Friday, April 29, 2022

स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत लिंगायत राणी ' चेन्नमा ' यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा सत्कार .


स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत  लिंगायत राणी ' चेन्नमा ' यांची भूमिका साकारणाऱ्या  अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा सत्कार .
नाशिक दि 29 :- प्रा अजय शेटे
 मराठी टिव्ही वरील ' शेवंता ' फेम व  सुप्रसिद्ध मराठी मालिका  'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या मालिकेत  लिंगायत राणी ' चेन्नमा ' यांचीभूमिका साकारणाऱ्या   हरहुन्नरी सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिची लिंगायत संघर्ष समिती व वीरशैव इंटर नॅशनल असोसिएशन चे युवा अध्यक्ष मा.प्रदिप साखरे यांनी नुकतीच एक प्रकट मुलाखत घेतली.
यामध्ये त्यांनी तिला लिंगायत राणी चेन्नमा यांची भूमिका करतानाचा तुझा अनुभव काय ? या प्रश्नावर तिने अतिशय दिलखुलास उत्तर दिले आणि सांगितले की, माझी मराठी रसिकांच्या मनातील इमेज हि ' शेवंता ' ची होती.तिच्या बोलण्याची एक खास लकब मला अभिनय करताना वापरावी लागली होती .परंतु हि भूमिका ही खूप वेगळी होती. अगदी सुरुवातीला जेव्हा मला राणी चेन्नमा यांच्या भूमिके बद्दल विचारले गेले तेव्हा माझ्या मनावर एकदम दडपण येवून,माझी मनस्थिती द्विधा झाली.आणि मला ही अवघड ऐत्याहासिक भूमिका जमणार नाही असे वाटले.परंतु माझी आई जिद्दीला पेटली आणि तिने मला आग्रह करून आत्मविश्वास दिला की,तू ही भूमिका नक्की चांगली करू शकशील आणि मला तुला ही च भूमिका करताना पहायचे च आहे.अशा प्रकारच्या तिचा आग्रहामुळे मी त्या भूमिकेला होकार दिला व राणी चेन्नमा ची अतिशय आव्हानात्मक भूमिका मी साकारली.याचे सर्व श्रेय मी माझ्या आईला देते.

तिने साकारलेल्या या भूमिकेबद्दल लिंगायत लोकनेते मा.काकासाहेब कोयटे ,लिंगायत संघर्ष समिती युवा अध्यक्ष प्रदीप साखरे,सौ.सुहासिनी ताई कोयटे ,सौ स्वाती कोयटे,सौ.कल्याणी हुरणे,संतोष साखरे,गिरीश सोनेकर,अमोल राजूरकर यांनी त्यांचा लिंगायत विरांगणा राणी चेन्नमा यांची प्रतिमा भेट देवून सर्व लिंगायत संघर्ष समितीच्या वतीने तिचा खास सन्मान केला

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...