Saturday, April 30, 2022

महात्मा बसवण्णा यांनी 'कायकवे कैलास' हा जगण्याचा मुलमंत्र दिला : प्रा. डॉ. भीमराव पाटीलवीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचा भव्य शुभारंभ


महात्मा बसवण्णा यांनी 'कायकवे कैलास' हा जगण्याचा मुलमंत्र दिला : प्रा. डॉ. भीमराव पाटील
वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचा शुभारंभ
सोलापूर दि 29  : प्रतिनिधी राजशेखर बुरुकुले 
महात्मा बसवण्णा यांनी माणसाचा दर्जा जातीवरून नाही तर त्याच्या आचारावरून, विचारावरून आणि कामावरून ठरविला. त्यांच्या अनुभव मंटपात सर्व जातीधर्मातील शरणांना सारखेच दिले. त्याची सुरुवात सोलापुरातील मंगळवेढा येथून केली. व्यक्तीला जगण्यासाठी आर्थिक प्राप्तीची गरज असते. त्यासाठी व्यक्तीने आळस झटकून सतत काम केले पाहिजे. याद्वारे त्यांनी 'कायकवे कैलास' हा जगण्याचा मुलमंत्र दिला असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर यांचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. भीमराव पाटील (लातूर) यांनी केले.
            वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेचे शुभारंभाचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, सिद्धेश्वर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कावळे, सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. निलेश ठोकडे, मेतन फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यकटेश मेतन, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते.
           यावेळी आ. देशमुख म्हणाले की महात्मा बसवेश्वर यांनी बाराव्या शतकात समाजसुधारणेचा पाया घातला. त्यानंतर अनेक समाजसुधारकांनी त्यांचा वारसा चालवत महाराष्ट्राची जडणघडण केली. त्यामुळे महात्मा बसवेश्वर हे सामाजिक क्रांतीचे जनक आहेत.
             प्रारंभी चिदानंद मुस्तारे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कोटीवाले यांनी तर आभार विजयकुमार बिराजदार यांनी मानले.
          यावेळी उपस्थितांपैकी लकी ड्रॉ मधील पाच भाग्यवान विजेत्यास वीरशैव व्हिजनचे सचिव नागेश बडदाळ यांच्यावतीने पाच भेटवस्तू देण्यात आल्या.
          यावेळी बसव केंद्राच्या अध्यक्षा सिंधुताई काडादी, रोटरी क्लबचे डॉ. सिद्धेश्वर वाले, सावाचे अध्यक्ष महेश अंदेली, केमिस्ट असोसिएशनचे राजशेखर बारोळे, सिद्रामप्पा हुलसुरे आदी उपस्थित होते.
           कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमेश्वर याबाजी, नागेश बडदाळ, संजय साखरे, आनंद दुलंगे, शिवानंद सावळगी, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, राजेश नीला, गणेश घाळे, शिव कलशेट्टी, अविनाश हत्तरकी, सचिन विभुते, बसवराज जमखंडी, सोमनाथ चौधरी, अमोल कोटगोंडे, सिद्धेश्वर हत्तरकी, मलकप्पा बणजगोळे, अमित कलशेट्टी, चेतन लिगाडे यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळी : वीरशैव व्हिजनच्या बसव व्याख्यानमालेप्रसंगी प्रा. डॉ. भीमराव पाटील (लातूर), आ. विजयकुमार देशमुख, ऍड. निलेश ठोकडे, मल्लिकार्जुन कावळे, डॉ. व्यकटेश मेतन, सिद्धाराम उमदी, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...