संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात संपन्न
औरंगाबाद दि 28:- प्रतिनिधी
संगमेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ची 27 वी वार्षिक सर्वसाधरण सभा मोठ्या उत्साहात व सर्व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाली.या वेळी श्री मन्मथस्वामी व क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना नेते मा.खा.चंद्रकांत खैरे साहेब, उदघाटक डॉ शिवकुमार संतपुरे हे होते.प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी,
माजी नगरसेवक विरभद्र गादगे, मा.सौ.कविता नावंदे(जिल्हा क्रीडधिकारी), मा.सौ.अंजली मिटकर-हुरणे(औषधी निरीक्षक), मा.सौ. भारती सोसे(क.प्रकल्प अधिकारी मा.उ. वि. के.), मा.श्री. सागर अप्पा वाडकर, यांची उपस्थिती होती.
अहवाल वाचन प्रा.नंदकिशोर गवंडर यांनी केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष श्री शिवा अप्पा खांडखुळे यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जयश्री लद्दे यांनी केले.सचिव कैलासअप्पा झारेकर यांनी आभार प्रदर्शन केले.या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व संचालक व कर्मचारी वृंद,सभासद यांची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment