लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर आधारित ' महात्मा बसवेश्वर ' या नाटकाचा प्रयोग शुक्रवार दि.13 मे रोजी सांगली येथे
सातारा, दि.23 -प्रा.अजय शेटे, प्रतिनिधी
वीरशैव लिंगायत समाज संघटना,सांगली च्या वतीने लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांच्या जीवन कार्यावर आधारित ' महात्मा बसवेश्वर ' या नाटकाचा प्रयोग शुक्रवार दि.13.05.2022 रोजी भावे नाट्यगृह ,सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या नाटकात महात्मा बसवेश्वर यांच्या प्रमुख भूमिकेत अभिनेते शरण राजेंद्र आलम खाने हे दिसणार आहेत.तसेच इतर चाळीस कलाकारांना घेवून हे नाटक सादर होणार आहे.
सदर नाटक समस्त लिंगायत समाज,सांगली.यांचे वतीने आयोजित करण्यात आले असून समाजातील सर्वांनी हे नाटक सहकुटुंब सहपरिवार पहावे. व आपल्या रोजच्या जीवनात म.बसवेश्र्वरांच्या जीवन कार्याचा अंगीकार करून घेवून दैनंदिन जीवनात त्याचा फायदा करून घ्यावा.असे आवाहन समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच ज्यांना कोणाला नाटक नियोजन समिती मध्ये निस्वार्थ काम करायचे आहे तसेच नाटकाची वेळ व इतर काही गोष्टी माहीत करून घ्यायच्या आहेत , त्यांनी शरण आप्पासाहेब शेगावे ,भ्रमणध्वनी क्र.9975185511,यांचेशी संपर्क साधावा.अशी विनंती संघटने तर्फे करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment