भारतातील लिंगायत समाज व पुढील दिशा ' या विषयावर सविस्तर मा. आमदार विनय जी कोरे यांचे बरोबर बैठक संपन्न
सातारा, दि.26 - प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
सोमवार दि.25 रोजी वारणा नगर ( कोल्हापूर ) येथे आदरणीय शरण आमदार व माजी मंत्री विनय जी कोरे साहेब ( सावकार ) यांचे बरोबर ' भारतातील लिंगायत समाज व पुढील दिशा ' या विषयावर जवळजवळ एक तास सविस्तर चर्चा झाली.
या चर्चेत लिंगायत धर्म अल्पसंख्यांक दर्जा, म.बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ,उद्योग विश्वाला चालना देण्यासाठीच्या कर्ज योजना,गाव तिथे स्मशान भूमीची जागा ,अशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याच वेळी कोल्हापूर येथील समन्वयक शरण राजशेखर तंबाके यांचेशी संपर्क साधून लवकरच एक मोठी बैठक आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.यामध्ये समाजातील सर्व जगद्गुरु , आजी माजी आधिकारी ,राजकीय पदाधिकारी,सर्व संघटना व समाज बांधव यांना एकत्रित बोलावून वरील ध्येय धोरणे या विषयी एक समान अजेंडा तयार करून भावी वाटचाल निश्चित करण्यासाठी अंतिम चर्चा करण्यात येणार आहे.
तरी सर्व लिंगायत बांधवांनी आप आपल्या गाव, तालुका व जिल्हा स्तरावर याद्या तयार करून ठेवाव्यात. म.बसवेश्वर जयंती नंतर आम्ही पदाधिकारी नेते आपणा कडे येवून मार्गदर्शन करू व याद्या गोळा करून सर्व माहिती घेवू असे लिंगायत नेते श्री.प्रदिपबापू वाले, कवठे महांकाळ.यांनी जाहीर केले आहे. तसेच अधिक माहिती साठी त्यांच्या मोबाईल क्रमांक 9423037482 यावर संपर्क साधावा.असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे.
No comments:
Post a Comment