खानापुरात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा..
खानापूर: दि 23 प्रतिनिधी लिंगायत TV live ( शिवकुमार कल्याणी )
राष्ट्रसंत,लिंगैक्य, डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे प्रथम स्मृतिदिन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडला,गुरूवर्यांनी राष्ट्रप्रेम, पर्यावरण संरक्षण,व किर्तन, सत्संग व भजनातुन समाजप्रबोधनाचे अतुल्य कार्य केले,वयाचे शंभरी पार केल्यानंतर ते ज्या तडफडीने समाजाला मार्गदर्शन करीत होते ती त्यांच्यातली ऊर्जा आश्चर्यकारकच होती, अध्यात्मिक क्षेत्रातील एक विज्ञाननिष्ठ कर्मयोगी अशी गुरूमाऊली राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची ओळख होती,अशा शब्दांत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्याप्रति शब्दसुमनांजली अर्पण केली, खानापूर येथील विरभद्र स्वामी मठात राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माजी उपसरपंच अनंत पाटील खानापूर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी राष्ट्रसंताच्या स्मृतींची पुष्पपुजा करून अभिवादन करण्यात आले,व तदनंतर भावीक भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात आले, यावेळी , ग्रामपंचायत सदस्य राजेश्वर अटकळे, मारोती परबते,रवी कामशेटे, नांदेड ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवकुमार ताडकोले, सामाजिक कार्यकर्ते निळकंठ पटणे,संजय धनसुरे, बसवेश्वर भजनी मंडळाचे शंकर पटणे , उमाकांत स्वामी व इतर अनेक गावकऱ्यांची उपस्थिती होती..
No comments:
Post a Comment