Sunday, April 24, 2022

महाराष्ट्र राज्यातील विविध लिंगायत संघटनांची ऐक्याची घोषणा


 महाराष्ट्र राज्यातील विविध लिंगायत संघटनांची ऐक्याची घोषणा 
सातारा, दि.25 - प्रसाद वाकडे लिंगायत TV live प्रतिनिधी
 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख संघटना एकत्र करून एकाच ' सकल लिंगायत महा समिती ' ची स्थापना करण्यात आल्याची घोषणा सर्व समाज संघटना कडून करण्यात आली आहे.समाजाच्या काही प्रमुख मागण्या आणि प्रश्नांसाठी ही समिती कार्य करेल ,असा उद्देश यात ठेवण्यात आला आहे.

       या बैठकीच्या माध्यमातून राज्यस्तरीय समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.यामध्ये राज्यातील सर्व लिंगायत समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण तात्काळ मिळावे. श्रीक्षेत्र मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक निर्माण कार्यासाठी 500 कोटी रुपयांची निधी तरतूद व्हावी.महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना त्वरित करून त्यासाठी तात्काळ 500 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा.श्रीक्षेत्र कपिलधार च्या विकासासाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा.लिंगायत विद्यार्थ्यांसाठी नवीन वसती गृहांची स्थापना करण्यात यावी.गाव तिथे त्वरित स्मशान भूमी साठी जागा उपलब्ध होऊन तिच्या सुशोभिकरणासाठी अधिक निधी उपलब्ध करून द्यावा.अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात येवून ,ठराव करण्यात आले व ते प्रचंड टाळ्यांच्या गजरात एकमताने मंजूर करण्यात आले.तसेच या सर्व विषयांचा समान कार्यक्रम निश्चित करण्यात आला .

लिंगायत संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक  मा.काकासाहेब कोयटे यांच्या विशेष प्रयत्नाने पुणे येथे ही महाराष्ट्रातील प्रमुख लिंगायत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरुवार दि.21 रोजी आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील रुकारी, कार्याध्यक्षा सरला ताई पाटील,लिंगायत महा समितीचे अध्यक्ष सुदर्शन बिरादार,लिंगायत सेवा संघाचे अध्यक्ष विजयकुमार शेटे,महाराष्ट्र बसव परिषदेचे अध्यक्ष शिवानंद हैबतपुरे, राष्ट्रसंत मिशन चे अध्यक्ष रामदास पाटील,महात्मा बसवेश्वर स्मारक कृती समितीचे अध्यक्ष डॉ.बसवराज बगले,काँग्रेस चे प्रवक्ते नरेंद्र व्यवहारे,भाजपाच्या प्रवक्त्या प्रेरणा होनराव,मनसेचे संतोष जिरेसाल,शिवसेनेचे ज्ञानेश्र्वर खर्डे,राष्ट्रवादीचे संजय चितारी,आम आदमी पक्षाचे नरेंद्र देसाई,सौ.सुहासिनी ताई कोयटे ,उपाध्यक्ष राजेंद्र मुंडे,भगवान कोठावळे,मराठवाडा प्रमुख उदय चौंडे,संघटक गुरुनाथ बडूरे,युवा अध्यक्ष प्रदिप साखरे,शिवलिंग ढवळेश्वर,अनिल चौगुले,चंद्रशेखर दणदणे, निशा ताई बिडवे,भगवान कोठावळे,यांची प्रमुख उपस्थिती होती.
या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अधिकृत राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली.
या समितीच्या प्रमुख पदी सर्वश्री  श्री.ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे ,कोपरगाव हे असून ,सुनील रूकारी,पुणे.सरला ताई पाटील ,कोल्हापूर.प्रा.सुदर्शन बिरादार,लातूर.विजयकुमार शेटे,लातूर.बसवराज कणजे,चिंचवड.शिवानंद हैबतपुरे,लातूर.रामदास पाटील, नांदेड. डॉ.बसवराज बगले,सोलापूर.प्रेरणा ताई होनराव ,लातूर.अनिल चौगुले, नाशिक.आदींचा समावेश करण्यात आला आहे.
पुढील किमान समान कार्यक्रमाचे धोरण ठरवून प्रत्येक जिल्ह्यात व शासन स्तरावर त्याची अंमलबजावणी करण्याचे काम या राज्यस्तरीय समन्वय समिती कडून करण्यात येणार आहे.
या बैठकीला केशवराव नगरे,जयश्री तोडकर,उज्वला बसवे,संतोष लिभारे,अर्चना खडके,शिवा खांड कुळे,दत्तात्रय वायचळ,शिवानंद कथले,सतीश निळकंठ,राजेश कोठाळे,अरुण आवटे,सुधीर भुसारे, गिरीश सोनेकर,अनिल रुद्रुके,लक्ष्मी घोडके,श्रीकांत तोडकर,नंदकुमार गवंडर,निंगप्पा तळे,तुषार स्वामी,प्रा गिरजप्पा मुचाटे,बसवराज हिरेमठ यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...