वयक पदी निवड
सातारा , दि.23 - प्रणाली वाकडे प्रतिनिधी
लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश समन्वयक पदी ,लिंगायत समाजाचे सक्षम नेतृत्व असलेल्या सौ.निशा ताई बिडवे यांची निवड झाली आहे.
त्या ' ग्रज्युएट फोरम ऑफ महाराष्ट्र ' च्या अध्यक्षा पण आहेत त्यांच्या या निवडी बद्दल वीरशैव लिंगायत समाज संघटना व लिंगायत टिव्ही यांचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल लिंगायत समाजाची जवळजवळ एक कोटी लोकसंख्या आहे. या संघटनेच्या माध्यमातून सर्व समाज संघटना एकत्र येवू न आपल्या मागण्यांचा एकत्रित पणे पाठपुरावा करणार आहेत.अशी माहिती लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक श्री.ओमप्रकाश दादाप्पा तथा काकासाहेब कोयटे यांनी दिली.
पुणे येथील सुहाग मंगल कार्यालयात झालेल्या समाज संघटनेच्या एकत्रित बैठकीस लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनिल नामदेवराव रुकारी,लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सौ.सरलाताई पाटील,लिंगायत महासमितीचे अध्यक्ष प्रा.सुदर्शन बिराजदार,लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष श्री.विजय कुमार शेटे,महाराष्ट्र बस व परिषदेचे अध्यक्ष श्री.शिवानंद हैबतपुरे,राष्ट्रसंत मिशन चे अध्यक्ष श्री.रामदास जी पाटील,जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष श्री.बसवराज कनजे ,बसवेश्वर स्मारक समितीचे प्रमुख श्री.बसवराज बगलें,शिवलिंग ढवळेश्वर ,भा. ज.पा. च्या प्रवक्त्या प्रेरणा ताई होनराव,निशा ताई बडवे ,काँग्रेस पक्षाचे पुण्याचे प्रवक्ते श्री.नरेंद्र व्यवहारे,संभाजी नगर शिवसेनेचे नेते श्री.ज्ञानेश्र्वर खरडे,श्री.शिवा खांडकुळे तसेच नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस चे माजी अध्यक्ष श्री.अनिल चौगुले ,कागल चे नगरसेवक श्री संजय चितारी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री.संतोष जिरेसाळ, आम आदमी पार्टीचे श्री.नरेंद्र बाळासाहेब देसाई आदी नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment