Sunday, September 5, 2021

उंब्रज येथील प्रसिद्ध उद्योजक मा राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार प्रदान


उंब्रज येथील प्रसिद्ध उद्योजक मा राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार प्रदान
उंब्रज दि ५:- प्रतिनिधी (लिंगायत TV live प्रसाद वाकडे)
उंब्रज येथील प्रसिद्ध उद्योजक मा राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार प्रदान करणेत आला.
नेल्सन मंडेला नोबेल पुरस्कार 4 सप्टेंबर  2021 रोजी ताज हॉटेल अहमदाबाद गुजरात येथे  संपन्न झाला. 

 सदरच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री माननीय महोदय श्री रामदास आठवले , श्री प्रल्हाद दामोदरदास मोदी , डॉक्टर राजकुमार टाक, माननीय श्री उदित नारायण, माननीय मंदिरा बेदी, कर्नल शैलेंद्र सिंह व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.  सदरचा पुरस्कार  मा पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे बंधू श्री प्रल्हाद दामोदरदास मोदी यांच्या हस्ते श्री राजेंद्र प्रल्हादशेठ घुटे यांना नेल्सन मंडेला नोबल पुरस्कार व अमेरिकन विद्यापीठाची बिजनेस मॅनेजमेंट करिता डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. श्री राजेंद्र  प्रल्हादशेठ घुटे यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल लिंगायत समाज उंब्रज आणि सर्व उंब्रजकर ग्रामस्थ यांचे कडून अभिनंदन करणेत येत आहे

No comments:

Post a Comment

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे , सातारा येथे बसव पुरस्कार वितरण.

लिंगायत महिलांनी व्यवसायाच्या बाबतीत स्वावलंबी व्हावे - काकासाहेब कोयटे ,  सातारा येथे बसव पुरस्कार वितरण             ...