वडूज , ता.खटाव, येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ - श्री जोगेश्वरी यात्रा कार्यक्रम शुभारंभ
सातारा, दि.22 -प्रा.अजय शेटे. प्रतिनिधी
वडूज , ता.खटाव, जि.सातारा येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ व श्री देवी जोगेश्वरी यांचा यात्रा कार्यक्रम आज शुक्रवार, दि.22.04.2022 पासून सुरु होत असून आज रोजी श्री देवाचा हळदी समारंभ होणार आहे.शनिवार दि.23.04.2022 रोजी संध्याकाळी श्री देवांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.रविवार दि.24.04.2022 रोजी संध्याकाळी श्रीनाथ बाबांची घोड्यावरून मिरवणूक तसेच सोमवार , दि.25.04.2022 रोजी संध्याकाळी श्री जोगेश्वरी देवीची घोड्यावरून मिरवणूक होईल.मंगळवार दि.26.04.2022 रोजी संध्याकाळी दोन्ही देवांची घोड्यावरून मिरवणूक व छबिना
कार्य क्रम होणार आहे.बुधवार दि.27.04.2022 रोजी श्री नाथ बाबांची खीर प्रसाद कार्यक्रम होईल. व दुपारी 4 वा.कुस्त्यांचे जंगी मैदान श्री जोतिबा मंदिर समोर होईल.
अशा प्रकारे ग्रामदैवत यात्रा कार्यक्रम नियोजित करण्यात आल्याचे यात्रा समिती व देवाचे सा लकरी श्री.सुभाष गुरव यांनी जाहीर केले आहे.अधिक माहितीसाठी त्यांच्या 9881031959 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. व सर्व भाविक भक्तांनी यात्रा कार्यक्रमात सामील होऊन श्री देवांची कृपा दृष्टी प्राप्त करून घ्यावी.असे आवाहन यात्रा समिती तर्फे करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment