लिंगायत बांधवांनो जागे व्हा..रात्रच नव्हे ..दिवस पण वैऱ्याचे आहेत
सातारा दि 23 :- रवी वाकडे
लिंगायत बांधवांनो जागे व्हा..रात्रच नव्हे ..दिवस पण वैऱ्याचे आहेत
महात्मा बसवेश्वर जयंती मंगळवार दि.3 मे रोजी आहे.म्हणजे फक्त 10 च दिवस राहिले आहेत .पण अनेक गावामधील लिंगायत समाज या जयंती साठी उत्सुक नाही असे वाटते आहे.ठराविक जण च प्रयत्न करताना दिसत आहेत. म.बसवेश्वर जयंती च्या दरम्यान 'रमजान ',सण येतो आहे.त्याच दिवशी श्री परशुराम जयंती पण आहे.तर आपण रमजान सणाचं नियोजन करूयात निदान त्यामुळे तर आपला समाज येईल फक्त नावाला लिंगायत समाज आहे,अजूनही आपल्या समाजात कसलीही एकी नाही त्यामुळे सर्व राजकीय लोक हे आपल्या समाजाचाच वापर हा फक्त सरकारी 'निरोध ' सारखा करून घेत आहेत आणि आपला समाज वापर करून देत आहेत हे दुर्दैव आहे आणि अतिशय खेद जनक पण आहे . किव येते आपल्या समाजाची आणि खूप वाईट ही वाटते की, जगाला ज्ञान शिकविण्याऱ्या महात्मा बसवेश्वर महाराज यांची त्यांचा समाजच अवहेलना करत आहे.आपल्या भागात मुस्लीम समाज न चुकता दर शुक्रवारी जास्त वेळ व रोज थोडा तरी वेळ एकत्र सामुदायिक प्रार्थनेला एकत्र जमतात.ख्रिश्चन समाजाचे प्रस्थ ही वाढीस लागले आहे.रोज व आठवड्यातून एकदा खास सामुदायिक प्रार्थना करणे. व त्या अनुषंगाने धर्म,जात व समाज विकासाची चर्चा करून त्याप्रमाणे कार्यवाही करणे. हि त्यांची बलस्थाने ठरत चालली आहेत.त्याचा त्यांना फायदा होत आहे.
श्री परशुराम जयंती चे ही प्रस्थ आपणाकडे वाढत चालले आहे.त्यांचे लोक खेडोपाडी जाऊन समाज संघटन करत फिरत आहे.मुख्य गावात श्री परशुराम जयंती साठी सर्वजण एकत्र जमत आहेत.
तेव्हा आपला समाज काय करत आहे? हा प्रश्न आपणासमोर पडला आहे. आठवड्यातून एकदा सर्वांनी वीरशैव लिंगायत धर्माचा एखादा कार्यक्रम करण्यासाठी एकत्र जमून आपले सामुदायिक देव व अध्यात्म कार्य करण्यास सुरुवात करावी लागेल.रोजची कामे तर सर्वानाच आहेत.परंतु ' Busy man also gets time,lazy can't be' या इंग्रजी म्हणी प्रमाणे आपल्याला दिवसभराची चार कामे करून ,वर पाचवे आपल्या समाजाचे कार्य करावेच लागेल.आपल्या दैनंदिन उत्पन्नाच्या कमीत कमी अडीच व जास्तीत जास्त दहा टक्के रक्कम समाजासाठी खर्च करावीच लागेल.मी एकटा नाही गेलो तर कार्यक्रम थांबणार नाही.म्हणून कार्यक्रमाला जाणे टाळण्या पेक्षा मी गेल्या शिवाय कार्यक्रमा ला शोभा नाही.असे मानून समाजाच्या सर्व कार्यक्रमात सामील झालेच पाहिजे.
आपल्या समाजातील लोक इतर संघटनांची पदे,सत्संग,बैठका,वर्ग सांभाळत आहेत.त्यांचे देव..महाराज पूजत आहेत..त्यांची भाषा,शब्द बोलत आहेत. त्यांच्यासाठी वर्गणी,देणगी गों ळा करत आहेत.पण आपल्या समाजाचे हेच सर्व आपले म्हणून काम करणारे कार्यकर्ते तयार झाले पाहिजेत.
तेव्हा आता वेळीच सावध होऊन येणारी म.बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करा. व वरील संकल्प सुरू करून पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत .यासाठी आपले सर्व मठाधिपती स्वामी महाराज यांचे आलटून..पालटून कार्यक्रम घेवून मार्गदर्शन घ्यावे. तसेच श्री कोळेकर महाराज,श्री धारेश्र्वर कर महाराज,श्री वाईकर महाराज यांनी आपल्या अधिकारात समाज जागृती साठी वैयक्तिक अधिक प्रमाणात प्रयत्न करणे गरजेचे आहे. तरच भावी काळात आपले देव,मठाधिपती महाराज,संस्थान गाद्या ,सन उत्सव,समारंभ टिकून राहतील.तेव्हा अखंड सावधान व्हा.. .जय बसवा..
No comments:
Post a Comment