शिक्षणाचा पाया मजबूत करण्याचे काम कर्तव्यभावनेतून करा – जगदाळे,स्वाती चेणगे - बाजारे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान
कराड : ( लिंगायत TV live )
शिक्षण हा विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा पाया असून तो मजबुत असेल तरच त्यावर कळस चढतो. तो शिक्षणाचा पाया मजबुत करण्याचे काम कर्तव्यभावनेतून करा, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी कराड येथे केले.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने कराड पंचायत समितीच्या वतीने आयोजित 'स्व. यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार' वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अॅड. उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, सागर शिवदास, प्राचार्य गणपतराव कणसे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात स्वाती बाजारे, खुर्शिद पटेल, जयश्री कुंभार, शारदा क्षीरसागर, माधवी चव्हाण, शोभा शिंदे, हरिदास माने, संभाजी यादव यांच्यासह २४ गुरूजनांना पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले.
दिशा देण्याचे काम ही नैतिक जबाबदारी कोरोनामुळे शिक्षणाचा पॅटर्न बदलला आहे. या बदलत्या काळात ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थी जोपर्यंत शिकत नाही, तोपर्यंत प्रगतीच्या गप्पांना अर्थ नाही. त्यामुळे उद्याचा महाराष्ट्र, उद्याचा देश घडवण्याच्या दृष्टीने शिक्षकांनी ज्ञानदानाचे काम करावे, असे आवाहन मानसिंगराव जगदाळे यांनी यावेळी केले. मातापित्यांच्या नंतर वंदनीय स्थान गुरूला असते. विद्यार्थी घडला, तर तो आयुष्यभर आपल्या शिक्षकाचे नाव काढत असतो. त्याला दिशा देण्याचे काम करणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे. पुरस्काराच्या रूपाने ही जबाबदारी आणखी वाढली आहे, असे प्रतिपादन अॅड. उदयसिंह पाटील यांनी याप्रसंगी केलेजे काम स्वीकारले, ते आनंदाने करा !केवळ पाठ्यपुस्तक म्हणजे शिक्षण नव्हे. त्याच्या पलीकडे जावून ज्ञानकण वेचावे लागतील व ते विद्यार्थ्यांमध्ये पेरावे लागतील. त्यासाठी वाचन वाढवून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे लागेल, असे सांगत, जे काम स्वीकारले आहे, ते लादले आहे या भावनेतून नव्हे, तर आनंदाने करा, असा कानमंत्र प्राचार्य कणसे यांनी गुरूजनांना दिला. यावेळी प्रणव ताटे, रमेश चव्हाण, वनिता पलंगे, शिक्षण विस्तार अधिकारी जमिला मुलाणी, सन्मती देशमाने यांचीही भाषणे झाली. पुरस्कार विजेत्यांपैकी हणमंत ताटे, विक्रम पाटील, माधवी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी स्वागत, उपसभापती रमेश देशमुख यांनी प्रास्ताविक केले.
पुरस्कारप्राप्त गुरूजनांची यादी,श्रीमती खुर्शिद पटेल (हजारमाची),सौ. जयश्री अरूण कुंभार (चरेगाव),सौ. शारदा सुधाकर क्षीरसागर (शामगाव),सौ. माधवी सोमनाथ चव्हाण (कोरेगाव),सौ. शोभा विजय शिंदे (हेळगाव),हरिदास रामचंद माने (मस्करवाडी - इंदोली),संभाजी राजाराम यादव (शिवाजीनगर - काले),सौ. कुसुम पोपट देसाई (वानरवाडी),सौ. विजया शिरिष पाटील (सैदापूर),श्रीमती मनिषा तानाजी माने (पाचवड मळा),सौ. स्वाती सूर्यकांत बाजारे (मसूर मुली),संजय महादेव शेंडे (बांदेकरवाडी),सौ. आशाताई उत्तम निकम (कोर्टी),विक्रम वसंत पाटील (पवारमळा, रेठरे बुद्रुक),सुरेश आनंदा चव्हाण (केसे),श्रीकांत नामदेव बाबर (डेळेवाडी),सौ. मनिषा शंकर रामुगडे (उंब्रज मुली} ,सौ. मिनाक्षी अशोक गायकवाड (उंडाळे),महेशकुमार उत्तमराव बोंगाळे (कोडोली),सौ. सुवर्णा कुमार पाटील (वहागाव),प्रल्हाद पांडुरंग कदम (मालखेड),श्रीमती विजया प्रकाश पाटील (शिंगणवाडी),तानाजी शामराव गुजर (भरेवाडी),राजाराम सिदू जगताप (म्हासोली)
No comments:
Post a Comment