श्री वाघेश्र्वरी व श्री नवलाई देवी यांची यात्रा शांततेत पार पाडण्यात येणार , यात्रेची नियोजन बैठक संपन्न
सातारा , दि.20 -प्रा.अजय शेटे
विसापूर, ता.खटाव, जि.सातारा.येथील आराध्य ग्रामदेवता श्री वाघेश्र्वरी व श्री नवलाई देवी यांच्या वार्षिक यात्रे ची नियोजन बैठक नुकतीच बुधवार, दि.20 .04.2022 रोजी सकाळी 9 वा.सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री देवी मंदिरात पार पडली.
यात्रे चा सर्वसाधारण कार्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आला आहे.
शुक्रवार दि.29.04.2022 रोजी रात्री 9 वा. किर्तन.
शनिवार दि.30.04.2022 रोजी सकाळी श्री देवीचा विधिवत अभिषेक.
दुपारी बैलगाड्यां ची भव्य शर्यत होईल.या शर्यतीचे पहिले बक्षीस रु.21 हजार ,दुसरे 15 हजार,तिसरे 10 हजार,चौथे सात हजार व पाचवे 5 हजार रुपये आहे.स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा नियोजन समिती सदस्य, पैलवान सागर भाऊ साळुंखे यांचेकडून खास चांदीच्या ढाली देण्यात येणार आहेत. स्पर्धेला प्रवेश फी रू. 501/- आहे.स्पर्धा मैदान सकाळी 10 वा.सुरू होईल, कोणतीही गावगाडी डायरेक्ट फायनल ला पळवली जाणार नाही,पंचांचा निर्णय अंतिम राहील, समान उतरलेल्या गाड्या डबल सोडण्यात येतील, प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारी वर मैदान पहावे.सर्व स्पर्धा काटेकोर नियम व अटी पाळून होतील .संध्याकाळी देवीचा गोंधळ झाले नंतर छबिना ,श्री देवीच्या मूर्तीची ग्राम फेरी.
रविवार , दि.1.5.2022 रोजी जंगी कुस्ती स्पर्धेचा आखाडा होईल.
रात्री 9 वा. ऑर्केस्ट्रा तसेच माया उंब्रजकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल.
अशा प्रकारे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत श्री देवीच्या यात्रेचे काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे ज्येष्ठ यात्रा मार्गदर्शक श्री.दिलीप ढोले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले
No comments:
Post a Comment