महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संघटना तर्फे पुणे येथे म.बसवेश्वर जयंती चे आयोजन
सातारा, दि.27 - प्रणाली वाकडे प्रतिनिधी
महाराष्ट्र वीरशैव लिंगायत संघटना,पुणे .तसेच लिंगायत संघर्ष समिती ,महाराष्ट्र यांचे तर्फे श्री श्री श्री 1008 जगद्गुरु एकोरामाराध्य व जगदज्योती महात्मा बसवेश्वर जयंती मंगळवार दि.3 मे 2022 रोजी पुणे शहरामध्ये आयोजित करण्यात आली आहे.
पुणे महानगर पालीकेच्या वतीने म.बसवेश्वर पुतळ्याचे पूजन मंगळवार, दि.3 मे रोजी सकाळी 9 वा.महाराणा प्रताप उद्यान,बाजीराव रोड,टेलिफोन भवन समोर , म.बसवेश्वर चौक,पुणे येथे करण्यात येणार आहे.
तसेच संध्या.6.30 वा.प्रमुख पाहुणे मा.खासदार गिरीश बापट साहेब, मा. आ.उल्हास दादा पवार, मा. आ.अनंतराव गाडगीळ, मा आ.मोहन जोशी, मा.रमेश बागवे, मा.अभय छाजेड, मा.संजय बालगुडे, मा.अनिल गाडवे, मा.काकासाहेब कोयटे यांचे उपस्थितीत डॉ.महादेव शिवलिंग सगरे यांना ' वीरशैव भूषण ' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.तसेच या प्रसंगी मा.प्रा सतीश कुमदाळे यांचे
' म.बसवेश्वर' यांच्यावर व्याख्यान होणार आहे.तसेच ' लोकायत' सांस्कृतिक आघाडी यांचा कार्यक्रम होणार आहे.असे मा. सुनिल शेठ रुकारी व नरेंद्र मार्तंड व्यवहारे यांनी निमंत्रण पत्रिके द्वारे जाहीर केले आहे
या कार्यक्रमाला वीरशैव माहेश्वर मंडळ व दि विश्वेश्वर सहकारी बँक,पुणे यांचे संपूर्ण सहकार्य राहणार आहे.
या कार्यक्रमात कै.भिकुबाई मेन कुदळे पंचम लिंगायत ट्रस्ट,वीरशैव माहेश्र्वर मंडळ,वीरशैव तिराळी समाज,वीरशैव महिला भजनी मंडळ,वधू वर सूचक मंडळ,वीरशैव पद्मशाली लिंगायत कोष्टी समाज, अर्थसिद्धी नागरी सहकारी पतसंस्था,लिंगायत सेवा मंडळ,अष्टविनायक सोशल ग्रुप,श्री संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट,वीरशैव गवळी समाज,प्रेरणा वीरशैव महिला भजनी मंडळ,वीरशैव बुरुड समाज,कर्नाटक संघ,वीरशैव ज्येष्ठ नागरिक संघ,पुणे.
वीरशैव तरुण सेवा मंडळ,येरवडा.वीरशैव सेवा मंडळ,वडगाव शेरी.वीरशैव लिंगायत सेवा मंडळ,वडगाव धायरी.वीरशैव सांस्कृतिक सेवा मंडळ,पिंपरी चिंचवड.वीरशैव धारेश्वर सेवा संघ,वडगाव धायरी.सिद्धेश्वर सेवा संस्था, धनकवडी.वीरशैव सेवा मंडळ,हडपसर.वीरशैव मंडळ,मुंढवा.बसवेश्वर सेवा संस्था,धनकवडी.श्री संत शिवगंगा देवी विद्यालय,अरण्येश्वर मित्रमंडळ,गवळीवाडी,सह.नगर ,पुणे.वीरशैव को. ऑ.बँक लि.कोल्हापूर.अशा सर्व संस्था सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाला वीरशैव मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर ,लिंगायत संघर्ष समिती,पुणे यांचे खास सौजन्य लाभले आहे.
तरी आपल्या वीरशैव लिंगायत समाजातील सर्व बंधू भगिनी यांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.असे आवाहन समाज संघटने तर्फे करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment